logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

बाम्पेवाडा परिसरात वाघाने तिसऱ्यांदा केला हल्ला साकोली तालुक्यातील आमगाव बुज येथील रहिवासी असणार्या महिला छाया सुधाकर मुंगमोडे वय 53 या शेतामध्ये काड्या जमा करत असताना वाघाने अचानक मागेहून तिच्यावर हल्ला केला आणि मानेला आणि कानाला जखमी केले त्यांचा सतरा वर्षीय मुलगा तन्मय यांनीआरडाओरड करित वाघाच्या मागे धावल्याने वाघाने छाया यांना सोडून तो पळून गेला त्यामुळे त्यांचा जीव वाचला असला तरी छाया या गंभीर जखमी झाल्याने त्यांना साकोली उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर नागपूर येथे सरकारी दवाखान्यांमध्ये उपचारासाठी पाठवण्यात आले आहे हे घटना बुधवार दिनांक 1 एप्रिलला सकाळी नऊ वाजता घडली आहे छाया यांच्याकडे दोन एकर जमीन असून त्या शेतामध्ये व काड्या जमा करण्यासाठी गेल्या होत्या काढाव्यातच असताना अचानक त्यांच्यावर वागणे हल्ला केला त्यांचा उदरनिर्वाह पूर्णपणे शेतीवर करत असून पती एक सतरा वर्षाचा मुलगा व एक सहा वर्षाची मुलगी आहे बामपेवड्या परिसरात या 15 दिवसात वाघाने तीन वेळा हल्ला केला आहे यात बॉम्बेवाडा येथील वसंता मेश्राम यांचा जीव गेला तर उमरझरी येथील महिला माया रामकृष्ण सोनवाने यांच्या वर हल्ला करून जखमी केले व आज छाया मुंगमोडे यांच्या वर हल्ला केला या तीनही घटनेत हल्ला करणारा वाघ हा एकच सण तो नरभक्षक झाला आहे परिसरात भीतीचे प्रचंड वातावरण पसरले असून या वाघाला जेरबंद करण्याची मागणीजिल्हा परिषद सदस्य अविनाश ब्राम्हणकर, माजी जि प सदस्य नेपाल रंगारी ,माजी.जि. प सदस्य माहेश्वरी नेवारे तसेच पिंडकेपारचे सरपंच नंदकुमार समरीत , यांनी केली आहे यावेळी त्यांचा सतरा वर्षीय मुलगा तन्मय याने घटना कशी घडली याबाबतची माहिती दिली

1 hr ago
user_मनिषा विजय काशीवार
मनिषा विजय काशीवार
साकोली, भंडारा, महाराष्ट्र•
1 hr ago

बाम्पेवाडा परिसरात वाघाने तिसऱ्यांदा केला हल्ला साकोली तालुक्यातील आमगाव बुज येथील रहिवासी असणार्या महिला छाया सुधाकर मुंगमोडे वय 53 या शेतामध्ये काड्या जमा करत असताना वाघाने अचानक मागेहून तिच्यावर हल्ला केला आणि मानेला आणि कानाला जखमी केले त्यांचा सतरा वर्षीय मुलगा तन्मय यांनीआरडाओरड करित वाघाच्या मागे धावल्याने वाघाने छाया यांना सोडून तो पळून गेला त्यामुळे त्यांचा जीव

वाचला असला तरी छाया या गंभीर जखमी झाल्याने त्यांना साकोली उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर नागपूर येथे सरकारी दवाखान्यांमध्ये उपचारासाठी पाठवण्यात आले आहे हे घटना बुधवार दिनांक 1 एप्रिलला सकाळी नऊ वाजता घडली आहे छाया यांच्याकडे दोन एकर जमीन असून त्या शेतामध्ये व काड्या जमा करण्यासाठी गेल्या होत्या काढाव्यातच असताना अचानक त्यांच्यावर वागणे हल्ला केला त्यांचा उदरनिर्वाह पूर्णपणे

शेतीवर करत असून पती एक सतरा वर्षाचा मुलगा व एक सहा वर्षाची मुलगी आहे बामपेवड्या परिसरात या 15 दिवसात वाघाने तीन वेळा हल्ला केला आहे यात बॉम्बेवाडा येथील वसंता मेश्राम यांचा जीव गेला तर उमरझरी येथील महिला माया रामकृष्ण सोनवाने यांच्या वर हल्ला करून जखमी केले व आज छाया मुंगमोडे यांच्या वर हल्ला केला या तीनही घटनेत हल्ला

करणारा वाघ हा एकच सण तो नरभक्षक झाला आहे परिसरात भीतीचे प्रचंड वातावरण पसरले असून या वाघाला जेरबंद करण्याची मागणीजिल्हा परिषद सदस्य अविनाश ब्राम्हणकर, माजी जि प सदस्य नेपाल रंगारी ,माजी.जि. प सदस्य माहेश्वरी नेवारे तसेच पिंडकेपारचे सरपंच नंदकुमार समरीत , यांनी केली आहे यावेळी त्यांचा सतरा वर्षीय मुलगा तन्मय याने घटना कशी घडली याबाबतची माहिती दिली

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • Post by मनिषा विजय काशीवार
    4
    Post by मनिषा विजय काशीवार
    user_मनिषा विजय काशीवार
    मनिषा विजय काशीवार
    साकोली, भंडारा, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • महागावात बिबट्याची दहशत; रेस्क्यू पथकाची पुन्हा मोहीम सुरू महागाव शहर व परिसरातील शेतांमध्ये बिबट्याची दहशत पसरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर कर्तव्यदक्ष कलेक्टर विकास मीना यांच्या आदेशानुसार बिबट्याच्या शोधासाठी रेस्क्यू पथकाने पुन्हा एकदा मोहीम हाती घेतली आहे. वनविभागासह संबंधित यंत्रणा सतर्कतेने काम करत असून, बिबट्याचा शोध वेगाने सुरू आहे. परिसरात गस्त वाढविण्यात आली असून संभाव्य ठिकाणी पिंजरे व सापळे लावण्याची तयारी सुरू आहे. प्रशासनाकडून लवकरच बिबट्याला पकडून जेरबंद करण्यात येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे, एकट्याने शेतात न जाणे, रात्रीच्या वेळी बाहेर पडताना काळजी घेणे व संशयास्पद हालचाली दिसल्यास त्वरित वनविभागाला कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
    2
    महागावात बिबट्याची दहशत; रेस्क्यू पथकाची पुन्हा मोहीम सुरू
महागाव शहर व परिसरातील शेतांमध्ये बिबट्याची दहशत पसरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर कर्तव्यदक्ष कलेक्टर विकास मीना यांच्या आदेशानुसार बिबट्याच्या शोधासाठी रेस्क्यू पथकाने पुन्हा एकदा मोहीम हाती घेतली आहे.
वनविभागासह संबंधित यंत्रणा सतर्कतेने काम करत असून, बिबट्याचा शोध वेगाने सुरू आहे. परिसरात गस्त वाढविण्यात आली असून संभाव्य ठिकाणी पिंजरे व सापळे लावण्याची तयारी सुरू आहे.
प्रशासनाकडून लवकरच बिबट्याला पकडून जेरबंद करण्यात येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे, एकट्याने शेतात न जाणे, रात्रीच्या वेळी बाहेर पडताना काळजी घेणे व संशयास्पद हालचाली दिसल्यास त्वरित वनविभागाला कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
    user_Taha Mirza
    Taha Mirza
    Teacher महागाव, यवतमाळ, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • सरपंच अनिलकुमार सोयाम अखेर अपात्र, उपसरपंच गुनाराम मेहर यांनी स्वीकारला पदभार नमस्कार, ‘सत्य को जानो’ न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. सालेकसा (जि. गोंदिया): सालेकसा तालुक्यातील पिपरिया ग्रामपंचायतीमध्ये 'नागरी सुविधा' योजनेच्या निधीत झालेल्या लाखो रुपयांच्या भ्रष्टाचारप्रकरणी राज्य शासनाने मोठा निर्णय दिला आहे. अप्पर आयुक्त नागपूर यांच्या अपात्रतेच्या निर्णयाविरोधात माजी सरपंच अनिलकुमार तेजलाल सोयाम यांनी केलेले अपील ग्रामविकास मंत्रालयाने फेटाळून लावले आहे. या निर्णयानंतर आज उपसरपंच गुनाराम बुधराम मेहर यांच्याकडे सरपंच पदाचा प्रभारी पदभार सोपवण्यात आला असून, गावात फटाक्यांच्या आतिशबाजीत जल्लोष साजरा करण्यात आला. माहिती अधिकारातून झाला घोटाळ्याचा पर्दाफाश डिसेंबर २०२३ मध्ये ग्रामपंचायतीच्या निधीत हेराफेरी झाल्याची कुणकुण लागताच, गुनाराम मेहर यांनी त्यांचे सहकारी धिरेंद्र अग्रवाल यांच्या माध्यमातून माहिती अधिकारांतर्गत कागदपत्रे मिळवली. या कागदपत्रांच्या आधारे १ मार्च २०२४ रोजी जिल्हा परिषद गोंदियाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली होती. चौकशीत सरपंच आणि सचिव दोषी आढळल्यानंतर, विभागीय आयुक्तांनी १४ जानेवारी २०२५ रोजी सोयाम यांना अपात्र घोषित केले होते. कसा झाला २८ लाखांचा घोटाळा? (तपशील) तक्रारीनुसार, नागरी सुविधा योजनेच्या एकूण निधीपैकी ३३% म्हणजेच सुमारे २८ लाख रुपयांची अफरातफर करण्यात आली. पत्रात नमूद केल्यानुसार खालीलप्रमाणे रकमांची हेराफेरी झाली: * वर्ष २०२०-२१: १० नोव्हेंबर २०२३ रोजी प्राप्त झालेल्या १३,५८,९९९ रुपयांपैकी १०,००,३२० रुपये नियमबाह्यरीत्या 'ओम बिल्डिंग मटेरियल'ला देण्यात आले. वास्तविक ही रक्कम 'कृष्णकुमार बिल्डिंग मटेरियल'ला देणे अपेक्षित होते. * वर्ष २०२०-२२ (पूरक): १५,००,००० रुपयांपैकी १,५०,००० रुपये चुकीच्या पद्धतीने आरटीजीएस करण्यात आले. * वर्ष २०२२-२३: ८ नोव्हेंबर २०२३ रोजी प्राप्त १२,८७,५४९ रुपयांपैकी ८,८३,४०४ रुपये पुन्हा 'ओम बिल्डिंग मटेरियल'ला तर ३,७८,६०१ रुपये 'अंजली सायकलबार'ला वळवण्यात आले. या व्यवहारांमध्ये सरपंच, सचिव आणि तत्कालीन लोकप्रतिनिधींची मिलिभगत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. जंगी स्वागत आणि सत्कार मंत्रालयाच्या अंतिम आदेशानंतर पिपरिया ग्रामपंचायतीची सूत्रे आता गुनाराम मेहर यांच्या हाती आली आहेत. आज पदभार स्वीकारताना माजी सरपंच मधुताई धिरेंद्र अग्रवाल, भाजप नेते रामलाल डिब्बे, ग्रामपंचायत सदस्य आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. नूतन प्रभारी सरपंचांचे गुलाल उधळून आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. "हा भ्रष्टाचाराविरुद्धचा आणि सर्वसामान्य जनतेचा विजय आहे," अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या. फटाक्यांच्या आवाजात गावकऱ्यांनी या निर्णयाचे स्वागत केले. पुढील कारवाईकडे लक्ष सरपंच अपात्र ठरल्यानंतर आता या घोटाळ्यात सामील असलेल्या इतर दोषींवर आणि संबंधित कंत्राटदारांवर प्रशासन काय कारवाई करणार, याकडे संपूर्ण सालेकसा तालुक्याचे लक्ष लागले आहे.
    1
    सरपंच अनिलकुमार सोयाम अखेर अपात्र, उपसरपंच गुनाराम मेहर यांनी स्वीकारला पदभार
नमस्कार, ‘सत्य को जानो’ न्यूजमध्ये आपले स्वागत आहे.
सालेकसा (जि. गोंदिया):
सालेकसा तालुक्यातील पिपरिया ग्रामपंचायतीमध्ये 'नागरी सुविधा' योजनेच्या निधीत झालेल्या लाखो रुपयांच्या भ्रष्टाचारप्रकरणी राज्य शासनाने मोठा निर्णय दिला आहे. अप्पर आयुक्त नागपूर यांच्या अपात्रतेच्या निर्णयाविरोधात माजी सरपंच अनिलकुमार तेजलाल सोयाम यांनी केलेले अपील ग्रामविकास मंत्रालयाने फेटाळून लावले आहे. या निर्णयानंतर आज उपसरपंच गुनाराम बुधराम मेहर यांच्याकडे सरपंच पदाचा प्रभारी पदभार सोपवण्यात आला असून, गावात फटाक्यांच्या आतिशबाजीत जल्लोष साजरा करण्यात आला.
माहिती अधिकारातून झाला घोटाळ्याचा पर्दाफाश
डिसेंबर २०२३ मध्ये ग्रामपंचायतीच्या निधीत हेराफेरी झाल्याची कुणकुण लागताच, गुनाराम मेहर यांनी त्यांचे सहकारी धिरेंद्र अग्रवाल यांच्या माध्यमातून माहिती अधिकारांतर्गत कागदपत्रे मिळवली. या कागदपत्रांच्या आधारे १ मार्च २०२४ रोजी जिल्हा परिषद गोंदियाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली होती. चौकशीत सरपंच आणि सचिव दोषी आढळल्यानंतर, विभागीय आयुक्तांनी १४ जानेवारी २०२५ रोजी सोयाम यांना अपात्र घोषित केले होते.
कसा झाला २८ लाखांचा घोटाळा? (तपशील)
तक्रारीनुसार, नागरी सुविधा योजनेच्या एकूण निधीपैकी ३३% म्हणजेच सुमारे २८ लाख रुपयांची अफरातफर करण्यात आली. पत्रात नमूद केल्यानुसार खालीलप्रमाणे रकमांची हेराफेरी झाली:
* वर्ष २०२०-२१: १० नोव्हेंबर २०२३ रोजी प्राप्त झालेल्या १३,५८,९९९ रुपयांपैकी १०,००,३२० रुपये नियमबाह्यरीत्या 'ओम बिल्डिंग मटेरियल'ला देण्यात आले. वास्तविक ही रक्कम 'कृष्णकुमार बिल्डिंग मटेरियल'ला देणे अपेक्षित होते.
* वर्ष २०२०-२२ (पूरक): १५,००,००० रुपयांपैकी १,५०,००० रुपये चुकीच्या पद्धतीने आरटीजीएस करण्यात आले.
* वर्ष २०२२-२३: ८ नोव्हेंबर २०२३ रोजी प्राप्त १२,८७,५४९ रुपयांपैकी ८,८३,४०४ रुपये पुन्हा 'ओम बिल्डिंग मटेरियल'ला तर ३,७८,६०१ रुपये 'अंजली सायकलबार'ला वळवण्यात आले.
या व्यवहारांमध्ये सरपंच, सचिव आणि तत्कालीन लोकप्रतिनिधींची मिलिभगत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
जंगी स्वागत आणि सत्कार
मंत्रालयाच्या अंतिम आदेशानंतर पिपरिया ग्रामपंचायतीची सूत्रे आता गुनाराम मेहर यांच्या हाती आली आहेत. आज पदभार स्वीकारताना माजी सरपंच मधुताई धिरेंद्र अग्रवाल, भाजप नेते रामलाल डिब्बे, ग्रामपंचायत सदस्य आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
नूतन प्रभारी सरपंचांचे गुलाल उधळून आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. "हा भ्रष्टाचाराविरुद्धचा आणि सर्वसामान्य जनतेचा विजय आहे," अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या. फटाक्यांच्या आवाजात गावकऱ्यांनी या निर्णयाचे स्वागत केले.
पुढील कारवाईकडे लक्ष
सरपंच अपात्र ठरल्यानंतर आता या घोटाळ्यात सामील असलेल्या इतर दोषींवर आणि संबंधित कंत्राटदारांवर प्रशासन काय कारवाई करणार, याकडे संपूर्ण सालेकसा तालुक्याचे लक्ष लागले आहे.
    user_नरेश बोपचे
    नरेश बोपचे
    Journalist आमगाव, गोंदिया, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • कुही-वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या महिलेच्या वारसांना २५ लाखांची आर्थिक मदत . दहा लाख रुपयांचा तात्काळ धनादेश तर बाकी पंधरा लाख रुपये मिळणार फिक्स च्या स्वरूपात. निर्मला श्रीपत गभणे वय वर्षे ७८ यांचा शेतात काम करताना वाघाने केलेल्या हल्यात दि.२७/३/२०२६ ला झाला होता मृत्यू, यावेळी वारसांना सह वनविभागाचे कर्मचारी व अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते
    1
    कुही-वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या महिलेच्या वारसांना २५ लाखांची आर्थिक मदत . दहा लाख रुपयांचा तात्काळ धनादेश तर बाकी पंधरा लाख रुपये मिळणार फिक्स च्या स्वरूपात. निर्मला श्रीपत गभणे वय वर्षे ७८ यांचा शेतात काम करताना वाघाने केलेल्या हल्यात दि.२७/३/२०२६ ला झाला होता मृत्यू, यावेळी वारसांना सह वनविभागाचे कर्मचारी व अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते
    user_Sharad shahare
    Sharad shahare
    कुही, नागपूर, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • Post by Samachar king digital
    1
    Post by Samachar king digital
    user_Samachar king digital
    Samachar king digital
    Local News Reporter Nagpur, Maharashtra•
    14 hrs ago
  • वानाडोंगरीत भूमाफियांचा मोठा घोटाळा उघड ! ओपन जागा विक्रीचा आरोप नागपूर :- वानाडोंगरी परिसरात शहाकार गृह निर्माण सहकारी सोसायटीने लेआउटमधील मूळ नकाशा बदलून ओपन जागा विकल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. अशा प्रकारचे व्यवहार नगर परिषद प्रशासनाच्या संमतीशिवाय होऊ शकत नाहीत, असा थेट सवाल उपस्थित करण्यात आला आहे. सेवानिवृत्त कॅप्टन गोपाल ठाकरे यांनी नगराध्यक्ष आणि नगरसेवकांवर निशाणा साधत म्हटले की, प्रभाग क्रमांक १ ते १२ मध्ये आरक्षित जागा नकाशा बदलून कशा विकल्या गेल्या याची चौकशी करावी. संबंधित सर्व कागदपत्रे बाहेर काढून दोषींवर पोलिसांत गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे. सिंधू नरुले यांच्या नावावर महसूल विभागात जमीन नोंद असतानाही ती बेकायदेशीररीत्या प्लॉट करून विकण्यात आली. त्यावर ग्राहकांना कर आकारणी कशाच्या आधारे करण्यात आली ? तसेच त्या ठिकाणी रस्ते, नाले, पाणीपुरवठा यांसारखी विकासकामे कशी झाली, याबाबतही मोठे प्रश्न उपस्थित झाले आहेत. “नगर परिषदेत दाल काळी नाही, तर पूर्ण दाळच काळी आहे,” असा घणाघाती आरोप करत ठाकरे यांनी लोकप्रतिनिधींनाच थेट जबाबदार धरले आहे. त्यांनी हा मुद्दा सोशल मीडियावर व्हिडिओद्वारे व्हायरल करत प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला आहे. जोपर्यंत या प्रकरणातील दोषींना जेलची हवा लागत नाही, तोपर्यंत मी पाठपुरावा सुरू ठेवणार, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
    1
    वानाडोंगरीत भूमाफियांचा मोठा घोटाळा उघड ! ओपन जागा विक्रीचा आरोप
नागपूर :- वानाडोंगरी परिसरात शहाकार गृह निर्माण सहकारी सोसायटीने लेआउटमधील मूळ नकाशा बदलून ओपन जागा विकल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. अशा प्रकारचे व्यवहार नगर परिषद प्रशासनाच्या संमतीशिवाय होऊ शकत नाहीत, असा थेट सवाल उपस्थित करण्यात आला आहे.
सेवानिवृत्त कॅप्टन गोपाल ठाकरे यांनी नगराध्यक्ष आणि नगरसेवकांवर निशाणा साधत म्हटले की, प्रभाग क्रमांक १ ते १२ मध्ये आरक्षित जागा नकाशा बदलून कशा विकल्या गेल्या याची चौकशी करावी. संबंधित सर्व कागदपत्रे बाहेर काढून दोषींवर पोलिसांत गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.
सिंधू नरुले यांच्या नावावर महसूल विभागात जमीन नोंद असतानाही ती बेकायदेशीररीत्या प्लॉट करून विकण्यात आली. त्यावर ग्राहकांना कर आकारणी कशाच्या आधारे करण्यात आली ? तसेच त्या ठिकाणी रस्ते, नाले, पाणीपुरवठा यांसारखी विकासकामे कशी झाली, याबाबतही मोठे प्रश्न उपस्थित झाले आहेत.
“नगर परिषदेत दाल काळी नाही, तर पूर्ण दाळच काळी आहे,” असा घणाघाती आरोप करत ठाकरे यांनी लोकप्रतिनिधींनाच थेट जबाबदार धरले आहे. त्यांनी हा मुद्दा सोशल मीडियावर व्हिडिओद्वारे व्हायरल करत प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला आहे.
जोपर्यंत या प्रकरणातील दोषींना जेलची हवा लागत नाही, तोपर्यंत मी पाठपुरावा सुरू ठेवणार, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
    user_SATISH M. BHALERAO
    SATISH M. BHALERAO
    नागपूर (ग्रामीण), नागपूर, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • छत्तीसगड कांकेरमध्ये दोन नक्षलवाद्यांनी एके-४७ सह केले आत्मसमर्पण जंगलात लपून बसलेल्या साथीदारांना मुख्य प्रवाहात परत येण्याचे आवाहन केले....
    1
    छत्तीसगड कांकेरमध्ये दोन नक्षलवाद्यांनी एके-४७ सह केले आत्मसमर्पण
जंगलात लपून बसलेल्या साथीदारांना मुख्य प्रवाहात परत येण्याचे आवाहन केले....
    user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    Co-ed school हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • Post by मनिषा विजय काशीवार
    4
    Post by मनिषा विजय काशीवार
    user_मनिषा विजय काशीवार
    मनिषा विजय काशीवार
    साकोली, भंडारा, महाराष्ट्र•
    3 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.