logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

महाराष्ट्राची परंपरा जपणाऱ्या शिक्षकांचा शिवसेनेकडून गौरव

8 hrs ago
user_वणी न्यूज एक्सप्रेस
वणी न्यूज एक्सप्रेस
Wani, Yavatmal•
8 hrs ago

महाराष्ट्राची परंपरा जपणाऱ्या शिक्षकांचा शिवसेनेकडून गौरव

More news from Yavatmal and nearby areas
  • महाराष्ट्राची परंपरा जपणाऱ्या शिक्षकांचा शिवसेनेकडून गौरव
    1
    महाराष्ट्राची परंपरा जपणाऱ्या शिक्षकांचा शिवसेनेकडून गौरव
    user_वणी न्यूज एक्सप्रेस
    वणी न्यूज एक्सप्रेस
    Wani, Yavatmal•
    8 hrs ago
  • किटकजन्य आजाराबाबत भारत विद्यालय हिंगणघाट येथे जनजागृती कार्यक्रम... वर्धा हिंगणघाट आज भारत विद्यालय हिंगणघाट येथे किटकजन्यआजाराबाबत जिल्हा हिवताप अधिकारी वर्धा डॉ. नलिनी विखे ,वैद्यकीय अधीक्षक , उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट डॉ. आशिष लांडे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ, प्रभाकर नाईक, यांच्या मार्गदर्शनाखाली जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला . यावेळी शाळेचे मुख्याध्यापक भट्टड सर, शाळेच्या पर्यवेक्षिका मॅडम तसेच शिक्षकवॄंद, व इतर कर्मचारी, तालुका पर्यवेक्षिका पुनम भुसारी , उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट येथील मलेरिया विभागाचे आरोग्य निरीक्षक श्री उमेश मेश्राम, आरोग्य कर्मचारी असलम फारुकी, डाखराम मेश्राम, , शहरी भागातील आरोग्यवर्धिनी केंद्राचे आरोग्य कर्मचारी,व हत्तीरोग विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांना आरोग्य पर्यवेक्षिका पूनम भुसारी यांनी किटकजन्य आजाराबाबत सविस्तर माहिती दिली व त्यापासून उद्भवणारे आजार मलेरिया ,डेंग्यू, चिकनगुनिया , स्क्रबटायफस , हत्तीरोग या सर्व आजारांची लक्षणे सांगितली तसेच काळजी घेण्याचे आवाहन केले. श्री उमेश मेश्राम आरोग्य निरीक्षक यांनी राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत राबविण्यात येणारे विविध कार्यक्रमाविषयी माहिती दिली तसेच आपल्या आजूबाजूला असलेले निकामी झालेले टायर मडके नारळाच्या करवंट्या हे नष्ट किंवा उलटे करून ठेवावे तसेच आपला आजुबाजुचा परिसर स्वच्छ ठेवावा व किटकजन्य आजारापासुन दूर राहावे असे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच आरोग्य कर्मचारी असलम फारुकी यांनी विद्यार्थ्यांना शाळेमध्ये लावण्यात आलेल्या प्रदर्शनी बॅनऀरवरची किटकजन्य आजार कोणते होतात तसेच डासांपासुन कोणते आजार होतात याची सविस्तर माहिती दिली. श्री .डाखराम मेश्राम आरोग्य कर्मचारी यांनी गप्पी मासे बाबत माहिती दिली लारवा व गप्पी मासे यांचे प्रदर्शन लावले. यावेळी शाळेतील सर्व शिक्षकवृंदांनी सहकार्य केले. शाळेतील सर्व विद्यार्थीनी किटकजन्य आजार बाबत माहिती जाणुन घेतली. सोनल पातोंड मॅडम, कोंडावार मॅडम, शाळेतील सर्व शिक्षकवृंद, कर्मचारी शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले यावेळी उपजिल्हा रुग्णालयाचे शुभम गावंडे, रोशन सावळीकर, सुभाष वाडगे, शशिकृतभुजाडे, मंगेश राऊत , राम उजवणे,, मुंजेवार, भागवत ,शहरी भागातील आरोग्यवर्धिनीचे सर्व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.
    1
    किटकजन्य आजाराबाबत भारत विद्यालय हिंगणघाट येथे जनजागृती कार्यक्रम...
वर्धा हिंगणघाट
आज  भारत विद्यालय हिंगणघाट येथे किटकजन्यआजाराबाबत जिल्हा हिवताप अधिकारी वर्धा डॉ. नलिनी विखे ,वैद्यकीय अधीक्षक , उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट  डॉ. आशिष लांडे, 
तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ, प्रभाकर नाईक, यांच्या मार्गदर्शनाखाली जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला .
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक भट्टड सर, शाळेच्या पर्यवेक्षिका मॅडम तसेच शिक्षकवॄंद, व इतर कर्मचारी, तालुका पर्यवेक्षिका पुनम भुसारी ,
उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट येथील मलेरिया विभागाचे आरोग्य निरीक्षक श्री उमेश मेश्राम, आरोग्य कर्मचारी असलम फारुकी, डाखराम मेश्राम, 
, शहरी भागातील आरोग्यवर्धिनी केंद्राचे आरोग्य कर्मचारी,व हत्तीरोग विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. 
यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांना आरोग्य पर्यवेक्षिका पूनम भुसारी यांनी किटकजन्य आजाराबाबत  सविस्तर माहिती दिली व त्यापासून उद्भवणारे आजार मलेरिया ,डेंग्यू, चिकनगुनिया , स्क्रबटायफस , हत्तीरोग या सर्व आजारांची लक्षणे सांगितली तसेच काळजी घेण्याचे आवाहन केले.
श्री उमेश मेश्राम आरोग्य निरीक्षक यांनी राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत राबविण्यात येणारे विविध कार्यक्रमाविषयी माहिती दिली तसेच आपल्या आजूबाजूला असलेले निकामी झालेले टायर मडके नारळाच्या करवंट्या हे नष्ट किंवा उलटे करून ठेवावे तसेच आपला आजुबाजुचा परिसर स्वच्छ ठेवावा व किटकजन्य आजारापासुन दूर राहावे असे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
तसेच आरोग्य कर्मचारी असलम फारुकी यांनी विद्यार्थ्यांना शाळेमध्ये लावण्यात आलेल्या प्रदर्शनी बॅनऀरवरची किटकजन्य आजार कोणते होतात तसेच डासांपासुन कोणते आजार होतात याची सविस्तर माहिती दिली. 
श्री .डाखराम मेश्राम आरोग्य कर्मचारी यांनी गप्पी मासे बाबत माहिती दिली  लारवा व गप्पी मासे यांचे प्रदर्शन लावले.
यावेळी शाळेतील सर्व शिक्षकवृंदांनी सहकार्य केले. शाळेतील सर्व विद्यार्थीनी किटकजन्य आजार बाबत माहिती जाणुन घेतली.
सोनल पातोंड मॅडम, कोंडावार  मॅडम, शाळेतील सर्व शिक्षकवृंद, कर्मचारी शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले यावेळी उपजिल्हा रुग्णालयाचे शुभम गावंडे,  रोशन सावळीकर, सुभाष वाडगे, शशिकृतभुजाडे, मंगेश राऊत , राम उजवणे,, मुंजेवार, भागवत ,शहरी भागातील आरोग्यवर्धिनीचे सर्व आरोग्य कर्मचारी  उपस्थित होते.
    user_Ravi yenorkar PRESS -IN BCN NEWS
    Ravi yenorkar PRESS -IN BCN NEWS
    हिंगणघाट, वर्धा, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • १० वर्षांत १५२ पेपरफुटी; ७.५ कोटी विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ प्रतिनिधी | गेल्या दहा वर्षांत देशभरात तब्बल १५२ प्रश्नपत्रिका फुटीच्या घटना घडल्याचा दावा करण्यात आला असून, यामुळे सुमारे ७.५ कोटी विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर परिणाम झाल्याचे सांगितले जात आहे. ही केवळ आकडेवारी नसून, लाखो-कोट्यवधी विद्यार्थ्यांसाठी संधीची दारे बंद होत असल्याचे चित्र आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी अनेक विद्यार्थी वर्षानुवर्षे मेहनत घेतात. मात्र प्रश्नपत्रिका फुटल्याच्या घटनांमुळे त्यांचा मौल्यवान वेळ वाया जातो, कुटुंबांनी केलेला आर्थिक खर्च व्यर्थ ठरतो आणि विद्यार्थ्यांच्या आशा-आकांक्षांवर पाणी फिरते. काही मोजक्या लोकांकडून भ्रष्ट आणि त्रुटीपूर्ण व्यवस्थेचा गैरफायदा घेतला जात असल्याचा आरोप केला जात आहे. त्याची मोठी किंमत मात्र देशातील कोट्यवधी विद्यार्थी आणि त्यांची कुटुंबे चुकवत आहेत. विद्यार्थ्यांचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी परीक्षा व्यवस्थेत पारदर्शकता, कठोर सुरक्षा उपाय आणि पेपरफुटी प्रकरणांतील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी विविध स्तरांतून सातत्याने होत आहे. #PaperLeak #ExamScam #Students #Youth #Education #JusticeForStudents #ExamReforms #StopPaperLeak #StudentRights #EducationSystem #India #MarathiNews #ChandrapurNagari #BreakingNews #ViralNews
    1
    १० वर्षांत १५२ पेपरफुटी; ७.५ कोटी विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ
प्रतिनिधी |
गेल्या दहा वर्षांत देशभरात तब्बल १५२ प्रश्नपत्रिका फुटीच्या घटना घडल्याचा दावा करण्यात आला असून, यामुळे सुमारे ७.५ कोटी विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर परिणाम झाल्याचे सांगितले जात आहे.
ही केवळ आकडेवारी नसून, लाखो-कोट्यवधी विद्यार्थ्यांसाठी संधीची दारे बंद होत असल्याचे चित्र आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी अनेक विद्यार्थी वर्षानुवर्षे मेहनत घेतात. मात्र प्रश्नपत्रिका फुटल्याच्या घटनांमुळे त्यांचा मौल्यवान वेळ वाया जातो, कुटुंबांनी केलेला आर्थिक खर्च व्यर्थ ठरतो आणि विद्यार्थ्यांच्या आशा-आकांक्षांवर पाणी फिरते.
काही मोजक्या लोकांकडून भ्रष्ट आणि त्रुटीपूर्ण व्यवस्थेचा गैरफायदा घेतला जात असल्याचा आरोप केला जात आहे. त्याची मोठी किंमत मात्र देशातील कोट्यवधी विद्यार्थी आणि त्यांची कुटुंबे चुकवत आहेत.
विद्यार्थ्यांचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी परीक्षा व्यवस्थेत पारदर्शकता, कठोर सुरक्षा उपाय आणि पेपरफुटी प्रकरणांतील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी विविध स्तरांतून सातत्याने होत आहे.
#PaperLeak #ExamScam #Students #Youth #Education #JusticeForStudents #ExamReforms #StopPaperLeak #StudentRights #EducationSystem #India #MarathiNews #ChandrapurNagari #BreakingNews #ViralNews
    user_Vainganga News Live Network
    Vainganga News Live Network
    Press advisory पोंभुर्णा, चंद्रपूर, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • Post by विर अशोक सम्राट संघटना वर्धा महाराष्ट्र राज्य
    1
    Post by विर अशोक सम्राट संघटना वर्धा महाराष्ट्र राज्य
    user_विर अशोक सम्राट संघटना वर्धा महाराष्ट्र राज्य
    विर अशोक सम्राट संघटना वर्धा महाराष्ट्र राज्य
    वर्धा, वर्धा, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • सत्य आणि सत्याग्रह — या दोन्ही गोष्टींना मोदी सरकार घाबरते. सत्य आणि सत्याग्रह — या दोन्ही गोष्टींना मोदी सरकार घाबरते. मध्य प्रदेशातील आपल्या आदिवासी बांधवांनी जल सत्याग्रह आणि उपोषण सुरू केले आहे. कारण केन–बेतवा प्रकल्पासाठी त्यांची जमीन संपादित करण्यात आली, मात्र त्यांना ना न्याय्य मोबदला मिळाला, ना सन्मानाने पुनर्वसन करण्यात आले. सत्य हे आहे की, आदिवासी हे या देशाचे मूळ रहिवासी आहेत. जल, जंगल आणि जमीन यांवर सर्वप्रथम हक्क त्यांचाच आहे. आणि त्यांचा सत्याग्रह यासाठी आहे की, आज त्यांच्याकडून हाच मूलभूत हक्क हिरावून घेतला जात आहे. त्यांची मागणी फार साधी आहे — जगण्यासाठी योग्य आधार, न्याय्य मोबदला आणि सन्मानाने पुनर्वसन द्या. अन्यथा त्यांचे आयुष्य म्हणजे जिवंतपणी चितेसमान आहे. पण हेही भाजप सरकारला मान्य नाही. त्यांच्या मागण्या ऐकून घेण्याऐवजी शांततापूर्ण आंदोलन पोलिसांच्या बळावर दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे. आम्ही आपल्या आदिवासी बांधवांसोबत ठामपणे उभे आहोत. त्यांना न्याय मिळालाच पाहिजे. योग्य मोबदला आणि सन्मानपूर्वक पुनर्वसन देणे ही सरकारची जबाबदारी आहे. व्हिडिओ सौजन्य: Shiksha Pareek आणि Lok Singh. #आदिवासी_न्याय #जलसत्याग्रह #आदिवासीहक्क #पुनर्वसन #योग्यमोबदला #जलजंगलजमीन #संविधान #सामाजिकन्याय #MadhyaPradesh #KenBetwaProject #TribalRights #JalSatyagraha #JusticeForAdivasis #SaveTribalRights #Rehabilitation #LandRights #HumanRights #StandWithAdivasis #ConstitutionOfIndia #SocialJustice
    1
    सत्य आणि सत्याग्रह — या दोन्ही गोष्टींना मोदी सरकार घाबरते.

सत्य आणि सत्याग्रह — या दोन्ही गोष्टींना मोदी सरकार घाबरते.
मध्य प्रदेशातील आपल्या आदिवासी बांधवांनी जल सत्याग्रह आणि उपोषण सुरू केले आहे. कारण केन–बेतवा प्रकल्पासाठी त्यांची जमीन संपादित करण्यात आली, मात्र त्यांना ना न्याय्य मोबदला मिळाला, ना सन्मानाने पुनर्वसन करण्यात आले.
सत्य हे आहे की, आदिवासी हे या देशाचे मूळ रहिवासी आहेत. जल, जंगल आणि जमीन यांवर सर्वप्रथम हक्क त्यांचाच आहे.
आणि त्यांचा सत्याग्रह यासाठी आहे की, आज त्यांच्याकडून हाच मूलभूत हक्क हिरावून घेतला जात आहे.
त्यांची मागणी फार साधी आहे — जगण्यासाठी योग्य आधार, न्याय्य मोबदला आणि सन्मानाने पुनर्वसन द्या. अन्यथा त्यांचे आयुष्य म्हणजे जिवंतपणी चितेसमान आहे.
पण हेही भाजप सरकारला मान्य नाही. त्यांच्या मागण्या ऐकून घेण्याऐवजी शांततापूर्ण आंदोलन पोलिसांच्या बळावर दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे.
आम्ही आपल्या आदिवासी बांधवांसोबत ठामपणे उभे आहोत. त्यांना न्याय मिळालाच पाहिजे. योग्य मोबदला आणि सन्मानपूर्वक पुनर्वसन देणे ही सरकारची जबाबदारी आहे.
व्हिडिओ सौजन्य: Shiksha Pareek आणि Lok Singh.
#आदिवासी_न्याय
#जलसत्याग्रह
#आदिवासीहक्क
#पुनर्वसन
#योग्यमोबदला
#जलजंगलजमीन
#संविधान
#सामाजिकन्याय
#MadhyaPradesh
#KenBetwaProject
#TribalRights
#JalSatyagraha
#JusticeForAdivasis
#SaveTribalRights
#Rehabilitation
#LandRights
#HumanRights
#StandWithAdivasis
#ConstitutionOfIndia
#SocialJustice
    user_Vainganga News Live Network
    Vainganga News Live Network
    Press advisory पोंभुर्णा, चंद्रपूर, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • दोन ट्रकच्या धडकेत ट्रक चालक जखमी; किनी-जवादे येथील घटना राळेगाव, दि. 28 जुलै : वडकी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील किनी-जवादे येथे आज (दि. 28 जुलै) सकाळी सुमारे 8 वाजताच्या दरम्यान दोन ट्रकची धडक होऊन एक ट्रकचा चालक जखमी झाल्याची घटना घडली. या अपघातात गजेंद्र कृष्णा पाल (वय 26, रा. कानपूर) हे गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच वडकी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी जखमी चालकाला तातडीने मदत करून पुढील उपचारासाठी करंजी येथील रुग्णालयात रवाना केले. असून पुढील तपास वडकी पोलीस स्टेशन करीत आहे
    1
    दोन ट्रकच्या धडकेत ट्रक चालक  जखमी; किनी-जवादे येथील घटना
राळेगाव, दि. 28 जुलै : वडकी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील किनी-जवादे येथे आज (दि. 28 जुलै) सकाळी सुमारे 8 वाजताच्या दरम्यान दोन ट्रकची धडक होऊन एक ट्रकचा चालक जखमी झाल्याची घटना घडली.
या अपघातात गजेंद्र कृष्णा पाल (वय 26, रा. कानपूर) हे गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच वडकी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी जखमी चालकाला तातडीने मदत करून पुढील उपचारासाठी करंजी येथील रुग्णालयात रवाना केले. असून पुढील तपास वडकी पोलीस स्टेशन करीत आहे
    user_Amol sangani
    Amol sangani
    पत्रकार राळेगाव, यवतमाळ, महाराष्ट्र•
    9 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.