logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

उमराणेतील श्री रामेश्वर कृषी मार्केटचा खासगी बाजार परवाना रद्द पणन संचालकांचा आदेश, शेतमाल खरेदी विक्रीवर बंदी देवळा : देवळा तालुक्यातील महात्मा फुलेनगर (उमराणे) येथील श्री रामेश्वर कृषी मार्केटला देण्यात आलेला खासगी बाजार परवाना पणन संचालक शरद जरे यांनी रद्द केला आहे. गुरुवारी (दि. ३०) जारी करण्यात आलेल्या या आदेशामुळे संबंधित बाजारातील शेतमालाच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार तत्काळ बंद होणार असल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. मागील वर्षी जून २०२५ मध्ये पणन विभागाच्या सहसंचालक स्नेहा जोशी यांनी या खासगी बाजाराची सविस्तर तपासणी केली होती. तपासणीत व्यापाऱ्यांच्या व्यवहारांवर बाजार व्यवस्थापनाचे प्रभावी नियंत्रण नसल्याचे निदर्शनास आले. शेतकऱ्यांना शेतमालाचे पैसे नियमानुसार व वेळेत मिळत आहेत की नाही, याबाबतही बाजार परवानाधारक अनभिज्ञ असल्याचे स्पष्ट झाले. तपासणीदरम्यान काही व्यापाऱ्यांकडे शेतमाल खरेदी व शेतकऱ्यांना देयके अदा केल्याची आवश्यक कागदपत्रे उपलब्ध नव्हती. याचवेळी हर्षद ट्रेडर्सविरोधात बाजार परिसरात घोषणाबाजी झाल्यानंतर शेतकऱ्यांकडून अर्ज मागवण्यात आले होते. त्यात तब्बल ३८ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. अहवालानुसार, शेतकऱ्यांच्या थकीत देयकांच्या वसुलीसाठी बाजार व्यवस्थापनाने कोणतीही प्रभावी कार्यवाही केली नसल्याचे तसेच त्याबाबतचे अभिलेखही उपलब्ध नसल्याचे आढळले. व्यापाऱ्यांच्या व्यवहारांवर आवश्यक पर्यवेक्षण व नियंत्रण नसल्याचाही निष्कर्ष नोंदवण्यात आला. दरम्यान, या प्रकरणी घेण्यात आलेल्या ११ सुनावण्यांना बाजार परवानाधारकांनी प्रतिसाद दिला नसल्याने चौकशी प्रक्रियेत अडथळा निर्माण झाल्याचा ठपकाही आदेशात ठेवण्यात आला आहे. या सर्व बाबींचा विचार करत संबंधित खासगी बाजाराने वैधानिक जबाबदाऱ्यांचे गंभीर उल्लंघन केल्याचे नमूद करत पणन संचालकांनी बाजारचा परवाना रद्द केला आहे. या आदेशानंतर संबंधित बाजारात शेतमालाच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार केल्यास कायदेशीर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे. दरम्यान, या निर्णयाबाबत श्री रामेश्वर कृषी मार्केटच्या संचालक मंडळाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला असतो तो होऊ शकला नाही.

2 hrs ago
user_Dadasaheb Gaikwad
Dadasaheb Gaikwad
Nashik, Maharashtra•
2 hrs ago

उमराणेतील श्री रामेश्वर कृषी मार्केटचा खासगी बाजार परवाना रद्द पणन संचालकांचा आदेश, शेतमाल खरेदी विक्रीवर बंदी देवळा : देवळा तालुक्यातील महात्मा फुलेनगर (उमराणे) येथील श्री रामेश्वर कृषी मार्केटला देण्यात आलेला खासगी बाजार परवाना पणन संचालक शरद जरे यांनी रद्द केला आहे. गुरुवारी (दि. ३०) जारी करण्यात आलेल्या या आदेशामुळे संबंधित बाजारातील शेतमालाच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार तत्काळ बंद होणार असल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. मागील वर्षी जून २०२५ मध्ये पणन विभागाच्या सहसंचालक स्नेहा जोशी यांनी या खासगी बाजाराची सविस्तर तपासणी केली होती. तपासणीत व्यापाऱ्यांच्या व्यवहारांवर बाजार व्यवस्थापनाचे प्रभावी नियंत्रण नसल्याचे निदर्शनास आले. शेतकऱ्यांना शेतमालाचे पैसे नियमानुसार व वेळेत मिळत आहेत की नाही, याबाबतही बाजार परवानाधारक अनभिज्ञ असल्याचे स्पष्ट झाले. तपासणीदरम्यान काही व्यापाऱ्यांकडे शेतमाल खरेदी व शेतकऱ्यांना देयके अदा केल्याची आवश्यक कागदपत्रे उपलब्ध नव्हती. याचवेळी हर्षद ट्रेडर्सविरोधात बाजार परिसरात घोषणाबाजी झाल्यानंतर शेतकऱ्यांकडून अर्ज मागवण्यात आले होते. त्यात तब्बल ३८ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. अहवालानुसार, शेतकऱ्यांच्या थकीत देयकांच्या वसुलीसाठी बाजार व्यवस्थापनाने कोणतीही प्रभावी कार्यवाही केली नसल्याचे तसेच त्याबाबतचे अभिलेखही उपलब्ध नसल्याचे आढळले. व्यापाऱ्यांच्या व्यवहारांवर आवश्यक पर्यवेक्षण व नियंत्रण नसल्याचाही निष्कर्ष नोंदवण्यात आला. दरम्यान, या प्रकरणी घेण्यात आलेल्या ११ सुनावण्यांना बाजार परवानाधारकांनी प्रतिसाद दिला नसल्याने चौकशी प्रक्रियेत अडथळा निर्माण झाल्याचा ठपकाही आदेशात ठेवण्यात आला आहे. या सर्व बाबींचा विचार करत संबंधित खासगी बाजाराने वैधानिक जबाबदाऱ्यांचे गंभीर उल्लंघन केल्याचे नमूद करत पणन संचालकांनी बाजारचा परवाना रद्द केला आहे. या आदेशानंतर संबंधित बाजारात शेतमालाच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार केल्यास कायदेशीर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे. दरम्यान, या निर्णयाबाबत श्री रामेश्वर कृषी मार्केटच्या संचालक मंडळाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला असतो तो होऊ शकला नाही.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • येवला विंचूर चौफुलीवर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत ५० वर्षीय महिला जागीच ठार येवला विंचूर चौफुलीवर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत ५० वर्षीय महिला जागीच ठार ​येवला: येवला शहरातील विंचूर चौफुली पोलीस चौकीसमोर रस्ता ओलांडताना भरधाव ट्रकच्या धडकेत निर्मला बाळासाहेब भिसे (वय ५०, रा. पैलवान गल्ली, येवला) या महिलेचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेनंतर स्थानिकांनी तातडीने धाव घेत मृतदेह येवला उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला. याप्रकरणी येवला शहर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ​या अपघातानंतर स्थानिक नागरिकांमधून प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे. विंचूर चौफुली ते फत्तेबुरुज नाका परिसरात रस्त्यावर एकही दिशाफलक (Signboard) लावण्यात आलेला नाही. परिणामी, चालकांना अचानक ब्रेक मारावे लागतात किंवा वाहने मागे-पुढे करावी लागतात, ज्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळेच एका निष्पाप महिलेचा जीव गेल्याचा आरोप स्थानिकांनी केला असून, चौफुलीवर तातडीने दिशाफलक बसवण्याची जोरदार मागणी होत आहे. ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला
    1
    येवला विंचूर चौफुलीवर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत ५० वर्षीय महिला जागीच ठार
येवला विंचूर चौफुलीवर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत ५० वर्षीय महिला जागीच ठार
​येवला:
येवला शहरातील विंचूर चौफुली पोलीस चौकीसमोर रस्ता ओलांडताना भरधाव ट्रकच्या धडकेत निर्मला बाळासाहेब भिसे (वय ५०, रा. पैलवान गल्ली, येवला) या महिलेचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेनंतर स्थानिकांनी तातडीने धाव घेत मृतदेह येवला उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला. याप्रकरणी येवला शहर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
​या अपघातानंतर स्थानिक नागरिकांमधून प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे. विंचूर चौफुली ते फत्तेबुरुज नाका परिसरात रस्त्यावर एकही दिशाफलक (Signboard) लावण्यात आलेला नाही. परिणामी, चालकांना अचानक ब्रेक मारावे लागतात किंवा वाहने मागे-पुढे करावी लागतात, ज्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळेच एका निष्पाप महिलेचा जीव गेल्याचा आरोप स्थानिकांनी केला असून, चौफुलीवर तातडीने दिशाफलक बसवण्याची जोरदार मागणी होत आहे.
ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला
    user_Sachin Dilip Wakhare
    Sachin Dilip Wakhare
    Reporter येवला, नाशिक, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • 9 ऑगस्ट 2026 रोजी येणाऱ्या जागतिक आदिवासी दिनाची जय्यत तयारी शासकीय माध्यमिक आश्रम शाळा सुसरवाडी येथे 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा होण्यासाठी विद्यार्थ्यांची जय्यत तयारी चालु असल्याचे पहायला मिळत आहे.
    1
    9 ऑगस्ट 2026 रोजी येणाऱ्या जागतिक आदिवासी दिनाची जय्यत तयारी
शासकीय माध्यमिक आश्रम शाळा सुसरवाडी येथे 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा होण्यासाठी विद्यार्थ्यांची  जय्यत तयारी चालु असल्याचे पहायला मिळत आहे.
    user_Nilesh Nana Dhinda
    Nilesh Nana Dhinda
    Teacher वाडा, पालघर, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • लहुजी शक्ती सेनेच्या वतीने राहुरी फॅक्टरी येथे अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजर लहुजी शक्ती सेनेच्या वतीने राहुरी फॅक्टरी येथे अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी राहुरी फॅक्टरी, प्रतिनिधी : लहुजी शक्ती सेना, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने देवळाली प्रवरा येथील नूतन माध्यमिक विद्यालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमास राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. देशमुख हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. पोलीस निरीक्षक श्री. देशमुख यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वह्या व पेन देण्यात आले. तसेच त्यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व, शिस्त, सामाजिक जबाबदारी आणि उज्ज्वल भविष्यासाठी परिश्रमाचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमात लहुजी शक्ती सेना महाराष्ट्र राज्याचे जिल्हा संघटक नंदूभाऊ उल्हारे, शहराध्यक्ष शरदभाऊ लोखंडे, उपशहराध्यक्ष सुनीलभाऊ रोकडे, सेक्रेटरी सागरभाऊ उल्हारे तसेच सदस्य करण लोंढे, संदीप तोडमल, प्रफुल शिंदे उपस्थित होते. देवळाली प्रवरा नगरपालिकेचे नगरसेवक बाळासाहेब लोखंडे यांनीही कार्यक्रमास उपस्थिती दर्शविली. यावेळी सामाजिक बांधिलकी जपत जिल्हा संघटक नंदूभाऊ उल्हारे यांच्या वतीने गरजू दोन विद्यार्थ्यांना शाळेचे गणवेश भेट देण्यात आले. या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले. अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा वारसा जपत शिक्षण, सामाजिक समता आणि समाजसेवेचा संदेश देणारा हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
    1
    लहुजी शक्ती सेनेच्या वतीने राहुरी फॅक्टरी येथे अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजर
लहुजी शक्ती सेनेच्या वतीने राहुरी फॅक्टरी येथे अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी
राहुरी फॅक्टरी, प्रतिनिधी : लहुजी शक्ती सेना, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने देवळाली प्रवरा येथील नूतन माध्यमिक विद्यालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमास राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. देशमुख हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. पोलीस निरीक्षक श्री. देशमुख यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वह्या व पेन देण्यात आले. तसेच त्यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व, शिस्त, सामाजिक जबाबदारी आणि उज्ज्वल भविष्यासाठी परिश्रमाचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमात लहुजी शक्ती सेना महाराष्ट्र राज्याचे जिल्हा संघटक नंदूभाऊ उल्हारे, शहराध्यक्ष शरदभाऊ लोखंडे, उपशहराध्यक्ष सुनीलभाऊ रोकडे, सेक्रेटरी सागरभाऊ उल्हारे तसेच सदस्य करण लोंढे, संदीप तोडमल, प्रफुल शिंदे उपस्थित होते. देवळाली प्रवरा नगरपालिकेचे नगरसेवक बाळासाहेब लोखंडे यांनीही कार्यक्रमास उपस्थिती दर्शविली.
यावेळी सामाजिक बांधिलकी जपत जिल्हा संघटक नंदूभाऊ उल्हारे यांच्या वतीने गरजू दोन विद्यार्थ्यांना शाळेचे गणवेश भेट देण्यात आले. या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.
अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा वारसा जपत शिक्षण, सामाजिक समता आणि समाजसेवेचा संदेश देणारा हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
    user_पत्रकार जालिंदर आल्हाट
    पत्रकार जालिंदर आल्हाट
    Rahuri, Ahmednagar•
    9 hrs ago
  • प्रीति और जैस्मिन बॉक्सिंग चैंपियन, सोमन ने पैरा शॉटपुट जीता; अब तक 30 मेडल प्रीति पवार (बॉक्सिंग): महिलाओं के 54 किग्रा भारवर्ग के फाइनल मुकाबले में कनाडा की स्कारलेट सवाना डेलगाडो को एकतरफा 5-0 से हराकर स्वर्ण पदक अपने नाम किया।जैस्मिन लंबोरिया (बॉक्सिंग): महिलाओं के 57 किग्रा वर्ग के बेहद कड़े फाइनल में उत्तरी आयरलैंड की मौजूदा चैंपियन माइकेला वॉल्श को 5-0 से मात देकर भारत की झोली में दूसरा बॉक्सिंग गोल्ड डाला।सोमन राणा (पैरा शॉटपुट): पुरुषों की F57 गोला फेंक (Shot Put) स्पर्धा में 13.40 मीटर के बेहतरीन थ्रो के साथ स्वर्ण पदक जीता। इसी स्पर्धा में भारत के शुभम जुयाल ने 13.28 मीटर थ्रो कर रजत (Silver) पदक हासिल किया ब्रेकिंग न्यूज़ संवाददाता आशीष मिश्रा
    1
    प्रीति और जैस्मिन बॉक्सिंग चैंपियन, सोमन ने पैरा शॉटपुट जीता; अब तक 30 मेडल प्रीति पवार (बॉक्सिंग): महिलाओं के 54 किग्रा भारवर्ग के फाइनल मुकाबले में कनाडा की स्कारलेट सवाना डेलगाडो को एकतरफा 5-0 से हराकर स्वर्ण पदक अपने नाम किया।जैस्मिन लंबोरिया (बॉक्सिंग): महिलाओं के 57 किग्रा वर्ग के बेहद कड़े फाइनल में उत्तरी आयरलैंड की मौजूदा चैंपियन माइकेला वॉल्श को 5-0 से मात देकर भारत की झोली में दूसरा बॉक्सिंग गोल्ड डाला।सोमन राणा (पैरा शॉटपुट): पुरुषों की F57 गोला फेंक (Shot Put) स्पर्धा में 13.40 मीटर के बेहतरीन थ्रो के साथ स्वर्ण पदक जीता। इसी स्पर्धा में भारत के शुभम जुयाल ने 13.28 मीटर थ्रो कर रजत (Silver) पदक हासिल किया
ब्रेकिंग न्यूज़ संवाददाता आशीष मिश्रा
    user_आशीष मिश्रा
    आशीष मिश्रा
    Local News Reporter Palghar, Maharashtra•
    4 hrs ago
  • श्रमजीवी संघटनेचा पंचायत समिती जव्हार कार्यालयावर ताटली आंदोलन जिल्हा परिषद शाळे मध्ये मिळणाऱ्या मध्यान्ह भोजन योजनेचे धान्य पुरवठा सुरळीत नाही जव्हार तालुक्यात जिल्हा परिषद शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. काही ठिकाणी शिक्षक कमी तर शिक्षकांना अतिरिक्त प्रशासनाने दिलेली कामे याचा फटका विदयार्थ्यांच्या शिक्षणावर होतो. अशातच जि. प. शाळांना मिळणाऱ्या मध्यान्ह भोजन योजनेचा धान्य पुरवठा होत नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याचा निषेधार्थ श्रमजीवी संघटनाच्या वतीने ताटली आंदोलन करण्यात आले. संघटनेचे तालुका अध्यक्ष अजित गायकवाड,गोविंद गावित ता. संघटक,संतोष धिंढा तालूका सचिव यांच्या नेतृत्वात निघालेल्या ताटली आंदोलनात, आदिवासी कष्टकरी ढोर नाही माणूस आहे,माणुसकीची भीक नको, आम्हाला आमचा हक्क हवा अशा घोषणा देत कार्यकर्ते व हजारो पालक व विध्यार्थी सहभागी झाले. संघटण्याच्या म्हणण्यानुसार धान्य नियमित मिळत नसल्याने त्या ठिकाणी बचत गट किंवा वैयक्तिक महिला यांना पोषण आहार स्वखर्चाने धान्य विकत घेऊन शिजवून दिले जात आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा व भविष्याचा विचार करून प्रशासनाने तातडीने माध्यान्ह भोजन योजनेचे धान्य पुरवठा सुरळीत चालू करावा नाहीतर या पुढचे आंदोलन अधिक तीव्र करनार अशा इशारा संघटनेच्या वतीन देण्यात आला.
    1
    श्रमजीवी संघटनेचा पंचायत समिती जव्हार कार्यालयावर ताटली आंदोलन 
जिल्हा परिषद शाळे मध्ये
 मिळणाऱ्या मध्यान्ह भोजन योजनेचे धान्य पुरवठा सुरळीत नाही  

जव्हार तालुक्यात जिल्हा परिषद शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. काही ठिकाणी शिक्षक कमी तर  शिक्षकांना अतिरिक्त प्रशासनाने दिलेली कामे याचा फटका विदयार्थ्यांच्या शिक्षणावर होतो. अशातच जि. प. शाळांना मिळणाऱ्या मध्यान्ह भोजन योजनेचा धान्य पुरवठा होत नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याचा निषेधार्थ श्रमजीवी संघटनाच्या वतीने ताटली आंदोलन करण्यात आले. संघटनेचे तालुका अध्यक्ष अजित गायकवाड,गोविंद गावित ता. संघटक,संतोष धिंढा तालूका सचिव यांच्या नेतृत्वात निघालेल्या ताटली आंदोलनात, आदिवासी कष्टकरी ढोर नाही माणूस आहे,माणुसकीची भीक नको, आम्हाला आमचा हक्क हवा अशा घोषणा देत कार्यकर्ते व हजारो पालक व विध्यार्थी सहभागी झाले.
संघटण्याच्या म्हणण्यानुसार धान्य नियमित मिळत नसल्याने त्या ठिकाणी बचत गट किंवा वैयक्तिक महिला यांना पोषण आहार स्वखर्चाने धान्य विकत घेऊन शिजवून दिले जात आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा व भविष्याचा विचार करून प्रशासनाने तातडीने माध्यान्ह भोजन योजनेचे धान्य पुरवठा सुरळीत चालू करावा नाहीतर या पुढचे आंदोलन अधिक तीव्र करनार अशा इशारा संघटनेच्या वतीन देण्यात आला.
    user_लोक हिंद चॅनल
    लोक हिंद चॅनल
    Journalist शहापूर, ठाणे, महाराष्ट्र•
    12 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.