भ्रष्टाचाराचा हिशोब मागताच सरपंचांचा काढता पाय; सुटाळ्यात 'डफडे बजाव' आंदोलनाचा गजर खामगाव : तालुक्यातील सुटाळा बुद्रुक येथे प्रजासत्ताक दिनी आयोजित ग्रामसभेत मोठा गोंधळ उडाला. ग्रामस्थांनी विकासकामांचा हिशोब आणि कथित भ्रष्टाचाराबाबत विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देता न आल्याने सरपंच आणि सचिवांनी सभेतून काढता पाय घेतला. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर 'डफडे बजाव' आंदोलन सुरू केले असून परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. आज ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेला सुरुवात होताच ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नांची सरबत्ती केली. गेल्या काही काळात झालेली विकासकामे आणि त्यात झालेला कथित भ्रष्टाचार याचा हिशोब जनतेने मागितला. मात्र, सरपंच वैशाली इंगळे आणि ग्रामपंचायत सचिव शेगोकार यांनी प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देण्याऐवजी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने वादाला तोंड फुटले.ग्रामस्थांचा रोष वाढत असल्याचे पाहून आणि प्रश्नांची उत्तरे देता येत नसल्याने सरपंच व सचिवांनी अचानक ग्रामसभा तहकूब केली आणि सभास्थळावरून निघून गेले. लोकशाहीच्या या 'संसदेत' जनतेला उत्तर देण्याचे कर्तव्य सोडून जबाबदार पदाधिकाऱ्यांनी पळ काढल्याने ग्रामस्थ अधिकच आक्रमक झाले. सरपंच-सचिवांच्या या वागणुकीचा निषेध करण्यासाठी ग्रामस्थांनी तत्काळ ग्रामपंचायत कार्यालयासमोर डफडे वाजवून आंदोलन डफडे बजाव आंदोलन सुरू केले. ग्रामपंचायत समोर वाद सुरू झाल्याने पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आला होता.जोपर्यंत विचारलेल्या प्रश्नांची स्पष्ट आणि लेखी उत्तरे मिळत नाहीत, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही. येत्या दोन दिवसांत समाधानकारक उत्तर न मिळाल्यास खामगाव पंचायत समितीसमोर काळे झेंडे घेऊन डफडे बजाव आंदोलन करण्यात येईल असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

- भ्रष्टाचाराचा हिशोब मागताच सरपंचांचा काढता पाय; सुटाळ्यात 'डफडे बजाव' आंदोलनाचा गजर खामगाव : तालुक्यातील सुटाळा बुद्रुक येथे प्रजासत्ताक दिनी आयोजित ग्रामसभेत मोठा गोंधळ उडाला. ग्रामस्थांनी विकासकामांचा हिशोब आणि कथित भ्रष्टाचाराबाबत विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देता न आल्याने सरपंच आणि सचिवांनी सभेतून काढता पाय घेतला. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर 'डफडे बजाव' आंदोलन सुरू केले असून परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. आज ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेला सुरुवात होताच ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नांची सरबत्ती केली. गेल्या काही काळात झालेली विकासकामे आणि त्यात झालेला कथित भ्रष्टाचार याचा हिशोब जनतेने मागितला. मात्र, सरपंच वैशाली इंगळे आणि ग्रामपंचायत सचिव शेगोकार यांनी प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देण्याऐवजी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने वादाला तोंड फुटले.ग्रामस्थांचा रोष वाढत असल्याचे पाहून आणि प्रश्नांची उत्तरे देता येत नसल्याने सरपंच व सचिवांनी अचानक ग्रामसभा तहकूब केली आणि सभास्थळावरून निघून गेले. लोकशाहीच्या या 'संसदेत' जनतेला उत्तर देण्याचे कर्तव्य सोडून जबाबदार पदाधिकाऱ्यांनी पळ काढल्याने ग्रामस्थ अधिकच आक्रमक झाले. सरपंच-सचिवांच्या या वागणुकीचा निषेध करण्यासाठी ग्रामस्थांनी तत्काळ ग्रामपंचायत कार्यालयासमोर डफडे वाजवून आंदोलन डफडे बजाव आंदोलन सुरू केले. ग्रामपंचायत समोर वाद सुरू झाल्याने पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आला होता.जोपर्यंत विचारलेल्या प्रश्नांची स्पष्ट आणि लेखी उत्तरे मिळत नाहीत, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही. येत्या दोन दिवसांत समाधानकारक उत्तर न मिळाल्यास खामगाव पंचायत समितीसमोर काळे झेंडे घेऊन डफडे बजाव आंदोलन करण्यात येईल असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.1
- 77 वा प्रजासत्ताक दिनानिमित्त खाऊ व चाकलेट चा वाटप खामगाव तालुक्यातील हिवरखेड या गावांमध्ये.... धंदरे परिवाराकडून1
- प्रजासत्ताक दिनीच मोताळ्यात आंदोलनाचा भडका; अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न, मोठी दुर्घटना टळली1
- Post by Ayaz patel Ayaz patel1
- भोकरदन तालुक्यातील उपयोगी अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा 3 रा दीवस कोर्टात प्रकरण प्रलंबित असल्याकारणाने इकडे तलाठ्याने फेर कसा मंजुर केला आहे जनतेचा आवाज 21 मराठी न्यूज चॅनल मुख्यसंपादक प्रकाश सुरडकर4
- Post by Shamsher Kha1
- मालेगाव तालुका अंतर्गत येत असलेल्या डव्हा येथे श्रीनाथ नंगे महाराज यात्रेमध्ये हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ1
- प्रजासत्ताक दिनाच्या पवित्र मुहूर्तावर, खामगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांनी शहर पोलीस स्टेशनमध्ये देशभक्तीपर गीत सादर करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.1