logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील उंद्री येथील पाझर तलावाच्या दुरुस्ती कामात निकृष्ट दर्जाचे काम झाल्याचा आरोप करत स्थानिक शेतकरी व ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. सुमारे ४० लाख रुपयांच्या निधीतून सुरू असलेल्या या कामात मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचे ग्रामस्थ बोलत असून, त्याची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. शेतकरी व ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, पाझर तलावाच्या पाळीसाठी नवीन साहित्य आणण्याऐवजी पूर्णतः काळी माती आणि मुरमाचा वापर करण्यात आला आहे, तसेच तलावाच्या कडेला असलेलेच दगड, मुरूम व माती वापरून काम उरकण्यात आले आहे. अंदाजपत्रकात रॉयल्टीसाठी जवळपास ९ लाख रुपये दाखवले असताना, प्रत्यक्षात कोणत्या साहित्यावर रॉयल्टी भरली, असा प्रश्न ग्रामस्थ विचारत आहेत. याव्यतिरिक्त, पाळीची अपेक्षित उंची ३० फूट असताना ती प्रत्यक्षात २५ ते २६ फूट, तर काही ठिकाणी केवळ ६ ते ७ फूटच करण्यात आल्याचा आरोप आहे. पूर्वी रुंद असलेली पाळी आता लहान व अरुंद केल्याने “पाळीवरून माणूस किंवा जनावरे फिरली तरी घसरून पडतील अशी परिस्थिती आहे,” असे काही शेतकऱ्यांनी म्हटले आहे. वाळूच्या कामातही माती व मुरूमच भरल्याचा आरोप असून, सांडवा जुनाच ठेवण्यात आला आहे. पाळीच्या खालच्या बाजूस कालवा करून दगडी पिचिंग करणे आवश्यक असताना तेही न केल्यामुळे मोठ्या पावसात तलाव फुटण्याचा धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती शेतकरी व्यक्त करत आहेत. यामुळे बाजूच्या शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान होण्याचीही चिंता आहे. शेतकरी सुधाकर वडजे यांनी कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट असून, काम सुरू असताना ग्रामपंचायत किंवा लघुपाटबंधारे विभागातील संबंधित अधिकारी फिरकलेही नाहीत, असे सांगितले. याबाबत माहिती देताना अभियंता चौधरी धीरज यांनी हे काम नक्षत्र कन्स्ट्रक्शन कंपनीला दिल्याचे सांगितले. त्यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता, त्यांनी काम जवळपास ९० टक्के पूर्ण झाल्याचा दावा करत काम मजबूत व टिकाऊ पद्धतीने केल्याचे म्हटले. तसेच, काही काम शिल्लक राहिल्यास पुन्हा येऊन पूर्ण केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र, पावसाळा तोंडावर आलेला असताना उर्वरित काम पावसात कसे पूर्ण होणार, असा प्रश्न उंद्री येथील शेतकरी उपस्थित करत आहेत. शासनाचा निधी हा शेतकरी व सर्वसामान्यांच्या हितासाठी असतो की ठेकेदार व अधिकाऱ्यांना मोठे करण्यासाठी, अशी संतप्त प्रतिक्रिया जनमानसातून उमटत आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून कामाची गुणवत्ता तपासण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

3 hrs ago
user_मारोती  वडजे उंद्रीकर पत्रकार
मारोती वडजे उंद्रीकर पत्रकार
मुखेड, नांदेड, महाराष्ट्र•
3 hrs ago

नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील उंद्री येथील पाझर तलावाच्या दुरुस्ती कामात निकृष्ट दर्जाचे काम झाल्याचा आरोप करत स्थानिक शेतकरी व ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. सुमारे ४० लाख रुपयांच्या निधीतून सुरू असलेल्या या कामात मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचे ग्रामस्थ बोलत असून, त्याची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. शेतकरी व ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, पाझर तलावाच्या पाळीसाठी नवीन साहित्य आणण्याऐवजी पूर्णतः काळी माती आणि मुरमाचा वापर करण्यात आला आहे, तसेच तलावाच्या कडेला असलेलेच दगड, मुरूम व माती वापरून काम उरकण्यात आले आहे. अंदाजपत्रकात रॉयल्टीसाठी जवळपास ९ लाख रुपये दाखवले असताना, प्रत्यक्षात कोणत्या साहित्यावर रॉयल्टी भरली, असा प्रश्न ग्रामस्थ विचारत आहेत. याव्यतिरिक्त, पाळीची अपेक्षित उंची ३० फूट असताना ती प्रत्यक्षात २५ ते २६ फूट, तर काही ठिकाणी केवळ ६ ते ७ फूटच करण्यात आल्याचा आरोप आहे. पूर्वी रुंद असलेली पाळी आता लहान व अरुंद केल्याने “पाळीवरून माणूस किंवा जनावरे फिरली तरी घसरून पडतील अशी परिस्थिती आहे,” असे काही शेतकऱ्यांनी म्हटले आहे. वाळूच्या कामातही माती व मुरूमच भरल्याचा आरोप असून, सांडवा जुनाच ठेवण्यात आला आहे. पाळीच्या खालच्या बाजूस कालवा करून दगडी पिचिंग करणे आवश्यक असताना तेही न केल्यामुळे मोठ्या पावसात तलाव फुटण्याचा धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती शेतकरी व्यक्त करत आहेत. यामुळे बाजूच्या शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान होण्याचीही चिंता आहे. शेतकरी सुधाकर वडजे यांनी कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट असून, काम सुरू असताना ग्रामपंचायत किंवा लघुपाटबंधारे विभागातील संबंधित अधिकारी फिरकलेही नाहीत, असे सांगितले. याबाबत माहिती देताना अभियंता चौधरी धीरज यांनी हे काम नक्षत्र कन्स्ट्रक्शन कंपनीला दिल्याचे सांगितले. त्यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता, त्यांनी काम जवळपास ९० टक्के पूर्ण झाल्याचा दावा करत काम मजबूत व टिकाऊ पद्धतीने केल्याचे म्हटले. तसेच, काही काम शिल्लक राहिल्यास पुन्हा येऊन पूर्ण केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र, पावसाळा तोंडावर आलेला असताना उर्वरित काम पावसात कसे पूर्ण होणार, असा प्रश्न उंद्री येथील शेतकरी उपस्थित करत आहेत. शासनाचा निधी हा शेतकरी व सर्वसामान्यांच्या हितासाठी असतो की ठेकेदार व अधिकाऱ्यांना मोठे करण्यासाठी, अशी संतप्त प्रतिक्रिया जनमानसातून उमटत आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून कामाची गुणवत्ता तपासण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

More news from Maharashtra and nearby areas
  • मोमिन आर्ट अकादमीने एका अप्रतिम कला प्रदर्शनाचे यशस्वी आयोजन केले, ज्यासोबतच प्रमाणपत्र वितरण सोहळाही उत्साहात पार पडला.
    1
    मोमिन आर्ट अकादमीने एका अप्रतिम कला प्रदर्शनाचे यशस्वी आयोजन केले, ज्यासोबतच प्रमाणपत्र वितरण सोहळाही उत्साहात पार पडला.
    user_Today One Live
    Today One Live
    Journalist Nanded, Maharashtra•
    7 hrs ago
  • सिरपूर येथील शेत सर्वे क्रमांक ५६ ची भूमिअभिलेख कार्यालयाकडून मोजणी करण्यात आली आहे. या मोजणीच्या कार्यवाहीनंतर संबंधित शेतकरी आवरगंड यांनी प्रशासनाचे आभार मानले.
    1
    सिरपूर येथील शेत सर्वे क्रमांक ५६ ची भूमिअभिलेख कार्यालयाकडून मोजणी करण्यात आली आहे. या मोजणीच्या कार्यवाहीनंतर संबंधित शेतकरी आवरगंड यांनी प्रशासनाचे आभार मानले.
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    18 hrs ago
  • परळी शहरातील श्री पद्मावती शिक्षण संस्था संचालित संस्कार प्राथमिक शाळेच्या १९९९-२००० या शैक्षणिक वर्षातील सातवी उत्तीर्ण माजी विद्यार्थ्यांचा भव्य स्नेहमेळावा पद्मावती विभागामध्ये उत्साहात आणि भावनिक वातावरणात नुकताच पार पडला. आजवर दहावी-बारावीच्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहमेळावे मोठ्या उत्साहात साजरे झाल्याचे पाहायला मिळाले असले तरी, संस्कार प्राथमिक शाळेच्या सातवीच्या माजी विद्यार्थ्यांनी तब्बल २५ वर्षांनंतर एकत्र येऊन स्नेहमेळाव्याचे आयोजन करत एक आगळावेगळा उपक्रम राबवला. या सोहळ्यात अनेक वर्षांनंतर भेटलेल्या मित्रांनी शालेय जीवनातील सुवर्णक्षणांना उजाळा दिला, ज्यामुळे बालपणीच्या आठवणी पुन्हा जिवंत झाल्या. कार्यक्रमस्थळी दाखल होताच जुन्या मित्रांच्या चेहऱ्यावरील आनंद, शिक्षकांविषयी व्यक्त झालेला आदर आणि बालपणीच्या आठवणींमध्ये हरवून गेलेले भावनिक क्षण उपस्थितांच्या मनाला भिडले. यावेळी शाळेत पुन्हा एकदा १९९९-२००० चा काळ अवतरल्याचे दृश्य पाहायला मिळाले. या विशेष स्नेहमेळाव्यासाठी संस्थेचे अध्यक्ष श्री कैलास तांदळे अध्यक्षस्थानी होते, तर सचिव श्री दीपक तांदळे, सहसचिव श्रीमती प्रेमिलाताई तांदळे मॅडम, मुख्याध्यापिका सौ. माधुरीताई तांदळे, श्री कराड सर, श्री पाचांगे सर, श्री अनकाडे सर, पर्यवेक्षक श्री इंगळे सर, श्रीम.रणखांब मॅडम, श्री गित्ते सर, श्रीम. साळुंके मॅडम आणि श्री दैठणेकर सर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी दिपक ढाकणे, राज रत्नपारखे, अमोल धुमाळ, गणेश टाक, राजेश देशमाने, शैलेश चांडक, सागर टाक, अमोल राजूरकर, धीरज काळे, विपुल बियाणी, वैभव घोडके, श्रीकांत बाहेती, श्रीकांत शर्मा, धनराज स्वामी, प्रताप सोनवणे, भगवान कराळे, उदय पेंटेवार, विशाल आडेपवार, दिलीप खोशे, अशोक कराळे, मनोज मोरे, अमजद पठाण, संभाजी काटे, उमेश फुलझळके, आनंद रेळेकर, दिपाली आघाव, गौतमी भद्रे, पूजा चांडक, स्वाती, मनीषा, श्वेता दीक्षित, गीता काबरा, दिपाली दहातोंडे, पल्लवी हुलगुंडे, वर्षा अदोडे, चंद्रमणी वाघमारे, गंगाधर रायभोळे, श्रीकांत काकडे, अमोल मुळे, पवन भोयटे आदी माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या यशस्वी वाटचालीचे कौतुक करत “संस्कार प्राथमिक शाळा ही केवळ शिक्षण देणारी शाळा नसून विद्यार्थ्यांच्या जीवनाला योग्य दिशा देणारे संस्कार मंदिर आहे,” असे गौरवोद्गार काढले. १९९९-२००० मध्ये सातवी उत्तीर्ण झालेले हे विद्यार्थी आज डॉक्टर, शिक्षक, अभियंते, उद्योजक, शासकीय अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते अशा विविध प्रतिष्ठित पदांवर कार्यरत असून आपापल्या क्षेत्रात यशाचे शिखर गाठले आहे. त्यांच्या बोलण्यातून शाळेप्रती असलेले प्रेम आणि गुरुजनांविषयीची कृतज्ञता प्रकर्षाने जाणवत होती. कार्यक्रमादरम्यान जुन्या आठवणींना उजाळा देताना वातावरण अनेकदा भावुक झाले. वर्गातील गंमती-जमती, शाळेतील सहली, सांस्कृतिक कार्यक्रम, मधल्या सुट्टीतील धम्माल, शिक्षकांचा धाक आणि मित्रांसोबतचे अविस्मरणीय क्षण आठवून अनेकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. “मोठी पदे मिळाली, आयुष्य पुढे गेले; पण शाळेतील मैत्री आणि शिक्षकांचे संस्कार हेच आमच्या आयुष्याचे खरे भांडवल आहे,” अशा भावना अनेक माजी विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या. या स्नेहमेळाव्यात माजी विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजनांचा सत्कार करून कृतज्ञता व्यक्त केली. जुन्या आठवणींना उजाळा देणारे फोटो, संवाद, हास्यकल्लोळ आणि मैत्रीचा उत्स्फूर्त आनंद यामुळे संपूर्ण परिसर भारला होता. अनेक विद्यार्थ्यांनी शाळेच्या विकासासाठी भविष्यात विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबविण्याचा संकल्पही यावेळी व्यक्त केला. “एक शाळा... एक संस्कार... आणि आयुष्यभर साथ देणारी मैत्री,” अशी भावना व्यक्त करत सर्व माजी विद्यार्थ्यांनी पुन्हा भेटण्याचा निर्धार केला. शाळेने आणि माजी विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले. शेवटी, सर्वांनी एकत्र येऊन ‘संस्कार’च्या आठवणी कायम जपण्याचा संकल्प करत भावपूर्ण वातावरणात कार्यक्रमाचा समारोप केला.
    1
    परळी शहरातील श्री पद्मावती शिक्षण संस्था संचालित संस्कार प्राथमिक शाळेच्या १९९९-२००० या शैक्षणिक वर्षातील सातवी उत्तीर्ण माजी विद्यार्थ्यांचा भव्य स्नेहमेळावा पद्मावती विभागामध्ये उत्साहात आणि भावनिक वातावरणात नुकताच पार पडला. आजवर दहावी-बारावीच्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहमेळावे मोठ्या उत्साहात साजरे झाल्याचे पाहायला मिळाले असले तरी, संस्कार प्राथमिक शाळेच्या सातवीच्या माजी विद्यार्थ्यांनी तब्बल २५ वर्षांनंतर एकत्र येऊन स्नेहमेळाव्याचे आयोजन करत एक आगळावेगळा उपक्रम राबवला. या सोहळ्यात अनेक वर्षांनंतर भेटलेल्या मित्रांनी शालेय जीवनातील सुवर्णक्षणांना उजाळा दिला, ज्यामुळे बालपणीच्या आठवणी पुन्हा जिवंत झाल्या.

कार्यक्रमस्थळी दाखल होताच जुन्या मित्रांच्या चेहऱ्यावरील आनंद, शिक्षकांविषयी व्यक्त झालेला आदर आणि बालपणीच्या आठवणींमध्ये हरवून गेलेले भावनिक क्षण उपस्थितांच्या मनाला भिडले. यावेळी शाळेत पुन्हा एकदा १९९९-२००० चा काळ अवतरल्याचे दृश्य पाहायला मिळाले. या विशेष स्नेहमेळाव्यासाठी संस्थेचे अध्यक्ष श्री कैलास तांदळे अध्यक्षस्थानी होते, तर सचिव श्री दीपक तांदळे, सहसचिव श्रीमती प्रेमिलाताई तांदळे मॅडम, मुख्याध्यापिका सौ. माधुरीताई तांदळे, श्री कराड सर, श्री पाचांगे सर, श्री अनकाडे सर, पर्यवेक्षक श्री इंगळे सर, श्रीम.रणखांब मॅडम, श्री गित्ते सर, श्रीम. साळुंके मॅडम आणि श्री दैठणेकर सर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

यावेळी दिपक ढाकणे, राज रत्नपारखे, अमोल धुमाळ, गणेश टाक, राजेश देशमाने, शैलेश चांडक, सागर टाक, अमोल राजूरकर, धीरज काळे, विपुल बियाणी, वैभव घोडके, श्रीकांत बाहेती, श्रीकांत शर्मा, धनराज स्वामी, प्रताप सोनवणे, भगवान कराळे, उदय पेंटेवार, विशाल आडेपवार, दिलीप खोशे, अशोक कराळे, मनोज मोरे, अमजद पठाण, संभाजी काटे, उमेश फुलझळके, आनंद रेळेकर, दिपाली आघाव, गौतमी भद्रे, पूजा चांडक, स्वाती, मनीषा, श्वेता दीक्षित, गीता काबरा, दिपाली दहातोंडे, पल्लवी हुलगुंडे, वर्षा अदोडे, चंद्रमणी वाघमारे, गंगाधर रायभोळे, श्रीकांत काकडे, अमोल मुळे, पवन भोयटे आदी माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या यशस्वी वाटचालीचे कौतुक करत “संस्कार प्राथमिक शाळा ही केवळ शिक्षण देणारी शाळा नसून विद्यार्थ्यांच्या जीवनाला योग्य दिशा देणारे संस्कार मंदिर आहे,” असे गौरवोद्गार काढले. १९९९-२००० मध्ये सातवी उत्तीर्ण झालेले हे विद्यार्थी आज डॉक्टर, शिक्षक, अभियंते, उद्योजक, शासकीय अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते अशा विविध प्रतिष्ठित पदांवर कार्यरत असून आपापल्या क्षेत्रात यशाचे शिखर गाठले आहे. त्यांच्या बोलण्यातून शाळेप्रती असलेले प्रेम आणि गुरुजनांविषयीची कृतज्ञता प्रकर्षाने जाणवत होती.

कार्यक्रमादरम्यान जुन्या आठवणींना उजाळा देताना वातावरण अनेकदा भावुक झाले. वर्गातील गंमती-जमती, शाळेतील सहली, सांस्कृतिक कार्यक्रम, मधल्या सुट्टीतील धम्माल, शिक्षकांचा धाक आणि मित्रांसोबतचे अविस्मरणीय क्षण आठवून अनेकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. “मोठी पदे मिळाली, आयुष्य पुढे गेले; पण शाळेतील मैत्री आणि शिक्षकांचे संस्कार हेच आमच्या आयुष्याचे खरे भांडवल आहे,” अशा भावना अनेक माजी विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या. या स्नेहमेळाव्यात माजी विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजनांचा सत्कार करून कृतज्ञता व्यक्त केली. जुन्या आठवणींना उजाळा देणारे फोटो, संवाद, हास्यकल्लोळ आणि मैत्रीचा उत्स्फूर्त आनंद यामुळे संपूर्ण परिसर भारला होता. अनेक विद्यार्थ्यांनी शाळेच्या विकासासाठी भविष्यात विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबविण्याचा संकल्पही यावेळी व्यक्त केला. “एक शाळा... एक संस्कार... आणि आयुष्यभर साथ देणारी मैत्री,” अशी भावना व्यक्त करत सर्व माजी विद्यार्थ्यांनी पुन्हा भेटण्याचा निर्धार केला. शाळेने आणि माजी विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले. शेवटी, सर्वांनी एकत्र येऊन ‘संस्कार’च्या आठवणी कायम जपण्याचा संकल्प करत भावपूर्ण वातावरणात कार्यक्रमाचा समारोप केला.
    user_M. p. gitte
    M. p. gitte
    परळी, बीड, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • सामाजिक कार्यकर्ते रविराज साबळे यांनी लातूर येथील विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात धाव घेत एका शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. मंगळवार, २६ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी दोनच्या सुमारास ते पोलीस ठाण्यात पोहोचले आणि पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांची भेट घेऊन प्रकरणाची चौकशी केली. लातूर शहरातील पूर्व भागात असलेल्या या पोलीस ठाण्यात शेतकऱ्यावर बैल खरेदीवरून गुन्हा नोंदवण्यात आला होता, ज्याची माहिती मिळताच साबळे यांनी लातूर गाठले होते. धाराशिव जिल्ह्यातील अरजखेडा येथील शेतकरी भीमराव सूर्यवंशी आणि त्यांचा मुलगा महेश सूर्यवंशी यांनी पाटोदा येथील बाजारातून शेतीसाठी बैलजोडी खरेदी केली होती. त्यांच्याकडे ग्रामपंचायतीचा अधिकृत जनावर खरेदी-विक्री दाखलाही होता. बैलजोडीसह ते पायी आपल्या गावाकडे निघाले असताना, खोपेगाव परिसरात काही बजरंग दल आणि राजीव गांधी चौकात गोरक्षक पदाधिकाऱ्यांनी त्यांना अडवले. 'बैल कुठे नेताय?' आणि 'कशासाठी नेताय?' अशी चौकशी करत त्यांना बराच वेळ रोखून धरण्यात आले. शेतकऱ्यांनी सर्व कागदपत्रे दाखवूनही त्यांना सोडण्यात आले नसल्याचे सांगण्यात येत आहे. वाढता तणाव पाहून शेतकरी महेश सूर्यवंशी यांनी पोलीस हेल्पलाईनवर फोन केला. त्यानंतर विवेकानंद पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मात्र, अडवणाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी, बैलजोडी घेऊन जाणाऱ्या शेतकऱ्यांवरच अन्याय करत गुन्हा दाखल करण्यात आला. या संपूर्ण प्रकारावर संतप्त प्रतिक्रिया देताना रविराज साबळे यांनी स्पष्ट केले की, शेतकऱ्यांना पुन्हा त्रास झाला तर ते सहन करणार नाहीत.
    1
    सामाजिक कार्यकर्ते रविराज साबळे यांनी लातूर येथील विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात धाव घेत एका शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. मंगळवार, २६ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी दोनच्या सुमारास ते पोलीस ठाण्यात पोहोचले आणि पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांची भेट घेऊन प्रकरणाची चौकशी केली. लातूर शहरातील पूर्व भागात असलेल्या या पोलीस ठाण्यात शेतकऱ्यावर बैल खरेदीवरून गुन्हा नोंदवण्यात आला होता, ज्याची माहिती मिळताच साबळे यांनी लातूर गाठले होते.

धाराशिव जिल्ह्यातील अरजखेडा येथील शेतकरी भीमराव सूर्यवंशी आणि त्यांचा मुलगा महेश सूर्यवंशी यांनी पाटोदा येथील बाजारातून शेतीसाठी बैलजोडी खरेदी केली होती. त्यांच्याकडे ग्रामपंचायतीचा अधिकृत जनावर खरेदी-विक्री दाखलाही होता. बैलजोडीसह ते पायी आपल्या गावाकडे निघाले असताना, खोपेगाव परिसरात काही बजरंग दल आणि राजीव गांधी चौकात गोरक्षक पदाधिकाऱ्यांनी त्यांना अडवले. 'बैल कुठे नेताय?' आणि 'कशासाठी नेताय?' अशी चौकशी करत त्यांना बराच वेळ रोखून धरण्यात आले.

शेतकऱ्यांनी सर्व कागदपत्रे दाखवूनही त्यांना सोडण्यात आले नसल्याचे सांगण्यात येत आहे. वाढता तणाव पाहून शेतकरी महेश सूर्यवंशी यांनी पोलीस हेल्पलाईनवर फोन केला. त्यानंतर विवेकानंद पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मात्र, अडवणाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी, बैलजोडी घेऊन जाणाऱ्या शेतकऱ्यांवरच अन्याय करत गुन्हा दाखल करण्यात आला. या संपूर्ण प्रकारावर संतप्त प्रतिक्रिया देताना रविराज साबळे यांनी स्पष्ट केले की, शेतकऱ्यांना पुन्हा त्रास झाला तर ते सहन करणार नाहीत.
    user_Nitin Chalak
    Nitin Chalak
    Media company शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • लातूर जिल्हा पोलिसांनी दाखवलेल्या सतर्कता, समन्वय आणि धाडसी कारवाईमुळे औराद शहाजानी परिसरातून अपहरण झालेल्या एका युवकाची काही तासांत सुखरूप सुटका करण्यात आली आहे. या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या समन्वयामुळे, नाकाबंदी आणि पोलिसांच्या तत्पर पाठलागामुळे ही कारवाई यशस्वी ठरली. दिनांक २५ मे २०२६ रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. बांगर हे औराद शहाजानी पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करत असताना त्यांना मौजे तगरखेडा येथील पुलाजवळून एका युवकाचे अपहरण झाल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच सपोनि बांगर यांनी घटनास्थळी धाव घेतली असता, चार ते पाच जणांनी एका युवकाला जबरदस्तीने कारमध्ये बसवून लातूरच्या दिशेने नेल्याचे समोर आले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सपोनि बांगर यांनी तात्काळ वाहनाचा क्रमांक मिळवून पोलीस नियंत्रण कक्षाला कळवले. यानंतर निलंगा, शिरूर अनंतपाळ, देवणी आणि निटूर परिसरातील पोलिसांना सतर्क करून संबंधित मार्गांवर नाकाबंदी करण्याचे आदेश देण्यात आले. अपहरणकर्त्यांची कार निटूर मार्गे लातूरकडे जात असल्याचे स्पष्ट झाल्यावर निटूर येथे कर्तव्यावर असलेल्या पोलीस अंमलदार सुधीर शिंदे यांच्याशी संपर्क साधण्यात आला. त्यांनी तात्काळ संशयित वाहन ओळखले आणि प्रसंगावधान राखत एका खाजगी वाहनाच्या मदतीने आरोपींच्या कारचा पाठलाग सुरू केला. पाठलाग सुरू असल्याचे लक्षात येताच आरोपींनी पानचिंचोली परिसरात रस्त्याच्या कडेला वाहन थांबवून अपहरण केलेल्या युवकाला कारमध्येच सोडून उसाच्या शेतात पळ काढला. काही वेळातच सपोनि बांगर आणि त्यांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी युवकाची सुखरूप सुटका करत संबंधित वाहन ताब्यात घेतले. दरम्यान, पळून गेलेले आरोपी रस्त्यावर येऊन लातूरकडे जाण्यासाठी वाहनाची वाट पाहत असताना औराद शहाजानी पोलीस ठाण्याच्या पथकाने आणि पानचिंचोली येथील सतर्क ग्रामस्थांच्या मदतीने सद्दाम मुस्ताक फारुकी (वय ३६, रा. बाभळगाव रोड, लातूर) आणि वाजिद हक्कानी उर्फ हकानी शेख (रा. बरकत नगर, लातूर) या दोन आरोपींना ताब्यात घेऊन अटक केली. उर्वरित आरोपी राहुल चंद्रकांत वाघमारे, अलीम कलीम शेख आणि सचिन वाघमारे यांचा शोध सुरू आहे. सदर प्रकरणात पोलीस ठाणे औराद शहाजानी येथे मोईन अकबर चौधरी (वय २५, रा. अंजली नगर, लातूर) यांच्या फिर्यादीवरून गुरनं ११५/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम १४०(१), १०९(१), १२६(२), ११५(२), १८९(२), १८९(४), १९०, १९१(३) तसेच शस्त्र अधिनियम कलम ४, २५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राथमिक तपासात अनैतिक संबंधाच्या संशयातून आरोपींनी कट रचून फिर्यादीचे अपहरण केल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपींनी फिर्यादीची दुचाकी अडवून त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, डोक्यात बिअरची बाटली फोडून जखमी केले आणि जबरदस्तीने कारमध्ये टाकून त्याचे अपहरण केले असल्याचे तपासात समोर आले आहे. या संपूर्ण कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. बांगर, पोलीस अंमलदार सुधीर शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण कदम, पप्पू कांबळे तसेच औराद शहाजानी पोलीस ठाण्याचे इतर अधिकारी आणि अंमलदार तसेच पानचिंचोली येथील ग्रामस्थांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे पोलिसांना आरोपींना पकडण्यात यश मिळाले आहे. सदर प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. बांगर हे करत आहेत.
    1
    लातूर जिल्हा पोलिसांनी दाखवलेल्या सतर्कता, समन्वय आणि धाडसी कारवाईमुळे औराद शहाजानी परिसरातून अपहरण झालेल्या एका युवकाची काही तासांत सुखरूप सुटका करण्यात आली आहे. या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या समन्वयामुळे, नाकाबंदी आणि पोलिसांच्या तत्पर पाठलागामुळे ही कारवाई यशस्वी ठरली.

दिनांक २५ मे २०२६ रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. बांगर हे औराद शहाजानी पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करत असताना त्यांना मौजे तगरखेडा येथील पुलाजवळून एका युवकाचे अपहरण झाल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच सपोनि बांगर यांनी घटनास्थळी धाव घेतली असता, चार ते पाच जणांनी एका युवकाला जबरदस्तीने कारमध्ये बसवून लातूरच्या दिशेने नेल्याचे समोर आले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सपोनि बांगर यांनी तात्काळ वाहनाचा क्रमांक मिळवून पोलीस नियंत्रण कक्षाला कळवले. यानंतर निलंगा, शिरूर अनंतपाळ, देवणी आणि निटूर परिसरातील पोलिसांना सतर्क करून संबंधित मार्गांवर नाकाबंदी करण्याचे आदेश देण्यात आले.

अपहरणकर्त्यांची कार निटूर मार्गे लातूरकडे जात असल्याचे स्पष्ट झाल्यावर निटूर येथे कर्तव्यावर असलेल्या पोलीस अंमलदार सुधीर शिंदे यांच्याशी संपर्क साधण्यात आला. त्यांनी तात्काळ संशयित वाहन ओळखले आणि प्रसंगावधान राखत एका खाजगी वाहनाच्या मदतीने आरोपींच्या कारचा पाठलाग सुरू केला. पाठलाग सुरू असल्याचे लक्षात येताच आरोपींनी पानचिंचोली परिसरात रस्त्याच्या कडेला वाहन थांबवून अपहरण केलेल्या युवकाला कारमध्येच सोडून उसाच्या शेतात पळ काढला. काही वेळातच सपोनि बांगर आणि त्यांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी युवकाची सुखरूप सुटका करत संबंधित वाहन ताब्यात घेतले.

दरम्यान, पळून गेलेले आरोपी रस्त्यावर येऊन लातूरकडे जाण्यासाठी वाहनाची वाट पाहत असताना औराद शहाजानी पोलीस ठाण्याच्या पथकाने आणि पानचिंचोली येथील सतर्क ग्रामस्थांच्या मदतीने सद्दाम मुस्ताक फारुकी (वय ३६, रा. बाभळगाव रोड, लातूर) आणि वाजिद हक्कानी उर्फ हकानी शेख (रा. बरकत नगर, लातूर) या दोन आरोपींना ताब्यात घेऊन अटक केली. उर्वरित आरोपी राहुल चंद्रकांत वाघमारे, अलीम कलीम शेख आणि सचिन वाघमारे यांचा शोध सुरू आहे.

सदर प्रकरणात पोलीस ठाणे औराद शहाजानी येथे मोईन अकबर चौधरी (वय २५, रा. अंजली नगर, लातूर) यांच्या फिर्यादीवरून गुरनं ११५/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम १४०(१), १०९(१), १२६(२), ११५(२), १८९(२), १८९(४), १९०, १९१(३) तसेच शस्त्र अधिनियम कलम ४, २५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राथमिक तपासात अनैतिक संबंधाच्या संशयातून आरोपींनी कट रचून फिर्यादीचे अपहरण केल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपींनी फिर्यादीची दुचाकी अडवून त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, डोक्यात बिअरची बाटली फोडून जखमी केले आणि जबरदस्तीने कारमध्ये टाकून त्याचे अपहरण केले असल्याचे तपासात समोर आले आहे.

या संपूर्ण कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. बांगर, पोलीस अंमलदार सुधीर शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण कदम, पप्पू कांबळे तसेच औराद शहाजानी पोलीस ठाण्याचे इतर अधिकारी आणि अंमलदार तसेच पानचिंचोली येथील ग्रामस्थांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे पोलिसांना आरोपींना पकडण्यात यश मिळाले आहे. सदर प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. बांगर हे करत आहेत.
    user_Dede Khanderao Nivrutti
    Dede Khanderao Nivrutti
    Advertising agency शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • Post by Nandkumar Motiram Totewad
    1
    Post by Nandkumar Motiram Totewad
    user_Nandkumar Motiram Totewad
    Nandkumar Motiram Totewad
    Farmer हदगाव, नांदेड, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • महाराष्ट्र आणि तेलंगणा या राज्यांच्या सीमावर्ती भागांत गारपीट झाली आहे. याचबरोबर, शहरातही रिमझिम पाऊस कोसळल्याचे वृत्त आहे.
    1
    महाराष्ट्र आणि तेलंगणा या राज्यांच्या सीमावर्ती भागांत गारपीट झाली आहे. याचबरोबर, शहरातही रिमझिम पाऊस कोसळल्याचे वृत्त आहे.
    user_Today One Live
    Today One Live
    Journalist Nanded, Maharashtra•
    7 hrs ago
  • लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या पुण्यतिथीच्या अनुषंगाने नामदार पंकजाताई मुंडे यांनी आवाहन केले आहे.
    1
    लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या पुण्यतिथीच्या अनुषंगाने नामदार पंकजाताई मुंडे यांनी आवाहन केले आहे.
    user_M. p. gitte
    M. p. gitte
    परळी, बीड, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • धुळे शहरातील अवधान उपनगरातील निंबा नगर येथील आदिवासी वस्तीत अनैतिक संबंधांच्या वादातून किशोर डापटे नावाच्या तरुणाची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या करण्यात आली आहे. आज ही धक्कादायक घटना उघडकीस आल्याने संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, अनैतिक संबंधांच्या वादामधून अज्ञातांनी किशोर डापटे याच्यावर धारदार शस्त्राने सपासप वार केले, ज्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आढळल्यानंतर नागरिकांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच मोहाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. या भीषण हत्येमागील नेमके धागेदोरे शोधून मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळण्याचे आव्हान आता पोलिसांसमोर आहे. मोहाडी पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या संपूर्ण प्रकरणाचा पुढील सविस्तर तपास वेगाने सुरू आहे.
    1
    धुळे शहरातील अवधान उपनगरातील निंबा नगर येथील आदिवासी वस्तीत अनैतिक संबंधांच्या वादातून किशोर डापटे नावाच्या तरुणाची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या करण्यात आली आहे. आज ही धक्कादायक घटना उघडकीस आल्याने संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, अनैतिक संबंधांच्या वादामधून अज्ञातांनी किशोर डापटे याच्यावर धारदार शस्त्राने सपासप वार केले, ज्यात त्याचा जागीच मृत्यू झाला.

रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आढळल्यानंतर नागरिकांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच मोहाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. या भीषण हत्येमागील नेमके धागेदोरे शोधून मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळण्याचे आव्हान आता पोलिसांसमोर आहे. मोहाडी पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या संपूर्ण प्रकरणाचा पुढील सविस्तर तपास वेगाने सुरू आहे.
    user_सुमन नागनाथ अलमलकर
    सुमन नागनाथ अलमलकर
    Local News Reporter शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    9 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.