logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

मोमिन आर्ट अकादमीने एका अप्रतिम कला प्रदर्शनाचे यशस्वी आयोजन केले, ज्यासोबतच प्रमाणपत्र वितरण सोहळाही उत्साहात पार पडला.

4 hrs ago
user_Today One Live
Today One Live
Journalist Nanded, Maharashtra•
4 hrs ago

मोमिन आर्ट अकादमीने एका अप्रतिम कला प्रदर्शनाचे यशस्वी आयोजन केले, ज्यासोबतच प्रमाणपत्र वितरण सोहळाही उत्साहात पार पडला.

More news from Maharashtra and nearby areas
  • मोमिन आर्ट अकादमीने एका अप्रतिम कला प्रदर्शनाचे यशस्वी आयोजन केले, ज्यासोबतच प्रमाणपत्र वितरण सोहळाही उत्साहात पार पडला.
    1
    मोमिन आर्ट अकादमीने एका अप्रतिम कला प्रदर्शनाचे यशस्वी आयोजन केले, ज्यासोबतच प्रमाणपत्र वितरण सोहळाही उत्साहात पार पडला.
    user_Today One Live
    Today One Live
    Journalist Nanded, Maharashtra•
    4 hrs ago
  • Post by Nandkumar Motiram Totewad
    1
    Post by Nandkumar Motiram Totewad
    user_Nandkumar Motiram Totewad
    Nandkumar Motiram Totewad
    Farmer हदगाव, नांदेड, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • सिरपूर येथील शेत सर्वे क्रमांक ५६ ची भूमिअभिलेख कार्यालयाकडून मोजणी करण्यात आली आहे. या मोजणीच्या कार्यवाहीनंतर संबंधित शेतकरी आवरगंड यांनी प्रशासनाचे आभार मानले.
    1
    सिरपूर येथील शेत सर्वे क्रमांक ५६ ची भूमिअभिलेख कार्यालयाकडून मोजणी करण्यात आली आहे. या मोजणीच्या कार्यवाहीनंतर संबंधित शेतकरी आवरगंड यांनी प्रशासनाचे आभार मानले.
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    15 hrs ago
  • परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यात २३ मे २०२६ रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
    1
    परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यात २३ मे २०२६ रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
    user_Ramesh Mulgir
    Ramesh Mulgir
    मानवत, परभणी, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • परळी शहरातील श्री पद्मावती शिक्षण संस्था संचालित संस्कार प्राथमिक शाळेच्या १९९९-२००० या शैक्षणिक वर्षातील सातवी उत्तीर्ण माजी विद्यार्थ्यांचा भव्य स्नेहमेळावा पद्मावती विभागामध्ये उत्साहात आणि भावनिक वातावरणात नुकताच पार पडला. आजवर दहावी-बारावीच्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहमेळावे मोठ्या उत्साहात साजरे झाल्याचे पाहायला मिळाले असले तरी, संस्कार प्राथमिक शाळेच्या सातवीच्या माजी विद्यार्थ्यांनी तब्बल २५ वर्षांनंतर एकत्र येऊन स्नेहमेळाव्याचे आयोजन करत एक आगळावेगळा उपक्रम राबवला. या सोहळ्यात अनेक वर्षांनंतर भेटलेल्या मित्रांनी शालेय जीवनातील सुवर्णक्षणांना उजाळा दिला, ज्यामुळे बालपणीच्या आठवणी पुन्हा जिवंत झाल्या. कार्यक्रमस्थळी दाखल होताच जुन्या मित्रांच्या चेहऱ्यावरील आनंद, शिक्षकांविषयी व्यक्त झालेला आदर आणि बालपणीच्या आठवणींमध्ये हरवून गेलेले भावनिक क्षण उपस्थितांच्या मनाला भिडले. यावेळी शाळेत पुन्हा एकदा १९९९-२००० चा काळ अवतरल्याचे दृश्य पाहायला मिळाले. या विशेष स्नेहमेळाव्यासाठी संस्थेचे अध्यक्ष श्री कैलास तांदळे अध्यक्षस्थानी होते, तर सचिव श्री दीपक तांदळे, सहसचिव श्रीमती प्रेमिलाताई तांदळे मॅडम, मुख्याध्यापिका सौ. माधुरीताई तांदळे, श्री कराड सर, श्री पाचांगे सर, श्री अनकाडे सर, पर्यवेक्षक श्री इंगळे सर, श्रीम.रणखांब मॅडम, श्री गित्ते सर, श्रीम. साळुंके मॅडम आणि श्री दैठणेकर सर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी दिपक ढाकणे, राज रत्नपारखे, अमोल धुमाळ, गणेश टाक, राजेश देशमाने, शैलेश चांडक, सागर टाक, अमोल राजूरकर, धीरज काळे, विपुल बियाणी, वैभव घोडके, श्रीकांत बाहेती, श्रीकांत शर्मा, धनराज स्वामी, प्रताप सोनवणे, भगवान कराळे, उदय पेंटेवार, विशाल आडेपवार, दिलीप खोशे, अशोक कराळे, मनोज मोरे, अमजद पठाण, संभाजी काटे, उमेश फुलझळके, आनंद रेळेकर, दिपाली आघाव, गौतमी भद्रे, पूजा चांडक, स्वाती, मनीषा, श्वेता दीक्षित, गीता काबरा, दिपाली दहातोंडे, पल्लवी हुलगुंडे, वर्षा अदोडे, चंद्रमणी वाघमारे, गंगाधर रायभोळे, श्रीकांत काकडे, अमोल मुळे, पवन भोयटे आदी माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या यशस्वी वाटचालीचे कौतुक करत “संस्कार प्राथमिक शाळा ही केवळ शिक्षण देणारी शाळा नसून विद्यार्थ्यांच्या जीवनाला योग्य दिशा देणारे संस्कार मंदिर आहे,” असे गौरवोद्गार काढले. १९९९-२००० मध्ये सातवी उत्तीर्ण झालेले हे विद्यार्थी आज डॉक्टर, शिक्षक, अभियंते, उद्योजक, शासकीय अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते अशा विविध प्रतिष्ठित पदांवर कार्यरत असून आपापल्या क्षेत्रात यशाचे शिखर गाठले आहे. त्यांच्या बोलण्यातून शाळेप्रती असलेले प्रेम आणि गुरुजनांविषयीची कृतज्ञता प्रकर्षाने जाणवत होती. कार्यक्रमादरम्यान जुन्या आठवणींना उजाळा देताना वातावरण अनेकदा भावुक झाले. वर्गातील गंमती-जमती, शाळेतील सहली, सांस्कृतिक कार्यक्रम, मधल्या सुट्टीतील धम्माल, शिक्षकांचा धाक आणि मित्रांसोबतचे अविस्मरणीय क्षण आठवून अनेकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. “मोठी पदे मिळाली, आयुष्य पुढे गेले; पण शाळेतील मैत्री आणि शिक्षकांचे संस्कार हेच आमच्या आयुष्याचे खरे भांडवल आहे,” अशा भावना अनेक माजी विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या. या स्नेहमेळाव्यात माजी विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजनांचा सत्कार करून कृतज्ञता व्यक्त केली. जुन्या आठवणींना उजाळा देणारे फोटो, संवाद, हास्यकल्लोळ आणि मैत्रीचा उत्स्फूर्त आनंद यामुळे संपूर्ण परिसर भारला होता. अनेक विद्यार्थ्यांनी शाळेच्या विकासासाठी भविष्यात विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबविण्याचा संकल्पही यावेळी व्यक्त केला. “एक शाळा... एक संस्कार... आणि आयुष्यभर साथ देणारी मैत्री,” अशी भावना व्यक्त करत सर्व माजी विद्यार्थ्यांनी पुन्हा भेटण्याचा निर्धार केला. शाळेने आणि माजी विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले. शेवटी, सर्वांनी एकत्र येऊन ‘संस्कार’च्या आठवणी कायम जपण्याचा संकल्प करत भावपूर्ण वातावरणात कार्यक्रमाचा समारोप केला.
    1
    परळी शहरातील श्री पद्मावती शिक्षण संस्था संचालित संस्कार प्राथमिक शाळेच्या १९९९-२००० या शैक्षणिक वर्षातील सातवी उत्तीर्ण माजी विद्यार्थ्यांचा भव्य स्नेहमेळावा पद्मावती विभागामध्ये उत्साहात आणि भावनिक वातावरणात नुकताच पार पडला. आजवर दहावी-बारावीच्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहमेळावे मोठ्या उत्साहात साजरे झाल्याचे पाहायला मिळाले असले तरी, संस्कार प्राथमिक शाळेच्या सातवीच्या माजी विद्यार्थ्यांनी तब्बल २५ वर्षांनंतर एकत्र येऊन स्नेहमेळाव्याचे आयोजन करत एक आगळावेगळा उपक्रम राबवला. या सोहळ्यात अनेक वर्षांनंतर भेटलेल्या मित्रांनी शालेय जीवनातील सुवर्णक्षणांना उजाळा दिला, ज्यामुळे बालपणीच्या आठवणी पुन्हा जिवंत झाल्या.

कार्यक्रमस्थळी दाखल होताच जुन्या मित्रांच्या चेहऱ्यावरील आनंद, शिक्षकांविषयी व्यक्त झालेला आदर आणि बालपणीच्या आठवणींमध्ये हरवून गेलेले भावनिक क्षण उपस्थितांच्या मनाला भिडले. यावेळी शाळेत पुन्हा एकदा १९९९-२००० चा काळ अवतरल्याचे दृश्य पाहायला मिळाले. या विशेष स्नेहमेळाव्यासाठी संस्थेचे अध्यक्ष श्री कैलास तांदळे अध्यक्षस्थानी होते, तर सचिव श्री दीपक तांदळे, सहसचिव श्रीमती प्रेमिलाताई तांदळे मॅडम, मुख्याध्यापिका सौ. माधुरीताई तांदळे, श्री कराड सर, श्री पाचांगे सर, श्री अनकाडे सर, पर्यवेक्षक श्री इंगळे सर, श्रीम.रणखांब मॅडम, श्री गित्ते सर, श्रीम. साळुंके मॅडम आणि श्री दैठणेकर सर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

यावेळी दिपक ढाकणे, राज रत्नपारखे, अमोल धुमाळ, गणेश टाक, राजेश देशमाने, शैलेश चांडक, सागर टाक, अमोल राजूरकर, धीरज काळे, विपुल बियाणी, वैभव घोडके, श्रीकांत बाहेती, श्रीकांत शर्मा, धनराज स्वामी, प्रताप सोनवणे, भगवान कराळे, उदय पेंटेवार, विशाल आडेपवार, दिलीप खोशे, अशोक कराळे, मनोज मोरे, अमजद पठाण, संभाजी काटे, उमेश फुलझळके, आनंद रेळेकर, दिपाली आघाव, गौतमी भद्रे, पूजा चांडक, स्वाती, मनीषा, श्वेता दीक्षित, गीता काबरा, दिपाली दहातोंडे, पल्लवी हुलगुंडे, वर्षा अदोडे, चंद्रमणी वाघमारे, गंगाधर रायभोळे, श्रीकांत काकडे, अमोल मुळे, पवन भोयटे आदी माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या यशस्वी वाटचालीचे कौतुक करत “संस्कार प्राथमिक शाळा ही केवळ शिक्षण देणारी शाळा नसून विद्यार्थ्यांच्या जीवनाला योग्य दिशा देणारे संस्कार मंदिर आहे,” असे गौरवोद्गार काढले. १९९९-२००० मध्ये सातवी उत्तीर्ण झालेले हे विद्यार्थी आज डॉक्टर, शिक्षक, अभियंते, उद्योजक, शासकीय अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते अशा विविध प्रतिष्ठित पदांवर कार्यरत असून आपापल्या क्षेत्रात यशाचे शिखर गाठले आहे. त्यांच्या बोलण्यातून शाळेप्रती असलेले प्रेम आणि गुरुजनांविषयीची कृतज्ञता प्रकर्षाने जाणवत होती.

कार्यक्रमादरम्यान जुन्या आठवणींना उजाळा देताना वातावरण अनेकदा भावुक झाले. वर्गातील गंमती-जमती, शाळेतील सहली, सांस्कृतिक कार्यक्रम, मधल्या सुट्टीतील धम्माल, शिक्षकांचा धाक आणि मित्रांसोबतचे अविस्मरणीय क्षण आठवून अनेकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. “मोठी पदे मिळाली, आयुष्य पुढे गेले; पण शाळेतील मैत्री आणि शिक्षकांचे संस्कार हेच आमच्या आयुष्याचे खरे भांडवल आहे,” अशा भावना अनेक माजी विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या. या स्नेहमेळाव्यात माजी विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजनांचा सत्कार करून कृतज्ञता व्यक्त केली. जुन्या आठवणींना उजाळा देणारे फोटो, संवाद, हास्यकल्लोळ आणि मैत्रीचा उत्स्फूर्त आनंद यामुळे संपूर्ण परिसर भारला होता. अनेक विद्यार्थ्यांनी शाळेच्या विकासासाठी भविष्यात विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबविण्याचा संकल्पही यावेळी व्यक्त केला. “एक शाळा... एक संस्कार... आणि आयुष्यभर साथ देणारी मैत्री,” अशी भावना व्यक्त करत सर्व माजी विद्यार्थ्यांनी पुन्हा भेटण्याचा निर्धार केला. शाळेने आणि माजी विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले. शेवटी, सर्वांनी एकत्र येऊन ‘संस्कार’च्या आठवणी कायम जपण्याचा संकल्प करत भावपूर्ण वातावरणात कार्यक्रमाचा समारोप केला.
    user_M. p. gitte
    M. p. gitte
    परळी, बीड, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • माहूर शहरातील कपिलेश्वर धर्मशाळेचे संचालक, 60 वर्षीय भारत बेहेरे यांचा 26 रोजी सकाळी 6 वाजून 15 मिनिटांनी एका कारच्या धडकेत जागीच मृत्यू झाला. ते दररोज कपिलेश्वर धर्मशाळा ते न्यायालयापर्यंत मॉर्निंग वॉकला जात असत आणि आज सकाळी मॉर्निंग वॉकवरून परत येत असताना हॉटेल षडानन समोर त्यांना एका कारने मागून जोरदार धडक दिली. मनमिळावू स्वभावाचे असलेल्या भारत बेहेरे यांना धडक देणारा चालक धनाजी ज्ञानेश्वर देव (वय 30, रा. किशोर, ता. कन्नड, जि. छत्रपती संभाजीनगर) होता. तो आपली MH 09 CJ 7676 क्रमांकाची क्रिएटा कार घेऊन घरच्या मंडळींसह माहूर येथे दर्शनासाठी येत होता. सकाळची वेळ असल्याने चालकाला समोरून येणारे भारत बेहेरे दिसले नाहीत किंवा काही समजण्याआधीच त्यांच्या गाडीने बेहेरे यांना मागून जोराची धडक दिली. धडकेमुळे भारत बेहेरे रस्त्यावर पडून 30 ते 35 फूट फरफटत गेले, ज्यामुळे त्यांच्या डोक्याला, तोंडाला आणि कमरेला गंभीर मार लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी भारत बेहेरे यांना त्याच कारमधून माहूरच्या ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी कारचालक धनाजी देव यांना अटक करण्यात आली असून, माहूर पोलिसांनी घटनेची नोंद घेतली आहे. पोलीस निरीक्षक देविदास चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी शरद घोडके, पो उप नी बाबू जाधव आणि पो का पवन राऊत हे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. मनमिळावू स्वभावाच्या भारत बेहेरे यांच्या निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.
    4
    माहूर शहरातील कपिलेश्वर धर्मशाळेचे संचालक, 60 वर्षीय भारत बेहेरे यांचा 26 रोजी सकाळी 6 वाजून 15 मिनिटांनी एका कारच्या धडकेत जागीच मृत्यू झाला. ते दररोज कपिलेश्वर धर्मशाळा ते न्यायालयापर्यंत मॉर्निंग वॉकला जात असत आणि आज सकाळी मॉर्निंग वॉकवरून परत येत असताना हॉटेल षडानन समोर त्यांना एका कारने मागून जोरदार धडक दिली.

मनमिळावू स्वभावाचे असलेल्या भारत बेहेरे यांना धडक देणारा चालक धनाजी ज्ञानेश्वर देव (वय 30, रा. किशोर, ता. कन्नड, जि. छत्रपती संभाजीनगर) होता. तो आपली MH 09 CJ 7676 क्रमांकाची क्रिएटा कार घेऊन घरच्या मंडळींसह माहूर येथे दर्शनासाठी येत होता. सकाळची वेळ असल्याने चालकाला समोरून येणारे भारत बेहेरे दिसले नाहीत किंवा काही समजण्याआधीच त्यांच्या गाडीने बेहेरे यांना मागून जोराची धडक दिली. धडकेमुळे भारत बेहेरे रस्त्यावर पडून 30 ते 35 फूट फरफटत गेले, ज्यामुळे त्यांच्या डोक्याला, तोंडाला आणि कमरेला गंभीर मार लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला.

अपघातानंतर घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी भारत बेहेरे यांना त्याच कारमधून माहूरच्या ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी कारचालक धनाजी देव यांना अटक करण्यात आली असून, माहूर पोलिसांनी घटनेची नोंद घेतली आहे. पोलीस निरीक्षक देविदास चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी शरद घोडके, पो उप नी बाबू जाधव आणि पो का पवन राऊत हे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. मनमिळावू स्वभावाच्या भारत बेहेरे यांच्या निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.
    user_Dhananjay Govindrao Aradhye
    Dhananjay Govindrao Aradhye
    Newspaper advertising department माहूर, नांदेड, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • महाराष्ट्र आणि तेलंगणा या राज्यांच्या सीमावर्ती भागांत गारपीट झाली आहे. याचबरोबर, शहरातही रिमझिम पाऊस कोसळल्याचे वृत्त आहे.
    1
    महाराष्ट्र आणि तेलंगणा या राज्यांच्या सीमावर्ती भागांत गारपीट झाली आहे. याचबरोबर, शहरातही रिमझिम पाऊस कोसळल्याचे वृत्त आहे.
    user_Today One Live
    Today One Live
    Journalist Nanded, Maharashtra•
    5 hrs ago
  • लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या पुण्यतिथीच्या अनुषंगाने नामदार पंकजाताई मुंडे यांनी आवाहन केले आहे.
    1
    लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या पुण्यतिथीच्या अनुषंगाने नामदार पंकजाताई मुंडे यांनी आवाहन केले आहे.
    user_M. p. gitte
    M. p. gitte
    परळी, बीड, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • सामाजिक कार्यकर्ते रविराज साबळे यांनी लातूर येथील विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात धाव घेत एका शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. मंगळवार, २६ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी दोनच्या सुमारास ते पोलीस ठाण्यात पोहोचले आणि पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांची भेट घेऊन प्रकरणाची चौकशी केली. लातूर शहरातील पूर्व भागात असलेल्या या पोलीस ठाण्यात शेतकऱ्यावर बैल खरेदीवरून गुन्हा नोंदवण्यात आला होता, ज्याची माहिती मिळताच साबळे यांनी लातूर गाठले होते. धाराशिव जिल्ह्यातील अरजखेडा येथील शेतकरी भीमराव सूर्यवंशी आणि त्यांचा मुलगा महेश सूर्यवंशी यांनी पाटोदा येथील बाजारातून शेतीसाठी बैलजोडी खरेदी केली होती. त्यांच्याकडे ग्रामपंचायतीचा अधिकृत जनावर खरेदी-विक्री दाखलाही होता. बैलजोडीसह ते पायी आपल्या गावाकडे निघाले असताना, खोपेगाव परिसरात काही बजरंग दल आणि राजीव गांधी चौकात गोरक्षक पदाधिकाऱ्यांनी त्यांना अडवले. 'बैल कुठे नेताय?' आणि 'कशासाठी नेताय?' अशी चौकशी करत त्यांना बराच वेळ रोखून धरण्यात आले. शेतकऱ्यांनी सर्व कागदपत्रे दाखवूनही त्यांना सोडण्यात आले नसल्याचे सांगण्यात येत आहे. वाढता तणाव पाहून शेतकरी महेश सूर्यवंशी यांनी पोलीस हेल्पलाईनवर फोन केला. त्यानंतर विवेकानंद पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मात्र, अडवणाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी, बैलजोडी घेऊन जाणाऱ्या शेतकऱ्यांवरच अन्याय करत गुन्हा दाखल करण्यात आला. या संपूर्ण प्रकारावर संतप्त प्रतिक्रिया देताना रविराज साबळे यांनी स्पष्ट केले की, शेतकऱ्यांना पुन्हा त्रास झाला तर ते सहन करणार नाहीत.
    1
    सामाजिक कार्यकर्ते रविराज साबळे यांनी लातूर येथील विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात धाव घेत एका शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. मंगळवार, २६ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी दोनच्या सुमारास ते पोलीस ठाण्यात पोहोचले आणि पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांची भेट घेऊन प्रकरणाची चौकशी केली. लातूर शहरातील पूर्व भागात असलेल्या या पोलीस ठाण्यात शेतकऱ्यावर बैल खरेदीवरून गुन्हा नोंदवण्यात आला होता, ज्याची माहिती मिळताच साबळे यांनी लातूर गाठले होते.

धाराशिव जिल्ह्यातील अरजखेडा येथील शेतकरी भीमराव सूर्यवंशी आणि त्यांचा मुलगा महेश सूर्यवंशी यांनी पाटोदा येथील बाजारातून शेतीसाठी बैलजोडी खरेदी केली होती. त्यांच्याकडे ग्रामपंचायतीचा अधिकृत जनावर खरेदी-विक्री दाखलाही होता. बैलजोडीसह ते पायी आपल्या गावाकडे निघाले असताना, खोपेगाव परिसरात काही बजरंग दल आणि राजीव गांधी चौकात गोरक्षक पदाधिकाऱ्यांनी त्यांना अडवले. 'बैल कुठे नेताय?' आणि 'कशासाठी नेताय?' अशी चौकशी करत त्यांना बराच वेळ रोखून धरण्यात आले.

शेतकऱ्यांनी सर्व कागदपत्रे दाखवूनही त्यांना सोडण्यात आले नसल्याचे सांगण्यात येत आहे. वाढता तणाव पाहून शेतकरी महेश सूर्यवंशी यांनी पोलीस हेल्पलाईनवर फोन केला. त्यानंतर विवेकानंद पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मात्र, अडवणाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी, बैलजोडी घेऊन जाणाऱ्या शेतकऱ्यांवरच अन्याय करत गुन्हा दाखल करण्यात आला. या संपूर्ण प्रकारावर संतप्त प्रतिक्रिया देताना रविराज साबळे यांनी स्पष्ट केले की, शेतकऱ्यांना पुन्हा त्रास झाला तर ते सहन करणार नाहीत.
    user_Nitin Chalak
    Nitin Chalak
    Media company शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    3 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.