Shuru
Apke Nagar Ki App…
Nandkumar Motiram Totewad
More news from महाराष्ट्र and nearby areas
- Post by Nandkumar Motiram Totewad1
- माहूर शहरातील कपिलेश्वर धर्मशाळेचे संचालक, 60 वर्षीय भारत बेहेरे यांचा 26 रोजी सकाळी 6 वाजून 15 मिनिटांनी एका कारच्या धडकेत जागीच मृत्यू झाला. ते दररोज कपिलेश्वर धर्मशाळा ते न्यायालयापर्यंत मॉर्निंग वॉकला जात असत आणि आज सकाळी मॉर्निंग वॉकवरून परत येत असताना हॉटेल षडानन समोर त्यांना एका कारने मागून जोरदार धडक दिली. मनमिळावू स्वभावाचे असलेल्या भारत बेहेरे यांना धडक देणारा चालक धनाजी ज्ञानेश्वर देव (वय 30, रा. किशोर, ता. कन्नड, जि. छत्रपती संभाजीनगर) होता. तो आपली MH 09 CJ 7676 क्रमांकाची क्रिएटा कार घेऊन घरच्या मंडळींसह माहूर येथे दर्शनासाठी येत होता. सकाळची वेळ असल्याने चालकाला समोरून येणारे भारत बेहेरे दिसले नाहीत किंवा काही समजण्याआधीच त्यांच्या गाडीने बेहेरे यांना मागून जोराची धडक दिली. धडकेमुळे भारत बेहेरे रस्त्यावर पडून 30 ते 35 फूट फरफटत गेले, ज्यामुळे त्यांच्या डोक्याला, तोंडाला आणि कमरेला गंभीर मार लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी भारत बेहेरे यांना त्याच कारमधून माहूरच्या ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी कारचालक धनाजी देव यांना अटक करण्यात आली असून, माहूर पोलिसांनी घटनेची नोंद घेतली आहे. पोलीस निरीक्षक देविदास चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी शरद घोडके, पो उप नी बाबू जाधव आणि पो का पवन राऊत हे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. मनमिळावू स्वभावाच्या भारत बेहेरे यांच्या निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.4
- एमआयएमचे वारिस पठाण यांनी नितीश राणे यांच्या मानसिक संतुलनावर भाष्य केले आहे. पठाण यांच्या म्हणण्यानुसार, नितीश राणे यांचे मानसिक संतुलन ठीक नाही.1
- हिंगोली जिल्ह्यात आरक्षण वर्गीकरण तात्काळ लागू करण्यात यावे, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. आरक्षण वर्गीकरणाची अंमलबजावणी त्वरित व्हावी यासाठी हा मोर्चा संपन्न झाला.1
- नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील उंद्री येथील पाझर तलावाच्या दुरुस्ती कामात निकृष्ट दर्जाचे काम झाल्याचा आरोप करत स्थानिक शेतकरी व ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. सुमारे ४० लाख रुपयांच्या निधीतून सुरू असलेल्या या कामात मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचे ग्रामस्थ बोलत असून, त्याची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. शेतकरी व ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, पाझर तलावाच्या पाळीसाठी नवीन साहित्य आणण्याऐवजी पूर्णतः काळी माती आणि मुरमाचा वापर करण्यात आला आहे, तसेच तलावाच्या कडेला असलेलेच दगड, मुरूम व माती वापरून काम उरकण्यात आले आहे. अंदाजपत्रकात रॉयल्टीसाठी जवळपास ९ लाख रुपये दाखवले असताना, प्रत्यक्षात कोणत्या साहित्यावर रॉयल्टी भरली, असा प्रश्न ग्रामस्थ विचारत आहेत. याव्यतिरिक्त, पाळीची अपेक्षित उंची ३० फूट असताना ती प्रत्यक्षात २५ ते २६ फूट, तर काही ठिकाणी केवळ ६ ते ७ फूटच करण्यात आल्याचा आरोप आहे. पूर्वी रुंद असलेली पाळी आता लहान व अरुंद केल्याने “पाळीवरून माणूस किंवा जनावरे फिरली तरी घसरून पडतील अशी परिस्थिती आहे,” असे काही शेतकऱ्यांनी म्हटले आहे. वाळूच्या कामातही माती व मुरूमच भरल्याचा आरोप असून, सांडवा जुनाच ठेवण्यात आला आहे. पाळीच्या खालच्या बाजूस कालवा करून दगडी पिचिंग करणे आवश्यक असताना तेही न केल्यामुळे मोठ्या पावसात तलाव फुटण्याचा धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती शेतकरी व्यक्त करत आहेत. यामुळे बाजूच्या शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान होण्याचीही चिंता आहे. शेतकरी सुधाकर वडजे यांनी कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट असून, काम सुरू असताना ग्रामपंचायत किंवा लघुपाटबंधारे विभागातील संबंधित अधिकारी फिरकलेही नाहीत, असे सांगितले. याबाबत माहिती देताना अभियंता चौधरी धीरज यांनी हे काम नक्षत्र कन्स्ट्रक्शन कंपनीला दिल्याचे सांगितले. त्यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता, त्यांनी काम जवळपास ९० टक्के पूर्ण झाल्याचा दावा करत काम मजबूत व टिकाऊ पद्धतीने केल्याचे म्हटले. तसेच, काही काम शिल्लक राहिल्यास पुन्हा येऊन पूर्ण केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र, पावसाळा तोंडावर आलेला असताना उर्वरित काम पावसात कसे पूर्ण होणार, असा प्रश्न उंद्री येथील शेतकरी उपस्थित करत आहेत. शासनाचा निधी हा शेतकरी व सर्वसामान्यांच्या हितासाठी असतो की ठेकेदार व अधिकाऱ्यांना मोठे करण्यासाठी, अशी संतप्त प्रतिक्रिया जनमानसातून उमटत आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून कामाची गुणवत्ता तपासण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.1
- महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शनाखाली, वाशिम जिल्ह्यात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम आणि SDRF नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने मान्सूनपूर्व आपत्ती व्यवस्थापनासाठी एक दिवसीय विशेष प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अधिक सक्षम आणि सतर्क करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने हा उपक्रम हाती घेतला आहे. दरवर्षी मान्सून काळात अतिवृष्टी, पूरस्थिती, नद्या-नाल्यांना येणारे पाणी, वीज पडणे, झाडे कोसळणे यांसारख्या विविध नैसर्गिक आपत्तींच्या घटना घडतात. अशा परिस्थितीत तात्काळ बचावकार्य कसे करावे, नागरिकांना सुरक्षित स्थळी कसे हलवावे, प्राथमिक उपचार कसे द्यावेत आणि आपत्तीच्या वेळी योग्य समन्वय साधून कार्यवाही कशी करावी, याबाबत या प्रशिक्षणात मार्गदर्शन करण्यात आले. SDRF नागपूरच्या तज्ज्ञ पथकाने बचावकार्याची प्रात्यक्षिके दाखवली आणि उपस्थितांना आपत्कालीन परिस्थितीत वापरण्यात येणाऱ्या साधनसामग्रीची माहिती दिली. पूरग्रस्त भागातील बचाव कार्य, दोरीच्या साहाय्याने बचाव, पाण्यात अडकलेल्यांना बाहेर काढण्याच्या पद्धती तसेच लाईफ जॅकेट व बोटीचा वापर यावर सविस्तर प्रशिक्षण देण्यात आले. महसूल विभाग, पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग, नगर परिषद कर्मचारी, ग्रामपंचायत अधिकारी, आपत्ती व्यवस्थापन पथके, स्वयंसेवी संस्था आणि विविध विभागांचे कर्मचारी मोठ्या संख्येने यात सहभागी झाले होते. आपत्ती काळात विविध विभागांमध्ये समन्वय राखून जलद प्रतिसाद देणे महत्त्वाचे असल्याचे अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. जिल्हा प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, पावसाळ्यात अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, नदी-नाले व धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे आणि आपत्कालीन परिस्थितीत तातडीने प्रशासनाशी संपर्क साधावा. मान्सूनपूर्व तयारीच्या या प्रशिक्षणामुळे जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अधिक सक्षम होण्यास मदत होणार असल्याचा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.4
- मान्सूनपूर्व शेती मशागतीची कामे वेगात सुरू असताना, डिझेल मिळत नसल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी मुखेड-लातूर महामार्गावर काही काळ रास्ता रोको आंदोलन केले. या अचानक झालेल्या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. सध्या पावसाळ्यापूर्वी शेतकरी मशागतीची कामे, पेरणीपूर्व तयारी आणि इतर शेती कामांमध्ये व्यस्त आहेत. ट्रॅक्टर, पंपसेट आणि शेती अवजारे चालवण्यासाठी मोठ्या प्रमाणात डिझेलची आवश्यकता असते. मात्र, डिझेलचा पुरवठा सुरळीत होत नसल्याने शेतकऱ्यांना पेट्रोलपंपावर तासनतास रांगा लावाव्या लागत आहेत. यामुळे शेतीच्या कामासाठी महत्त्वाचा वेळ वाया जात असून मशागतीची कामे खोळंबत असल्याची नाराजी शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.1
- Post by Nandkumar Motiram Totewad1