*येवला मतदारसंघातील बचतगटाच्या महिलांसाठी चांगले उद्योग सुरू करण्यासाठी प्रयत्न करू - डॉ.शेफाली भुजबळ* *महिलांना सक्षम होण्यासाठी बचतगट हे महत्वाचे माध्यम - डॉ.शेफाली भुजबळ* प्रतिनिधी सचिन वखारे येवला -* बचतगट हे महिलांना सक्षम करण्यासाठी अतिशय महत्वाचे साधन आहे. येवला मतदारसंघातील बचतगटाच्या महिलांसाठी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या माध्यमातून चांगले उद्योग निर्माण करण्यासाठी आपण स्वतः प्रयत्न करू असे प्रतिपादन मेट भुजबळ नॉलेज सिटीच्या व्यवस्थापकीय संचालिका डॉ.शेफाली भुजबळ यांनी केले. मंत्री छगन भुजबळ व माजी खासदार समीर भुजबळ यांच्या संकल्पनेतून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आयोजित येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघातील बचत गटातील महिलांसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आज विंचूर गटातील बचत गटांच्या महिलांसाठी डॉ.शेफाली भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत मंजुळा लॉन्स विंचूर येथे मार्गदर्शन शिबिर पार पडले. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष पंढरीनाथ थोरे, येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, डॉ.श्रीकांत आवारे, पांडुरंग राऊत, तानाजी आंधळे, तालुकाध्यक्ष सुरेखा नागरे, डॉ.वैशाली पवार, सीमा दरेकर, प्रा.प्रतिभा जाधव, गटविकास अधिकारी नम्रता जगताप, विकास गोरे, शांताराम नागरे, रामभाऊ जगताप, ज्ञानेश्वर भडांगे, प्रदीप तीपायले, राहुल डुंबरे, मोहन जावळे, माधव जगताप, सोहेल मोमीन, इस्माईल मोमीन,मोहसिन शेख, तालुका अभियान व्यवस्थापक नितीन कापुरे, क्लस्टर कोऑरडीनेटर विश्वजित कोल्हे यांच्यासह पदाधिकारी व बचत गटाच्या महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या. यावेळी डॉ.शेफाली भुजबळ म्हणाल्या की, मंत्री छगन भुजबळ व माजी खासदार समीर भुजबळ यांच्या संकल्पनेतून बचत गटातील महिलांसाठी मार्गदर्शन व हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. हा मार्गदर्शन व हळदी-कुंकू कार्यक्रम म्हणजे केवळ एक सामाजिक उपक्रम नसून, तो स्त्रीशक्तीच्या सन्मानाचा, आत्मनिर्भरतेच्या प्रवासाचा आणि परिवर्तनाच्या चळवळीचा उत्सव असून येवला तालुक्यातील कर्तृत्ववान महिलांशी संवाद साधण्याची संधी मिळणे, ही माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब असल्याचे त्या म्हणाल्या. त्या म्हणाल्या की, बचत गट ही संकल्पना म्हणजे महिलांच्या आयुष्यातील क्रांतिकारी बदलाची सुरुवात आहे. बचत गट म्हणजे केवळ दरमहा थोडे पैसे जमा करण्याची व्यवस्था नाही. तर तो आत्मविश्वास, संघटन, निर्णयक्षमता आणि नेतृत्वगुण विकसित करणारा मंच आहे. आज येवला मतदारसंघातील अनेक बचत गटांनी हे सिद्ध केले आहे की,महिला एकत्र आल्या,त्यांनी नियोजन केले,आणि मेहनतीने काम केले,तर त्या कोणताही व्यवसाय यशस्वीपणे उभा करू शकतात. दुग्ध व्यवसाय, शेतीपूरक उद्योग, किराणा दुकाने, शिवणकाम, पापड-लोणचं उद्योग, मसाला निर्मिती, कॅटरिंग, महिलांसाठी सेवा उद्योग, या सगळ्या क्षेत्रांत आज बचत गटांच्या महिलांनी आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. हे केवळ आर्थिक यश नाही, तर स्वाभिमानाने उभे राहण्याचे प्रतीक असल्याचे त्यांनी सांगितले. त्या म्हणाल्या की, आज येवला विधानसभा मतदारसंघात जे विकासाचे चित्र आपल्याला दिसते, ते केवळ निधीमुळे नाही, तर दूरदृष्टी असलेल्या नेतृत्वामुळे शक्य झाले आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी येवला मतदारसंघाच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न केले असून,सर्वसामान्य नागरिक आणि विशेषतः महिलांना केंद्रस्थानी ठेवून विकासाची दिशा ठरवली आहे. विशेष म्हणजे महिला बचत गट, स्वयंरोजगार योजना, आर्थिक सहाय्य, सामाजिक सुरक्षा योजना यांच्या माध्यमातून महिलांच्या हातात आर्थिक निर्णयशक्ती देण्याचे काम मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली झाले आहे. महिला सक्षम झाली, तर कुटुंब सक्षम होते, आणि कुटुंब सक्षम झाले, तर समाज प्रगत होतो. हा विचार या विकासामागे असल्याचे त्यांनी सांगितले.
*येवला मतदारसंघातील बचतगटाच्या महिलांसाठी चांगले उद्योग सुरू करण्यासाठी प्रयत्न करू - डॉ.शेफाली भुजबळ* *महिलांना सक्षम होण्यासाठी बचतगट हे महत्वाचे माध्यम - डॉ.शेफाली भुजबळ* प्रतिनिधी सचिन वखारे येवला -* बचतगट हे महिलांना सक्षम करण्यासाठी अतिशय महत्वाचे साधन आहे. येवला मतदारसंघातील बचतगटाच्या महिलांसाठी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या माध्यमातून चांगले उद्योग निर्माण करण्यासाठी आपण स्वतः प्रयत्न करू असे प्रतिपादन मेट भुजबळ नॉलेज सिटीच्या व्यवस्थापकीय संचालिका डॉ.शेफाली भुजबळ यांनी केले. मंत्री छगन भुजबळ व माजी खासदार समीर भुजबळ यांच्या संकल्पनेतून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आयोजित येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघातील बचत गटातील महिलांसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आज विंचूर गटातील बचत गटांच्या महिलांसाठी डॉ.शेफाली भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत मंजुळा लॉन्स
विंचूर येथे मार्गदर्शन शिबिर पार पडले. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष पंढरीनाथ थोरे, येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, डॉ.श्रीकांत आवारे, पांडुरंग राऊत, तानाजी आंधळे, तालुकाध्यक्ष सुरेखा नागरे, डॉ.वैशाली पवार, सीमा दरेकर, प्रा.प्रतिभा जाधव, गटविकास अधिकारी नम्रता जगताप, विकास गोरे, शांताराम नागरे, रामभाऊ जगताप, ज्ञानेश्वर भडांगे, प्रदीप तीपायले, राहुल डुंबरे, मोहन जावळे, माधव जगताप, सोहेल मोमीन, इस्माईल मोमीन,मोहसिन शेख, तालुका अभियान व्यवस्थापक नितीन कापुरे, क्लस्टर कोऑरडीनेटर विश्वजित कोल्हे यांच्यासह पदाधिकारी व बचत गटाच्या महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या. यावेळी डॉ.शेफाली भुजबळ म्हणाल्या की, मंत्री छगन भुजबळ व माजी खासदार समीर भुजबळ यांच्या संकल्पनेतून बचत गटातील महिलांसाठी मार्गदर्शन व हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. हा मार्गदर्शन व हळदी-कुंकू कार्यक्रम
म्हणजे केवळ एक सामाजिक उपक्रम नसून, तो स्त्रीशक्तीच्या सन्मानाचा, आत्मनिर्भरतेच्या प्रवासाचा आणि परिवर्तनाच्या चळवळीचा उत्सव असून येवला तालुक्यातील कर्तृत्ववान महिलांशी संवाद साधण्याची संधी मिळणे, ही माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब असल्याचे त्या म्हणाल्या. त्या म्हणाल्या की, बचत गट ही संकल्पना म्हणजे महिलांच्या आयुष्यातील क्रांतिकारी बदलाची सुरुवात आहे. बचत गट म्हणजे केवळ दरमहा थोडे पैसे जमा करण्याची व्यवस्था नाही. तर तो आत्मविश्वास, संघटन, निर्णयक्षमता आणि नेतृत्वगुण विकसित करणारा मंच आहे. आज येवला मतदारसंघातील अनेक बचत गटांनी हे सिद्ध केले आहे की,महिला एकत्र आल्या,त्यांनी नियोजन केले,आणि मेहनतीने काम केले,तर त्या कोणताही व्यवसाय यशस्वीपणे उभा करू शकतात. दुग्ध व्यवसाय, शेतीपूरक उद्योग, किराणा दुकाने, शिवणकाम, पापड-लोणचं उद्योग, मसाला निर्मिती, कॅटरिंग, महिलांसाठी सेवा उद्योग, या सगळ्या क्षेत्रांत आज बचत गटांच्या महिलांनी
आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. हे केवळ आर्थिक यश नाही, तर स्वाभिमानाने उभे राहण्याचे प्रतीक असल्याचे त्यांनी सांगितले. त्या म्हणाल्या की, आज येवला विधानसभा मतदारसंघात जे विकासाचे चित्र आपल्याला दिसते, ते केवळ निधीमुळे नाही, तर दूरदृष्टी असलेल्या नेतृत्वामुळे शक्य झाले आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी येवला मतदारसंघाच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न केले असून,सर्वसामान्य नागरिक आणि विशेषतः महिलांना केंद्रस्थानी ठेवून विकासाची दिशा ठरवली आहे. विशेष म्हणजे महिला बचत गट, स्वयंरोजगार योजना, आर्थिक सहाय्य, सामाजिक सुरक्षा योजना यांच्या माध्यमातून महिलांच्या हातात आर्थिक निर्णयशक्ती देण्याचे काम मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली झाले आहे. महिला सक्षम झाली, तर कुटुंब सक्षम होते, आणि कुटुंब सक्षम झाले, तर समाज प्रगत होतो. हा विचार या विकासामागे असल्याचे त्यांनी सांगितले.
- Post by Mintlal yadav up501
- 📍 आज वाकी येथे निष्ठावंतांची उसळलेली गर्दी! वाकी येथे करंजखेड जिल्हा परिषद महायुतीचे अधिकृत उमेदवार मा. डॉ. मनोज राठोड साहेब तसेच सौ. अश्विनी रमेश सोनवणे (पंचायत समिती गण, घाटशेंद्रा) यांच्या शुभहस्ते शुभमुहूर्तावर प्रचाराचा नारळ फोडून अधिकृत शुभारंभ करण्यात आला. नारळ फुटला आणि मायबाप जनता ठामपणे आपल्या सोबत उभी राहिली! यावेळी गावातील मान्यवर व वरिष्ठ नागरिकांनी देखील नारळ फोडून आशीर्वाद दिला 🙏 ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद संपूर्ण कार्यक्रमात जाणवत होता. ही सुरुवात केवळ निवडणूक प्रचाराची नाही, तर गावागावच्या विकासाच्या नव्या विचारांची नांदी आहे. विकासासाठी कटिबद्ध असलेल्या या नेतृत्वाला साथ देत, मोठ्या बहुमताने विजयी करण्याचा ठाम विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला. 🚩1
- Post by Amarjeet Albala1
- Post by RNN CHANNEL4
- https://youtube.com/shorts/myf7ElPkvFw?si=0J8IbNZwAIR1nbLM याच क्षणाची वाट | संपूर्ण महाराष्ट्र बघत होता ! #shorts1
- साकीनाका टेलीफोन एक्सचेंज जोखानी स्टार बिल्डिंग के पास में फहराया तिरंगा, राष्ट्रीय पर्व उत्साह से मनाया गया। राष्ट्रीय पर्व के अवसर पर गरिमामय ढंग से ध्वजारोहण कार्यक्रम आयोजित किया गया। यहाँ के भावी नगर सेवक ने राष्ट्रध्वज फहराकर कार्यक्रम का शुभारंभ किया। इस दौरान उपस्थित सभी नगर वाशी ने तिरंगे को सलामी दी। ध्वजारोहण कार्यक्रम में बड़ी संख्या में लोग शामिल हुए।1
- रास्ते में घायल व्यक्ति को देखकर मंत्री प्रताप सरनाईक ने तुरंत अपना काफिला रुकवाया और बिना देर किए घायल को अस्पताल भेजने की व्यवस्था की।1
- Ek kahani..... BHARAT MERA DESH HE.1
- Post by RNN CHANNEL1