साताऱ्यात महिला शक्तीचा जागर; जागतिक महिला दिनानिमित्त महिला अधिकारी-कर्मचाऱ्यांची भव्य बाईक रॅली साताऱ्यात महिला शक्तीचा जागर; जागतिक महिला दिनानिमित्त महिला अधिकारी-कर्मचाऱ्यांची भव्य बाईक रॅली सातारा दि. 13: जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सातारा शहरात महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वतीने भव्य 'बाईक रॅली' काढण्यात आली. "क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी रचलेल्या शिक्षणाच्या पायामुळेच आज महिला सर्वच क्षेत्रांत नेतृत्वाची शिखरे सर करत आहेत, अशा शब्दांत महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव करत जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी या रॅलीला झेंडा दाखवून मार्गस्थ केले. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने, जिल्हा माहती अधिकारी वर्षा पाटोळे, गणेश देशमुख, नेताजी बिसले, प्रकाश जाधव, उद्धव इंगवले यांच्यासह विविध विभागांच्या महिला अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सकाळी गांधी मैदान येथून या रॅलीचा प्रारंभ झाला. डोक्यावर फेटा, हातात सामाजिक संदेशांचे फलक आणि 'जय जिजाऊ, जय सावित्री'च्या जयघोषाने सातारा शहर दुमदुमून गेले होते. शेकडो महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपल्या दुचाकींसह या रॅलीत सहभाग नोंदवला. शहरातील मुख्य मार्गावरून ही रॅली काढण्यात आली. यावेळी बोलताना जिल्हाधिकारी संतोष पाटील म्हणाले की, आज आपल्या महिला अधिकारी पुरुष अधिकाऱ्यांच्या बरोबरीने, किंबहुना त्यांच्यापेक्षाही सरस कामगिरी करत आहेत. सावित्रीबाईंच्या विचारांमुळेच आपण आज इथपर्यंत पोहोचलो आहोत. नोकरीमध्ये स्थिरावल्यानंतर आता समाजातील तळागाळातील विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचवण्यासाठी महिलांनी पुढाकार घ्यावा. ज्या उत्साहात आज ही बाईक रॅली काढण्यात आली, तसाच उत्साह आणि कर्तव्यदक्षता वर्षभर आपल्या शासकीय कामकाजातही दिसून येवो, अशी अपेक्षा जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केली जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली म्हणाल्या, जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने शासकीय कार्यालयात काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचारी महिला काढण्यात आली आहे. आम्ही सगळे अगदी सक्षमपणे प्रशासनात काम करीत आहोत. समाजातील प्रत्येक मुलीने संकटांना तोंड देण्यासाठी अजिबात घाबरू नका आणि त्याला चांगल्या पद्धतीने प्रतिकार करा हीच खरी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाची दारे उघडे करुन दिले त्याला न्याय दिल्यासारखे होईल. 0000
साताऱ्यात महिला शक्तीचा जागर; जागतिक महिला दिनानिमित्त महिला अधिकारी-कर्मचाऱ्यांची भव्य बाईक रॅली साताऱ्यात महिला शक्तीचा जागर; जागतिक महिला दिनानिमित्त महिला अधिकारी-कर्मचाऱ्यांची भव्य बाईक रॅली सातारा दि. 13: जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सातारा शहरात महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वतीने भव्य 'बाईक रॅली' काढण्यात आली. "क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी रचलेल्या शिक्षणाच्या पायामुळेच आज महिला सर्वच क्षेत्रांत नेतृत्वाची शिखरे सर करत आहेत, अशा शब्दांत महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव करत जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी या रॅलीला झेंडा दाखवून मार्गस्थ केले. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने, जिल्हा माहती अधिकारी वर्षा पाटोळे, गणेश देशमुख, नेताजी
बिसले, प्रकाश जाधव, उद्धव इंगवले यांच्यासह विविध विभागांच्या महिला अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सकाळी गांधी मैदान येथून या रॅलीचा प्रारंभ झाला. डोक्यावर फेटा, हातात सामाजिक संदेशांचे फलक आणि 'जय जिजाऊ, जय सावित्री'च्या जयघोषाने सातारा शहर दुमदुमून गेले होते. शेकडो महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपल्या दुचाकींसह या रॅलीत सहभाग नोंदवला. शहरातील मुख्य मार्गावरून ही रॅली काढण्यात आली. यावेळी बोलताना जिल्हाधिकारी संतोष पाटील म्हणाले की, आज आपल्या महिला अधिकारी पुरुष अधिकाऱ्यांच्या बरोबरीने, किंबहुना त्यांच्यापेक्षाही सरस कामगिरी करत आहेत. सावित्रीबाईंच्या विचारांमुळेच आपण आज इथपर्यंत पोहोचलो आहोत. नोकरीमध्ये स्थिरावल्यानंतर आता समाजातील तळागाळातील विद्यार्थ्यांपर्यंत
शिक्षणाची गंगा पोहोचवण्यासाठी महिलांनी पुढाकार घ्यावा. ज्या उत्साहात आज ही बाईक रॅली काढण्यात आली, तसाच उत्साह आणि कर्तव्यदक्षता वर्षभर आपल्या शासकीय कामकाजातही दिसून येवो, अशी अपेक्षा जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केली जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली म्हणाल्या, जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने शासकीय कार्यालयात काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचारी महिला काढण्यात आली आहे. आम्ही सगळे अगदी सक्षमपणे प्रशासनात काम करीत आहोत. समाजातील प्रत्येक मुलीने संकटांना तोंड देण्यासाठी अजिबात घाबरू नका आणि त्याला चांगल्या पद्धतीने प्रतिकार करा हीच खरी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाची दारे उघडे करुन दिले त्याला न्याय दिल्यासारखे होईल. 0000
- महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती बारामतीत साजरी करण्यात आली भव्य असे मिरवणूक काढून बाबासाहेबांना मानवंदना देण्यात आल्या.1
- पिंपरी चिंचवड :- आकुर्डी येथील कै. फकीरभाई पानसरे उर्दू शाळेत आरटीई RTE प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्र पडताळणी प्रक्रियेदरम्यान प्रशासनाचा भोंगळ कारभार समोर आला आहे. शेकडो पालक आपल्या मुलांसह शाळेत जमा झाले असताना, कर्मचारी कोणतीही पूर्वसूचना न देता निघून गेल्याने पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे... आरटीई प्रवेशासाठी १५ ते २२ एप्रिल हा कालावधी अत्यंत मर्यादित आहे. या अल्प मुदतीत कागदपत्रे पडताळणे आवश्यक असताना, शाळेतील कर्मचारी पालकांना उन्हात ताटकळत ठेवून अचानक निघून गेले. यामुळे संतापलेल्या पालकांनी विचारणा केली की, जर वेळेत पडताळणी झाली नाही आणि मुलांचे वर्ष वाया गेले, तर याला जबाबदार कोण ? असा संतप्त सवाल पालकांनी उपस्थित केला आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन शिक्षण विभागाने आकुर्डीतील गैरसोयीची माहिती मिळताच जादा कर्मचारी पाठवले असून प्रक्रिया सुरळीत पार पडेल याची काळजी घेतली जात आहे. दरम्यान मुदत संपण्यापूर्वी आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित व्हावा, यासाठी पालकांची धावपळ सुरू असून प्रशासनाने अधिक संवेदनशीलतेने काम करण्याची मागणी होत आहे... #आकुर्डी #पिंपरीचिंचवड #आरटीईप्रवेश #शिक्षणविभाग #पालकांचा_संताप #प्रशासनाचा_गोंधळ #उन्हातहाल #शाळाप्रवेश #विद्यार्थीप्रश्न #RTEगोंधळ #Akurdi #PimpriChinchwad #RTEAdmission #EducationDepartment #ParentsProtest #AdministrativeFailure #SchoolAdmission #StudentIssues #RTEProcess #BreakingNews1
- कात्रज कोंढावा रोड परिसर शत्रुंजय मंदिरा समोर बी जे पार्क बिल्डिंग च्या समोर चा रस्ता. 10 वर्ष झाली रस्ता असाच आहे. कोणी दखल घेत नाही. त्यामुळे दुकानाच्या धंद्यावर मोठया प्रमाणावर फरक पडला आहे. तरी हे काम लवकरात लवकर करावे ही विनंती.3
- पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी : शहरातील अनैतिक मानवी तस्करी आणि वेश्याव्यवसायाविरोधात पोलिसांनी पुन्हा एकदा कडक कारवाई करत गुन्हेगारी विश्वाला जोरदार धक्का दिला आहे. पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या निर्देशानुसार अनैतिक मानव तस्करी प्रतिबंधक कक्षाने चिखली परिसरात मध्यरात्री छापा टाकून एक मोठे रॅकेट उघडकीस आणले. १३ एप्रिल २०२६ रोजी रात्री सुमारे ११:३० वाजण्याच्या सुमारास देहू-आळंदी रोडवरील लक्ष्मी चौकातील ‘आदित्य लॉज’वर अचानक धाड टाकण्यात आली. या कारवाईत ९ महिलांची सुटका करण्यात आली. यातील एक महिला बांगलादेशातून बेकायदेशीररीत्या तस्करी करून आणण्यात आल्याचे उघड झाल्याने या प्रकरणाला अधिक गांभीर्य प्राप्त झाले आहे. संबंधित महिलेच्या पुनर्वसनाची प्रक्रिया सुरू असून तिला मायदेशी पाठवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. प्राथमिक तपासात ‘आदित्य लॉज’च्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी लॉज चालक, मालक, व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्यांसह एकूण ५ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर भारतीय दंड संहिता तसेच अनैतिक मानवी तस्करी प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. अनैतिक मानव तस्करी प्रतिबंधक कक्षाने २०२६ या वर्षात आतापर्यंत ११ ठिकाणी छापे टाकले आहेत. यामध्ये ७ मसाज पार्लर आणि ४ हॉटेल्सचा समावेश आहे. या कारवायांमध्ये एकूण ३१ आरोपींना अटक करण्यात आली असून २८ महिलांची सुटका करण्यात आली आहे. ही संपूर्ण कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली असून, भविष्यात अशा प्रकारच्या गुन्ह्यांविरोधात अधिक आक्रमक भूमिका घेण्यात येणार असल्याचा स्पष्ट इशारा पोलिसांनी दिला आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांची ही कारवाई केवळ गुन्हेगारीवर प्रहार नसून, पीडित महिलांना नवजीवन देणारी ठरत आहे.1
- पिंपरी चिंचवड वाकड, तपास पथकाची कामगिरी ४८ तासांत चेन स्नॅचर जेरबंद; ४.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त.1
- कोल्हापूर: कोल्हापूर महानगरपालिकेच्या विभागीय कार्यालय क्र. २ (छ. शिवाजी मार्केट) व अतिक्रमण निर्मूलन पथकाकडून आज तटाकडील तालीम चौक ते ताराबाई रोड तसेच महाद्वार परिसरात संयुक्त अतिक्रमण विरोधी कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान 3 लोखंडी टेबल, 11 पार्किंग जाळ्या, 4 स्टॅन्ड बोर्ड, 4 छत्र्या, 5 लोखंडी स्टॅन्ड, 3 लोखंडी कॉट, 2 कॅरेट, 15 लाकडी टेबल, 1 स्पीकर, 6 पुतळे, 20 लोखंडी पाईप, 1 लोखंडी स्टूल, 4 स्टॅन्ड, 2 रांगोळी बॅग, 1 ढकल गाडी व इतर साहित्य जप्त करण्यात आले. सदर कारवाई महापौर सौ. रुपाराणी निकम यांच्या आदेशानुसार, अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर, उपआयुक्त किरणकुमार धनवाडे, सहाय्यक आयुक्त स्वाती दुधाणे व शहर अभियंता रमेश मस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये उपशहर अभियंता सुरेश पाटील, अतिक्रमण प्रमुख प्रफुल्ल कांबळे, कनिष्ठ लिपीक सजन नागलोत तसेच अतिक्रमण विभाग व विभागीय कार्यालय क्र. २ मधील कर्मचाऱ्यांच्या पथकाने सहभाग घेतला. महापालिकेच्या अतिक्रमण विभागामार्फत शहरातील अनधिकृत फेरीवाले तसेच रस्त्यावर दुकाने बाहेर उभारण्यात आलेल्या अनधिकृत शेड्सवर यापुढेही कडक कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे संबंधित दुकानदार व फेरीवाल्यांनी आपले अनधिकृत अतिक्रमण त्वरित स्वत:हून काढून घ्यावे असे आवाहन महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.1
- पिंपरी चिंचवड :- पिंपरी चिंचवड शहरातील रावेत पोलीस स्टेशनच्या अगदी समोर आज एका भरधाव थार जीप आणि रुग्णवाहिकेचा भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये रुग्णवाहिकेचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. या घटनेत एक दुचाकीस्वार देखील गंभीर जखमी झाला असून वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.... मिळालेल्या माहितीनुसार, रावेत पोलीस स्टेशनसमोरील मुख्य रस्त्यावर रुग्णवाहिका आणि थार कारची जोरात धडक झाली. याच दरम्यान एक दुचाकीस्वारही या अपघाताच्या कचाट्यात सापडला. अपघाताचा आवाज ऐकताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. अपघातातील जखमींना पोलिसांनी तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. अपघातात रुग्णवाहिकेचा दर्शनी भाग पूर्णपणे चेपला गेला असून दुचाकीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान हा अपघात नेमका कोणाच्या चुकीमुळे झाला, याचा तपास रावेत पोलीस करत आहेत. सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींच्या जबाबावरून दोषींवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले आहे. या अपघातामुळे परिसरात काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती, मात्र पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करून रस्ता मोकळा केला आहे....2
- पिंपरी चिंचवड काळेवाडीत आंब्याचे आमिष दाखवून अडीच वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला अटक1
- Lucknow mein Aag lagne ke Karan Bhari nuksan aur hua Hai1