logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

आज 11 मार्च आजचा दिवस म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाचा दिवस छत्रपती शिवाजी महाराज यांचे जेष्ठ चिरंजीव असलेल्या संभाजी महाराजांनी स्वराज्यासाठी आणि धर्मासाठी प्राणाची आहुती दिली. मुघल बादशहा औरंगजेब याने धर्मांतराचा दबाव टाकला, पण संभाजी महाराजांनी तो ठामपणे नाकारला आणि स्वाभिमानासाठी बलिदान दिले. म्हणूनच त्यांना “धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज” म्हणून ओळखले जाते. या महान योद्ध्याला आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन.

1 hr ago
user_SHEGAONlive
SHEGAONlive
Local News Reporter Buldana, Buldhana•
1 hr ago

आज 11 मार्च आजचा दिवस म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाचा दिवस छत्रपती शिवाजी महाराज यांचे जेष्ठ चिरंजीव असलेल्या संभाजी महाराजांनी स्वराज्यासाठी आणि धर्मासाठी प्राणाची आहुती दिली. मुघल बादशहा औरंगजेब याने धर्मांतराचा दबाव टाकला, पण संभाजी महाराजांनी तो ठामपणे नाकारला आणि स्वाभिमानासाठी बलिदान दिले. म्हणूनच त्यांना “धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज” म्हणून ओळखले जाते. या महान योद्ध्याला आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • स्वामी ग्रुपतर्फे सुलतानपूर येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा – शाहीन पटेल यांचा सन्मान”
    1
    स्वामी ग्रुपतर्फे सुलतानपूर येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा –  शाहीन पटेल यांचा सन्मान”
    user_जिजाऊ एक्सप्रेस २८ न्यूज
    जिजाऊ एक्सप्रेस २८ न्यूज
    News Anchor बुलढाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    13 min ago
  • छत्रपती शिवाजी महाराज यांचे जेष्ठ चिरंजीव असलेल्या संभाजी महाराजांनी स्वराज्यासाठी आणि धर्मासाठी प्राणाची आहुती दिली. मुघल बादशहा औरंगजेब याने धर्मांतराचा दबाव टाकला, पण संभाजी महाराजांनी तो ठामपणे नाकारला आणि स्वाभिमानासाठी बलिदान दिले. म्हणूनच त्यांना “धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज” म्हणून ओळखले जाते. या महान योद्ध्याला आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन.
    1
    छत्रपती शिवाजी महाराज यांचे जेष्ठ चिरंजीव असलेल्या संभाजी महाराजांनी स्वराज्यासाठी आणि धर्मासाठी प्राणाची आहुती दिली.
मुघल बादशहा औरंगजेब याने धर्मांतराचा दबाव टाकला, पण संभाजी महाराजांनी तो ठामपणे नाकारला आणि स्वाभिमानासाठी बलिदान दिले.
म्हणूनच त्यांना “धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज” म्हणून ओळखले जाते.
या महान योद्ध्याला आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन.
    user_SHEGAONlive
    SHEGAONlive
    Local News Reporter Buldana, Buldhana•
    1 hr ago
  • Post by Shivaji Bhosale
    1
    Post by Shivaji Bhosale
    user_Shivaji Bhosale
    Shivaji Bhosale
    Journalist खामगाव, बुलढाणा, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • #marathi#newsjalna#
    1
    #marathi#newsjalna#
    user_Jansagar 9 Marathi
    Jansagar 9 Marathi
    Bhokardan, Jalna•
    6 hrs ago
  • प्रतिनिधि.... दिलीप मोरे  छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्याच्या सीमेवर आणि बुलढाणा जिल्ह्याच्या हद्दीलगत असलेल्या गिरडा घाटात दि १० रोजी मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास रेती वाहतूक करणाऱ्या टिप्परचा अपघात झाला. घाट उतरत असताना टिप्परचे अचानक ब्रेक निकामी झाले. परिस्थितीची गंभीरता लक्षात येताच चालकाने प्रसंगावधान राखत टिप्पर टेकडीकडे वळवून धडक दिली. त्यामुळे टिप्पर जागीच पलटी झाला. या अपघातात चालकाला किरकोळ दुखापत झाली असून तो सुदैवाने बचावला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चालकाने वेळीच निर्णय घेतला नसता तर टिप्पर अंदाजे २०० ते २५० फूट खोल दरीत कोसळण्याची शक्यता होती. त्यामुळे मोठी जीवितहानी टळल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान, या दहा टायरी टिप्परमध्ये साधारण पाच ते सहा ब्रास रेती असल्याची माहिती मिळाली आहे. अपघातानंतर टिप्पर रस्त्यावर पलटी झाल्याने काही काळासाठी गिरडा घाटातील वाहतूक पूर्णपणे बंद पडली. त्यामुळे वाहनधारकांना बराच वेळ अडचणीचा सामना करावा लागनार आहे गिरडा घाट हा अवैधरित्या रेती वाहतूक करणाऱ्या टिप्परचा प्रमुख मार्ग बनल्याची चर्चा परिसरात आहे. अरुंद घाटमार्गावरून मोठ्या वेगाने धावणाऱ्या टिप्परमुळे परिसरातील दुचाकीस्वार आणि नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
    2
    प्रतिनिधि....
दिलीप मोरे 
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्याच्या सीमेवर आणि बुलढाणा जिल्ह्याच्या हद्दीलगत असलेल्या गिरडा घाटात दि १० रोजी मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास रेती वाहतूक करणाऱ्या टिप्परचा अपघात झाला. घाट उतरत असताना टिप्परचे अचानक ब्रेक निकामी झाले. परिस्थितीची गंभीरता लक्षात येताच चालकाने प्रसंगावधान राखत टिप्पर टेकडीकडे वळवून धडक दिली. त्यामुळे टिप्पर जागीच पलटी झाला.
या अपघातात चालकाला किरकोळ दुखापत झाली असून तो सुदैवाने बचावला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चालकाने वेळीच निर्णय घेतला नसता तर टिप्पर अंदाजे २०० ते २५० फूट खोल दरीत कोसळण्याची शक्यता होती. त्यामुळे मोठी जीवितहानी टळल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे.
दरम्यान, या दहा टायरी टिप्परमध्ये साधारण पाच ते सहा ब्रास रेती असल्याची माहिती मिळाली आहे. अपघातानंतर टिप्पर रस्त्यावर पलटी झाल्याने काही काळासाठी गिरडा घाटातील वाहतूक पूर्णपणे बंद पडली. त्यामुळे वाहनधारकांना बराच वेळ अडचणीचा सामना करावा लागनार आहे 
गिरडा घाट हा अवैधरित्या रेती वाहतूक करणाऱ्या टिप्परचा प्रमुख मार्ग बनल्याची चर्चा परिसरात आहे. अरुंद घाटमार्गावरून मोठ्या वेगाने धावणाऱ्या टिप्परमुळे परिसरातील दुचाकीस्वार आणि नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
    user_DILIP DESHMUKH
    DILIP DESHMUKH
    Farmer सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • गिरडा घाटात 10 टायर हायवा अपघातग्रस्त; नागरिकांच्या मदतीने परिस्थिती नियंत्रणात बातमी : सोयगाव तालुक्यातील गिरडा घाट येथे 10 टायर हायवा वाहनाचा अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात काही जण किरकोळ जखमी झाले असल्याची माहिती मिळाली आहे. अपघातामुळे काही काळ घाटातील वाहतूक थांबवण्यात आली होती. मात्र सध्या घाटातील रस्ता पुन्हा सुरू करण्यात आला असून वाहतूक सुरळीत सुरू आहे. स्थानिक नागरिक आणि प्रशासनाच्या मदतीने परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली.
    2
    गिरडा घाटात 10 टायर हायवा अपघातग्रस्त; नागरिकांच्या मदतीने परिस्थिती नियंत्रणात
बातमी :
सोयगाव तालुक्यातील गिरडा घाट येथे 10 टायर हायवा वाहनाचा अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात काही जण किरकोळ जखमी झाले असल्याची माहिती मिळाली आहे.
अपघातामुळे काही काळ घाटातील वाहतूक थांबवण्यात आली होती. मात्र सध्या घाटातील रस्ता पुन्हा सुरू करण्यात आला असून वाहतूक सुरळीत सुरू आहे. स्थानिक नागरिक आणि प्रशासनाच्या मदतीने परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली.
    user_RahimKhan Pathan
    RahimKhan Pathan
    Voice of people सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • राजमाता महोत्सव 2026 ची उत्साहात सांगता; 5 दिवसांत 40 लाखांची विक्री! बुलढाणा : जिजामाता प्रेक्षागार येथे आयोजित राजमाता महोत्सव 2026 ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत सोमवारी महोत्सवाची दिमाखदार सांगता झाली. महिला बचत गटांच्या उत्पादनांना मोठी मागणी मिळून अवघ्या पाच दिवसांत तब्बल 40 लाखांहून अधिक विक्री झाली. महिला उद्योजकांच्या स्टॉल्स, खाद्यपदार्थ आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी महोत्सव रंगला. उत्कृष्ट उत्पादन गटांचा सन्मान करण्यात आला असून या उपक्रमामुळे ग्रामीण महिलांच्या उद्योजकतेला मोठी चालना मिळाल्याचे प्रशासनाने सांगितले. महिलांच्या कष्टाला बाजारपेठ — राजमाता महोत्सव ठरला यशस्वी!
    1
    राजमाता महोत्सव 2026 ची उत्साहात सांगता; 5 दिवसांत 40 लाखांची विक्री!
बुलढाणा : जिजामाता प्रेक्षागार येथे आयोजित राजमाता महोत्सव 2026 ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत सोमवारी महोत्सवाची दिमाखदार सांगता झाली. महिला बचत गटांच्या उत्पादनांना मोठी मागणी मिळून अवघ्या पाच दिवसांत तब्बल 40 लाखांहून अधिक विक्री झाली.
महिला उद्योजकांच्या स्टॉल्स, खाद्यपदार्थ आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी महोत्सव रंगला. उत्कृष्ट उत्पादन गटांचा सन्मान करण्यात आला असून या उपक्रमामुळे ग्रामीण महिलांच्या उद्योजकतेला मोठी चालना मिळाल्याचे प्रशासनाने सांगितले.
महिलांच्या कष्टाला बाजारपेठ — राजमाता महोत्सव ठरला यशस्वी!
    user_Sachin kadukar
    Sachin kadukar
    Photographer Shegaon, Buldhana•
    2 hrs ago
  • स्टंटबाजी बेतली जीवावर: सापाच्या दंशाने ख्यातनाम सर्पमित्राचा खामगावात दुर्दैवी मृत्यू.
    1
    स्टंटबाजी बेतली जीवावर: सापाच्या दंशाने ख्यातनाम सर्पमित्राचा खामगावात दुर्दैवी मृत्यू.
    user_जिजाऊ एक्सप्रेस २८ न्यूज
    जिजाऊ एक्सप्रेस २८ न्यूज
    News Anchor बुलढाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    19 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.