खुलताबाद येथील हजरत ख्वाजा मुन्तजिबुद्दीन रहेमतुल्लाह अलैह उर्फ जर जरी जर बक्ष दुल्हा यांच्या उरूस ची जय्यत तयारी सुरू, *खुलताबाद येथील प्रसिद्ध जर जरी जर बक्ष दुल्हा यांच्या उरूस ची जय्यत तयारी सुरू* *हजरत ख्वाजा मुन्तजिबुद्दीन रहेमतुल्लाह अलैह यांचा ७४० वा उरुस २० ऑगस्ट पासून सुरू होत आहे,* छत्रपती संभाजीनगर जिल्हा खुलताबाद येथील प्रसिद्ध दर्गा वली हजरत ख्वाजा मुन्तजिबुद्दीन रहेमतुल्लाह अलैह उर्फ जर जरी जर बक्ष दुल्हा यांच्या ७४० व्या उरूसाची जय्यत तयारी सुरू, हजरत ख्वाजा मुन्तजिबुद्दीन रहेमतुल्लाह अलैह यांना जर जरी जर बक्ष दुल्हा म्हणून ओळखले जाते, हे १४ व्या शतकाच्या सुरुवातीस दिल्लीहून दख्खनमध्ये आलेले एक प्रसिद्ध सुफी संत होते, त्यांनी महाराष्ट्रातील औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) जिल्ह्याच्या खुलताबाद येथे आपले आध्यात्मिक कार्य केले, त्यांचा प्रसिद्ध दर्गा याच ऐतिहासिक खुलताबाद शहरात आहे, यांचे गुरू हजरत बाबा फरिदुद्दीन आहे तर प्रसिद्ध सुफी संत हजरत निजामुद्दीन औलिया ते निकटवर्तीय होते, हजरत निजामुद्दीन औलिया यांनी जर जरी जर बक्ष दुल्हा यांना ७०० किंवा १४०० शिष्यांच्या काफिल्यासह दक्षिण भारतात (दख्खन) येथे इस्लामचा संदेश व सुफी विचार पोहोचवण्यासाठी पाठवले होते, ते शिष्यांच्या काफिल्यामध्ये सर्वात पुढे आणि नव्या वरासारखे तेजाने भरलेले दिसत म्हणून त्यांना दुल्हा म्हटले गेले, त्यांच्याकडे दैवी मदतीने येणाऱ्या संपत्तीतून गरिबांना व संतांना सोन्याची मदत केली जात असे या वरून त्यांना जर जरी जर बक्ष म्हणजे सोन्याचे दान करणारा ही पदवी मिळाली, त्यांनी वयाच्या अवघ्या ३४ व्या वर्षी ७०९ हिजरी सन १३०९ मध्ये खुलताबाद येथे अखेरचा श्वास घेतला, दरवर्षी इस्लामिक रब्बी - उल - अव्वल महिन्यात त्यांचा उरूस भरतो, या वर्षी ७४० व्या उरूस निमित्त दिनांक १८ ऑगस्ट रोजी चूना, १९ ऑगस्ट रोजी फर्श व जलसा एक सिरतुन्नबी, तर २० ऑगस्ट गुरुवार रोजी सायंकाळी चार वाजता संदल शरीफ मिरवणूक निघणार आहे, २१ ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता कुस्त्यांचे जंगी मुकाबला राहणार आहे, तर याच दिवशी रात्री चिरागा राहणार आहे, २२ ऑगस्ट रोजी ऑल इंडिया सेमिनार व महेफिल ए समा कव्वाली मुकाबला राहणार आहे, २३ ऑगस्ट रवीवार रोजी ऑल इंडिया मुशाएरा चा कार्यक्रम रहाणार आहे, २४ ऑगस्ट रोजी मुजाहिरा ए किरत, तसेच इस्लामिक तारखे नुसार २५ , किंवा २६ ऑगस्ट रोजी इद - ए - मिलादुन्नबी कार्यक्रम घेण्यात येणार आहे, *रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा*
खुलताबाद येथील हजरत ख्वाजा मुन्तजिबुद्दीन रहेमतुल्लाह अलैह उर्फ जर जरी जर बक्ष दुल्हा यांच्या उरूस ची जय्यत तयारी सुरू, *खुलताबाद येथील प्रसिद्ध जर जरी जर बक्ष दुल्हा यांच्या उरूस ची जय्यत तयारी सुरू* *हजरत ख्वाजा मुन्तजिबुद्दीन रहेमतुल्लाह अलैह यांचा ७४० वा उरुस २० ऑगस्ट पासून सुरू होत आहे,* छत्रपती संभाजीनगर जिल्हा खुलताबाद येथील प्रसिद्ध दर्गा वली हजरत ख्वाजा मुन्तजिबुद्दीन रहेमतुल्लाह अलैह उर्फ जर जरी जर बक्ष दुल्हा यांच्या ७४० व्या उरूसाची जय्यत तयारी सुरू, हजरत ख्वाजा मुन्तजिबुद्दीन रहेमतुल्लाह अलैह यांना जर जरी जर बक्ष दुल्हा म्हणून ओळखले जाते, हे १४ व्या शतकाच्या सुरुवातीस दिल्लीहून दख्खनमध्ये आलेले एक प्रसिद्ध सुफी संत होते, त्यांनी महाराष्ट्रातील औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) जिल्ह्याच्या खुलताबाद येथे आपले आध्यात्मिक कार्य केले, त्यांचा प्रसिद्ध दर्गा याच ऐतिहासिक खुलताबाद शहरात आहे, यांचे गुरू हजरत बाबा फरिदुद्दीन आहे तर प्रसिद्ध सुफी संत हजरत निजामुद्दीन औलिया ते निकटवर्तीय होते, हजरत निजामुद्दीन औलिया यांनी जर जरी जर बक्ष दुल्हा यांना ७०० किंवा १४०० शिष्यांच्या काफिल्यासह दक्षिण भारतात (दख्खन) येथे इस्लामचा संदेश व सुफी विचार पोहोचवण्यासाठी पाठवले होते, ते शिष्यांच्या काफिल्यामध्ये सर्वात पुढे आणि नव्या वरासारखे तेजाने भरलेले दिसत म्हणून त्यांना दुल्हा म्हटले गेले, त्यांच्याकडे दैवी मदतीने येणाऱ्या संपत्तीतून गरिबांना व संतांना सोन्याची मदत केली जात असे या वरून त्यांना जर जरी जर बक्ष म्हणजे सोन्याचे दान करणारा ही पदवी मिळाली, त्यांनी वयाच्या अवघ्या ३४ व्या वर्षी ७०९ हिजरी सन १३०९ मध्ये खुलताबाद येथे अखेरचा श्वास घेतला, दरवर्षी इस्लामिक रब्बी - उल - अव्वल महिन्यात त्यांचा उरूस भरतो, या वर्षी ७४० व्या उरूस निमित्त दिनांक १८ ऑगस्ट रोजी चूना, १९ ऑगस्ट रोजी फर्श व जलसा एक सिरतुन्नबी, तर २० ऑगस्ट गुरुवार रोजी सायंकाळी चार वाजता संदल शरीफ मिरवणूक निघणार आहे, २१ ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता कुस्त्यांचे जंगी मुकाबला राहणार आहे, तर याच दिवशी रात्री चिरागा राहणार आहे, २२ ऑगस्ट रोजी ऑल इंडिया सेमिनार व महेफिल ए समा कव्वाली मुकाबला राहणार आहे, २३ ऑगस्ट रवीवार रोजी ऑल इंडिया मुशाएरा चा कार्यक्रम रहाणार आहे, २४ ऑगस्ट रोजी मुजाहिरा ए किरत, तसेच इस्लामिक तारखे नुसार २५ , किंवा २६ ऑगस्ट रोजी इद - ए - मिलादुन्नबी कार्यक्रम घेण्यात येणार आहे, *रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा*
- छत्रपती संभाजीनगर ब्रेकिंग... ANC : विमानतळावर आकर्षक नोकरी देण्याचे आमिष दाखवत एका खाजगी कंपनीने महाराष्ट्रातील हजारो सुशिक्षित बेरोजगारांना गंडा घातल्याचा आरोप करण्यात येत आहे. शासकीय भरतीप्रमाणेच पारदर्शक प्रक्रिया असल्याचा देखावा निर्माण करून प्रत्येक विद्यार्थ्याकडून ५०० ते ७०० रुपयांची फी उकळण्यात आली. महिन्याला २५ हजार रुपयांचा पगार आणि विमानतळावरील झगमगीत नोकरीच्या आमिषाला बळी पडत राज्यभरातील शेकडो विद्यार्थी आज छत्रपती संभाज नगरच्या उस्मानपुरा येथील एका शाळेत पोहोचले, पण आपली फसवणूक झाल्याचा दावा आता या विद्यार्थ्यांनी केला आहे. विशेष म्हणजे महिन्याभरापासून ऑनलाईन अर्ज भरून, अभ्यासाची तयारी करून परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांना खरी परिस्थिती।लक्षात येताच त्यांच्या पायाखालची वाळूच सरकली. तसेच कंपनीने सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाईन संगणकीय परीक्षा होणार असल्याचे ठोकून सांगितले होते. मात्र, प्रत्यक्ष केंद्रावर एकही संगणक उपलब्ध नव्हता. अधिक विचारणा केली असता, परीक्षा घेण्यासाठी आलेली कथित 'थर्ड पार्टी' कंपनीही हात वर करत "आम्हाला काहीच माहिती नाही, असं सांगत असल्याचे आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. याबाबत माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस देखील दाखल झाले आहे. Byte : विद्यार्थी छत्रपती संभाजीनगर ब्रेकिंग... ANC : विमानतळावर आकर्षक नोकरी देण्याचे आमिष दाखवत एका खाजगी कंपनीने महाराष्ट्रातील हजारो सुशिक्षित बेरोजगारांना गंडा घातल्याचा आरोप करण्यात येत आहे. शासकीय भरतीप्रमाणेच पारदर्शक प्रक्रिया असल्याचा देखावा निर्माण करून प्रत्येक विद्यार्थ्याकडून ५०० ते ७०० रुपयांची फी उकळण्यात आली. महिन्याला २५ हजार रुपयांचा पगार आणि विमानतळावरील झगमगीत नोकरीच्या आमिषाला बळी पडत राज्यभरातील शेकडो विद्यार्थी आज छत्रपती संभाज नगरच्या उस्मानपुरा येथील एका शाळेत पोहोचले, पण आपली फसवणूक झाल्याचा दावा आता या विद्यार्थ्यांनी केला आहे. विशेष म्हणजे महिन्याभरापासून ऑनलाईन अर्ज भरून, अभ्यासाची तयारी करून परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांना खरी परिस्थिती।लक्षात येताच त्यांच्या पायाखालची वाळूच सरकली. तसेच कंपनीने सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाईन संगणकीय परीक्षा होणार असल्याचे ठोकून सांगितले होते. मात्र, प्रत्यक्ष केंद्रावर एकही संगणक उपलब्ध नव्हता. अधिक विचारणा केली असता, परीक्षा घेण्यासाठी आलेली कथित 'थर्ड पार्टी' कंपनीही हात वर करत "आम्हाला काहीच माहिती नाही, असं सांगत असल्याचे आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. याबाबत माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस देखील दाखल झाले आहे. Byte : विद्यार्थी3
- तामिळनाडूच्या टीमसोबत अभिजीत दिपके यांचा संवाद; सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा, लवकरच चेन्नईला येण्याचे आश्वासन! तामिळनाडूमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अभिजीत दिपके यांनी तामिळनाडूतील आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी आंदोलनाची सद्यस्थिती आणि विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. अभिजीत दिपके यांनी आंदोलनाला आपला पाठिंबा व्यक्त करत, आंदोलकांच्या भूमिकेला सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. तसेच लवकरच चेन्नई येथे प्रत्यक्ष भेट देऊन आंदोलनकर्त्यांशी संवाद साधणार असल्याचे त्यांनी सांगितले.1
- खाटू श्याम देवस्थान या ठिकाणी भाविकांची अफाट गर्दी जिल्हाभरातून आलेल्या भाविकांनी छत्रपती संभाजी नगर: येथील खाटू श्याम देवस्थान या ठिकाणी आज रविवार रोजी भाविकांनी अफाट गर्दी केली दर्शनासाठी भाविकांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या या ठिकाणी जिल्हाभरातून नाहीतर महाराष्ट्रातून भाविक दर्शनासाठी येतात..2
- महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनाचे अभिजित दिपके यांच्यावर गुन्हा दाखल करून सुरक्षा हटविण्याची मागणी, *अभिजित दिपके यांच्यावर गुन्हा दाखल करून पोलीस सुरक्षा हटविण्याची मागणी* *महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेने दिला आंदोलनाचा इशारा* छत्रपती संभाजीनगर येथे अभिजित दिपके यांनी त्यांच्या घरी एका पोलीस अधिकारी यांचे अपमान केल्याने त्यांच्या वर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली, (CJP) कॉक्रोज जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी त्यांच्या घरी संरक्षण करत असलेले एमआयडीसी पोलीस ठाण्याचे साध्या गणवेशात असलेले PSI सुरेश सांगळे यांना मी कोणाला भेटू, कोणाला भेटू नये सांगणारे तुम्ही कोण, तुम्ही दिल्ली पोलीसांसारखे वागू नका, म्हणत अपनास्पद वागणूक देत बाहेर जाण्याचे सांगितले, अभिजित दिपके यांनी PSI यांचा अपमान केल्याबद्दल दिपके यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा आणि त्यांच्या घरासमोर पोलीस प्रोटेक्शनानुसार त्यांना दिले जात असलेले संरक्षण काढून घेण्यात यावे असे निवेदन पोलीस आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांना महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेने दिले आहे, निवेदनात पुढे असे ही सांगितले आहे की पोलीस कर्मचारी यांना अरेरावीची भाषा करणारे अभिजित दिपके यांच्यावर गुन्हा दाखल करावा अन्यथा महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना कमिशनर ऑफिस समोर व पोलीस अधीक्षक कार्यालय समोर आंदोलन व चक्काजाम करण्यात येईल असे निवेदन महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनाचे जिल्हा युवक अध्यक्ष शंकर उर्फ अण्णा डरांगे यांनी दिला, *रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा*1
- सुनील तटकरेंबाबत रुपाली ठोंबरेचं खळबळजनक विधान. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी एक मोठा दावा करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. नक्की काय आहे हे संपूर्ण प्रकरण? रुपाली ठोंबरे यांनी नेमका काय दावा केलाय.?1
- क्रांती चौक ते विभागीय आयुक्त कार्यालय मोर्चा: पोलीस उपायुक्त पंकज अतुलकर यांच्याकडून ५ मार्गदर्शक सूचना जाहीर1
- ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांचे मनोज जरांगे, उदय सामंत आणि प्रसाद लाड यांच्यावर गंभीर आरोप मुख्य पॉइंटर्स : जात पडताळणी समित्यांच्या कामाबाबत ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले. मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात कुणबी प्रमाणपत्रे वैध ठरली असून, त्यापैकी केवळ काही प्रमाणपत्रे रद्द झाल्याचा दावा वाघमारे यांनी केला. वंशावळीत दिशाभूल करून जात पडताळणी प्रक्रियेत गैरप्रकार केल्याचे आढळल्याने संबंधित प्रमाणपत्रे रद्द झाल्याचे त्यांनी सांगितले. “अत्यल्प प्रमाणपत्रे रद्द झाली असताना मनोज जरांगे-पाटील या मुद्द्याचा कांगावा करत आहेत,” असा आरोप वाघमारे यांनी केला. जरांगे हे प्रसिद्धी मिळवण्यासाठी आणि स्वतःचे हित साधण्यासाठी समाजाची दिशाभूल करत असल्याचा दावा. ओबीसींची अवैध प्रमाणपत्रे ठरवली जात असल्याचा आरोप चुकीचा असल्याचे वाघमारे यांनी म्हटले. ओबीसी-मराठा समाजात संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा वाघमारे यांचा आरोप. “महाराष्ट्रात दंगल घडवण्याच्या प्रयत्नात कोण आहे, याची चौकशी झाली पाहिजे,” अशी मागणी त्यांनी केली. तलवारीची किंवा कोयत्याची भाषा करणाऱ्यांवर गृह विभागाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी. या परिस्थितीसाठी उदय सामंत आणि प्रसाद लाड यांना जबाबदार धरले जाईल, असा इशारा वाघमारे यांनी दिला. उदय सामंत आणि प्रसाद लाड हे जरांगे यांच्या आंदोलनाला ताकद देत असल्याचा आरोप. “उदय सामंत सांगतील तसे जरांगे नाचत आहेत,” असा घणाघाती आरोप वाघमारे यांनी केला. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी या संपूर्ण प्रकरणाकडे तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी. मनोज जरांगे यांनी १९९४ च्या जीआरचा मुद्दा उपस्थित केला असल्यास तो रद्द करून दाखवावा, असे आव्हान वाघमारे यांनी दिले. ओबीसी नेते आणि ओबीसी समाजाला लक्ष्य करण्याचे काम सुरू असल्याचा आरोप. महसूल विभागाचे काम करणारे चंद्रशेखर बावनकुळे ओबीसी असल्यामुळे त्यांना लक्ष्य केले जात असल्याचा दावा वाघमारे यांनी केला. संविधानिक पदावर असलेल्या व्यक्तींवर टीका करताना वैयक्तिक किंवा अवमानकारक भाषा वापरणे चुकीचे असल्याचे त्यांनी सांगितले. “आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे; मात्र आंदोलनाच्या नावाखाली समाजात तेढ निर्माण करू नये,” असे वाघमारे म्हणाले. वाशी येथे झालेल्या आंदोलनाच्या संदर्भातही वाघमारे यांनी जरांगे यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. आंदोलनादरम्यान सरकारचे कौतुक करणे आणि नंतर पुन्हा सरकारवर टीका करणे, यावर त्यांनी सवाल उपस्थित केला. जरांगे यांच्या आंदोलनामागे ठोस भूमिका नसून “स्क्रिप्टेड आंदोलन” असल्याचा गंभीर आरोप. ओबीसी आणि मराठा समाजामध्ये वाद निर्माण करून राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न होत असल्याचे वाघमारे यांनी म्हटले. “ओबीसी-मराठा संघर्ष निर्माण झाला तर त्याचे गंभीर परिणाम महाराष्ट्राला भोगावे लागतील,” असा इशारा. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी परिस्थिती गांभीर्याने घेऊन संबंधितांवर कारवाई करावी, अशी वाघमारे यांची मागणी. संभाव्य हेडलाईन “ओबीसी-मराठा वाद पेटवण्याचा प्रयत्न; जरांगे, सामंत आणि लाडांवर नवनाथ वाघमारेंचे गंभीर आरोप” सबहेड “तलवारीची भाषा करणाऱ्यांवर कारवाई करा; मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यावे” — नवनाथ वाघमारे1
- पंढरपूर सायकल वारी – २०२६ यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या ६३ सायकलस्वारांचा थाटात सत्कार! सायकलिंग फाउंडेशन, छत्रपती संभाजीनगरचा उपक्रम; ३३० किमीच्या खडतर प्रवासानंतर सत्कार सोहळा उत्साहात संपन्न पंढरपूर सायकल वारी – २०२६ यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या ६३ सायकलस्वारांचा थाटात सत्कार! सायकलिंग फाउंडेशन, छत्रपती संभाजीनगरचा उपक्रम; ३३० किमीच्या खडतर प्रवासानंतर सत्कार सोहळा उत्साहात संपन्न छत्रपती संभाजीनगर :सायकलिंग फाउंडेशन, छत्रपती संभाजीनगरच्या वतीने आयोजित “पंढरपूर सायकल वारी – २०२६” मध्ये उत्साहाने व शिस्तबद्ध पद्धतीने सहभाग नोंदवून तब्बल ३३० किमीचा सायकल प्रवास यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या ६३ सायकलस्वारांचा गौरवशाली सत्कार सोहळा हर्सूल-सावंगी रोडवरील इंद्रप्रस्थ लॉन येथे मोठ्या उत्साहात पार पडला. भक्ती, आरोग्य आणि पर्यावरणाचा संदेश अध्यात्म, आरोग्य आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने या सायकल वारीचे आयोजन करण्यात आले होते. यंदाच्या पंढरपूर सायकल वारीमध्ये छत्रपती संभाजीनगरमधील ६३ उत्साही सायकलस्वारांनी सहभागी होत अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने ३३० किमीचा आव्हानात्मक सायकल प्रवास पूर्ण केला. शेकडो किलोमीटरचा प्रवास सायकलवरून पूर्ण करत या सायकलस्वारांनी पंढरपूर गाठले. तेथे श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेत वारीची सांगता करण्यात आली. भक्ती आणि सायकलिंगचा अनोखा संगम घडविणाऱ्या या उपक्रमाला सहभागींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ६३ सायकलस्वारांचा गौरव इंद्रप्रस्थ लॉन येथे आयोजित दिमाखदार सत्कार सोहळ्यात सर्व ६३ सायकलस्वारांना पंढरपूर सायकल वारी पूर्णता प्रमाणपत्र, मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. उपस्थित मान्यवर आणि नागरिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात सर्व सायकलस्वारांचे अभिनंदन केले. ३३० किमीचा हा प्रवास पूर्ण करण्यासाठी दाखविलेली चिकाटी, शारीरिक क्षमता, सायकलिंगप्रती निष्ठा आणि वारकरी परंपरेप्रती असलेली श्रद्धा याबद्दल आयोजकांच्या वतीने सायकलस्वारांचे मनःपूर्वक कौतुक करण्यात आले. “सायकलच्या चाकांसोबत आरोग्य, पर्यावरण आणि भक्तीचा संदेश पुढे नेणाऱ्या या प्रेरणादायी प्रवासासाठी सर्व ६३ सायकलस्वारांचे हार्दिक अभिनंदन!” अशा शब्दांत पदाधिकाऱ्यांनी सायकलस्वारांचे कौतुक केले. पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन हर्सूल-सावंगी रोडवरील इंद्रप्रस्थ लॉन येथे पार पडलेला हा सोहळा Cyclist Foundation, Chhatrapati Sambhajinagarच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी अध्यक्ष डॉ. विजय व्यवहारे, सचिव जयंत सांगवीकर, खजिनदार डॉ. अरुण गावंडे आणि संचालक डॉ. प्रशांत महाले यांनी उपस्थित सायकलस्वारांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला शहरातील अनेक क्रीडाप्रेमी, नागरिक तसेच विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सायकलस्वारांच्या उत्साहपूर्ण सहभागाबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले. आनंदोत्सवाच्या वातावरणात कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.1
- झालेल्या कामाचे पुन्हा टेंडर? कृष्णा पाटील डोणगावकर यांचा लासूर स्टेशन बाजार समितीवर गंभीर आरोप लासूर स्टेशन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कारभारावर कृष्णा पाटील डोणगावकर यांनी गंभीर आरोप केले आहेत. झालेल्या कामाचे पुन्हा टेंडर काढण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. एकदा काम पूर्ण झाल्यानंतर त्याच कामासाठी पुन्हा निविदा काढण्याची गरज काय, असा सवाल डोणगावकर यांनी उपस्थित केला आहे. या प्रकारामागे भ्रष्टाचाराचा संशय असल्याचा आरोपही त्यांनी केला. बाजार समितीच्या कारभारात पारदर्शकता नसल्याचा आरोप करत संबंधित कामांची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. तसेच निविदा प्रक्रियेची माहिती सार्वजनिक करण्याची मागणी करण्यात आली आहे. या आरोपांमुळे लासूर स्टेशन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, संबंधित प्रशासन याबाबत काय भूमिका घेते, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.1