संत कान्होपात्राच्या भक्तिरसाने रंगली संगीत नाट्यसंध्या; अहिल्यानगरमध्ये रसिकांची उत्स्फूर्त उपस्थिती अहिल्यानगर, दि. २६ ऑगस्ट २०२६ : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित तीन दिवसीय संगीत नाट्य महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी ‘संत कान्होपात्रा’ या संगीत नाट्यप्रयोगाने अहिल्यानगरमधील रसिकांना भक्ती, अध्यात्म आणि अभिजात संगीताचा सुरेल अनुभव दिला. माऊली सभागृहात झालेल्या या प्रयोगाला संगीतप्रेमी आणि नाट्यरसिकांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली. नाट्यपरिषदेचे सतीश लोटके, श्याम शिंदे तसेच नाट्यपरिषदेचे इतर सदस्य यावेळी उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले. सांस्कृतिक कार्य संचालनालयाचा हा तिसरा संगीत नाट्य महोत्सव असून, मराठी संगीत रंगभूमीची समृद्ध परंपरा जपणे, तिचा प्रसार करणे आणि नव्या पिढीला या अभिजात कलाप्रकाराची ओळख करून देणे हा महोत्सवाचा प्रमुख उद्देश आहे. महोत्सवाच्या स्थानिक आयोजनासाठी श्रुती संगीत निकेतन, अहिल्यानगर यांचे सहकार्य घेण्यात आले आहे. महोत्सवाच्या पहिल्या दिवशी सादर झालेल्या ‘संगीत ऊस डोंगा परी’ या प्रयोगानंतर दुसऱ्या दिवशी ‘संत कान्होपात्रा’ या नाटकाने महोत्सवाची रंगत आणखी वाढवली. संत कान्होपात्रा यांच्या जीवनातील भक्ती, अध्यात्म आणि भावविश्व संगीताच्या माध्यमातून रंगमंचावर प्रभावीपणे साकारण्यात आले. अभिजात संगीत, भावपूर्ण गायन आणि प्रभावी अभिनय यामुळे प्रयोगाने रसिकांची मने जिंकली. नाटकातील संगीतबद्ध पदे, भक्तिरसपूर्ण प्रसंग आणि कलाकारांचे प्रभावी सादरीकरण यांना उपस्थितांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली. ना. वि. कुलकर्णी लिखित, मास्टर कृष्णराव यांच्या संगीताने आणि श्री. सुरेश साखळकर यांच्या दिग्दर्शनाखाली साकारलेल्या या नाट्यप्रयोगाचे सादरीकरण बालगंधर्व संगीत रसिक मंडळ, पुणे, अहिल्यानगर यांच्या वतीने करण्यात आले. संगीत नाटकाची वैशिष्ट्यपूर्ण मांडणी, गायकांचे स्पष्ट उच्चार, भावपूर्ण अभिनय आणि अभिजात संगीत यामुळे प्रयोगाला विशेष रंगत आली. भक्ती आणि संगीताचा सुरेख संगम साधणाऱ्या या प्रयोगातून संत कान्होपात्रा यांच्या जीवनातील आध्यात्मिक जाणिवांचा प्रभावी प्रत्यय रसिकांना आला. आज ‘संगीत संशय कल्लोळ’चा समारोप तीन दिवसीय संगीत नाट्य महोत्सवाचा समारोप गुरुवार, दि. २७ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध ‘संगीत संशय कल्लोळ’ या संगीत नाट्यप्रयोगाने होणार आहे. गो. ब. देवल लिखित आणि श्री. मनोहर जोशी दिग्दर्शित हा प्रयोग खल्वायन, रत्नागिरी यांच्या वतीने सादर करण्यात येणार आहे. संगीत, नाट्य, साहित्य, अभिनय आणि गायन यांचा सुरेख संगम असलेल्या या महोत्सवाला मिळत असलेला प्रतिसाद हा मराठी संगीत नाट्यकलेविषयी रसिकांच्या मनात असलेल्या जिव्हाळ्याचे द्योतक ठरत आहे. अहिल्यानगर आणि परिसरातील नाट्यरसिक, संगीतप्रेमी, विद्यार्थी, कलाकार व सांस्कृतिकप्रेमींनी अंतिम दिवशी होणाऱ्या ‘संगीत संशय कल्लोळ’ या प्रयोगाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
संत कान्होपात्राच्या भक्तिरसाने रंगली संगीत नाट्यसंध्या; अहिल्यानगरमध्ये रसिकांची उत्स्फूर्त उपस्थिती अहिल्यानगर, दि. २६ ऑगस्ट २०२६ : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित तीन दिवसीय संगीत नाट्य महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी ‘संत कान्होपात्रा’ या संगीत नाट्यप्रयोगाने अहिल्यानगरमधील रसिकांना भक्ती, अध्यात्म आणि अभिजात संगीताचा सुरेल अनुभव दिला. माऊली सभागृहात झालेल्या या प्रयोगाला संगीतप्रेमी आणि नाट्यरसिकांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली. नाट्यपरिषदेचे सतीश लोटके, श्याम शिंदे तसेच नाट्यपरिषदेचे इतर सदस्य यावेळी उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले. सांस्कृतिक कार्य संचालनालयाचा हा तिसरा संगीत नाट्य महोत्सव असून,
मराठी संगीत रंगभूमीची समृद्ध परंपरा जपणे, तिचा प्रसार करणे आणि नव्या पिढीला या अभिजात कलाप्रकाराची ओळख करून देणे हा महोत्सवाचा प्रमुख उद्देश आहे. महोत्सवाच्या स्थानिक आयोजनासाठी श्रुती संगीत निकेतन, अहिल्यानगर यांचे सहकार्य घेण्यात आले आहे. महोत्सवाच्या पहिल्या दिवशी सादर झालेल्या ‘संगीत ऊस डोंगा परी’ या प्रयोगानंतर दुसऱ्या दिवशी ‘संत कान्होपात्रा’ या नाटकाने महोत्सवाची रंगत आणखी वाढवली. संत कान्होपात्रा यांच्या जीवनातील भक्ती, अध्यात्म आणि भावविश्व संगीताच्या माध्यमातून रंगमंचावर प्रभावीपणे साकारण्यात आले. अभिजात संगीत, भावपूर्ण गायन आणि प्रभावी अभिनय यामुळे प्रयोगाने रसिकांची मने जिंकली. नाटकातील संगीतबद्ध पदे, भक्तिरसपूर्ण
प्रसंग आणि कलाकारांचे प्रभावी सादरीकरण यांना उपस्थितांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली. ना. वि. कुलकर्णी लिखित, मास्टर कृष्णराव यांच्या संगीताने आणि श्री. सुरेश साखळकर यांच्या दिग्दर्शनाखाली साकारलेल्या या नाट्यप्रयोगाचे सादरीकरण बालगंधर्व संगीत रसिक मंडळ, पुणे, अहिल्यानगर यांच्या वतीने करण्यात आले. संगीत नाटकाची वैशिष्ट्यपूर्ण मांडणी, गायकांचे स्पष्ट उच्चार, भावपूर्ण अभिनय आणि अभिजात संगीत यामुळे प्रयोगाला विशेष रंगत आली. भक्ती आणि संगीताचा सुरेख संगम साधणाऱ्या या प्रयोगातून संत कान्होपात्रा यांच्या जीवनातील आध्यात्मिक जाणिवांचा प्रभावी प्रत्यय रसिकांना आला. आज ‘संगीत संशय कल्लोळ’चा समारोप तीन दिवसीय संगीत नाट्य महोत्सवाचा समारोप गुरुवार, दि. २७ ऑगस्ट
२०२६ रोजी प्रसिद्ध ‘संगीत संशय कल्लोळ’ या संगीत नाट्यप्रयोगाने होणार आहे. गो. ब. देवल लिखित आणि श्री. मनोहर जोशी दिग्दर्शित हा प्रयोग खल्वायन, रत्नागिरी यांच्या वतीने सादर करण्यात येणार आहे. संगीत, नाट्य, साहित्य, अभिनय आणि गायन यांचा सुरेख संगम असलेल्या या महोत्सवाला मिळत असलेला प्रतिसाद हा मराठी संगीत नाट्यकलेविषयी रसिकांच्या मनात असलेल्या जिव्हाळ्याचे द्योतक ठरत आहे. अहिल्यानगर आणि परिसरातील नाट्यरसिक, संगीतप्रेमी, विद्यार्थी, कलाकार व सांस्कृतिकप्रेमींनी अंतिम दिवशी होणाऱ्या ‘संगीत संशय कल्लोळ’ या प्रयोगाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
- ‘विकृत, विक्षिप्त’ म्हणविलेल्या आरोपांवरून सारिका चंद्रकांत नागरे यांच्या विरोधात जनशक्ती एकवटली शिरूर : स्वतःला समाजसेविका म्हणून पुढे करणाऱ्या सारिका चंद्रकांत नागरे यांच्या कथित कार्यपद्धतीविरोधात नागरिकांमध्ये नाराजी वाढत असून, त्यांच्या विरोधात जनशक्ती एकवटत असल्याचे चित्र आहे. नागरे यांच्या संदर्भात विविध आरोप व तक्रारी पुढे येत असून, या सर्व बाबींची प्रशासनाने निष्पक्षपणे चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. समाजसेवेच्या नावाखाली कोणतेही गैरप्रकार होत असतील किंवा सर्वसामान्य नागरिकांवर अन्याय होत असेल, तर त्याची सत्यता अधिकृत चौकशीतून समोर आणणे आवश्यक असल्याची भूमिका नागरिकांनी घेतली आहे. संबंधित प्रकरणातील कागदपत्रे, पुरावे आणि तक्रारींची सखोल तपासणी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. दरम्यान, नागरे यांच्या विरोधातील कथित आरोपांमुळे परिसरात चर्चेला उधाण आले असून, नागरिकांमध्येही तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. प्रशासनाने कोणत्याही दबावाला बळी न पडता पारदर्शक चौकशी करून दोष आढळल्यास कायद्यानुसार योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे. ‘समाजसेवेच्या नावाखाली गैरप्रकारांना थारा नको; सत्य काय आहे हे निष्पक्ष चौकशीतून समोर आले पाहिजे,’ अशी भूमिका नागरिकांकडून व्यक्त होत असून, आता प्रशासन या प्रकरणात कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.1
- लासलगावमध्ये शेतकऱ्यांनी अडवली कांदा एक्सप्रेस; सडलेला कांदा भरल्याचा आरोप1
- आपले गाडीचे पेपर (RC)हरवले, खराब झालं,5 मिनिटात काढून मिळेल. License हरवले, मतदान कार्ड मोबाईल नंबर लिंक फक्त 1 मिनीटात,pan कार्ड नवे, अपडेट, दुरुस्ती सर्व संबंधित कामासाठी,account open,मनी ट्रांसफर, पैसे काढणे,mobile दुरुस्ती, software, सेल, service and charger,battery, झेरॉक्स, color xerox, महा ID कार्ड, accessories, ऑनलाईन प्रिंट,संपर्क सुपर मोबाईल galaxy AND MULTI Services वाळूज , आपले गाडीचे पेपर (RC)हरवले, खराब झालं,5 मिनिटात काढून मिळेल. License हरवले, मतदान कार्ड मोबाईल नंबर लिंक फक्त 1 मिनीटात,pan कार्ड नवे, अपडेट, दुरुस्ती सर्व संबंधित कामासाठी,account open,मनी ट्रांसफर, पैसे काढणे,mobile दुरुस्ती, software, सेल, service and charger,battery, झेरॉक्स, color xerox, महा ID कार्ड, accessories, ऑनलाईन प्रिंट,संपर्क सुपर मोबाईल galaxy AND MULTI Services वाळूज ,1
- फुलंब्री नगरपंचायत कार्यालयाच्या सभागृहात ईद ए मिलादुन्नबी निमित्त जलसा-ए-सिरातुन्नबी कार्यक्रमात फुलंब्री समाचार वृत्तपत्राचे मुख्य संपादक मा, श्री, संजयजी मोरे साहेब,1
- छ संभाजीनगर सहा लाख प्रवासी, तरीही गोवा, नागपूर, अहमदाबादची विमानसेवा बंद ANC - छत्रपती संभाजीनगर विमानतळावरून गेल्या आर्थिक वर्षात सुमारे सहा लाखांहून अधिक प्रवाशांनी प्रवास केला. छ संभाजीनगर सहा लाख प्रवासी, तरीही गोवा, नागपूर, अहमदाबादची विमानसेवा बंद ANC - छत्रपती संभाजीनगर विमानतळावरून गेल्या आर्थिक वर्षात सुमारे सहा लाखांहून अधिक प्रवाशांनी प्रवास केला. विमानतळावरून मोठ्या प्रमाणात कार्गो वाहतूकही होत असताना गोवा, नागपूर आणि अहमदाबाद या महत्त्वाच्या शहरांसाठीची विमानसेवा बंद झाली आहे. त्यामुळे पर्यटन आणि औद्योगिक राजधानीच्या विकासाला मोठा फटका बसत आहे. विमानसेवा वाढण्याऐवजी कमी होत असल्याने प्रवासी आणि उद्योजकांमध्ये नाराजी आहे. छत्रपती संभाजीनगर हे पर्यटन आणि औद्योगिक केंद्र असल्याने देशातील प्रमुख शहरांशी हवाई कनेक्टिव्हिटी वाढवण्याची मागणी होत आहे. विमानतळावर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध असतानाही अपेक्षित विमानसेवा मिळत नसल्याने केंद्र आणि राज्य सरकारने तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.1
- नेपाळ मधील आलेल्या पुराचे रौद्र रूप. डोळ्यात पाणी आणणारी दृश्य.1
- Bade Mudde News | मंडळी, ज्या माय मराठीनं परप्रातियांना भाकरी दिली, त्यांच्या चुली पेटवल्या, त्यांची पोटं भरली... त्याच भाकरीशी कशी प्रतारणा सुरू आहे, याचं ज्वलंत उदाहरण आज मुंबईच्या रस्त्यांवर रोज पाहायला मिळतंय. महाराष्ट्रात राहायचं, इथल्या पायाभूत सुविधा वापरायच्या, इथल्या जनतेच्या घामाच्या पैशांवर स्वतःचा संसार उभा करायचा... आणि ज्या भाषेनं जगण्याचा घास दिला, ती जुजबी भाषा शिकायचीही तसदी घ्यायची नाही? ही साधी अनास्था नाही, सरळसरळ मुजोरी आहे! Bade Mudde News | मंडळी, ज्या माय मराठीनं परप्रातियांना भाकरी दिली, त्यांच्या चुली पेटवल्या, त्यांची पोटं भरली... त्याच भाकरीशी कशी प्रतारणा सुरू आहे, याचं ज्वलंत उदाहरण आज मुंबईच्या रस्त्यांवर रोज पाहायला मिळतंय. महाराष्ट्रात राहायचं, इथल्या पायाभूत सुविधा वापरायच्या, इथल्या जनतेच्या घामाच्या पैशांवर स्वतःचा संसार उभा करायचा... आणि ज्या भाषेनं जगण्याचा घास दिला, ती जुजबी भाषा शिकायचीही तसदी घ्यायची नाही? ही साधी अनास्था नाही, सरळसरळ मुजोरी आहे!1
- निर्वी येथे NH-548D मार्गावर दुचाकीचा अपघात; बाप्पू धुमाळ जखमी निर्वी : NH-548D निर्वी–जामखेड मार्गावर आज, दि. 26 ऑगस्ट 2026 रोजी दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात बाप्पू धुमाळ, रा. धुमाळवाडी, ता. शिरूर, जि. पुणे हे जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, बाप्पू धुमाळ हे Hero Splendor दुचाकी क्रमांक MH-12-OB-5976 वरून प्रवास करत असताना निर्वी परिसरात अपघात झाला. या अपघातात त्यांच्या चेहऱ्याला दुखापत झाली असून दुचाकीचेही नुकसान झाले आहे. अपघातानंतर जखमी बाप्पू धुमाळ यांना तातडीने न्हावरे येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना शिरूर येथे पाठवण्यात आले. अपघाताची नेमकी कारणे अद्याप स्पष्ट झालेली नाहीत. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी मदत करून जखमीला उपचारासाठी हलवले. या अपघातामुळे NH-548D निर्वी–जामखेड मार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.4