logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

महिला विधेयक मंजुरीला विरोध करणाऱ्या काँग्रेस पक्षाचा शिवसेना महिला आघाडीच्या वतीने निषेध करण्यात आला लातूर येथे महिला आरक्षणावरून शिवसेना महिला आघाडी आक्रमक;  गांधी चौकात काँग्रेसचा तीव्र निषेध ​लातूर (प्रतिनिधी)लोकसभेतील ३३ टक्के महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाल्याच्या पार्श्वभूमीवर, काँग्रेस पक्षाच्या भूमिकेचा निषेध करण्यासाठी शिवसेना महिला आघाडी लातूर शहराच्या वतीने गांधी चौक येथे रणशिंग फुंकण्यात आले. केंद्र सरकारने मांडलेल्या या ऐतिहासिक विधेयकाला काँग्रेसने विरोध दर्शवून महिलांच्या प्रगतीला खिळ घातल्याचा आरोप करत, शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांनी या आंदोलनाद्वारे आपला तीव्र संताप व्यक्त केला. ​हे आंदोलन शिवसेना मुख्य नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार आणि विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या सूचनेवरून करण्यात आले. महिला संपर्कप्रमुख रंजना कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हाप्रमुख सचिन दाने यांच्या नेतृत्वाखाली लातूरच्या गांधी चौकात मोठ्या संख्येने शिवसैनिक आणि महिला आघाडीच्या पदाधिकारी एकवटल्या होत्या. ​यावेळी आंदोलनाचे मुख्य आकर्षण ठरलेल्या महिला जिल्हाप्रमुख जयश्री भुतेकर यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली. त्या म्हणाल्या की, "काँग्रेसने नेहमीच महिलांच्या सन्मानाचा अवमान केला आहे. ३३ टक्के आरक्षणामुळे महिलांना राजकारणात हक्काचे स्थान मिळणार होते, मात्र काँग्रेसने आडकाठी आणून आपला महिलाविरोधी चेहरा पुन्हा एकदा उघड केला आहे." आंदोलकांनी यावेळी काँग्रेस पक्षाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला. ​या निषेध आंदोलनात जयश्री भुतेकर यांच्यासह दिशा देशमुख, प्रीती कोळी, सुरेखा गाडेकर, रेणुका गिरी, संजना निटूरे, सुमित्रा बनसोडे यांसारख्या महिला पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका मांडली. तसेच या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बाबुराव शेळके, सदाशिव गव्हाणे, मोहन दिवटे, संजय सोनकांबळे, पवन रणदिवे, सज्जाद शेख, बाळासाहेब दांडिमे यांच्यासह अनेक शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महिलांचे आरक्षण मिळेपर्यंत हा लढा सुरूच राहील, असा पवित्रा यावेळी महिला आघाडीने घेतला.

12 hrs ago
user_Laxman Ugile
Laxman Ugile
उदगीर, लातूर, महाराष्ट्र•
12 hrs ago
2fa2ffe7-b2e8-46b6-8bcd-134362b88edf

महिला विधेयक मंजुरीला विरोध करणाऱ्या काँग्रेस पक्षाचा शिवसेना महिला आघाडीच्या वतीने निषेध करण्यात आला लातूर येथे महिला आरक्षणावरून शिवसेना महिला आघाडी आक्रमक;  गांधी चौकात काँग्रेसचा तीव्र निषेध ​लातूर (प्रतिनिधी)लोकसभेतील ३३ टक्के महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाल्याच्या पार्श्वभूमीवर, काँग्रेस पक्षाच्या भूमिकेचा निषेध करण्यासाठी शिवसेना महिला आघाडी लातूर शहराच्या वतीने गांधी चौक येथे रणशिंग फुंकण्यात आले. केंद्र सरकारने मांडलेल्या या ऐतिहासिक विधेयकाला काँग्रेसने विरोध दर्शवून महिलांच्या प्रगतीला खिळ घातल्याचा आरोप करत, शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांनी या आंदोलनाद्वारे आपला तीव्र संताप व्यक्त केला. ​हे आंदोलन शिवसेना मुख्य नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार आणि विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या सूचनेवरून करण्यात आले. महिला संपर्कप्रमुख रंजना कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हाप्रमुख सचिन दाने यांच्या नेतृत्वाखाली लातूरच्या गांधी चौकात मोठ्या संख्येने शिवसैनिक आणि महिला आघाडीच्या पदाधिकारी एकवटल्या होत्या. ​यावेळी आंदोलनाचे मुख्य आकर्षण ठरलेल्या महिला जिल्हाप्रमुख जयश्री भुतेकर यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली. त्या म्हणाल्या की, "काँग्रेसने नेहमीच महिलांच्या सन्मानाचा अवमान केला आहे. ३३ टक्के आरक्षणामुळे महिलांना राजकारणात हक्काचे स्थान मिळणार होते, मात्र काँग्रेसने आडकाठी आणून आपला महिलाविरोधी चेहरा पुन्हा एकदा उघड केला आहे." आंदोलकांनी यावेळी काँग्रेस पक्षाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला. ​या निषेध आंदोलनात जयश्री भुतेकर यांच्यासह दिशा देशमुख, प्रीती कोळी, सुरेखा गाडेकर, रेणुका गिरी, संजना निटूरे, सुमित्रा बनसोडे यांसारख्या महिला पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका मांडली. तसेच या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बाबुराव शेळके, सदाशिव गव्हाणे, मोहन दिवटे, संजय सोनकांबळे, पवन रणदिवे, सज्जाद शेख, बाळासाहेब दांडिमे यांच्यासह अनेक शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महिलांचे आरक्षण मिळेपर्यंत हा लढा सुरूच राहील, असा पवित्रा यावेळी महिला आघाडीने घेतला.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • माजी मंत्री आ. अमित देशमुख अवमान प्रकरणी उदगीरात निषेध....  उदगीर (प्रतिनिधी) लातूर येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळ्याजवळ आरक्षण वर्गीकरण संदर्भात  आंदोलन झाले. आंदोलन करणे हा संविधानिक अधिकार आहे. पण सदरील आंदोलन भरकटले गेले असा आरोप मानवाधिकार संरक्षण समितीच्या वतीने  राज्य समन्वयक नितीन एकुर्केकर यांच्या वतीने करण्यात आला. विषय आरक्षण वर्गीकरणाचा होता पण त्यात माजी मंत्री आ. अमित देशमुख यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये समाजाला प्रतिनिधित्व  दिले नाही म्हणून त्यांच्या प्रतिमेला जोडे मारून विटंबना करण्यात आली , अर्वाच्य भाषा वापरण्यात आली. अपमानजनक भाषा वापरण्यात आली. पाय बांधण्यात येतील असेही यावेळी  आंदोलनकर्ते  म्हणाले. आरक्षण वर्गीकरण संदर्भात आंदोलन असताना दुसराच विषय मध्ये विनाकारण घुसवून लातूरचे माजी मंत्री आ. अमित देशमुख यांची बदनामी करण्यात आली. माजी मंत्री आ. यांचा कोणत्याही प्रकारचा संबंध नसताना वैयक्तिक आकासापोटी बदनामी करण्याच्या हेतूने सदरील प्रकार घडवून आणल्याची टीका यावेळी पॅंथर नेते गौतम दादा सोमवंशी यांनी केली . सदरील प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून माजी मंत्री आ. अमित देशमुख यांच्या बद्दल अपमान जनक वक्तव्य करणाऱ्या आंदोलकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात यावेत, याबाबतचे निवेदन उपजिल्हाधिकारी उदगीर व पोलीस निरीक्षक उदगीर शहर यांना देण्यात आले. सदरील  असंविधानिक भाषा वापरणाऱ्यांनी तात्काळ दिलगिरी व्यक्त करावी. पोलीस प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी, अन्यथा जशास तसे उत्तर मिळेल आणि आंदोलन तीव्र करण्यात येईल असा इशारा यावेळी निवेदनाद्वारे देण्यात आला. यावेळी मानवाधिकार संरक्षण समितीचे राज्य समन्वयक नितीन एकुर्केकर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवक जिल्हाध्यक्ष सुशील कुमार शिंदे, भारतीय दलित पॅंथरचे युवक प्रदेशाध्यक्ष गौतम दादा सोमवंशी, राहुल चौधरी, राम काळे, श्रीआनंद उपाध्ये, आकाश दयानंद माने, कृष्णा मोगले,अक्षय सावंत इत्यादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    3
    माजी मंत्री आ. अमित देशमुख अवमान प्रकरणी उदगीरात निषेध.... 
उदगीर (प्रतिनिधी)
लातूर येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळ्याजवळ आरक्षण वर्गीकरण संदर्भात  आंदोलन झाले. आंदोलन करणे हा संविधानिक अधिकार आहे. पण सदरील आंदोलन भरकटले गेले असा आरोप मानवाधिकार संरक्षण समितीच्या वतीने  राज्य समन्वयक नितीन एकुर्केकर यांच्या वतीने करण्यात आला. विषय आरक्षण वर्गीकरणाचा होता पण त्यात माजी मंत्री आ. अमित देशमुख यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये समाजाला प्रतिनिधित्व  दिले नाही म्हणून त्यांच्या प्रतिमेला जोडे मारून विटंबना करण्यात आली , अर्वाच्य भाषा वापरण्यात आली. अपमानजनक भाषा वापरण्यात आली. पाय बांधण्यात येतील असेही यावेळी  आंदोलनकर्ते  म्हणाले. आरक्षण वर्गीकरण संदर्भात आंदोलन असताना दुसराच विषय मध्ये विनाकारण घुसवून लातूरचे माजी मंत्री आ. अमित देशमुख यांची बदनामी करण्यात आली. माजी मंत्री आ. यांचा कोणत्याही प्रकारचा संबंध नसताना वैयक्तिक आकासापोटी बदनामी करण्याच्या हेतूने सदरील प्रकार घडवून आणल्याची टीका यावेळी पॅंथर नेते गौतम दादा सोमवंशी यांनी केली .
सदरील प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून माजी मंत्री आ. अमित देशमुख यांच्या बद्दल अपमान जनक वक्तव्य करणाऱ्या आंदोलकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात यावेत, याबाबतचे निवेदन उपजिल्हाधिकारी उदगीर व पोलीस निरीक्षक उदगीर शहर यांना देण्यात आले. सदरील  असंविधानिक भाषा वापरणाऱ्यांनी तात्काळ दिलगिरी व्यक्त करावी. पोलीस प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी, अन्यथा जशास तसे उत्तर मिळेल आणि आंदोलन तीव्र करण्यात येईल असा इशारा यावेळी निवेदनाद्वारे देण्यात आला. यावेळी मानवाधिकार संरक्षण समितीचे राज्य समन्वयक नितीन एकुर्केकर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवक जिल्हाध्यक्ष सुशील कुमार शिंदे, भारतीय दलित पॅंथरचे युवक प्रदेशाध्यक्ष गौतम दादा सोमवंशी, राहुल चौधरी, राम काळे, श्रीआनंद उपाध्ये, आकाश दयानंद माने, कृष्णा मोगले,अक्षय सावंत इत्यादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    user_Laxman Ugile
    Laxman Ugile
    उदगीर, लातूर, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यात धक्कादायक घटना व नात्याला काळीबा पासणारे घटना घडली आहे सख्या चुलतीनेच सात वर्षीय पुतण्याचा केला गळा आवळून त्याला खून घडलेल्या या धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर सुन्न झाला आहे. सकाळी दोन अल्पवयीन मुले बेपत्ता झाल्यानंतर सुरू झालेल्या शोधमोहीमेत 7 वर्षीय देवांश स्वामी याचा मृतदेह पडक्या घराजवळ आढळून आला. 👉 दुसरा मुलगा साईचरण स्वामी सुखरूप सापडला, ही एक दिलासादायक बाब. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, शेतजमिनीच्या वादातून हा प्रकार घडल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून, या प्रकरणी मृत बालकाची चुलती असलेल्या महिलेला ताब्यात घेण्यात आले आहे. तपासात बेपत्ता नाट्य रचल्याचाही आरोप समोर येत असून, या घटनेमुळे नात्यांवरच प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.
    1
    लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यात धक्कादायक घटना व नात्याला काळीबा पासणारे घटना घडली आहे सख्या चुलतीनेच सात वर्षीय पुतण्याचा केला गळा आवळून त्याला खून  घडलेल्या या धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर सुन्न झाला आहे. सकाळी दोन अल्पवयीन मुले बेपत्ता झाल्यानंतर सुरू झालेल्या शोधमोहीमेत 7 वर्षीय देवांश स्वामी याचा मृतदेह पडक्या घराजवळ आढळून आला.
👉 दुसरा मुलगा साईचरण स्वामी सुखरूप सापडला, ही एक दिलासादायक बाब.
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, शेतजमिनीच्या वादातून हा प्रकार घडल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून, या प्रकरणी मृत बालकाची चुलती असलेल्या महिलेला ताब्यात घेण्यात आले आहे.
तपासात बेपत्ता नाट्य रचल्याचाही आरोप समोर येत असून, या घटनेमुळे नात्यांवरच प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.
    user_Satish Chande
    Satish Chande
    चाकूर, लातूर, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • मुखेडच्या लेकीचा राष्ट्रपतीच्या उपस्थितीत गौरव मुखेड दि. १५ एप्रिल रोजी नागपूर येथे अखील भारतीय आयुर्विज्ञान संस्थान नागपूरच्या वतीने पार पडलेल्या द्वितीय दिक्षांत समारोहात मुखेडची लेक डॉ. ऋतुजा अशोक कौरवार यांचा महामहीम राष्ट्रपती मा. द्रोपदी मुरमु व राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. डॉ. ऋतुजा अशोक कौरवार यांनी AIIMS, Nagpur येथून सन. २०२० च्या बॕचमध्ये MBBS आॕब्स्टेट्रिक्स व गायनेकाॕलाॕजी या विषयात प्रथम व जनरल मेडिसीन या विषयात द्वितीय आल्याबद्दल त्यांना या कार्यक्रमात गौरविण्यात आले. तसेच १२ वी नीट-२०२० मध्ये ७२० पैकी ६६७ गुण घेऊन देशात १४५० वा क्रमांक मिळविला. डॉ. ऋतुजा ही AIIMS ला मुखेड आणि परिसरातून जाणारी एकमेव विद्यार्थीनी होती. तिच्या या यशामध्ये तिचे वडिल डॉ. अशोक कौरवार व आई डॉ. रचिता कौरवार यांचे अथक परिश्रम तेवढेच महत्त्वाचे आहेत. डॉ. ऋतुजाला हा बहुमान मिळाल्याबद्दल मुखेडकरांची छाती गर्वाने फुलली असून परिसरात तीच्यावर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.
    7
    मुखेडच्या लेकीचा राष्ट्रपतीच्या उपस्थितीत गौरव
मुखेड दि.
१५ एप्रिल रोजी नागपूर येथे अखील भारतीय आयुर्विज्ञान संस्थान नागपूरच्या वतीने पार पडलेल्या द्वितीय दिक्षांत समारोहात मुखेडची लेक डॉ. ऋतुजा अशोक कौरवार यांचा महामहीम राष्ट्रपती मा. द्रोपदी मुरमु व राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.  
डॉ. ऋतुजा अशोक कौरवार यांनी AIIMS, Nagpur येथून सन. २०२० च्या बॕचमध्ये MBBS आॕब्स्टेट्रिक्स व गायनेकाॕलाॕजी  या विषयात प्रथम व जनरल मेडिसीन या विषयात द्वितीय आल्याबद्दल त्यांना या कार्यक्रमात गौरविण्यात आले.  तसेच १२ वी नीट-२०२० मध्ये ७२० पैकी ६६७ गुण घेऊन देशात १४५० वा क्रमांक मिळविला.  डॉ. ऋतुजा ही AIIMS ला मुखेड आणि परिसरातून जाणारी एकमेव विद्यार्थीनी होती.
तिच्या या यशामध्ये तिचे वडिल डॉ. अशोक कौरवार व आई डॉ. रचिता कौरवार यांचे अथक परिश्रम तेवढेच महत्त्वाचे आहेत.  डॉ. ऋतुजाला हा बहुमान मिळाल्याबद्दल मुखेडकरांची छाती गर्वाने फुलली असून परिसरात तीच्यावर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.
    user_Press Mukhed Bablu Mulla
    Press Mukhed Bablu Mulla
    मुखेड, नांदेड, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • नांदेड : कंधार तालुक्यातील मानार प्रकल्पाच्या कोठा–जगडा मार्गावर असलेल्या अरुंद पुलावरून एक कार खाली कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या अपघातात कारमधील पाच प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कार अरुंद पुलावरून जात असताना चालकाचा ताबा सुटल्याने वाहन थेट पुलाखाली कोसळले. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिक नागरिकांनी तत्काळ धाव घेत बचावकार्य सुरू केले. जखमींना तातडीने बाहेर काढून जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. वेळेवर मदत मिळाल्यामुळे मोठा अनर्थ टळल्याचे सांगितले जात आहे. या घटनेमुळे त्या मार्गावरील पुलाची सुरक्षितता पुन्हा एकदा प्रश्नचिन्हाखाली आली असून, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.
    1
    नांदेड : कंधार तालुक्यातील मानार प्रकल्पाच्या कोठा–जगडा मार्गावर असलेल्या अरुंद पुलावरून एक कार खाली कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या अपघातात कारमधील पाच प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कार अरुंद पुलावरून जात असताना चालकाचा ताबा सुटल्याने वाहन थेट पुलाखाली कोसळले. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिक नागरिकांनी तत्काळ धाव घेत बचावकार्य सुरू केले.
जखमींना तातडीने बाहेर काढून जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. वेळेवर मदत मिळाल्यामुळे मोठा अनर्थ टळल्याचे सांगितले जात आहे.
या घटनेमुळे त्या मार्गावरील पुलाची सुरक्षितता पुन्हा एकदा प्रश्नचिन्हाखाली आली असून, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.
    user_MUKRAMABAD MDL
    MUKRAMABAD MDL
    मुखेड, नांदेड, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • Post by Karan
    1
    Post by Karan
    user_Karan
    Karan
    Photographer कंधार, नांदेड, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • लातूर जिल्ह्यातील अहमदपूर ते आंबेजोगाई हायवे रोडवर चालत्या कारणे घेतला पेट. वाहन चालकासह कार जळून खाक. सूरु ॲप इन मराठी न्यूज लातूर. सोमवार दिनांक 20 एप्रिल 2026. लातूर जिल्ह्यात उन्हाचा पारा चढला असून सध्या 41 अंश ते 43 अंश पारा असून मोठ्या प्रमाणात उन्हाचा कडाका लागत आहे दुपारी बारा ते चार च्या दरम्यान बाहेर निघणे खूप कठीण झाले आहे. यातच लातूर जिल्ह्यातील अहमदपूर ते आंबेजोगाई हायवे रोडवर कार जात असताना या कारणे अचानक पेट घेतला वाहन चालकास छातीत दुखत असल्याने तो घराकडे जात होता अचानक पेट घेतल्याने वाहन चालकास बाहेर पडण्याचाही आगीने वेळ न दिल्याने वाहन चालकासह कारणे पेट घेत वाहन चालकाचा जागेवर मृत्यू झाला असून कार पूर्णपणे जळत असताना पाहायला दिसत आहे.
    1
    लातूर जिल्ह्यातील अहमदपूर ते आंबेजोगाई हायवे रोडवर चालत्या कारणे घेतला पेट. 
वाहन चालकासह कार जळून खाक.
सूरु ॲप इन मराठी न्यूज लातूर. 
सोमवार दिनांक 20 एप्रिल 2026.
लातूर जिल्ह्यात उन्हाचा पारा चढला असून सध्या 41 अंश ते 43 अंश पारा असून मोठ्या प्रमाणात उन्हाचा कडाका लागत आहे दुपारी बारा ते चार च्या दरम्यान बाहेर निघणे खूप कठीण झाले आहे. यातच लातूर जिल्ह्यातील अहमदपूर ते आंबेजोगाई हायवे रोडवर कार जात असताना या कारणे अचानक पेट घेतला वाहन चालकास छातीत दुखत असल्याने तो घराकडे जात होता अचानक पेट घेतल्याने वाहन चालकास बाहेर पडण्याचाही आगीने वेळ न दिल्याने वाहन चालकासह कारणे पेट घेत वाहन चालकाचा जागेवर मृत्यू झाला असून कार पूर्णपणे जळत असताना पाहायला दिसत आहे.
    user_Nitin Chalak
    Nitin Chalak
    Media company शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • सहाय्यक निबंध दुधाटे यांचे तात्काळ निलंबन करा पत्रकार परिषदेत मागणी.
    1
    सहाय्यक निबंध दुधाटे यांचे तात्काळ निलंबन करा पत्रकार परिषदेत मागणी.
    user_लहुकुमार शिंदे
    लहुकुमार शिंदे
    Media company Latur, Maharashtra•
    9 hrs ago
  • Post by Laxman Ugile
    1
    Post by Laxman Ugile
    user_Laxman Ugile
    Laxman Ugile
    उदगीर, लातूर, महाराष्ट्र•
    14 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.