ॲड. सुधीर जोशी यांची विधी आघाडी संयोजकपदी नियुक्ती; नाशिक बैठकीत सत्कार कोल्हापूर ०२ सिटी न्यूज नेटवर्क विश्व हिंदू परिषदेच्या विधी आघाडी-प्रकोष्ठाच्या नाशिक येथे पार पडलेल्या प्रांत बैठकीत ॲड. सुधीर जोशी यांची मुंबई उच्च न्यायालय सर्किट बेंच, कोल्हापूर येथे विधी आघाडी संयोजकपदी नियुक्ती करण्यात आली. या वेळी ज्येष्ठ विधीज्ञ तथा सर्वोच्च न्यायालय, दिल्ली येथील ॲड. डॉ. अभिषेक अत्रे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. ॲड. अत्रे हे केंद्रिय विधी प्रकोष्ठाचे संयोजक असून भारत सरकारच्या कायदे तयार करणाऱ्या समितीचे प्रमुख सदस्य व मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. विविध महत्त्वाच्या कायद्यांचे मसुदे तयार करण्यात त्यांचा मोलाचा सहभाग राहिलेला आहे. नियुक्त झालेले ॲड. सुधीर जोशी हे कोल्हापूरमधील ज्येष्ठ विधीज्ञ असून विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा मंत्री म्हणून त्यांनी प्रभावी काम केले आहे. तसेच विविध सामाजिक उपक्रमांमध्येही त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. या नियुक्तीबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे. समाजातील सर्व घटकांना, विशेषतः जनजाती व वंचित घटकांना योग्य कायदेशीर मार्गदर्शन करून गरजू व दुर्बल घटकांना मदत करणे, हा विधी प्रकोष्ठाचा प्रमुख उद्देश असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.

- कोल्हापूर: बोंद्रेनगर रोडवरील गंगाई लॉन जवळील एका सुपर बाजारला आज सकाळी भीषण आग लागली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करत आहेत. आगीची भीषणता पाहता सुपर बाजारचे मोठे नुकसान झाल्याची शक्यता आहे. या घटनेचा अधिक तपशील अद्याप समजू शकलेला नाही. पोलीस आणि अग्निशमन दलाचे अधिकारी घटनास्थळी उपस्थित असून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.1
- कोल्हापूर जिल्ह्यातील शहापूर येथे जुन्या वादातून एका व्यापाऱ्याला अडवून धमकावण्यात आले आणि त्याच्या दुचाकीची तोडफोड करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.1
- सुषमा अंधारे यांनी खरात व दीपक आबा साळुंखे यांच्या संबंधाबद्दल वक्तव्य केले होते त्याला दीपक आबा साळुंखे यांनी प्रत्युत्तर दिले.1
- जावली तालुक्यात विज व वादळी वाऱ्यासह जोरदार गारांचा धुरंधर पाउस. नागरिकांचे जनजीवन विस्कळित.1
- विक्रम शिंदे /भोर दि.२ भोर तालुक्यातील वडगाव डाळ येथे राज्याचे कृषी मंत्री दतात्रय भरणे यांनी भर पावसात केली नुकसान ग्रस्त शेतीची पहाणी केली आहे.मागील दोन तीन दिवसांपासून भोर तालुक्याला अवकाळी पावसाचा चांगलाच फटका बसला आहे.बऱ्याच ठिकाणी घरांचे नुकसान झाले आहे.तसेच शेती पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल आहे या पार्श्वभूमीवर आज दि.२ कृषीमंत्री भरणे यांनी भेट देत नुकसानग्रस्त भागाचा दौरा केला तसेच पंचनामे करण्याच्या सुचना दिल्या आहेत.1
- BARAMATI BREAKING : बारामती तालुक्यात आज गारांसह जोरदार पावसानं हजेरी लावली.. यात मोठ्या प्रमाणात पिकांचं नुकसान झालं आहे.. त्यामुळं शेतकरी धास्तावले असून शासन आता काय निर्णय घेतं याकडे लक्ष लागलं आहे..1
- Post by समर्थ न्युज आवाज महाराष्ट्राचा1
- सांगोला तालुका वाटंबरे येथे आज आलेल्या वादळी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणावर मका व इतर पिकांचे नुकसान झाले तसेच मोठमोठे झाडे उन्मळून पडली.1