कागलमध्ये शालेय बुद्धिबळ स्पर्धा उत्साहात; पार्थ, शिवम आणि ओजस ठरले विजेते कागल, दि. 19 एप्रिल – डी. आर. माने महाविद्यालय, कागल येथे अनुज चेस ॲकॅडमीच्या वतीने आयोजित शालेय बुद्धिबळ स्पर्धा उत्साहात पार पडली. स्पर्धा 9 वर्षांखालील, 13 वर्षांखालील आणि 13 वर्षांवरील (खुला) अशा तीन गटांमध्ये घेण्यात आल्या. प्रत्येक गटात सुमारे 25 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असून स्पर्धा पाच फेऱ्यांमध्ये रंगली. स्पर्धेचे उद्घाटन प्रवीण सुतार आणि श्रीनय पालनकर यांच्या हस्ते पटावरील चाल करून करण्यात आले. लहान गट (9 वर्षांखालील): पार्थ सुतार याने प्रथम क्रमांक पटकावला. श्रीनय पालनकर द्वितीय, कृष्णराज चव्हाण तृतीय, अंशराज चव्हाण चौथा आणि शौर्य कांडेकरी पाचवा क्रमांक मिळवला. उत्कृष्ट विद्यार्थिनी म्हणून कैवल्या चव्हाण हिचा गौरव करण्यात आला. मध्यम गट (13 वर्षांखालील): शिवम साबळे प्रथम, वरद चौगुले द्वितीय, शौर्य पाटील तृतीय, शिवराज फडतारे चौथा आणि अंश निंबाळकर पाचवा क्रमांकावर राहिले. उत्कृष्ट विद्यार्थिनी म्हणून शरयू कांडेकरी हिला सन्मानित करण्यात आले. मोठा गट (13 वर्षांवरील/खुला): ओजस व्हनमाने याने प्रथम क्रमांक मिळवला, तर सोहम चौगुले द्वितीय ठरला. उत्तेजनार्थ पारितोषिक रणवीर पुनुगडे आणि स्वरा सुतार यांना देण्यात आले. स्पर्धेसाठी पंच म्हणून अनुज चेस ॲकॅडमीचे प्रशिक्षक आणि जिल्हा चेस असोसिएशनचे खजिनदार बाबूराव पाटील यांनी काम पाहिले. बक्षीस वितरण समारंभ कोल्हापूर जिल्हा चेस असोसिएशनचे माजी सचिव कृष्णात पाटील, मोहन कांडेकरी, रणजीत चव्हाण, बाबूराव पाटील आणि प्रवीण सुतार यांच्या हस्ते पार पडला. स्पर्धेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नंदकुमार कदम, डॉ. श्रीनिवास पाटील आणि प्रा. संग्राम तोडकर यांचे मार्गदर्शन लाभले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अनुराग पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.

- कोल्हापुरात भीषण दुर्घटना! भिंत कोसळून प्राध्यापिका व विद्यार्थिनीचा मृत्यू कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. जुने घर जेसीबीने पाडत असताना भिंत अचानक कोसळली आणि त्या ठिकाणाहून जात असलेल्या प्राध्यापिका ज्योती नितीन कुंभार आणि विद्यार्थिनी वैष्णवी भोसले यांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत ललीता भोसले गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.ही घटना परिसरात शोककळा पसरवणारी ठरली आहे.1
- Shiv Jayanti 2026 Kolhapur Shiv Jayanti Shivaji Maharaj Jayanti Chhatrapati Shivaji Maharaj Shiv Jayanti Celebration Kolhapur Festival Maharashtra Festivalकोल्हापुरात शिवजयंतीचा जल्लोष | छत्रपती शिवाजी महाराज जयंती 2026s Shivaji Maharaj Status Shivaji Maharaj Video Shiv Jayanti Kolhapur 2026 Maharashtra Culture Dhol Tasha Pathak Shiv Jayanti Utsav Kolhapur News Shivaji Maharaj Jayanti Celebration1
- सिंधुदुर्ग गेल्या अनेक वर्षांपासून मानपान, वाद आणि मतभेदांमुळे बंद अवस्थेत असलेली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मंदिरे आता पुन्हा एकदा उघडणार आहेत. महाराष्ट्र मंदिर महासंघाने सुरू केलेल्या विशेष अभियानामुळे हे सकारात्मक चित्र पाहायला मिळत असून, दोन दशकांपासून कुलूपबंद असलेली काही मंदिरे आता भक्तांसाठी खुली झाली आहेत. महाराष्ट्र मंदिर महासंघाचे राज्य संघटक संजय जोशी यांनी सिंधुदुर्ग येथे आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी त्यांनी जिल्हयातील मंदिरांच्या सद्यस्थितीवर आणि महासंघाच्या प्रयत्नांवर प्रकाश टाकला. प्राथमिक सर्वेक्षणात जिल्ह्यातील सुमारे २५ मंदिरे वादांमुळे बंद किंवा बंद पडण्याच्या मार्गावर असल्याचे समोर आले आहे. महासंघाने गेल्या दोन वर्षांत गावपातळीवर बैठका घेऊन, दोन गटांमधील मतभेद मिटवून सामंजस्य घडवून आणण्याचे काम केले आहे. आतापर्यंत १० मंदिरांच्या विश्वस्तांशी संपर्क साधण्यात आला असून, त्यापैकी ४ मंदिरे पूर्णपणे पूर्ववत सुरू झाली आहेत. यात देऊळ आणि माडखोल येथील मंदिरांचा प्रामुख्याने समावेश आहे. केवळ मंदिर उघडणेच नव्हे, तर बंद पडत चाललेल्या धार्मिक प्रथा आणि परंपरा पुन्हा सुरू करण्यावरही महासंघाने भर दिला आहे. महाराष्ट्रासमोर नवा आदर्श संजय जोशी यांनी यावेळी सांगितले की, "सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मंदिर विश्वस्तांनी आपापसातील मतभेद बाजूला ठेवून एकोप्याने काम करण्याचा जो निर्णय घेतला आहे, तो संपूर्ण महाराष्ट्रासाठी आदर्श आहे." त्यांनी आवाहन केले की, राज्यातील इतर जिल्ह्यांतही जिथे मंदिरे बंद आहेत, तिथल्या विश्वस्तांनी एकत्र येऊन समाजाला मंदिरांचा 'ऊर्जास्त्रोत' पुन्हा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत.1
- ##1
- एसपी तुषार दोशी यांची सांगलीला बदली; निखील पिंगळे साताऱ्याचे नवे पोलीस अधीक्षक सातारा, दि. २० सातारा जिल्ह्यातील पोलीस प्रशासनात महत्त्वाचा बदल करण्यात आला असून पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची सांगली येथे बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी निखील पिंगळे यांची साताऱ्याचे नवे पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा परिषद निवड प्रक्रियेदरम्यान झालेल्या गोंधळानंतर साताऱ्यातील पोलीस यंत्रणा चर्चेत आली होती. धक्काबुक्की, अटक आणि मतदान प्रक्रियेतील हस्तक्षेपाच्या आरोपांमुळे हा मुद्दा विधानमंडळातही गाजला. दोशी यांच्या निलंबनाची मागणी, त्यानंतरचे आदेश आणि त्यावरून निर्माण झालेले वाद यामुळे प्रशासनावर लक्ष केंद्रीत झाले होते. या पार्श्वभूमीवर दोशी काही दिवस अर्जित रजेवरही होते. दरम्यान, राज्य सरकारने प्रशासनिक पातळीवर निर्णय घेत त्यांची बदली केली आहे. त्यामुळे झेडपी निवडीनंतर सुरू झालेल्या वादाला नवे वळण मिळाले आहे. नवे पोलीस अधीक्षक निखील पिंगळे यांना विविध जिल्ह्यांतील कामाचा अनुभव आहे. त्यांनी पंढरपूर येथे उपविभागीय पोलीस अधिकारी, वर्धा येथे अतिरिक्त पोलीस अधीक्षक, गडचिरोली येथे राज्य राखीव पोलीस दलाचे समादेशक, तसेच लातूर आणि गोंदिया येथे पोलीस अधीक्षक म्हणून काम पाहिले आहे. ते मूळचे पुणे जिल्ह्यातील असून प्रशासकीय अनुभवामुळे त्यांच्याकडून साताऱ्यात कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षमपणे हाताळली जाईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. साताऱ्यातील अलीकडील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पिंगळे यांच्यासमोर कायदा व सुव्यवस्था राखण्याबरोबरच राजकीय तणावाचे व्यवस्थापन करण्याचे मोठे आव्हान असणार आहे.4
- Post by मन्सूर शेख1
- मोहरी खुर्द येथे विराट हिंदू संमेलन संपन्न विक्रम शिंदे /भोर दि.२१ मोहरी खुर्द (ता.भोर) येथे सकल हिंदू समाज गुंजन मावळ खोरे यांच्या वतीने विराट हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते,या संमेलनात गुंजन मावळ खोऱ्यातील हिंदू समाजाने उपस्थिती दाखवून एकतेचे दर्शन घडवले,कार्यक्रमाची सुरुवात शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली,हिंदू जनजागृती समितीच्या डॉ.ज्योती काळे यांनी मातृशक्ती वर मार्गदर्शन केले,ह.भ.प.नवनाथ महाराज गाडे यांनी भारताचा गौरवशाली इतिहास सर्वांसमोर मांडला,हिंदुत्ववादी वक्ते सर्वेश मेहेंदळे यांनी माता-भगिनींना येणाऱ्या संकटांपासून सावध राहण्याचे आवाहन केले,राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे रमेश आंबेकर यांनी संघ शताब्दी वर्षानिमित्त पंच परिवर्तन याविषयी मार्गदर्शन केले, संमेलन यशस्वी करण्यासाठी स्थानिक आयोजन समिती आणि स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले, शिस्तबद्ध पद्धतीने पार पडलेले संमेलन गुंजन मावळ खोऱ्यातील हिंदू समाजासाठी एक ऊर्जा स्रोत ठरले.2
- छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त कोल्हापूर शहरात भव्य मिरवणुका काढण्यात आल्या. यावेळी सध्या चर्चेत असलेल्या ‘खरात प्रकरणा’वर टीकात्मक भाष्य करणारा देखावा विशेष लक्षवेधी ठरला. अंधश्रद्धा आणि भोंदूगिरीला बळी पडू नका, असा ठाम संदेश या देखाव्यातून नागरिकांना देण्यात आला. सामाजिक जागरूकतेचा हा अनोखा प्रयत्न नागरिकांच्या चर्चेचा विषय बनला आहे.1