Shuru
Apke Nagar Ki App…
फुलंब्री तालुक्यातील दरेगाव दरी येथील शालेय समितीच्या अध्यक्षपदी बाबासाहेब मालोदे यांची निवड करण्यात आली आहे.
AKBAR SHAHA REPORTER
फुलंब्री तालुक्यातील दरेगाव दरी येथील शालेय समितीच्या अध्यक्षपदी बाबासाहेब मालोदे यांची निवड करण्यात आली आहे.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ आणि देशभरातील वाढत्या पेपरफुटीच्या घटनांविरोधात छत्रपती संभाजीनगरात रविवारी, 26 जुलै रोजी भव्य तिरंगा मार्च काढण्यात आला. भारत मातेच्या पाल्यांच्या सुरक्षित भविष्यासाठी क्रांती चौक ते पैठण गेट दरम्यान काढण्यात आलेल्या या मार्चमध्ये शहरवासीय, तरुण, महिला, विद्यार्थी व विविध क्षेत्रांतील हजारो नागरिक उत्स्फूर्तपणे रस्त्यावर उतरले. या आंदोलनात सहभागी नागरिकांनी कोणत्याही राजकीय पक्षाचा झेंडा न घेता हातात केवळ राष्ट्रध्वज तिरंगा, महापुरुषांचे फ्लेक्स आणि केंद्र सरकारच्या भूमिकेचा निषेध करणारे फलक घेतले होते. विद्यार्थ्यांवरील अत्याचार आणि पेपरफुटीचा निषेध करण्यासाठी सर्व जण काळे कपडे परिधान करून सहभागी झाले होते. या वेळी 'केंद्र सरकार हाय हाय...', 'मोदी सरकार हाय हाय...' आणि 'विद्यार्थ्यांवर आणि माता-भगिनींवर हात उचलणाऱ्या सरकारचा धिक्कार असो...' अशा जोरदार घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. देशातील विद्यार्थ्यांचे भविष्य सुरक्षित झाले पाहिजे, पेपरफुटीच्या घटनांना आळा बसला पाहिजे आणि विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय थांबला पाहिजे, अशी ठाम भूमिका या वेळी शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी मांडली. या तिरंगा मार्चमध्ये शिवसेना नेते तथा आमदार अंबादास दानवे, शिवसेना उपनेते सुभाष पाटील, माजी मंत्री अनिस पटेल, काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर, सीपीआय नेते कॉम्रेड अभय टाकसाळ, माजी आमदार नामदेवराव पवार, संतोष जेजुरकर, संतोष खेंडके, राशीद मामू, काँग्रेस शहराध्यक्ष सय्यद अक्रम, बाळासाहेब थोरात, हरिभाऊ हिवाळे, ज्ञानेश्वर डांगे, दिग्विजय शेरखाने, जगन्नाथ काळे, शिवसेना महिला आघाडी जिल्हा संघटक आशा दातार, महानगर संघटक सुकन्या भोसले, काँग्रेस महिला शहराध्यक्ष दिपाली मिसाळ, रेखा वाहटूळे, विद्या गायकवाड यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.2
- उद्धव ठाकरे यांनी नितीन गडकरी यांना 'खड्डामंत्री' म्हणत थेट डिवचले आहे. या खोचक टीकेनंतर आता e20 पेट्रोलचा मुद्दा अधिक चिघळणार का, असा सवाल उपस्थित होत असून राजकीय वातावरणात यावरून जोरदार चर्चा रंगू लागली आहे.1
- फुलंब्री तालुक्यातील दरेगाव दरी येथील शालेय समितीच्या अध्यक्षपदी बाबासाहेब मालोदे यांची निवड करण्यात आली आहे.1
- विठ्ठलमय वातावरणात 'श्री स्वामी समर्थ ग्राम विकास अभियान'च्या वतीने प्रसादाच्या माध्यमातून स्वामी भक्तीचा जागर करत अन्नदान उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या भक्तीमय उपक्रमात स्वामी भक्तीचा उत्साह आणि प्रसादाचे वाटप श्रद्धेने पार पडले.1
- संभाजीनगर येथील क्रांतीचौकात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचा जल्लोष करण्यात आला. या ठिकाणी जमा झालेल्या लोकांनी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानिमित्त हा आनंदोत्सव साजरा केला.1
- आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर पंढरपूर नगरीत लाखो वारकऱ्यांच्या जयघोषाने भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून चंद्रभागेच्या पवित्र तीरावर "ज्ञानोबा-तुकाराम"च्या गजरात श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळली आहे. या आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न झाली. महापूजेसाठी मंदिराच्या दर्शन रांगेतील पहिल्या निष्ठावंत वारकरी दांपत्याला मानाचा वारकरी म्हणून बसण्याचा सन्मान दिला जातो. यंदा हा मान धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील गौरगाव येथील बाबासाहेब माधव माने व प्रभावती बाबासाहेब माने या दांपत्याला मिळाला आहे. गेली २० वर्षे अखंड पंढरीची वारी करणारे माने दांपत्य हे वारकरी परंपरेची तिसरी पिढी आहे. साक्षात विठुरायाच्या महापूजेचा मान मिळाल्याने आयुष्य कृतार्थ झाले असून असा बहुमान मिळेल असे स्वप्नातही वाटले नव्हते, अशी भावना त्यांनी याप्रसंगी व्यक्त केली.2
- छत्रपती संभाजीनगर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत मंत्री संजय शिरसाट यांनी इंडिया आघाडी आणि विरोधी नेत्यांवर जोरदार निशाणा साधला आहे. लोकसभेच्या निवडणुकीनंतर इंडिया आघाडी पूर्णपणे संपली असून त्यांच्यात कुठेही एकवाक्यता उरलेली नाही, असा दावा त्यांनी केला. दिल्लीतील आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचे श्रेय घेण्यासाठी विरोधी नेत्यांमध्ये चढाओढ लागली होती आणि भविष्यातही ही आघाडी राहणार नाही, असे शिरसाट यांनी स्पष्ट केले. उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना शिरसाट म्हणाले की, शरद पवार माझ्यामुळे आंदोलनाची दिशा बदलली म्हणतात, तर राहुल गांधी टी-शर्ट घालून आंदोलन करून दिशा बदलल्याचा दावा करतात; त्यामुळे नेमक्या कोणामुळे दिशा बदलली हे सांगण्यासाठी वेगळा वक्ता आणावा लागेल. पेपर फुटीच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी सांगितले की, ही घटना पहिल्यांदा घडलेली नाही. पूर्वी दरवर्षी पेपर लीक व्हायचे आणि विद्यार्थी जीव द्यायचे, मात्र यावेळच्या मजबूत आंदोलनामुळे शिक्षण क्षेत्रात वेगळी दिशा पाहायला मिळाली आहे. कोणतेही सरकार आले तरी ते आता विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणार नाही. हुकूमशाही केल्यानंतर तरुण वर्ग चिरडला जातो आणि सत्ताही जाते, हा काहींचा मागचा अनुभव आता कामी आला आहे. राजकीय पक्ष आपली बाजू मांडण्यासाठी खेळ खेळत असून लोकांना या खेळाशी काही देणेघेणे नाही, असे सांगत शिरसाट यांनी नमूद केले की, 'माझा पेपर लीक होणार नाही' या भावनेतून तरुण आनंद व्यक्त करत आहेत. शरद पवार यांच्या बदलत्या भूमिकांवर बोट ठेवत ते म्हणाले की, पवार एनडीए मध्ये जातील की नाही माहित नाही, पण त्यांचा मागचा अनुभव पाहता ते जास्त काळ एनडीए मध्ये राहणार नाहीत. तसेच राज ठाकरे यांच्यावर बाळासाहेबांचा प्रभाव असल्याने ते तसे विधान करतात, असेही शिरसाट यांनी म्हटले.1
- छत्रपती संभाजीनगरमधील सातारा गावाजवळील वल्मी तलावात रविवारी सायंकाळी एका अंदाजे २५ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच कांचनवाडी अग्निशमन केंद्राचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पदमपुरा अग्निशमन पथकाच्या मदतीने तलावात शोधमोहीम राबवून संबंधित तरुणाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. त्यानंतर मृतदेह सातारा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला आहे. मृत व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नसून सातारा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गोविंद एकीलवाले पुढील तपास करत आहेत. ही बचाव मोहीम मुख्य अग्निशमन अधिकारी अशोक एन. खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशमन दलाने यशस्वीरीत्या पार पाडली.2