अमरावती ग्रामीणमधील कुऱ्हा पोलीस स्टेशन अंतर्गत पूर्ववैमनस्यातून दाखल केलेली तक्रार मागे न घेतल्याने एका १९ वर्षीय तरुणीवर पेट्रोल फेकून तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी कुऱ्हा पोलिसांनी आरोपीविरुद्ध विनयभंग आणि जिवे मारण्याचा प्रयत्न केल्यासह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. ही घटना ११ जुलै २०२६ रोजी दुपारी १२:१५ ते १२:२५ च्या दरम्यान घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतीक विलास ताठे (वय २५, रा. महेंद्र कॉलनी, अमरावती) असे आरोपीचे नाव आहे. घटनेच्या वेळी पीडित तरुणी घरात कपडे धुवत असताना आरोपीने तिला घराबाहेर बोलावले आणि आधी दाखल केलेला गुन्हा (गु.र.नं. १३४/२०२६) मागे घेण्यास सांगितले. "तू माझ्याविरुद्ध दिलेली तक्रार मागे घे, मी तुझ्यासोबत लग्न करतो," असे आरोपी म्हणाला, मात्र तरुणीने लग्न करण्यास आणि केस मागे घेण्यास स्पष्ट नकार दिला. याचा राग येऊन आरोपी प्रतीकने तरुणीला जबरदस्तीने पकडले, ज्यामध्ये तिचे कपडे फाटले. यानंतर आरोपीने स्वतःजवळील पेट्रोलची बॉटल काढून ते पेट्रोल पीडित तरुणीच्या अंगावर फेकले आणि खिशातील माचिस काढली. या प्रकारामुळे घाबरलेल्या तरुणीने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली असता तिचे शेजारी आणि चुलत भाऊ धावून आले. लोकांना येताना पाहून आरोपी घटनास्थळावरून पळून गेला. याप्रकरणी पीडित तरुणीच्या जबानीवरून कुऱ्हा पोलिसांनी आरोपीविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

- अमरावती ग्रामीणमधील कुऱ्हा पोलीस स्टेशन अंतर्गत पूर्ववैमनस्यातून दाखल केलेली तक्रार मागे न घेतल्याने एका १९ वर्षीय तरुणीवर पेट्रोल फेकून तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी कुऱ्हा पोलिसांनी आरोपीविरुद्ध विनयभंग आणि जिवे मारण्याचा प्रयत्न केल्यासह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. ही घटना ११ जुलै २०२६ रोजी दुपारी १२:१५ ते १२:२५ च्या दरम्यान घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतीक विलास ताठे (वय २५, रा. महेंद्र कॉलनी, अमरावती) असे आरोपीचे नाव आहे. घटनेच्या वेळी पीडित तरुणी घरात कपडे धुवत असताना आरोपीने तिला घराबाहेर बोलावले आणि आधी दाखल केलेला गुन्हा (गु.र.नं. १३४/२०२६) मागे घेण्यास सांगितले. "तू माझ्याविरुद्ध दिलेली तक्रार मागे घे, मी तुझ्यासोबत लग्न करतो," असे आरोपी म्हणाला, मात्र तरुणीने लग्न करण्यास आणि केस मागे घेण्यास स्पष्ट नकार दिला. याचा राग येऊन आरोपी प्रतीकने तरुणीला जबरदस्तीने पकडले, ज्यामध्ये तिचे कपडे फाटले. यानंतर आरोपीने स्वतःजवळील पेट्रोलची बॉटल काढून ते पेट्रोल पीडित तरुणीच्या अंगावर फेकले आणि खिशातील माचिस काढली. या प्रकारामुळे घाबरलेल्या तरुणीने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली असता तिचे शेजारी आणि चुलत भाऊ धावून आले. लोकांना येताना पाहून आरोपी घटनास्थळावरून पळून गेला. याप्रकरणी पीडित तरुणीच्या जबानीवरून कुऱ्हा पोलिसांनी आरोपीविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.1
- वर्धा जिल्ह्यातील बेटवडे गावच्या शेतकऱ्यांची कथित फसवणूक केल्याप्रकरणी मॅरेथॉन कंपनीच्या भू-माफियांविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचे अनिश्चितकालीन धरणे आंदोलन सुरू आहे. मॅरेथॉन कंपनीचे मधुर रमणीकलाल शाह, सागर गाला आणि इतर भागीदारांवर तात्काळ गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी शेतकरी आक्रमक झाले आहेत. या प्रकरणातील दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी आणि पीडित शेतकऱ्यांना न्याय मिळावा, अशी आग्रही मागणी आंदोलकांकडून केली जात आहे. मॅरेथॉन कंपनीवर शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप असून, आरोपींवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन सुरूच ठेवण्यात आले आहे.1
- भाजपाच्या अमरावती ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी आमदार प्रताप अडसड यांची वर्णी लागली आहे. भाजप हा नेहमीच तरुण पिढीला संधी देणारा पक्ष असल्याचे मत यावेळी आमदार प्रताप अडसड यांनी व्यक्त केले.1
- पालममध्ये 'व्हॉईस ऑफ मीडिया'ची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. या नवनिर्वाचित कार्यकारिणीमध्ये गुणवंत सराफ यांची तालुकाध्यक्षपदी तर चांद तांबोळी यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.1
- हिंगणघाट येथील दत्त मंदिर वॉर्डमधील रहिवासी पितांबर पुरुषोत्तम टिपले यांच्या घरासमोर गदर पाईप फुटला आहे. या फुटलेल्या पाईपमुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर डास तयार झाले आहेत. या समस्येचे निवारण करण्यासाठी नगरपालिकेला पत्र देऊन तक्रार करण्यात आली आहे, परंतु पालिका प्रशासन यावर कोणतीही कारवाई न करता केवळ झोपा काढत आहे.3
- नागपूर येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तरुणांना नोकरी शोधण्याऐवजी स्वतः नोकरी देणारे बनण्याचे आवाहन केले आहे. तरुणांनी नोकरीच्या मागे न धावता इतरांना नोकऱ्या देणारे बनावे, असे त्यांनी म्हटले आहे.1
- राज्य सरकारने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी २ लाख रुपयांपर्यंतच्या पीक कर्जमाफीची घोषणा केल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. मात्र, या घोषणेनंतर राज्यातील अनेक जिल्ह्यांत, विशेषतः अकोला जिल्ह्यात, २०१७ मधील महात्मा फुले कर्जमाफी योजना आणि २०१९ मधील छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेचा लाभ न मिळालेले अनेक शेतकरी अद्यापही वंचित असल्याचे वास्तव समोर आले आहे. या वंचित शेतकऱ्यांना यंदाच्या कर्जमाफी योजनेत समाविष्ट करून सरकारने न्याय द्यावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. अकोला जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी २०१३ ते २०१६ दरम्यान विविध बँकांतून २ लाख रुपयांच्या आतील पीक कर्ज घेतले होते. बँकांच्या चुकांमुळे किंवा सरकारकडून निधी न आल्यामुळे या शेतकऱ्यांना मागील दोन्ही कर्जमाफी योजनांचा लाभ मिळाला नाही. याबाबत संबंधित बँका, जिल्हा अग्रणी बँक, डीडीआर कार्यालय आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रारी करूनही अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही. बँकांकडे विचारणा केली असता, आम्ही संपूर्ण डेटा पाठवला असून सरकारनेच कर्जमाफीचे पैसे पाठवले नसल्याचे त्यांच्याकडून सांगितले जात आहे. त्यातच काही बँकांनी शेतकऱ्यांना न विचारता त्यांच्या थकीत पीक कर्जाचे परस्पर पुनर्गठन केल्याचा धक्कादायक प्रकारही उघडकीस आला आहे. या अन्यायाविरोधात आता शेतकरी संघटना आक्रमक झाल्या असून, शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय परस्पर पीक कर्जाचे पुनर्गठन करणाऱ्या बँका आणि संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, यासाठी लवकरच मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले जाणार आहे. जनअभियान फाउंडेशनचे अविनाशजी देशमुख आणि शेतकरी संघटनेचे जिल्हा समन्वयक विनोद राऊत यांनी, बँकेच्या चुकांमुळे वंचित राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांना या योजनेत समाविष्ट करून पूर्ण कर्जमुक्ती देण्याची मागणी केली आहे. तसेच नारी शक्ती एकता संघर्ष फाउंडेशनच्या केंद्रीय अध्यक्षा संगीता प्रभे यांनी सरकारने सरसकट कर्जमाफी देऊन भेदभाव टाळावा, असे म्हटले आहे. तर संस्थेच्या केंद्रीय उपाध्यक्षा हमिदा बि शेख अख्तर यांनी, शेतकरी नैराश्यातून आत्महत्या करत असताना शासनाने त्यांची थट्टा थांबवून सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याची आग्रही मागणी केली आहे.1
- अयोध्या राम मंदिरातील कथित दान अपहार आणि जमिनीच्या गैरव्यवहार प्रकरणी अमरावतीत युवक काँग्रेसकडून 'रघुपती राघव राजाराम' सत्याग्रह करण्यात आला आहे. डॉ. सुनील देशमुख यांच्या नेतृत्वात युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हा सत्याग्रह केला.1