राहुरी फॅक्टरी सबस्टेशन शेजारी वीज कोसळून वडाच्या झाडाला आग राहुरी फॅक्टरी सबस्टेशन शेजारी वीज कोसळून वडाच्या झाडाला आग राहुरी प्रतिनिधी गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास झालेल्या अवकाळी पावसामध्ये राहुरी फॅक्टरी येथील महावितरण सबस्टेशन परिसरात गुरुवारी दुपारी अचानक वीज कोसळल्याने सबस्टेशनजवळील एका मोठ्या वडाच्या झाडाने पेट घेतला. झाडाला आग लागल्याने काही काळ परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. विशेष म्हणजे हा प्रकार महावितरण च्या सबस्टेशनच्या अगदी शेजारी घडल्याने संभाव्य मोठ्या दुर्घटनेची भीती व्यक्त केली जात होती. घटनेची माहिती मिळताच देवळाली प्रवरा नगर परिषदेचे नगराध्यक्ष सत्यजित कदम तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्या उपस्थितीत अग्निशामक दलाच्या जवानांनी वेगाने हालचाली करत आगीवर नियंत्रण मिळवले. झाडाला लागलेली आग सबस्टेशनकडे पसरण्यापूर्वीच ती पूर्णपणे आटोक्यात आणण्यात यश आले. वेळीच करण्यात आलेल्या या तत्पर कारवाईमुळे महावितरणच्या यंत्रणेला कोणतीही हानी पोहोचली नाही. तसेच परिसरातील नागरिकांनाही कोणताही धोका निर्माण झाला नाही. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी अथवा वित्तहानी झाली नसून मोठी दुर्घटना टळली.

- वैजापूर.महावितरण कार्यालयांचे दुर्लक्ष विज ग्राहकांना वेठीस धरण्याचे काम महावितरण कंपनी शिवराई सबस्टेशन येथून दोन दिवसांपासून लाईट गुल एक ही महावितरण कंपनीचे अधिकारी फिरकले नाही गोळवाडी दहेगाव करंजगाव राहेगव्हाण विजग्रहकांना सेवा देण्यासाठी अ कार्यक्षम.2
- दुर्गम भागात बायफ टाकळी सेंटरचा हातभार: पशुपालकांना प्रशिक्षण व साहित्य वितरण1
- तालुक्यामध्ये अवकाळी पावसाने मोठे नुकसान केले आहे काढणीला आलेला कांदा,मका, गहू, हरभरा,टरबूज,टोमॅटो इत्यादी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्याचबरोबर पुरणगाव येथील समाधान झांबरे यांच्या रोपवाटिकेचे देखील मोठे नुकसान झाले आहे अचानकपणे काल झालेल्या या बे मोसमी पावसामुळे तालुक्यातील शेतकरी मोठा अडचणीत आला आहे आधीच कुठल्याही पिकाला भाव नसल्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटांना तोंड देत होता त्यात आता या अवकाळी पावसाचं मोठं संकट त्याच्यासमोर उभे राहिले आहे काल झालेल्या या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठी नुकसान झाले आहे पुरणगाव येथील समाधान झांबरे यांच्या रोपवाटिकेचे जवळपास आठ ते दहा लाख रुपये नुकसान झाल्याचे समोर आले आहे घटनेची माहिती मिळताच शिवसेनेचे तालुकाप्रमुख पांडुरंग शेळके पाटील यांनी प्रत्यक्ष जाऊन पाहणे केली तिथूनच शिक्षक आमदार किशोर दराडे यांना शेतकऱ्याची व्यथा सांगितली तात्काळ आमदार दराडे यांनी स्थानिक प्रशासनाला सोबत घेऊन पाहणी दौरा केला या दौऱ्यामध्ये तहसीलदार आबा महाजन,तालुका कृषी अधिकारी शुभम बेरड यांच्यासह प्रशासनातील महत्त्वाचे अधिकारी उपस्थित होते आमदार दराडे यांनी तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे असा अहवाल तात्काळ तयार करून वरिष्ठांना द्यावा अशा सूचना आमदार दराडे यांनी केल्या तालुक्यातील ज्या ज्या भागात मुस्कान झाले आहे त्या ठिकाणी आमदार किशोर दराडे व शिवसेना तालुकाप्रमुख पांडुरंग शेळके पाटील यांनी स्वतः शेतीचा बांधावर जात पाहणी करत शेतकऱ्यांना धीर देत सांत्वन केले आहे प्रशासनाकडून तात्काळ पंचनामे करून घेत शेतकऱ्यांच्या हाताला मदत कशी मिळेल यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे देखील तालुक्याचा सविस्तर आढावा देणार असल्याचे श्री दराडे यांनी सांगितले. प्रतिक्रिया अवकाळी पावसामुळे तालुक्यात शेती क्षेत्राची मोठी नुकसान झाले आहे शेतकरी आधीच अडचणीत असल्यामुळे त्याला या अस्मानी संकटाला देखील तोंड द्यावे लागत आहे ही अतिशय कदाचित गोष्ट असून शेतकऱ्यांनी कुठे खचून जाऊ नये आम्ही तात्काळ पंचनामेचे आदेश केले आहे लवकरात लवकर आपल्याला मदत मिळावी यासाठी वरिष्ठ पातळीवरती तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी आम्ही न्याय मागून. आमदार किशोर दराडे प्रतिक्रिया. तालुक्यातील शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती आधीच बिकट होती त्यात या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याची पूर्णपणे वाट लागली आहे आम्ही सर्व शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते शेतकऱ्यांच्या सोबत आहोत शेतकऱ्यांना पंचनामे किंवा प्रशासकीय यंत्रणेत कुठलीही अडचण आल्यास तात्काळ आमच्या पदाधिकारी किंवा कार्यकर्त्यांची संपर्क साधावा असे आव्हान आम्ही या निमित्ताने करत आहोत. तालुक्यातील संपूर्ण पंचनामे होत नाही तो पर्यंत आम्ही प्रशासनाचा पाठपुरावा करत राहू. पांडुरंग शेळके पाटील शिवसेना तालुकाप्रमुख येवला.2
- नेकनूर येथे कासार समाजाचा महाकुंभ..! कालिका मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी..1
- आज शुक्रवार तीन मार्च रोजी छत्रपती संभाजी नगर शहरातील बाळापूर शिवारामध्ये एका पोलीस कर्मचाऱ्यांचा विहिरीत पडून मृत्यू झाला आहे, सदरची माहिती अग्निशामक विभागाला मिळताच अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी जाऊन विहिरीतून मृतदेह शोधून चिखलठाणा पोलिसांच्या ताब्यात दिला आहे अशी माहिती आज रोजी माध्यमांना सदरील माहिती देण्यात येत आहे.1
- Exclusive Interview Bk Dr Donika Meditation | Gallinews Bharat1
- छ. संभाजीनगर प्रतिनिधी: बिबवेवाडी गावठाण येथील शाळेतून गेले 4,30 तास पाणी वाहत आहे...ह्यावर उपाययोजना करणार आहे की नाही, का ह्याच उत्तर पण आम्ही नगरसेवकांना मागायच की नेहरूंना शाळेतून 6 वाजल्यापासून पाणी वाहत आहे... अजूनही उपाययोजना नाही ...1
- येवला: रेंडाळे ते ममदापूर रस्त्याच्या कडेला एका मादी जातीच्या हरणाचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, हरणाच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. मिळालेल्या माहितीनुसार, रस्त्यावरून जाणाऱ्या प्रवाशांना उशिरा हरणाचा मृतदेह दिसून आला. त्यांनी तात्काळ स्थानिक नागरिकांना व वन्यजीव प्रेमींना याबाबत माहिती दिली. हरणाच्या शरीरावर कोणत्याही जखमांच्या खुणा प्राथमिकदृष्ट्या दिसत नसल्याने, पाण्यासाठीची वणवण किंवा अंतर्गत आजार यामुळे हा मृत्यू झाला असावा, असा अंदाज वर्तवला जात आहे. घटनेची माहिती मिळताच वन विभागाच्या पथकाला पाचारण करण्यात आले आहे. वन अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून, पंचनामा केल्यानंतर हरणाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी हलवण्यात येणार आहे. "विच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होईल," असे वन विभागाकडून सांगण्यात आले. या भागात वन्यप्राण्यांचा वावर मोठा असल्याने त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला1