logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

महावितरणच्या ठाणे शाखेकडून कोकणातील लाखो वीज ग्राहकांना 'पुढील ४८ तासांत स्मार्ट मीटर बसविण्यात येईल' असा धमकीवजा संदेश मिळाल्यानंतर काल अक्षरशः खळबळ उडाली. या दमबाजीच्या सुरामुळे संतप्त नागरिकांनी 'हा महाराष्ट्र आहे की हुकूमशाही?' असा सवाल उपस्थित केला आहे. घरमालकांची परवानगी नसताना, लोकांचा विरोध असताना आणि ग्रामसभा विरोधात ठराव करत असतानाही स्मार्ट मीटरची सक्ती करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप सर्वत्र होत असून, यामुळे जनतेचा रोष आणखी वाढला आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आक्रमक भूमिका घेत थेट महावितरण कार्यालयावर धडक दिली. जनतेच्या भावना आणि हक्कांसाठी शिवसेना रस्त्यावर उतरल्याने प्रशासनातही खळबळ उडाली. यावेळी जिल्हाप्रमुख दत्ताजी कदम यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना थेट इशारा देत सांगितले की, जसा जनतेला ४८ तासांत स्मार्ट मीटर बसवण्याचा दम दिला, तसाच दम आम्हीही देतो; 'तुम्ही ४८ तासांत एक तरी स्मार्ट मीटर बसवून दाखवा, मग पुढे काय होते ते बघू!' या स्पष्ट आणि ठाम भूमिकेमुळे उपस्थित नागरिकांनी समाधान व्यक्त केले. यावेळी तालुकाप्रमुख मयुरेश पाटील, शहरप्रमुख प्रशांत साळुंखे, युवासेना जिल्हाधिकारी प्रसाद सावंत, उपशहरप्रमुख नितीन तळेकर, सलील डाफळे, उपतालुकाप्रमुख विजय देसाई, विभागप्रमुख किरण तोडणकर, शशी बारगोडे, महिला उपजिल्हा संघटक रशिदा गोदड, महिला शहर संघटक सेजल बोराटे, नगरसेविका फौजिया मुजावर यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. दरम्यान, स्मार्ट मीटरबाबत सुरू असलेल्या संभ्रमावर अनेक महत्त्वाचे मुद्दे समोर आले आहेत. केंद्र सरकारच्या नव्या नियमानुसार १ एप्रिल २०२६ पासून ग्राहकांच्या संमतीशिवाय प्रीपेड वीजपुरवठा लादता येणार नाही, असे म्हटले आहे. महावितरणचे संचालक सचिन तळेवार यांनीही नवीन स्मार्ट मीटर पोस्टपेडच राहतील, असे स्पष्ट केले आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सामान्य ग्राहकांवर प्रीपेडची सक्ती करू नये तसेच घर बंद असताना जबरदस्तीने मीटर बदलू नयेत, असे निर्देश दिल्याचे सांगितले जात आहे. मात्र, प्रत्यक्षात गावोगावी वेगळीच परिस्थिती दिसत असून, अनेक ठिकाणी घरमालक अनुपस्थित असताना मीटर बदलण्याचे प्रयत्न, महिलांवर दबाव आणि सक्तीच्या तक्रारी समोर येत असल्याने जनतेमध्ये अस्वस्थता वाढली आहे. शिवसेनेच्या आक्रमक पवित्र्यानंतर आता महावितरण बॅकफूटवर जाणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कोकणातील जनतेने स्मार्ट मीटरच्या सक्तीविरोधात उघडपणे आवाज उठविल्याने हा विषय केवळ वीज मीटरचा राहिलेला नसून, तो आता लोकशाही अधिकारांचा आणि ग्राहकांच्या स्वाभिमानाचा प्रश्न बनला आहे. जनतेसाठी महत्त्वाचे आहे की, स्मार्ट मीटरबाबत आलेल्या ४८ तासांच्या संदेशाला घाबरून जाऊ नका. प्रीपेड व्यवस्था नको असल्यास लेखी अर्ज द्या. जबरदस्ती, दमदाटी किंवा विनापरवानगी मीटर बदलण्याचा प्रयत्न झाल्यास तात्काळ १९१२ या हेल्पलाईनवर तक्रार नोंदवा अथवा स्थानिक लोकप्रतिनिधींशी संपर्क साधा. कोकणातील जनतेचा एकच सवाल आहे: वीज ग्राहकांना ग्राहक म्हणून वागवणार की गुलाम समजून आदेश देणार?

8 hrs ago
user_EXPRESS NEWS
EXPRESS NEWS
Press advisory मिरज, सांगली, महाराष्ट्र•
8 hrs ago
c7475d81-70a7-44a0-b1c8-89fb1c8ff696

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • फार पूर्वीच्या जुन्या पिढीत, पाऊस पडण्यासाठी खेडोपाडी शेतकरी आणि गावकरी 'धोंड्याची मिरवणूक' काढत असत. या मिरवणुकीदरम्यान एक खास गाणे म्हटले जायचे, जे किती भावपूर्ण होते याची कल्पना आजही येते. मात्र, नवीन पिढीला कदाचित या रूढीबद्दल माहिती नसल्याने त्यांना त्यातील खरा आनंद अनुभवता येणार नाही. सध्या जून महिन्याचा मध्यावधी उलटूनही पाऊस न आल्याने, जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी असे भावपूर्ण गाणे ऐकायला नक्कीच आवडेल, ज्यामुळे मन हरखून जाते. यातूनच जुन्या पिढीतील पावसासाठीच्या रूढी आणि परंपरा कशा हळूहळू संपत चालल्या आहेत, हे स्पष्ट होते.
    1
    फार पूर्वीच्या जुन्या पिढीत, पाऊस पडण्यासाठी खेडोपाडी शेतकरी आणि गावकरी 'धोंड्याची मिरवणूक' काढत असत. या मिरवणुकीदरम्यान एक खास गाणे म्हटले जायचे, जे किती भावपूर्ण होते याची कल्पना आजही येते. मात्र, नवीन पिढीला कदाचित या रूढीबद्दल माहिती नसल्याने त्यांना त्यातील खरा आनंद अनुभवता येणार नाही.

सध्या जून महिन्याचा मध्यावधी उलटूनही पाऊस न आल्याने, जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी असे भावपूर्ण गाणे ऐकायला नक्कीच आवडेल, ज्यामुळे मन हरखून जाते. यातूनच जुन्या पिढीतील पावसासाठीच्या रूढी आणि परंपरा कशा हळूहळू संपत चालल्या आहेत, हे स्पष्ट होते.
    user_EXPRESS NEWS
    EXPRESS NEWS
    Press advisory मिरज, सांगली, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • तो विद्यार्थी गुरूजींना विकून येईल. आमदार सुहासभैया बाबर
    1
    तो विद्यार्थी  गुरूजींना विकून येईल. आमदार सुहासभैया बाबर
    user_होनाई न्यूज/सा.माणदेश दर्शन
    होनाई न्यूज/सा.माणदेश दर्शन
    तासगाव, सांगली, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कोल्हापूर जिल्ह्याला भेट दिली. त्यांच्या या दौऱ्यादरम्यान विविध विकासकामांची सुरुवात करण्यात आली.
    1
    केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कोल्हापूर जिल्ह्याला भेट दिली. त्यांच्या या दौऱ्यादरम्यान विविध विकासकामांची सुरुवात करण्यात आली.
    user_E city news network
    E city news network
    Local News Reporter करवीर, कोल्हापूर, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • आंतरराष्ट्रीय योग दिनापूर्वी कोलकाता येथे हावडा ब्रिजजवळ एका विशेष ड्रोन शोचे आयोजन करण्यात आले. या नेत्रदीपक प्रदर्शनामुळे कोलकाताचे आकाश उजळून निघाले. ड्रोन शोमध्ये विविध योग मुद्रा आणि सांस्कृतिक प्रतीके अतिशय सुंदरपणे सादर करण्यात आली, ज्याने हावडा ब्रिज परिसरातील वातावरण उत्साहपूर्ण बनले.
    1
    आंतरराष्ट्रीय योग दिनापूर्वी कोलकाता येथे हावडा ब्रिजजवळ एका विशेष ड्रोन शोचे आयोजन करण्यात आले. या नेत्रदीपक प्रदर्शनामुळे कोलकाताचे आकाश उजळून निघाले. ड्रोन शोमध्ये विविध योग मुद्रा आणि सांस्कृतिक प्रतीके अतिशय सुंदरपणे सादर करण्यात आली, ज्याने हावडा ब्रिज परिसरातील वातावरण उत्साहपूर्ण बनले.
    user_Prime news 83
    Prime news 83
    Solapur South, Maharashtra•
    2 hrs ago
  • मालवणमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन मालवण नगरपरिषद आणि स. का. पाटील महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मालवण बंदर जेटी येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात सहभागी होऊन मार्गदर्शन करताना, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी धकाधकीच्या जीवनशैलीत शारीरिक आणि मानसिक आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी योग हा अत्यंत प्रभावी, सुलभ आणि शाश्वत उपाय असल्याचे प्रतिपादन केले. जिल्हाधिकारी धोडमिसे यांनी पुढे नमूद केले की, योगामुळे शरीर सुदृढ होते, मन प्रसन्न राहते आणि आत्मविश्वासात वाढ होते. निरोगी व सक्षम समाज घडविण्यासाठी प्रत्येकाने योगाला आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनवावा असे आवाहन त्यांनी केले. भारताने जगाला दिलेली योग ही अमूल्य देणगी आज संपूर्ण जगाने स्वीकारली आहे. योग केवळ व्यायामाचा प्रकार नसून, शरीर, मन आणि आत्मा यांचा समतोल साधणारी एक जीवनपद्धती आहे, ज्यामुळे नियमित योगाभ्यासाने विविध आजारांपासून संरक्षण मिळते, मानसिक तणाव कमी होतो आणि सकारात्मक विचारसरणी विकसित होते. समुद्रकिनाऱ्याच्या निसर्गरम्य वातावरणात आयोजित या योग शिबिरात विविध योगासने, सूर्यनमस्कार आणि प्राणायामाची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली, ज्यात विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी आणि योगप्रेमींनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत योगाभ्यासाचा अनुभव घेतला.
    4
    मालवणमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन मालवण नगरपरिषद आणि स. का. पाटील महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मालवण बंदर जेटी येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात सहभागी होऊन मार्गदर्शन करताना, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी धकाधकीच्या जीवनशैलीत शारीरिक आणि मानसिक आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी योग हा अत्यंत प्रभावी, सुलभ आणि शाश्वत उपाय असल्याचे प्रतिपादन केले.

जिल्हाधिकारी धोडमिसे यांनी पुढे नमूद केले की, योगामुळे शरीर सुदृढ होते, मन प्रसन्न राहते आणि आत्मविश्वासात वाढ होते. निरोगी व सक्षम समाज घडविण्यासाठी प्रत्येकाने योगाला आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनवावा असे आवाहन त्यांनी केले. भारताने जगाला दिलेली योग ही अमूल्य देणगी आज संपूर्ण जगाने स्वीकारली आहे. योग केवळ व्यायामाचा प्रकार नसून, शरीर, मन आणि आत्मा यांचा समतोल साधणारी एक जीवनपद्धती आहे, ज्यामुळे नियमित योगाभ्यासाने विविध आजारांपासून संरक्षण मिळते, मानसिक तणाव कमी होतो आणि सकारात्मक विचारसरणी विकसित होते. समुद्रकिनाऱ्याच्या निसर्गरम्य वातावरणात आयोजित या योग शिबिरात विविध योगासने, सूर्यनमस्कार आणि प्राणायामाची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली, ज्यात विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी आणि योगप्रेमींनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत योगाभ्यासाचा अनुभव घेतला.
    user_MH07NEWS
    MH07NEWS
    कुडाळ, सिंधुदुर्ग, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • शरदचंद्रजी पवार यांची नात आणि सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे हिचा विवाह सोहळा नुकताच पार पडला. या खास प्रसंगी राजकारणातील दिग्गज, विविध क्षेत्रांतील उद्योगपती, तसेच बॉलीवूडमधील अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावत नवदाम्पत्याला शुभेच्छा दिल्या.
    1
    शरदचंद्रजी पवार यांची नात आणि सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे हिचा विवाह सोहळा नुकताच पार पडला. या खास प्रसंगी राजकारणातील दिग्गज, विविध क्षेत्रांतील उद्योगपती, तसेच बॉलीवूडमधील अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावत नवदाम्पत्याला शुभेच्छा दिल्या.
    user_Mansoor Shaikh
    Mansoor Shaikh
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • शिर्डीचा प्रसाद घेऊ नका आणि तो घरीही आणू नका, असे आवाहन सध्या केले जात आहे. नेमके हे आवाहन का करण्यात आले आहे, हे पाहण्यासाठी लोकांना सांगितले जात आहे.
    1
    शिर्डीचा प्रसाद घेऊ नका आणि तो घरीही आणू नका, असे आवाहन सध्या केले जात आहे. नेमके हे आवाहन का करण्यात आले आहे, हे पाहण्यासाठी लोकांना सांगितले जात आहे.
    user_होनाई न्यूज/सा.माणदेश दर्शन
    होनाई न्यूज/सा.माणदेश दर्शन
    तासगाव, सांगली, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • भोर तालुक्यातील ऐतिहासिक राजगड किल्ल्यावर पर्यटनासाठी आलेल्या एका तरुणाला बालेकिल्ल्याकडे जात असताना अपघात झाला. जळगाव येथील अविनाश श्रावण बागुल (वय २५) असे या तरुणाचे नाव असून, आपत्ती व्यवस्थापन पथकाने सुमारे दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर त्याला सुखरूप बाहेर काढले. मिळालेल्या माहितीनुसार, अविनाश आपल्या कुटुंबासोबत राजगड दर्शनासाठी आले होते. बालेकिल्ल्याकडे जात असताना त्यांनी मुख्य रहदारीचा मार्ग सोडून चुकून दुसऱ्या वाटेने जाण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे त्यांचा तोल जाऊन ते सुमारे ४५ ते ५० फूट खोल दरीच्या दिशेने घसरले. सुदैवाने, खाली एका मोठ्या झाडाला अडकल्यामुळे आणखी मोठी दुर्घटना टळली, परंतु या अपघातात अविनाश बागुल यांच्या पाठीच्या मणक्याला फ्रॅक्चर झाले असून मान व पायालाही गंभीर दुखापत झाली आहे. घटनेची माहिती मिळताच, पोलीस प्रशासनाने तात्काळ आपत्ती व्यवस्थापन रेस्क्यू पथकाला पाचारण केले. या पथकाने अत्यंत कौशल्य आणि धाडस दाखवत सुमारे दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर अविनाशला यशस्वीपणे रेस्क्यू केले.
    1
    भोर तालुक्यातील ऐतिहासिक राजगड किल्ल्यावर पर्यटनासाठी आलेल्या एका तरुणाला बालेकिल्ल्याकडे जात असताना अपघात झाला. जळगाव येथील अविनाश श्रावण बागुल (वय २५) असे या तरुणाचे नाव असून, आपत्ती व्यवस्थापन पथकाने सुमारे दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर त्याला सुखरूप बाहेर काढले.

मिळालेल्या माहितीनुसार, अविनाश आपल्या कुटुंबासोबत राजगड दर्शनासाठी आले होते. बालेकिल्ल्याकडे जात असताना त्यांनी मुख्य रहदारीचा मार्ग सोडून चुकून दुसऱ्या वाटेने जाण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे त्यांचा तोल जाऊन ते सुमारे ४५ ते ५० फूट खोल दरीच्या दिशेने घसरले. सुदैवाने, खाली एका मोठ्या झाडाला अडकल्यामुळे आणखी मोठी दुर्घटना टळली, परंतु या अपघातात अविनाश बागुल यांच्या पाठीच्या मणक्याला फ्रॅक्चर झाले असून मान व पायालाही गंभीर दुखापत झाली आहे.

घटनेची माहिती मिळताच, पोलीस प्रशासनाने तात्काळ आपत्ती व्यवस्थापन रेस्क्यू पथकाला पाचारण केले. या पथकाने अत्यंत कौशल्य आणि धाडस दाखवत सुमारे दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर अविनाशला यशस्वीपणे रेस्क्यू केले.
    user_पत्रकार विक्रम शिंदे
    पत्रकार विक्रम शिंदे
    Reporter भोर, पुणे, महाराष्ट्र•
    8 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.