Shuru
Apke Nagar Ki App…
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड शहरात पती-पत्नीमध्ये झालेल्या वादातून पतीने आपल्या सासू आणि सासऱ्यावर चाकूने वार केल्याची घटना घडली आहे. घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला आहे. याप्रकरणी सिल्लोड शहर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Sham Thakur
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड शहरात पती-पत्नीमध्ये झालेल्या वादातून पतीने आपल्या सासू आणि सासऱ्यावर चाकूने वार केल्याची घटना घडली आहे. घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला आहे. याप्रकरणी सिल्लोड शहर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- छत्रपती संभाजीनगर येथील अभिजीत दिपके यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला मोठे यश मिळाले असून, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर दिपके यांच्या घरी आज मोठा आनंद साजरा करण्यात आला. या यशानंतर अभिजीत दिपके यांचे आई, वडील आणि भाऊ अत्यंत भावुक झाले असून त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू अनावर झाले. आपल्या भावना व्यक्त करताना अभिजीत यांच्या आई म्हणाल्या की, त्यांच्या मुलाने उभे केलेले हे पहिलेच आंदोलन होते आणि त्याला एवढे मोठे यश मिळाले आहे. या आंदोलनादरम्यान अभिजीत यांच्यावर शाई फेकण्यात आली, त्यांना चापट खावी लागली आणि आंदोलनासाठी डासांमध्ये झोपावे लागले. या सर्व हालअपेष्टानंतर अखेर आंदोलनाला यश मिळाल्याचा अत्यंत आनंद होत असल्याचे सांगताना त्यांच्या आईला पुन्हा एकदा आनंदाश्रू अनावर झाले.2
- दिल्लीत अभिजीत दिपके यांच्या विजयाची घोषणा होताच छत्रपती संभाजीनगर येथील क्रांती चौकात वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष साजरा केला. कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी, घोषणाबाजी करत आणि एकमेकांना मिठाई भरवत आपला आनंद व्यक्त केला. या विजयामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, हा विजय म्हणजे सामाजिक न्यायाच्या लढ्याचे प्रतीक असल्याची भावना यावेळी अनेकांनी व्यक्त केली.1
- केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर जालन्यातील मामा चौकात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जोरदार आनंदोत्सव साजरा करण्यात आला. २५ तारीख शनिवारी संध्याकाळी ५ वाजेच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार, वंचितच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत मामा चौकात फटाक्यांची आतषबाजी केली आणि पेढे वाटून विजयाचा उत्सव साजरा केला. या प्रसंगी डेव्हिड घुमारे यांनी दावा केला की, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला प्रकाश आंबेडकर यांच्या पाठिंब्यामुळेच देशभरातून मोठा प्रतिसाद मिळाला. त्यांनी या संपूर्ण घडामोडीला 'लोकशाही संघर्षाचा विजय' असे संबोधले आहे.1
- फुलंब्री नगरपंचायतीकडून विनापरवाना करण्यात आलेल्या बांधकामांवर बुलडोझर कारवाई करण्यात आली आहे. नगरपंचायतीची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता उभारण्यात आलेल्या अशा अनधिकृत बांधकामांवर नगरपंचायत प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे.1
- पाचोरा येथील कृष्णापुरी परिसरात आषाढी एकादशीच्या निमित्ताने फराळ वाटप करण्यात आले आहे. माऊली ग्रुप आणि बहुळेश्वर ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने या फराळ वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.1
- देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भाजप कार्यकर्त्यांच्या वतीने 'जीवनदायी' उपक्रम राबवण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत गुलमंडी येथे आयोजित कार्यक्रमात भाजप कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने एकत्र येत रक्तदान केले.1
- आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल नामाच्या अखंड गजरात पोलीस कर्मचाऱ्यांनीही हरिनामात तल्लीन होत भक्तिरसाचा अनुभव घेतला. आपले कर्तव्य बजावत असतानाच त्यांनी वारकऱ्यांसोबत टाळ-मृदंगाच्या गजरात उत्साहाने सहभाग नोंदवला. 'माऊली... माऊली'च्या जयघोषात पोलीस कर्मचारीही पूर्णपणे तल्लीन झाले. या भक्तिमय क्षणाने तेथे उपस्थित सर्व भाविकांचे लक्ष वेधून घेतले, ज्यामुळे परिसरात श्रद्धा, सेवा आणि समर्पणाचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला.1
- शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतल्यानंतर अभिजीत दिपके आणि सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला यश मिळाले आहे. या घडामोडींनंतर छत्रपती संभाजीनगरमधील वाळूज औद्योगिक परिसरात असलेल्या अभिजीत दिपके यांच्या निवासस्थानी पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. या ठिकाणी वाढवण्यात आलेल्या पोलीस बंदोबस्ताचा आणि परिस्थितीचा आढावा प्रतिनिधी सचिन बडे यांनी अभिजीत दिपके यांच्या निवासस्थानावरून घेतला आहे.1
- जालना शहरातील वाल्मीक नगर परिसरात लहान मुलांच्या किरकोळ भांडणातून सुरू झालेल्या वादाने भीषण वळण घेतले. या रक्तरंजित संघर्षात १८ वर्षीय अहमद रियाज सय्यद या युवकाचा बळी गेला आहे. या हत्याप्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत सात आरोपींना ताब्यात घेतले आहे, तर एक आरोपी अद्याप फरार आहे. ही घटना रविवारी, १९ तारखेला दुपारच्या सुमारास घडली होती. या प्रकरणात एकूण आठ जणांविरुद्ध खुनासह विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झालेल्या आणि पोलिसांच्या ताब्यात असलेल्या आरोपींमध्ये तीन विधीसंघर्षग्रस्त बालकांचाही समावेश आहे. शनिवारी, २५ तारखेला दुपारी १२ वाजेपर्यंत मिळालेल्या माहितीनुसार पोलीस या प्रकरणी पुढील कारवाई करत असून फरार आरोपीचा शोध घेत आहेत.1