Shuru
Apke Nagar Ki App…
इंडो किड्सच्या विद्यार्थ्यांनी राबविले स्वच्छता अभियान; सवत कडा येथे दिला निसर्गसंवर्धनाचा संदेश महात्मा गांधी जयंती आणि जागतिक वन्यजीव सप्ताहाचे औचित्य साधून कबनूर येथील इंडो किड्स इंग्लिश हायस्कूलच्या एकशे त्रेपन्न विद्यार्थी व शिक्षकांनी केनवडे येथील सवत कडा परिसरात स्वच्छता अभियान राबविले. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना वन्यजीव, जैवविविधता आणि पर्यावरण संवर्धनाबाबत मार्गदर्शन केले.
News reporter मुबारक शेख
इंडो किड्सच्या विद्यार्थ्यांनी राबविले स्वच्छता अभियान; सवत कडा येथे दिला निसर्गसंवर्धनाचा संदेश महात्मा गांधी जयंती आणि जागतिक वन्यजीव सप्ताहाचे औचित्य साधून कबनूर येथील इंडो किड्स इंग्लिश हायस्कूलच्या एकशे त्रेपन्न विद्यार्थी व शिक्षकांनी केनवडे येथील सवत कडा परिसरात स्वच्छता अभियान राबविले. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना वन्यजीव, जैवविविधता आणि पर्यावरण संवर्धनाबाबत मार्गदर्शन केले.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- इंडो किड्सच्या विद्यार्थ्यांनी राबविले स्वच्छता अभियान; सवत कडा येथे दिला निसर्गसंवर्धनाचा संदेश महात्मा गांधी जयंती आणि जागतिक वन्यजीव सप्ताहाचे औचित्य साधून कबनूर येथील इंडो किड्स इंग्लिश हायस्कूलच्या एकशे त्रेपन्न विद्यार्थी व शिक्षकांनी केनवडे येथील सवत कडा परिसरात स्वच्छता अभियान राबविले. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना वन्यजीव, जैवविविधता आणि पर्यावरण संवर्धनाबाबत मार्गदर्शन केले.1
- तासगांवात एकच खळबळ मणेराजुरी येथील 34 वर्षीय तरुण बेपत्ता मणेराजुरी गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विशाल सुखदेव जमदाडे (वय ३४) हे शेतात खत टाकायला जातो सांगून घराबाहेर पडले आणि थेट बेपत्ता झाले. बराच वेळ झाला तरी परत न आल्याने कुटुंबाने शोधाशोध केली, पण मोबाईल बंद लागला. सकाळीही संपर्क होईना, नातेवाईकांकडे चौकशी केली तरी पत्ता लागेना. अखेर कुटुंबाचा संशय बळावला आणि पत्नीने थेट तासगाव पोलिस गाठले. पत्नीने दिलेल्या जबाबात स्पष्ट म्हटले आहे की, माझ्या पतीचे अज्ञात इसमांनी अपहरण केले असावे.या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञातांविरुद्ध अपहरणाचा गुन्हा नोंदवला आहे. विशाल जमदाडे नेमके गेले कुठे? त्यामागे घातपात आहे की आणखी काही? या सर्व बाजूंनी पोलिस तपास सुरू आहे.1
- साखरेचा MSP ₹50 करा; इथेनॉलचा दर ₹75 करा उसाच्या प्रश्नांवर 8 ऑक्टोबरला पुण्यात शरद जोशी विचार मंचाचा मोर्चा साखरेचा MSP ₹50 करा; इथेनॉलचा दर ₹75 करा उसाच्या प्रश्नांवर 8 ऑक्टोबरला पुण्यात शरद जोशी विचार मंचाचा मोर्चा पुणे : ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे केंद्र व राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शरद जोशी विचार मंचच्या वतीने गुरुवार, दि. 8 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता पुणे येथील साखर आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष मा. महेश भाऊ यशवंत खराडे यांनी दिली. साखर उद्योगातील आर्थिक गणित आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून साखरेचा किमान विक्री दर (MSP) सध्याच्या ₹31 प्रति किलोवरून ₹50 प्रति किलो करावा, तसेच इथेनॉलचा दर ₹75 प्रति लिटर करावा, ऊसाला प्रति टन 5 हजार रुपये दर द्यावा अशी प्रमुख मागणी मोर्चाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या अधिकृत माहितीनुसार साखरेचा MSP सध्या ₹31 प्रति किलो आहे. याशिवाय साखर कारखाने 1 नोव्हेंबरनंतरच सुरू करावेत, साखरेची विक्री घरगुती कमी दराने आणि व्यावसायिकविक्री ज्यादा दराने अशा दुहेरी पद्धतीने करण्याची व्यवस्था करावी, ऊसतोडणीसाठी शेतकऱ्यांकडून बेकायदेशीरपणे पैसे मागणाऱ्यांवर खंडणीचे गुन्हे दाखल करावेत, तसेच साखर कारखान्यांमधील वजनकाटे ऑनलाइन करून त्यामध्ये पारदर्शकता आणावी, अशा मागण्याही करण्यात येणार आहेत. ऊसाची रिकव्हरी शेताच्या बांधावर काढून त्या प्रमाणे ऊस दर द्यावा. उसाचे वजन, तोडणी, वाहतूक, साखरेची विक्री, इथेनॉल निर्मिती आणि त्यातून निर्माण होणारे उत्पन्न या संपूर्ण साखळीमध्ये शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य मिळावे, यासाठी पारदर्शक यंत्रणा उभारण्याची मागणीही मोर्चातून करण्यात येणार आहे. महाराष्ट्राच्या साखर क्षेत्रामध्ये साखर आयुक्त कार्यालयाची महत्त्वाची नियामक भूमिका असून, ऊस उत्पादकांना FRP मिळण्याची खात्री करणे आणि साखर कारखान्यांना गाळप परवाने देणे ही त्याची प्रमुख कामे आहेत. मोर्चानंतर केंद्र व राज्य सरकारकडे पाठपुरावा या मोर्चानंतर याच प्रश्नांवर केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच संबंधित केंद्रीय व राज्यस्तरीय मंत्र्यांची भेट घेऊन ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांचा पाठपुरावा करण्यात येणार आहे, असे महेश खराडे यांनी सांगितले. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ठोस निर्णय होईपर्यंत पाठपुरावा सुरू ठेवणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या मोर्चात शेतकरी शेतकरी सेनेचे प्रा जालिंदर पाटील, जय शिवराय संघटनेचे शिवाजी माने, भाजपा किसान मोर्चाचे पृथ्वीराज पवार, भगवान काटे आदी उपस्थित राहणार आहेत.1
- कवठे महांकाळ पंचायत समिती सदस्य अर्जुन करपे यांनी मांडले आपले मत कवठे महांकाळ पंचायत समितीचे सदस्य अर्जुन करपे यांनी विविध स्थानिक प्रश्नांवर आपले मत मांडले. तालुक्यातील नागरिकांच्या समस्या, विकासकामे तसेच सर्वसामान्यांच्या अडचणी याबाबत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन संबंधित विषय प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे अर्जुन करपे यांनी यावेळी सांगितले. कवठे महांकाळ पंचायत समिती सदस्य अर्जुन करपे यांनी मांडले आपले मत कवठे महांकाळ पंचायत समितीचे सदस्य अर्जुन करपे यांनी विविध स्थानिक प्रश्नांवर आपले मत मांडले. तालुक्यातील नागरिकांच्या समस्या, विकासकामे तसेच सर्वसामान्यांच्या अडचणी याबाबत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन संबंधित विषय प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे अर्जुन करपे यांनी यावेळी सांगितले.4
- केरळ नदीला पाणी कसलं नाही पाणी सोडायला सरकारांना माझी एवढीच विनंती की पाणी सोडा शेतकऱ्यांच्या सगळे तिथे सगळे सरकारला एवढी विनंती आहे की ला पाणी सोडावे लागेल सरकार माझे एवढे जीवनातील केरळा नदी पाणी कसलं नाही पाणी सोडावा लागेल1
- नाना पाटेकर काळाच्या पडद्याआड; लाखो मनांचा लाडका कलाकार हरपला! आपल्या भाषेच्या शैलीने आणि दमदार अभिनयाने लाखो मनं जिंकणाऱ्या नाना पाटेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली. मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाची वेगळी छाप उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. दमदार संवादफेक, प्रभावी अभिनय आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्वामुळे त्यांनी असंख्य प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले. ‘नटसम्राट’सह अनेक गाजलेल्या भूमिकांमधून त्यांनी आपल्या अभिनयाची ताकद सिद्ध केली. अभिनयासोबतच सामाजिक कार्यातही त्यांनी योगदान दिले. त्यांच्या जाण्याने भारतीय चित्रपटसृष्टीची मोठी हानी झाली आहे. “असा नट पुन्हा होणे नाही…” नाना पाटेकर यांच्या स्मृतींना भावपूर्ण श्रद्धांजली! 🙏💐 पोलीस फ्लॅश न्यूज | तपास 24 न्यूज1
- भोर तालुक्यातील आंबवडेत वन्यजीव सप्ताहनिमित्याने चित्रकला स्पर्धेचे आयोजन ;सहायक वनसंरक्षक शीतल राठोड उपस्थित वन्यजीव सप्ताहात चित्रकला स्पर्धा व पर्यावरण गौरव समारंभ आंबवडे च्या नागेश्वर विद्यालय मध्ये संपन्न विक्रम शिंदे /भोर, दि. 8 ऑक्टोबर २०२६ : महाराष्ट्र वनविभाग, भोर यांच्या वतीने वन्यजीव सप्ताह २०२६ अंतर्गत चित्रकला स्पर्धा बक्षीस वितरण व पर्यावरण गौरव समारंभ उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहाय्यक वनसंरक्षक श्रीमती शीतल राठोड, तर प्रमुख पाहुणे वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. शिवाजी राऊत होते. प्रस्तावना वनपरिमंडळ अधिकारी श्री. रोहन इंगवले यांनी केली. चित्रकला स्पर्धेत नागेश्वर विद्यालय, आंबावडे येथील मृण्मयी नितीन जेधे, वैष्णवी विनायक शेडगे व तनिष्का जितेंद्र देवघरे यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला. वीर बाजी प्रभू देशपांडे विद्यालय, शिंद येथील जान्हवी तानाजी दुधाणे, आर्या नवनाथ खुटवड व सिमरन उस्मान शेख यांनीही अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. यावेळी बार्न आऊल बर्डिंग ग्रुप, पिसावरे, सर्पमित्र श्री. तबरेज खान व निसर्गकवी श्री. लक्ष्मण शिंदे यांचा वन, वन्यजीव व पर्यावरण संवर्धनातील कार्याबद्दल सन्मानपत्र व ट्रॉफी देऊन गौरव करण्यात आला. नागेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. सुनील थोपटे यांनी मनोगत व्यक्त केले. मान्यवरांनी निसर्ग व वन्यजीव संवर्धनासाठी जनजागृतीची गरज व्यक्त केली. कार्यक्रमात प्रमुख पाहुणे श्री. शिवाजी राऊत, वनपरिक्षेत्र अधिकारी, भोर यांनी वन, वन्यजीव व पर्यावरण संवर्धनासाठी विद्यार्थ्यांनी आणि नागरिकांनी सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष श्रीमती शीतल राठोड, सहाय्यक वनसंरक्षक, भोर यांनी अध्यक्षीय विचार व्यक्त करताना निसर्ग संवर्धन, वन्यजीव संरक्षण आणि पर्यावरणपूरक जीवनशैली याबाबत विद्यार्थ्यांमध्ये सातत्याने जनजागृती होणे आवश्यक असल्याचे सांगितले. “निसर्ग वाचवा, वन्यजीव वाचवा, पर्यावरणाचे संरक्षण करा” हा संदेश देत कार्यक्रमाची सांगता झाली.1
- मजलेतील मुरूम उत्खननाविरोधात सागर लाखे यांचे लाक्षणिक उपोषण; प्रांताधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर स्थगित मजले येथील गट क्रमांक सहाशे ब्याऐंशीमधील कथित बेकायदेशीर मुरूम उत्खननाविरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए)च्या वतीने प्रांताधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले. प्रांताधिकाऱ्यांनी कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर उपोषण स्थगित करण्यात आले. कारवाई न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.1