logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

शेतकरी, महिला-बालकांसह अन्नसुरक्षेला प्राधान्य - पालकमंत्री नरहरी झिरवाळ औंढा नागनाथ विकास आराखड्यास १९३ कोटी ५५ लाखांची मान्यता विविध विकासकामांसह जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासावर भर हिंगोली: देशातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी आठवे ज्योतिर्लिंग असलेले औंढा नागनाथ मंदिर हिंगोली जिल्ह्याचे धार्मिक व ऐतिहासिक वैभव आहे. या मंदिराच्या विकास आराखड्यास दोन टप्प्यात एकूण १९३ कोटी ५५ लाख रुपयांच्या सुधारित विकास आराखड्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीने मान्यता दिली आहे. या माध्यमातून मंदिर व परिसरातील मंदिरांचे संवर्धन व जीर्णोद्धार करण्यात येणार आहे. भाविकांना आधुनिक सुविधा उपलब्ध करून देतानाच जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला चालना देण्यासह जिल्ह्यातील विविध विकासकामांवर भर देणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न व औषध प्रशासन, विशेष सहाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी केले. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या 78 व्या वर्धापन दिनानिमित्त येथील अण्णासाहेब टाकळगव्हाणकर बाल उद्यानातील हुतात्मा स्मारक स्मृतिस्तंभ येथे आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ प्रसंगी पालकमंत्री नरहरी झिरवाळ बोलत होते. यावेळी ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिकांचे कुटुंबीय श्रीमती मालतीबाई पैठणकर, आमदार संतोष बांगर, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, पोलीस अधीक्षक डॉ. श्रेणिक लोढा, अपर जिल्हाधिकारी महेंद्र काबंळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड यांच्यासह सर्व जिल्हा प्रशासनातील विभागप्रमुख उपस्थित होते. स्वातंत्र्यानंतरही देशातील काश्मीर, जुनागढ आणि हैद्राबाद ही संस्थाने विलीन झाली नव्हती. हैद्राबाद संस्थानातून मराठवाडा मुक्त करण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली मुक्ती संग्रामाचा लढा सुरु झाला होता. मराठवाड्याच्या गावा-गावातून हा लढा अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी शौर्याने लढला. भारताच्या प्रादेशिक अखंडतेचा हा लढा होता. सतत 13 महिन्यांच्या आंदोलनात अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी प्राणांची आहुती दिली. त्यातून आजचा हा दिवस 17 सप्टेंबर, 1948 रोजी निजामाच्या जोखडातून मराठवाडा मुक्त झाल्याने पाहता आला. या मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचा 78 वा वर्धापन दिन आज मराठवाड्यात सर्वत्र उत्साहाने साजरा होत आहे. याबाबत पालकमंत्री यांनी जनेतला शुभेच्छा दिल्या. राष्ट्रीय पोषण माह-२०२५ मध्ये हिंगोली जिल्ह्याने महाराष्ट्रातून द्वितीय क्रमांक मिळविला आहे. महिला व बालकल्याण विभागातील अधिकारी, कर्मचारी, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या नियोजनबद्ध प्रयत्नातून पोषण, मातृ-बाल आरोग्य, स्वच्छता व बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात आले. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल महिला व बाल विकास मंत्री अदितीताई तटकरे यांच्या हस्ते हिंगोली जिल्ह्याचा गौरव करण्यात आला याबाबत पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी कौतुक केले. कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा जातीचे प्रमाणपत्र वितरणाची कार्यवाही जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. आतापर्यंत 13 हजारांहून अधिक प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले असून, आजअखेर जिल्ह्यात झिरो पेंडन्सी आहे. जिल्हा प्रशासनामार्फत ही कार्यवाही दक्षतेने सुरू असल्याची माहिती पालकमंत्री श्री. झिरवाळ यांनी दिली. तसेच अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या विविध कर्ज व्याज परतावा योजनेंतर्गत 1 हजार 343 लाभार्थ्यांना विविध बँकांमार्फत 96 कोटी 23 लाख रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आले आहे. यापैकी 12 कोटी 43 लाख रुपये व्याज परतावा डीबीटी प्रणालीद्वारे लाभार्थ्यांच्या नोंदणीकृत बँक खात्यात जमा करण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली. अल निनोच्या पार्श्वभूमीवर खरीप हंगाम 2026 साठी पीक कापणी प्रयोगांना गती देण्यात आली आहे. जिल्ह्यात मूग व उडिद पिकांचे पीक कापणी प्रयोग प्रशासकीय पातळीवर सुरू असून, सोयाबीन पिकाचे पीक कापणी प्रयोग सप्टेंबरअखेर सुरू करण्यात येणार आहेत. DCS MH ॲपद्वारे शेतकऱ्यांना स्वतः पीक नोंदणीची सुविधा उपलब्ध झाली असून पीक नोंदणी प्रक्रिया सुलभ, पारदर्शक व जलद होणार असून, शासकीय योजना, अनुदान व विविध सेवांचा लाभ देण्यासाठी ही माहिती उपयुक्त ठरणार आहे. तरी जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची अचूक व वेळेत नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन पालकमंत्री श्री. झिरवाळ यांनी केले. *पांगरा शिंदे येथे राष्ट्रीय भूकंपमापन केंद्र कार्यान्वित* जिल्ह्यातील भूकंपाच्या धक्क्यांची अचूक नोंद व वैज्ञानिक अभ्यासासाठी पांगरा शिंदे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात राष्ट्रीय भूकंपमापन केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे. अत्याधुनिक यंत्रणेद्वारे भूकंपाची माहिती रिअल टाइममध्ये नवी दिल्ली येथील राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राकडे पाठविली जाणार असून, केंद्र २४ तास कार्यरत राहणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत हिंगोली जिल्ह्यातील 42 हजार 612 शेतकऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण झाली असून, उर्वरित पात्र लाभार्थी शेतकऱ्यांनी फार्मर आयडीसह ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. *एपीएल केशरी शिधापत्रिकाधारकांना ३ कोटी २० लाखांची रक्कम वितरित* हिंगोली जिल्ह्यात एपीएल केशरी शिधापत्रिकाधारकांसाठी अन्नधान्याऐवजी रोख रक्कम हस्तांतरणाची योजना राबविण्यात येत आहे. सन २०२६-२७ मध्ये जिल्ह्यातील ३४ हजार ९३४ एपीएल शिधापत्रिकाधारकांपैकी १७ हजार लाभार्थ्यांच्या खात्यावर आतापर्यंत ३ कोटी २० लाख ३७ हजार रुपये वितरित करण्यात आले आहेत. उर्वरित पात्र लाभार्थ्यांना रक्कम मिळावी, यासाठी कार्यवाही सुरु असल्याची माहिती पालकमंत्री श्री. झिरवाळ यांनी दिली. कार्यक्रमाच्या सुरवातीला पालकमंत्री महोदयांच्या हस्ते हुतात्मा स्तंभास सलामी देवून पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. ध्वजारोहनानंतर पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी स्वातंत्र्यसैनिक व त्यांच्या नातेवाईकांची भेट घेत शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांच्या हस्ते विविध पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी वंदे मातरम, राष्ट्रगीत, राज्यगीत गायले.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन पंडीत अवचार यांनी केले. यावेळी पालकमंत्री श्री. झिरवाळ यांच्या हस्ते जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळा, चिंचोली ता.जि.हिंगोली येथील शाळेचे विद्यार्थी अनिकेत गणेश उचितकर यांचा एमबीबीएस साठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथे निवड झाल्याबाबत सन्मान करण्यात आला. प्रधानमंत्री विश्वकर्मा सन्मान योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना प्रमाणपत्र, टुलकिट वाटप व कर्ज मंजूरी पत्राचे वाटप पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये सेनगाव तालुक्यातील बाबुळगाव येथील आकाश हनवते, स्वाती विजय लाटे, प्रिंयका बबन डाकोरे, दत्तराव माधव हनवते, रामा दगडु बलखंडे यांचा प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.

7 hrs ago
user_दिपक हैबतराव चोरमले
दिपक हैबतराव चोरमले
Local Politician Aundha (Nagnath), Hingoli•
7 hrs ago
f4b03be6-47a9-4e85-be22-3f17e0e26b63

शेतकरी, महिला-बालकांसह अन्नसुरक्षेला प्राधान्य - पालकमंत्री नरहरी झिरवाळ औंढा नागनाथ विकास आराखड्यास १९३ कोटी ५५ लाखांची मान्यता विविध विकासकामांसह जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासावर भर हिंगोली: देशातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी आठवे ज्योतिर्लिंग असलेले औंढा नागनाथ मंदिर हिंगोली जिल्ह्याचे धार्मिक व ऐतिहासिक वैभव आहे. या मंदिराच्या विकास आराखड्यास दोन टप्प्यात एकूण १९३ कोटी ५५ लाख रुपयांच्या सुधारित विकास आराखड्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीने मान्यता दिली आहे. या माध्यमातून मंदिर व परिसरातील मंदिरांचे संवर्धन व जीर्णोद्धार करण्यात येणार आहे. भाविकांना आधुनिक सुविधा उपलब्ध करून देतानाच जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला चालना देण्यासह जिल्ह्यातील विविध विकासकामांवर भर देणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न व औषध प्रशासन, विशेष सहाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी केले. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या 78 व्या वर्धापन दिनानिमित्त येथील अण्णासाहेब टाकळगव्हाणकर बाल उद्यानातील हुतात्मा स्मारक स्मृतिस्तंभ येथे आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ प्रसंगी पालकमंत्री नरहरी झिरवाळ बोलत होते. यावेळी ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिकांचे कुटुंबीय श्रीमती मालतीबाई पैठणकर, आमदार संतोष बांगर, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, पोलीस अधीक्षक डॉ. श्रेणिक लोढा, अपर जिल्हाधिकारी महेंद्र काबंळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड यांच्यासह सर्व जिल्हा प्रशासनातील विभागप्रमुख उपस्थित होते. स्वातंत्र्यानंतरही देशातील काश्मीर, जुनागढ आणि हैद्राबाद ही संस्थाने विलीन झाली नव्हती. हैद्राबाद संस्थानातून मराठवाडा मुक्त करण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली मुक्ती संग्रामाचा लढा

ea352fcf-0aac-43cd-9287-55f6038ea11f

सुरु झाला होता. मराठवाड्याच्या गावा-गावातून हा लढा अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी शौर्याने लढला. भारताच्या प्रादेशिक अखंडतेचा हा लढा होता. सतत 13 महिन्यांच्या आंदोलनात अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी प्राणांची आहुती दिली. त्यातून आजचा हा दिवस 17 सप्टेंबर, 1948 रोजी निजामाच्या जोखडातून मराठवाडा मुक्त झाल्याने पाहता आला. या मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचा 78 वा वर्धापन दिन आज मराठवाड्यात सर्वत्र उत्साहाने साजरा होत आहे. याबाबत पालकमंत्री यांनी जनेतला शुभेच्छा दिल्या. राष्ट्रीय पोषण माह-२०२५ मध्ये हिंगोली जिल्ह्याने महाराष्ट्रातून द्वितीय क्रमांक मिळविला आहे. महिला व बालकल्याण विभागातील अधिकारी, कर्मचारी, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या नियोजनबद्ध प्रयत्नातून पोषण, मातृ-बाल आरोग्य, स्वच्छता व बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात आले. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल महिला व बाल विकास मंत्री अदितीताई तटकरे यांच्या हस्ते हिंगोली जिल्ह्याचा गौरव करण्यात आला याबाबत पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी कौतुक केले. कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा जातीचे प्रमाणपत्र वितरणाची कार्यवाही जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. आतापर्यंत 13 हजारांहून अधिक प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले असून, आजअखेर जिल्ह्यात झिरो पेंडन्सी आहे. जिल्हा प्रशासनामार्फत ही कार्यवाही दक्षतेने सुरू असल्याची माहिती पालकमंत्री श्री. झिरवाळ यांनी दिली. तसेच अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या विविध कर्ज व्याज परतावा योजनेंतर्गत 1 हजार 343 लाभार्थ्यांना विविध बँकांमार्फत 96 कोटी 23 लाख रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आले आहे. यापैकी 12 कोटी 43 लाख रुपये व्याज परतावा डीबीटी प्रणालीद्वारे लाभार्थ्यांच्या नोंदणीकृत बँक खात्यात जमा करण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली. अल निनोच्या पार्श्वभूमीवर खरीप हंगाम 2026 साठी पीक कापणी प्रयोगांना गती देण्यात आली आहे. जिल्ह्यात मूग व उडिद पिकांचे पीक कापणी प्रयोग प्रशासकीय पातळीवर सुरू असून, सोयाबीन पिकाचे पीक कापणी प्रयोग सप्टेंबरअखेर सुरू करण्यात येणार आहेत. DCS MH ॲपद्वारे शेतकऱ्यांना स्वतः पीक नोंदणीची सुविधा उपलब्ध झाली असून पीक नोंदणी प्रक्रिया सुलभ, पारदर्शक व जलद होणार असून, शासकीय योजना, अनुदान व विविध सेवांचा लाभ देण्यासाठी ही माहिती उपयुक्त ठरणार

d898911b-2ebf-4ec7-90c8-195be1b2f0ff

आहे. तरी जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची अचूक व वेळेत नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन पालकमंत्री श्री. झिरवाळ यांनी केले. *पांगरा शिंदे येथे राष्ट्रीय भूकंपमापन केंद्र कार्यान्वित* जिल्ह्यातील भूकंपाच्या धक्क्यांची अचूक नोंद व वैज्ञानिक अभ्यासासाठी पांगरा शिंदे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात राष्ट्रीय भूकंपमापन केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे. अत्याधुनिक यंत्रणेद्वारे भूकंपाची माहिती रिअल टाइममध्ये नवी दिल्ली येथील राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राकडे पाठविली जाणार असून, केंद्र २४ तास कार्यरत राहणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत हिंगोली जिल्ह्यातील 42 हजार 612 शेतकऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण झाली असून, उर्वरित पात्र लाभार्थी शेतकऱ्यांनी फार्मर आयडीसह ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. *एपीएल केशरी शिधापत्रिकाधारकांना ३ कोटी २० लाखांची रक्कम वितरित* हिंगोली जिल्ह्यात एपीएल केशरी शिधापत्रिकाधारकांसाठी अन्नधान्याऐवजी रोख रक्कम हस्तांतरणाची योजना राबविण्यात येत आहे. सन २०२६-२७ मध्ये जिल्ह्यातील ३४ हजार ९३४ एपीएल शिधापत्रिकाधारकांपैकी १७ हजार लाभार्थ्यांच्या खात्यावर आतापर्यंत ३ कोटी २० लाख ३७ हजार रुपये वितरित करण्यात आले आहेत. उर्वरित पात्र लाभार्थ्यांना रक्कम मिळावी, यासाठी कार्यवाही सुरु असल्याची माहिती पालकमंत्री श्री. झिरवाळ यांनी दिली. कार्यक्रमाच्या सुरवातीला पालकमंत्री महोदयांच्या हस्ते हुतात्मा स्तंभास सलामी देवून पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. ध्वजारोहनानंतर पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी स्वातंत्र्यसैनिक व त्यांच्या नातेवाईकांची भेट घेत शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांच्या हस्ते विविध पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी वंदे मातरम, राष्ट्रगीत, राज्यगीत गायले.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन पंडीत अवचार यांनी केले. यावेळी पालकमंत्री श्री. झिरवाळ यांच्या हस्ते जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळा, चिंचोली ता.जि.हिंगोली येथील शाळेचे विद्यार्थी अनिकेत गणेश उचितकर यांचा एमबीबीएस साठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथे निवड झाल्याबाबत सन्मान करण्यात आला. प्रधानमंत्री विश्वकर्मा सन्मान योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना प्रमाणपत्र, टुलकिट वाटप व कर्ज मंजूरी पत्राचे वाटप पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये सेनगाव तालुक्यातील बाबुळगाव येथील आकाश हनवते, स्वाती विजय लाटे, प्रिंयका बबन डाकोरे, दत्तराव माधव हनवते, रामा दगडु बलखंडे यांचा प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • धानोरा (जहाँगीर) येथे ७९ व्या मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त ध्वजारोहण मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या ७९ व्या दिनानिमित्त धानोरा (जहाँगीर) ता.कळमनुरी जि.हिंगोली येथील ग्रामपंचायत कार्यालयात तंटामुक्ती अध्यक्ष प्रफुल्ल पाईकराव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.तसेच ॲड.रवि शिंदे यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी,भारतीय संविधानाचे शिल्पकार विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, शहीद-ए-आजम भगतसिंग यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच तेथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गावचे चेअरमन बंडू कोरडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपसरपंच टोपाजी पोटे, सहशिक्षक भुरके,मगरे, यांच्या सह बाबुराव मस्के,मोतीराम मोरे, मुंजाजी बर्गे,सुभाष सरडे,निस्सारखॉं पठाण,भीमराव पाईकराव,विश्वनाथ जाधव, साहेबराव डोंगरे,कैलास सापनार, रमेश ढबाले,दिनकर पाईकराव,प्रदीप बरडे, सुभाष सापनार,मारोती कोरडे,नामदेव शिंदे ,प्रकाश भुजंगळे, सुहास मस्के,सलीम पठाण,कृष्णा पोटे,गौतम ढबाले, प्रमोद पाईकराव,फैजान पठाण, आकाश पाईकराव,प्रमोद डोंगरे, संदीप पाईकराव,समाधान पाईकराव,शुभम मुळे,हर्षद पाईकराव,अंगणवाडी कर्मचारी फमीदा बेगम,सौ.शोभा चिरमाडे, सौ.नाजुका डोंगरे,रोजगार सेवक सुनील पाईकराव, ग्रामपंचायत सेवक संभा पोटे,संतोष चिरमाडे यांच्यासह ग्रामस्थ तसेच विद्यार्थीची मोठ्या संख्येने उपस्थिती होती .
    1
    धानोरा (जहाँगीर) येथे ७९ व्या मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त  ध्वजारोहण
मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या ७९ व्या दिनानिमित्त धानोरा (जहाँगीर) ता.कळमनुरी जि.हिंगोली येथील ग्रामपंचायत कार्यालयात तंटामुक्ती अध्यक्ष प्रफुल्ल पाईकराव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.तसेच ॲड.रवि शिंदे यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी,भारतीय संविधानाचे शिल्पकार विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, शहीद-ए-आजम भगतसिंग यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. 
तसेच तेथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गावचे चेअरमन बंडू कोरडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. 
यावेळी उपसरपंच टोपाजी पोटे, सहशिक्षक भुरके,मगरे, यांच्या सह बाबुराव मस्के,मोतीराम मोरे, मुंजाजी बर्गे,सुभाष सरडे,निस्सारखॉं पठाण,भीमराव पाईकराव,विश्वनाथ जाधव, साहेबराव डोंगरे,कैलास सापनार, रमेश ढबाले,दिनकर पाईकराव,प्रदीप बरडे, सुभाष सापनार,मारोती कोरडे,नामदेव शिंदे ,प्रकाश भुजंगळे, सुहास मस्के,सलीम पठाण,कृष्णा पोटे,गौतम ढबाले, प्रमोद पाईकराव,फैजान पठाण, आकाश पाईकराव,प्रमोद डोंगरे, संदीप पाईकराव,समाधान पाईकराव,शुभम मुळे,हर्षद पाईकराव,अंगणवाडी कर्मचारी फमीदा बेगम,सौ.शोभा चिरमाडे, सौ.नाजुका डोंगरे,रोजगार सेवक सुनील पाईकराव, ग्रामपंचायत सेवक संभा पोटे,संतोष चिरमाडे यांच्यासह ग्रामस्थ तसेच  विद्यार्थीची मोठ्या संख्येने उपस्थिती होती .
    user_Shankar mulgir
    Shankar mulgir
    Reporter कळमनुरी, हिंगोली, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • देशभक्तीपर गीतांच्या वातावरणात कोळसा येथे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा! "विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी सुविधांची कमतरता पडू देणार नाही"-संस्थेचे अध्यक्ष श्री भास्करराव बेंगाळ यांचे आश्वासन! सेनगाव/विश्वनाथ देशमुख तालुक्यातील कोळसा येथील विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ संचलित विद्यालयात दि.१७ सप्टेंबर गुरुवार रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन अत्यंत उत्साहात आणि देशभक्तीपर वातावरणात साजरा करण्यात आला.विविध अभिनव उपक्रम,सांगीतिक प्रबोधन आणि विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागाने या सोहळ्याला विशेष रंगत आणली.संस्थेचे अध्यक्ष भास्करराव बेंगाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ठीक ८:०० वाजता संस्थेचे अध्यक्ष श्री.भास्करराव बेंगाळ यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहणाने झाली.यावेळी राष्ट्रध्वजाला सलामी देत राष्ट्रगीत आणि देशभक्तीपर घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.५ सप्टेंबर शिक्षकदिनी स्वयंशासन दिनाचा उपक्रम राबविण्यात आला होता.यामध्ये मुख्याध्यापक म्हणून कु.पूनम धोंडगे आणि उपमुख्याध्यापक म्हणून सौरभ बिडगर यांनी विद्यालयाचा प्रशासकीय प्रभार अत्यंत उत्कृष्टपणे सांभाळला.या दोन्ही विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाचे आणि कौशल्याचे कौतुक करत संस्थेच्या वतीने व्यासपीठावर त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात केकत उंबरा (जि. वाशिम) येथील चेतन सेवांकुर म्युझिकल ऑर्केस्ट्रा ग्रुप यांच्या देशभक्तीपर गीतांच्या बहारदार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यांनी सादर केलेल्या एकापेक्षा एक सरस देशभक्तीपर गीतांनी उपस्थितांची मने जिंकली.तसेच शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देऊन सेवानिवृत्त झालेल्या मान्यवरांचाही यावेळी संस्थेच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला.या सोहळ्याला सेनगाव पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी पी.के.गव्हाणे, केंद्रप्रमुख डी.आर.पायघन आणि शाखा अभियंता टी. व्ही. पिनगाळे आदी मान्यवरांचा सेवानिवृत्तीबद्दल सत्कार करण्यात आला.तसेच व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष भास्करराव बेंगाळ,सचिव अंकुशराव बेंगाळ,उपाध्यक्षा सौ.आनंदीताई बेंगाळ,प्राचार्य अभिषेकभैया बेंगाळ,मुख्याध्यापक व्ही. एम.सरकटे,मुख्याध्यापक आर.बी.शिंदे,पर्यवेक्षक पी.पी.कसाब,परीक्षा विभागप्रमुख चोपडे सर, नर्सिंग कॉलेज,बीसीए व फार्मसी कॉलेजचे प्राचार्य, तसेच केशवराव कापसे, पांडुरंग मोहिते,प्रितेश शिंदे व श्री.भोपाळे सर आदी मान्यवर उपस्थित होते.प्रमुख व्याख्यात्या ह.भ.प. कुमारी भाग्यश्री मोहिते (परभणी) यांनी आपल्या ओजस्वी वाणीतून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या आदर्श राज्यकारभाराचे आणि राजमाता जिजाऊंच्या कर्तृत्वाचा प्रेरणादायी इतिहास मांडला. "मुला-मुलींनी निष्ठेने राहून समाज व देशाची सेवा करावी," असा मौल्यवान संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.अध्यक्षीय भाषणात संस्थेचे अध्यक्ष श्री.भास्करराव बेंगाळ यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.ते म्हणाले की,"संस्थेमध्ये विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासाठी सर्व आवश्यक भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि प्रगतीसाठी सुविधांची कमतरता कधीही पडू देणार नाही.यापुढेही आणखी काही आधुनिक व हायटेक सुविधा संस्थेच्या वतीने उपलब्ध करून दिल्या जातील,"असे ठाम आश्वासन त्यांनी यावेळी दिले.आर.बी.शिंदे यांनी केले उत्कृष्ट सूत्रसंचालन या संपूर्ण सोहळ्याचे अत्यंत नेटके आणि बहारदार सूत्रसंचालन मुख्याध्यापक आर.बी.शिंदे यांनी केले. कार्यक्रमाला संस्थेचे सर्व पदाधिकारी,प्राध्यापक, शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि कोळसा परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.विद्यालयाच्या वतीने सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
    2
    देशभक्तीपर गीतांच्या वातावरणात कोळसा येथे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा! "विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी सुविधांची कमतरता पडू देणार नाही"-संस्थेचे अध्यक्ष श्री भास्करराव बेंगाळ यांचे आश्वासन!
सेनगाव/विश्वनाथ देशमुख 
तालुक्यातील कोळसा येथील विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ संचलित विद्यालयात दि.१७ सप्टेंबर गुरुवार रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन अत्यंत उत्साहात आणि देशभक्तीपर वातावरणात साजरा करण्यात आला.विविध अभिनव उपक्रम,सांगीतिक प्रबोधन आणि विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागाने या सोहळ्याला विशेष रंगत आणली.संस्थेचे अध्यक्ष भास्करराव बेंगाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ठीक ८:०० वाजता संस्थेचे अध्यक्ष श्री.भास्करराव बेंगाळ यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहणाने झाली.यावेळी राष्ट्रध्वजाला सलामी देत राष्ट्रगीत आणि देशभक्तीपर घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.५ सप्टेंबर शिक्षकदिनी स्वयंशासन दिनाचा उपक्रम राबविण्यात आला होता.यामध्ये मुख्याध्यापक म्हणून कु.पूनम धोंडगे आणि उपमुख्याध्यापक म्हणून सौरभ बिडगर यांनी विद्यालयाचा प्रशासकीय प्रभार अत्यंत उत्कृष्टपणे सांभाळला.या दोन्ही विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाचे आणि कौशल्याचे कौतुक करत संस्थेच्या वतीने व्यासपीठावर त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमात केकत उंबरा (जि. वाशिम) येथील चेतन सेवांकुर म्युझिकल ऑर्केस्ट्रा ग्रुप यांच्या देशभक्तीपर गीतांच्या बहारदार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यांनी सादर केलेल्या एकापेक्षा एक सरस देशभक्तीपर गीतांनी उपस्थितांची मने जिंकली.तसेच शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देऊन सेवानिवृत्त झालेल्या मान्यवरांचाही यावेळी संस्थेच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला.या सोहळ्याला सेनगाव पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी पी.के.गव्हाणे, केंद्रप्रमुख डी.आर.पायघन आणि शाखा अभियंता टी. व्ही. पिनगाळे आदी मान्यवरांचा सेवानिवृत्तीबद्दल सत्कार करण्यात आला.तसेच व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष भास्करराव बेंगाळ,सचिव अंकुशराव बेंगाळ,उपाध्यक्षा सौ.आनंदीताई बेंगाळ,प्राचार्य अभिषेकभैया बेंगाळ,मुख्याध्यापक व्ही. एम.सरकटे,मुख्याध्यापक आर.बी.शिंदे,पर्यवेक्षक पी.पी.कसाब,परीक्षा विभागप्रमुख चोपडे सर, नर्सिंग कॉलेज,बीसीए व फार्मसी कॉलेजचे प्राचार्य, तसेच केशवराव कापसे, पांडुरंग मोहिते,प्रितेश शिंदे व श्री.भोपाळे सर आदी मान्यवर उपस्थित होते.प्रमुख व्याख्यात्या ह.भ.प. कुमारी भाग्यश्री मोहिते (परभणी) यांनी आपल्या ओजस्वी वाणीतून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या आदर्श राज्यकारभाराचे आणि राजमाता जिजाऊंच्या कर्तृत्वाचा प्रेरणादायी इतिहास मांडला. "मुला-मुलींनी निष्ठेने राहून समाज व देशाची सेवा करावी," असा मौल्यवान संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.अध्यक्षीय भाषणात संस्थेचे अध्यक्ष श्री.भास्करराव बेंगाळ यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.ते म्हणाले की,"संस्थेमध्ये विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासाठी सर्व आवश्यक भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि प्रगतीसाठी सुविधांची कमतरता कधीही पडू देणार नाही.यापुढेही आणखी काही आधुनिक व हायटेक सुविधा संस्थेच्या वतीने उपलब्ध करून दिल्या जातील,"असे ठाम आश्वासन त्यांनी यावेळी दिले.आर.बी.शिंदे यांनी केले उत्कृष्ट सूत्रसंचालन
या संपूर्ण सोहळ्याचे अत्यंत नेटके आणि बहारदार सूत्रसंचालन मुख्याध्यापक आर.बी.शिंदे यांनी केले. कार्यक्रमाला संस्थेचे सर्व पदाधिकारी,प्राध्यापक, शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि कोळसा परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.विद्यालयाच्या वतीने सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
    user_Vishwanath Deshmukh
    Vishwanath Deshmukh
    सेनगाव, हिंगोली, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • इतिहास प्रसिद्ध आजेगाव येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात साजरा सेनगाव तालुक्यातील आजेगाव या ठिकाणी आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिन मोठ्या उत्साहात साजरा करून मराठवाडा मुक्ती संग्रामात शहीद झालेल्या शूरवीर जवानांना विनम्र अभिवादन करण्यात आले. मराठवाडा निजामाच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी मराठवाड्यात मोठा रणसंग्राम झाला होता यामध्ये सेनगाव तालुक्यातील आजेगाव या ठिकाणी देखील निजामाच्या शत्रु सोबत सैन्यांची लढाई झाली होती यामध्ये शूरवीर जवान हुतात्मा बहिर्जी शिंदे यांना वीरमरण आले होते त्यांच्या पश्चात उभारण्यात आलेल्या हुतात्मा बहिर्जी स्मारक या ठिकाणी आज ध्वजारोहण करण्यात आले.
    1
    इतिहास प्रसिद्ध आजेगाव येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात साजरा 
सेनगाव तालुक्यातील आजेगाव या ठिकाणी आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिन मोठ्या उत्साहात साजरा करून मराठवाडा मुक्ती संग्रामात शहीद झालेल्या शूरवीर जवानांना विनम्र अभिवादन करण्यात आले. मराठवाडा निजामाच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी मराठवाड्यात मोठा रणसंग्राम झाला होता यामध्ये सेनगाव तालुक्यातील आजेगाव या ठिकाणी देखील निजामाच्या शत्रु सोबत सैन्यांची लढाई झाली होती यामध्ये शूरवीर जवान हुतात्मा बहिर्जी शिंदे यांना वीरमरण आले होते त्यांच्या पश्चात उभारण्यात आलेल्या हुतात्मा बहिर्जी स्मारक या ठिकाणी आज ध्वजारोहण करण्यात आले.
    user_Shankar bhairane
    Shankar bhairane
    Reportar सेनगाव, हिंगोली, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • ST आरक्षणासाठी धनगर समाजाचा एल्गार; महामोर्चास परभणीत जनसागर उसळला ST आरक्षणासाठी धनगर समाजाचा एल्गार; महामोर्चास परभणीत जनसागर उसळला
    1
    ST आरक्षणासाठी धनगर समाजाचा एल्गार; महामोर्चास परभणीत जनसागर उसळला
ST आरक्षणासाठी धनगर समाजाचा एल्गार; महामोर्चास परभणीत जनसागर उसळला
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    3 hrs ago
  • स्टेट बैंक ऑफ इंडिया शाखा प्रबंधक उमरखेड़ कि ओर से 1000 वृक्ष लगाये गए SBI स्टेट बैंक ऑफ इंडिया शाखा प्रबंधक मैनेजर उमरखेड़ कि ओर से 1000 वृक्ष लगाये गए शहर में SBI स्टेट बैंक ऑफ इंडिया शाखा प्रबंधक मैनेजर उमरखेड़ साहब का उपक्रम उमरखेड़ के लोकप्रिय नेता नितिन भाऊ भूतड़ा भी रहे शामिल उमरखेड़ थानेदार शंकर पांचाल साहब के हाथों से पेड़ लगाए गए
    1
    स्टेट बैंक ऑफ इंडिया शाखा प्रबंधक उमरखेड़ कि ओर से 1000 वृक्ष लगाये गए 
SBI स्टेट बैंक ऑफ इंडिया शाखा प्रबंधक मैनेजर उमरखेड़ कि ओर से 1000 वृक्ष लगाये गए शहर में SBI स्टेट बैंक ऑफ इंडिया शाखा प्रबंधक मैनेजर उमरखेड़ साहब का उपक्रम उमरखेड़ के लोकप्रिय नेता नितिन भाऊ भूतड़ा भी रहे शामिल उमरखेड़ थानेदार शंकर पांचाल साहब के हाथों से पेड़ लगाए गए
    user_Firoz Ahemad Noor khan
    Firoz Ahemad Noor khan
    Beverage Store उमरखेड, यवतमाळ, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • 17 सप्टेंबर2026 मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त संजय कुमार चव्हाण सर यांची प्रतिक्रिया. 17 सप्टेंबर 2026 मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त संजय कुमार चव्हाण सर यांची विशेष प्रतिक्रिया.
    1
    17 सप्टेंबर2026 मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त संजय कुमार चव्हाण सर यांची प्रतिक्रिया.
17 सप्टेंबर 2026 मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त संजय कुमार चव्हाण सर यांची विशेष प्रतिक्रिया.
    user_Mahadev pakhare super
    Mahadev pakhare super
    मराठवाडा अभिनेता,पत्रकार मंठा, जालना, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • सोनपेठ पोलीस प्रशासनाचा रूट मार्च, श्री गणेश चतुर्थीच्या धर्तीवर कायदा व सुवेव्यवस्था आभाधित ठेवण्यासाठी पुन्हा सोनपेठ पोलीस प्रशासनाचा रूट मार्च संपन्न सोनपेठ पोलीस प्रशासनाचा रूट मार्च, श्री गणेश चतुर्थीच्या धर्तीवर कायदा व सुवेव्यवस्था आभाधित ठेवण्यासाठी पुन्हा सोनपेठ पोलीस प्रशासनाचा रूट मार्च संपन्न सोनपेठ (दर्शन) :- सोनपेठ पोलीस प्रशासनाचा रूट मार्च, श्री गणेश चतुर्थीच्या धर्तीवर कायदा व सुवेव्यवस्था आभाधित ठेवण्यासाठी पुन्हा सोनपेठ पोलीस प्रशासनाचा रूट मार्च संपन्न
    1
    सोनपेठ पोलीस प्रशासनाचा रूट मार्च, श्री गणेश चतुर्थीच्या धर्तीवर कायदा व सुवेव्यवस्था आभाधित ठेवण्यासाठी पुन्हा सोनपेठ पोलीस प्रशासनाचा रूट मार्च संपन्न
सोनपेठ पोलीस प्रशासनाचा रूट मार्च, श्री गणेश चतुर्थीच्या धर्तीवर कायदा व सुवेव्यवस्था आभाधित ठेवण्यासाठी पुन्हा सोनपेठ पोलीस प्रशासनाचा रूट मार्च संपन्न
सोनपेठ (दर्शन) :-
सोनपेठ पोलीस प्रशासनाचा रूट मार्च, श्री गणेश चतुर्थीच्या धर्तीवर कायदा व सुवेव्यवस्था आभाधित ठेवण्यासाठी पुन्हा सोनपेठ पोलीस प्रशासनाचा रूट मार्च संपन्न
    user_साप्ताहिक सोनपेठ दर्शन
    साप्ताहिक सोनपेठ दर्शन
    Paper Distributor सोनपेठ, परभणी, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • पहाटे ३ वाजता पाटोद्यात बाप-लेकाची भेट;संघर्ष योध्दा मनोजदादा जरांगे पाटील आणि त्यांच्या वडिलांमधील‌ भावनिक क्षण! सेनगाव/विश्वनाथ देशमुख मराठा आरक्षणाच्या लढ्यासाठी अहोरात्र महाराष्ट्र पिंजून काढणारे मनोज जरांगे पाटील आणि त्यांचे वडील रावसाहेब जरांगे यांच्यातील भेटीचा एक अत्यंत भावूक क्षण बीडमधील पाटोदा नगरीत पाहायला मिळाला. मध्यरात्र उलटून गेल्यानंतर पहाटे ठीक तीन वाजता झालेल्या या दोन मिनिटांच्या भेटीने उपस्थितांचे डोळे पाणावले. मराठा आरक्षणाच्या संवाद दौऱ्यादरम्यान मनोज जरांगे पाटील यांचे पाटोदा येथे मध्यरात्री दीड ते दोनच्या सुमारास आगमन झाले. एवढ्या उशिराही त्यांना ऐकण्यासाठी हजारो बांधवांनी मोठी गर्दी केली होती. रात्री अडीच वाजेपर्यंत सभा आटोपल्यानंतर,पहाटे तीनच्या सुमारास मनोज जरांगे यांना भेटण्यासाठी त्यांचे वडील स्वतः त्या ठिकाणी पोहोचले. दिवस-रात्र समाजाच्या हक्कासाठी प्रकृतीची पर्वा न करता लढणाऱ्या मुलाला समोर पाहून वडिलांचे डोळे भरून आले.तर वडिलांना समोर पाहताच मनोज जरांगे यांच्या चेहऱ्यावरही कमालीचे भाव दाटून आले.या दोन-तीन मिनिटांच्या संक्षिप्त भेटीत दोघांमध्ये फारसे शब्द बोलले गेले नाहीत;पण बापाने मुलाच्या पाठीवर टाकलेली मायेची थाप आणि दोघांच्या डोळ्यांतील मूक संवाद शब्दांच्या पलीकडचा होता. लाखो बांधवांसाठी लढणाऱ्या नेत्याला पहाटेच्या शांततेत मिळालेली ही पित्याची साथ सध्या सर्वत्र चर्चेचा आणि कौतुकाचा विषय ठरत आहे.
    1
    पहाटे ३ वाजता पाटोद्यात बाप-लेकाची भेट;संघर्ष योध्दा मनोजदादा जरांगे पाटील आणि त्यांच्या वडिलांमधील‌ भावनिक क्षण!
सेनगाव/विश्वनाथ देशमुख 
मराठा आरक्षणाच्या लढ्यासाठी अहोरात्र महाराष्ट्र पिंजून काढणारे मनोज जरांगे पाटील आणि त्यांचे वडील रावसाहेब जरांगे यांच्यातील भेटीचा एक अत्यंत भावूक क्षण बीडमधील पाटोदा नगरीत पाहायला मिळाला. मध्यरात्र उलटून गेल्यानंतर पहाटे ठीक तीन वाजता झालेल्या या दोन मिनिटांच्या भेटीने उपस्थितांचे डोळे पाणावले.
मराठा आरक्षणाच्या संवाद दौऱ्यादरम्यान मनोज जरांगे पाटील यांचे पाटोदा येथे मध्यरात्री दीड ते दोनच्या सुमारास आगमन झाले. एवढ्या उशिराही त्यांना ऐकण्यासाठी हजारो बांधवांनी मोठी गर्दी केली होती. रात्री अडीच वाजेपर्यंत सभा आटोपल्यानंतर,पहाटे तीनच्या सुमारास मनोज जरांगे यांना भेटण्यासाठी त्यांचे वडील स्वतः त्या ठिकाणी पोहोचले.
दिवस-रात्र समाजाच्या हक्कासाठी प्रकृतीची पर्वा न करता लढणाऱ्या मुलाला समोर पाहून वडिलांचे डोळे भरून आले.तर वडिलांना समोर पाहताच मनोज जरांगे यांच्या चेहऱ्यावरही कमालीचे भाव दाटून आले.या दोन-तीन मिनिटांच्या संक्षिप्त भेटीत दोघांमध्ये फारसे शब्द बोलले गेले नाहीत;पण बापाने मुलाच्या पाठीवर टाकलेली मायेची थाप आणि दोघांच्या डोळ्यांतील मूक संवाद शब्दांच्या पलीकडचा होता. लाखो बांधवांसाठी लढणाऱ्या नेत्याला पहाटेच्या शांततेत मिळालेली ही पित्याची साथ सध्या सर्वत्र चर्चेचा आणि कौतुकाचा विषय ठरत आहे.
    user_Vishwanath Deshmukh
    Vishwanath Deshmukh
    सेनगाव, हिंगोली, महाराष्ट्र•
    11 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.