वाणी वरखडे खांदे वस्तीवरील श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त मंदिर रंगकामास शुभारंभ वाणी वरखडे खांदे वस्तीवरील श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त मंदिर रंगकामास शुभारंभ सदाभाऊ शिंदे राहुरी फॅक्टरी परिसरातील श्रीरामनगर, वाणी-वरखडे-खांदे वस्ती येथील श्री हनुमान मंदिरात आगामी हनुमान जन्मोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिर रंगकामास उत्साहात सुरुवात करण्यात आली आहे. समस्त ग्रामस्थांच्या वतीने हा उपक्रम हाती घेण्यात आला असून, माजी नगरसेवक ज्ञानेश्वर उर्फ माऊली वाणी यांच्या मार्गदर्शनाखाली कामाचा शुभारंभ झाला. या रंगकामासाठी स्थानिक कार्यकर्ते सदाभाऊ शिंदे (फिटर) यांनी स्वतः पुढाकार घेत प्रत्यक्ष कामात सहभाग घेतला. त्यांच्या मदतीने मंदिर परिसर सुशोभित करण्याचे काम सुरू असून ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. यावेळी काही ग्रामस्थ उपस्थित राहून कामाची पाहणी करत सहकार्य करत असल्याचे दिसून आले. दरम्यान, गुरुवार दिनांक २ एप्रिल २०२६ रोजी श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी काकडी पाण्याची मिरवणूक, अभिषेक, चालिसा व महाआरती, सायंकाळी संगीतमय प्रवचन, तसेच रात्री भजन व भक्तीगीतांचा कार्यक्रम (DJ) आयोजित करण्यात आला आहे. यानंतर महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले असून सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्ताने मंदिर सुशोभीकरणाचे काम सुरू असल्याने परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे.
वाणी वरखडे खांदे वस्तीवरील श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त मंदिर रंगकामास शुभारंभ वाणी वरखडे खांदे वस्तीवरील श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त मंदिर रंगकामास शुभारंभ सदाभाऊ शिंदे राहुरी फॅक्टरी परिसरातील श्रीरामनगर, वाणी-वरखडे-खांदे वस्ती येथील श्री हनुमान मंदिरात आगामी हनुमान जन्मोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिर रंगकामास उत्साहात सुरुवात करण्यात आली आहे.
समस्त ग्रामस्थांच्या वतीने हा उपक्रम हाती घेण्यात आला असून, माजी नगरसेवक ज्ञानेश्वर उर्फ माऊली वाणी यांच्या मार्गदर्शनाखाली कामाचा शुभारंभ झाला. या रंगकामासाठी स्थानिक कार्यकर्ते सदाभाऊ शिंदे (फिटर) यांनी स्वतः पुढाकार घेत प्रत्यक्ष कामात सहभाग घेतला. त्यांच्या मदतीने मंदिर परिसर सुशोभित करण्याचे काम सुरू असून ग्रामस्थांमध्ये
समाधान व्यक्त केले जात आहे. यावेळी काही ग्रामस्थ उपस्थित राहून कामाची पाहणी करत सहकार्य करत असल्याचे दिसून आले. दरम्यान, गुरुवार दिनांक २ एप्रिल २०२६ रोजी श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी काकडी पाण्याची मिरवणूक, अभिषेक, चालिसा व महाआरती, सायंकाळी संगीतमय
प्रवचन, तसेच रात्री भजन व भक्तीगीतांचा कार्यक्रम (DJ) आयोजित करण्यात आला आहे. यानंतर महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले असून सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्ताने मंदिर सुशोभीकरणाचे काम सुरू असल्याने परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे.
- वैजापूर पंचायत समिती गट विकास अधिकारी शासकीय नियमा विरुद्ध. पंचायत समिती गट विकास अधिकारी यांच्या दालनात A/C त बसून जनतेची सेवा करताना.1
- Post by शेख अजहर ताहेर (पत्रकार)1
- शिरूर तालुक्यातील वरुडे-धामारी रोडवर भरधाव वेगातील कारचा भीषण अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्या कडेला असलेल्या खांबावर आदळून खड्ड्यात कोसळली. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र वाहनाचे मोठे नुकसान झाले.घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, रस्त्यावर स्पीड ब्रेकर बसविणे व रुंदीकरण करण्याची मागणी करण्यात येत आहे.1
- आज ३० मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता माध्यमांना माहिती देण्यात आली की सिल्लोड तालुक्यातील आमठाणा येथे वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली यात विजांचा मोठा कडकडाट सुरू झाला होता आमठाणा येथे एका झाडावर वीज पडल्याची घटना घडली असून सदरील प्रकार बघण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे चित्र या ठिकाणी दिसून आले आहे.1
- Sanjay Shirsat Visit The Soul Of Fashion Opening Ceremony in Kalda Corner1
- Post by कर्जत लाईव्ह1
- *चांदवड तालुक्याला वादळी पावसाचा तडाखा; काजी सांगवी, हिवरखेडे व निमगव्हाण परिसरात नुकसान* *बळीराजा पुन्हा एकदा संकटात;* चांदवड (प्रतिनिधी) :चांदवड शहरासह संपूर्ण तालुक्यात आज सायंकाळच्या सुमारास हवामानात अचानक बदल होऊन जोरदार वाऱ्यासह वादळी पावसाने रौद्र रूप धारण केले. विशेषतः तालुक्यातील काजी सांगवी, हिवरखेडे आणि निमगव्हाण परिसरात सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह झालेल्या मुसळधार पावसामुळे काढणीस आलेल्या गहू आणि कांदा पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. या अस्मानी संकटामुळे वर्षभर काबाडकष्ट करणारा शेतकरी पुन्हा एकदा हवालदिल झाला आहे. दुपारपासूनच परिसरात उकाड्याचे प्रमाण वाढले होते. मात्र, सायंकाळी अचानक आकाशात काळे ढग जमा झाले आणि जोरदार वाऱ्याला सुरुवात झाली. वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता. चांदवड शहरातही धुळीचे लोट उसळून काही काळ जनजीवन विस्कळीत झाले होते. सध्या तालुक्यात गव्हाची कापणी आणि कांदा काढणीची कामे अंतिम टप्प्यात आहेत. काजीसांगवी व निमगव्हाण, हिवरखेडे परिसरात अनेक शेतकऱ्यांनी गहू कापून शेतातच ठेवला होता, तर काहींचा उभा गहू काढणीला आलेला होता. मात्र, वादळी पावसामुळे उभा गहू जमिनीदोस्त झाला असून कापून ठेवलेला गहू भिजल्याने त्याला मोड फुटण्याची भीती निर्माण झाली आहे. तसेच, हिवरखेडे आणि निमगव्हाण परिसरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांची अवस्थाही बिकट झाली आहे. अनेक ठिकाणी कांदा काढून शेतातच साठवून ठेवलेला होता. अचानक आलेल्या पावसामुळे शेतात पाणी साचल्याने कांदा सडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. मशागत, बी-बियाणे आणि खतांचा खर्चही निघणे आता कठीण झाल्याने शेतकरी डोळ्यात पाणी आणून उघड्यावर पडलेले आपले पीक पाहत आहे. निसर्गाच्या या लहरीपणामुळे शेतकरी पूर्णपणे आर्थिक संकटात सापडला आहे.4
- शिरूर तालुक्यातील भांबर्डे गावात वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात एक बिबट्या जेरबंद करण्यात यश आले.गेल्या काही दिवसांत बिबट्यांचा वावर वाढून पाळीव जनावरांवर हल्ल्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे ग्रामस्थांनी अधिक पिंजरे लावण्याची मागणी केली आहे.वन विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, शेतात जाताना व सकाळ-संध्याकाळ विशेष काळजी घेण्याचे निर्देश दिले आहेत.1