सेवा संकल्प अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करावी -जिल्हाधिकारी आशिष येरेकर अमरावती: नागरिकांच्या सोयीसाठी आणि गरजूंना लाभ देण्यासाठी सेवा संकल्प अभियान राबविण्यात येत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संसदीय कार्यकाळाला 25 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने हे अभियान एक महिनाभर राबविण्यात येणार आहे. नागरिकांच्या जीवनात बदल घडून येईल, अशा योजना या अभियानात राबविण्यात यावा, तसेच अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात सेवा संकल्प अभियानामध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचा आढावा घेण्यात आला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी, निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी, जिल्ह्यात प्रामुख्याने वन हक्क पट्टे वाटपाचा कार्यक्रम धारणी आणि चिखलदरा तालुक्यात प्राधान्याने राबविण्याचे निर्देश दिले. दि. 17 ते 19 सप्टेंबरदरम्यान प्रत्येक गावात सभा घेऊन वनपट्टे वाटप निश्चित करावे. त्यानंतर दि. 20 सप्टेंबरपासून प्रत्यक्ष कारवाई करावी. ग्रामसभा, उपविभाग आणि जिल्हास्तरीय समितीची मंजुरी घेऊन या अभियानात पट्टेवाटप अंतिम करण्यात यावे. तसेच नव्याने तयार करण्यात आलेला सात ई आणि बारा ईबाबत कार्यवाही करण्यात यावी. अभियानात राशनबाबत कार्यवाही करण्यात यावी. यात लाभार्थ्यांशी संवाद साधून आवश्यक नसलेल्या नागरिकांना लाभ सोडण्याचे आवाहन करण्यात यावे. धान्य नको असलेल्या नागरिकांकडून लेखी घ्यावे, तसेच गरजूंची नावे समाविष्ठ करण्यात यावी. तसेच आयुष्मान कार्ड आणि वयोवंदन योजनेत प्राधान्याने कामे करण्यात येणार आहे. यासोबतच शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात येणार आहे. मेळघाटात प्रामुख्याने ही शिबीरे आयोजित करण्यात येतील. युवकांसाठी 29 सप्टेंबर रोजी सर्व तालुक्यात रोजगार मेळावे आयोजित करण्यात येणार आहे. यात 1800 जागा भरण्यात येणार असून यासाठी 56 कंपन्यांनी नोंद केली आहे. आतापर्यंत 5 हजार युवकांनी यासाठी नोंदणी केली आहे. त्यासोबतच समाज कल्याण आणि आदिवासी विकास विभागाच्या वसतिगृहात करीअर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. कामगार विभागातर्फे असंघटीत कामगारांसाठी ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करण्यात येणार आहे. त्यांच्यासाठी आरोग्य शिबीर, विमा आदी उपक्रम राबविण्यात येणार आहे. या क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना बँकेत पगार करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. अभियान विविध विभागांच्या समन्वयातून राबविण्यात येणार आहे. सर्व विभागांची जबाबदारीने कार्यक्रमाचे नियोजन करून राबवावे, तसेच याचा अहवाल सादर दर आठवड्याला सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी दिले.

- User6399बल्लारपूर, चंद्रपूर, महाराष्ट्र🙏1 hr ago
- १६०० लिटर मोहा मास सडवा नष्ट व साहित्य जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची अवैध हातभट्टी दारूवर धडक कारवाई;1
- अकोट तालुका कोरडा दुष्काळ जाहीर करा शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत मिळून देण्यासाठी अकोट तालुका व शहर काँग्रेस च्या वतीने एक दिवसीय उपोषण अकोट तालुका कोरडा दुष्काळ जाहीर करा शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत मिळून देण्यासाठी अकोट तालुका व शहर काँग्रेस च्या वतीने एक दिवसीय उपोषण अकोट तालुका प्रतिनिधी... अकोट काँग्रेसच्या वतीने 16 सप्टेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये अकोला जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देणे संदर्भात एक दिवसीय उपोषण आंदोलन करण्यात येऊन मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना अकोट उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटल्याप्रमाणे अकोला जिल्ह्यात यावर्षी अत्यल्प व अनियमित पाऊस झाल्यामुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद तसेच इतर पिकांचे उत्पादन अत्यंत घटले असून शेतकरी व शेतमजूर गंभीर आर्थिक संकटात सापडले आहेत. अनेक भागांमध्ये पिके पूर्णपणे हातची गेली असून शेतकऱ्यांवर कर्जबाजारीपणाचे मोठे संकट ओढवले आहे. या पार्श्वभूमीवर अकोला जिल्हा काँग्रेस कमिटीच्या मार्गदर्शनाखाली अकोट तालुका काँग्रेस कमिटी व अकोट शहर काँग्रेस कमिटी यांच्या वतीने प्रशांत पाचडे, अनोख राहणे, सारंग मालाणी, बादल अहिर, विकास देशमुख ,संजय आठवले, यांच्या उपस्थितीत अकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे एक दिवसीय उपोषण करण्यात आले. सदर निवेदनातील मागण्या संपूर्ण अकोला जिल्हा तात्काळ कोरडा दुष्काळग्रस्त घोषित करण्यात यावा. सर्व बाधित शेतकऱ्यांना प्रति हेक्टर किमान ₹५०,००० आर्थिक मदत देण्यात यावी. पीक विमा योजनेंतर्गत सर्व पात्र शेतकऱ्यांना तातडीने व संपूर्ण नुकसानभरपाई मिळावी. शेतकऱ्यांच्या पीक कर्जाची वसुली स्थगित करून कर्जमाफीबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा. शेतमजुरांसाठी विशेष आर्थिक सहाय्य व रोजगार हमी योजनेंतर्गत अतिरिक्त कामे उपलब्ध करून द्यावीत.महसूल विभागामार्फत तातडीने पंचनामे करून वास्तविक नुकसानीचा अहवाल शासनाकडे सादर करावा. नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित सर्व घटकांसाठी विशेष मदत पॅकेज जाहीर करण्यात यावे.शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचा विचार करून वरील मागण्यांवर तातडीने सकारात्मक कार्यवाही करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.या निवेदनावर अफजल खान ,प्रमोद चोरे, पांडुरंग खवले, दिनेश ताडे, शिवदास मुऱ्हेकार, सय्यद कलीम, ओंकार टवलारे ,हैदर अली, महेंद्र पवार ,आजम खा पठाण ,केशव हेन्ड, सय्यद सोहेल अली, धनराज कहार, मोती तेजवानी ,रोशन चिंचोलकर, मिलिंद नितोने ,नुसरत अली, मिलिंद झाडे, अविनाश जायले, अचल बेलसरे, दशरथ खवले, राजु पंडित , अविनाश डिक्कर ,अफजल खान, शेख खाजा,अब्दुल जमिल अब्दुल खलिक, अब्दुल आबीद अब्दुल अहाब,सह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या सह्या आहेत.4
- वर्धा जिल्ह्यातील अन्निपुर येथे श्री गणेशा आरोग्याचा आरोग्य अभियान अंतर्गत मोफत तपासणी शिबिर संपन्न वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर येथे 'श्रीगणेशा आरोग्याचा' आरोग्य अभियान अंतर्गत मोफत तपासणी शिबिर संपन्न वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर आयुष्मान आरोग्य मंदिर, अल्लीपूर येथे _'श्रीगणेशा आरोग्याचा - आरोग्य अभियान 2026'_ अंतर्गत भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात एकूण 102 रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये 15 गरजू लाभार्थ्यांचे आयुष्मान भारत कार्ड तर 06 ज्येष्ठ नागरिकांचे वय वंदना कार्ड काढण्यात आले. उपस्थित सर्व नागरिकांची रक्तदाब (BP) व रक्तातील साखर (Blood Sugar) तपासणी करण्यात आली. सद्यस्थितीतील धावपळीच्या जीवनशैलीमुळे वाढत असले मधुमेह व उच्च रक्तदाब यासारखे आजार रोखण्यासाठी नागरिकांना तज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले. तसेच वेळेवर तपासणी करून वेळेत उपचार घेणे किती गरजेचे आहे, याबाबत जनजागृती करण्यात आली. या शिबिराचा नागरिकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला. या प्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल रुईकर , आरोग्य सहायक जोशी कांबळे, NCD स्टाफ कु. दिपा पडोळे, तसेच सर्व आरोग्य सेवक, सेविका व आशा स्वयंसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या .1
- तळेगाव-आर्वी रोडवर वाहनाला आग; वनविभागावर गंभीर आरोप#foreshtnews तळेगाव-आर्वी रोडवर वाहनाला आग; वनविभागावर गंभीर आरोप #foresht #vanvibhag #breking1
- खामगावात गणेश विसर्जन मिरवणुकीचा चिमुकली काढला लकी ड्रॉ खामगाव: बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात मोठ्या उत्साहात गणेश उत्सव साजरा करण्यात येतो. यामध्ये विसर्जन मिरवणुकीच्या रांगेत प्रथम मानाचा लाकडी गणपती , तानाजी गणेश मंडळ, हनुमान गणेश मंडळ, व राणा गणेश मंडळ असतात तर त्यानंतर लकी ड्रॉ प्रमाणे इतर मंडळे सहभागी होत असतात. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा लकी ड्रॉ नुसार विसर्जन मिरवणूक पार पडणार आहे. यंदा गणेशोत्सव 12 दिवसांचा असून अनंत चतुर्दशीला शहरातून गणेश विसर्जन मिरवणुक निघणार आहे.यामध्ये शिवाजी नगर पोलिस स्टेशन तर शहर पोलीस स्टेशन अंतर्गत अशा एकूण 28 गणेश मंडळांचा समावेश राहणार आहे. या अनुषंगाने जाहीर केल्याप्रमाणे आज शहर पोलिस स्टेशनच्या प्रांगणात अप्पर पोलीस अधीक्षक पीयुष जगताप , उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील, शहर पो.स्टे.चे ठाणेदार सुरेंद्र अहेरकर ,शिवाजी नगर पो.स्टे.चे ठाणेदार मंदार पुरी व गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत प्रिश अनुपकुमार छतवाणी वय 3 व आर्यन संतोष श्रीनाथ वय या लहान मूल्यांच्या हस्ते ईश्वर चिठ्ठी ने लकी ड्रॉ काढून मंडळाची क्रमवारी जाहीर करण्यात आली.4
- विषय: नवनिर्मित जिल्हा रुग्णालय, नागपूर मधील विद्यमान १०० खाटांची ९०० पर्यंत वाढ करणे बाबत.1
- अमरावतीत गणेश विसर्जनासाठी महापालिकेची जय्यत तयारी; २२ कृत्रिम विसर्जन टँकची व्यवस्था1
- धारणी में अवैध रेत माफियाओं की दबंगई: विरोध करने पर आदिवासी नेता पर ट्रैक्टर चढ़ाने का प्रयास, वीडियो वायरल1