संतप्त जमावाकडून संशयितांना चोप पुणे जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी ऑनलाईन पैसे पाठवतो रोख रक्कम द्या असे म्हणून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या दोघा संशयितांना केंदूर येथील नागरिकांनी पकडून चोप देत संतप्त जमावाने सदर संशयितांच्या कारची तोडफोड करत दोरीने बांधून ठेवत पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. केंदूर ता. शिरुर रस्त्याने दोघे संशयित नंबर नसलेल्या कार मधून येत असल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांना मिळताच पोलिसांनी पाबळ परिसरात नाकाबंदी लावली मात्र सदर संशयितांनी त्यांची कार ठाकरवस्तीच्या बाजूने नेल्याने नागरिकांनी त्यांना अडवले मात्र दोघे फरार होण्याच्या तयारीत असल्याने संतप्त जमावाने त्यांच्या कारवर दगडफेक करुन दोघांना ताब्यात घेऊन चोप देत दोघांना दोरीने बांधून ठेवले, दरम्यान सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक धनंजय थेऊरकर, पोलीस हवालदार संतोष शेळके, पोलीस शिपाई विशाल देशमुख यांसह आदींनी सदर ठिकाणी धाव घेत अनिकेत दिलीप पठारे वय २५ रा. मावळेवाडी ता. पारनेर जि. अहिल्यानगर व अक्षय संदीप वाबळे वय २५ वर्षे रा. म्हसे खुर्द ता. पारनेर जि. अहिल्यानगर या दोघांना ताब्यात घेऊन उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले, दरम्यान पोलिसांनी चौकशी केली असता यवत पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सदर कार मधून आलेल्या दोघांनी फसवणूक केल्याची घटना घडलेली असल्याने नागरिकांनी त्यांचा पाठलाग केल्याचे समोर आले असल्याचे शिक्रापूर पोलिसांनी सांगितले, दरम्यान अनिकेत पठारे याने तळेगाव ढमढेरे येथे काही दिवसांपूर्वी एका मोबाईल शॉपी चालकाची सदर युवकांनी फसवणूक केल्याचे उघड झाले मात्र दोघांना सध्या उपचाराची गरज असल्याने त्यांना पोलिसांच्या वतीने नोटीस देण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांनी सांगितले. नागरिकांना कोठेही संशयित युवक आढळून आल्यास संतप्त न होता पोलिसांना माहिती देण्याची गरज आहे, नागरिकांनी संशयितांना मारहाण केल्यास अडचण निर्माण होऊ शकते त्यामुळे नागरिकांनी पोलिसांना माहिती देणे गरजेचे असल्याचे पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांनी सांगितले.

- Post by AMINIYA COURIER1
- पुणे अहिल्यानगर महामार्ग वाघोली मध्ये सतत वाहतूक कोंडी होत असते, आज देखील वाघोली मध्ये मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी पाहायला मिळाले, वाहतूक कोंडीतून मार्ग काढत नागरिकांना तासन्तास वाहतूक कोंडी थांबावे लागते.1
- झरेश्वर महादेव मंदिरात प्रथम वर्धापन दिनानिमित्त शिवलिलामृत पारायण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न. ह.भ.प.सदगुरू परमपूज्य श्री.राघव चैतन्य बाबा यांच्या काल्याच्या कीर्तनाने कार्यक्रमाची सांगता अहिल्यानगर तालुक्यातील आशितोष भगवान झरेश्वर महादेव मंदिर शिवमल्हारगडच्या प्रथम वर्धापनदिनानिमित्त नगर तालुक्यातील हिवरे झरे येथे श्रीमद् भागवत कथा व शिवलिलामृत पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. 9 फेब्रुवारीपासून या सोहळ्यास सुरवात झाली तर 16 फेब्रुवारी रोजी हरिभक्त पारायण राघव चैतन्य बाबा यांच्या काल्याच्या कीर्तनाने या सप्ताह कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या सप्ताहात 9 फेब्रुवारी रोजी भागवत महात्म्य,10 फेब्रुवारी रोजी परीक्षित दिग्विजय,जय विजय कथा, 11 फेब्रुवारीला ध्रृव व्याख्यान,अजामेळ व्याख्यान, हिरण्यकश्यपू वध, १२ फेब्रुवारी रोजी गजेंद्र मोक्ष, वामन अवतार, १३ फेब्रुवारी रोजी श्रीराम चरित्र, श्रीकृष्ण जन्मोत्सव, १४ फेब्रुवारी रोजी गोकुळलिला, गोवर्धन लिला, रासलिला १५ फेब्रुवारी रोजी कंस वध श्रीकृष्ण रुक्मिणी विवाह परिक्षित उद्धार यावर कथा प्रवचन झाले तर १६ फेब्रुवारी रोजी ह.भ.प.सदगुरू परमपूज्य श्री.राघव चैतन्य बाबा यांच्या काल्याच्या कीर्तनाने कार्यक्रमाची सांगता झाली.रविवार 15 फेब्रुवारी रोजी सकाळी 7 ते 8 या वेळेस शिवअभिषेक तसेच होम हवन झाला. त्याबरोबरच १६ फेब्रुवारी रोजी भागवत ग्रंथ मिरवणूक व ग्राम प्रदक्षिणा काढण्यात आली. या धार्मिक कार्यक्रमांचा भाविकांनी दररोज मोठ्या प्रमाणावर लाभ घेतला. हा आठ दिवसाचा पारायण सोहळा संपन्न करण्यासाठी आशुतोष झरेश्वर मंदिर पंच कमेटीचे खजिनदार रोहिदास भांडवलकर ,अध्यक्ष नारायण रोडे, उपाध्यक्ष ओंकार काटे, सदस्य संजय टकले,अक्षय काटे आदी कमिटीचे पदाधिकारी व हिवरे झरे येथील सर्व ग्रामस्थ व भजन मंडळी यांनी अथक परिश्रम घेतले. या पारायण सोहळ्यानिमित्त टकले परिवार, आंबदास काटे, राहुल बहिरट (खडकी), अभय सिंघ राठी (कमांडर) अहिल्यानगर, समस्त रोडे परिवार, झरेकर परिवार,गोरक्ष गायकवाड, समस्त काटे परिवार,बाबा शेठ झरेकर, आदी दानशूर भूमिपुत्रांनी अन्नदान करून विशेष योगदान केले.राजाराम रखमाजी वाबळे यांनी सभामंडप, परिसर पेंविंग ब्लॉक दिले.1
- अहिल्यानगरच्या भिंगारजवळ आलमगीर परिसरातील एका घरात शिरलेला बिबट्या जेरबंद करण्यात आला. सोमवारी सकाळी वन विभागाच्या पथकाने ही कारवाई केली.1
- Post by NEWS 24 MAHARASHTRA1
- Post by Deepak Sagar1
- अंधाऱ्या व निर्मनुष्य ठिकाणी दारु पिणारे, नशा करणारे तळीरामांवर धडक कारवाई.1
- वाघोली मध्ये विविध विकास कामांचे उद्घाटन नुकतेच पार पडले,या वेळी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते1