logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

शहरातील वायू प्रदूषणावर लगाम घालण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची मोठी कारवाई! *२२ आरएमसी प्रकल्पांची तपासणी, नियमभंग करणारे १४ प्रकल्प सील* *पिंपरी, दि. २२ एप्रिल २०२६ :* पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पर्यावरण विभागामार्फत शहरातील वाढत्या वायू प्रदूषणावर नियंत्रण मिळविण्यासाठी सातत्याने आणि नियोजनबद्ध पद्धतीने उपाययोजना राबविण्यात येत आहेत. बांधकाम व औद्योगिक आस्थापनांकडून होणाऱ्या धूळकणांच्या प्रदूषणावर आळा घालण्यासाठी महापालिका प्रशासनाने विशेष लक्ष केंद्रित केले असून, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या १७ ऑक्टोबर २०२५ च्या पत्रान्वये आरएमसी प्रकल्प संचालनासंबंधी मार्गदर्शक सूचना आणि नियमांचे काटेकोर पालन सुनिश्चित करण्यासाठी सातत्याने कारवाई सुरू आहे. या अनुषंगाने महापालिकेच्या उपद्रव शोध पथकांमार्फत शहरातील रेडी मिक्स काँक्रीट प्रकल्पांवर व्यापक तपासणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान एकूण २२ आरएमसी प्रकल्पांची सखोल पाहणी करण्यात आली. तपासणीदरम्यान पर्यावरणीय नियम व मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन करणाऱ्या १४ प्रकल्पांवर तात्काळ कारवाई करत त्यांना सील करण्यात आले. यामध्ये धूळ नियंत्रणासाठी आवश्यक यंत्रणा नसणे, परिसरात पाण्याची फवारणी न करणे, उघड्यावर साहित्य साठवणे, तसेच धूळ नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजनांचा अभाव आदी गंभीर त्रुटी आढळून आल्या. उर्वरित प्रकल्पांमध्ये निदर्शनास आलेल्या त्रुटींनुसार संबंधितांना कडक इशारा देण्यात आला असून, हवा गुणवत्ता निरीक्षण प्रणाली तातडीने बसविणे, पाण्याची नियमित फवारणी करणे, संपूर्ण प्रकल्पाभोवती शेड्स उभारणे, धूळ नियंत्रणासाठी योग्य उपाययोजना करणे या बाबी त्वरित पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नियमांचे पालन न केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. महापालिकेच्या वतीने शहरातील वायू गुणवत्ता सुधारण्यासाठी विविध स्तरांवर उपाययोजना राबविल्या जात असून, औद्योगिक तसेच बांधकाम प्रकल्पांमधून होणाऱ्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष मोहिमा हाती घेतल्या जात आहेत. नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण आणि पर्यावरण संतुलन राखण्यासाठी अशा कारवायांना पुढील काळातही अधिक गती दिली जाणार आहे, असे पर्यावरण विभागातर्फे यावेळी स्पष्ट करण्यात आले. *महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानुसार आरएमसी प्रकल्प संचालनासंबंधी महत्त्वाचे नियम* • महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या ‘ऑरेंज’ वर्गवारीनुसार सर्व परवानग्या घेणे बंधनकारक. • शाळा, रुग्णालये, न्यायालये यांपासून २०० मीटर व निवासी भागापासून किमान ५० मीटर अंतर राखावे. • संपूर्ण प्रकल्प बंदिस्त व कच्चा माल, सिलो, कन्वेयर, लोडिंग-अनलोडिंग व मिक्सिंग युनिट आच्छादित ठेवणे बंधनकारक. • नियमित पाणी फवारणी, धूळ संकलन प्रणाली व हरित पट्टा निर्माण करणे अनिवार्य. • पक्के अंतर्गत रस्ते, नियमित साफसफाई व सर्व स्थानांतरण बिंदू बंदिस्त ठेवणे आवश्यक. • टायर धुण्याची व्यवस्था, सीसीटीव्ही कॅमेरे व जीपीएस प्रणाली अनिवार्य आहे तसेच वाहने स्वच्छ करूनच बाहेर सोडावीत. • कच्चा माल बंदिस्त ठिकाणी ठेवणे व कन्वेयर बेल्ट झाकलेले असणे आवश्यक. • वायू प्रदूषण नियंत्रणाच्या पीएम १० व पीएम २.५ मानकांचे पालन करणे बंधनकारक. • सांडपाणी प्रक्रिया व पुनर्वापर अनिवार्य आहे तसेच ते इतरत्र सोडण्यास मनाई. • ध्वनी व घनकचरा व्यवस्थापन नियमांचे पालन करणे बंधनकारक. • औद्योगिक क्षेत्राबाहेरील प्रकल्प सकाळी ६ ते रात्री १० पर्यंतच कार्यान्वित असावेत. ....... *कोट:* शहरातील वायू प्रदूषणावर प्रभावी नियंत्रण मिळविणे ही महापालिकेची सर्वोच्च प्राधान्याची बाब आहे. बांधकाम व औद्योगिक प्रकल्पांनी पर्यावरणीय नियमांचे काटेकोर पालन करणे अत्यावश्यक असून, कोणत्याही प्रकारचा नियमभंग सहन केला जाणार नाही. प्रदूषण करणाऱ्या घटकांवर सातत्याने कारवाई करून शहरातील वायू गुणवत्ता सुधारण्यासाठी महापालिका प्रशासन कटिबद्ध आहे. - डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका …… *कोट:* शहरातील आरएमसी प्लांट्स आणि बांधकाम प्रकल्पांनी बांधकाम ठिकाणी धूळ नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना करणे अनिवार्य आहे. नियमभंग करणाऱ्यांवर कोणतीही तडजोड न करता तात्काळ कारवाई केली जात आहे. पुढील काळातही अशी तपासणी मोहीम राबवून प्रदूषण करणाऱ्या घटकांवर कडक नियंत्रण ठेवण्यात येईल. - संजय कुलकर्णी, मुख्य अभियंता, पिंपरी चिंचवड महापालिका

3 hrs ago
user_City Mirror News
City Mirror News
Media house पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
3 hrs ago
9da82370-2c00-47da-b8aa-39c2b4088345

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेणारा जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
    1
    अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेणारा जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
    user_विशेष तपास न्युज
    विशेष तपास न्युज
    पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • Post by NEWS 24 MAHARASHTRA
    1
    Post by NEWS 24 MAHARASHTRA
    user_NEWS 24 MAHARASHTRA
    NEWS 24 MAHARASHTRA
    Media house पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • पिंपरी चिंचवड :- गुंतवणुकीच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची सायबर फसवणूक करणाऱ्या टोळीवर पिंपरी चिंचवड पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मकोका) अंतर्गत कारवाई केली आहे. सायबर गुन्हेगारांविरुद्ध अशा प्रकारची ही आयुक्तालयातील पहिलीच कारवाई ठरली आहे... एका सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिकाची बनावट ट्रेडिंग ॲपद्वारे ११ कोटी १३ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली होती. या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी कोल्हापूर, पुणे, मुंबई आणि राजस्थान येथून ९ अट्टल गुन्हेगारांना अटक केली आहे. या टोळीने केवळ महाराष्ट्रच नव्हे तर मध्य प्रदेशातही आपले जाळे पसरवले होते. अटक केलेल्या ९ आरोपींमध्ये अभय पाटील , शिवतेज पोटे , युवराज मुदलीयार, रॉनी उर्फ पंकज गिरीगोस्वामी, प्रल्हाद गाडरी, उमेश भट्ट , महेश उडचणे, राहुल मौर्य आणि शेख अब्दुल रहिस यांचा समावेश आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर मार्केटमध्ये जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवणे. फसवणुकीची रक्कम USDT सारख्या आभासी चलनात Cryptocurrency वर्ग करून देशाच्या अर्थव्यवस्थेला धोका निर्माण करणे. आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांच्या संपर्कात राहून संघटितपणे गुन्हे करणे. पोलिसांनी तपासादरम्यान विविध बँक खात्यांमधील २ कोटी ६५ लाख ७६ हजार रुपये गोठवले असून, ते तक्रारदाराला परत मिळवून देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे व त्यांच्या पथकाने ही उल्लेखनीय कामगिरी केली. या कारवाईमुळे सायबर गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत... #पिंपरीचिंचवडपोलीस #सायबरगुन्हा #मकोका #सायबरफसवणूक #क्रिप्टोकरन्सी #USDT #गुन्हेगारी #पोलीसकारवाई #फसवणूकप्रकरण #शेअरमार्केटस्कॅम #आर्थिकगुन्हे #महाराष्ट्रपोलीस #मोठीकारवाई #न्यायालयआदेश #PimpriChinchwadPolice #CyberCrime #MCOCA #CyberFraud #Cryptocurrency #USDT #FinancialFraud #PoliceAction #ScamAlert #StockMarketScam #OrganizedCrime #MaharashtraPolice #BigAction #CourtOrder
    1
    पिंपरी चिंचवड :-
गुंतवणुकीच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची सायबर फसवणूक करणाऱ्या टोळीवर पिंपरी चिंचवड पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मकोका) अंतर्गत कारवाई केली आहे. सायबर गुन्हेगारांविरुद्ध अशा प्रकारची ही आयुक्तालयातील पहिलीच कारवाई  ठरली आहे...
एका सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिकाची बनावट ट्रेडिंग ॲपद्वारे ११ कोटी १३ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली होती. या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी कोल्हापूर, पुणे, मुंबई आणि राजस्थान येथून ९ अट्टल गुन्हेगारांना अटक केली आहे. या टोळीने केवळ महाराष्ट्रच नव्हे तर मध्य प्रदेशातही आपले जाळे पसरवले होते. अटक केलेल्या ९ आरोपींमध्ये अभय पाटील , शिवतेज पोटे , युवराज मुदलीयार, रॉनी उर्फ पंकज गिरीगोस्वामी, प्रल्हाद गाडरी, उमेश भट्ट , महेश उडचणे, राहुल मौर्य आणि शेख अब्दुल रहिस  यांचा समावेश आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर मार्केटमध्ये जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवणे. फसवणुकीची रक्कम USDT सारख्या आभासी चलनात Cryptocurrency वर्ग करून देशाच्या अर्थव्यवस्थेला धोका निर्माण करणे. आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांच्या संपर्कात राहून संघटितपणे गुन्हे करणे. पोलिसांनी तपासादरम्यान विविध बँक खात्यांमधील २ कोटी ६५ लाख ७६ हजार रुपये गोठवले असून, ते तक्रारदाराला परत मिळवून देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे व त्यांच्या पथकाने ही उल्लेखनीय कामगिरी केली. या कारवाईमुळे सायबर गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत...
#पिंपरीचिंचवडपोलीस #सायबरगुन्हा #मकोका #सायबरफसवणूक #क्रिप्टोकरन्सी #USDT #गुन्हेगारी #पोलीसकारवाई #फसवणूकप्रकरण #शेअरमार्केटस्कॅम #आर्थिकगुन्हे #महाराष्ट्रपोलीस #मोठीकारवाई #न्यायालयआदेश
#PimpriChinchwadPolice #CyberCrime #MCOCA #CyberFraud #Cryptocurrency #USDT #FinancialFraud #PoliceAction #ScamAlert #StockMarketScam #OrganizedCrime #MaharashtraPolice #BigAction #CourtOrder
    user_Thenayak
    Thenayak
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • Post by क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    1
    Post by क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    user_क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • विक्रम शिंदे /भोर दि.२१ येत्या दिनांक १ मे पासून जनगणना मोहीम सुरू होतं आहे.यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.
    1
    विक्रम शिंदे /भोर दि.२१
येत्या दिनांक १ मे पासून  जनगणना  मोहीम सुरू होतं आहे.यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.
    user_दै.राष्ट्र सह्याद्री  reporter
    दै.राष्ट्र सह्याद्री reporter
    Reporter भोर, पुणे, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • Post by Nityanand More
    1
    Post by Nityanand More
    user_Nityanand More
    Nityanand More
    Chauffeur service वाई, सातारा, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • शिव सिंह राजपूत दहिया जर्नलिस्ट अमरपाटन सतना मैहर मध्य प्रदेश भोपाल 9974778863
    1
    शिव सिंह राजपूत दहिया जर्नलिस्ट अमरपाटन सतना मैहर मध्य प्रदेश भोपाल 9974778863
    user_Shiv Singh rajput dahiya journalist MP
    Shiv Singh rajput dahiya journalist MP
    Court reporter Ambarnath, Thane•
    14 hrs ago
  • पिंपरी चिंचवड :- सांगवी-बोपोडी दरम्यानच्या ३२ कोटींच्या पुलाच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करणारे दीपक मारुतराव तनपुरे यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी सांगवी पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे. परिसरात दहशत माजवणाऱ्या या गुंडांची पोलिसांनी त्याच भागात धिंड काढून त्यांच्यातील हवा काढली आहे.... पुलाच्या कामातील कथित भ्रष्टाचाराबाबत आवाज उठवल्याच्या रागातून दीपक तनपुरे यांच्यावर ४ ते ५ अज्ञात व्यक्तींनी लोखंडी रॉड आणि चाकूने प्राणघातक हल्ला केला होता. या हल्ल्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. तनपुरे यांनी हे हल्लेखोर भाजपच्या एका स्थानिक नेत्याचे कार्यकर्ते असल्याचा खळबळजनक आरोपही केला होता. सांगवी पोलिसांनी तपासचक्र वेगाने फिरवत पाच मुख्य आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. तर अभिषेक शेडगे,अंकित कुमार ऊर्फ राजेश मोर्या, ओम ताकवले,ओम इनामदार, चैतन्य कदम अशी आरोपींची नावे आहेत. दरम्यान नागरिकांमधील भीतीचे वातावरण कमी करण्यासाठी पोलिसांनी ज्या परिसरात हल्ला झाला होता, त्याच परिसरातून आरोपींची धिंड काढली. यावेळी आरोपींना रस्त्यावर हात जोडून बसवण्यात आले होते. पोलिसांच्या या सिंघम स्टाईल कारवाईचे सर्वसामान्यांकडून स्वागत होत आहे.... #PimpriChinchwad #SangviPolice #CrimeNews #AssaultCase #CorruptionAllegation #PoliceAction #Arrested #PublicSafety #BreakingNews #MaharashtraNews #पिंपरीचिंचवड #सांगवीपोलीस #गुन्हेवार्ता #हल्लाप्रकरण #भ्रष्टाचारआरोप #पोलीसकारवाई #अटक #सार्वजनिकसुरक्षा #ब्रेकिंगन्यूज #महाराष्ट्रवार्ता
    1
    पिंपरी चिंचवड :-
सांगवी-बोपोडी दरम्यानच्या ३२ कोटींच्या पुलाच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करणारे दीपक मारुतराव तनपुरे यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी सांगवी पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे. परिसरात दहशत माजवणाऱ्या या गुंडांची पोलिसांनी त्याच भागात धिंड काढून त्यांच्यातील हवा काढली आहे....
पुलाच्या कामातील कथित भ्रष्टाचाराबाबत आवाज उठवल्याच्या रागातून दीपक तनपुरे यांच्यावर ४ ते ५ अज्ञात व्यक्तींनी लोखंडी रॉड आणि चाकूने प्राणघातक हल्ला केला होता. या हल्ल्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. तनपुरे यांनी हे हल्लेखोर भाजपच्या एका स्थानिक नेत्याचे कार्यकर्ते असल्याचा खळबळजनक आरोपही केला होता. सांगवी पोलिसांनी तपासचक्र वेगाने फिरवत पाच मुख्य आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. तर अभिषेक शेडगे,अंकित कुमार ऊर्फ राजेश मोर्या, ओम  ताकवले,ओम इनामदार, चैतन्य कदम अशी आरोपींची नावे आहेत. दरम्यान नागरिकांमधील भीतीचे वातावरण कमी करण्यासाठी पोलिसांनी ज्या परिसरात हल्ला झाला होता, त्याच परिसरातून आरोपींची धिंड काढली. यावेळी आरोपींना रस्त्यावर हात जोडून बसवण्यात आले होते. पोलिसांच्या या सिंघम स्टाईल कारवाईचे सर्वसामान्यांकडून स्वागत होत आहे....
#PimpriChinchwad #SangviPolice #CrimeNews #AssaultCase #CorruptionAllegation #PoliceAction #Arrested #PublicSafety #BreakingNews #MaharashtraNews
#पिंपरीचिंचवड #सांगवीपोलीस #गुन्हेवार्ता #हल्लाप्रकरण #भ्रष्टाचारआरोप #पोलीसकारवाई #अटक #सार्वजनिकसुरक्षा #ब्रेकिंगन्यूज #महाराष्ट्रवार्ता
    user_Thenayak
    Thenayak
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    5 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.