अहमदपुरात पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाचा छापा; १ लाख १६ हजारांचा अवैध गुटखा जप्त. अहमदपुरात पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाचा छापा; १ लाख १६ हजारांचा अवैध गुटखा जप्त. सूरू ॲप इन मराठी न्यूज लातूर. लातूर (विशेष प्रतिनिधी): नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक श्री. शहाजी उमाप यांच्या विशेष पथकाने अहमदपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत धडक कारवाई करत १,१६,८८० रुपये किमतीचा अवैध गुटखा जप्त केला आहे. या कारवाईमुळे परिसरातील अवैध व्यवसायिकांचे धाबे दणाणले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी लातूर जिल्हा हद्दीत अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी विशेष पथक रवाना केले होते. या पथकाने मंगळवार, दिनांक १५ सप्टेंबर २०२६ रोजी अहमदपूर तालुक्यातील मौजे उगिलेवाडी येथील एका घरावर छापा टाकला. या छाप्यात १,१६,८८० रुपयांचा प्रतिबंधित गुटखा हस्तगत करण्यात आला. या प्रकरणी आरोपी सुधीर सूर्यकांत बेंबडे आणि अतुल सूर्यकांत बेंबडे (दोघे रा. उगिलेवाडी, ता. अहमदपूर, जि. लातूर) यांच्याविरुद्ध अहमदपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १२३, २२३, २७४, २७५, ३(५) अन्वये गुन्हा नोंद (गु.र.नं. ६१४/२०२६) करण्यात आला आहे. ही यशस्वी कारवाई पोलीस उपनिरीक्षक पंकज इंगळे यांच्यासह पोलीस अंमलदार प्रदीप खानसोळे, गणेश राठोड आणि गजानन डवरे यांच्या पथकाने केली. पथकाच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस उप महानिरीक्षक श्री. शहाजी उमाप यांनी संबंधित अधिकारी व अंमलदारांचे अभिनंदन करून कौतुक केले आहे. 'खबर' हेल्पलाइनवर अवैध व्यवसायांची माहिती देण्याचे आवाहन परिक्षेत्रातील अवैध व्यवसायांचे उच्चाटन करण्यासाठी पोलीस उप महानिरीक्षक कार्यालयाने ९१ ५० १०० १०० हा व्हॉट्सॲप/मोबाईल क्रमांक असलेली 'खबर' हेल्पलाइन सुरू केली आहे. नागरिकांनी आपल्या भागातील अवैध धंद्यांची माहिती थेट या क्रमांकावर देऊन पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक श्री. शहाजी उमाप यांनी केले आहे. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
अहमदपुरात पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाचा छापा; १ लाख १६ हजारांचा अवैध गुटखा जप्त. अहमदपुरात पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाचा छापा; १ लाख १६ हजारांचा अवैध गुटखा जप्त. सूरू ॲप इन मराठी न्यूज लातूर. लातूर (विशेष प्रतिनिधी): नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक श्री. शहाजी उमाप यांच्या विशेष पथकाने अहमदपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत धडक कारवाई करत १,१६,८८० रुपये किमतीचा अवैध गुटखा जप्त केला आहे. या कारवाईमुळे परिसरातील अवैध व्यवसायिकांचे धाबे दणाणले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी लातूर जिल्हा हद्दीत अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी विशेष पथक रवाना केले होते. या पथकाने मंगळवार, दिनांक १५ सप्टेंबर २०२६ रोजी अहमदपूर तालुक्यातील मौजे उगिलेवाडी येथील एका घरावर छापा टाकला. या छाप्यात १,१६,८८० रुपयांचा प्रतिबंधित गुटखा हस्तगत करण्यात आला. या प्रकरणी आरोपी सुधीर सूर्यकांत बेंबडे आणि अतुल सूर्यकांत बेंबडे (दोघे रा. उगिलेवाडी, ता. अहमदपूर, जि. लातूर) यांच्याविरुद्ध अहमदपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १२३, २२३, २७४, २७५, ३(५) अन्वये गुन्हा नोंद (गु.र.नं. ६१४/२०२६) करण्यात आला आहे. ही यशस्वी कारवाई पोलीस उपनिरीक्षक पंकज इंगळे यांच्यासह पोलीस अंमलदार प्रदीप खानसोळे, गणेश राठोड आणि गजानन डवरे यांच्या पथकाने केली. पथकाच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस उप महानिरीक्षक श्री. शहाजी उमाप यांनी संबंधित अधिकारी व अंमलदारांचे अभिनंदन करून कौतुक केले आहे. 'खबर' हेल्पलाइनवर अवैध व्यवसायांची माहिती देण्याचे आवाहन परिक्षेत्रातील अवैध व्यवसायांचे उच्चाटन करण्यासाठी पोलीस उप महानिरीक्षक कार्यालयाने ९१ ५० १०० १०० हा व्हॉट्सॲप/मोबाईल क्रमांक असलेली 'खबर' हेल्पलाइन सुरू केली आहे. नागरिकांनी आपल्या भागातील अवैध धंद्यांची माहिती थेट या क्रमांकावर देऊन पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक श्री. शहाजी उमाप यांनी केले आहे. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
- धनगर समाजाच्या निर्णायक महामोर्चा महा मेळाव्यास थोड्याच वेळात शनिवारबाजार परिसरातून सुरुवात होईल;परभणी येथे निर्णायक महामोर्चास जनसागर उसळला धनगर समाजाच्या निर्णायक महामोर्चा महा मेळाव्यास थोड्याच वेळात शनिवारबाजार परिसरातून सुरुवात होईल;परभणी येथे निर्णायक महामोर्चास जनसागर उसळला सोनपेठ (दर्शन) :- परभणी धनगर समाजाच्या निर्णायक महामोर्चा महा मेळाव्यास थोड्याच वेळात शनिवारबाजार परिसरातून सुरुवात होईल. परभणी जिल्ह्यासह परिसरातील जिल्ह्यातूनही धनगर समाजबांधव या महामेळाव्याप्रसंगी एकवटला आहे.1
- शेतकऱ्यांची व्यथा मुलाने साडी नेसून म्हशीचे दूध काढण्याचा केला प्रयत्न आई वडील काही कामानिमित्त गावी गेले असता म्हैस दूध देत नाही हे पाहून. मुलांनी रोज आई दूध कशी काढते. याचा विचार करून साडी नेसून काढण्याचा प्रयत्न केला .पण तो फेल झाला .ही व्यथा जरी हसण्यासारखी असली तरी याच्यातून शेतकऱ्याची व्यथा नक्की करते1
- 17 सप्टेंबर2026 मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त संजय कुमार चव्हाण सर यांची प्रतिक्रिया. 17 सप्टेंबर 2026 मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त संजय कुमार चव्हाण सर यांची विशेष प्रतिक्रिया.1
- देशभक्तीपर गीतांच्या वातावरणात कोळसा येथे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा! "विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी सुविधांची कमतरता पडू देणार नाही"-संस्थेचे अध्यक्ष श्री भास्करराव बेंगाळ यांचे आश्वासन! सेनगाव/विश्वनाथ देशमुख तालुक्यातील कोळसा येथील विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ संचलित विद्यालयात दि.१७ सप्टेंबर गुरुवार रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन अत्यंत उत्साहात आणि देशभक्तीपर वातावरणात साजरा करण्यात आला.विविध अभिनव उपक्रम,सांगीतिक प्रबोधन आणि विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागाने या सोहळ्याला विशेष रंगत आणली.संस्थेचे अध्यक्ष भास्करराव बेंगाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ठीक ८:०० वाजता संस्थेचे अध्यक्ष श्री.भास्करराव बेंगाळ यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहणाने झाली.यावेळी राष्ट्रध्वजाला सलामी देत राष्ट्रगीत आणि देशभक्तीपर घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.५ सप्टेंबर शिक्षकदिनी स्वयंशासन दिनाचा उपक्रम राबविण्यात आला होता.यामध्ये मुख्याध्यापक म्हणून कु.पूनम धोंडगे आणि उपमुख्याध्यापक म्हणून सौरभ बिडगर यांनी विद्यालयाचा प्रशासकीय प्रभार अत्यंत उत्कृष्टपणे सांभाळला.या दोन्ही विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाचे आणि कौशल्याचे कौतुक करत संस्थेच्या वतीने व्यासपीठावर त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात केकत उंबरा (जि. वाशिम) येथील चेतन सेवांकुर म्युझिकल ऑर्केस्ट्रा ग्रुप यांच्या देशभक्तीपर गीतांच्या बहारदार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यांनी सादर केलेल्या एकापेक्षा एक सरस देशभक्तीपर गीतांनी उपस्थितांची मने जिंकली.तसेच शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देऊन सेवानिवृत्त झालेल्या मान्यवरांचाही यावेळी संस्थेच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला.या सोहळ्याला सेनगाव पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी पी.के.गव्हाणे, केंद्रप्रमुख डी.आर.पायघन आणि शाखा अभियंता टी. व्ही. पिनगाळे आदी मान्यवरांचा सेवानिवृत्तीबद्दल सत्कार करण्यात आला.तसेच व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष भास्करराव बेंगाळ,सचिव अंकुशराव बेंगाळ,उपाध्यक्षा सौ.आनंदीताई बेंगाळ,प्राचार्य अभिषेकभैया बेंगाळ,मुख्याध्यापक व्ही. एम.सरकटे,मुख्याध्यापक आर.बी.शिंदे,पर्यवेक्षक पी.पी.कसाब,परीक्षा विभागप्रमुख चोपडे सर, नर्सिंग कॉलेज,बीसीए व फार्मसी कॉलेजचे प्राचार्य, तसेच केशवराव कापसे, पांडुरंग मोहिते,प्रितेश शिंदे व श्री.भोपाळे सर आदी मान्यवर उपस्थित होते.प्रमुख व्याख्यात्या ह.भ.प. कुमारी भाग्यश्री मोहिते (परभणी) यांनी आपल्या ओजस्वी वाणीतून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या आदर्श राज्यकारभाराचे आणि राजमाता जिजाऊंच्या कर्तृत्वाचा प्रेरणादायी इतिहास मांडला. "मुला-मुलींनी निष्ठेने राहून समाज व देशाची सेवा करावी," असा मौल्यवान संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.अध्यक्षीय भाषणात संस्थेचे अध्यक्ष श्री.भास्करराव बेंगाळ यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.ते म्हणाले की,"संस्थेमध्ये विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासाठी सर्व आवश्यक भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि प्रगतीसाठी सुविधांची कमतरता कधीही पडू देणार नाही.यापुढेही आणखी काही आधुनिक व हायटेक सुविधा संस्थेच्या वतीने उपलब्ध करून दिल्या जातील,"असे ठाम आश्वासन त्यांनी यावेळी दिले.आर.बी.शिंदे यांनी केले उत्कृष्ट सूत्रसंचालन या संपूर्ण सोहळ्याचे अत्यंत नेटके आणि बहारदार सूत्रसंचालन मुख्याध्यापक आर.बी.शिंदे यांनी केले. कार्यक्रमाला संस्थेचे सर्व पदाधिकारी,प्राध्यापक, शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि कोळसा परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.विद्यालयाच्या वतीने सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.2
- उपोषण स्थगित केल्यानंतर मनोज जरांगे पाटील गॅलेक्सी हॉस्पिटलच्या दिशेने उपचारासाठी रवाना1
- मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण संपन्न परभणी जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी शासन कटीबध्द - पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर संभाव्य दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्यशासन तत्पर सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवणार मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण संपन्न परभणी जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी शासन कटीबध्द - पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर संभाव्य दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्यशासन तत्पर सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवणार सोनपेठ (दर्शन) : - मराठवाडा मुक्तीसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागातून मिळालेले स्वातंत्र्य आणि लोकशाही मुल्यांची जपवणूक करत परभणी जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासाला गती देण्यासाठी शासन कटीबध्द आहे, असे प्रतिपादन राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणीपुरवठा व स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमप्रसंगी केले. जिल्हयात पर्जन्यमानात घट झाली असली, तरी शेतकऱ्यांनी संभाव्य टंचाईच्या परिस्थितीला घाबरु नये. शेतकऱ्यांच्या प्रत्येक अडचणीत शासन खंबीरपणे पाठीशी असून आवश्यक त्या सर्व उपाययोजना राबविण्यात येतील, असा दिलासाही पालकमंत्री यांनी दिला. तसेच सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून तळगाळातील लोकांपर्यंत शासनाच्या योजना व सेवा निश्चितपण पोहोचविल्या जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली. परभणी येथील सी. राजगोपालचारी उद्यानात मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या निमित्ताने मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री यांच्या हस्ते झाले. यावेळी महापौर सय्यद इक्बाल, जिल्हा परिषद अध्यक्षा लता वाकळे, खासदार संजय जाधव, उपमहापौर गणेश देशमुख, जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर, पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, महानगरपालिका आयुक्त नितीन नार्वेकर, अपर जिल्हाधिकारी शोभादेवी जाधव, अपर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, स्वातंत्र्य सैनिक यांच्यासह वीरपत्नी, वीर माता-पिता, विद्यार्थी, पत्रकार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभी पालकमंत्री श्रीमती बोर्डीकर यांनी स्मृतिस्तंभास पुष्पचक्र अर्पण करुन हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. यावेळी पोलीस पथकाने शोक धून वाजवून हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडून मानवंदना दिली. पालकमंत्री म्हणाल्या की, मराठवाडा मुक्तीसंग्राम हा केवळ संस्थानाच्या विलिनीकरणाचा नव्हे तर, प्रादेशिक अखंडता, स्वातंत्र्य व सामाजिक हक्कासाठीचा लढा होता. स्वातंत्र्यसैनिकांच्या या त्यागाची जाणीव ठेवून मराठवाड्याच्या सर्वांगिण विकासासाठी सर्वांनी योगदान देणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संविधानिक पदावरील कारकिर्दीला 25 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आजपासून महिनाभर जिल्ह्यात ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येत आहे. ‘सेवा परमोधर्म’ या भावनेतून शासनाच्या विविध योजना व सेवांचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचविणे, जनसहभाग वाढविणे आणि विविध क्षेत्रातील विकासकामांची माहिती या अभियानाच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोचविण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. पालकमंत्री पुढे म्हणाल्या की, राज्य शासनाने ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६’ योजनेंतर्गत परभणी जिल्ह्यातील ५२ हजार ५८३ शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांमध्ये आतापर्यंत ४०८ कोटी रुपये जमा केले आहेत. उर्वरित पात्र शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांमध्येही लवकरच रक्कम जमा होणार आहे. योजनेतील पात्र शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध करण्यात येत असून, पात्र शेतकऱ्यांनी तातडीने आधार प्रमाणीकरण पूर्ण करून घ्यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. चालू खरीप हंगामात प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ५ लाख २३ हजार शेतकऱ्यांनी ३ लाख ६१ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिके विमा काढून संरिक्षत केली आहेत. तसेच नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा-२ अंतर्गत जिल्ह्यातील १७३ गावांची निवड करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत १ हजार २९८ लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर ५६ लाख रुपयांचे अनुदान जमा केले आहे. शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी शासनाकडून विविध योजना राबविण्यात येत असून, शेतकऱ्यांनी त्यांचा लाभ घेऊन शेती अधिक सक्षम व समृद्ध करावी, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले. ‘सेवा संकल्प अभियान’ हे शासनाच्या योजना व सेवा नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासोबतच शेतकरी, युवक, महिला, उद्योजक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या विकासाच्या संधी अधिक सुलभ करण्याचे माध्यम ठरणार आहे. नागरिकांनी अभियानातील विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवून शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री श्रीमती साकोरे-बोर्डीकर यांनी केले. ‘सेवा संकल्प अभियाना’अंतर्गत आजपासून जिल्ह्यात ‘क्षयरोगमुक्त परभणी जिल्हा व नेत्र तपासणी अभियान’ राबविण्यात येणार आहे. तसेच श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना आरोग्य सुविधा सहज उपलब्ध व्हाव्यात, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून ‘श्री गणेशा आरोग्याचा’ अभियान जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. गणेश मंडळांनी या सामाजिक उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा तसेच नागरिकांनीही आयोजित आरोग्य शिबिरांचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले. परभणी ग्रोथ हबच्या माध्यमातून नुकतीच जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद पार पडली. परभणीच्या उद्योग विकासासाठी सोळाशे कोटी रुपयांहून अधिक गुंतवणुकीचे प्रस्ताव दाखल केले असून, सुमारे 162 उद्योग घटकांनी सामंजस्य करार केले आहेत. या गुंतवणुकीच्या माध्यमातून 15 हजारांपेक्षा अधिक रोजगारनिर्मिती होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे ही गुंतवणूक जिल्ह्यातील युवकांसाठी रोजगार व स्वयंरोजगाराच्या नव्या संधी निर्माण करणार असल्याचे पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी सांगितले. परभणी जिल्ह्यातील चालुक्य व यादवकालीन मंदिरे, बारवा, साईबाबा व संत जनाबाई यांची जन्मस्थळे असून, सेाबतच जांभूळबेटसारखी नैसर्गिक पर्यटनस्थळे आहेत. या पर्यटनस्थळांना देशपातळीवर प्रसिद्धी देण्यासाठी विमानतळे तसेच महत्त्वाच्या ठिकाणी दर्शनीय भागात याबाबतची माहिती देण्यात येणार आहे. तसेच पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिक युवकांना गाईड म्हणून रोजगार, तसेच न्याहारी, निवास, स्थानिक उत्पादने आणि कृषी पर्यटनाच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. आरोग्य, ऊर्जा, महिला व बालविकास, शिक्षण, कौशल्य विकास, उद्योजकता व रोजगार या क्षेत्रात जिल्ह्यात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. जिल्ह्यातील आरोग्य सुविधांच्या बळकटीकरणासाठी विविध कामे प्रगतीपथावर आहेत. जिल्हा रुग्णालयातील नवीन कॅथलॅब लवकरच सुरु होईल तर गंगाखेड व सेलू येथील उपजिल्हा रुग्णालयांमध्ये प्रत्येकी 10 खाटांचे नवीन आयसीयू कार्यान्वित झाले आहेत. जिंतूर व बोरी येथील ग्रामीण रुग्णालयांतील प्रसूती कक्षांचे अद्यावतीकरण आणि सेलू येथील नवीन स्त्री रुग्णालय, मानवत ग्रामीण रुग्णालयाचे 50 खाटांमध्ये श्रेणीवर्धनही लवकरच पूर्ण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय विश्वविक्रमी रोजगार महाकुंभा’अंतर्गत दि. 29 रोजी परभणी जिल्ह्यात 13 रोजगार मेळावे घेण्यात येणार असून, यामध्ये युवक-युवतींना विविध रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याचे पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी सांगितले. ध्वजारोहणाच्या मुख्य कार्यक्रमानंतर पालकमंत्री मेघना साकोरे -बोर्डीकर यांनी उपस्थित स्वातंत्र्यसैनिक, शहीद जवान यांच्या वीरमाता, वीरपत्नी, त्यांचे वारस आणि उपस्थित नागरिकांची भेट घेऊन मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक बडगुजर यांनी केले.1
- तेली गल्लीत दोनदा खांदून ही लिकेज सापडेना, नगर परिषद चा अजब कारभार ! :- शेख युनूस तेली गल्लीत दोनदा खांदून ही लिकेज सापडेना, नगर परिषद चा अजब कारभार ! :- शेख युनूस बीड (प्रतिनिधी) बीड शहरातील तेली गल्लीत नगर परिषद च्या भोंगळा कारभाराचा आणखी एक नमुना समोर आला आहे. गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या पाण्याच्या लिकेजसाठी नगरपरिषद ने दोनदा रस्ता खोदला, मात्र लिकेज नेमके कुठे आहे हे सापडले नाही. स्थानिक नागरिकांनी सांगितले की, पाण्याची पाईपलाईन फुटल्याने हजारो लिटर दररोज पाणी वाया जात आहे. तक्रार केल्यानंतर नगरपरिषद ने उशिरा दखल घेतली. आणि जेसीपी लावून रस्ता खोदला. पहिल्यांदा खोदून लिकेज सापडले नाही, म्हणून माती टाकून बुजवले. पुन्हा दुसऱ्यांदा त्याच ठिकाणी खोदले गेले, तरीही लिकेज सापडले नाही. तेली गल्लीतील संपूर्ण रस्ता चिखलमय आणि खड्डेमय झाला आहे. नागरिकांना ये- जा करण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत आहे. आणि तिथे मज्जिद असल्यामुळे लोकांना घाण पाण्यातून जावे लागत आहे. गाड्यांची पाणी लोकांच्या अंगावर जात असून, शाळकरी मुळे यांना पण खूप त्रास सहन करावा लागत आहे. दोनदा खोदकाम करून सुद्धा नगरपरिषद चा पैसा आणि वेळ दोन्ही वाया गेला. हा कसला कारभार? लिकेज शोधण्यासाठी नगरपरिषद कडे एक्सपर्ट टीम नाही का? ते अंदाजे खोदकाम करून बिल काढायचे काम करत आहे का ? असा सवाल सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार शेख युनूस यांनी केला. पुढे ते म्हणाले की, नगर परिषद ने तात्काळ तज्ञ अभियंता यांना पाठवून लिकेज शोधून काढावे व लिकेज दुरुस्ती करून खराब झालेला रस्ता तात्काळ दुरुस्त करावा अशी मागणी नागरिककडूनही केली जात आहे.1
- इतिहास प्रसिद्ध आजेगाव येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात साजरा सेनगाव तालुक्यातील आजेगाव या ठिकाणी आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिन मोठ्या उत्साहात साजरा करून मराठवाडा मुक्ती संग्रामात शहीद झालेल्या शूरवीर जवानांना विनम्र अभिवादन करण्यात आले. मराठवाडा निजामाच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी मराठवाड्यात मोठा रणसंग्राम झाला होता यामध्ये सेनगाव तालुक्यातील आजेगाव या ठिकाणी देखील निजामाच्या शत्रु सोबत सैन्यांची लढाई झाली होती यामध्ये शूरवीर जवान हुतात्मा बहिर्जी शिंदे यांना वीरमरण आले होते त्यांच्या पश्चात उभारण्यात आलेल्या हुतात्मा बहिर्जी स्मारक या ठिकाणी आज ध्वजारोहण करण्यात आले.1
- आंबेडकर जयंती मिरवणूक मार्गावरील घाण पाण्याच्या मुद्द्यावर आंदोलन; आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतर धम्मानंद वाघमारे पोलिसांच्या ताब्यात आंबेडकर जयंती मिरवणूक मार्गावरील घाण पाण्याच्या मुद्द्यावर आंदोलन; आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतर धम्मानंद वाघमारे पोलिसांच्या ताब्यात बीड | प्रतिनिधी बीड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणूक मार्गावर नालीचे दूषित पाणी सोडल्याच्या कथित घटनेप्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करणारे दलित पँथरचे बीड जिल्हाध्यक्ष धम्मानंद वाघमारे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन सुरू होते. प्रशासनाकडून मागण्यांवर कारवाई न झाल्यास मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांसमोर १७ सप्टेंबर रोजी आत्मदहन आंदोलन करण्याचा इशारा वाघमारे यांनी निवेदनातून दिला होता. १४ एप्रिल २०२६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त बीड शहरातून मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणूक मार्गावर नालीचे दूषित व घाण पाणी सोडण्यात आल्याचा आरोप धम्मानंद वाघमारे यांनी केला आहे. या प्रकारामुळे आंबेडकर अनुयायांच्या भावना दुखावल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे. या प्रकरणी बीड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, उपनगराध्यक्ष, स्वच्छता सभापती आणि बांधकाम सभापती यांच्याविरोधात पोलिसांकडे तक्रार करण्यात आल्याचे निवेदनात नमूद आहे. तक्रार करून सुमारे सहा महिने उलटूनही संबंधितांवर कायदेशीर कारवाई झालेली नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी घाण पाणी सोडण्यास जबाबदार असलेल्या अधिकारी व लोकप्रतिनिधींवर अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (अॅट्रॉसिटी अॅक्ट) गुन्हा दाखल करावा, तसेच कर्तव्यात कसूर करणाऱ्या संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधींचे राजीनामे घेण्यात यावेत, अशी मागणी वाघमारे यांनी केली आहे. प्रशासनाने १६ सप्टेंबरपर्यंत कारवाई न केल्यास १७ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांसमोर आत्मदहन आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला होता. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू असताना पोलिसांनी धम्मानंद वाघमारे यांना ताब्यात घेतले. दरम्यान, या प्रकरणातील आरोपांची अधिकृत चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात आली आहे. पोलिसांनी वाघमारे यांना कोणत्या कारणास्तव ताब्यात घेतले आणि त्यांच्यावर कोणती कारवाई करण्यात आली, याबाबत अधिकृत माहिती उपलब्ध होणे अपेक्षित आहे.1