"अट्रोसिटी कायद्यात बदलाचा वाद; तासगावात दलित पँथर सेनेचे जोरदार आंदोलन" तासगाव प्रतिनिधी अट्रोसिटी कायद्यातील तातडीच्या अटकेची तरतूद शिथिल करण्याचा सरकारचा निर्णय हा दलितांवरील अत्याचारांना प्रोत्साहन देणारा असल्याचा आरोप राष्ट्रीय दलित पँथर सेनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रशांत केदार यांनी केला आहे. या निर्णयाच्या निषेधार्थ तहसील कार्यालयासमोर पँथर सेनेच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी आंदोलनकर्त्यांनी दंडाला काळी फित बांधून समाजकल्याण मंत्री संजय शिरसाठ यांच्या राजीनाम्याची मागणी केली. “अट्रोसिटी कायद्यातील बदल हे संविधानविरोधी असून दलित, आदिवासी आणि मागासवर्गीयांच्या अधिकारांवर गदा आणणारे आहेत,” असे मत प्रशांत केदार व राज्य संपर्क प्रमुख युनूस कोल्हापूरे यांनी व्यक्त केले. तहसीलदार अतुल पाटोळे यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले की, अट्रोसिटी कायदा हा केंद्र सरकारचा असून राज्य सरकारने केवळ त्याची अंमलबजावणी करणे अपेक्षित आहे. मात्र तातडीची अटक थांबवून आधी प्राथमिक तपासणी करण्याचा निर्णय हा पीडितांना न्याय मिळण्यात अडथळा निर्माण करणारा आहे. “तातडीची अटक शिथिल केल्यास गुन्हेगारांचे मनोबल वाढेल आणि पीडितांवर दबाव टाकण्याची शक्यता वाढेल,” असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला. तसेच, या निर्णयामुळे दलित आणि आदिवासी समाजाच्या विश्वासाला तडा गेल्याचे सांगत, हा निर्णय तात्काळ मागे न घेतल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. या आंदोलनात प्रमिला गावडे, विजयाताई माळी, निशांत आवळेकर, अंकुश केंगार, ऋषिकेश गुजले, श्रुष्टी कांबळे, गुरुनाथ धाबडे, राहुल साठे, नितीन जाधव यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते. फोटो ओळ : दंडाला काळी फित बांधून समाजकल्याण मंत्री संजय शिरसाठ यांच्या विरोधात निदर्शने करताना प्रशांत केदार, युनूस कोल्हापूरे, प्रमिला गावडे व अन्य कार्यकर्ते.

- हेडलाईन: 🚨 राजस्थानमध्ये भीषण अपघात – पुलावरून कार कोसळली, अनेक जखमी बातमी: राजस्थानमध्ये दिल्ली–मुंबई महामार्गावर भीषण अपघात झाला असून एक कार पुलावरून खाली कोसळली. प्राथमिक माहितीनुसार वाहनाचा वेग नियंत्रणात न राहिल्याने हा अपघात झाला. स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातात सहभागी वाहनावर महाराष्ट्रातील (MH14) नोंदणी असल्याची माहिती समोर येत आहे, मात्र अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही. “अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे” लवकरच तीही पोस्ट करू1
- Post by क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज1
- पिंपरी चिंचवड : - पिंपरी चिंचवड शहरातील भक्ती शक्ती चौकाजवळ काल रात्री साडेआठ वाजता दरम्यान अचानक एका दुचाकी वाहनाने पेठ घेतला आहे. दुचाकी वाहन आगीत जळत असतानाची दृश्य रस्त्याने ये जा करणाऱ्या काही नागरिकांनी आपल्या मोबाईल मध्ये टिपली आहेत. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन दलाने या आगीची वर्दी मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी तातडीने पोहोचून दुचाकी वाहनला लागलेली आग आटोक्यात आणली आहे... #PimpriChinchwad #BhaktiShaktiChowk #BikeFire #FireIncident #BreakingNews #PCMC #FireBrigade #MaharashtraNews #LocalNews #ViralVideo #पिंपरीचिंचवड #भक्तीशक्तीचौक #दुचाकीआग #आगघटना #अग्निशमनदल #ताज्या_बातम्या #स्थानिकबातम्या #महाराष्ट्रन्यूज #ब्रेकिंगन्यूज2
- Post by NEWS 24 MAHARASHTRA1
- निगडीत स्पा सेंटरमध्ये सुरू होता वेश्याव्यवसाय; पोलिसांचा छापा, चालकाविरुद्ध गुन्हा दाखल....1
- #ShivajiMaharaj #ChhatrapatiShivajiMaharaj #ShivajiMaharajRespect #ShivPremi #MaharashtraNews #PimpriChinchwad #BreakingNews #PoliticalNews #BJPControversy #ShivajiStatue #RespectShivaji #MarathiNews #LocalNews #Thergaon #PCMC #NewsUpdate #ViralNews #PublicReaction #MaharashtraPolitics #JusticeForShivaji1
- Post by Maharashtra 18 news1
- पिंपरी चिंचवड : - खंडणीसाठी अपहरण आणि कोयत्याचा धाक दाखवून जबरी चोरी करणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना पिंपरी चिंचवड पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने बेड्या ठोकल्यात, पवन छगन उजगरे, सुमित हनुमंत कराड अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत, या कारवाईत पोलिसांनी दोन रिक्षा, दोन कोयते, मोबाईल फोन आणि काही रोख रक्कम असा 5 लाख 16 हजार 90 रुपयांचा मुद्देमाल ही जप्त केलाय, आरोपींना अटक केल्याने भोसरी आणि सांगवी पोलिसांत दाखल असलेल्या गुन्ह्यांची उकल झाली आहे....2