logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

राष्ट्रवादी विद्यार्थी आक्रमक आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणाला पाठिंबा पुण्यातील मांजरी येथे गेल्या १२ दिवसांपासून विविध न्याय्य मागण्यांसाठी आदिवासी विद्यार्थी आमरण उपोषणाला बसले आहेत. या आंदोलनाची शासनाने तातडीने दखल घेऊन मागण्या प्रकल्प मान्य न केल्यास आंदोलन तीव्र करण्याचा - इशारा राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या विद्यार्थी सेलतर्फे देण्यात आला आहे. यासंदर्भात जव्हार तालुका विद्यार्थी सेलच्या पदाधिकाऱ्यांनी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, जव्हारच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले. मांजरी येथील उपोषणामुळे काही विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक बनली आहे. तरीही प्रशासनाकडून ठोस पावले उचलली जात नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाल्यास त्याची पूर्ण जबाबदारी शासनाची राहील, असा इशारा निवेदनात देण्यात आला. या प्रसंगी पक्षाचे कार्याध्यक्ष सोनू खुताडे, युवक अध्यक्ष विनू मौळे, विद्यार्थी सेल अध्यक्ष राहुल घेगड, महिला तालुका अध्यक्ष मनीषा वाणी, आदिवासी सेल अध्यक्ष संजय भल्ला यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

1 hr ago
user_जितेंद्र मोरघा
जितेंद्र मोरघा
Grain Wholesaler जव्हार, पालघर, महाराष्ट्र•
1 hr ago
1ce1af05-72aa-42df-bdbe-6833ffea1c26

राष्ट्रवादी विद्यार्थी आक्रमक आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणाला पाठिंबा पुण्यातील मांजरी येथे गेल्या १२ दिवसांपासून विविध न्याय्य मागण्यांसाठी आदिवासी विद्यार्थी आमरण उपोषणाला बसले आहेत. या आंदोलनाची शासनाने तातडीने दखल घेऊन मागण्या प्रकल्प मान्य न केल्यास आंदोलन तीव्र करण्याचा - इशारा राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या विद्यार्थी सेलतर्फे देण्यात आला आहे. यासंदर्भात जव्हार तालुका विद्यार्थी सेलच्या पदाधिकाऱ्यांनी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, जव्हारच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले. मांजरी येथील उपोषणामुळे काही विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक बनली आहे. तरीही प्रशासनाकडून ठोस पावले उचलली जात नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाल्यास त्याची पूर्ण जबाबदारी शासनाची राहील, असा इशारा निवेदनात देण्यात आला. या प्रसंगी पक्षाचे कार्याध्यक्ष सोनू खुताडे, युवक अध्यक्ष विनू मौळे, विद्यार्थी सेल अध्यक्ष राहुल घेगड, महिला तालुका अध्यक्ष मनीषा वाणी, आदिवासी सेल अध्यक्ष संजय भल्ला यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • खुपरीत केमिकलची गळती! दुर्गंधीमुळे कामगारांना त्रास; काहींना रुग्णालयात दाखल | वाडा वाडा तालुक्यातील खुपरी परिसरातून एक गंभीर घटना समोर आली आहे. इको ग्रीन कंपनीत केमिकल घेऊन जाणाऱ्या वाहनाला गळती लागल्याने रस्त्यावर केमिकल सांडल्याची घटना घडली. या केमिकलमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली. त्याचा परिणाम आजूबाजूच्या कंपन्यांमधील कामगार तसेच स्थानिक नागरिकांवर झाल्याचे सांगण्यात येत आहे. दुर्गंधीचा त्रास वाढल्याने जवळील कंपनीतील काही कामगारांना कल्याणी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच वाडा पोलीस ठाण्याचे नवनियुक्त सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश कदम यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. त्यांनी परिस्थितीची पाहणी करून घटनेचा पंचनामा करण्याची कार्यवाही केली. तसेच संबंधित कंपनीविरोधात नियमाप्रमाणे आवश्यक ती कारवाई लवकरच करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आल्याचे समजते. या घटनेनंतर खुपरी परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, वाडा तालुक्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिक कंपन्या आणि केमिकलशी संबंधित उद्योग आहेत. त्यामुळे अशा घटनांमध्ये कामगार आणि स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. केमिकल हाताळताना आणि वाहतूक करताना संबंधित कंपन्यांकडून सर्व सुरक्षा नियमांचे पालन केले जाते का? गळती किंवा अपघात झाल्यास तातडीच्या उपाययोजनांची व्यवस्था कंपन्यांकडे आहे का? आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे, नियमांचे उल्लंघन होत असल्यास संबंधित विभाग आणि पोलीस प्रशासन अशा कंपन्यांवर कठोर कारवाई करणार का? याकडे आता स्थानिक नागरिकांचे
    4
    खुपरीत केमिकलची गळती! दुर्गंधीमुळे कामगारांना त्रास; काहींना रुग्णालयात दाखल | वाडा
वाडा तालुक्यातील खुपरी परिसरातून एक गंभीर घटना समोर आली आहे. इको ग्रीन कंपनीत केमिकल घेऊन जाणाऱ्या वाहनाला गळती लागल्याने रस्त्यावर केमिकल सांडल्याची घटना घडली.
या केमिकलमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली. त्याचा परिणाम आजूबाजूच्या कंपन्यांमधील कामगार तसेच स्थानिक नागरिकांवर झाल्याचे सांगण्यात येत आहे.
दुर्गंधीचा त्रास वाढल्याने जवळील कंपनीतील काही कामगारांना कल्याणी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
घटनेची माहिती मिळताच वाडा पोलीस ठाण्याचे नवनियुक्त सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश कदम यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. त्यांनी परिस्थितीची पाहणी करून घटनेचा पंचनामा करण्याची कार्यवाही केली.
तसेच संबंधित कंपनीविरोधात नियमाप्रमाणे आवश्यक ती कारवाई लवकरच करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आल्याचे समजते.
या घटनेनंतर खुपरी परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
दरम्यान, वाडा तालुक्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिक कंपन्या आणि केमिकलशी संबंधित उद्योग आहेत. त्यामुळे अशा घटनांमध्ये कामगार आणि स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
केमिकल हाताळताना आणि वाहतूक करताना संबंधित कंपन्यांकडून सर्व सुरक्षा नियमांचे पालन केले जाते का?
गळती किंवा अपघात झाल्यास तातडीच्या उपाययोजनांची व्यवस्था कंपन्यांकडे आहे का?
आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे, नियमांचे उल्लंघन होत असल्यास संबंधित विभाग आणि पोलीस प्रशासन अशा कंपन्यांवर कठोर कारवाई करणार का?
याकडे आता स्थानिक नागरिकांचे
    user_Sanvad Maharashtra News
    Sanvad Maharashtra News
    वाडा, पालघर, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • मुदखेड तालुका पुरोगामी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी उत्तम हनुमंते; अब्दुल रझाक उपाध्यक्ष, साहेबराव गागलवाड सचिव नूतन कार्यकारिणीची बिनविरोध निवड मुदखेड तालुका पुरोगामी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी उत्तम हनुमंते; अब्दुल रझाक उपाध्यक्ष, साहेबराव गागलवाड सचिव नूतन कार्यकारिणीची बिनविरोध निवड; पत्रकारांच्या हक्कांसाठी आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी संघटितपणे काम करण्याचा निर्धार मुदखेड, दि. २८ ऑगस्ट २०२६ | प्रतिनिधी : मुदखेड तालुका पुरोगामी पत्रकार संघाच्या नूतन कार्यकारिणीची निवड नुकतीच उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. दैनिक **‘एकमत’**चे पत्रकार उत्तम हनुमंते यांची तालुकाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी अब्दुल रझाक, सचिवपदी साहेबराव गागलवाड, सहसचिवपदी राजेश महाशेट्टे, संघटकपदी धम्मदाता कांबळे, सहसंघटकपदी राहुल कोलते, तर सल्लागारपदी अॅड. गोविंद गुजरवाड यांची निवड करण्यात आली. मुदखेड शहरातील विश्रामगृहात २६ ऑगस्ट २०२६ रोजी पुरोगामी पत्रकार संघाची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत तालुका कार्यकारिणी निवड प्रक्रिया पार पडली. जिल्हा, मराठवाडा तसेच राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ (भारत) या राज्यस्तरीय संघटनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. सर्व पदांची बिनविरोध निवड झाल्याने पत्रकारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. उत्तम हनुमंते यांच्यावर तालुकाध्यक्षपदाची जबाबदारी मुदखेड तालुक्यात पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले दैनिक ‘एकमत’चे पत्रकार उत्तम हनुमंते यांच्यावर तालुका पुरोगामी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांच्या निवडीचे उपस्थित पत्रकार आणि पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले. पत्रकारिता ही केवळ बातम्या देण्यापुरती मर्यादित नसून समाजातील विविध घटकांचे प्रश्न प्रशासन आणि शासनापर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण माध्यम आहे. ग्रामीण आणि तालुका पातळीवरील पत्रकारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत पत्रकारांच्या विविध प्रश्नांना संघटितपणे वाचा फोडण्यासाठी नूतन कार्यकारिणी प्रभावीपणे काम करेल, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली. विविध पदांवर पदाधिकाऱ्यांची निवड बैठकीत झालेल्या निवडीनुसार अब्दुल रझाक यांची उपाध्यक्षपदी, साहेबराव गागलवाड यांची सचिवपदी, राजेश महाशेट्टे यांची सहसचिवपदी निवड करण्यात आली. तसेच धम्मदाता कांबळे यांच्यावर संघटकपदाची, तर राहुल कोलते यांच्यावर सहसंघटकपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. अॅड. गोविंद गुजरवाड यांची सल्लागार म्हणून निवड करण्यात आली. कार्यकारिणीच्या सदस्यपदी जयराम वन्ने, सिद्धार्थ चौदंते, साहेबराव हौसरे, राहुल आप्पा चौदंते, देविदास शिंदे आणि प्रकाश गवारे यांची निवड करण्यात आली. नूतन कार्यकारिणीमध्ये अनुभवी तसेच विविध सामाजिक प्रश्नांवर सातत्याने लिखाण करणाऱ्या पत्रकारांचा समावेश झाल्याने संघटनेच्या कार्याला अधिक व्यापक स्वरूप मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. पत्रकारांच्या प्रश्नांसाठी संघटित प्रयत्न तालुका आणि ग्रामीण भागातील पत्रकारांना वार्तांकन करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. प्रशासकीय पातळीवरील माहिती मिळविणे, पत्रकारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न, अधिस्वीकृती व विविध शासकीय सुविधांशी संबंधित अडचणी, पत्रकारांच्या व्यावसायिक हक्कांचे संरक्षण तसेच पत्रकारितेच्या क्षेत्रातील बदलती आव्हाने या विषयांवर संघटनेच्या माध्यमातून आवाज उठविण्याची गरज असल्याचे बैठकीत नमूद करण्यात आले. नूतन कार्यकारिणी पत्रकारांच्या समस्या संबंधित विभाग आणि प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. त्याचबरोबर पत्रकारांनीही सामाजिक बांधिलकी जपत वस्तुनिष्ठ आणि जबाबदार पत्रकारिता करण्याचा निर्धार करावा, अशी अपेक्षा उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. सामाजिक प्रश्नांना प्राधान्य देण्याचा निर्धार पुरोगामी पत्रकार संघाच्या माध्यमातून समाजातील वंचित, दुर्बल आणि गरजू घटकांच्या प्रश्नांना प्रसिद्धी देण्याबरोबरच प्रशासनाचे लक्ष वेधण्याचे काम करण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण, रोजगार, शेती, महिला व युवकांचे प्रश्न तसेच विविध सामाजिक समस्यांवर पत्रकारांनी सकारात्मक आणि तथ्याधारित वार्तांकन करावे, यावरही भर देण्यात आला. पत्रकारिता लोकशाहीचा महत्त्वाचा आधारस्तंभ असल्याने समाजहिताचे प्रश्न सातत्याने मांडणे ही पत्रकारांची जबाबदारी आहे. या भूमिकेतून संघटनेची पुढील वाटचाल करण्यात येईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. महापुरुषांना अभिवादन नूतन कार्यकारिणीची निवड जाहीर झाल्यानंतर उपस्थित पदाधिकारी आणि सदस्यांनी आनंद व्यक्त केला. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करून नूतन कार्यकारिणीच्या निवडीचा उत्साह साजरा करण्यात आला. त्यानंतर महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. समाजसुधारक आणि लोकशाही मूल्यांसाठी संघर्ष करणाऱ्या महापुरुषांच्या विचारांचा पत्रकारितेच्या माध्यमातून प्रसार करण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला. नूतन पदाधिकाऱ्यांचा यावेळी उपस्थितांच्या वतीने सत्कार करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. संघटनेच्या बळकटीसाठी एकजुटीचा संदेश पत्रकारांच्या विविध प्रश्नांवर प्रभावीपणे काम करण्यासाठी संघटनेत एकजूट आणि परस्पर सहकार्य आवश्यक असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. तालुक्यातील पत्रकारांना एका व्यासपीठावर आणून त्यांच्या अडचणी समजून घेणे आणि त्या सोडविण्यासाठी संबंधित यंत्रणांशी संवाद साधणे, याला प्राधान्य देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. पत्रकारांमध्ये वैचारिक मतभेद असले तरी पत्रकारांच्या मूलभूत प्रश्नांवर एकत्रितपणे काम करण्याची भूमिका महत्त्वाची आहे. पत्रकारितेची विश्वासार्हता टिकविण्यासाठी सत्यता, निष्पक्षता आणि सामाजिक बांधिलकी या मूल्यांना प्राधान्य देण्याची गरज असल्याचेही यावेळी अधोरेखित करण्यात आले. नूतन कार्यकारिणीसमोर आव्हाने मुदखेड तालुक्यातील पत्रकारितेला अधिक संघटित आणि सक्षम करण्याचे मोठे आव्हान नूतन कार्यकारिणीसमोर आहे. डिजिटल माध्यमांचा वाढता प्रभाव, सोशल मीडियावर वेगाने पसरणाऱ्या अपुऱ्या किंवा चुकीच्या माहितीचे आव्हान, पत्रकारांच्या बदलत्या भूमिका आणि व्यावसायिक अडचणी या पार्श्वभूमीवर पत्रकारांना अद्ययावत राहणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर पत्रकारांसाठी मार्गदर्शनपर कार्यक्रम, चर्चासत्रे, प्रशिक्षण उपक्रम आणि सामाजिक विषयांवरील जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्याची गरज व्यक्त होत आहे. संघटनेच्या माध्यमातून भविष्यात अशा उपक्रमांना चालना मिळण्याची अपेक्षा आहे. उपस्थितांकडून शुभेच्छांचा वर्षाव नूतन कार्यकारिणीची निवड झाल्यानंतर उपस्थित जिल्हा, मराठवाडा आणि राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांनी सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. संघटनेच्या पुढील वाटचालीसाठी आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासनही यावेळी देण्यात आले. तालुक्यातील पत्रकारांनीही नूतन कार्यकारिणीचे स्वागत करून पत्रकारांच्या प्रश्नांसाठी एकत्रितपणे काम करण्याची भावना व्यक्त केली. मुदखेड तालुका पुरोगामी पत्रकार संघाच्या माध्यमातून पत्रकारांच्या हक्कांसाठी आवाज उठवितानाच समाजातील विविध घटकांचे प्रश्न प्रभावीपणे मांडले जातील. पत्रकारिता अधिक जबाबदार, निर्भीड आणि लोकाभिमुख करण्यासाठी नूतन कार्यकारिणी प्रयत्न करेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. नूतन कार्यकारिणी तालुकाध्यक्ष : उत्तम हनुमंते उपाध्यक्ष : अब्दुल रझाक सचिव : साहेबराव गागलवाड सहसचिव : राजेश महाशेट्टे संघटक : धम्मदाता कांबळे सहसंघटक : राहुल कोलते सल्लागार : अॅड. गोविंद गुजरवाड सदस्य : जयराम वन्ने, सिद्धार्थ चौदंते, साहेबराव हौसरे, राहुल आप्पा चौदंते, देविदास शिंदे आणि प्रकाश गवारे दिव्य भारत बीएसएम न्यूज सत्याची धार, जनतेचा आधार
    3
    मुदखेड तालुका पुरोगामी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी उत्तम हनुमंते; अब्दुल रझाक उपाध्यक्ष, साहेबराव गागलवाड सचिव
नूतन कार्यकारिणीची बिनविरोध निवड
मुदखेड तालुका पुरोगामी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी उत्तम हनुमंते; अब्दुल रझाक उपाध्यक्ष, साहेबराव गागलवाड सचिव
नूतन कार्यकारिणीची बिनविरोध निवड; पत्रकारांच्या हक्कांसाठी आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी संघटितपणे काम करण्याचा निर्धार
मुदखेड, दि. २८ ऑगस्ट २०२६ | प्रतिनिधी :
मुदखेड तालुका पुरोगामी पत्रकार संघाच्या नूतन कार्यकारिणीची निवड नुकतीच उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. दैनिक **‘एकमत’**चे पत्रकार उत्तम हनुमंते यांची तालुकाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी अब्दुल रझाक, सचिवपदी साहेबराव गागलवाड, सहसचिवपदी राजेश महाशेट्टे, संघटकपदी धम्मदाता कांबळे, सहसंघटकपदी राहुल कोलते, तर सल्लागारपदी अॅड. गोविंद गुजरवाड यांची निवड करण्यात आली.
मुदखेड शहरातील विश्रामगृहात २६ ऑगस्ट २०२६ रोजी पुरोगामी पत्रकार संघाची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत तालुका कार्यकारिणी निवड प्रक्रिया पार पडली. जिल्हा, मराठवाडा तसेच राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ (भारत) या राज्यस्तरीय संघटनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. सर्व पदांची बिनविरोध निवड झाल्याने पत्रकारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
उत्तम हनुमंते यांच्यावर तालुकाध्यक्षपदाची जबाबदारी
मुदखेड तालुक्यात पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले दैनिक ‘एकमत’चे पत्रकार उत्तम हनुमंते यांच्यावर तालुका पुरोगामी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांच्या निवडीचे उपस्थित पत्रकार आणि पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले.
पत्रकारिता ही केवळ बातम्या देण्यापुरती मर्यादित नसून समाजातील विविध घटकांचे प्रश्न प्रशासन आणि शासनापर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण माध्यम आहे. ग्रामीण आणि तालुका पातळीवरील पत्रकारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत पत्रकारांच्या विविध प्रश्नांना संघटितपणे वाचा फोडण्यासाठी नूतन कार्यकारिणी प्रभावीपणे काम करेल, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.
विविध पदांवर पदाधिकाऱ्यांची निवड
बैठकीत झालेल्या निवडीनुसार अब्दुल रझाक यांची उपाध्यक्षपदी, साहेबराव गागलवाड यांची सचिवपदी, राजेश महाशेट्टे यांची सहसचिवपदी निवड करण्यात आली.
तसेच धम्मदाता कांबळे यांच्यावर संघटकपदाची, तर राहुल कोलते यांच्यावर सहसंघटकपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. अॅड. गोविंद गुजरवाड यांची सल्लागार म्हणून निवड करण्यात आली.
कार्यकारिणीच्या सदस्यपदी जयराम वन्ने, सिद्धार्थ चौदंते, साहेबराव हौसरे, राहुल आप्पा चौदंते, देविदास शिंदे आणि प्रकाश गवारे यांची निवड करण्यात आली.
नूतन कार्यकारिणीमध्ये अनुभवी तसेच विविध सामाजिक प्रश्नांवर सातत्याने लिखाण करणाऱ्या पत्रकारांचा समावेश झाल्याने संघटनेच्या कार्याला अधिक व्यापक स्वरूप मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
पत्रकारांच्या प्रश्नांसाठी संघटित प्रयत्न
तालुका आणि ग्रामीण भागातील पत्रकारांना वार्तांकन करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. प्रशासकीय पातळीवरील माहिती मिळविणे, पत्रकारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न, अधिस्वीकृती व विविध शासकीय सुविधांशी संबंधित अडचणी, पत्रकारांच्या व्यावसायिक हक्कांचे संरक्षण तसेच पत्रकारितेच्या क्षेत्रातील बदलती आव्हाने या विषयांवर संघटनेच्या माध्यमातून आवाज उठविण्याची गरज असल्याचे बैठकीत नमूद करण्यात आले.
नूतन कार्यकारिणी पत्रकारांच्या समस्या संबंधित विभाग आणि प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. त्याचबरोबर पत्रकारांनीही सामाजिक बांधिलकी जपत वस्तुनिष्ठ आणि जबाबदार पत्रकारिता करण्याचा निर्धार करावा, अशी अपेक्षा उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
सामाजिक प्रश्नांना प्राधान्य देण्याचा निर्धार
पुरोगामी पत्रकार संघाच्या माध्यमातून समाजातील वंचित, दुर्बल आणि गरजू घटकांच्या प्रश्नांना प्रसिद्धी देण्याबरोबरच प्रशासनाचे लक्ष वेधण्याचे काम करण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण, रोजगार, शेती, महिला व युवकांचे प्रश्न तसेच विविध सामाजिक समस्यांवर पत्रकारांनी सकारात्मक आणि तथ्याधारित वार्तांकन करावे, यावरही भर देण्यात आला.
पत्रकारिता लोकशाहीचा महत्त्वाचा आधारस्तंभ असल्याने समाजहिताचे प्रश्न सातत्याने मांडणे ही पत्रकारांची जबाबदारी आहे. या भूमिकेतून संघटनेची पुढील वाटचाल करण्यात येईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
महापुरुषांना अभिवादन
नूतन कार्यकारिणीची निवड जाहीर झाल्यानंतर उपस्थित पदाधिकारी आणि सदस्यांनी आनंद व्यक्त केला. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करून नूतन कार्यकारिणीच्या निवडीचा उत्साह साजरा करण्यात आला.
त्यानंतर महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. समाजसुधारक आणि लोकशाही मूल्यांसाठी संघर्ष करणाऱ्या महापुरुषांच्या विचारांचा पत्रकारितेच्या माध्यमातून प्रसार करण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला.
नूतन पदाधिकाऱ्यांचा यावेळी उपस्थितांच्या वतीने सत्कार करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
संघटनेच्या बळकटीसाठी एकजुटीचा संदेश
पत्रकारांच्या विविध प्रश्नांवर प्रभावीपणे काम करण्यासाठी संघटनेत एकजूट आणि परस्पर सहकार्य आवश्यक असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. तालुक्यातील पत्रकारांना एका व्यासपीठावर आणून त्यांच्या अडचणी समजून घेणे आणि त्या सोडविण्यासाठी संबंधित यंत्रणांशी संवाद साधणे, याला प्राधान्य देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
पत्रकारांमध्ये वैचारिक मतभेद असले तरी पत्रकारांच्या मूलभूत प्रश्नांवर एकत्रितपणे काम करण्याची भूमिका महत्त्वाची आहे. पत्रकारितेची विश्वासार्हता टिकविण्यासाठी सत्यता, निष्पक्षता आणि सामाजिक बांधिलकी या मूल्यांना प्राधान्य देण्याची गरज असल्याचेही यावेळी अधोरेखित करण्यात आले.
नूतन कार्यकारिणीसमोर आव्हाने
मुदखेड तालुक्यातील पत्रकारितेला अधिक संघटित आणि सक्षम करण्याचे मोठे आव्हान नूतन कार्यकारिणीसमोर आहे. डिजिटल माध्यमांचा वाढता प्रभाव, सोशल मीडियावर वेगाने पसरणाऱ्या अपुऱ्या किंवा चुकीच्या माहितीचे आव्हान, पत्रकारांच्या बदलत्या भूमिका आणि व्यावसायिक अडचणी या पार्श्वभूमीवर पत्रकारांना अद्ययावत राहणे आवश्यक आहे.
या पार्श्वभूमीवर पत्रकारांसाठी मार्गदर्शनपर कार्यक्रम, चर्चासत्रे, प्रशिक्षण उपक्रम आणि सामाजिक विषयांवरील जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्याची गरज व्यक्त होत आहे. संघटनेच्या माध्यमातून भविष्यात अशा उपक्रमांना चालना मिळण्याची अपेक्षा आहे.
उपस्थितांकडून शुभेच्छांचा वर्षाव
नूतन कार्यकारिणीची निवड झाल्यानंतर उपस्थित जिल्हा, मराठवाडा आणि राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांनी सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. संघटनेच्या पुढील वाटचालीसाठी आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासनही यावेळी देण्यात आले.
तालुक्यातील पत्रकारांनीही नूतन कार्यकारिणीचे स्वागत करून पत्रकारांच्या प्रश्नांसाठी एकत्रितपणे काम करण्याची भावना व्यक्त केली.
मुदखेड तालुका पुरोगामी पत्रकार संघाच्या माध्यमातून पत्रकारांच्या हक्कांसाठी आवाज उठवितानाच समाजातील विविध घटकांचे प्रश्न प्रभावीपणे मांडले जातील. पत्रकारिता अधिक जबाबदार, निर्भीड आणि लोकाभिमुख करण्यासाठी नूतन कार्यकारिणी प्रयत्न करेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
नूतन कार्यकारिणी
तालुकाध्यक्ष : उत्तम हनुमंते
उपाध्यक्ष : अब्दुल रझाक
सचिव : साहेबराव गागलवाड
सहसचिव : राजेश महाशेट्टे
संघटक : धम्मदाता कांबळे
सहसंघटक : राहुल कोलते
सल्लागार : अॅड. गोविंद गुजरवाड
सदस्य : जयराम वन्ने, सिद्धार्थ चौदंते, साहेबराव हौसरे, राहुल आप्पा चौदंते, देविदास शिंदे आणि प्रकाश गवारे
दिव्य भारत बीएसएम न्यूज
सत्याची धार, जनतेचा आधार
    user_दिव्य भारत बीएसएम न्यूज
    दिव्य भारत बीएसएम न्यूज
    Tour Guide नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    40 min ago
  • नेपाळमध्ये अडकलेल्या राज्यातील पर्यटकांच्या शोधासाठी सरकार सक्रिय नेपाळमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील पर्यटकांचा शोध घेण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न सुरू केले आहेत. याबाबत नेपाळ सरकारच्या संपर्कात असून, महाराष्ट्रातील नागरिकांची माहिती मिळवण्याचे काम सुरू असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. नेपाळमध्ये गेलेल्या पर्यटकांच्या सुरक्षिततेबाबत राज्य सरकारकडून सतत माहिती घेतली जात आहे. संबंधित नागरिकांशी संपर्क साधून त्यांची सद्यस्थिती जाणून घेण्यासह आवश्यक मदत उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचे महाजन यांनी सांगितले.
    1
    नेपाळमध्ये अडकलेल्या राज्यातील पर्यटकांच्या शोधासाठी सरकार सक्रिय
नेपाळमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील पर्यटकांचा शोध घेण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न सुरू केले आहेत. याबाबत नेपाळ सरकारच्या संपर्कात असून, महाराष्ट्रातील नागरिकांची माहिती मिळवण्याचे काम सुरू असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. नेपाळमध्ये गेलेल्या पर्यटकांच्या सुरक्षिततेबाबत राज्य सरकारकडून सतत माहिती घेतली जात आहे. संबंधित नागरिकांशी संपर्क साधून त्यांची सद्यस्थिती जाणून घेण्यासह आवश्यक मदत उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचे महाजन यांनी सांगितले.
    user_Kapil Katyare
    Kapil Katyare
    Photographer नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • पटना से बड़ी खबर सामने आ रही है। आदित्य पटना हाईकोर्ट पहुंचा है और FIR की कॉपी लेकर न्याय की मांग कर रहा है। मामले में वरीय पुलिस अधिकारियों पर गंभीर आरोप लगाए गए हैं। आखिर पूरा मामला क्या है? पुलिस पर क्या आरोप हैं और हाईकोर्ट में क्या हुआ? जानिए इस वीडियो में पूरी जानकारी वीडियो पसंद आए तो Like 👍, Share 🔄 और Channel को Subscribe 🔔 जरूर करें। पटना से बड़ी खबर सामने आ रही है। आदित्य पटना हाईकोर्ट पहुंचा है और FIR की कॉपी लेकर न्याय की मांग कर रहा है। मामले में वरीय पुलिस अधिकारियों पर गंभीर आरोप लगाए गए हैं। आखिर पूरा मामला क्या है? पुलिस पर क्या आरोप हैं और हाईकोर्ट में क्या हुआ? जानिए इस वीडियो में पूरी जानकारी वीडियो पसंद आए तो Like 👍, Share 🔄 और Channel को Subscribe 🔔 जरूर करें।
    1
    पटना से बड़ी खबर सामने आ रही है। आदित्य पटना हाईकोर्ट पहुंचा है और FIR की कॉपी लेकर न्याय की मांग कर रहा है। मामले में वरीय पुलिस अधिकारियों पर गंभीर आरोप लगाए गए हैं। आखिर पूरा मामला क्या है? पुलिस पर क्या आरोप हैं और हाईकोर्ट में क्या हुआ? जानिए इस वीडियो में पूरी जानकारी
वीडियो पसंद आए तो Like 👍, Share 🔄 और Channel को Subscribe 🔔 जरूर करें।
पटना से बड़ी खबर सामने आ रही है। आदित्य पटना हाईकोर्ट पहुंचा है और FIR की कॉपी लेकर न्याय की मांग कर रहा है। मामले में वरीय पुलिस अधिकारियों पर गंभीर आरोप लगाए गए हैं। आखिर पूरा मामला क्या है? पुलिस पर क्या आरोप हैं और हाईकोर्ट में क्या हुआ? जानिए इस वीडियो में पूरी जानकारी
वीडियो पसंद आए तो Like 👍, Share 🔄 और Channel को Subscribe 🔔 जरूर करें।
    user_शीतल कुमार सिंह
    शीतल कुमार सिंह
    Local News Reporter नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • शहापूरमध्ये जलद संयुक्त मोहिमेद्वारे जखमी नीलगायीची सुटका एका दयाळू आणि समयोचित हस्तक्षेपात, शहापूर वन विभाग आणि वन्यजीव कल्याण संघटनेच्या (WWA) संयुक्त कृती दलाने शहापूरच्या चांग्याचापडा येथे एका अत्यंत संकटात सापडलेल्या नीलगायीची यशस्वीपणे सुटका केली. आज संध्याकाळी उशिरा एका दक्ष स्थानिक शेतकऱ्याने आपल्या शेतात आश्रय घेतलेल्या जखमी प्राण्याला पाहिल्यानंतर तात्काळ अधिकाऱ्यांना सतर्क केले, त्यानंतर ही आपत्कालीन मोहीम सुरू करण्यात आली. डोळ्याला स्पष्ट दुखापत झालेली आणि अत्यंत शारीरिक अशक्तपणाने ग्रस्त असलेली ती नीलगाय खूप तणावाखाली होती आणि सुरक्षिततेच्या शोधात सतत शेजारच्या शेतजमिनीवर फिरत होती. कोणताही विलंब न करता, बचाव पथक घटनास्थळी पोहोचले, त्यांनी जलदगतीने जमिनीची पाहणी केली आणि रात्रीच्या आव्हानात्मक परिस्थितीत संपूर्ण परिसरात पद्धतशीरपणे शोध सुरू केला. एका तासाच्या केंद्रित शोधानंतर, बचाव पथकाने त्या संकटात सापडलेल्या प्राण्याला शोधून काढले आणि मध्यरात्री ही नाजूक बचाव मोहीम यशस्वीपणे पार पाडली. पुढील मानसिक आघात टाळण्यासाठी मानवी तंत्रांचा वापर करून नीलगायीला सुरक्षितपणे ताब्यात घेण्यात आले. मध्यरात्रीच्या यशस्वी कारवाईनंतर, नीलगायीला वन विभागाच्या उपचार संक्रमण केंद्रात सुरक्षितपणे नेण्यात आले, जिथे सध्या तिच्यावर विशेष पशुवैद्यकीय उपचार आणि वैद्यकीय देखरेख सुरू आहे. वन्यजीव अधिकाऱ्यांनी चांग्याचापडा येथील रहिवाशांच्या व जीवरक्षक संस्था प्रसंगावधानाचे कौतुक केले आणि स्थानिक वन्यजीवांचे संरक्षण करण्यासाठी व जलद आपत्कालीन उपचार सुनिश्चित करण्यासाठी सामुदायिक सतर्कता अत्यंत महत्त्वाची असल्याचे अधोरेखित केले.
    1
    शहापूरमध्ये जलद संयुक्त मोहिमेद्वारे जखमी नीलगायीची सुटका
एका दयाळू आणि समयोचित हस्तक्षेपात, शहापूर वन विभाग आणि वन्यजीव कल्याण संघटनेच्या (WWA) संयुक्त कृती दलाने शहापूरच्या चांग्याचापडा येथे एका अत्यंत संकटात सापडलेल्या नीलगायीची यशस्वीपणे सुटका केली. आज संध्याकाळी उशिरा एका दक्ष स्थानिक शेतकऱ्याने आपल्या शेतात आश्रय घेतलेल्या जखमी प्राण्याला पाहिल्यानंतर तात्काळ अधिकाऱ्यांना सतर्क केले, त्यानंतर ही आपत्कालीन मोहीम सुरू करण्यात आली.
डोळ्याला स्पष्ट दुखापत झालेली आणि अत्यंत शारीरिक अशक्तपणाने ग्रस्त असलेली ती नीलगाय खूप तणावाखाली होती आणि सुरक्षिततेच्या शोधात सतत शेजारच्या शेतजमिनीवर फिरत होती. कोणताही विलंब न करता, बचाव पथक घटनास्थळी पोहोचले, त्यांनी जलदगतीने जमिनीची पाहणी केली आणि रात्रीच्या आव्हानात्मक परिस्थितीत संपूर्ण परिसरात पद्धतशीरपणे शोध सुरू केला. एका तासाच्या केंद्रित शोधानंतर, बचाव पथकाने त्या संकटात सापडलेल्या प्राण्याला शोधून काढले आणि मध्यरात्री ही नाजूक बचाव मोहीम यशस्वीपणे पार पाडली. पुढील मानसिक आघात टाळण्यासाठी मानवी तंत्रांचा वापर करून नीलगायीला सुरक्षितपणे ताब्यात घेण्यात आले.
मध्यरात्रीच्या यशस्वी कारवाईनंतर, नीलगायीला वन विभागाच्या उपचार संक्रमण केंद्रात सुरक्षितपणे नेण्यात आले, जिथे सध्या तिच्यावर विशेष पशुवैद्यकीय उपचार आणि वैद्यकीय देखरेख सुरू आहे. वन्यजीव अधिकाऱ्यांनी चांग्याचापडा येथील रहिवाशांच्या व जीवरक्षक संस्था प्रसंगावधानाचे कौतुक केले आणि स्थानिक वन्यजीवांचे संरक्षण करण्यासाठी व जलद आपत्कालीन उपचार सुनिश्चित करण्यासाठी सामुदायिक सतर्कता अत्यंत महत्त्वाची असल्याचे अधोरेखित केले.
    user_लोक हिंद चॅनल
    लोक हिंद चॅनल
    Journalist शहापूर, ठाणे, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • १६० कामगारांच्या पुनर्नियुक्तीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण आमदार हिरामण खोसकरांचा पाठिंबा इगतपुरी तालुक्यातील वाडीवरे येथील रुठे यार्ड इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतील सुमारे १६० कामगारांना पुन्हा कामावर घ्यावे, तसेच अनेक वर्षांपासून नियमित उत्पादनाचे काम करणाऱ्या या कामगारांना कायम कामगारांप्रमाणे वेतन व अन्य लाभ द्यावेत, या प्रमुख मागणीसाठी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे. या आंदोलनाला इगतपुरी मतदार संघाचे आमदार हिरामण खोसकर यांनी पाठिंबा दर्शवला असून कंपनीतील हे सुमारे १६० कामगार गेल्या अनेक वर्षांपासून उत्पादन विभागात मशीन ऑपरेशनसह विविध नियमित स्वरूपाची कामे सातत्याने करत असल्याचा दावा कामगार संघटनेने केला आहे. मात्र, एवढ्या काळापासून कंपनीच्या उत्पादन प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावूनही त्यांच्या प्रश्नांकडे व्यवस्थापनाकडून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. कामगारांच्या मागण्यांसंदर्भात नाशिक वर्कर्स युनियन सिटी संलग्न संघटनेने १३ मे २०२६ रोजी कामगार आयुक्त, नाशिक विभाग यांच्याकडे निवेदन सादर केले होते. संबंधित कामगारांना पुन्हा कामावर घेऊन कायम कामगारांप्रमाणे वेतन, सेवा-सुविधा आणि अन्य लाभ देण्यात यावेत, अशी मागणी त्यामध्ये करण्यात आली होती. दरम्यान, कंत्राटी पद्धतीचे निर्मूलन करण्याबाबतचा प्रस्ताव कामगार विभागाने राज्य सरकारकडे सादर केला असल्याचे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले. त्यामुळे कंपनीतील कामगारांच्या रोजगाराच्या स्वरूपाबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात येत असून, नियमित स्वरूपाचे काम करणाऱ्या कामगारांना योग्य सेवा-सुरक्षा आणि लाभ मिळावेत, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. या प्रश्नावर कंपनी व्यवस्थापनासोबत वेळोवेळी चर्चा करून तोडगा काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, व्यवस्थापनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नसल्याचा आरोप आमदार हिरामण खोसकर यांनी केला असून कामगारांच्या मागण्यांवर ठोस निर्णय होऊन त्यांना न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार, असा इशाराही त्यांनी दिला दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू झालेल्या या बेमुदत उपोषणामुळे १६० कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, कंपनी व्यवस्थापन आणि प्रशासन या आंदोलनाची कशी दखल घेते, याकडे कामगारांचे लक्ष लागले आहे.
    4
    १६० कामगारांच्या पुनर्नियुक्तीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण

आमदार हिरामण खोसकरांचा पाठिंबा
इगतपुरी तालुक्यातील वाडीवरे येथील रुठे यार्ड इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतील सुमारे १६० कामगारांना पुन्हा कामावर घ्यावे, तसेच अनेक वर्षांपासून नियमित उत्पादनाचे काम करणाऱ्या या कामगारांना कायम कामगारांप्रमाणे वेतन व अन्य लाभ द्यावेत, या प्रमुख मागणीसाठी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे. या आंदोलनाला इगतपुरी मतदार संघाचे आमदार हिरामण खोसकर यांनी पाठिंबा  दर्शवला असून 
कंपनीतील हे सुमारे १६० कामगार गेल्या अनेक वर्षांपासून उत्पादन विभागात मशीन ऑपरेशनसह विविध नियमित स्वरूपाची कामे सातत्याने करत असल्याचा दावा कामगार संघटनेने केला आहे. मात्र, एवढ्या काळापासून कंपनीच्या उत्पादन प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावूनही त्यांच्या प्रश्नांकडे व्यवस्थापनाकडून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.
कामगारांच्या मागण्यांसंदर्भात नाशिक वर्कर्स युनियन सिटी संलग्न संघटनेने १३ मे २०२६ रोजी कामगार आयुक्त, नाशिक विभाग यांच्याकडे निवेदन सादर केले होते. संबंधित कामगारांना पुन्हा कामावर घेऊन कायम कामगारांप्रमाणे वेतन, सेवा-सुविधा आणि अन्य लाभ देण्यात यावेत, अशी मागणी त्यामध्ये करण्यात आली होती.
दरम्यान, कंत्राटी पद्धतीचे निर्मूलन करण्याबाबतचा प्रस्ताव कामगार विभागाने राज्य सरकारकडे सादर केला असल्याचे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले. त्यामुळे कंपनीतील कामगारांच्या रोजगाराच्या स्वरूपाबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात येत असून, नियमित स्वरूपाचे काम करणाऱ्या कामगारांना योग्य सेवा-सुरक्षा आणि लाभ मिळावेत, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे.
या प्रश्नावर कंपनी व्यवस्थापनासोबत वेळोवेळी चर्चा करून तोडगा काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, व्यवस्थापनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नसल्याचा आरोप आमदार हिरामण खोसकर यांनी केला असून कामगारांच्या मागण्यांवर ठोस निर्णय होऊन त्यांना न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार, असा इशाराही त्यांनी दिला 
दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू झालेल्या या बेमुदत उपोषणामुळे १६० कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, कंपनी व्यवस्थापन आणि प्रशासन या आंदोलनाची कशी दखल घेते, याकडे कामगारांचे लक्ष लागले आहे.
    user_Anil GUNJAL
    Anil GUNJAL
    नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • durvesh bridge crack bhot bhoda dayak hai is par gadi chalna please shear durvesh bridge crack bhot bhoda dayak hai is par gadi chalna please shear
    1
    durvesh bridge crack 
bhot bhoda dayak hai is par gadi chalna 
please shear 
durvesh bridge crack 
bhot bhoda dayak hai is par gadi chalna 
please shear
    user_Tausif Pathan
    Tausif Pathan
    Concrete contractor वाडा, पालघर, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • मविप्र कृषी महाविद्यालयाच्या नूतन वास्तूचे दिनांक 28 ऑगस्ट ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन चाचडगाव येथे १४ एकरांच्या प्रशस्त कॅम्पसमध्ये अत्याधुनिक सुविधा; १०९ एकरांवर विद्यार्थ्यांसाठी प्रात्यक्षिक शेती क्षेत्र मविप्र कृषी महाविद्यालयाच्या नूतन वास्तूचे दिनांक 28 ऑगस्ट ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन चाचडगाव येथे १४ एकरांच्या प्रशस्त कॅम्पसमध्ये अत्याधुनिक सुविधा; १०९ एकरांवर विद्यार्थ्यांसाठी प्रात्यक्षिक शेती क्षेत्र दिव्य भारत बीएसएम न्यूज दिनांक २६ ऑगस्ट २०२६ | नाशिक, (प्रतिनिधी : निलेश शेकोकार):- मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक संस्थेच्या ‘कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषी महाविद्यालया’च्या नूतन वास्तूचा उद्घाटन सोहळा शुक्रवार, दिनांक . २८ ऑगस्ट २०२६ रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते चाचडगाव, तालुका दिंडोरी येथे होणार आहे. महाविद्यालयाची मुख्य इमारत मुलांचे आणि मुलींचे सुसज्ज वसतीगृह या तीन भव्य इमारतींचे उद्घाटन या वेळी करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाची माहिती मविप्र संस्थेचे सरचिटणीस ॲडव्हॅकेट नितीन ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. मविप्र संस्थेच्या मध्यवर्ती कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेस संस्थेचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपाध्यक्ष विश्वासराव मोरे, शिक्षणाधिकारी आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन राहणार आहेत. अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांच्यासह नाशिक जिल्ह्यातील खासदार राजाराम वाजे, खासदार भास्कर भगरे, आमदार उपस्थित राहणार आहेत. नाशिक महापालिकेच्या महापौर श्रीमती हिमगिरी आहेर-आडके व उपमहापौर विलास शिंदे यांचीही प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमास मविप्र संस्थेचे सरचिटणीस ॲडव्होकेट . नितीन ठाकरे, अध्यक्ष डॉक्टर सुनील ढिकले, सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपाध्यक्ष विश्वासराव मोरे, उपसभापती डी. बी. मोगल, चिटणीस दिलीप दळवी, दिंडोरी तालुका संचालक प्रवीण जाधव यांच्यासह संस्थेचे कार्यकारी मंडळ, शिक्षणाधिकारी, सभासद, सेवक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. २००३ पासून कृषी शिक्षणाची वाटचाल नाशिक जिल्हा हा फळे, फुले आणि भाजीपाला उत्पादनासाठी महाराष्ट्रात अग्रगण्य मानला जातो. जिल्ह्यातील कृषी क्षेत्राची गरज लक्षात घेऊन मराठा विद्या प्रसारक समाजाने दिनांक १ नोव्हेंबर २००३ रोजी नाशिक शहरात महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी मान्यताप्राप्त व संलग्नित कृषी महाविद्यालयाची सुरुवात केली. पुढे या महाविद्यालयाचे ‘कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषी महाविद्यालय’ असे नामकरण करण्यात आले. कृषी शिक्षण केवळ वर्गखोल्यांपुरते मर्यादित न राहता विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शेतीचा अनुभव मिळावा आणि ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा लाभ मिळावा, या उद्देशाने महाविद्यालयाचे नाशिक शहरातून दिंडोरी तालुक्यातील नाशिक-पेठ महामार्गावरील मौजे चाचडगाव येथे स्थलांतर करण्यात आले. १४ एकरांचा अत्याधुनिक कॅम्पस चाचडगाव येथे तब्बल १४ एकर जागेवर महाविद्यालयाचा प्रशस्त व आधुनिक कॅम्पस उभारण्यात आला आहे. या परिसरात प्रशासकीय इमारत, मुलांचे व मुलींचे स्वतंत्र वसतीगृह, भव्य ग्रंथालय, ई-लायब्ररी, स्पर्धा परीक्षा मंच, संगणक प्रयोगशाळा तसेच विविध शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. महाविद्यालयातील सर्व दहा विभागांसाठी अद्ययावत प्रयोगशाळा, आधुनिक शिक्षण साहित्याने सुसज्ज व्याख्यान कक्ष, वाय-फाय आणि इंटरनेट सुविधा उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक सुविधांसोबतच निवास आणि अभ्यासासाठी आवश्यक वातावरण निर्माण करण्यात आले आहे. १०९ एकरांवर प्रात्यक्षिक शेती कृषी शिक्षणातील सर्वांत महत्त्वाचा भाग म्हणजे प्रत्यक्ष शेतीचा अनुभव. ही गरज लक्षात घेऊन विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिकांसाठी तब्बल १०९ एकर जमीन क्षेत्र तयार करण्यात आले आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध पिकांचे उत्पादन, आधुनिक शेती तंत्रज्ञान, पीक व्यवस्थापन, कृषी प्रयोग, संशोधन आणि शेतकरी मार्गदर्शन यांचा प्रत्यक्ष अनुभव मिळणार आहे. महाविद्यालयात चार वर्षांचा बी.एस्सी. कृषी पदवी अभ्यासक्रम असून दरवर्षी १२० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. त्याच कॅम्पसमध्ये मराठी माध्यमाचे कृषी विद्यालय आणि इंग्रजी माध्यमाचे कृषी तंत्रनिकेतन विद्यालयही सुरू आहे. त्यामुळे कृषी शिक्षणाची साखळी अधिक सक्षम झाली आहे. ‘अ’ दर्जासह विविध पुरस्कारांनी गौरव महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांनी महाविद्यालयातील शैक्षणिक सुविधा, पायाभूत सुविधा आणि शैक्षणिक गुणवत्तेचा आढावा घेत सन २०२२-२३ मध्ये महाविद्यालयास ‘अ’ दर्जा प्रदान केला. तसेच सन २०२४ मध्ये ‘कृषीभूषण महाराष्ट्र एफपीओ फेडरेशन’तर्फे महाविद्यालयाला ‘कृषीभूषण-२०२४’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ‘KRUSHITHON 2024’मध्ये महाविद्यालयाला ‘प्रयोगशील कृषी महाविद्यालय’ हा पुरस्कार मिळाला. या पुरस्कारांमुळे महाविद्यालयाच्या कृषी शिक्षण, प्रयोगशीलता आणि संशोधनाच्या कार्याला विशेष अधोरेखित करण्यात आले आहे. संशोधन आणि शेतकरी सेवेला प्राधान्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बापूसाहेब भाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली दहा विभागांचे प्रमुख, २८ शिक्षक आणि ४४ शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत आहेत. कृषी क्षेत्रातील बदलत्या तंत्रज्ञानाचा विद्यार्थ्यांना लाभ मिळावा, तसेच संशोधनाला चालना मिळावी, यासाठी महाविद्यालयाकडून विविध उपक्रम राबविले जात आहेत. आधुनिक कृषी तंत्रज्ञान, प्रयोगशील शेती, संशोधन आणि शेतकरी सेवा यांचा समन्वय साधत नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे. शिक्षण, संशोधन आणि शेतकरी सेवा यांच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यातील गावांचा कृषी व आर्थिक विकास साधणे हेच महाविद्यालयाचे प्रमुख ध्येय असल्याचे ॲडव्होकेट नितीन ठाकरे यांनी स्पष्ट केले. मविप्र संस्थेच्या कृषी शिक्षणाच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे ग्रामीण विद्यार्थ्यांना आधुनिक कृषी शिक्षणाच्या अधिक चांगल्या संधी उपलब्ध होणार असून, शेतकरी आणि कृषी क्षेत्राशी संबंधित घटकांनाही त्याचा मोठा लाभ होण्याची अपेक्षा आहे. दिव्य भारत बीएसएम न्यूज नाशिक प्रतिनिधी : निलेश शेकोकार, नाशिक दिव्य भारत बीएसएम न्यूज मुख्य संपादक : प्रा. डॉक्टर भागवत महाले
    2
    मविप्र कृषी महाविद्यालयाच्या नूतन वास्तूचे  दिनांक 28 ऑगस्ट ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन
चाचडगाव येथे १४ एकरांच्या प्रशस्त कॅम्पसमध्ये अत्याधुनिक सुविधा; १०९ एकरांवर विद्यार्थ्यांसाठी प्रात्यक्षिक शेती क्षेत्र
मविप्र कृषी महाविद्यालयाच्या नूतन वास्तूचे  दिनांक 28 ऑगस्ट ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन
चाचडगाव येथे १४ एकरांच्या प्रशस्त कॅम्पसमध्ये अत्याधुनिक सुविधा; १०९ एकरांवर विद्यार्थ्यांसाठी प्रात्यक्षिक शेती क्षेत्र
दिव्य भारत बीएसएम न्यूज 
दिनांक २६ ऑगस्ट २०२६ |
नाशिक, (प्रतिनिधी : निलेश शेकोकार):-
मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक संस्थेच्या ‘कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषी महाविद्यालया’च्या नूतन वास्तूचा उद्घाटन सोहळा शुक्रवार, दिनांक . २८ ऑगस्ट २०२६ रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री  देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते चाचडगाव, तालुका दिंडोरी येथे होणार आहे. महाविद्यालयाची मुख्य इमारत  मुलांचे आणि मुलींचे सुसज्ज वसतीगृह या तीन भव्य इमारतींचे उद्घाटन या वेळी करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाची माहिती मविप्र संस्थेचे सरचिटणीस ॲडव्हॅकेट नितीन ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मविप्र संस्थेच्या मध्यवर्ती कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेस संस्थेचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपाध्यक्ष विश्वासराव मोरे, शिक्षणाधिकारी आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री  गिरीश महाजन राहणार आहेत. अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, शालेय शिक्षणमंत्री  दादाजी भुसे, अन्न व औषध प्रशासन मंत्री  नरहरी झिरवाळ, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे,  राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांच्यासह नाशिक जिल्ह्यातील खासदार  राजाराम वाजे,  खासदार भास्कर भगरे, आमदार उपस्थित राहणार आहेत.
नाशिक महापालिकेच्या महापौर श्रीमती हिमगिरी आहेर-आडके व उपमहापौर  विलास शिंदे यांचीही प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या कार्यक्रमास मविप्र संस्थेचे सरचिटणीस ॲडव्होकेट . नितीन ठाकरे, अध्यक्ष डॉक्टर सुनील ढिकले, सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपाध्यक्ष विश्वासराव मोरे, उपसभापती डी. बी. मोगल, चिटणीस दिलीप दळवी, दिंडोरी तालुका संचालक प्रवीण जाधव यांच्यासह संस्थेचे कार्यकारी मंडळ, शिक्षणाधिकारी, सभासद, सेवक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
२००३ पासून कृषी शिक्षणाची वाटचाल नाशिक जिल्हा हा फळे, फुले आणि भाजीपाला उत्पादनासाठी महाराष्ट्रात अग्रगण्य मानला जातो. जिल्ह्यातील कृषी क्षेत्राची गरज लक्षात घेऊन मराठा विद्या प्रसारक समाजाने दिनांक १ नोव्हेंबर २००३ रोजी नाशिक शहरात महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी मान्यताप्राप्त व संलग्नित कृषी महाविद्यालयाची सुरुवात केली. पुढे या महाविद्यालयाचे ‘कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषी महाविद्यालय’ असे नामकरण करण्यात आले.
कृषी शिक्षण केवळ वर्गखोल्यांपुरते मर्यादित न राहता विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शेतीचा अनुभव मिळावा आणि ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा लाभ मिळावा, या उद्देशाने महाविद्यालयाचे नाशिक शहरातून दिंडोरी तालुक्यातील नाशिक-पेठ महामार्गावरील मौजे चाचडगाव येथे स्थलांतर करण्यात आले.
१४ एकरांचा अत्याधुनिक कॅम्पस
चाचडगाव येथे तब्बल १४ एकर जागेवर महाविद्यालयाचा प्रशस्त व आधुनिक कॅम्पस उभारण्यात आला आहे. या परिसरात प्रशासकीय इमारत, मुलांचे व मुलींचे स्वतंत्र वसतीगृह, भव्य ग्रंथालय, ई-लायब्ररी, स्पर्धा परीक्षा मंच, संगणक प्रयोगशाळा तसेच विविध शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
महाविद्यालयातील सर्व दहा विभागांसाठी अद्ययावत प्रयोगशाळा, आधुनिक शिक्षण साहित्याने सुसज्ज व्याख्यान कक्ष, वाय-फाय आणि इंटरनेट सुविधा उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक सुविधांसोबतच निवास आणि अभ्यासासाठी आवश्यक वातावरण निर्माण करण्यात आले आहे.
१०९ एकरांवर प्रात्यक्षिक शेती
कृषी शिक्षणातील सर्वांत महत्त्वाचा भाग म्हणजे प्रत्यक्ष शेतीचा अनुभव. ही गरज लक्षात घेऊन विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिकांसाठी तब्बल १०९ एकर जमीन क्षेत्र तयार करण्यात आले आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध पिकांचे उत्पादन, आधुनिक शेती तंत्रज्ञान, पीक व्यवस्थापन, कृषी प्रयोग, संशोधन आणि शेतकरी मार्गदर्शन यांचा प्रत्यक्ष अनुभव मिळणार आहे.
महाविद्यालयात चार वर्षांचा बी.एस्सी. कृषी पदवी अभ्यासक्रम असून दरवर्षी १२० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. त्याच कॅम्पसमध्ये मराठी माध्यमाचे कृषी विद्यालय आणि इंग्रजी माध्यमाचे कृषी तंत्रनिकेतन विद्यालयही सुरू आहे. त्यामुळे कृषी शिक्षणाची साखळी अधिक सक्षम झाली आहे.
‘अ’ दर्जासह विविध पुरस्कारांनी गौरव
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांनी महाविद्यालयातील शैक्षणिक सुविधा, पायाभूत सुविधा आणि शैक्षणिक गुणवत्तेचा आढावा घेत सन २०२२-२३ मध्ये महाविद्यालयास ‘अ’ दर्जा प्रदान केला. तसेच सन २०२४ मध्ये ‘कृषीभूषण महाराष्ट्र एफपीओ फेडरेशन’तर्फे महाविद्यालयाला ‘कृषीभूषण-२०२४’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
‘KRUSHITHON 2024’मध्ये महाविद्यालयाला ‘प्रयोगशील कृषी महाविद्यालय’ हा पुरस्कार मिळाला. या पुरस्कारांमुळे महाविद्यालयाच्या कृषी शिक्षण, प्रयोगशीलता आणि संशोधनाच्या कार्याला विशेष अधोरेखित करण्यात आले आहे.
संशोधन आणि शेतकरी सेवेला प्राधान्य
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बापूसाहेब भाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली दहा विभागांचे प्रमुख, २८ शिक्षक आणि ४४ शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत आहेत. कृषी क्षेत्रातील बदलत्या तंत्रज्ञानाचा विद्यार्थ्यांना लाभ मिळावा, तसेच संशोधनाला चालना मिळावी, यासाठी महाविद्यालयाकडून विविध उपक्रम राबविले जात आहेत.
आधुनिक कृषी तंत्रज्ञान, प्रयोगशील शेती, संशोधन आणि शेतकरी सेवा यांचा समन्वय साधत नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे. शिक्षण, संशोधन आणि शेतकरी सेवा यांच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यातील गावांचा कृषी व आर्थिक विकास साधणे हेच महाविद्यालयाचे प्रमुख ध्येय असल्याचे ॲडव्होकेट नितीन ठाकरे यांनी स्पष्ट केले.
मविप्र संस्थेच्या कृषी शिक्षणाच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे ग्रामीण विद्यार्थ्यांना आधुनिक कृषी शिक्षणाच्या अधिक चांगल्या संधी उपलब्ध होणार असून, शेतकरी आणि कृषी क्षेत्राशी संबंधित घटकांनाही त्याचा मोठा लाभ होण्याची अपेक्षा आहे.
दिव्य भारत बीएसएम न्यूज 
नाशिक प्रतिनिधी : निलेश शेकोकार, नाशिक
दिव्य भारत बीएसएम न्यूज
मुख्य संपादक : प्रा. डॉक्टर भागवत महाले
    user_दिव्य भारत बीएसएम न्यूज
    दिव्य भारत बीएसएम न्यूज
    Tour Guide नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    13 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.