logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

उरण नागाव समुद्रकिनारी पाच पर्यटकांचे थरारक बचाव; सुरक्षा उपाययोजनांच्या अभावामुळे धोका कायम धोक्याच्या सूचना फलकांचा अभाव, टेहाळणी चौक्यांची कमतरता; वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे प्रशासनावर प्रश्नचिन्ह ० उरणच्या नागाव समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांची दिवसेंदिवस वाढ ० भरतीच्या वेळी पाण्यात अडकण्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ ० किनाऱ्यावर धोक्याचे इशारे देणारे फलक नाहीत ग्रामपंचायत व प्रशासनाकडून सुरक्षा उपाययोजनांचा अभाव ० सागरी सुरक्षा रक्षकांकडे अपुरी साधनसामग्री ० सहा–सात किमी लांबीच्या किनाऱ्यावर टेहाळणी चौक्यांचा अभाव उरण तालुक्यातील नागाव समुद्रकिनाऱ्यावर सोमवारी संध्याकाळी पाच पर्यटक समुद्राच्या पाण्यात अडकल्याची धक्कादायक घटना घडली. मात्र सागर सुरक्षा रक्षकांनी प्रसंगावधान राखत तात्काळ धाव घेत सर्व पर्यटकांना सुरक्षित बाहेर काढत त्यांचा जीव वाचवला. या घटनेमुळे पुन्हा एकदा किनाऱ्यावरील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. उरण तालुका हा निसर्गसंपन्न किनारपट्टीसाठी ओळखला जातो. येथील नागाव समुद्रकिनारा पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत असून, दररोज मोठ्या संख्येने पर्यटक येथे भेट देतात. विशेषतः पिरवाडी परिसरात पीर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचीही मोठी गर्दी असते. याच दरम्यान अनेक पर्यटक समुद्रात उतरून मौजमजा करताना भरतीच्या वेळी अडकण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. या किनाऱ्यावर धोक्याच्या सूचना देणारे फलक नसल्याने पर्यटक बेधडक पाण्यात उतरून आपला जीव धोक्यात घालत आहेत. तर येथे अशाप्रकारचे धोक्याच्या सूचना देणारे फलक लावण्याची मागणी आता होत आहे.  सोमवारी घडलेल्या घटनेत, पिरवाडी परिसरात पाच पर्यटक समुद्राच्या वाढत्या पाण्यात अडकले होते. माहिती मिळताच सागर सुरक्षा रक्षकांनी जीवाची पर्वा न करता बचावकार्य सुरू केले आणि सर्वांना सुखरूप बाहेर काढले. त्यांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला. मात्र, या किनाऱ्यावर वारंवार अशा घटना घडत असतानाही मूलभूत सुरक्षा उपाययोजनांचा अभाव गंभीर चिंता निर्माण करणारा ठरत आहे. किनाऱ्यावरील धोकादायक भागांबाबत इशारा देणारे फलक अद्याप लावण्यात आलेले नाहीत. तसेच ग्रामपंचायत, तहसील प्रशासन, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा किंवा बंदर विभागाकडून ठोस उपाययोजना होताना दिसत नाहीत. याशिवाय, सागरी सुरक्षा रक्षकांना कार्यरत राहण्यासाठी आवश्यक सुविधा देखील अपुऱ्या आहेत. जवळपास सहा ते सात किलोमीटर लांबीच्या या विस्तीर्ण किनाऱ्यावर एकही टेहाळणी चौकी नसल्याने रक्षकांना साहित्य ठेवण्यासाठी आणि सतत देखरेख ठेवण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अपुऱ्या साधनसामग्रीतच ते जीव धोक्यात घालून पर्यटकांचे प्राण वाचवत आहेत. दरम्यान किनाऱ्यावर ज्याठिकाणी सातात्याने अपघात होत आहेत अशा ठिकाणी धोक्याच्या सूचना देणारे फलक असणे आवश्यक असताना प्रशासनाकडून किनातेही फलक लावण्यात आलेले नाहीत. ज्यामुळे पर्यटकांचे जीव अधिकच धोक्यात येतं आहेत.  दरवर्षी अशा प्रकारच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने नागाव समुद्रकिनाऱ्यावर तातडीने सुरक्षा उपाययोजना राबवण्याची मागणी जोर धरत आहे. धोक्याच्या ठिकाणी इशारा फलक उभारणे, टेहाळणी चौक्या उभारणे, तसेच सागरी सुरक्षा रक्षकांना आवश्यक साहित्य उपलब्ध करून देणे अत्यंत गरजेचे झाले आहे. पर्यटन वाढत असताना सुरक्षिततेकडे दुर्लक्ष होणे हे भविष्यात गंभीर दुर्घटनांना आमंत्रण देणारे ठरू शकते. त्यामुळे प्रशासनाने वेळीच पावले उचलून पर्यटकांच्या सुरक्षेची खात्री करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

2 hrs ago
user_विरेश मधुकर मोडखरकर
विरेश मधुकर मोडखरकर
उरण, रायगड, महाराष्ट्र•
2 hrs ago
a3188e23-b666-469d-9a51-7edd5b491a0b

उरण नागाव समुद्रकिनारी पाच पर्यटकांचे थरारक बचाव; सुरक्षा उपाययोजनांच्या अभावामुळे धोका कायम धोक्याच्या सूचना फलकांचा अभाव, टेहाळणी चौक्यांची कमतरता; वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे प्रशासनावर प्रश्नचिन्ह ० उरणच्या नागाव समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांची दिवसेंदिवस वाढ ० भरतीच्या वेळी पाण्यात अडकण्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ ० किनाऱ्यावर धोक्याचे इशारे देणारे फलक नाहीत ग्रामपंचायत व प्रशासनाकडून सुरक्षा उपाययोजनांचा अभाव ० सागरी सुरक्षा रक्षकांकडे अपुरी साधनसामग्री ० सहा–सात किमी लांबीच्या किनाऱ्यावर टेहाळणी चौक्यांचा अभाव उरण तालुक्यातील नागाव समुद्रकिनाऱ्यावर सोमवारी संध्याकाळी पाच पर्यटक समुद्राच्या पाण्यात अडकल्याची धक्कादायक घटना घडली. मात्र सागर सुरक्षा रक्षकांनी प्रसंगावधान राखत तात्काळ धाव घेत सर्व पर्यटकांना सुरक्षित बाहेर काढत त्यांचा जीव वाचवला. या घटनेमुळे पुन्हा एकदा किनाऱ्यावरील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. उरण तालुका हा निसर्गसंपन्न किनारपट्टीसाठी ओळखला जातो. येथील नागाव समुद्रकिनारा पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत असून, दररोज मोठ्या संख्येने पर्यटक येथे भेट देतात. विशेषतः पिरवाडी परिसरात पीर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचीही मोठी गर्दी असते. याच दरम्यान अनेक पर्यटक समुद्रात उतरून मौजमजा करताना भरतीच्या वेळी अडकण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. या किनाऱ्यावर धोक्याच्या सूचना देणारे फलक नसल्याने पर्यटक बेधडक पाण्यात उतरून आपला जीव धोक्यात घालत आहेत. तर येथे अशाप्रकारचे धोक्याच्या सूचना देणारे फलक लावण्याची मागणी आता होत आहे.  सोमवारी घडलेल्या घटनेत, पिरवाडी परिसरात पाच पर्यटक समुद्राच्या वाढत्या पाण्यात अडकले होते. माहिती मिळताच सागर सुरक्षा रक्षकांनी जीवाची पर्वा न करता बचावकार्य सुरू

e3b36bcc-bfe6-4d6f-8d7f-278592423bf5

केले आणि सर्वांना सुखरूप बाहेर काढले. त्यांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला. मात्र, या किनाऱ्यावर वारंवार अशा घटना घडत असतानाही मूलभूत सुरक्षा उपाययोजनांचा अभाव गंभीर चिंता निर्माण करणारा ठरत आहे. किनाऱ्यावरील धोकादायक भागांबाबत इशारा देणारे फलक अद्याप लावण्यात आलेले नाहीत. तसेच ग्रामपंचायत, तहसील प्रशासन, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा किंवा बंदर विभागाकडून ठोस उपाययोजना होताना दिसत नाहीत. याशिवाय, सागरी सुरक्षा रक्षकांना कार्यरत राहण्यासाठी आवश्यक सुविधा देखील अपुऱ्या आहेत. जवळपास सहा ते सात किलोमीटर लांबीच्या या विस्तीर्ण किनाऱ्यावर एकही टेहाळणी चौकी नसल्याने रक्षकांना साहित्य ठेवण्यासाठी आणि सतत देखरेख ठेवण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अपुऱ्या साधनसामग्रीतच ते जीव धोक्यात घालून पर्यटकांचे प्राण वाचवत आहेत. दरम्यान किनाऱ्यावर ज्याठिकाणी सातात्याने अपघात होत आहेत अशा ठिकाणी धोक्याच्या सूचना देणारे फलक असणे आवश्यक असताना प्रशासनाकडून किनातेही फलक लावण्यात आलेले नाहीत. ज्यामुळे पर्यटकांचे जीव अधिकच धोक्यात येतं आहेत.  दरवर्षी अशा प्रकारच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने नागाव समुद्रकिनाऱ्यावर तातडीने सुरक्षा उपाययोजना राबवण्याची मागणी जोर धरत आहे. धोक्याच्या ठिकाणी इशारा फलक उभारणे, टेहाळणी चौक्या उभारणे, तसेच सागरी सुरक्षा रक्षकांना आवश्यक साहित्य उपलब्ध करून देणे अत्यंत गरजेचे झाले आहे. पर्यटन वाढत असताना सुरक्षिततेकडे दुर्लक्ष होणे हे भविष्यात गंभीर दुर्घटनांना आमंत्रण देणारे ठरू शकते. त्यामुळे प्रशासनाने वेळीच पावले उचलून पर्यटकांच्या सुरक्षेची खात्री करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • रायगड जिल्ह्यातील काशिद येथे नदीपात्र व समुद्र किनारी सुरू असलेल्या कथित अनधिकृत बांधकामामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार,  देवेन चंद्रकांत गाभावाला (मुंबई) यांच्या वतीने काशिद नदीपात्रात अतिक्रमण करून वाढीव बांधकाम सुरू असल्याचा आरोप करण्यात येत आहे. सदर बांधकामामुळे नदीच्या नैसर्गिक प्रवाहाला अडथळा निर्माण होत असून भविष्यात पूरस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. विशेषतः पावसाळ्यात नदीचा मार्ग बदलल्यास आजूबाजूच्या वस्त्यांना व शेतीला मोठा धोका निर्माण होऊ शकतो, अशी चिंता स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत. याशिवाय, हे बांधकाम किनारी नियमन क्षेत्र (CRZ) नियमांचे उल्लंघन करत असल्याचेही सांगितले जात आहे. समुद्र किनाऱ्यालगत कोणतेही बांधकाम करताना पर्यावरणीय नियमांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक असताना, येथे ते नियम धाब्यावर बसवले जात असल्याचा आरोप होत आहे. या प्रकारामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडण्याची शक्यता असून स्थानिक जैवविविधतेलाही धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे संबंधित प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करून सदर प्रकरणाची चौकशी करावी व अनधिकृत बांधकामावर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. दरम्यान, या प्रकरणी महसूल विभाग तसेच संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी पाहणी करून सत्यस्थिती समोर आणणे गरजेचे असल्याचे मत जाणकार व्यक्त करत आहेत. प्रशासनाकडून यावर कोणती भूमिका घेतली जाते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
    4
    रायगड जिल्ह्यातील काशिद येथे नदीपात्र व समुद्र किनारी सुरू असलेल्या कथित अनधिकृत बांधकामामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार,  देवेन चंद्रकांत गाभावाला (मुंबई) यांच्या वतीने काशिद नदीपात्रात अतिक्रमण करून वाढीव बांधकाम सुरू असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
सदर बांधकामामुळे नदीच्या नैसर्गिक प्रवाहाला अडथळा निर्माण होत असून भविष्यात पूरस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. विशेषतः पावसाळ्यात नदीचा मार्ग बदलल्यास आजूबाजूच्या वस्त्यांना व शेतीला मोठा धोका निर्माण होऊ शकतो, अशी चिंता स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत.
याशिवाय, हे बांधकाम किनारी नियमन क्षेत्र (CRZ) नियमांचे उल्लंघन करत असल्याचेही सांगितले जात आहे. समुद्र किनाऱ्यालगत कोणतेही बांधकाम करताना पर्यावरणीय नियमांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक असताना, येथे ते नियम धाब्यावर बसवले जात असल्याचा आरोप होत आहे.
या प्रकारामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडण्याची शक्यता असून स्थानिक जैवविविधतेलाही धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे संबंधित प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करून सदर प्रकरणाची चौकशी करावी व अनधिकृत बांधकामावर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
दरम्यान, या प्रकरणी महसूल विभाग तसेच संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी पाहणी करून सत्यस्थिती समोर आणणे गरजेचे असल्याचे मत जाणकार व्यक्त करत आहेत. प्रशासनाकडून यावर कोणती भूमिका घेतली जाते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
    user_Raigad news
    Raigad news
    अलिबाग, रायगड, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • मुंबईतील टर्मिनल २ येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. भारतीय कामगार सेनेच्या वतीने त्यांना मानवंदना देऊन अभिवादन करण्यात आले. या वेळी संजय कदम आणि तोष कदम यांनी कामगारांना त्यांच्या हक्कांबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने कामगार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी Police Vision Times सोबत जोडलेले रहा.
    1
    मुंबईतील टर्मिनल २ येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. भारतीय कामगार सेनेच्या वतीने त्यांना मानवंदना देऊन अभिवादन करण्यात आले.
या वेळी संजय कदम आणि तोष कदम यांनी कामगारांना त्यांच्या हक्कांबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने कामगार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी Police Vision Times सोबत जोडलेले रहा.
    user_Police Vision Times
    Police Vision Times
    Journalist मुंबई, मुंबई, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • लखीमपुर- मैलानी थाना क्षेत्र के बांकेगंज में बाबा अंबेडकर की मूर्ति तोड़ने को लेकर भारी बवाल हो गया है पुलिस वालों की गाड़ियां तोड़ी गई मौके पर भारी हंगामा हो रहा है अंबेडकर जयंती के दिन अंबेडकर साहब की मूर्ति तोड़े जाने को लेकर भारी बवाल⤵️
    1
    लखीमपुर- मैलानी थाना क्षेत्र के बांकेगंज में बाबा अंबेडकर की मूर्ति तोड़ने को लेकर भारी बवाल हो गया है 
पुलिस वालों की गाड़ियां तोड़ी गई 
मौके पर भारी हंगामा हो रहा है
अंबेडकर जयंती के दिन अंबेडकर साहब की मूर्ति तोड़े जाने को लेकर भारी बवाल⤵️
    user_अमर ज्योति न्यूज़
    अमर ज्योति न्यूज़
    पत्रकार कुर्ला, मुंबई उपनगर, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • आंबेडकर की 135वीं जयंती के अवसर पर अंबेडकर चैत्य भूमि से @indiaaajkaltv का सीधा प्रसारण। Special live coverage from chaityabhumi of @indiaaajkaltv of 135th birth anniversary of Dr. BR Ambedkar डॉ. बी.आर. आंबेडकर की 135वीं जयंती पर चैत्यभूमि से @indiaaajkaltv की विशेष लाइव कवरेज।
    1
    आंबेडकर की 135वीं जयंती के अवसर पर अंबेडकर चैत्य भूमि से @indiaaajkaltv का सीधा प्रसारण। 
Special live coverage from chaityabhumi of @indiaaajkaltv of 135th birth anniversary of Dr. BR Ambedkar 
डॉ. बी.आर. आंबेडकर की 135वीं जयंती पर चैत्यभूमि से @indiaaajkaltv की विशेष लाइव कवरेज।
    user_Ips Yadav
    Ips Yadav
    Advertising agency मुंबई, मुंबई, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • गोरेगाव येथील नेस्को परिसरात उघडकीस आलेल्या ड्रग्ज पार्टी प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. विद्यार्थ्यांनी कॅबमध्येच ड्रग्सचे सेवन करणे, एमडीसारख्या घातक पदार्थांचा वापर करणे आणि त्यातून ओव्हरडोस होऊन प्रकृती बिघडणे.ही परिस्थिती अत्यंत चिंताजनक व धक्कादायक आहे.या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश प्रवक्ते तथा युवकचे मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल करत गंभीर आरोप केले आहेत. ॲड. अमोल मातेले म्हणाले “मुंबईसारख्या महानगरात विद्यार्थ्यांपर्यंत ड्रग्ज इतक्या सहजपणे पोहोचत असतील, तर हे सरकारचे पूर्ण अपयश आहे. कल्याण परिसरातून ड्रग्ज मागवले जातात, इव्हेंटमध्ये खुलेआम सेवन केले जाते, आणि प्रशासनाला काहीच सुगावा लागत नाही.हे अत्यंत लाजिरवाणे आहे.हे फक्त काही विद्यार्थ्यांचे प्रकरण नाही, तर यामागे मोठे ड्रग्ज रॅकेट कार्यरत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. या रॅकेटला कोणाचे संरक्षण आहे? कोणत्या राजकीय दबावाखाली हे प्रकार सुरू आहेत? याची सखोल चौकशी झालीच पाहिजे! पोलीस फक्त अटक दाखवून जबाबदारी संपली असे समजत असतील, तर ते चुकीचे आहे. 15 ते 16 विद्यार्थ्यांचा सहभाग, पुरवठादारांची साखळी हे सर्व पाहता ही केवळ हिमनगाची टोक आहे.” “राज्य सरकारने तात्काळ विशेष तपास पथक (SIT) स्थापन करून संपूर्ण ड्रग्ज नेटवर्क उध्वस्त करावे. अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल. महाराष्ट्रातील तरुणाईला ड्रग्जच्या विळख्यातून वाचवण्यासाठी आम्ही कुठल्याही टोकाला जाऊ!” ड्रग्ज पुरवठा साखळीचा संपूर्ण भांडाफोड करावा.संबंधित पोलीस व प्रशासनातील जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावीशैक्षणिक संस्थांमध्ये अँटी-ड्रग्ज मोहिम तातडीने राबवावी“महाराष्ट्राला ड्रग्जमुक्त करणे ही सरकारची जबाबदारी आहे.आणि त्यात अपयश आल्यास जनता माफ करणार नाही!”
    1
    गोरेगाव येथील नेस्को परिसरात उघडकीस आलेल्या ड्रग्ज पार्टी प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. विद्यार्थ्यांनी कॅबमध्येच ड्रग्सचे सेवन करणे, एमडीसारख्या घातक पदार्थांचा वापर करणे आणि त्यातून ओव्हरडोस होऊन प्रकृती बिघडणे.ही परिस्थिती अत्यंत चिंताजनक व धक्कादायक आहे.या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश प्रवक्ते तथा युवकचे मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल करत गंभीर आरोप केले आहेत.
ॲड. अमोल मातेले म्हणाले “मुंबईसारख्या महानगरात विद्यार्थ्यांपर्यंत ड्रग्ज इतक्या सहजपणे पोहोचत असतील, तर हे सरकारचे पूर्ण अपयश आहे. कल्याण परिसरातून ड्रग्ज मागवले जातात, इव्हेंटमध्ये खुलेआम सेवन केले जाते, आणि प्रशासनाला काहीच सुगावा लागत नाही.हे अत्यंत लाजिरवाणे आहे.हे फक्त काही विद्यार्थ्यांचे प्रकरण नाही, तर यामागे मोठे ड्रग्ज रॅकेट कार्यरत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. या रॅकेटला कोणाचे संरक्षण आहे? कोणत्या राजकीय दबावाखाली हे प्रकार सुरू आहेत? याची सखोल चौकशी झालीच पाहिजे!
पोलीस फक्त अटक दाखवून जबाबदारी संपली असे समजत असतील, तर ते चुकीचे आहे. 15 ते 16 विद्यार्थ्यांचा सहभाग, पुरवठादारांची साखळी हे सर्व पाहता ही केवळ हिमनगाची टोक आहे.”
“राज्य सरकारने तात्काळ विशेष तपास पथक (SIT) स्थापन करून संपूर्ण ड्रग्ज नेटवर्क उध्वस्त करावे. अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल.
महाराष्ट्रातील तरुणाईला ड्रग्जच्या विळख्यातून वाचवण्यासाठी आम्ही कुठल्याही टोकाला जाऊ!”
ड्रग्ज पुरवठा साखळीचा संपूर्ण भांडाफोड करावा.संबंधित पोलीस व प्रशासनातील जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावीशैक्षणिक संस्थांमध्ये अँटी-ड्रग्ज मोहिम तातडीने राबवावी“महाराष्ट्राला ड्रग्जमुक्त करणे ही सरकारची जबाबदारी आहे.आणि त्यात अपयश आल्यास जनता माफ करणार नाही!”
    user_Ajinkya
    Ajinkya
    मुंबई, मुंबई, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • Today Special Video From Mi Marathi India
    1
    Today Special Video From Mi Marathi India
    user_Simon Mascarenhas
    Simon Mascarenhas
    Photographer मुंबई, मुंबई, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • 19 अप्रैल को गुलामे अहले बैत फाउंडेशन Dwara महिलाओं के लिए मुफ़्त हिजामा कैंप का आयोजन.#mumbranews
    1
    19 अप्रैल को गुलामे अहले बैत फाउंडेशन Dwara महिलाओं के लिए मुफ़्त हिजामा कैंप का आयोजन.#mumbranews
    user_Naya Inquilab Tv News Official
    Naya Inquilab Tv News Official
    News,blog,entertainment ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • ​रायगड - अमुलकुमार जैन एकीकडे निसर्ग संवर्धनासाठी शासन कोट्यवधी रुपये खर्च करत असताना, दुसरीकडे रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यात भूमाफियांनी कायद्याचा धाक पूर्णपणे सोडल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. मौजे कोलमांडला (ताराबंदर) येथे राष्ट्रीय हरित लवाद (NGT) आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशांना उघडपणे हरताळ फासत पुन्हा एकदा अनधिकृत माती भराव सुरू झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. ​ नेमकी घटना काय? ​मिळालेल्या माहितीनुसार, रविवार दिनांक १२ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळच्या सुमारास ताराबंदर येथील कांदळवन क्षेत्रात पोकलेन आणि जेसीबी (JCB) मशीनच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणावर माती भराव करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले होते. हे ठिकाण आधीच पर्यावरणीय वादाच्या भोवऱ्यात असून, येथे कांदळवन कत्तल झाल्याचा ठपका ठेवत NGT ने पुनर्लागवडीचे स्पष्ट आदेश दिलेले आहेत. ​ "फॉरेस्टची परवानगी आहे!" – कंत्राटदाराची अरेरावी ​स्थानिक ग्रामस्थांना या अनधिकृत कामाचा सुगावा लागताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थ व्हिडिओ चित्रीकरण करत असल्याचे पाहून संबंधित कंत्राटदार आणि कामगारांनी आक्रमक पवित्रा घेतला. “हे काम फॉरेस्टच्या (वनविभाग) परवानगीने सुरू आहे,” असा खोटा दावा करत त्यांनी ग्रामस्थांना दडपण्याचा आणि भीती घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, ग्रामस्थांच्या ठाम विरोधापुढे कंत्राटदाराने अखेर नमते घेत तेथून पळ काढला आणि मशिनरी एका कंपाऊंडमध्ये लपवून ठेवल्या. ​ प्रशासनाचे 'अर्थपूर्ण' मौन? ​या घटनेतील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, फणसाड वन्यजीव विभागाच्या RFO (परिक्षेत्र वन अधिकारी) यांना ग्रामस्थांनी तातडीने माहिती देऊनही त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. वारंवार संपर्क करूनही अधिकाऱ्यांनी या गंभीर प्रकाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिक करत आहेत. ​"ज्या ठिकाणी कोट्यवधींचा दंड आकारला गेला आहे, गुन्हे दाखल आहेत, तिथे पुन्हा भराव होतोच कसा? यामागे नक्की कोणाचे वरदहस्त आहेत?" > — संतप्त सवाल, ताराबंदर ग्रामस्थ. पार्श्वभूमी आणि कारवाईची मागणी ​दंडात्मक कारवाई: यापूर्वीच याच जागेवर झालेल्या अनधिकृत भरावामुळे महसूल विभागाने कोट्यवधी रुपयांचा दंड ठोठावला आहे. ​गुन्हे दाखल: वनविभागामार्फत याआधी गुन्हे नोंदवण्यात आलेले आहेत. ​न्यायालयीन लढा: NGT ने येथे कांदळवन पुनरुज्जीवनाचे आदेश दिले आहेत. ​ताराबंदर ग्रामस्थ मंडळाने आता आक्रमक भूमिका घेतली असून, संबंधित दोषींवर आणि कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई न झाल्यास पुन्हा एकदा न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याचा इशारा दिला आहे. संवेदनशील किनारी भागात सुरू असलेला हा 'पर्यावरणीय दहशतवाद' थांबणार का, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
    2
    ​रायगड - अमुलकुमार जैन 
एकीकडे निसर्ग संवर्धनासाठी शासन कोट्यवधी रुपये खर्च करत असताना, दुसरीकडे रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यात भूमाफियांनी कायद्याचा धाक पूर्णपणे सोडल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. मौजे कोलमांडला (ताराबंदर) येथे राष्ट्रीय हरित लवाद (NGT) आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशांना उघडपणे हरताळ फासत पुन्हा एकदा अनधिकृत माती भराव सुरू झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
​ नेमकी घटना काय?
​मिळालेल्या माहितीनुसार, रविवार दिनांक १२ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळच्या सुमारास ताराबंदर येथील कांदळवन क्षेत्रात पोकलेन आणि जेसीबी (JCB) मशीनच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणावर माती भराव करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले होते. हे ठिकाण आधीच पर्यावरणीय वादाच्या भोवऱ्यात असून, येथे कांदळवन कत्तल झाल्याचा ठपका ठेवत NGT ने पुनर्लागवडीचे स्पष्ट आदेश दिलेले आहेत.
​ "फॉरेस्टची परवानगी आहे!" – कंत्राटदाराची अरेरावी
​स्थानिक ग्रामस्थांना या अनधिकृत कामाचा सुगावा लागताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थ व्हिडिओ चित्रीकरण करत असल्याचे पाहून संबंधित कंत्राटदार आणि कामगारांनी आक्रमक पवित्रा घेतला. “हे काम फॉरेस्टच्या (वनविभाग) परवानगीने सुरू आहे,” असा खोटा दावा करत त्यांनी ग्रामस्थांना दडपण्याचा आणि भीती घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, ग्रामस्थांच्या ठाम विरोधापुढे कंत्राटदाराने अखेर नमते घेत तेथून पळ काढला आणि मशिनरी एका कंपाऊंडमध्ये लपवून ठेवल्या.
​ प्रशासनाचे 'अर्थपूर्ण' मौन?
​या घटनेतील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, फणसाड वन्यजीव विभागाच्या RFO (परिक्षेत्र वन अधिकारी) यांना ग्रामस्थांनी तातडीने माहिती देऊनही त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. वारंवार संपर्क करूनही अधिकाऱ्यांनी या गंभीर प्रकाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिक करत आहेत.
​"ज्या ठिकाणी कोट्यवधींचा दंड आकारला गेला आहे, गुन्हे दाखल आहेत, तिथे पुन्हा भराव होतोच कसा? यामागे नक्की कोणाचे वरदहस्त आहेत?" > — संतप्त सवाल, ताराबंदर ग्रामस्थ.
पार्श्वभूमी आणि कारवाईची मागणी
​दंडात्मक कारवाई: यापूर्वीच याच जागेवर झालेल्या अनधिकृत भरावामुळे महसूल विभागाने कोट्यवधी रुपयांचा दंड ठोठावला आहे.
​गुन्हे दाखल: वनविभागामार्फत याआधी गुन्हे नोंदवण्यात आलेले आहेत.
​न्यायालयीन लढा: NGT ने येथे कांदळवन पुनरुज्जीवनाचे आदेश दिले आहेत.
​ताराबंदर ग्रामस्थ मंडळाने आता आक्रमक भूमिका घेतली असून, संबंधित दोषींवर आणि कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई न झाल्यास पुन्हा एकदा न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याचा इशारा दिला आहे. संवेदनशील किनारी भागात सुरू असलेला हा 'पर्यावरणीय दहशतवाद' थांबणार का, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
    user_Raigad news
    Raigad news
    अलिबाग, रायगड, महाराष्ट्र•
    3 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.