जळगावात घरगुती गॅसचा मोठा तुटवडा; ग्राहकांना गॅस मिळण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार? एलपीजी गॅस निर्मिती व पुरवठ्यावर परिणाम जळगावात घरगुती गॅसचा मोठा तुटवडा; ग्राहकांना गॅस मिळण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार? एलपीजी गॅस निर्मिती व पुरवठ्यावर परिणाम जळगाव प्रतिनिधी जळगाव : आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम आता जळगाव शहरावरही दिसू लागला आहे. घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरचा पुरवठा कमी झाल्याने ग्राहकांना गॅस मिळण्यासाठी चार-चार दिवस प्रतीक्षा करावी लागत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. गॅस बुकिंग केल्यानंतर साधारण दुसऱ्या दिवशी सिलिंडर घरपोच मिळत असतो. मात्र सध्या पुरवठा कमी झाल्याने अनेक ग्राहकांना तीन ते चार दिवसांपर्यंत प्रतीक्षा करावी लागत आहे. काही ग्राहकांनी ४ मार्च रोजी गॅस बुकिंग केले असतानाही ७ मार्चपर्यंत सिलिंडर मिळाला नसल्याचे सांगितले आहे. गॅस एजन्सीकडून ग्राहकांच्या नावाने बिल तयार झाल्यानंतर मेसेजही पाठवले जात आहेत. मात्र प्रत्यक्षात सिलिंडर न आल्याने ग्राहकांमध्ये संभ्रम आणि नाराजी निर्माण होत आहे. सिलिंडर उशिरा मिळत असल्याने वितरणाची प्रतीक्षा यादीही वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, अमेरिका, इस्त्रायल आणि इराण यांच्यातील तणावामुळे एलपीजी निर्मिती व पुरवठ्यावर परिणाम झाल्याचे वितरकांचे म्हणणे आहे. जळगाव शहरात दररोज साधारण चार ते पाच हजार सिलिंडर वितरित केले जातात. एका एजन्सीकडून सरासरी ७०० ते ८०० सिलिंडर दिले जातात. मात्र सध्या प्रत्येक एजन्सीला केवळ ३०० सिलिंडरच मिळत असल्याने पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. सिलिंडरच्या तुटवड्यासोबतच दरवाढीचाही फटका ग्राहकांना बसला आहे. शहरात घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात प्रति सिलिंडर ६० रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे ८५८ रुपये ५० पैशांना मिळणारा सिलिंडर आता ९१८ रुपये ५० पैशांवर पोहोचला आहे. तुटवड्याच्या भीतीने नागरिकांनी घाईघाईने बुकिंग करू नये, यासाठी कंपन्यांनी ‘लॉक सिस्टिम’ लागू केली आहे. एका बुकिंगनंतर २५ दिवस पूर्ण झाल्यानंतरच पुढील सिलिंडर बुक करता येणार असल्याची माहिती गॅस एजन्सी चालक दिलीप चौबे यांनी दिली. दरम्यान, ज्या ग्राहकांकडे दोन सिलिंडर आहेत त्यांची तात्पुरती गरज भागत असली तरी ज्या ग्राहकांकडे एकच सिलिंडर आहे त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. स्वयंपाकापासून दैनंदिन गरजांसाठी इंधन कसे मिळवावे, असा प्रश्न अनेक कुटुंबांसमोर उभा राहिला आहे.

- Post by Kishor k Patil Patil2
- सिल्लोड तालुक्यातील आमसरी येथे मका गंजीला आग; शेतकऱ्याचे मोठे नुकसान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील आमसरी येथे शेतातील मक्काच्या गंजीला अचानक आग लागून शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आमसरी येथील शेतकरी पुंडलिक शामराव बावस्कर यांच्या गट नं. ३१४, क्षेत्र १.३१, शिवना शिवारातील शेतात झाकून ठेवलेल्या मक्काच्या गंजीला दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत गंजीतील मोठ्या प्रमाणात मका जळून खाक झाला असून शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत गंजीतील मोठ्या प्रमाणात मका जळून खाक झाला होता. आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झाले नाही. या घटनेमुळे शेतकरी पुंडलिक बावस्कर यांचे मोठे नुकसान झाले असून प्रशासनाने पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.1
- संरक्षण जाळी तोडून खोलीत घुसला बिबट्या; वनविभागाने घटनास्थळी भेट देत केला पंचनामा सोयगाव प्रतिनिधी दिलीप मोरे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील डाभा परिसरात बिबट्याने हल्ला करून शेतकरी महिलेच्या शेळ्या ठार केल्याची घटना घडली आहे. डाभा येथील शेतकरी कमलबाई रमेश रगड यांची शेती देऊळगाव – सावळदबारा रस्त्यालगत, गट क्रमांक ८२ मध्ये आहे. येथे शेळीपालनासाठी टीन पत्र्यांची खोली बांधून परिसराला संरक्षणासाठी जाळी लावण्यात आली होती. मात्र, सोमवारी (दि. ९ मार्च २०२६) रात्री वन्य प्राणी बिबट्याने संरक्षण जाळी तोडून आत प्रवेश केला आणि ४ बकऱ्या व २ बोकड असे एकूण ६ शेळ्यांना ठार केले. या खोलीमध्ये पार्टिशन जाळी असल्यामुळे इतर काही शेळ्या वाचल्या असल्या तरी या घटनेमुळे शेतकरी महिलेचे मोठे नुकसान झाले आहे. ही घटना वर्दळीच्या ठिकाणी घडल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील काही महिन्यांपासून या भागात बिबट्याच्या हल्ल्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. दरम्यान, या घटनेची माहिती शेतकऱ्यांनी तत्काळ अजिंठा वन विभागाला दिल्यानंतर सावळदबारा बीटचे अधिकारी प्रवीण गवळी, वनसेवक युसुफ पठाण तसेच पशुवैद्यकीय डॉक्टरांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली. त्यांनी पाहणी करून पंचनामा केला असून पुढील कार्यालयीन कार्यवाहीसाठी अहवाल सादर करण्यात येणार असल्याचे सांगितले. दरम्यान, अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत शेळीपालन करून उदरनिर्वाह करणाऱ्या कमलबाई रमेश रगड यांना या घटनेमुळे मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे वनविभागाने तातडीने उपाययोजना करून बिबट्याचा बंदोबस्त करावा तसेच झालेल्या नुकसानीची त्वरित नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे.1
- #jalna#marathinews#1
- भोकरदन बस स्थानकामध्ये आलेल्या बसमध्ये एका वृद्ध महिलेची मंगळसूत्र चोरीला गेल्याचा प्रकार समोर आला आहेत1
- मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील हाडाखेड सीमेवर पडलेल्या जीवघेण्या खड्ड्यांविरोधात शिरपूरमध्ये नागरिकांनी अनोखे आंदोलन केले. शिरपूर फर्स्टच्या वतीने महामार्गावरील खड्ड्यात बसून ‘26 लाखांच्या खड्ड्याची सत्यनारायण पूजा’ करून प्रशासनाचा निषेध नोंदवण्यात आला.1
- Post by 🏛️ सत्यमेव जयते 🏛️1
- #marathi#news#jalna#1