Shuru
Apke Nagar Ki App…
माजी खासदार संजय काका पाटील व खानापूर तालुका भाजपा अध्यक्ष अगस्ती नगरचे लोकनियुक्त सरपंच माननीय दाजी भाऊ पवार आणि सन्माननीय यांच्या वतीने होनाई न्यूज चे संपादक यांचा सत्कार करून होनाई वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
साप्ताहिक माणदेश
माजी खासदार संजय काका पाटील व खानापूर तालुका भाजपा अध्यक्ष अगस्ती नगरचे लोकनियुक्त सरपंच माननीय दाजी भाऊ पवार आणि सन्माननीय यांच्या वतीने होनाई न्यूज चे संपादक यांचा सत्कार करून होनाई वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
More news from Sangli and nearby areas
- माजी खासदार संजय काका पाटील व खानापूर तालुका भाजपा अध्यक्ष अगस्ती नगरचे लोकनियुक्त सरपंच माननीय दाजी भाऊ पवार आणि सन्माननीय यांच्या वतीने होनाई न्यूज चे संपादक यांचा सत्कार करून होनाई वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या.1
- महिला आयोगाच्या माजी अयोग्य अध्यक्ष रुपाली चाकणकर आता पब् बार रेस्टॉरंट च्या व्यवसायात. नाही म्हणले तरी साठ ते सत्तर कोटी ची लागत.ताई एवढे पैसे आले कुठून. महिला आयोगाच्या माजी अयोग्य अध्यक्ष रुपाली चाकणकर आता पब् बार रेस्टॉरंट च्या व्यवसायात. नाही म्हणले तरी साठ ते सत्तर कोटी ची लागत.ताई एवढे पैसे आले कुठून.असे कॉग्रेसच्या नेत्या मनीषा तिवारी यांनी म्हंटले आहे, ते मुंबई महेश शेट्टी Dance Bar वाले,under world चा कोणी मुजावर हे त्यात काय आहेत.त्या खरात भोंदू ने बायका खराब केल्या आता तुमचे पुत्र रत्न सोहम पुण्याची तरुण पिढी नासवणार,बरबाद करणार का? बाई जरा आवारा. पुण्याचे आमदार बंधू ह्यानी तुम्हाला लीज नी जागा दिली.आपण 6 पार्टनर घेतले असे ऐकिवात आहे तुमच्या सोहम बाळा बरोबर. एवढे पैसे तुमच्या कडे येण्याचे स्तोत्र काय आहे.1
- नवी दिल्ली : Zee News चे संस्थापक सुभाष चंद्रा यांच्या कर्जासंदर्भात सोशल मीडियावर एक पोस्टर मोठ्या प्रमाणात चर्चेत आले आहे. या पोस्टरमध्ये सुभाष चंद्रा यांच्यावर २२ हजार कोटी रुपयांचे कर्ज असल्याचा दावा करण्यात आला आहे. Zee News संस्थापक सुभाष चंद्रा यांच्या कर्जाबाबत मोठा दावा; चर्चेला उधाण नवी दिल्ली : Zee News चे संस्थापक सुभाष चंद्रा यांच्या कर्जासंदर्भात सोशल मीडियावर एक पोस्टर मोठ्या प्रमाणात चर्चेत आले आहे. या पोस्टरमध्ये सुभाष चंद्रा यांच्यावर २२ हजार कोटी रुपयांचे कर्ज असल्याचा दावा करण्यात आला आहे. पोस्टरमध्ये पुढे दावा करण्यात आला आहे की, त्यातील केवळ ६.५ हजार कोटी रुपयेच फेडायचे असून उर्वरित कर्ज माफ करण्यात आल्याचे म्हटले आहे. तसेच सरकारने केलेल्या कथित कर्जमाफीची भरपाई कोण करणार, असा सवालही पोस्टरमधून उपस्थित करण्यात आला आहे. या दाव्यामुळे सामान्य जनता, शेतकरी आणि कर्जबाधित नागरिकांमध्ये चर्चेला सुरुवात झाली आहे. विशेषतः सर्वसामान्य नागरिकांना कर्जफेडीसाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असताना मोठ्या उद्योगसमूहांच्या कर्जाबाबत असे दावे समोर येत असल्याने प्रश्न उपस्थित होत आहेत. मात्र, सोशल मीडियावरील या पोस्टरमधील २२ हजार कोटींचे कर्ज आणि कर्जमाफीचे दावे अधिकृत कागदपत्रे किंवा विश्वसनीय स्रोतांच्या आधारे स्वतंत्रपणे पडताळणे आवश्यक आहे. त्यामुळे नागरिकांनी सोशल मीडियावरील माहिती शेअर करण्यापूर्वी तिची सत्यता तपासावी.1
- ❤️🪢 “महाराष्ट्र पोलीस माझे माहेरघर!” — दरवर्षीप्रमाणे यंदाही सातारा जिल्ह्यातील पोलीस बांधव व भगिनींना महाराष्ट्र पोलीस लोगोच्या राख्या बांधत रक्षाबंधनाचा अनोखा उपक्रम; समाजाच्या रक्षणासाठी २४ तास कर्तव्य बजावणाऱ्या वर्दीतील भाऊ-भगिनींना मनःपूर्वक सन्मान! 🇮🇳 ❤️🪢 “महाराष्ट्र पोलीस माझे माहेरघर!” — दरवर्षीप्रमाणे यंदाही सातारा जिल्ह्यातील पोलीस बांधव व भगिनींना महाराष्ट्र पोलीस लोगोच्या राख्या बांधत रक्षाबंधनाचा अनोखा उपक्रम; समाजाच्या रक्षणासाठी २४ तास कर्तव्य बजावणाऱ्या वर्दीतील भाऊ-भगिनींना मनःपूर्वक सन्मान! 🇮🇳 आजचा दिवस म्हणजे भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याचा रक्षाबंधनाचा दिवस. राखी हा केवळ एक धागा नसून प्रेम, विश्वास, आपुलकी, कृतज्ञता आणि संरक्षणाच्या भावनेचे प्रतीक आहे. मी नेहमीच अभिमानाने सांगते— “संपूर्ण महाराष्ट्र पोलीस विभाग हे माझे माहेरघर आहे.” या विभागात कार्यरत असणारे प्रत्येक पोलीस बांधव माझे भाऊ आणि प्रत्येक महिला पोलीस माझी भगिनी आहे. रक्ताचे नाते नसले तरी या वर्दीतील भाऊ-भगिनींशी माझे एक वेगळे भावनिक नाते जोडले गेले आहे. 🪢 दरवर्षीप्रमाणे यंदाही महाराष्ट्र पोलिसांना राखी… दरवर्षीप्रमाणे यंदाही रक्षाबंधनाच्या निमित्ताने महाराष्ट्र पोलीस विभागातील माझ्या भाऊ-भगिनींना राखी बांधण्याचा हा उपक्रम मी मनापासून राबवत आहे. विशेष म्हणजे यंदाही महाराष्ट्र पोलीस विभागाच्या लोगोच्या राख्या मी स्वतः तयार केल्या असून, सातारा जिल्ह्यातील दोनशेपेक्षा अधिक पोलीस बांधव आणि महिला पोलिसांना या राख्या प्रत्यक्ष पोलीस ठाण्यांमध्ये जाऊन बांधत आहे. त्यावेळी सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक श्री निखिल पिंगळे सर व त्यांच्या संपूर्ण टीम, सातारा जिल्हा कारागृह पोलीस अधीक्षक ब्रह्मदेव लटपटे सर व त्यांची संपूर्ण टीम,सातारा शहर वाहतूक विभाग श्री. राजेश माने सर व त्यांची संपूर्ण टीम, सातारा शाहूपुरी पोलीस ठाणे श्री.संग्राम शेवाळे सर व त्यांची संपूर्ण टीम सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री.सचिन म्हेत्रे सर व त्यांची संपूर्ण टीम, सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री.निलेश तांबे सर्व त्यांची संपूर्ण टीम, सातारा स्थानिक गुन्हे शाखा चे पोलीस निरीक्षक श्री विश्वजीत घोडके सर, भरोसा सेल्स पोलीस विभागाचे सर्व पोलीस, सातारा पासपोर्ट विभागाची सर्व पोलीस, गोपनी विभागाचे सर्व पोलीस, एटीएस विभागाचे सर्व पोलीस, सातारा सायबर विभागाचे सर्व पोलीस यांना सन्मानपूर्वक महाराष्ट्र पोलीस लोगो च्या राख्या बांधून त्यांचा सन्मान व कृतज्ञता व्यक्त केली...🌹🌹🙏🙏 या राख्या केवळ एक धागा नाहीत… त्या आहेत— भावना, कृतज्ञता, विश्वास आणि सन्मानाचे प्रतीक! एखाद्या महिलेला किंवा मुलीला संकट आले, अन्याय झाला किंवा तिच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला, तर कायद्याच्या चौकटीत तिच्या संरक्षणासाठी आणि तिला न्याय मिळवून देण्यासाठी पोलीस यंत्रणा सदैव तत्पर असते. कधी कधी सख्ख्या भाऊ-बहिणीमध्येही गैरसमज होतात, दुरावा निर्माण होतो, बोलणे बंद होते किंवा परिस्थितीमुळे नात्यात ताटातूट होते. मात्र एखाद्या महिलेला छेडछाड, विनयभंग, कौटुंबिक हिंसाचार किंवा अन्य कोणत्याही संकटाला सामोरे जावे लागले, तर तिच्या मदतीसाठी कायदेशीर संरक्षण आणि आवश्यक कारवाई करण्यासाठी पोलीस यंत्रणा महत्त्वाची भूमिका बजावते. ऊन असो, वारा असो किंवा पाऊस… मोर्चा असो किंवा आंदोलन… सण असो किंवा उत्सव… सातारा जिल्ह्यात कोणतेही मान्यवर अथवा मंत्री आले असोत… आपले पोलीस बांधव आणि भगिनी मात्र आपल्या कर्तव्यावर सदैव तैनात असतात. स्वतःच्या कुटुंबापासून दूर राहून, अनेकदा स्वतःचे सण-उत्सव बाजूला ठेवून समाजाच्या सुरक्षिततेसाठी कर्तव्य बजावणाऱ्या प्रत्येक पोलीस बांधवाला आणि पोलीस भगिनीला आजच्या दिवशी मनापासून सलाम! 🇮🇳 राखी बांधताना माझ्या मनात एकच भावना आहे— “ज्याप्रमाणे कुटुंबातील भाऊ आपल्या बहिणीच्या संरक्षणासाठी तिच्या पाठीशी उभा राहतो, त्याचप्रमाणे सातारा जिल्ह्यातील प्रत्येक महिला आणि मुलीच्या सुरक्षिततेसाठी आपण कायद्याच्या चौकटीत सदैव तत्पर राहता. म्हणून आज समस्त सातारा जिल्ह्यातील महिला आणि मुलींच्या वतीने मी आपणास ही राखी बांधत आहे.” ही राखी कोणतेही आश्वासन मागण्यासाठी नाही, तर समाजाच्या सुरक्षिततेसाठी आपले कर्तव्य बजावणाऱ्या वर्दीतील प्रत्येक भाऊ-भगिनीप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आहे. ❤️ रक्ताचे नाते नसले तरी मनाने जोडलेले नाते… काही नाती जन्माने मिळतात, तर काही नाती आपल्या भावना आणि विश्वासातून निर्माण होतात. महाराष्ट्र पोलीस विभागाशी माझे असेच एक नाते आहे. हातात बांधलेली राखी छोटी आहे, पण त्यामागची भावना खूप मोठी आहे. सातारा जिल्ह्यातील प्रत्येक महिला आणि मुलगी सुरक्षित राहावी, तिला कोणत्याही संकटाच्या वेळी कायद्याचे संरक्षण मिळावे आणि अन्यायाविरुद्ध तिला न्याय मिळावा, हीच मनापासूनची अपेक्षा. म्हणूनच आजच्या रक्षाबंधनाच्या पवित्र दिवशी माझ्या सर्व पोलीस भाऊ-भगिनींना मनःपूर्वक रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा! 💐🪢 आपल्या कर्तव्यनिष्ठेला, सेवाभावाला आणि समाजाच्या सुरक्षेसाठी दिलेल्या योगदानाला मनःपूर्वक सलाम! “वर्दी वेगळी असली, कर्तव्य वेगळे असले तरी नाते मात्र मनाचे आहे… महाराष्ट्र पोलीस माझे माहेरघर आहे!” ❤️🇮🇳 🪢 रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🇮🇳 जय हिंद! जय महाराष्ट्र! 🇮🇳 सौ. प्रतिभा सुनील शेलार संस्थापिका – महालक्ष्मी आधार फाउंडेशन1
- खेड बु!! तुळशी वृंदावन येथे दोन वाहनांचा अपघात; जीवितहानी टळली खेड बु!! तुळशी वृंदावन येथे दोन वाहनांचा अपघात; जीवितहानी टळली खड्डेमय रस्ता, धोकादायक वळणे अन् वाढती वाहतूक; PWD विभागाने तातडीने दुरुस्ती करावी खेड बु!! | वार : शुक्रवार | दिनांक : २८/८/२०२६ खंडाळा–लोणंद मार्गावरील तुळशी वृंदावन येथे एमएच ११ ए.डब्ल्यू. ६०२३ आणि एमएच ०४ के.यू. १०९६ या दोन वाहनांचा अपघात झाला. सुदैवाने या दुर्घटनेत जीवितहानी टळली. अपघाताची माहिती मिळताच खंडाळा रेस्क्यू टीमने तत्काळ मदतकार्य केले, तर लोणंद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक व गर्दी नियंत्रणात आणली. खेड बुद्रुक–लोणंद रस्ता प्रचंड खड्ड्यांनी व्यापलेला असून रस्ता अरुंद आणि ठिकठिकाणी धोकादायक वळणे आहेत. वाढती वाहतूक लक्षात घेता हा मार्ग वाहनचालकांसाठी धोकादायक बनला आहे. या रस्त्याच्या दुरवस्थेबाबत व्हॉइस ऑफ मीडिया खंडाळा तालुका संपर्क प्रमुख सुनिल रासकर यांनी यापूर्वीही सातत्याने आवाज उठविला असून साथ प्रतिष्ठानच्या माध्यमातूनही पाठपुरावा केला आहे. अपघातावेळी सुनिल रासकर व आर.पी.आय. खंडाळा तालुका अध्यक्ष यांच्या सतर्कतेमुळे पुढील मदत मिळण्यास मदत झाली. “अजून किती जीव गेल्यावर PWD जागे होणार?” असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित होत असून रस्त्याची तातडीने दुरुस्ती व सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. जीवितहानी टळली; मात्र धोका कायम! PWD ने आता तरी जागे व्हावे.1
- बारामतीमध्ये अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन; वृक्षाला राखी बांधून अजितदादांच्या आठवणींना उजाळा1
- डॉक्टरने मेडिकल मधील औषध गोळ्या घेण्यासाठी कॅपिटल अक्षर आवश्यक.1
- विद्यार्थिनींनी चालक-वाहकांना बांधल्या राख्या; भावनिक क्षणी चालकांच्या डोळ्यात अश्रू ! विद्यार्थिनींनी चालक-वाहकांना बांधल्या राख्या; भावनिक क्षणी चालकांच्या डोळ्यात अश्रू ! आटपाडी येथील श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी नागपूर-रत्नागिरी महामार्गावरील नाझरे येथे रक्षाबंधनाचा अनोखा उपक्रम राबवला. महामार्गावर प्रवास करणाऱ्या चालक आणि वाहकांना विद्यार्थ्यांनी राख्या बांधून रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांच्या या प्रेमळ कृतीने चालक भारावून गेले आणि काही चालकांच्या डोळ्यात अश्रू तरळले. नातं रक्ताचं नसतं, तर ते माणुसकीच्या धाग्यानेही जुळतं...1