logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

जिल्हाधिकाऱ्यांची लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयास भेट! परीक्षा नियोजन व शिस्तबद्ध व्यवस्थेबाबत व्यक्त केले समाधान नांदेड, दि. 17 फेब्रुवारी :- इयत्ता बारावीच्या सुरू असलेल्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राहूल कर्डिले यांनी आज धर्माबाद येथील लाल बहादूर शास्त्री महाविद्यालय या परीक्षा केंद्राला भेट देऊन व्यवस्थेचा आढावा घेतला. भेटीदरम्यान त्यांनी परीक्षा केंद्रावरील प्रश्नपत्रिका सुरक्षित साठवणूक व्यवस्था, सीसीटीव्ही यंत्रणा, विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था, परीक्षा हॉलमधील शिस्त, तसेच पर्यवेक्षकांची उपस्थिती यांची पाहणी केली. परीक्षा सुरळीत, पारदर्शक व कॉपीमुक्त वातावरणात पार पडावी यासाठी केंद्रावर करण्यात आलेल्या नियोजनाबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छतागृहे, प्रकाश व्यवस्था तसेच आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याचेही त्यांनी पाहिले. केंद्रप्रमुख व शिक्षकांनी जबाबदारीने व नियोजनबद्ध पद्धतीने परीक्षा व्यवस्थापन केल्याबद्दल जिल्हाधिकारी श्री. कर्डिले यांनी त्यांचे कौतुक केले. जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्रांनी याच पद्धतीने काटेकोरपणे नियमांचे पालन करून परीक्षा पार पाडाव्यात, तसेच विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारच्या गैरप्रकाराला बळी न पडता आत्मविश्वासाने परीक्षा द्यावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

2 hrs ago
user_Mohammad Rafikh
Mohammad Rafikh
Graphic designer Nanded, Maharashtra•
2 hrs ago
2b2dca33-baa0-4723-8da8-cc5b38c237af

जिल्हाधिकाऱ्यांची लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयास भेट! परीक्षा नियोजन व शिस्तबद्ध व्यवस्थेबाबत व्यक्त केले समाधान नांदेड, दि. 17 फेब्रुवारी :- इयत्ता बारावीच्या सुरू असलेल्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राहूल कर्डिले यांनी आज धर्माबाद येथील लाल बहादूर शास्त्री महाविद्यालय या परीक्षा केंद्राला भेट देऊन व्यवस्थेचा आढावा घेतला. भेटीदरम्यान त्यांनी परीक्षा केंद्रावरील प्रश्नपत्रिका सुरक्षित साठवणूक व्यवस्था, सीसीटीव्ही यंत्रणा, विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था, परीक्षा हॉलमधील शिस्त, तसेच पर्यवेक्षकांची उपस्थिती यांची पाहणी केली. परीक्षा सुरळीत, पारदर्शक व कॉपीमुक्त वातावरणात पार पडावी यासाठी केंद्रावर करण्यात आलेल्या नियोजनाबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छतागृहे, प्रकाश व्यवस्था तसेच आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याचेही त्यांनी पाहिले. केंद्रप्रमुख व शिक्षकांनी जबाबदारीने व नियोजनबद्ध पद्धतीने परीक्षा व्यवस्थापन केल्याबद्दल जिल्हाधिकारी श्री. कर्डिले यांनी त्यांचे कौतुक केले. जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्रांनी याच पद्धतीने काटेकोरपणे नियमांचे पालन करून परीक्षा पार पाडाव्यात, तसेच विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारच्या गैरप्रकाराला बळी न पडता आत्मविश्वासाने परीक्षा द्यावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

More news from Maharashtra and nearby areas
  • एकादशी निमित्त सांगवी येथील श्री खाटू श्याम बाबा मंदिरामध्ये भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी बघण्यास मिळाली तसेच प्रत्येक एकादशीला विशेष पूजा अर्चना भजन कीर्तन होते. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविक आपल्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्या यासाठी श्री श्याम बाबा यांच्या चरणी साकडे घालतात. पौराणिक कथेमध्ये सांगितले आहे की भगवान श्रीकृष्ण यांनी त्यांच्या सर्व कला शक्ती गुण श्री खाटू श्याम बाबा यांना आशीर्वादरूपी दिले. आणि असे वरदान दिले की कलियुगामध्ये प्रत्येक घरामध्ये पुंजले जाशील तू हरलेल्यांचा सहारा बनशील म्हणजेच हारे का सहारा बाबा श्याम हमार जो भक्त या जगापासून हरला आहे तो तुझ्या चौकटीवर येईल त्याला तू तारणार व त्याच्या मनोकामना पूर्ण करून त्याच्या पाठी उभा राहणारा असा देखील वरदान भगवान श्रीकृष्णाने या खाटू श्याम बाबा यांना दिला आहे. याची महिमा अद्भुत असून श्रीकृष्णाने विशेष असं वरदान देखील या खाटू श्याम बाबाला दिला आहे. की ज्याच्या जीवनात कष्ट ,दुःख , दारिद्र्य, रोग , लिहिलेला आहे. ते कोणी टाळू शकत नाही परंतु ते देखील तू तुझ्या चौकटीवर आलेल्या भक्तांच सर्व संकट दुःख दारिद्र्य कष्ट दूर करण्याच विशेष अधिकार देखील या श्याम बाबांना दिलेला आहे. या कलियुगामध्ये मोठ्या प्रमाणात श्री खाटू श्याम बाबा यांचे भक्त यांना अनेक वेळा विविध अशा मनोकामनामध्ये चमत्कारीरुपी अनुभव आलेला आहे. म्हणून आज लाखो करोडो भक्त या श्याम बाबाच्या दर्शनासाठी राजस्थान येथे मोठ्या संख्येने जाऊन दर्शन घेतात त्याचेच प्रतिरुपी म्हणून नांदेड सांगवी एअरपोर्ट रोड या ठिकाणी मंदिराची स्थापना करण्यात आली असून याचा नांदेड जिल्ह्याच्या प्रत्येक भक्तांना विशेष असा आशीर्वाद प्राप्त होण्याकरिता व त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होण्याकरिता या मंदिरात सर्वांसाठी प्रवेश असून कुठल्याही प्रकारे या ठिकाणी रोख टोक नसून सर्वांना प्रवेश देण्यात येतो या खाटू श्याम बाबा मंदिर समितीच्या वतीने योग्य त्या सोयी सुविधा येणाऱ्या भक्तांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. त्यामुळे अनेक भाविक भक्त या ठिकाणी येऊन श्याम बाबा यांचे दर्शन घेतात व आपल्या जीवनात अनुभवाचे बदल घडून घेतात. आज रोजी या ठिकाणी एकादशी निमित्त विशेष पूजा अर्चना आणि संध्याकाळी भजन कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. मोठ्या भक्ती भावाने खाटू श्याम बाबांचे गुणगान गायले जाते. आपणही या ठिकाणी येऊन अनुभव घ्याल अशी अपेक्षा. जय श्री श्याम
    1
    एकादशी निमित्त सांगवी येथील श्री खाटू श्याम बाबा मंदिरामध्ये भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी बघण्यास मिळाली तसेच प्रत्येक एकादशीला विशेष पूजा अर्चना भजन कीर्तन होते. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविक आपल्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्या यासाठी श्री श्याम बाबा यांच्या चरणी साकडे घालतात. पौराणिक कथेमध्ये सांगितले आहे की भगवान श्रीकृष्ण यांनी त्यांच्या सर्व कला शक्ती गुण श्री खाटू श्याम बाबा यांना आशीर्वादरूपी दिले. आणि असे वरदान दिले की कलियुगामध्ये प्रत्येक घरामध्ये पुंजले जाशील तू हरलेल्यांचा सहारा बनशील म्हणजेच हारे का सहारा बाबा श्याम हमार जो भक्त या जगापासून हरला आहे तो तुझ्या चौकटीवर येईल त्याला तू तारणार व त्याच्या मनोकामना पूर्ण करून त्याच्या पाठी उभा राहणारा असा देखील वरदान भगवान श्रीकृष्णाने या खाटू श्याम बाबा यांना दिला आहे. याची महिमा अद्भुत असून श्रीकृष्णाने विशेष असं वरदान देखील या खाटू श्याम बाबाला दिला आहे. की ज्याच्या जीवनात कष्ट ,दुःख , दारिद्र्य, रोग , लिहिलेला आहे. ते कोणी टाळू शकत नाही परंतु ते देखील तू  तुझ्या चौकटीवर आलेल्या भक्तांच सर्व संकट दुःख दारिद्र्य कष्ट दूर करण्याच विशेष अधिकार देखील या श्याम बाबांना दिलेला आहे. या कलियुगामध्ये मोठ्या प्रमाणात श्री खाटू श्याम बाबा यांचे भक्त यांना अनेक वेळा विविध अशा मनोकामनामध्ये चमत्कारीरुपी अनुभव आलेला आहे. म्हणून आज  लाखो करोडो भक्त या श्याम बाबाच्या दर्शनासाठी राजस्थान येथे मोठ्या संख्येने जाऊन दर्शन घेतात त्याचेच प्रतिरुपी म्हणून नांदेड सांगवी एअरपोर्ट रोड या ठिकाणी मंदिराची स्थापना करण्यात आली असून याचा नांदेड जिल्ह्याच्या प्रत्येक भक्तांना विशेष असा आशीर्वाद प्राप्त होण्याकरिता व त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होण्याकरिता या मंदिरात सर्वांसाठी प्रवेश असून कुठल्याही प्रकारे या ठिकाणी रोख टोक नसून सर्वांना प्रवेश देण्यात येतो या खाटू श्याम बाबा मंदिर समितीच्या वतीने योग्य त्या सोयी सुविधा येणाऱ्या भक्तांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. 
त्यामुळे अनेक भाविक भक्त या ठिकाणी येऊन श्याम बाबा यांचे दर्शन घेतात व आपल्या जीवनात अनुभवाचे बदल घडून घेतात. आज रोजी या ठिकाणी एकादशी निमित्त विशेष पूजा अर्चना आणि संध्याकाळी भजन कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. मोठ्या भक्ती भावाने खाटू श्याम बाबांचे गुणगान गायले जाते.
आपणही या ठिकाणी येऊन अनुभव घ्याल अशी अपेक्षा.
जय श्री श्याम
    user_Shivkumar kale Press reporter
    Shivkumar kale Press reporter
    Nanded, Maharashtra•
    23 hrs ago
  • *“धानोरा विकासकामांचा भांडाफोड; जलसंधारण घोटाळ्यावर जि.प. प्रशासन कोंडीत!”* - जि.प. यवतमाळसमोर आमरण उपोषणाला सुरवात! उमरखेड : धानोरा (सा), ता. उमरखेड येथील कथित विकासकामांतील गैरव्यवहार आणि जलसंधारण विभागातील अनियमिततेच्या गंभीर आरोपांमुळे जिल्हा परिषद प्रशासनाविरोधात संतापाचा ज्वालामुखी उसळला आहे. सोमवारी (दि. १६ फेब्रुवारी २०२६) पासून जिल्हा परिषद यवतमाळ कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात झाली असून प्रशासनावर थेट कारवाईचा दबाव वाढला आहे. पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांचा या आमरण उपोषणात रामदास अंबादास कांबळे (अध्यक्ष, संयुक्त पत्रकार संघ), शेख इरफान शेख इसा (कार्याध्यक्ष) आणि सुरेंद्रनाथ पंजाबराव दळवी (उपाध्यक्ष) सहभागी झाले आहेत त्यांनी जि.प. कार्यालयासमोर “दोषींवर कारवाई झाल्याशिवाय माघार नाही” असा स्पष्ट इशारा दिला. *धानोरा प्रकरणातील आरोप गंभीर* उपोषणकर्त्यांनी केलेले आरोप थेट जनहिताशी निगडित असून त्यात प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुल गैरव्यवहार, स्मशानभूमीकडे जाणाऱ्या सीसी रस्त्याचे काम न करता बिले काढल्याचा आरोप, सार्वजनिक शौचालयाच्या निकृष्ट दर्जाच्या बांधकामाबाबत तक्रारींकडे दुर्लक्ष यांचा समावेश आहे. संबंधित प्रकरणांत चौकशी व कार्यवाही न झाल्याने आमरण उपोषण करत असल्याचे त्यांनी सांगितले. *जलसंधारण विभागावर लाखोंच्या भ्रष्टाचाराचा ठपका* जि.प. उपविभाग पुसद येथे कार्यरत उपविभागीय जलसंधारण अधिकारी सीमा तायडे यांच्या कार्यकाळात पुसद, दिग्रस, उमरखेड व महागाव तालुक्यांतील विकासकामांत लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. धरण–तलाव गाळ उपसा योजनेत अनियमितता,वीटभट्टी धारकांना नियमबाह्य माती परवाने, संबंधित अधिकाऱ्यांच्या संपत्तीची सखोल चौकशी अशा मागण्या आंदोलनकर्त्यांनी केल्या आहेत. तसेच संबंधित अधिकाऱ्यांची तात्काळ निलंबन आणि फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणीही करण्यात आली आहे. *तक्रारींनंतरही कारवाई नाही* १७ डिसेंबर २०२५ रोजी लेखी निवेदन, ९ जानेवारी २०२६ रोजी स्मरणपत्र आणि ३० जानेवारी २०२६ रोजी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व ग्रामविकास मंत्र्यांना ई-मेलद्वारे तसेच प्रत्यक्ष तक्रार करूनही कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. “दोषींवर कठोर कारवाई होईपर्यंत उपोषण मागे घेणार नाही. उपोषणादरम्यान काही अनुचित घडल्यास प्रशासन जबाबदार राहील,” असा थेट इशारा देत उपोषणकर्त्यांनी उपोषण तीव्र करण्याचे संकेत दिले आहेत. दरम्यान जि.प. कार्यालया समोर सुरू असलेल्या आमरण उपोषणातील गंभीर आरोपांवर प्रशासन काय भूमिका घेते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
    1
    *“धानोरा विकासकामांचा भांडाफोड; जलसंधारण घोटाळ्यावर जि.प. प्रशासन कोंडीत!”*
-  जि.प. यवतमाळसमोर आमरण उपोषणाला सुरवात!
उमरखेड : धानोरा (सा), ता. उमरखेड येथील कथित विकासकामांतील गैरव्यवहार आणि जलसंधारण विभागातील अनियमिततेच्या गंभीर आरोपांमुळे जिल्हा परिषद प्रशासनाविरोधात संतापाचा ज्वालामुखी उसळला आहे. सोमवारी (दि. १६ फेब्रुवारी २०२६) पासून जिल्हा परिषद यवतमाळ कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात झाली असून प्रशासनावर थेट कारवाईचा दबाव वाढला आहे.
पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांचा 
या आमरण उपोषणात  रामदास अंबादास कांबळे (अध्यक्ष, संयुक्त पत्रकार संघ), शेख इरफान शेख इसा (कार्याध्यक्ष) आणि सुरेंद्रनाथ पंजाबराव दळवी (उपाध्यक्ष) सहभागी झाले आहेत  त्यांनी जि.प. कार्यालयासमोर  “दोषींवर कारवाई झाल्याशिवाय माघार नाही” असा स्पष्ट इशारा दिला.
*धानोरा प्रकरणातील आरोप गंभीर*
उपोषणकर्त्यांनी केलेले आरोप थेट जनहिताशी निगडित असून त्यात प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुल गैरव्यवहार,
स्मशानभूमीकडे जाणाऱ्या सीसी रस्त्याचे काम न करता बिले काढल्याचा आरोप,
सार्वजनिक शौचालयाच्या निकृष्ट दर्जाच्या बांधकामाबाबत तक्रारींकडे दुर्लक्ष
यांचा समावेश आहे. संबंधित प्रकरणांत चौकशी व कार्यवाही न झाल्याने आमरण उपोषण करत असल्याचे त्यांनी सांगितले.
*जलसंधारण विभागावर लाखोंच्या भ्रष्टाचाराचा ठपका*
जि.प. उपविभाग पुसद येथे कार्यरत उपविभागीय जलसंधारण अधिकारी सीमा तायडे यांच्या कार्यकाळात पुसद, दिग्रस, उमरखेड व महागाव तालुक्यांतील विकासकामांत लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
धरण–तलाव गाळ उपसा योजनेत अनियमितता,वीटभट्टी धारकांना नियमबाह्य माती परवाने, संबंधित अधिकाऱ्यांच्या संपत्तीची सखोल चौकशी
अशा मागण्या आंदोलनकर्त्यांनी केल्या आहेत. तसेच संबंधित अधिकाऱ्यांची तात्काळ निलंबन आणि फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
*तक्रारींनंतरही कारवाई नाही*
१७ डिसेंबर २०२५ रोजी लेखी निवेदन, ९ जानेवारी २०२६ रोजी स्मरणपत्र आणि ३० जानेवारी २०२६ रोजी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व ग्रामविकास मंत्र्यांना ई-मेलद्वारे तसेच प्रत्यक्ष तक्रार करूनही कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
“दोषींवर कठोर कारवाई होईपर्यंत उपोषण मागे घेणार नाही. उपोषणादरम्यान काही अनुचित घडल्यास प्रशासन जबाबदार राहील,” असा थेट इशारा देत उपोषणकर्त्यांनी उपोषण तीव्र करण्याचे संकेत दिले आहेत.
दरम्यान जि.प. कार्यालया समोर सुरू असलेल्या आमरण उपोषणातील गंभीर आरोपांवर प्रशासन काय भूमिका घेते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
    user_Shaikh irfan Shaikh isa
    Shaikh irfan Shaikh isa
    उमरखेड, यवतमाळ, महाराष्ट्र•
    4 min ago
  • 🔱 पावसात अदृश्य… शिवरात्रीला प्रकट! 🔱 तेलंगणातील तेलंगणा राज्यातील निजामाबाद जिल्हा, नंदिपेट मंडल परिसरातील उम्मेडा गावाजवळ गोदावरी नदीच्या पवित्र काठावर वसलेले श्री सोमेश्वर (उमामहेश्वर) मंदिर हे देवस्थान महाशिवरात्रीला अक्षरशः चमत्कारासारखे प्रकट होते! 🌊 पावसाळ्यात धरणातील पाणी वाढल्याने वर्षभर पाण्यात लपलेले हे प्राचीन मंदिर, पाणी ओसरताच महाशिवरात्रीला दर्शनासाठी खुले होते. 🛕 कळस, गाभारा आणि दीपमाळ पुन्हा उजेडात येतात आणि श्रद्धा-निसर्ग-अध्यात्म यांचा अद्भुत संगम अनुभवायला मिळतो. 🪔 कार्तिक महिन्यातील गंगा पूजन व दीपोत्सव तर भक्तांसाठी अविस्मरणीय क्षण ठरतो. ✨ निसर्गाच्या कुशीत दरवर्षी पुन्हा उगवणारा हा अध्यात्माचा दीप—गोदावरीकाठी अनुभवायला मिळणारी दिव्य पर्वणी! यंदा महाशिवरात्री निमित्त लाखो भाविकांनी सोमेश्वराचे दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेतला. हर हर महादेव! 🔱 #श्रीसोमेश्वर #उमामहेश्वर #गोदावरीकाठ #महाशिवरात्री2026 #Telangana #Nizamabad #Umedda #आस्था #धार्मिकवार्ता #NNLDigitalMedia
    1
    🔱 पावसात अदृश्य… शिवरात्रीला प्रकट! 🔱
तेलंगणातील तेलंगणा राज्यातील निजामाबाद जिल्हा, नंदिपेट मंडल परिसरातील उम्मेडा गावाजवळ गोदावरी नदीच्या पवित्र काठावर वसलेले श्री सोमेश्वर (उमामहेश्वर) मंदिर हे देवस्थान महाशिवरात्रीला अक्षरशः चमत्कारासारखे प्रकट होते!
🌊 पावसाळ्यात धरणातील पाणी वाढल्याने वर्षभर पाण्यात लपलेले हे प्राचीन मंदिर, पाणी ओसरताच महाशिवरात्रीला दर्शनासाठी खुले होते.
🛕 कळस, गाभारा आणि दीपमाळ पुन्हा उजेडात येतात आणि श्रद्धा-निसर्ग-अध्यात्म यांचा अद्भुत संगम अनुभवायला मिळतो.
🪔 कार्तिक महिन्यातील गंगा पूजन व दीपोत्सव तर भक्तांसाठी अविस्मरणीय क्षण ठरतो.
✨ निसर्गाच्या कुशीत दरवर्षी पुन्हा उगवणारा हा अध्यात्माचा दीप—गोदावरीकाठी अनुभवायला मिळणारी दिव्य पर्वणी!
यंदा महाशिवरात्री निमित्त लाखो भाविकांनी सोमेश्वराचे दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेतला.
हर हर महादेव! 🔱
#श्रीसोमेश्वर #उमामहेश्वर #गोदावरीकाठ #महाशिवरात्री2026 #Telangana #Nizamabad #Umedda #आस्था #धार्मिकवार्ता #NNLDigitalMedia
    user_ALM Network
    ALM Network
    Local News Reporter हिमायतनगर, नांदेड, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • संस्काराची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या गुरु कडून आशीर्वाद हेच जीवनाचे साफल्य - रामभाऊ तिरुके उदगीर (एल पी उगीले) उदगीर तालुक्यातील वाढवणा जिल्हा परिषद गटामधून भारतीय जनता पक्षाचे नेते रामभाऊ तिरुके विजयी झाल्यानंतर त्यांनी आपल्यावर संस्कार केलेल्या जिल्हा परिषद शाळेत पहिली ते चौथी इयत्तेपर्यंत संस्कार करणारे, शिक्षणाची भक्कम पायाभरणी करून देणारे मार्गदर्शक तथा शिक्षक शिवाजीराव पांचाळ गुरुजी यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेत आशीर्वाद घेतले.  गुरु पेक्षा शिष्य मोठा व्हावा, तोच गुरुला खरा आनंद असतो. भावनेने प्रचंड आनंदाने त्यांनी रामभाऊ तिरुके यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आणि आशीर्वाद दिला. हा आशीर्वाद घेतल्यानंतर बोलताना रामभाऊ तिरुके म्हणाले की, प्राथमिक शिक्षणाच्या त्या मजबूत पायावर उभा राहूनच मी पुढील शैक्षणिक, राजकीय आणि सामाजिक वाटचाल सुरू ठेवू शकलो. गेली ३२ वर्षे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात कार्यकर्ता म्हणून काम करत असताना लोकांनी दिलेला विश्वास, उभं केलेलं काम आणि चार वेळा जिल्हा परिषद निवडणूक लढवताना तीन वेळा जनतेने माझ्यावर उधळलेला विजयाचा गुलाल, हे सर्व ऐकून आणि पाहून गुरुजींच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद माझ्यासाठी सर्वात मोठा सन्मान होता. गुरुजींचे आशीर्वाद हेच माझे खरे बळ असून त्यांच्या कृपाशिर्वादाने समाजसेवेची ही वाटचाल अधिक जोमाने आणि निष्ठेने पुढे सुरू राहील, याचा मला पूर्ण विश्वास आहे. माझ्या गुरुजनांचा आणि माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या पक्षश्रष्ठींचा सन्मान झाला पाहिजे अशाच पद्धतीचे काम माझ्या हातून होत राहील. आज पर्यंत जो आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम करत आहे, तोच आदर्श शेवटपर्यंत माझ्यासमोर राहील. त्यामुळे मी समाजसेवा हेच जीवनाचे ध्येय ठेवले आहे, असे स्पष्ट केले.
    1
    संस्काराची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या गुरु कडून आशीर्वाद हेच जीवनाचे साफल्य - रामभाऊ तिरुके
उदगीर (एल पी उगीले) उदगीर तालुक्यातील वाढवणा जिल्हा परिषद गटामधून भारतीय जनता पक्षाचे नेते रामभाऊ तिरुके विजयी झाल्यानंतर त्यांनी आपल्यावर संस्कार केलेल्या जिल्हा परिषद शाळेत पहिली ते चौथी इयत्तेपर्यंत संस्कार करणारे, शिक्षणाची भक्कम पायाभरणी करून देणारे मार्गदर्शक तथा शिक्षक शिवाजीराव पांचाळ गुरुजी यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेत आशीर्वाद घेतले. 
गुरु पेक्षा शिष्य मोठा व्हावा, तोच गुरुला खरा आनंद असतो. भावनेने प्रचंड आनंदाने त्यांनी रामभाऊ तिरुके यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आणि आशीर्वाद दिला.
हा आशीर्वाद घेतल्यानंतर बोलताना रामभाऊ तिरुके म्हणाले की, प्राथमिक शिक्षणाच्या त्या मजबूत पायावर उभा राहूनच मी पुढील शैक्षणिक, राजकीय आणि सामाजिक वाटचाल सुरू ठेवू शकलो. गेली ३२ वर्षे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात कार्यकर्ता म्हणून काम करत असताना लोकांनी दिलेला विश्वास, उभं केलेलं काम आणि चार वेळा जिल्हा परिषद निवडणूक लढवताना तीन वेळा जनतेने माझ्यावर उधळलेला विजयाचा गुलाल, हे सर्व ऐकून आणि पाहून गुरुजींच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद माझ्यासाठी सर्वात मोठा सन्मान होता. गुरुजींचे आशीर्वाद हेच माझे खरे बळ असून त्यांच्या कृपाशिर्वादाने समाजसेवेची ही वाटचाल अधिक जोमाने आणि निष्ठेने पुढे सुरू राहील, याचा मला पूर्ण विश्वास आहे. माझ्या गुरुजनांचा आणि माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या पक्षश्रष्ठींचा सन्मान झाला पाहिजे अशाच पद्धतीचे काम माझ्या हातून होत राहील. आज पर्यंत जो आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम करत आहे, तोच आदर्श शेवटपर्यंत माझ्यासमोर राहील. त्यामुळे मी समाजसेवा हेच जीवनाचे ध्येय ठेवले आहे, असे स्पष्ट केले.
    user_Laxman Ugile
    Laxman Ugile
    उदगीर, लातूर, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • *शहीद संतोष जगदाळे यांच्या कन्येला पुणे महानगरपालिकेत शासकीय सेवा; डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या पाठपुराव्याला यश* ​ २२ एप्रिल २०२५ रोजी पहलगम (जम्मू-काश्मीर) येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात वीरमरण आलेले शहीद संतोष जगदाळे यांच्या कुटुंबाला आज मोठा दिलासा मिळाला आहे. जगदाळे कुटुंबातील एकमेव कमावत्या व्यक्तीचे छत्र हरपल्याने निर्माण झालेल्या संकटाच्या काळात, त्यांच्या कन्या आसावरी जगदाळे यांना पुणे महानगरपालिकेत शासकीय सेवेत सामावून घेण्याचा मार्ग आता मोकळा झाला असून, त्यांना नियुक्ती देण्याचे आदेश निर्गमित होत आहेत. शहीद संतोष जगदाळे यांच्या निधनानंतर जगदाळे कुटुंब उघड्यावर पडले होते. या घटनेची गांभीर्याने दखल घेत विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी २५ मे २०२५ रोजी जगदाळे कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतली होती. कुटुंबाची हलाखीची परिस्थिती आणि व्यथा जाणून घेतल्यानंतर, डॉ. गोऱ्हे यांनी २७ मे २०२५ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे यांना पत्र लिहून आसावरी जगदाळे यांना विशेष बाब म्हणून शासकीय सेवेत सामावून घेण्याची विनंती केली होती. ​ डॉ. गोऱ्हे यांच्या पत्राच्या अनुषंगाने १९ जून २०२५ रोजी नगरविकास विभागाने पुणे महानगरपालिकेला प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, या प्रक्रियेत अनेक तांत्रिक आणि प्रशासकीय अडचणी निर्माण झाल्या होत्या. या अडचणींमुळे नियुक्ती लांबणीवर पडत असताना डॉ. गोऱ्हे यांनी खचून न जाता सातत्याने पाठपुरावा केला. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांच्या वारंवार बैठका घेतल्या आणि सकारात्मक प्रस्ताव तयार करण्यासाठी प्रशासनावर दबाव निर्माण केला. ​ सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री ना. श्री. एकनाथजी शिंदे यांनी या प्रकरणात संवेदनशीलतेने लक्ष घातले. तांत्रिक अडचणी असूनही एका शहीद कुटुंबाच्या पाठीशी उभे राहण्याची भूमिका त्यांनी घेतली. डॉ. गोऱ्हे यांच्या सततच्या पाठपुराव्याला आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्या सकारात्मक निर्णयाला आज यश आले असून आसावरी यांना नोकरी प्राप्त होत आहे. ​"संतोष जगदाळे यांनी देशासाठी बलिदान दिले, त्यांचे जाणे ही न भरून निघणारी हानी आहे. त्यांच्या बलिदानाची परतफेड आपण करू शकत नाही, मात्र त्यांच्या कुटुंबाला वाऱ्यावर सोडणे ही आपली संस्कृती नाही. आसावरीला नोकरी मिळवून देण्यासाठी तांत्रिक अडचणींमुळे थोडा विलंब झाला, त्याबद्दल आम्ही जगदाळे कुटुंबाच्या भावनेशी सहमत आहोत. मात्र, आज तिला नियुक्ती मिळत असल्याचा समाधान आहे. उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की, ते केवळ राज्याचे प्रमुख नसून खऱ्या अर्थाने 'लाडक्या बहिणीचे राखणदार' आहेत." ​या निर्णयामुळे जगदाळे कुटुंबाला आर्थिक स्थैर्य लाभणार असून, एका वीरपुत्राच्या बलिदानाचा सन्मान शासनाकडून करण्यात आला आहे.
    1
    *शहीद संतोष जगदाळे यांच्या कन्येला पुणे महानगरपालिकेत शासकीय सेवा; डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या पाठपुराव्याला यश*
​
२२ एप्रिल २०२५ रोजी पहलगम (जम्मू-काश्मीर) येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात वीरमरण आलेले शहीद संतोष जगदाळे यांच्या कुटुंबाला आज मोठा दिलासा मिळाला आहे. जगदाळे कुटुंबातील एकमेव कमावत्या व्यक्तीचे छत्र हरपल्याने निर्माण झालेल्या संकटाच्या काळात, त्यांच्या कन्या आसावरी जगदाळे यांना पुणे महानगरपालिकेत शासकीय सेवेत सामावून घेण्याचा मार्ग आता मोकळा झाला असून, त्यांना नियुक्ती देण्याचे आदेश निर्गमित होत आहेत.
शहीद संतोष जगदाळे यांच्या निधनानंतर जगदाळे कुटुंब उघड्यावर पडले होते. या घटनेची गांभीर्याने दखल घेत विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी २५ मे २०२५ रोजी जगदाळे कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतली होती. कुटुंबाची हलाखीची परिस्थिती आणि व्यथा जाणून घेतल्यानंतर, डॉ. गोऱ्हे यांनी २७ मे २०२५ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे यांना पत्र लिहून आसावरी जगदाळे यांना विशेष बाब म्हणून शासकीय सेवेत सामावून घेण्याची विनंती केली होती.
​
डॉ. गोऱ्हे यांच्या पत्राच्या अनुषंगाने १९ जून २०२५ रोजी नगरविकास विभागाने पुणे महानगरपालिकेला प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, या प्रक्रियेत अनेक तांत्रिक आणि प्रशासकीय अडचणी निर्माण झाल्या होत्या. या अडचणींमुळे नियुक्ती लांबणीवर पडत असताना डॉ. गोऱ्हे यांनी खचून न जाता सातत्याने पाठपुरावा केला. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांच्या वारंवार बैठका घेतल्या आणि सकारात्मक प्रस्ताव तयार करण्यासाठी प्रशासनावर दबाव निर्माण केला.
​
सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री ना. श्री. एकनाथजी शिंदे यांनी या प्रकरणात संवेदनशीलतेने लक्ष घातले. तांत्रिक अडचणी असूनही एका शहीद कुटुंबाच्या पाठीशी उभे राहण्याची भूमिका त्यांनी घेतली. डॉ. गोऱ्हे यांच्या सततच्या पाठपुराव्याला आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्या सकारात्मक निर्णयाला आज यश आले असून आसावरी यांना नोकरी प्राप्त होत आहे.
​"संतोष जगदाळे यांनी देशासाठी बलिदान दिले, त्यांचे जाणे ही न भरून निघणारी हानी आहे. त्यांच्या बलिदानाची परतफेड आपण करू शकत नाही, मात्र त्यांच्या कुटुंबाला वाऱ्यावर सोडणे ही आपली संस्कृती नाही. आसावरीला नोकरी मिळवून देण्यासाठी तांत्रिक अडचणींमुळे थोडा विलंब झाला, त्याबद्दल आम्ही जगदाळे कुटुंबाच्या भावनेशी सहमत आहोत. मात्र, आज तिला नियुक्ती मिळत असल्याचा समाधान आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की, ते केवळ राज्याचे प्रमुख नसून खऱ्या अर्थाने 'लाडक्या बहिणीचे राखणदार' आहेत."
​या निर्णयामुळे जगदाळे कुटुंबाला आर्थिक स्थैर्य लाभणार असून, एका वीरपुत्राच्या बलिदानाचा सन्मान शासनाकडून करण्यात आला आहे.
    user_Sunil Gawali
    Sunil Gawali
    शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • Post by EKMAT DIGITAL
    1
    Post by EKMAT DIGITAL
    user_EKMAT DIGITAL
    EKMAT DIGITAL
    शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • *ओव्हरलोड गिट्टी भरून जाणारा हायवा ट्रकचा अपघात* आज सकाळी आसना नदी च्या नवीन बांधण्यात आलेल्या पूलाच्या दुभाजक असलेल्या डिव्हायडरला गिट्टीने ओव्हरलोड भरलेल्या हायवाचा अपघात झाला. आसना नदी वरून नवीन पुलाच्या दुभाजक रस्त्या वर हॉटेल सिल्वर ओक च्या समोरील फुलाच्या खालून जाणारा रस्त्यावर हा हायवा ट्रक पलटी झाला यामध्ये कुठलीही जीवित हानी झाल्याची नसली तरी वाहनाचे नुकसान झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे पूर्ण रस्त्यावर ट्रकचे ऑइल हे पसरले असून यामुळे दुसरी दुर्घटना घडू शकते. तरीही ओव्हरलोड करून दिवस ढवळ्या तसेच रात्री अपरात्री बिनधास्तपणे अशा प्रकारचे हायवा नशे करून तसेच कुठल्याही नियमाचे पालन न करता सुसाट वेगाने धावत आहेत. अनेक अपघात या हायवा ट्रक मुळे आजकाल शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात होत आहेत. त्यामध्ये अनेकांनी आपला जीव गमावला आहे. इतर वाहनांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान, सरकारी मालमत्तेचे नुकसान ,अशा घटना घडल्या असताना आजची ही घटना समोर आली आहे. या घटने त नशिबाने कुठलीही जीवितहानी किंवा इतर वाहनांचा समावेश नव्हता म्हणून बरं झालं अन्यथा या ठिकाणीही काही जीवित हानी अशा मोठ्या प्रकारची घटना घडली असती. तरीही अशा प्रकारे वाहतूक करणारे वाहतूकदार त्यांचे मालक हे या अशा घटनांना गंभीर घेत नसल्याचे दिसून येत आहे. यावर पोलीस प्रशासन काय कारवाई करत आहे. असा देखील प्रश्न निर्माण होत आहे. आजही शहरांमध्ये परवानगी नसताना सुद्धा मोठ्या प्रमाणात जड वाहतूक होताना दिसत आहे. तरीदेखील स्थानिक पोलीस प्रशासन तसेच स्थानिक तहसील कार्यालय वाळू वाहतूक, गट्टी वाहतूक ,मुरूम वाहतूक , गौण खजिना अशा अनेक वाहतुकीस परवानगी देतो का असा देखील प्रश्न निर्माण होत आहे.
    1
    *ओव्हरलोड गिट्टी भरून जाणारा हायवा ट्रकचा अपघात*
आज सकाळी आसना नदी च्या नवीन बांधण्यात आलेल्या पूलाच्या दुभाजक असलेल्या डिव्हायडरला गिट्टीने ओव्हरलोड भरलेल्या       
हायवाचा अपघात झाला. 
आसना नदी वरून नवीन पुलाच्या दुभाजक रस्त्या वर हॉटेल सिल्वर ओक च्या समोरील फुलाच्या खालून जाणारा रस्त्यावर हा हायवा ट्रक पलटी झाला यामध्ये कुठलीही जीवित हानी झाल्याची नसली तरी वाहनाचे नुकसान झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे पूर्ण रस्त्यावर ट्रकचे ऑइल हे पसरले असून यामुळे  दुसरी दुर्घटना घडू शकते. तरीही ओव्हरलोड करून दिवस ढवळ्या तसेच रात्री अपरात्री बिनधास्तपणे अशा प्रकारचे हायवा नशे करून तसेच कुठल्याही नियमाचे पालन न करता सुसाट वेगाने धावत आहेत. अनेक अपघात या हायवा ट्रक मुळे आजकाल शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात होत आहेत. त्यामध्ये अनेकांनी आपला जीव गमावला आहे. इतर वाहनांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान, सरकारी मालमत्तेचे नुकसान ,अशा घटना घडल्या असताना आजची ही घटना समोर आली आहे. या घटने त नशिबाने कुठलीही जीवितहानी किंवा इतर वाहनांचा समावेश नव्हता म्हणून बरं झालं अन्यथा या ठिकाणीही काही जीवित हानी अशा मोठ्या प्रकारची घटना घडली असती. तरीही अशा प्रकारे वाहतूक करणारे वाहतूकदार त्यांचे मालक हे या अशा घटनांना गंभीर घेत नसल्याचे दिसून येत आहे. यावर पोलीस प्रशासन काय कारवाई करत आहे. असा देखील प्रश्न निर्माण होत आहे. आजही शहरांमध्ये परवानगी नसताना सुद्धा मोठ्या प्रमाणात जड वाहतूक होताना दिसत आहे. तरीदेखील स्थानिक पोलीस प्रशासन तसेच स्थानिक तहसील कार्यालय वाळू वाहतूक, गट्टी वाहतूक ,मुरूम वाहतूक , गौण खजिना अशा अनेक वाहतुकीस परवानगी देतो का असा देखील प्रश्न निर्माण होत आहे.
    user_Shivkumar kale Press reporter
    Shivkumar kale Press reporter
    Nanded, Maharashtra•
    23 hrs ago
  • उदगीर (एल पी उगीले) येथील जीवन फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या वतीने आद्य क्रांतिगृह असतात लहुजी साळवे यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी प्रामुख्याने जीवन प्रयाग फाउंडेशनचे अध्यक्ष प्रभात सूर्यवंशी, प्रा. संजय बीबीनवरे, सामाजिक कार्यकर्ते दयानंद कांबळे, चंद्रकला सूर्यवंशी यांच्यासह वस्ताद लहुजी साळवे यांच्यावर प्रेम करणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
    1
    उदगीर (एल पी उगीले) येथील जीवन फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या वतीने आद्य क्रांतिगृह असतात लहुजी साळवे यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी प्रामुख्याने जीवन प्रयाग फाउंडेशनचे अध्यक्ष प्रभात सूर्यवंशी, प्रा. संजय बीबीनवरे, सामाजिक कार्यकर्ते दयानंद कांबळे, चंद्रकला सूर्यवंशी यांच्यासह वस्ताद लहुजी साळवे यांच्यावर प्रेम करणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
    user_Laxman Ugile
    Laxman Ugile
    उदगीर, लातूर, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • ज्ञानेशप्रसाद, ब्युरो चिफ न्यूज मराठी वाशिम* संवाद:- 9923230821 रिसोड: न. प. चे कर्मचारी विनोद बांगर यांच्यामुळे, गावात पुन्: पक्षांचा चिव चिवाट ऐकायला मिळतोय!
    1
    ज्ञानेशप्रसाद, ब्युरो चिफ न्यूज मराठी वाशिम* संवाद:- 9923230821
रिसोड: न. प. चे कर्मचारी विनोद बांगर यांच्यामुळे, गावात पुन्: पक्षांचा चिव चिवाट ऐकायला मिळतोय!
    user_Dnyaneshprasad
    Dnyaneshprasad
    वाशिम, वाशिम, महाराष्ट्र•
    3 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.