logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

छ.संभाजीनगर- बेगमपुरा पोलीस व स्टाफने सराईत गुन्हेगाराकडून १२ ग्रॅम एमडी पावडर केली जप्त; अंमलीपदार्थ प्रतिबंधक पथकाची कारवाई,२.४० लाखांची मेफेड्रोन पावडर जप्त; २४ गुन्हे दाखल असलेला आरोपी ताब्यात सराईत गुन्हेगाराकडून १२ ग्रॅम एमडी पावडर जप्त; अंमलीपदार्थ प्रतिबंधक पथकाची कारवाई २.४० लाखांची मेफेड्रोन पावडर जप्त; २४ गुन्हे दाखल असलेला आरोपी ताब्यात छत्रपती संभाजीनगरमध्ये अंमलीपदार्थ प्रतिबंधक पथकाने मोठी कारवाई करत सराईत गुन्हेगाराच्या ताब्यातून १२ ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) पावडर जप्त केली आहे. जटवाडा रोडवरील सईदा कॉलनी परिसरात आरोपी आदिल चाऊस हा एमडी पावडरची विक्री करत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी आरोपीकडून २ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून त्याच्याविरुद्ध बेगमपुरा पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात येत आहे. आरोपीवर यापूर्वी मकोका अंतर्गत कारवाई झाली असून विविध पोलीस ठाण्यांमध्ये २४ गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

8 hrs ago
user_रविंद्र सुरडकर गुरव
रविंद्र सुरडकर गुरव
औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
8 hrs ago
ca44de4c-061c-456f-b18a-3fd6454f236e

छ.संभाजीनगर- बेगमपुरा पोलीस व स्टाफने सराईत गुन्हेगाराकडून १२ ग्रॅम एमडी पावडर केली जप्त; अंमलीपदार्थ प्रतिबंधक पथकाची कारवाई,२.४० लाखांची मेफेड्रोन पावडर जप्त; २४ गुन्हे दाखल असलेला आरोपी ताब्यात सराईत गुन्हेगाराकडून १२ ग्रॅम एमडी पावडर जप्त; अंमलीपदार्थ प्रतिबंधक पथकाची कारवाई २.४० लाखांची मेफेड्रोन पावडर जप्त; २४ गुन्हे दाखल असलेला आरोपी ताब्यात छत्रपती संभाजीनगरमध्ये अंमलीपदार्थ प्रतिबंधक पथकाने मोठी कारवाई करत सराईत गुन्हेगाराच्या ताब्यातून १२ ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) पावडर जप्त

8e896317-ee8a-4169-9904-f450ef46fb21

केली आहे. जटवाडा रोडवरील सईदा कॉलनी परिसरात आरोपी आदिल चाऊस हा एमडी पावडरची विक्री करत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी आरोपीकडून २ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून त्याच्याविरुद्ध बेगमपुरा पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात येत आहे. आरोपीवर यापूर्वी मकोका अंतर्गत कारवाई झाली असून विविध पोलीस ठाण्यांमध्ये २४ गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • छ संभाजीनगर -कॉकरोच पार्टीचे अभिजीत दिपकेची प्रकृती बिघडली छ संभाजीनगर कॉकरोच अभिजीत दिपकेची प्रकृती बिघडली कॉकरोच जनता पक्षाचे अध्यक्ष अभिजीत दिपके यांची प्रकृती बिघडली असून, भेट देण्यासाठी आलेल्या लोकांना भेटत असताना अभिजीत दिपके यांना उलटी झाली, अभिजीत दिपके यांच्यावर उपचार करण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी डॉक्टर दाखल बाईट -डॉक्टर विशाल लहाने
    1
    छ संभाजीनगर -कॉकरोच पार्टीचे अभिजीत दिपकेची प्रकृती बिघडली 
छ संभाजीनगर 
कॉकरोच अभिजीत दिपकेची प्रकृती बिघडली 
कॉकरोच जनता पक्षाचे अध्यक्ष अभिजीत दिपके यांची प्रकृती बिघडली असून, भेट देण्यासाठी आलेल्या लोकांना भेटत असताना अभिजीत दिपके यांना उलटी झाली, अभिजीत दिपके यांच्यावर उपचार करण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी डॉक्टर दाखल
बाईट -डॉक्टर विशाल लहाने
    user_रविंद्र सुरडकर गुरव
    रविंद्र सुरडकर गुरव
    औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • सिल्लोड येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर.. प्रेस नोट *सिल्लोड येथे 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर' उत्साहात संपन्न* *११ हजार ५०० हून अधिक लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ* *प्रशासनाने जनतेच्या विश्वासाचे केंद्र बनावे; शासकीय योजनांचा लाभ प्रत्येक पात्र लाभार्थ्यापर्यंत पोहोचवा – आमदार अब्दुल सत्तार* सिल्लोड (प्रतिनिधी) महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या वतीने आयोजित 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर' सिल्लोड शहरातील डोंगरगाव फाटा येथील स्वस्तिक लॉन्स येथे उत्साहात संपन्न झाले. या शिबिराचे उदघाटन आमदार अब्दुल सत्तार यांच्याहस्ते संपन्न झाले. या शिबिरात महसूल, ग्रामविकास, कृषी, एकात्मिक बाल विकास, वन विभाग, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय, नगर परिषद आदी विविध विभागांच्या योजनांअंतर्गत सुमारे ११ हजार ५०० हून अधिक लाभार्थ्यांना आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात लाभांचे वितरण करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना आमदार अब्दुल सत्तार यांनी राज्य शासन हे सर्वसामान्य नागरिकांच्या कल्याणासाठी कटिबद्ध असलेले लोककल्याणकारी सरकार असल्याचे सांगितले. ग्रामसभा व विविध उपक्रमांच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांपर्यंत शासनाच्या योजना प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी विशेष उपाययोजना राबविण्याचे निर्देश त्यांनी संबंधित विभागांना दिले. महसूल प्रशासन हे केवळ कागदपत्रांची पूर्तता करणारे कार्यालय नसून जनतेच्या विश्वासाचे केंद्र आहे. त्यामुळे प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याने संवेदनशीलता, पारदर्शकता आणि तत्परता या तत्त्वांवर काम करावे, असे आवाहन त्यांनी केले. आपल्या भाषणात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोकाभिमुख प्रशासनाचा उल्लेख करताना सांगितले की, महाराजांनी रयतेला केंद्रस्थानी ठेवून प्रशासनाची उभारणी केली. शेतकरी, सर्वसामान्य नागरिक व दुर्बल घटकांच्या हिताला त्यांनी सर्वोच्च प्राधान्य दिले. त्याच विचारांवर राज्य शासन कार्यरत असून शेतकरी व सर्वसामान्य नागरिक केंद्रस्थानी ठेवून विविध विकासात्मक योजना राबविल्या जात आहेत. या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी अधिकाऱ्यांनी मनापासून पुढाकार घ्यावा, असे त्यांनी स्पष्ट केले. भ्रष्टाचारामुळे शासनाची प्रतिमा मलिन होते. त्यामुळे भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन करणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले. दिव्यांग, आदिवासी, शेतकरी, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबे तसेच सर्व वंचित घटकांना त्यांच्या हक्काच्या योजनांचा लाभ वेळेत मिळावा, यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जबाबदारीने काम करावे. नागरिकांशी सुसंवाद ठेवून त्यांचे समाधान होईल अशा पद्धतीने प्रशासनाने कार्य करावे, असेही त्यांनी सांगितले. ------------- प्रलंबित पीक विमा दाव्यांच्या संदर्भात बोलताना आमदार अब्दुल सत्तार यांनी पीक विमा हा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा अधिकार असून तो मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, असे सांगितले. येत्या विधिमंडळ अधिवेशनात या विषयावर शासनाकडे पाठपुरावा करून प्रश्न उपस्थित केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. ------------ यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात विविध लोकहिताचे निर्णय घेतले जात असल्याचा उल्लेख केला. तसेच स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख करून त्यांना विनम्र अभिवादन केले. ---------- नगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी आपल्या भाषणात सिल्लोड शहरातील बेघर नागरिकांसाठी आमदार अब्दुल सत्तार यांच्या पुढाकारातून म्हाडा योजनेंतर्गत पाच हजार घरांचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात येत असल्याची माहिती दिली. तसेच नगर परिषदेमार्फत सुरू असलेल्या विविध विकासकामांची माहिती देत नागरिकांनी शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. उपविभागीय अधिकारी प्रवीण फुलारी यांनी प्रास्ताविकात 'छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर' अंतर्गत करण्यात आलेल्या विविध कामांचा तसेच निकाली काढलेल्या प्रकरणांचा आढावा सादर केला. तहसीलदार अंकिता ताकभाते (सिल्लोड) व तहसीलदार मनीषा मेने (सोयगाव) यांनी महसूल विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती देत नागरिकांनी विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.तालुका कृषी अधिकारी संदीप जगताप यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती देत शेतकऱ्यांनी शासनाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. गटविकास अधिकारी रत्नाकर पगार यांनी ग्रामविकास विभागाच्या योजनांची माहिती देत पात्र लाभार्थ्यांनी प्रस्ताव सादर करून योजनांचा लाभ घ्यावा, असे सांगितले. कार्यक्रमाच्या प्रारंभी आमदार अब्दुल सत्तार व मान्यवरांनी स्वस्तिक लॉन्स परिसरात विविध विभागांनी उभारलेल्या शासकीय स्टॉलची पाहणी केली. तसेच महिला बचत गटांनी तयार केलेल्या विविध उत्पादनांची खरेदी करून त्यांच्या उत्पादनांना प्रोत्साहन दिले व नागरिकांनी स्थानिक बचत गटांच्या उत्पादनांना प्राधान्य द्यावे, असे आवाहन केले. सिल्लोड नगर परिषदेच्या विद्यार्थ्यांनी लेझीम पथक व पुष्पगुच्छाद्वारे मान्यवरांचे स्वागत केले. छत्रपती शिवाजी महाराज तसेच स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत जोशी यांनी केले, तर उपस्थितांचे आभार तहसीलदार अंकिता ताकभाते यांनी मानले. ------ यावेळी उपविभागीय अधिकारी प्रवीण फुलारी, परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी तथा तहसीलदार अंकिता ताकभाते (सिल्लोड), तहसीलदार मनीषा मेने (सोयगाव), गटविकास अधिकारी रत्नाकर पगार (सिल्लोड), गटविकास अधिकारी अमोल जगताप (सोयगाव), नगराध्यक्ष अब्दुल समीर अ. सत्तार, मुख्याधिकारी कारभारी दिवेकर, उपविभागीय कृषी अधिकारी सुभाष आघाव, तालुका कृषी अधिकारी संदीप जगताप (सिल्लोड), भारत कासार ( सोयगाव ), नायब तहसीलदार तुकाराम बनकर ,बळीराम मुंडे , संभाजी पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख केशवराव पाटील तायडे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख (सोयगाव) प्रभाकर काळे, उपनगराध्यक्ष विठ्ठल सपकाळ, शिवसेना तालुकाप्रमुख (सोयगाव) धरमसिंग चव्हाण, जिल्हा बँकेचे संचालक अर्जुन गाडे, जिल्हा परिषद सदस्य देविदास पालोदकर, अब्दुल आमेर अ. सत्तार, सय्यद नासेर हुसेन, राजू बाबा काळे, माजी जि.प.अध्यक्ष श्रीराम महाजन, माजी सभापती रामदास पालोदकर, विश्वासराव दाभाडे, नगर परिषद शिवसेना गटनेते सुधाकर पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सतीश ताठे, संदीप राऊत, राजाराम पाडळे, जयराम चिंचपुरे, नानासाहेब रहाटे, पंचायत समिती सदस्य निजाम पठाण, सुरेखा शिंदे, शिवसेना शहरप्रमुख मनोज झंवर, उपनगराध्यक्ष विठ्ठल सपकाळ, नगरसेवक रउफ बागवान, अकील वसईकर, आसिफ बागवान, सिद्धेश्वर आहेर, डॉ. फिरोज पठाण, बबलू पठाण, नूर मोहंमद कुरेशी, शिवसेना महिला आघाडीच्या दुर्गाबाई पवार, संजय डमाळे, राजूमिया देशमुख, अंबादास सपकाळ, मोतीराम पाडळे, पंकज जयस्वाल आदींसह शासनाच्या विविध विभागांचे विभागप्रमुख, अधिकारी, कर्मचारी, आशा सेविका, लाभार्थी तसेच विविध गावांतील आजी-माजी सरपंच, लोकप्रतिनिधी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    1
    सिल्लोड येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर..
प्रेस नोट
*सिल्लोड येथे 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर' उत्साहात संपन्न*
*११ हजार ५०० हून अधिक लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ*
*प्रशासनाने जनतेच्या विश्वासाचे केंद्र बनावे; शासकीय योजनांचा लाभ प्रत्येक पात्र लाभार्थ्यापर्यंत पोहोचवा – आमदार अब्दुल सत्तार*
सिल्लोड (प्रतिनिधी)  महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या वतीने आयोजित 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर' सिल्लोड शहरातील डोंगरगाव फाटा येथील स्वस्तिक लॉन्स येथे उत्साहात संपन्न झाले. या शिबिराचे उदघाटन आमदार अब्दुल सत्तार यांच्याहस्ते संपन्न झाले. या शिबिरात महसूल, ग्रामविकास, कृषी, एकात्मिक बाल विकास, वन विभाग, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय, नगर परिषद आदी विविध विभागांच्या योजनांअंतर्गत सुमारे ११ हजार ५०० हून अधिक लाभार्थ्यांना आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात लाभांचे वितरण करण्यात आले.
यावेळी मार्गदर्शन करताना आमदार अब्दुल सत्तार यांनी राज्य शासन हे सर्वसामान्य नागरिकांच्या कल्याणासाठी कटिबद्ध असलेले लोककल्याणकारी सरकार असल्याचे सांगितले. ग्रामसभा व विविध उपक्रमांच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांपर्यंत शासनाच्या योजना प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी विशेष उपाययोजना राबविण्याचे निर्देश त्यांनी संबंधित विभागांना दिले.
महसूल प्रशासन हे केवळ कागदपत्रांची पूर्तता करणारे कार्यालय नसून जनतेच्या विश्वासाचे केंद्र आहे. त्यामुळे प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याने संवेदनशीलता, पारदर्शकता आणि तत्परता या तत्त्वांवर काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.
आपल्या भाषणात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोकाभिमुख प्रशासनाचा उल्लेख करताना सांगितले की, महाराजांनी रयतेला केंद्रस्थानी ठेवून प्रशासनाची उभारणी केली. शेतकरी, सर्वसामान्य नागरिक व दुर्बल घटकांच्या हिताला त्यांनी सर्वोच्च प्राधान्य दिले. त्याच विचारांवर राज्य शासन कार्यरत असून शेतकरी व सर्वसामान्य नागरिक केंद्रस्थानी ठेवून विविध विकासात्मक योजना राबविल्या जात आहेत. या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी अधिकाऱ्यांनी मनापासून पुढाकार घ्यावा, असे त्यांनी स्पष्ट केले.
भ्रष्टाचारामुळे शासनाची प्रतिमा मलिन होते. त्यामुळे भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन करणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले. दिव्यांग, आदिवासी, शेतकरी, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबे तसेच सर्व वंचित घटकांना त्यांच्या हक्काच्या योजनांचा लाभ वेळेत मिळावा, यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जबाबदारीने काम करावे. नागरिकांशी सुसंवाद ठेवून त्यांचे समाधान होईल अशा पद्धतीने प्रशासनाने कार्य करावे, असेही त्यांनी सांगितले.
-------------
प्रलंबित पीक विमा दाव्यांच्या संदर्भात बोलताना आमदार अब्दुल सत्तार यांनी पीक विमा हा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा अधिकार असून तो मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, असे सांगितले. येत्या विधिमंडळ अधिवेशनात या विषयावर शासनाकडे पाठपुरावा करून प्रश्न उपस्थित केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
------------
यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात विविध लोकहिताचे निर्णय घेतले जात असल्याचा उल्लेख केला. तसेच स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख करून त्यांना विनम्र अभिवादन केले.
----------
नगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी आपल्या भाषणात सिल्लोड शहरातील बेघर नागरिकांसाठी आमदार अब्दुल सत्तार यांच्या पुढाकारातून म्हाडा योजनेंतर्गत पाच हजार घरांचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात येत असल्याची माहिती दिली. तसेच नगर परिषदेमार्फत सुरू असलेल्या विविध विकासकामांची माहिती देत नागरिकांनी शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
उपविभागीय अधिकारी प्रवीण फुलारी यांनी प्रास्ताविकात 'छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर' अंतर्गत करण्यात आलेल्या विविध कामांचा तसेच निकाली काढलेल्या प्रकरणांचा आढावा सादर केला. तहसीलदार अंकिता ताकभाते (सिल्लोड) व तहसीलदार मनीषा मेने (सोयगाव) यांनी महसूल विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती देत नागरिकांनी विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.तालुका कृषी अधिकारी संदीप जगताप यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती देत शेतकऱ्यांनी शासनाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. गटविकास अधिकारी रत्नाकर पगार यांनी ग्रामविकास विभागाच्या योजनांची माहिती देत पात्र लाभार्थ्यांनी प्रस्ताव सादर करून योजनांचा लाभ घ्यावा, असे सांगितले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी आमदार अब्दुल सत्तार व मान्यवरांनी स्वस्तिक लॉन्स परिसरात विविध विभागांनी उभारलेल्या शासकीय स्टॉलची पाहणी केली. तसेच महिला बचत गटांनी तयार केलेल्या विविध उत्पादनांची खरेदी करून त्यांच्या उत्पादनांना प्रोत्साहन दिले व नागरिकांनी स्थानिक बचत गटांच्या उत्पादनांना प्राधान्य द्यावे, असे आवाहन केले.
सिल्लोड नगर परिषदेच्या विद्यार्थ्यांनी लेझीम पथक व पुष्पगुच्छाद्वारे मान्यवरांचे स्वागत केले. छत्रपती शिवाजी महाराज तसेच स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत जोशी यांनी केले, तर उपस्थितांचे आभार तहसीलदार अंकिता ताकभाते यांनी मानले.
------
यावेळी उपविभागीय अधिकारी प्रवीण फुलारी, परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी तथा तहसीलदार अंकिता ताकभाते (सिल्लोड), तहसीलदार मनीषा मेने (सोयगाव), गटविकास अधिकारी रत्नाकर पगार (सिल्लोड), गटविकास अधिकारी अमोल जगताप (सोयगाव), नगराध्यक्ष अब्दुल समीर अ. सत्तार, मुख्याधिकारी कारभारी दिवेकर, उपविभागीय कृषी अधिकारी सुभाष आघाव, तालुका कृषी अधिकारी संदीप जगताप (सिल्लोड), भारत कासार ( सोयगाव ), नायब तहसीलदार तुकाराम बनकर ,बळीराम मुंडे , संभाजी पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख केशवराव पाटील तायडे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख (सोयगाव) प्रभाकर काळे, उपनगराध्यक्ष विठ्ठल सपकाळ, शिवसेना तालुकाप्रमुख (सोयगाव) धरमसिंग चव्हाण, जिल्हा बँकेचे संचालक अर्जुन गाडे, जिल्हा परिषद सदस्य देविदास पालोदकर, अब्दुल आमेर अ. सत्तार, सय्यद नासेर हुसेन, राजू बाबा काळे, माजी जि.प.अध्यक्ष श्रीराम महाजन, माजी सभापती रामदास पालोदकर, विश्वासराव दाभाडे, नगर परिषद शिवसेना गटनेते सुधाकर पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सतीश ताठे, संदीप राऊत, राजाराम पाडळे, जयराम चिंचपुरे, नानासाहेब रहाटे, पंचायत समिती सदस्य निजाम पठाण, सुरेखा शिंदे, शिवसेना शहरप्रमुख मनोज झंवर, उपनगराध्यक्ष विठ्ठल सपकाळ, नगरसेवक रउफ बागवान,  अकील वसईकर, आसिफ बागवान, सिद्धेश्वर आहेर, डॉ. फिरोज पठाण, बबलू पठाण, नूर मोहंमद कुरेशी,  शिवसेना महिला आघाडीच्या दुर्गाबाई पवार, संजय डमाळे, राजूमिया देशमुख, अंबादास सपकाळ, मोतीराम पाडळे, पंकज जयस्वाल आदींसह शासनाच्या विविध विभागांचे विभागप्रमुख, अधिकारी, कर्मचारी, आशा सेविका, लाभार्थी तसेच विविध गावांतील आजी-माजी सरपंच, लोकप्रतिनिधी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    user_One day news
    One day news
    News Anchor औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • Post by लोखंडे संभाजी नगर पत्रकार
    1
    Post by लोखंडे संभाजी नगर पत्रकार
    user_लोखंडे संभाजी नगर पत्रकार
    लोखंडे संभाजी नगर पत्रकार
    कन्नड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    14 min ago
  • ट्रक चालकाने वैतागून रस्त्यावर ओतत इथेनॉल मिश्रित डिझेलचा पर्दाफाश केला
    1
    ट्रक चालकाने वैतागून  रस्त्यावर ओतत 
इथेनॉल मिश्रित डिझेलचा पर्दाफाश केला
    user_शेख अजहर ताहेर (पत्रकार)
    शेख अजहर ताहेर (पत्रकार)
    गंगापूर, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • जालन्यात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 106 वी जयंती उत्साहात; पोलीस बँडच्या मानवंदनेने वाढवली सोहळ्याची शान! ​#AnnabhauSathe #AnnabhauSatheJayanti #Jalna #JalnaNews #LokshahirAnnabhauSathe #PoliceBand जालन्यात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 106 वी जयंती उत्साहात; पोलीस बँडच्या मानवंदनेने वाढवली सोहळ्याची शान! ​#AnnabhauSathe #AnnabhauSatheJayanti #Jalna #JalnaNews #LokshahirAnnabhauSathe #PoliceBand
    1
    जालन्यात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 106 वी जयंती उत्साहात; पोलीस बँडच्या मानवंदनेने वाढवली सोहळ्याची शान!
​#AnnabhauSathe #AnnabhauSatheJayanti #Jalna #JalnaNews #LokshahirAnnabhauSathe #PoliceBand
जालन्यात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 106 वी जयंती उत्साहात; पोलीस बँडच्या मानवंदनेने वाढवली सोहळ्याची शान!
​#AnnabhauSathe #AnnabhauSatheJayanti #Jalna #JalnaNews #LokshahirAnnabhauSathe #PoliceBand
    user_GLOBAL NEWS JALNA
    GLOBAL NEWS JALNA
    सच बोलने की आदत है मुझे जालना, जालना, महाराष्ट्र•
    34 min ago
  • अभिजीत दिपके यांची प्रकृती स्थिर; डॉक्टरांकडून आवश्यक उपचार सुरू छत्रपती संभाजीनगर | कॉकरोच जनता पक्षाचे अध्यक्ष अभिजीत दिपके यांची अचानक प्रकृती बिघडल्याने डॉक्टरांनी तातडीने तपासणी करून आवश्यक उपचार केले. डॉक्टरांच्या माहितीनुसार, सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून काळजीचे कोणतेही कारण नसल्याचे सांगण्यात आले. विश्रांतीचा सल्ला देत पुढील काही काळ वैद्यकीय देखरेखीखाली राहण्याचा सल्लाही देण्यात आला.
    1
    अभिजीत दिपके यांची प्रकृती स्थिर; डॉक्टरांकडून आवश्यक उपचार सुरू
छत्रपती संभाजीनगर | कॉकरोच जनता पक्षाचे अध्यक्ष अभिजीत दिपके यांची अचानक प्रकृती बिघडल्याने डॉक्टरांनी तातडीने तपासणी करून आवश्यक उपचार केले. डॉक्टरांच्या माहितीनुसार, सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून काळजीचे कोणतेही कारण नसल्याचे सांगण्यात आले. विश्रांतीचा सल्ला देत पुढील काही काळ वैद्यकीय देखरेखीखाली राहण्याचा सल्लाही देण्यात आला.
    user_Marathi News Point
    Marathi News Point
    Video editing service औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    43 min ago
  • खेळणाऱ्या चिमुकल्यावर भटक्या बैलांचा जीवघेणा हल्ला; थरार CCTV मध्ये कैद लखनऊ |उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथील अर्जुनगंज परिसरात घराबाहेर खेळत असलेल्या एका चिमुकल्यावर भटक्या बैलने अचानक हल्ला केला. ही संपूर्ण घटना परिसरातील CCTV कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या हल्ल्यात बालक गंभीर जखमी झाले असून प्राथमिक उपचारानंतर त्याला सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेनंतर परिसरात भटक्या जनावरांच्या वाढत्या समस्येबाबत नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
    1
    खेळणाऱ्या चिमुकल्यावर भटक्या बैलांचा जीवघेणा हल्ला; थरार CCTV मध्ये कैद
लखनऊ |उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथील अर्जुनगंज परिसरात घराबाहेर खेळत असलेल्या एका चिमुकल्यावर भटक्या बैलने अचानक हल्ला केला. ही संपूर्ण घटना परिसरातील CCTV कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या हल्ल्यात बालक गंभीर जखमी झाले असून प्राथमिक उपचारानंतर त्याला सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेनंतर परिसरात भटक्या जनावरांच्या वाढत्या समस्येबाबत नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
    user_Marathi News Point
    Marathi News Point
    Video editing service औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    40 min ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.