भोर तालुक्यातील बनेश्वर नसरापूर येथे महाशिवरात्री दिवशी दोन गटात हाणामारी ; गुन्हा दाखल महाशिवरात्रीच्या यात्रेत बनेश्वर परिसरात दोन गटांत तुफान हाणामारी; परस्परांविरुद्ध गुन्हे दाखल विक्रम शिंदे /भोर दि.16 महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर श्रीक्षेत्र बनेश्वर येथे मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी असताना दोन गटांमध्ये झालेल्या वादाचे रूपांतर मारहाणीत झाले. या घटनेत दोन्ही बाजूंचे काही जण जखमी झाले असून, परस्परांविरुद्ध राजगड पोलीस ठाण्यात क्रॉस गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात्रेच्या गर्दीत घडलेल्या या प्रकारामुळे काही काळ परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १५ फेब्रुवारी रोजी रात्री सुमारे ९.४५ वाजण्याच्या सुमारास बनेश्वर मंदिराजवळील रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेल्या मनोरंजन स्टॉल परिसरात ही घटना घडली. विजय बापुराव सपकाळ (वय ३०, रा. बाजारवाडी, ता. भोर) हे लहान मुलांसाठी मनोरंजन स्टॉल चालवत असताना फंडाच्या पैशांच्या कारणावरून पूर्वी झालेल्या वादाचा राग मनात धरून काही जणांनी तेथे येत वाद घातल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. तक्रारीनुसार, संबंधितांनी बेकायदेशीर जमाव जमवून सपकाळ यांना हाताने व काठीने मारहाण केली, शिवीगाळ व दमदाटी केली. भांडण सोडविण्यासाठी आलेल्या त्यांच्या नातेवाईकांनाही मारहाण करण्यात आल्याचे नमूद आहे. यावेळी सपकाळ यांच्या आजीच्या हातातील काठी हिसकावून पाठीवर व कंबरेवर मारहाण करण्यात आल्याचा आरोप असून, या घटनेत फिर्यादी व त्यांच्या आजीला दुखापत झाली. तसेच स्टॉलची तोडफोड करून नुकसान केल्याचीही तक्रार देण्यात आली आहे. दरम्यान, याच घटनेप्रकरणी अनिकेत चंद्रकांत जाधव (वय २५, रा. बाजारवाडी) यांनीही स्वतंत्र फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, रात्री उशिरा बनेश्वर मंदिर कमानीजवळील जानकीराम मंगल कार्यालय परिसरात फंडाच्या पैशांवरून विचारणा करण्यासाठी गेल्यानंतर दुसऱ्या गटाकडून वाद घालण्यात आला. त्यानंतर लाकडी बांबूने डोक्यावर मारहाण करून दुखापत केली तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण, शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यावेळी त्यांच्या दुचाकीचीही तोडफोड करून नुकसान केल्याचे तक्रारीत नमूद आहे. दोन्ही बाजूंच्या तक्रारींवरून भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार राजगड पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. महाशिवरात्रीच्या दिवशी मोठी गर्दी असताना घडलेल्या या घटनेमुळे काही काळ यात्रेतील वातावरण ढवळून निघाले होते. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदारांकडून सुरू असून, घटनेतील सर्व संबंधितांची चौकशी करण्यात येत आहे. तसेच साक्षीदारांचे जबाब व परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचीही तपासणी केली जात असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. पोलीसांनी नागरिकांना शांतता राखण्याचे व अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.

- विक्रम शिंदे /भोर दि.16 कापुरहोळ भोर वाई हा बहुचर्चित रस्ता अंतिम टप्प्यात आहे.मात्र आधी केलेल्या रस्ता खचण्याच्या घटना वारंवार घडत असून माळवाडी ते नेकलेस पॉईंट दरम्यान मोरी वरील रस्ता खचल्याने पोकलेनच्या सहायाने रस्ता उखडून आज (दि.16) दुरुस्तीचे काम सुरू केले आहे.मात्र या बाबत रस्त्याच्या कामांबाबत नागरिकांनी प्रश्न चिन्ह उपस्थित केले आहे.रस्त्याच्या गुणवतेबाबत शंका व्यक्त केली आहे.1
- Post by Raju Bawdiwale1
- एप्स्टिन फाइल के आने के बाद "मुद्रा" मोदी अब "मुजरा" मोदी बन गए हैं - ॲड. प्रकाश आंबेडकर1
- महोबा (बुंदेलखंड)। भ्रष्टाचार का एक और चौंकाने वाला मामला सामने आया है। बुंदेलखंड के महोबा जिले में जल जीवन मिशन के तहत लगभग 65 लाख रुपये की लागत से बनाई गई पानी की टंकी टेस्टिंग के महज एक दिन बाद ही लीक हो गई। जानकारी के मुताबिक 13 फरवरी को टंकी की विधिवत टेस्टिंग की गई थी। अधिकारियों और संबंधित कर्मचारियों की मौजूदगी में पानी भरकर इसकी जांच की गई। लेकिन टेस्टिंग के अगले ही दिन टंकी से पानी रिसने लगा, जिससे निर्माण कार्य की गुणवत्ता पर गंभीर सवाल खड़े हो गए हैं। स्थानीय ग्रामीणों का कहना है कि सरकार ने गांव-गांव स्वच्छ पेयजल पहुंचाने के लिए करोड़ों रुपये खर्च किए हैं, लेकिन यदि निर्माण कार्य में ही लापरवाही बरती जाएगी तो योजनाओं का उद्देश्य कैसे पूरा होगा? लोगों ने आरोप लगाया कि निर्माण में घटिया सामग्री का इस्तेमाल किया गया है, जिसके कारण टंकी इतनी जल्दी क्षतिग्रस्त हो गई। इस घटना के बाद विभागीय अधिकारियों की कार्यप्रणाली पर भी सवाल उठ रहे हैं। आखिर 65 लाख रुपये की लागत से बनी टंकी एक दिन भी सही सलामत नहीं रह सकी, तो निर्माण की निगरानी किस स्तर पर हुई? ग्रामीणों ने मामले की उच्च स्तरीय जांच और दोषियों के खिलाफ सख्त कार्रवाई की मांग की है। यदि समय रहते जिम्मेदारों पर कार्रवाई नहीं की गई, तो जल जीवन मिशन जैसी महत्वाकांक्षी योजना की विश्वसनीयता पर असर पड़ सकता है।1
- Post by Deepak Sagar1
- Post by NEWS 24 MAHARASHTRA1
- अंधाऱ्या व निर्मनुष्य ठिकाणी दारु पिणारे, नशा करणारे तळीरामांवर धडक कारवाई.1
- बरेली। थाना नवाबगंज क्षेत्र में नाबालिग युवती के अपहरण एवं दुष्कर्म के गंभीर मामले में पुलिस ने त्वरित कार्रवाई करते हुए अभियोग पंजीकृत कर आरोपी को हिरासत में ले लिया है। प्रकरण की विवेचना तेजी से की जा रही है और पीड़िता को आवश्यक चिकित्सीय एवं कानूनी सहायता उपलब्ध कराई गई है। इस संबंध में क्षेत्राधिकारी नवाबगंज, बरेली श्री नीलेश मिश्र ने बताया कि घटना की सूचना मिलते ही थाना नवाबगंज पुलिस ने तत्परता दिखाते हुए मुकदमा दर्ज किया और विशेष टीम गठित कर आरोपी की तलाश शुरू की। पुलिस की सक्रियता के चलते आरोपी को शीघ्र ही पकड़ लिया गया। सीओ श्री मिश्र ने बताया कि आरोपी से पूछताछ की जा रही है तथा साक्ष्यों के आधार पर विधिक कार्रवाई आगे बढ़ाई जा रही है। उन्होंने स्पष्ट किया कि नाबालिग से जुड़े मामलों में पुलिस पूरी संवेदनशीलता और गंभीरता के साथ कार्रवाई करती है और दोषी को कानून के तहत कड़ी सजा दिलाने का प्रयास किया जाएगा। पुलिस प्रशासन ने आमजन से अपील की है कि किसी भी संदिग्ध गतिविधि की सूचना तत्काल पुलिस को दें, ताकि समय रहते आवश्यक कार्रवाई की जा सके। मामले में आगे की कानूनी प्रक्रिया जारी है।1