राजाशिवाजी चित्रपटामधील ‘फूल पारिजात’ गाणे झाले रिलीज! अजय- अतुल यांच्या सुरातून सईबाईंच्या प्रेमभावनेची हळवी झलक कोल्हापूर १० सिटी न्यूज नेटवर्क जिओ स्टुडिओज आणि मुंबई फिल्म कंपनी निर्मित ‘राजा शिवाजी’ चित्रपटातील ‘फूल पारिजात’ हे गीत आज झाले रिलीज. छत्रपती शिवाजी महाराज आणि सईबाई यांच्या नात्यातील प्रेम, आदर आणि समर्पणाची भावना या गीतातून अत्यंत सुंदरपणे उलगडली आहे. महाराजांची केवळ पराक्रमी योद्धा म्हणून नव्हे, तर संवेदनशील , भावनिक आणि प्रेमळ स्वभावाची बाजू या गीतातून जाणवते. अजय-अतुल यांच्या सुरेल संगीताने सजलेले हे गीत शांत,भावपूर्ण आणि अभिजात शैलीत साकारले गेले आहे. श्रेया घोषाल यांनी हे गाण गायली आहे. गीतातील प्रत्येक सूर सईबाईंच्या मनातील प्रेम, समाधान आणि भक्तीभाव अधिक प्रभावीपणे व्यक्त करतो. विशेष म्हणजे, संगीत आणि शब्द यांचा समतोल राखत हे गीत कथानकाच्या भावनिक गाभ्याला अधिक ताकद देते. ‘फूल पारिजात’ या शीर्षकाप्रमाणेच गीतात पारिजाताच्या फुलाचे सुंदर रूपक वापरण्यात आले आहे. सईबाईंच्या आयुष्यात शिवाजी महाराजांचे स्थान हे एका दैवी आशीर्वादासारखे असल्याची भावना या गीतातून प्रकर्षाने जाणवते. त्यामुळे हे गीत केवळ प्रेमगीत न राहता, एका पवित्र आणि आत्मीय नात्याची भावपूर्ण अभिव्यक्ती ठरते. युद्ध, स्वराज्य आणि संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ‘फूल पारिजात’ हे गीत चित्रपटात एक सुंदर भावनिक क्षण निर्माण करते. सईबाईंच्या नजरेतून उलगडणारे महाराजांचे कोमल रूप प्रेक्षकांना अधिक जवळून अनुभवायला मिळते. जिओ स्टुडिओज' प्रस्तुत आणि 'मुंबई फिल्म कंपनी' निर्मित, ज्योती देशपांडे व जिनिलिया देशमुख निर्मित, रितेश विलासराव देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ हा भव्य ऐतिहासिक चित्रपट १ मे २०२६ मराठी आणि हिंदी भाषांमध्ये रिलीज झाला असून. चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

- पावसाळापूर्व नाले सफाई मोहिमेला वेग.... KMC Action मोडवर कोल्हापूर, ता. ९ : पावसाळ्यापूर्वी शहरातील पाण्याचा निचरा सुरळीत राहावा व नागरिकांना पूरस्थितीचा सामना करावा लागू नये, यासाठी कोल्हापूर महानगरपालिकाच्या आरोग्य विभागामार्फत नाले, चॅनेल व ओढे सफाई मोहीम युद्धपातळीवर राबविण्यात येत आहे. दिनांक २३ मार्च २०२६ पासून सुरू झालेल्या या मोहिमेलद्वारे कामाला वेग देण्यात आला आहे. महानगरपालिकेने शहरातील विविध भागांमध्ये मनुष्यबळ तसेच अत्याधुनिक यंत्रसामग्रीच्या सहाय्याने नालेसफाईचे काम सुरू आहे. आतापर्यंत अनेक ठिकाणी गाळ, कचरा व अडथळे दूर करण्यात आले असून पावसाळ्यापूर्व तयारी अंतिम टप्प्यात पोहोचत आहे. कामाची सद्यस्थिती पुढीलप्रमाणे : १) मनुष्यबळाद्वारे सफाई – एकूण ४७६ ठिकाणांपैकी २४६ ठिकाणांची सफाई पूर्ण (६४ टक्के) २) JCB यंत्राद्वारे सफाई – एकूण २०६ ठिकाणांपैकी ८७ ठिकाणांची सफाई पूर्ण (४० टक्के) ३) पोकलॅंड मशिनद्वारे सफाई – एकूण २१ ठिकाणांपैकी ७ ठिकाणांची सफाई पूर्ण, ४ ठिकाणी काम सुरू (५२ टक्के) या मोहिमेसाठी दोन स्वतंत्र मनुष्यबळ पथके कार्यरत करण्यात आली आहेत. पथक क्रमांक १ मध्ये २४ कर्मचारी तर पथक क्रमांक २ मध्ये २९ कर्मचारी कार्यरत आहेत. तसेच भाडेतत्त्वावर ३ पोकलॅंड, ३ JCB व ४ डंपर तैनात करण्यात आले असून महानगरपालिकेच्या स्वतःच्या १ पोकलॅंड मशिनचाही वापर सुरू आहे. मोठ्या नाल्यांमधील अडथळे दूर करण्यासाठी विशेषतः ५० फूट लॉगबूम पोकलॅंड मशिनद्वारे सफाईचे काम हाती घेण्यात आले आहे. महानगरपालिका प्रशासनाकडून पावसाळ्यापूर्व सर्व नालेसफाई वेळेत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले असून नागरिकांनीही कचरा नाल्यात टाकू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.1
- आजच्या राशीभविष्यात प्रत्येक राशीसाठीचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या. प्रेम, आरोग्य, आर्थिक स्थिती आणि करिअरसंबंधी महत्त्वाची माहिती मिळेल.1
- ट्री आर्मीच्या मदतीने पूर्ण मतदार संघात झाडे लावणार आमदार सुहास बाबर दोन दिवसांपूर्वी शूरु ॲपवर आमदार सुहास बाबर यांची बातमी प्रसिद्ध केली होती, तो व्हिडिओ तुफान वायरल झाला, नंतर आता आमदार सुहास बाबर यांनी सांगितले की ट्री आर्मीचे पदाधिकारी व आमचे पदाधिकारी पूर्ण खानापूर आटपाडी मतदारसंघात पिंपळाचे व इतर झाडे लावून मतदारसंघाचा कायापालट करणार आहे, तसेच वन विभागाकडून ही मदत घेऊन जंगल तयार करणार आहे. पाहूयात सुहास बाबर काय म्हणाले1
- जीवन निरगुडे यांना त्यांच्या 19 वर्षांच्या उत्कृष्ट पोलीस सेवेसाठी 'पोलीस महासंचालक सन्मान चिन्ह' देऊन गौरवण्यात आले. त्यांच्या या दैदिप्यमान यशाबद्दल पश्चिम बंगाल मराठी व्यापारी असोसिएशनने अभिनंदन केले आहे. हा सन्मान त्यांच्या समर्पित सेवेचे प्रतीक आहे.1
- आई ती असते जी संघर्षांमध्येही कधी हार मानत नाही. परमेश्वराने आपल्याला जगातील सर्वात प्रेमळ आणि शक्तिशाली माता दिल्याबद्दल त्याचे मनापासून आभार मानूया.4
- राजापूर रत्नागिरी बेनगी गाव चक्रीवादळ क्रिकेट सामन्यात उडाला मंच1
- सांगली हादरलं! महावितरण कर्मचाऱ्याचा गोळ्या झाडून खून; हल्ल्यामागचं कारण गूढ*1
- मराठी संगीत विश्वातील लोकप्रिय गायिका श्रेया घोषाला तिच्या गाण्यांमधून आजही रसिकांच्या मनात घर करून आहे. 'मेंदीच्या पानावर' सारख्या गाण्यांमधून तिचा मधुर आवाज आजही अनेकांना भुरळ घालतो.1