logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

on 8 November
user_Gopal. Taram.
Gopal. Taram.
Deori, Gondia•
on 8 November

  • user_User5432
    User5432
    Ratnagiri, Maharashtra
    😂
    on 12 November
  • user_Sahadeo Mahale
    Sahadeo Mahale
    Khamgaon, Buldhana
    😂
    on 10 November
  • user_User5102
    User5102
    Jalna, Maharashtra
    😤
    on 10 November
More news from महाराष्ट्र and nearby areas
  • सरपंच अनिलकुमार सोयाम अखेर अपात्र, उपसरपंच गुनाराम मेहर यांनी स्वीकारला पदभार नमस्कार, ‘सत्य को जानो’ न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. सालेकसा (जि. गोंदिया): सालेकसा तालुक्यातील पिपरिया ग्रामपंचायतीमध्ये 'नागरी सुविधा' योजनेच्या निधीत झालेल्या लाखो रुपयांच्या भ्रष्टाचारप्रकरणी राज्य शासनाने मोठा निर्णय दिला आहे. अप्पर आयुक्त नागपूर यांच्या अपात्रतेच्या निर्णयाविरोधात माजी सरपंच अनिलकुमार तेजलाल सोयाम यांनी केलेले अपील ग्रामविकास मंत्रालयाने फेटाळून लावले आहे. या निर्णयानंतर आज उपसरपंच गुनाराम बुधराम मेहर यांच्याकडे सरपंच पदाचा प्रभारी पदभार सोपवण्यात आला असून, गावात फटाक्यांच्या आतिशबाजीत जल्लोष साजरा करण्यात आला. माहिती अधिकारातून झाला घोटाळ्याचा पर्दाफाश डिसेंबर २०२३ मध्ये ग्रामपंचायतीच्या निधीत हेराफेरी झाल्याची कुणकुण लागताच, गुनाराम मेहर यांनी त्यांचे सहकारी धिरेंद्र अग्रवाल यांच्या माध्यमातून माहिती अधिकारांतर्गत कागदपत्रे मिळवली. या कागदपत्रांच्या आधारे १ मार्च २०२४ रोजी जिल्हा परिषद गोंदियाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली होती. चौकशीत सरपंच आणि सचिव दोषी आढळल्यानंतर, विभागीय आयुक्तांनी १४ जानेवारी २०२५ रोजी सोयाम यांना अपात्र घोषित केले होते. कसा झाला २८ लाखांचा घोटाळा? (तपशील) तक्रारीनुसार, नागरी सुविधा योजनेच्या एकूण निधीपैकी ३३% म्हणजेच सुमारे २८ लाख रुपयांची अफरातफर करण्यात आली. पत्रात नमूद केल्यानुसार खालीलप्रमाणे रकमांची हेराफेरी झाली: * वर्ष २०२०-२१: १० नोव्हेंबर २०२३ रोजी प्राप्त झालेल्या १३,५८,९९९ रुपयांपैकी १०,००,३२० रुपये नियमबाह्यरीत्या 'ओम बिल्डिंग मटेरियल'ला देण्यात आले. वास्तविक ही रक्कम 'कृष्णकुमार बिल्डिंग मटेरियल'ला देणे अपेक्षित होते. * वर्ष २०२०-२२ (पूरक): १५,००,००० रुपयांपैकी १,५०,००० रुपये चुकीच्या पद्धतीने आरटीजीएस करण्यात आले. * वर्ष २०२२-२३: ८ नोव्हेंबर २०२३ रोजी प्राप्त १२,८७,५४९ रुपयांपैकी ८,८३,४०४ रुपये पुन्हा 'ओम बिल्डिंग मटेरियल'ला तर ३,७८,६०१ रुपये 'अंजली सायकलबार'ला वळवण्यात आले. या व्यवहारांमध्ये सरपंच, सचिव आणि तत्कालीन लोकप्रतिनिधींची मिलिभगत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. जंगी स्वागत आणि सत्कार मंत्रालयाच्या अंतिम आदेशानंतर पिपरिया ग्रामपंचायतीची सूत्रे आता गुनाराम मेहर यांच्या हाती आली आहेत. आज पदभार स्वीकारताना माजी सरपंच मधुताई धिरेंद्र अग्रवाल, भाजप नेते रामलाल डिब्बे, ग्रामपंचायत सदस्य आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. नूतन प्रभारी सरपंचांचे गुलाल उधळून आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. "हा भ्रष्टाचाराविरुद्धचा आणि सर्वसामान्य जनतेचा विजय आहे," अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या. फटाक्यांच्या आवाजात गावकऱ्यांनी या निर्णयाचे स्वागत केले. पुढील कारवाईकडे लक्ष सरपंच अपात्र ठरल्यानंतर आता या घोटाळ्यात सामील असलेल्या इतर दोषींवर आणि संबंधित कंत्राटदारांवर प्रशासन काय कारवाई करणार, याकडे संपूर्ण सालेकसा तालुक्याचे लक्ष लागले आहे.
    1
    सरपंच अनिलकुमार सोयाम अखेर अपात्र, उपसरपंच गुनाराम मेहर यांनी स्वीकारला पदभार
नमस्कार, ‘सत्य को जानो’ न्यूजमध्ये आपले स्वागत आहे.
सालेकसा (जि. गोंदिया):
सालेकसा तालुक्यातील पिपरिया ग्रामपंचायतीमध्ये 'नागरी सुविधा' योजनेच्या निधीत झालेल्या लाखो रुपयांच्या भ्रष्टाचारप्रकरणी राज्य शासनाने मोठा निर्णय दिला आहे. अप्पर आयुक्त नागपूर यांच्या अपात्रतेच्या निर्णयाविरोधात माजी सरपंच अनिलकुमार तेजलाल सोयाम यांनी केलेले अपील ग्रामविकास मंत्रालयाने फेटाळून लावले आहे. या निर्णयानंतर आज उपसरपंच गुनाराम बुधराम मेहर यांच्याकडे सरपंच पदाचा प्रभारी पदभार सोपवण्यात आला असून, गावात फटाक्यांच्या आतिशबाजीत जल्लोष साजरा करण्यात आला.
माहिती अधिकारातून झाला घोटाळ्याचा पर्दाफाश
डिसेंबर २०२३ मध्ये ग्रामपंचायतीच्या निधीत हेराफेरी झाल्याची कुणकुण लागताच, गुनाराम मेहर यांनी त्यांचे सहकारी धिरेंद्र अग्रवाल यांच्या माध्यमातून माहिती अधिकारांतर्गत कागदपत्रे मिळवली. या कागदपत्रांच्या आधारे १ मार्च २०२४ रोजी जिल्हा परिषद गोंदियाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली होती. चौकशीत सरपंच आणि सचिव दोषी आढळल्यानंतर, विभागीय आयुक्तांनी १४ जानेवारी २०२५ रोजी सोयाम यांना अपात्र घोषित केले होते.
कसा झाला २८ लाखांचा घोटाळा? (तपशील)
तक्रारीनुसार, नागरी सुविधा योजनेच्या एकूण निधीपैकी ३३% म्हणजेच सुमारे २८ लाख रुपयांची अफरातफर करण्यात आली. पत्रात नमूद केल्यानुसार खालीलप्रमाणे रकमांची हेराफेरी झाली:
* वर्ष २०२०-२१: १० नोव्हेंबर २०२३ रोजी प्राप्त झालेल्या १३,५८,९९९ रुपयांपैकी १०,००,३२० रुपये नियमबाह्यरीत्या 'ओम बिल्डिंग मटेरियल'ला देण्यात आले. वास्तविक ही रक्कम 'कृष्णकुमार बिल्डिंग मटेरियल'ला देणे अपेक्षित होते.
* वर्ष २०२०-२२ (पूरक): १५,००,००० रुपयांपैकी १,५०,००० रुपये चुकीच्या पद्धतीने आरटीजीएस करण्यात आले.
* वर्ष २०२२-२३: ८ नोव्हेंबर २०२३ रोजी प्राप्त १२,८७,५४९ रुपयांपैकी ८,८३,४०४ रुपये पुन्हा 'ओम बिल्डिंग मटेरियल'ला तर ३,७८,६०१ रुपये 'अंजली सायकलबार'ला वळवण्यात आले.
या व्यवहारांमध्ये सरपंच, सचिव आणि तत्कालीन लोकप्रतिनिधींची मिलिभगत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
जंगी स्वागत आणि सत्कार
मंत्रालयाच्या अंतिम आदेशानंतर पिपरिया ग्रामपंचायतीची सूत्रे आता गुनाराम मेहर यांच्या हाती आली आहेत. आज पदभार स्वीकारताना माजी सरपंच मधुताई धिरेंद्र अग्रवाल, भाजप नेते रामलाल डिब्बे, ग्रामपंचायत सदस्य आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
नूतन प्रभारी सरपंचांचे गुलाल उधळून आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. "हा भ्रष्टाचाराविरुद्धचा आणि सर्वसामान्य जनतेचा विजय आहे," अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या. फटाक्यांच्या आवाजात गावकऱ्यांनी या निर्णयाचे स्वागत केले.
पुढील कारवाईकडे लक्ष
सरपंच अपात्र ठरल्यानंतर आता या घोटाळ्यात सामील असलेल्या इतर दोषींवर आणि संबंधित कंत्राटदारांवर प्रशासन काय कारवाई करणार, याकडे संपूर्ण सालेकसा तालुक्याचे लक्ष लागले आहे.
    user_नरेश बोपचे
    नरेश बोपचे
    Journalist आमगाव, गोंदिया, महाराष्ट्र•
    2 min ago
  • Post by मनिषा विजय काशीवार
    4
    Post by मनिषा विजय काशीवार
    user_मनिषा विजय काशीवार
    मनिषा विजय काशीवार
    साकोली, भंडारा, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • महागावात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा तडाखा जनजीवन विस्कळीत महागाव : महागाव परिसरात सोमवारी (ता.30) रोजी सायंकाळी अचानक आलेल्या विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला. दुपारपासून वाढलेला प्रचंड उकाडा आणि दमट वातावरण यानंतर सायंकाळी काळे ढग दाटून आले आणि काही क्षणातच वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. पावसासोबतच विजांचा कडकडाट इतका तीव्र होता की नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. अनेक ठिकाणी वीज खंडित झाली असून काही भागात ट्रान्सफॉर्मरवर परिणाम झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. विजांच्या सततच्या कडकडाटामुळे नागरिक घराबाहेर पडण्यास घाबरत होते. या मुसळधार पावसामुळे महागावातील मुख्य रस्त्यांवर पाणी साचले असून वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली. काही ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून रस्त्यावर पडल्यामुळे वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. स्थानिक प्रशासन आणि आपत्कालीन पथक सतर्क झाले असून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. दरम्यान, या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला तरी वादळी वाऱ्यामुळे काही पिकांचे नुकसान झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. नागरिकांना सुरक्षित ठिकाणी राहण्याचे, झाडाखाली उभे न राहण्याचे आणि विजेपासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. महागावमध्ये अचानक आलेल्या या नैसर्गिक बदलामुळे जनजीवन काही काळासाठी ठप्प झाले असून, पुढील काही तास हवामान असेच राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
    3
    महागावात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा तडाखा जनजीवन विस्कळीत
महागाव : महागाव परिसरात सोमवारी (ता.30) रोजी सायंकाळी अचानक आलेल्या विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला. दुपारपासून वाढलेला प्रचंड उकाडा आणि दमट वातावरण यानंतर सायंकाळी काळे ढग दाटून आले आणि काही क्षणातच वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. पावसासोबतच विजांचा कडकडाट इतका तीव्र होता की नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. अनेक ठिकाणी वीज खंडित झाली असून काही भागात ट्रान्सफॉर्मरवर परिणाम झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. विजांच्या सततच्या कडकडाटामुळे नागरिक घराबाहेर पडण्यास घाबरत होते. या मुसळधार पावसामुळे महागावातील मुख्य रस्त्यांवर पाणी साचले असून वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली. काही ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून रस्त्यावर पडल्यामुळे वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. स्थानिक प्रशासन आणि आपत्कालीन पथक सतर्क झाले असून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
दरम्यान, या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला तरी वादळी वाऱ्यामुळे काही पिकांचे नुकसान झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. नागरिकांना सुरक्षित ठिकाणी राहण्याचे, झाडाखाली उभे न राहण्याचे आणि विजेपासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
महागावमध्ये अचानक आलेल्या या नैसर्गिक बदलामुळे जनजीवन काही काळासाठी ठप्प झाले असून, पुढील काही तास हवामान असेच राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
    user_Taha Mirza
    Taha Mirza
    Teacher महागाव, यवतमाळ, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • कुही-वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या महिलेच्या वारसांना २५ लाखांची आर्थिक मदत . दहा लाख रुपयांचा तात्काळ धनादेश तर बाकी पंधरा लाख रुपये मिळणार फिक्स च्या स्वरूपात. निर्मला श्रीपत गभणे वय वर्षे ७८ यांचा शेतात काम करताना वाघाने केलेल्या हल्यात दि.२७/३/२०२६ ला झाला होता मृत्यू, यावेळी वारसांना सह वनविभागाचे कर्मचारी व अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते
    1
    कुही-वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या महिलेच्या वारसांना २५ लाखांची आर्थिक मदत . दहा लाख रुपयांचा तात्काळ धनादेश तर बाकी पंधरा लाख रुपये मिळणार फिक्स च्या स्वरूपात. निर्मला श्रीपत गभणे वय वर्षे ७८ यांचा शेतात काम करताना वाघाने केलेल्या हल्यात दि.२७/३/२०२६ ला झाला होता मृत्यू, यावेळी वारसांना सह वनविभागाचे कर्मचारी व अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते
    user_Sharad shahare
    Sharad shahare
    कुही, नागपूर, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • उमरेड ( राजु जांभुळे ) भिवापूर पोलिसांनी रेतीची चोरटी वाहतूक करणाऱ्यांविरोधात २८ व २९ मार्च रोजी धडक कारवाई करत एकूण ५ गुन्हे नोंदवले. या कारवाईत ५ टिप्पर वाहने आणि ३६ ब्रास रेती असा एकूण १ कोटी ३१ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी विविध ठिकाणी नाकाबंदी व पेट्रोलिंग करीत तहसिल कार्यालय टी पाइंट व जवळी परिसरात संशयित टिप्पर थांबवून तपासणी केली. तपासणीदरम्यान संबंधित वाहनांमध्ये रेती आढळून आली. मात्र चालकांकडे वाहतुकीसाठी कोणताही वैध परवाना नसल्याचे निष्पन्न झाले. कारवाईदरम्यान वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये २० ते ३० लाख रुपये किंमतीची टिप्पर वाहने तसेच ३० ते ४० हजार रुपये किंमतीची रेती जप्त करण्यात आली. सदरची कारवाई उपविभागीय अधिकारी वृष्टी जैन यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार रविंद्र मस्कर यांच्या नेतृत्वात पोलिस नाईक रविंद्र जाधव व पोलिस अमलंदार यांच्या पुढाकारात करण्यात आली. या सर्व प्रकरणांत चालक व वाहन मालकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणी भिवापूर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२), ३(५), ४९ तसेच महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ च्या कलम ४८(७) आणि ४८(८) अन्वये गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
    1
    उमरेड ( राजु जांभुळे )
भिवापूर पोलिसांनी रेतीची चोरटी वाहतूक करणाऱ्यांविरोधात २८ व २९ मार्च रोजी धडक कारवाई करत एकूण ५ गुन्हे नोंदवले. या कारवाईत ५ टिप्पर वाहने आणि ३६ ब्रास रेती असा एकूण १ कोटी ३१ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी विविध ठिकाणी नाकाबंदी व पेट्रोलिंग करीत तहसिल कार्यालय टी पाइंट व जवळी परिसरात संशयित टिप्पर थांबवून तपासणी केली. तपासणीदरम्यान संबंधित वाहनांमध्ये रेती आढळून आली. मात्र चालकांकडे वाहतुकीसाठी कोणताही वैध परवाना नसल्याचे निष्पन्न झाले.
कारवाईदरम्यान वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये २० ते ३० लाख रुपये किंमतीची टिप्पर वाहने तसेच ३० ते ४० हजार रुपये किंमतीची रेती जप्त करण्यात आली. सदरची कारवाई उपविभागीय अधिकारी वृष्टी जैन यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार रविंद्र मस्कर यांच्या नेतृत्वात पोलिस नाईक रविंद्र जाधव व पोलिस अमलंदार यांच्या पुढाकारात करण्यात आली. या सर्व प्रकरणांत चालक व वाहन मालकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
या प्रकरणी भिवापूर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२), ३(५), ४९ तसेच महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ च्या कलम ४८(७) आणि ४८(८) अन्वये गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
    user_राजु  जांभुळे
    राजु जांभुळे
    उमरेड, नागपूर, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • Post by Samachar king digital
    1
    Post by Samachar king digital
    user_Samachar king digital
    Samachar king digital
    Local News Reporter Nagpur, Maharashtra•
    10 hrs ago
  • छत्तीसगड कांकेरमध्ये दोन नक्षलवाद्यांनी एके-४७ सह केले आत्मसमर्पण जंगलात लपून बसलेल्या साथीदारांना मुख्य प्रवाहात परत येण्याचे आवाहन केले....
    1
    छत्तीसगड कांकेरमध्ये दोन नक्षलवाद्यांनी एके-४७ सह केले आत्मसमर्पण
जंगलात लपून बसलेल्या साथीदारांना मुख्य प्रवाहात परत येण्याचे आवाहन केले....
    user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    Co-ed school हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • Post by मनिषा विजय काशीवार
    3
    Post by मनिषा विजय काशीवार
    user_मनिषा विजय काशीवार
    मनिषा विजय काशीवार
    साकोली, भंडारा, महाराष्ट्र•
    19 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.