logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

साकोली पाटबंधारे कार्यालय परिसरात भीषण वणवा अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला देशोन्नती वृत्तसंकलन साकोली : येथील बसस्थानकासमोरील राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या पाटबंधारे विभाग कार्यालय परिसरात दि. २८ मार्च रोजी दुपारी अचानक भीषण आग लागली. वाळलेल्या कचऱ्यामुळे आगीने रौद्र रूप धारण केले होते, मात्र नगरपरिषद प्रशासकीय यंत्रणा आणि नागरिकांच्या प्रसंगावधानामुळे आगीवर वेळीच नियंत्रण मिळविण्यात यश आले. पाटबंधारे कार्यालयाच्या मोकळ्या परिसरात शनिवारी दुपारी दरम्यान अचानक वणवा पेटला. काही वेळातच आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट आकाशात दिसू लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. महामार्गालगतच हे कार्यालय असल्याने प्रवाशांमध्येही भीतीचे वात होते. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नगरसेविका वैशाली धनकलाल लांजेवार आणि परिसरातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तातडीने साकोली नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. नगरपरिषदेचा अग्निशमक दल घटनास्थळी दाखल होताच जवानांनी पाण्याचा मारा सुरू केला. अथक प्रयत्नानंतर आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळविण्यात यश आले. सुदैवाने, या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. वेळीच आग विझविल्या गेल्यामुळे मोठा अनर्थ टळला असून परिसरातील नागरिकांनी सुटकेचा

17 hrs ago
user_मनिषा विजय काशीवार
मनिषा विजय काशीवार
साकोली, भंडारा, महाराष्ट्र•
17 hrs ago

साकोली पाटबंधारे कार्यालय परिसरात भीषण वणवा अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला देशोन्नती वृत्तसंकलन साकोली : येथील बसस्थानकासमोरील राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या पाटबंधारे विभाग कार्यालय परिसरात दि. २८ मार्च रोजी दुपारी अचानक भीषण आग लागली. वाळलेल्या कचऱ्यामुळे आगीने रौद्र रूप धारण केले होते, मात्र नगरपरिषद प्रशासकीय यंत्रणा आणि नागरिकांच्या प्रसंगावधानामुळे आगीवर वेळीच नियंत्रण

8d94daa2-5043-40c4-91e7-7b5330fd0835

मिळविण्यात यश आले. पाटबंधारे कार्यालयाच्या मोकळ्या परिसरात शनिवारी दुपारी दरम्यान अचानक वणवा पेटला. काही वेळातच आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट आकाशात दिसू लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. महामार्गालगतच हे कार्यालय असल्याने प्रवाशांमध्येही भीतीचे वात होते. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नगरसेविका वैशाली धनकलाल लांजेवार आणि परिसरातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. परिस्थितीचे गांभीर्य

ba888c29-2603-46a2-a801-b670467bbf32

ओळखून तातडीने साकोली नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. नगरपरिषदेचा अग्निशमक दल घटनास्थळी दाखल होताच जवानांनी पाण्याचा मारा सुरू केला. अथक प्रयत्नानंतर आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळविण्यात यश आले. सुदैवाने, या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. वेळीच आग विझविल्या गेल्यामुळे मोठा अनर्थ टळला असून परिसरातील नागरिकांनी सुटकेचा

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • Post by मनिषा विजय काशीवार
    4
    Post by मनिषा विजय काशीवार
    user_मनिषा विजय काशीवार
    मनिषा विजय काशीवार
    साकोली, भंडारा, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • महागावात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा तडाखा जनजीवन विस्कळीत महागाव : महागाव परिसरात सोमवारी (ता.30) रोजी सायंकाळी अचानक आलेल्या विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला. दुपारपासून वाढलेला प्रचंड उकाडा आणि दमट वातावरण यानंतर सायंकाळी काळे ढग दाटून आले आणि काही क्षणातच वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. पावसासोबतच विजांचा कडकडाट इतका तीव्र होता की नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. अनेक ठिकाणी वीज खंडित झाली असून काही भागात ट्रान्सफॉर्मरवर परिणाम झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. विजांच्या सततच्या कडकडाटामुळे नागरिक घराबाहेर पडण्यास घाबरत होते. या मुसळधार पावसामुळे महागावातील मुख्य रस्त्यांवर पाणी साचले असून वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली. काही ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून रस्त्यावर पडल्यामुळे वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. स्थानिक प्रशासन आणि आपत्कालीन पथक सतर्क झाले असून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. दरम्यान, या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला तरी वादळी वाऱ्यामुळे काही पिकांचे नुकसान झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. नागरिकांना सुरक्षित ठिकाणी राहण्याचे, झाडाखाली उभे न राहण्याचे आणि विजेपासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. महागावमध्ये अचानक आलेल्या या नैसर्गिक बदलामुळे जनजीवन काही काळासाठी ठप्प झाले असून, पुढील काही तास हवामान असेच राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
    3
    महागावात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा तडाखा जनजीवन विस्कळीत
महागाव : महागाव परिसरात सोमवारी (ता.30) रोजी सायंकाळी अचानक आलेल्या विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला. दुपारपासून वाढलेला प्रचंड उकाडा आणि दमट वातावरण यानंतर सायंकाळी काळे ढग दाटून आले आणि काही क्षणातच वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. पावसासोबतच विजांचा कडकडाट इतका तीव्र होता की नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. अनेक ठिकाणी वीज खंडित झाली असून काही भागात ट्रान्सफॉर्मरवर परिणाम झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. विजांच्या सततच्या कडकडाटामुळे नागरिक घराबाहेर पडण्यास घाबरत होते. या मुसळधार पावसामुळे महागावातील मुख्य रस्त्यांवर पाणी साचले असून वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली. काही ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून रस्त्यावर पडल्यामुळे वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. स्थानिक प्रशासन आणि आपत्कालीन पथक सतर्क झाले असून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
दरम्यान, या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला तरी वादळी वाऱ्यामुळे काही पिकांचे नुकसान झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. नागरिकांना सुरक्षित ठिकाणी राहण्याचे, झाडाखाली उभे न राहण्याचे आणि विजेपासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
महागावमध्ये अचानक आलेल्या या नैसर्गिक बदलामुळे जनजीवन काही काळासाठी ठप्प झाले असून, पुढील काही तास हवामान असेच राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
    user_Taha Mirza
    Taha Mirza
    Teacher महागाव, यवतमाळ, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • कुही-वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या महिलेच्या वारसांना २५ लाखांची आर्थिक मदत . दहा लाख रुपयांचा तात्काळ धनादेश तर बाकी पंधरा लाख रुपये मिळणार फिक्स च्या स्वरूपात. निर्मला श्रीपत गभणे वय वर्षे ७८ यांचा शेतात काम करताना वाघाने केलेल्या हल्यात दि.२७/३/२०२६ ला झाला होता मृत्यू, यावेळी वारसांना सह वनविभागाचे कर्मचारी व अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते
    1
    कुही-वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या महिलेच्या वारसांना २५ लाखांची आर्थिक मदत . दहा लाख रुपयांचा तात्काळ धनादेश तर बाकी पंधरा लाख रुपये मिळणार फिक्स च्या स्वरूपात. निर्मला श्रीपत गभणे वय वर्षे ७८ यांचा शेतात काम करताना वाघाने केलेल्या हल्यात दि.२७/३/२०२६ ला झाला होता मृत्यू, यावेळी वारसांना सह वनविभागाचे कर्मचारी व अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते
    user_Sharad shahare
    Sharad shahare
    कुही, नागपूर, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • उमरेड ( राजु जांभुळे ) भिवापूर पोलिसांनी रेतीची चोरटी वाहतूक करणाऱ्यांविरोधात २८ व २९ मार्च रोजी धडक कारवाई करत एकूण ५ गुन्हे नोंदवले. या कारवाईत ५ टिप्पर वाहने आणि ३६ ब्रास रेती असा एकूण १ कोटी ३१ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी विविध ठिकाणी नाकाबंदी व पेट्रोलिंग करीत तहसिल कार्यालय टी पाइंट व जवळी परिसरात संशयित टिप्पर थांबवून तपासणी केली. तपासणीदरम्यान संबंधित वाहनांमध्ये रेती आढळून आली. मात्र चालकांकडे वाहतुकीसाठी कोणताही वैध परवाना नसल्याचे निष्पन्न झाले. कारवाईदरम्यान वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये २० ते ३० लाख रुपये किंमतीची टिप्पर वाहने तसेच ३० ते ४० हजार रुपये किंमतीची रेती जप्त करण्यात आली. सदरची कारवाई उपविभागीय अधिकारी वृष्टी जैन यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार रविंद्र मस्कर यांच्या नेतृत्वात पोलिस नाईक रविंद्र जाधव व पोलिस अमलंदार यांच्या पुढाकारात करण्यात आली. या सर्व प्रकरणांत चालक व वाहन मालकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणी भिवापूर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२), ३(५), ४९ तसेच महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ च्या कलम ४८(७) आणि ४८(८) अन्वये गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
    1
    उमरेड ( राजु जांभुळे )
भिवापूर पोलिसांनी रेतीची चोरटी वाहतूक करणाऱ्यांविरोधात २८ व २९ मार्च रोजी धडक कारवाई करत एकूण ५ गुन्हे नोंदवले. या कारवाईत ५ टिप्पर वाहने आणि ३६ ब्रास रेती असा एकूण १ कोटी ३१ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी विविध ठिकाणी नाकाबंदी व पेट्रोलिंग करीत तहसिल कार्यालय टी पाइंट व जवळी परिसरात संशयित टिप्पर थांबवून तपासणी केली. तपासणीदरम्यान संबंधित वाहनांमध्ये रेती आढळून आली. मात्र चालकांकडे वाहतुकीसाठी कोणताही वैध परवाना नसल्याचे निष्पन्न झाले.
कारवाईदरम्यान वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये २० ते ३० लाख रुपये किंमतीची टिप्पर वाहने तसेच ३० ते ४० हजार रुपये किंमतीची रेती जप्त करण्यात आली. सदरची कारवाई उपविभागीय अधिकारी वृष्टी जैन यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार रविंद्र मस्कर यांच्या नेतृत्वात पोलिस नाईक रविंद्र जाधव व पोलिस अमलंदार यांच्या पुढाकारात करण्यात आली. या सर्व प्रकरणांत चालक व वाहन मालकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
या प्रकरणी भिवापूर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२), ३(५), ४९ तसेच महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ च्या कलम ४८(७) आणि ४८(८) अन्वये गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
    user_राजु  जांभुळे
    राजु जांभुळे
    उमरेड, नागपूर, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • Post by Samachar king digital
    1
    Post by Samachar king digital
    user_Samachar king digital
    Samachar king digital
    Local News Reporter Nagpur, Maharashtra•
    8 hrs ago
  • छत्तीसगड कांकेरमध्ये दोन नक्षलवाद्यांनी एके-४७ सह केले आत्मसमर्पण जंगलात लपून बसलेल्या साथीदारांना मुख्य प्रवाहात परत येण्याचे आवाहन केले....
    1
    छत्तीसगड कांकेरमध्ये दोन नक्षलवाद्यांनी एके-४७ सह केले आत्मसमर्पण
जंगलात लपून बसलेल्या साथीदारांना मुख्य प्रवाहात परत येण्याचे आवाहन केले....
    user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    Co-ed school हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • सच दिखाने के लिए पत्रकार को परमिशन चाहिए #Aurai #BiharPolice #Muzaffarpur #viralreels #worldbiharnews
    1
    सच दिखाने के लिए पत्रकार को परमिशन चाहिए
#Aurai #BiharPolice #Muzaffarpur #viralreels #worldbiharnews
    user_BIHAR NEWS NOW
    BIHAR NEWS NOW
    Journalist समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    20 min ago
  • Post by मनिषा विजय काशीवार
    3
    Post by मनिषा विजय काशीवार
    user_मनिषा विजय काशीवार
    मनिषा विजय काशीवार
    साकोली, भंडारा, महाराष्ट्र•
    17 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.