सेंदूरवाफा येथे झाडीपट्टी नाट्य प्रशिक्षण साकोली महाराष्ट्र शासन सांस्कृतिक विभाग मुंबईच्या वतीने सेंदूरवाफा साकोली येथील प्रगती कॉलनीतील राजीव गांधी कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयात मोफत दहा दिवसीय झाडीपट्टी नाट्य प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत तर्कशुद्ध पध्दतीने अभिनय सादर करण्यासाठी तसेच नाटकातील अभिनयाच्या संदर्भात विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. त्यात लेखन, अभिनय, कलाकृती सादर करताना ती कशी सादर केली पाहिजे, अशा विविध विषयांवर प्रशिक्षण देण्यात आले. ev सदर कार्यशाळेत २० नवोदित प्रशिक्षणार्थीना झाडीपट्टीमधील विविध अनुभवी व नामवंत कलावंतांकडून मार्गदर्शन मिळाले. विशेष मार्गदर्शक म्हणून प्रा. संजयकुमार निंबेकर, महेंद्र गोंडाने, संजीव रामटेके, भारत रंगारी, युवराज प्रधान, रुपाली खोब्रागडे, दिपाली यावलकर, परमानंद गहाणे, सिनेनाट्य अभिनेता व प्रबोधनकार डॉ. अनिरुद्ध वनकर यांनी मार्गदर्शन केले. या शिबीर दरम्यान प्रशिक्षणार्थी यांना डॉ. अनिरुद्ध वनकर लिखित, दिग्दर्शित 'माणूस मारला' ही एकांकिका बसवून Next नाट्यप्रयोगाचे उत्कृष्ट सादरीकरण सुद्धा करण्यात आले. या नाटकाच्या उद्घाटन प्रसंगी प्राचार्य डॉ. अशोक कापगते, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. उषा डोंगरवार, सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी येळे, शिबीर संचालक परमानंद गहाणे आदी उपस्थित होते. या कार्यशाळेला प्रबोधनकार भावेश कोटांगले हे उपस्थित होते
सेंदूरवाफा येथे झाडीपट्टी नाट्य प्रशिक्षण साकोली महाराष्ट्र शासन सांस्कृतिक विभाग मुंबईच्या वतीने सेंदूरवाफा साकोली येथील प्रगती कॉलनीतील राजीव गांधी कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयात मोफत दहा दिवसीय झाडीपट्टी नाट्य प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत तर्कशुद्ध पध्दतीने अभिनय सादर करण्यासाठी तसेच नाटकातील
अभिनयाच्या संदर्भात विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. त्यात लेखन, अभिनय, कलाकृती सादर करताना ती कशी सादर केली पाहिजे, अशा विविध विषयांवर प्रशिक्षण देण्यात आले. ev सदर कार्यशाळेत २० नवोदित प्रशिक्षणार्थीना झाडीपट्टीमधील विविध अनुभवी व नामवंत कलावंतांकडून मार्गदर्शन मिळाले. विशेष मार्गदर्शक म्हणून प्रा.
संजयकुमार निंबेकर, महेंद्र गोंडाने, संजीव रामटेके, भारत रंगारी, युवराज प्रधान, रुपाली खोब्रागडे, दिपाली यावलकर, परमानंद गहाणे, सिनेनाट्य अभिनेता व प्रबोधनकार डॉ. अनिरुद्ध वनकर यांनी मार्गदर्शन केले. या शिबीर दरम्यान प्रशिक्षणार्थी यांना डॉ. अनिरुद्ध वनकर लिखित, दिग्दर्शित 'माणूस मारला' ही एकांकिका
बसवून Next नाट्यप्रयोगाचे उत्कृष्ट सादरीकरण सुद्धा करण्यात आले. या नाटकाच्या उद्घाटन प्रसंगी प्राचार्य डॉ. अशोक कापगते, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. उषा डोंगरवार, सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी येळे, शिबीर संचालक परमानंद गहाणे आदी उपस्थित होते. या कार्यशाळेला प्रबोधनकार भावेश कोटांगले हे उपस्थित होते
- प्रतापपुर शिवारात वाघाचा धुमाकूळ, दररोज गाय-वासरांची शिकार वेलतूर(शरद शहारे) वेलतूरलगतच्या प्रतापपुर शिवारात वाघाचा धुमाकूळ सुरूच असून, दररोज, बकरी, बैल, गाय-वासरांची शिकार त्याने आरंभीली आहे. वेलतूर वनपरीक्षेत्रातील वेलतूर ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या प्रतापपुर रिठी गावात पोहरा गावानंतर आठवड्यापासून वाघाने धुमाकूळ घातला असून भरदिवसा प्राण्यांवर दररोज होणाऱ्या हल्ल्यांमुळे गावात व परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आठवड्यापुर्वी पोहरा येथे एका इसमाला जखमी केले होते तर दोन दिवसांपूर्वी वेलतूरच्या प्रतापपूर शिवारात महिलेला ठार केले होते. वनपरीक्षेत्रात आठवड्यापासून वाघाने धुमाकूळ घातला असून भरदिवसा प्राण्यांवर दररोज होणाऱ्या हल्ल्यांमुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परिणामी शेतकरी व शेतमजुरांसमोर शेतीची कामे करावी तरी कशी? असा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. प्राप्त माहितीनुसार, वनपरिक्षेत्रत मागील आठवड्यापासून 2 ते 3 वाघांनी धुमाकूळ घातला असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे. गावालगतच्या परिसरात दिवसाढवळ्या शेतात चराई करीत असलेल्या जनावरांवर वाघ हल्ला करीत असल्याने पशुपालक शेतकरीवर्ग भयभीत झाला आहे. टेकेपार येथील पंकज लांजेवार यांच्या शेतातील 2 शेळ्या, पंकज शेंडे यांच्या शेतातील एक वासरू व दुधाळ गायीवर दिवसाढवळ्या हल्ला करीत जखमी केले. आता उन्हाळा सुरु झालेला आहे. त्यामुळे ग्रामीण भागात शेतकरी उन्हाळी व खरीप हंगामासाठी दिवसभर शेतात राबराब राबत आहेत. अशा स्थितीत परिसरात वाघाचा धुमाकूळ असताना आता शेती करावी तरी कशी? असा प्रश्नचिन्ह शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. या संपूर्ण घटनाक्रमाची वनविभागाला माहिती देण्यात आली. क्षेत्रसहाय्यक व बिट वनरक्षक यांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वनविभागामार्फत नुकसान भरपाई देण्यात येईल, अशी माहिती क्षेत्र सहाय्यक यांनी माध्यमांना दिली आहे. गावकऱ्यांनी स्वतःची काळजी घ्यावी, रात्रीच्या सुमारास शौचास घराबाहेर पडू नये, हातात काठीचा वापर करावा जनावरे मोकळ्या ठिकाणी न बांधता गोठ्यात बांधावे, अशा सूचनाही वनविभागामार्फत नागरिकांना दिल्या आहेत या वाघाला बेशुद्ध करून दुसऱ्या ठिकाणी नेण्यात यावे अशी मागणी गावकऱ्यांकडून केली जात आहे. आज पुन्हा दिसली वाघाची हालचाल वाघांचा दिवसेंदिवस वाढता धुमाकूळ सगळ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. घटनास्थळावरून सुमारे 200 ते 300 मीटर परिसरात माकडे जोरजोरात ओरडत होते. याचा अर्थ वाघ याच परिसरात थांबला असावा, अशी शंका व्यक्त होत आहे. हे सर्व वास्तविक असतानाच रूयाड गावालगत असलेल्या शेत व नाला परिसरात वाघ दिसल्याची माहिती देण्यात आली. त्यांनी तात्काळ दुसरा परिसर गाठला असता वनविभागाचे काही कर्मचारी व गावकरी त्या ठिकाणी दिसून आले. वाघ याच परिसरात होता, अशी माहिती काही प्रत्यक्षदर्शीनी दिली. सामाजिक व राजकीय पदाधिकारी यांनी या संपूर्ण घटनेची माहिती तालूका वनपरिक्षेत्र अधिकारी, तहसीलदार , पोलिस अधिकारी यांना दिली असता त्यांनी वनविभागाची टीम घटनास्थळी रवाना केली. वनविभाग कर्मचाऱ्यांनी परिसरात बंदुकीने आवाज करीत वाघाला परिसराबाहेर जंगलाच्या का वळवू नये असाही सवाल भयभीत परीसर वासी आता करत आहेत. मात्र, वाघ पुन्हा या परिसरातच असल्याने गावातील नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे.2
- उमरेड ( राजु जांभुळे ) नागपूर येथील अमृत भवन येथे Angel Ladies Club यांच्या वतीने महिला दिनानिमित्त “एक नारी सब पे भारी – सीझन 2” या भव्य पुरस्कार सोहळ्याचे तसेच होळी मिलन सेमिनारचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात विशेष आकर्षण ठरल्या त्या कटोल येथील साक्षी सुरेश कुमेरिया. त्यांनी पुणे येथे hair आणि makeup मध्ये व्यावसायिक शिक्षण घेतले असून, गेल्या 4 वर्षांच्या अनुभवाच्या जोरावर अल्पावधीतच उल्लेखनीय यश संपादन केले आहे. कार्यक्रमातील मेकअप टास्कमध्ये 20 मिनिटांत मॉडेल तयार करण्याचे आव्हान देण्यात आले होते. मात्र साक्षी कुमेरिया यांनी केवळ 8 मिनिटांतच आपली मॉडेल प्रिया नागदेवे यांना आकर्षक पद्धतीने तयार करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. यासोबतच त्यांनी महिलांना उपयुक्त असे beauty tips देखील दिले. त्यांच्या या उत्कृष्ट कामगिरीमुळे त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. यावेळी साक्षी कुमेरिया यांनी तरुणांना प्रेरणादायी संदेश देताना सांगितले की, स्वप्न मोठं ठेवा आणि मेहनत प्रामाणिक ठेवा, यश नक्की मिळतं.तसेच येत्या काळात ग्रामीण भागातील मुलींना व महिलांना प्रशिक्षण देण्यासाठी स्वतःची academy सुरू करण्याचा त्यांचा मानस असल्याचे त्यांनी सांगितल तसेच कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सीमा कोठारी, रितुजा जैस्वाल, शाची मल्लिक यांची उपस्थिती लाभली. विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात राधा-कृष्ण जोडी स्पर्धा, रेट्रो लुक फॅशन शो, तसेच वन मिनिट गेम शो यांसारख्या आकर्षक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. सर्व सहभागींसाठी गिफ्ट हॅम्पर्सचीही व्यवस्था करण्यात आली होती. काटोल सारख्या ग्रामीण भागातून मोठं स्वप्न पाहत साक्षी कुमेरिया यांनी सिद्ध केलं की जिद्द, मेहनत आणि कौशल्याच्या जोरावर कोणतंही यश दूर नसतं. त्यांच्या या कामगिरीमुळे परिसरात अभिमानाची भावना निर्माण झाली असून, अनेक तरुणांना प्रेरणा मिळत आहे.1
- Post by आनंद चौधरी ठाकुर शिवसेना कट्टर हिन्दू नेता युवा सेना उप राष्ट्रीय प्रमुख1
- विजय थलपती (TVK प्रमुख) यांनी तमिळनाडूतील विधानसभा निवडणुकीचा अर्ज भरला! नागपूर :- दि. 30 2026 रोजी विजय थलपती (TVK प्रमुख) यांनी तामिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी अधिकृतपणे उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ही निवडणूक त्यांची राजकारणातील पहिली मोठी निवडणूक लढत मानली जात आहे. अर्ज भरल्यानंतर विजय यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत जनतेसाठी काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.1
- नागपूर/ हिंगणा: (दि ३० मार्च) हिंगणा परिसरात आज १०.३० वा रात्री पासून पावसाला सुरूवात झाली असून, विजेचा कडकडाट व मेघगर्जनेसह सध्या सरीवर सरी बरसताहेत. विजेचा लपंडाव सुरू असून महावितरणांनी खबरदारी म्हणून वीज बंद केली आहे.1
- ब्रेकिंग चित्रकूट: बागै नदी में डूबने से दो मासूमों की दर्दनाक मौत, गांव में पसरा मातम* चित्रकूट। जनपद के पहाड़ी थाना क्षेत्र अंतर्गत सकरौली मजरा केयूटरा पुरवा गांव में मंगलवार सुबह एक हृदयविदारक हादसा हो गया। बागै नदी के चकरेही घाट पर नहाने गए दो मासूम बच्चों की डूबने से दर्दनाक मौत हो गई। प्राप्त जानकारी के अनुसार सुबह करीब 9 बजे शिवम राजपूत (पुत्र नवल) और आशीष राजपूत (पुत्र गोविंद) नदी में नहाने के लिए गए थे। इसी दौरान गहराई का अंदाजा न लग पाने के कारण दोनों बच्चे पानी में डूब गए। आसपास मौजूद लोगों ने बचाने का प्रयास किया, लेकिन तब तक काफी देर हो चुकी थी। घटना की सूचना मिलते ही परिजनों में कोहराम मच गया और पूरे गांव में शोक की लहर दौड़ गई। मौके पर पहुंची पुलिस ने ग्रामीणों की मदद से दोनों बच्चों के शव बाहर निकलवाए और आवश्यक कार्रवाई में जुट गई। इस दर्दनाक हादसे ने एक बार फिर नदी घाटों पर सुरक्षा व्यवस्था की कमी और बच्चों की निगरानी को लेकर गंभीर सवाल खड़े कर दिए हैं।1
- Post by मनिषा विजय काशीवार4
- हिंगणा/ नागपूर: (दि ३० मार्च) हिंगण्यातील आय सी चौकात सोसाट्याचा वारा; वाहतूक झाली शांत1
- Post by Pitam Parjapati1