रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला कोळगावच्या गोपीचंद पुना पाटील विद्यालयात ‘सजीव राखी’चा अनोखा उपक्रम रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला कोळगावच्या गोपीचंद पुना पाटील विद्यालयात ‘सजीव राखी’चा अनोखा उपक्रम....!!!! ४० विद्यार्थ्यांना मिळाली बहिणीची माया; २५ विद्यार्थिनींनी मानले विद्यार्थ्यांना भाऊ कोळगाव, ता. भडगाव (प्रतिनिधी) : येथील गोपीचंद पुना पाटील माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक राख्या तयार करून पारंपरिक रक्षाबंधनाचा सण उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरणात साजरा केला.यावेळी ‘सजीव राखी’च्या माध्यमातून भाऊ-बहिणीच्या नात्यातील प्रेम, आपुलकी, जिव्हाळा आणि परस्पर सहकार्याचा संदेश देण्यात आला. विद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या पर्यावरणपूरक राख्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता,पर्यावरण संवर्धनाची जाणीव तसेच भारतीय संस्कृती व परंपरांविषयी आदर निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य श्री.आर.आर.वळखंडे होते. विद्यार्थीनींनी त्यांनाही राखी बांधून सण साजरा केला,त्यानंतर रक्षाबंधनाचे महत्त्व विशद करताना सांगितले की,भाऊ-बहिणीचे नाते हे प्रेम,विश्वास,जिव्हाळा आणि परस्पर संरक्षणाचे प्रतीक आहे. विद्यालयातील ज्या सुमारे ४० विद्यार्थ्यांना सख्ख्या बहिणी नाहीत,अशा विद्यार्थ्यांना विद्यालयातील बहिणींनी राखी बांधून बहिणीच्या प्रेमाची उणीव भरून काढली.तसेच ज्या २५ विद्यार्थिनींना भाऊ नाही,त्यांनी विद्यालयातील विद्यार्थ्यांना भाऊ मानून त्यांच्याकडून राखी बांधून घेतली.त्यामुळे या उपक्रमाला सामाजिक आणि भावनिक स्वरूप प्राप्त झाले. यावेळी विद्यार्थ्यांना रक्षाबंधनाची परंपरा,त्यामागील सांस्कृतिक व भावनिक महत्त्व तसेच रक्षाबंधनाची विधीवत पद्धत याबाबत प्रत्यक्ष प्रात्यक्षिकासह माहिती देण्यात आली.आई-वडिलांनंतर रक्ताच्या नात्यात भाऊ-बहिणीचे नाते अत्यंत जिव्हाळ्याचे असते.त्यामुळे प्रत्येक भावाने आपल्या बहिणीचा प्रेमाने आदर व सन्मान करावा, तिच्या सुख-दुःखात साथ द्यावी आणि संकटाच्या काळात तिच्या मदतीला धावून जावे,असा संदेश विद्यार्थ्यांना देण्यात आला. रक्षाबंधनाच्या माध्यमातून केवळ राखी बांधण्याची परंपरा न जोपासता बंधुभाव, सामाजिक सलोखा, परस्पर सन्मान आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात आला.विविध उपक्रमांमधून विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत कार्यक्रमाची शोभा वाढवली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक श्री.एस.ए.वाघ यांनी केले. कार्यक्रमाच्या नियोजनासाठी विद्यालयातील महिला शिक्षिका श्रीमती सरिता पाटील,श्रीमती चारुलता पाटील व श्रीमती तृप्ती भामरे यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून कार्यक्रम यशस्वी केला. रक्षाबंधनाच्या निमित्ताने विद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या अभिनव उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, ‘सजीव राखी’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी माणुसकीच्या नात्याची वीण अधिक घट्ट केली, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला कोळगावच्या गोपीचंद पुना पाटील विद्यालयात ‘सजीव राखी’चा अनोखा उपक्रम रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला कोळगावच्या गोपीचंद पुना पाटील विद्यालयात ‘सजीव राखी’चा अनोखा उपक्रम....!!!! ४० विद्यार्थ्यांना मिळाली बहिणीची माया; २५ विद्यार्थिनींनी मानले विद्यार्थ्यांना भाऊ कोळगाव, ता. भडगाव (प्रतिनिधी) : येथील गोपीचंद पुना पाटील माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक राख्या तयार करून पारंपरिक रक्षाबंधनाचा सण उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरणात साजरा केला.यावेळी ‘सजीव राखी’च्या माध्यमातून भाऊ-बहिणीच्या नात्यातील प्रेम, आपुलकी, जिव्हाळा आणि परस्पर सहकार्याचा संदेश देण्यात आला. विद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या पर्यावरणपूरक राख्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता,पर्यावरण संवर्धनाची जाणीव तसेच भारतीय संस्कृती व परंपरांविषयी आदर निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य श्री.आर.आर.वळखंडे होते. विद्यार्थीनींनी त्यांनाही राखी बांधून सण साजरा केला,त्यानंतर रक्षाबंधनाचे महत्त्व विशद करताना सांगितले की,भाऊ-बहिणीचे नाते हे प्रेम,विश्वास,जिव्हाळा आणि परस्पर संरक्षणाचे प्रतीक आहे. विद्यालयातील ज्या सुमारे ४० विद्यार्थ्यांना सख्ख्या बहिणी नाहीत,अशा विद्यार्थ्यांना विद्यालयातील बहिणींनी राखी बांधून बहिणीच्या प्रेमाची उणीव भरून काढली.तसेच ज्या २५ विद्यार्थिनींना भाऊ नाही,त्यांनी विद्यालयातील विद्यार्थ्यांना भाऊ मानून त्यांच्याकडून राखी
बांधून घेतली.त्यामुळे या उपक्रमाला सामाजिक आणि भावनिक स्वरूप प्राप्त झाले. यावेळी विद्यार्थ्यांना रक्षाबंधनाची परंपरा,त्यामागील सांस्कृतिक व भावनिक महत्त्व तसेच रक्षाबंधनाची विधीवत पद्धत याबाबत प्रत्यक्ष प्रात्यक्षिकासह माहिती देण्यात आली.आई-वडिलांनंतर रक्ताच्या नात्यात भाऊ-बहिणीचे नाते अत्यंत जिव्हाळ्याचे असते.त्यामुळे प्रत्येक भावाने आपल्या बहिणीचा प्रेमाने आदर व सन्मान करावा, तिच्या सुख-दुःखात साथ द्यावी आणि संकटाच्या काळात तिच्या मदतीला धावून जावे,असा संदेश विद्यार्थ्यांना देण्यात आला. रक्षाबंधनाच्या माध्यमातून केवळ राखी बांधण्याची परंपरा न जोपासता बंधुभाव, सामाजिक सलोखा, परस्पर सन्मान आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात आला.विविध उपक्रमांमधून विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत कार्यक्रमाची शोभा वाढवली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक श्री.एस.ए.वाघ यांनी केले. कार्यक्रमाच्या नियोजनासाठी विद्यालयातील महिला शिक्षिका श्रीमती सरिता पाटील,श्रीमती चारुलता पाटील व श्रीमती तृप्ती भामरे यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून कार्यक्रम यशस्वी केला. रक्षाबंधनाच्या निमित्ताने विद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या अभिनव उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, ‘सजीव राखी’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी माणुसकीच्या नात्याची वीण अधिक घट्ट केली, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
- बंजारा समाजाची समृद्ध लोकसंस्कृती, परंपरा आणि सामाजिक एकोपा जपण्यासाठी अशा सांस्कृतिक उत्सवांचे महत्त्व मोठे आहे. सातकुंड-तेलवाडी येथे झालेल्या तिज महोत्सवातूनही याच सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडले. सातकुंड-तेलवाडी येथे बंजारा समाजाचा तिज महोत्सव उत्साहात सातकुंड-तेलवाडी : बंजारा समाजाच्या वतीने पारंपरिक तिज महोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. समाजातील महिला, युवक व ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत बंजारा समाजाची पारंपरिक संस्कृती, लोकपरंपरा आणि सामाजिक एकोप्याचे दर्शन घडविले. तिज महोत्सव हा बंजारा समाजाच्या सांस्कृतिक परंपरेशी जोडलेला महत्त्वाचा उत्सव मानला जातो. या उत्सवानिमित्त पारंपरिक पद्धतीने तिजची पूजा, पारंपरिक गीते व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. महिला व युवतींनी पारंपरिक वेशभूषेत सहभाग घेतल्याने कार्यक्रमाला विशेष रंगत आली. सातकुंड-तेलवाडी परिसरातील बंजारा समाजबांधवांनी एकत्र येत आपल्या संस्कृतीचे जतन आणि पुढील पिढीपर्यंत परंपरांचा वारसा पोहोचविण्याचा संदेश दिला. तिज महोत्सवाच्या माध्यमातून समाजातील महिला व युवकांचा सहभाग वाढविण्यासोबतच सामाजिक एकता आणि बंधुभाव मजबूत करण्यावर भर देण्यात आला. यावेळी पारंपरिक गीते, नृत्य आणि सांस्कृतिक सादरीकरणामुळे उत्सवाचे वातावरण अधिक उत्साहपूर्ण झाले. लहान मुले, महिला, युवक तसेच ज्येष्ठ समाजबांधवांनी कार्यक्रमाचा आनंद घेतला. बंजारा समाजाची समृद्ध लोकसंस्कृती, परंपरा आणि सामाजिक एकोपा जपण्यासाठी अशा सांस्कृतिक उत्सवांचे महत्त्व मोठे आहे. सातकुंड-तेलवाडी येथे झालेल्या तिज महोत्सवातूनही याच सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडले.1
- आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे संघर्ष समितीतर्फे खान्देशस्तरीय नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा जळगावात सत्कार आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे संघर्ष समितीतर्फे खान्देशस्तरीय नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा जळगावात सत्कार1
- पत्रकारावरही गुन्हा; माध्यमस्वातंत्र्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न असल्याचा ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चा आरोप पुणे | प्रतिनिधी पुण्यातील प्रतिष्ठित सी ओ पी टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीच्या वसतिगृहातील वादाला आता नवे वळण मिळाले आहे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांपासून सुरू झालेल्या या प्रकरणात विद्यार्थी संघटनांमधील संघर्षानंतर पोलिसांत गुन्हे दाखल झाले आणि आता ए बी पी माझाचे पुणे प्रतिनिधी पत्रकार मंदार गोंजारी यांच्याविरोधातही तक्रार गुन्हा दाखल झाल्याचे वृत्त समोर आले आहे. विद्यापीठ प्रशासनाने पत्रकाराने परवानगीशिवाय वसतिगृह परिसरात प्रवेश केल्याचा आरोप करत कायदेशीर तक्रार केली आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर व्हॉईस ऑफ मीडिया व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरमने तीव्र नाराजी व्यक्त करत पत्रकारांवर अशा प्रकारे कायदेशीर कारवाई करून माध्यमांवर दबाव आणण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. सी ओ पी परिसरातील घटनेनंतर पोलिसांनी आधी ए बी व्ही पी सदस्याच्या तक्रारीवरून एन एस यु आय आणि युवक काँग्रेसशी संबंधित ५० ते ६० कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर विद्यापीठ प्रशासनाच्या तक्रारीवरून आणखी एक गुन्हा दाखल झाल्याचे वृत्त आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर पत्रकार मंदार गोंजारी यांनी सी ओ पी परिसरातील विद्यार्थ्यांच्या कथित प्रश्नांबाबत केलेले वृत्तांकनही चर्चेत आले आहे. एबीपी माझाच्या अधिकृत संकेतस्थळावर गोंजारी यांच्या नावाने सी ओ पी प्रकरणावरील वृत्त प्रकाशित झाले आहे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर पत्रकाराने वृत्तांकन करणे हा पत्रकारितेचा मूलभूत अधिकार आणि कर्तव्याचा भाग आहे. एखाद्या पत्रकाराने नियमांचे उल्लंघन केले असल्यास कायदा आपले काम करेल; मात्र पत्रकाराने केलेल्या वृत्तांकनामुळे प्रशासन किंवा सत्ताधारी अस्वस्थ झाले म्हणून पत्रकाराविरोधात कारवाई होत असेल, तर हा माध्यमस्वातंत्र्यासाठी गंभीर इशारा आहे, अशी भूमिका व्हॉईस ऑफ मीडिया व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरमने व्यक्त केली आहे. सी ओ पी प्रकरणात विद्यार्थ्यांच्या शुल्क, शिष्यवृत्ती आणि विद्यार्थ्यांशी संबंधित प्रश्नांवरून वाद निर्माण झाल्याचे विविध वृत्तांतून समोर आले आहे. एका विद्यार्थिनीने सुरुवातीला कॉलेजकडून अतिरिक्त शुल्क आकारले जात असल्याचे सांगितले होते; त्यानंतर तिने दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपल्यावर दबाव निर्माण झाल्याचे सांगत राजकीय वादात आपल्याला ओढू नये, असे आवाहन केले. म्हणूनच या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांचे प्रश्न काय आहेत, त्यावर प्रशासनाची भूमिका काय आहे, विद्यार्थी संघटनांमध्ये नेमका संघर्ष कशामुळे झाला आणि पत्रकाराविरोधातील तक्रारीमागील वास्तविक कारण काय आहे, हे स्पष्टपणे समोर येणे गरजेचे आहे. व्हॉईस ऑफ मीडिया व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरमचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल म्हस्के यांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला. म्हस्के म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर पत्रकाराने बातमी केली म्हणून पत्रकाराला गुन्ह्याच्या चौकटीत आणण्याचा प्रयत्न होत असेल, तर हा केवळ एका पत्रकाराचा प्रश्न राहात नाही; हा संपूर्ण माध्यमविश्वाच्या स्वातंत्र्याचा प्रश्न बनतो. “पत्रकार चुकीचा असेल तर कायदा तपास करेल, पुरावे असतील तर न्यायालयीन प्रक्रिया होईल. मात्र पत्रकाराने प्रश्न उपस्थित केले म्हणून त्याच्यावर दबाव निर्माण करणे, त्याला घाबरवणे किंवा गुन्ह्याच्या माध्यमातून त्याची लेखणी रोखण्याचा प्रयत्न करणे कोणत्याही परिस्थितीत मान्य केले जाणार नाही,” अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली. सरकारने विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचे उत्तर देण्याऐवजी त्यांचे प्रश्न मांडणाऱ्या माध्यमांकडे संशयाने पाहिले जात असेल, तर ही लोकशाहीच्या दृष्टीने चिंतेची बाब असल्याचेही म्हस्के यांनी नमूद केले. “महाराष्ट्रातील पत्रकार निर्भयपणे काम करतील. माध्यमांवर कोणत्याही प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न झाला तर व्हॉइस ऑफ मीडिया इंटरनॅशनल फोरम पत्रकारांच्या पाठीशी ठामपणे उभा राहील,” असा इशाराही त्यांनी दिला. व्हॉईस ऑफ मीडिया व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरमचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विजय चोरडिया यांनीही सी ओ पी प्रकरणातील पत्रकाराविरोधातील कारवाईचा तीव्र शब्दांत निषेध केला. चोरडिया म्हणाले की, पत्रकार हा समाजातील प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविणारा महत्त्वाचा दुवा आहे. विद्यार्थ्यांच्या समस्या समोर आणणे, प्रशासनाला प्रश्न विचारणे आणि वस्तुस्थिती जनतेसमोर मांडणे हे पत्रकाराचे कर्तव्य आहे. “पत्रकाराने बातमी केली म्हणून त्याच्यावर गुन्हा दाखल होणे ही बाब अत्यंत गंभीर आहे. पत्रकारितेवर दबाव आणण्याचा कोणताही प्रयत्न महाराष्ट्रातील पत्रकार सहन करणार नाहीत. पत्रकाराच्या लेखणीला घाबरवण्याऐवजी प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत,” अशी भूमिका चोरडिया यांनी मांडली. सी ओ पी प्रकरणात पत्रकाराविरोधात दाखल झालेल्या तक्रारीची निष्पक्ष चौकशी व्हावी आणि पत्रकाराला केवळ त्याच्या व्यावसायिक कर्तव्यामुळे लक्ष्य केले जात नाही ना, याचीही चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. सी ओ पी प्रकरण आता केवळ विद्यार्थी संघटनांमधील संघर्षापुरते मर्यादित राहिलेले नाही. विद्यार्थ्यांचे प्रश्न, विद्यापीठ प्रशासनाची भूमिका, राजकीय हस्तक्षेप, विद्यार्थी संघटनांमधील संघर्ष आणि आता पत्रकाराविरोधातील कायदेशीर कारवाई या सर्व मुद्द्यांमुळे प्रकरण अधिक व्यापक झाले आहे. पोलिसांनी सी ओ पी परिसरात राजकीय व्यक्ती आणि कार्यकर्त्यांच्या प्रवेशावर तसेच राजकीय कार्यक्रमांवर काही काळ निर्बंधही लागू केले होते. मात्र प्रश्न असा आहे की, विद्यार्थ्यांचे प्रश्न नेमके काय आहेत? त्यांची उत्तरे कोण देणार? आणि ते प्रश्न जनतेसमोर मांडणाऱ्या पत्रकाराचे संरक्षण कोण करणार? व्हॉईस ऑफ मीडिया व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरमने स्पष्ट केले आहे की, पत्रकारितेचा आवाज दाबण्याचा कोणताही प्रयत्न झाला तर संघटना पत्रकारांच्या घटनात्मक अधिकारांच्या बाजूने ठामपणे उभी राहील. “पत्रकारांवर दबाव टाकून प्रश्न सुटणार नाहीत. उलट दबाव वाढला की प्रश्न अधिक तीव्रतेने जनतेसमोर येतील. विद्यार्थ्यांना न्याय आणि पत्रकारांना निर्भयपणे काम करण्याचे स्वातंत्र्य मिळणे, हीच लोकशाहीची खरी कसोटी आहे,” अशी भूमिका संघटनेने व्यक्त केली आहे. दरम्यान, पत्रकार मंदार गोंजारी यांच्याविरोधातील तक्रारीसह सी ओ पी प्रकरणातील सर्व आरोपांची निष्पक्ष चौकशी होणे आणि विद्यार्थी, विद्यापीठ प्रशासन, विद्यार्थी संघटना तसेच पत्रकार,सर्वांची बाजू ऐकून वस्तुस्थिती जनतेसमोर आणणे आवश्यक आहे. व्हॉईस ऑफ मीडिया व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरम यावर पुढची भूमिका घेणार आहे.1
- जलगाव जिल्हे मे एक औरत को नहाते हुए छेड रहा था एक आदमी उसे पकड के चारो तरफ से की पिटाई जलगाव लेटेस्ट न्यूज #जलगावन्यूज #जळगावजिल्हा #viralnewz #shuruapp1
- नेपाल का जलप्रलय भारत के दरवाजे पर! बिहार-UP में हाई अलर्ट, कोसी-गंडक मचा सकती हैं तबाही1
- छत्रपती संभाजीनगर: 'सियाराम डेव्हलपर्स'च्या नवीन कार्यालयाचे दिमाखात उद्घाटन1
- सिल्लोड कायगाव अज्ञात आरोपीने कपाशी पिकाची केली नुकसान वडोद बाजार पोलीस ठाणे येथे घटनेची नोंद सिल्लोड तालुक्यातील कायगाव येथे अज्ञात आरोपीने कपाशी पिकाचे झाडे उपटून फेकत खोडके या शेतकऱ्याचे मोठे नुकसान केले आहे सदरील घटनेची नोंद वडोद बाजार पोलिसांनी घेतली आहे1
- ब्रेकिंग न्यूज 🚨 नेपाळमध्ये भीषण महापूर; १५७ जणांचा मृत्यू, ४०० हून अधिक बेपत्ता 🚨 ब्रेकिंग न्यूज 🚨 नेपाळमध्ये भीषण महापूर; १५७ जणांचा मृत्यू, ४०० हून अधिक बेपत्ता काठमांडू : नेपाळ-चीन सीमेवरील भोटेकोशी नदीला आलेल्या भीषण पुरामुळे मोठी जीवितहानी झाली आहे. नेपाळ पोलिसांच्या ताज्या माहितीनुसार आतापर्यंत १५७ जणांचे मृतदेह सापडले असून ४०० हून अधिक नागरिक बेपत्ता आहेत. पुरामुळे रस्ते, पूल, घरे आणि वीज प्रकल्पांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेक भागांचा संपर्क तुटला आहे. बचाव आणि मदतकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. बेपत्ता असलेल्या नागरिकांमध्ये परदेशी नागरिकांचाही मोठा समावेश असून १३३ भारतीय नागरिक बेपत्ता असल्याची ताजी माहिती समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार हिमनदीचा मोठा भाग कोसळल्याने नदीत माती, दगड आणि पाण्याचा प्रचंड लोंढा निर्माण झाला असावा. या घटनेचा सविस्तर तपास सुरू आहे. बचाव पथके, सुरक्षा दल आणि हेलिकॉप्टरच्या मदतीने बेपत्ता नागरिकांचा शोध सुरू असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.1