logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

आज दुपारी बारामतीच्या पूर्व भागातील डोलवाडी, झारगडवाडी, सोनगाव, मेखळी, पिंपळी, काटेवाडी या परिसरात अचानक पावसाने हजेरी लावली. जोरदार वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. अनेक दिवसांपासून शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत होते, त्यामुळे आज वरून राजाने हजेरी लावल्याने ते सुखावले आहेत. या भागात सुमारे अर्धा तास पाऊस झाला.

7 hrs ago
user_Mansoor Shaikh
Mansoor Shaikh
Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
7 hrs ago

आज दुपारी बारामतीच्या पूर्व भागातील डोलवाडी, झारगडवाडी, सोनगाव, मेखळी, पिंपळी, काटेवाडी या परिसरात अचानक पावसाने हजेरी लावली. जोरदार वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. अनेक दिवसांपासून शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत होते, त्यामुळे आज वरून राजाने हजेरी लावल्याने ते सुखावले आहेत. या भागात सुमारे अर्धा तास पाऊस झाला.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे विधानभवनात आगमन झाले. यावेळी अनेक आमदार आणि मंत्री त्यांच्यासोबत उपस्थित होते. त्यांच्या विधानभवनातील प्रवेशाला 'दमदार एन्ट्री' असे संबोधण्यात आले.
    1
    पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे विधानभवनात आगमन झाले. यावेळी अनेक आमदार आणि मंत्री त्यांच्यासोबत उपस्थित होते. त्यांच्या विधानभवनातील प्रवेशाला 'दमदार एन्ट्री' असे संबोधण्यात आले.
    user_News Katta Live
    News Katta Live
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • आज दुपारी बारामतीच्या पूर्व भागातील डोलवाडी, झारगडवाडी, सोनगाव, मेखळी, पिंपळी, काटेवाडी या परिसरात अचानक पावसाने हजेरी लावली. जोरदार वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. अनेक दिवसांपासून शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत होते, त्यामुळे आज वरून राजाने हजेरी लावल्याने ते सुखावले आहेत. या भागात सुमारे अर्धा तास पाऊस झाला.
    1
    आज दुपारी बारामतीच्या पूर्व भागातील डोलवाडी, झारगडवाडी, सोनगाव, मेखळी, पिंपळी, काटेवाडी या परिसरात अचानक पावसाने हजेरी लावली. जोरदार वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाल्याने नागरिकांची तारांबळ उडाली.

अनेक दिवसांपासून शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत होते, त्यामुळे आज वरून राजाने हजेरी लावल्याने ते सुखावले आहेत. या भागात सुमारे अर्धा तास पाऊस झाला.
    user_Mansoor Shaikh
    Mansoor Shaikh
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • एकनाथ शिंदे यांनी सहा खासदारांसह राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) मध्ये प्रवेश केला आहे. या महत्त्वपूर्ण घडामोडीवर प्रतिक्रिया व्यक्त करताना शिंदे यांनी म्हटले की, 'शिवसेना महाराष्ट्रातील दुसरी सर्वात मोठी पार्टी आहे आणि हा दिवस आमच्यासाठी एक ऐतिहासिक दिवस आहे'.
    1
    एकनाथ शिंदे यांनी सहा खासदारांसह राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) मध्ये प्रवेश केला आहे. या महत्त्वपूर्ण घडामोडीवर प्रतिक्रिया व्यक्त करताना शिंदे यांनी म्हटले की, 'शिवसेना महाराष्ट्रातील दुसरी सर्वात मोठी पार्टी आहे आणि हा दिवस आमच्यासाठी एक ऐतिहासिक दिवस आहे'.
    user_Prime news 83
    Prime news 83
    Solapur South, Maharashtra•
    22 hrs ago
  • पिंपरी-चिंचवडमध्ये एका वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याचा पैसे घेतानाचा कथित व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. हा व्हिडिओ आळंदी परिसरातील असल्याचा दावा केला जात आहे. या प्रकरणाची वाहतूक विभागाने गंभीर दखल घेतली असून, व्हायरल झालेल्या व्हिडिओची सत्यता पडताळली जात आहे. वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, चौकशीत संबंधित कर्मचारी दोषी आढळल्यास त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
    1
    पिंपरी-चिंचवडमध्ये एका वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याचा पैसे घेतानाचा कथित व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. हा व्हिडिओ आळंदी परिसरातील असल्याचा दावा केला जात आहे. या प्रकरणाची वाहतूक विभागाने गंभीर दखल घेतली असून, व्हायरल झालेल्या व्हिडिओची सत्यता पडताळली जात आहे. वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, चौकशीत संबंधित कर्मचारी दोषी आढळल्यास त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
    user_Thenayak
    Thenayak
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • भोरचा सुपुत्र कु. श्लोक पराग भेलके याने राष्ट्रीय स्तरावरील १२ व्या नॅशनल रँकिंग ओपन नॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत घवघवीत यश मिळवले आहे. रांची (झारखंड) येथे १७ ते २० जून २०२६ दरम्यान झालेल्या या स्पर्धेत श्लोकने दोन सुवर्ण आणि एक रौप्यपदक पटकावून आपल्या भोर शहराचा गौरव वाढवला. भोर येथे जन्मलेला आणि वाढलेला तसेच पुणे येथील चॅम्पियन्स स्केटिंग क्लबमध्ये प्रशिक्षण घेत असलेल्या श्लोकने अंडर ८ ते १० वर्षे वयोगटात उत्कृष्ट कामगिरी करत ५०० मीटर रेसमध्ये सुवर्णपदक, २०० मीटर रिंक रेसमध्ये सुवर्णपदक आणि ३०० मीटर रोड रेसमध्ये रौप्यपदक जिंकले. विशेष म्हणजे, सलग दुसऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत त्याने पदकांची कमाई केली असून, यापूर्वी चेन्नई येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेतही त्याने पदक जिंकून महाराष्ट्राचा मान उंचावला होता. श्लोकच्या या अपूर्व यशाबद्दल त्याचे आई-वडील, प्रशिक्षक, चॅम्पियन्स स्केटिंग क्लबचे सदस्य, भोरकर नागरिक आणि सर्व हितचिंतकांकडून त्याचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले आहे. त्याच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देताना, राष्ट्रीय स्तरावरील ही सुवर्ण झेप भविष्यात भारताचा तिरंगा जागतिक स्तरावर फडकवो, अशी सदिच्छा व्यक्त करण्यात आली आहे.
    1
    भोरचा सुपुत्र कु. श्लोक पराग भेलके याने राष्ट्रीय स्तरावरील १२ व्या नॅशनल रँकिंग ओपन नॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत घवघवीत यश मिळवले आहे. रांची (झारखंड) येथे १७ ते २० जून २०२६ दरम्यान झालेल्या या स्पर्धेत श्लोकने दोन सुवर्ण आणि एक रौप्यपदक पटकावून आपल्या भोर शहराचा गौरव वाढवला.

भोर येथे जन्मलेला आणि वाढलेला तसेच पुणे येथील चॅम्पियन्स स्केटिंग क्लबमध्ये प्रशिक्षण घेत असलेल्या श्लोकने अंडर ८ ते १० वर्षे वयोगटात उत्कृष्ट कामगिरी करत ५०० मीटर रेसमध्ये सुवर्णपदक, २०० मीटर रिंक रेसमध्ये सुवर्णपदक आणि ३०० मीटर रोड रेसमध्ये रौप्यपदक जिंकले. विशेष म्हणजे, सलग दुसऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत त्याने पदकांची कमाई केली असून, यापूर्वी चेन्नई येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेतही त्याने पदक जिंकून महाराष्ट्राचा मान उंचावला होता.

श्लोकच्या या अपूर्व यशाबद्दल त्याचे आई-वडील, प्रशिक्षक, चॅम्पियन्स स्केटिंग क्लबचे सदस्य, भोरकर नागरिक आणि सर्व हितचिंतकांकडून त्याचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले आहे. त्याच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देताना, राष्ट्रीय स्तरावरील ही सुवर्ण झेप भविष्यात भारताचा तिरंगा जागतिक स्तरावर फडकवो, अशी सदिच्छा व्यक्त करण्यात आली आहे.
    user_पत्रकार विक्रम शिंदे
    पत्रकार विक्रम शिंदे
    Reporter भोर, पुणे, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • पुण्यातील बिबवेवाडी येथे अनिकेत सोसायटीजवळ PMPML बसचा एक्सल तुटून त्याचे चाक बाहेर आल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे PMPML प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर संतप्त प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, प्रशासनाकडून बसकडे लक्ष दिले जात नसल्याचा स्पष्ट आरोप करण्यात आला आहे. प्रवाशांना चांगली सुविधा आणि योग्य सेवा का मिळत नाही, तसेच त्यांच्या जीवाशी खेळ का केला जात आहे, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. जर या प्रकारामुळे प्रवाशांना काही दुखापत झाली, तर त्याची जबाबदारी कोण घेणार, असा थेट सवालही विचारण्यात आला आहे.
    1
    पुण्यातील बिबवेवाडी येथे अनिकेत सोसायटीजवळ PMPML बसचा एक्सल तुटून त्याचे चाक बाहेर आल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे PMPML प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर संतप्त प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, प्रशासनाकडून बसकडे लक्ष दिले जात नसल्याचा स्पष्ट आरोप करण्यात आला आहे. प्रवाशांना चांगली सुविधा आणि योग्य सेवा का मिळत नाही, तसेच त्यांच्या जीवाशी खेळ का केला जात आहे, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. जर या प्रकारामुळे प्रवाशांना काही दुखापत झाली, तर त्याची जबाबदारी कोण घेणार, असा थेट सवालही विचारण्यात आला आहे.
    user_Vibhav Salkar
    Vibhav Salkar
    City Star पुरंदर, पुणे, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • कराड शहराच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेला कोल्हापूर नाका उड्डाणपूल हा नागरिकांसाठी दिलासादायक प्रकल्प ठरणार आहे. या उड्डाणपुलामुळे वाहतूक कोंडी कमी होण्यास, वेळेची बचत होण्यास आणि शहराच्या प्रगतीला नवी दिशा मिळण्यास मदत होणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. महालक्ष्मी आधार फाउंडेशनच्या संस्थापिका सौ. प्रतिभा सुनील शेलार यांनी या महत्त्वपूर्ण कामासाठी सातत्याने पाठपुरावा करून योगदान देणारे सिक्कीमचे माजी राज्यपाल मा. श्रीनिवास पाटील यांचे प्रत्यक्ष दूरध्वनीद्वारे संपर्क साधून मनःपूर्वक आभार व्यक्त केले आहेत. कराड शहराच्या विकासासाठी श्रीनिवास पाटील यांनी दिलेले योगदान आणि त्यांची दूरदृष्टी नागरिकांसाठी प्रेरणादायी असल्याचे शेलार यांनी म्हटले आहे.
    1
    कराड शहराच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेला कोल्हापूर नाका उड्डाणपूल हा नागरिकांसाठी दिलासादायक प्रकल्प ठरणार आहे. या उड्डाणपुलामुळे वाहतूक कोंडी कमी होण्यास, वेळेची बचत होण्यास आणि शहराच्या प्रगतीला नवी दिशा मिळण्यास मदत होणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

महालक्ष्मी आधार फाउंडेशनच्या संस्थापिका सौ. प्रतिभा सुनील शेलार यांनी या महत्त्वपूर्ण कामासाठी सातत्याने पाठपुरावा करून योगदान देणारे सिक्कीमचे माजी राज्यपाल मा. श्रीनिवास पाटील यांचे प्रत्यक्ष दूरध्वनीद्वारे संपर्क साधून मनःपूर्वक आभार व्यक्त केले आहेत. कराड शहराच्या विकासासाठी श्रीनिवास पाटील यांनी दिलेले योगदान आणि त्यांची दूरदृष्टी नागरिकांसाठी प्रेरणादायी असल्याचे शेलार यांनी म्हटले आहे.
    user_Mahalaxmi News 24 Satara
    Mahalaxmi News 24 Satara
    Accountant सातारा, सातारा, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • बारामती विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत श्रीमती सुनेत्रा अजितदादा पवार यांनी देशातील सर्व विक्रम मोडीत काढत एक ऐतिहासिक विजय संपादन केला. या अभूतपूर्व जनादेशानंतर महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी त्यांनी विधानसभा अध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली आमदार पदाची शपथ घेतली. यावेळी सभागृहात उपस्थित आमदारांनी मोठ्या उत्साहात “एकच वादा... वहिनी आणि दादा!” अशा घोषणा देत त्यांचे जोरदार स्वागत केले. या घोषणांनी सभागृहातील वातावरण उत्साहपूर्ण आणि जल्लोषमय झाले होते. बारामतीकरांनी दिलेल्या विक्रमी पाठिंब्यामुळे सुनेत्रा पवार यांच्यावर मोठी जबाबदारी आली असून, मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी त्या कटिबद्ध असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. कार्यकर्ते आणि समर्थकांनी विश्वास व्यक्त केला की, सुनेत्रा पवार यांच्या या शपथविधीमुळे बारामतीच्या जनतेच्या प्रतिनिधित्वाला एक नवी दिशा मिळेल, तसेच राज्याच्या विकासातही त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
    1
    बारामती विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत श्रीमती सुनेत्रा अजितदादा पवार यांनी देशातील सर्व विक्रम मोडीत काढत एक ऐतिहासिक विजय संपादन केला. या अभूतपूर्व जनादेशानंतर महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी त्यांनी विधानसभा अध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली आमदार पदाची शपथ घेतली.

यावेळी सभागृहात उपस्थित आमदारांनी मोठ्या उत्साहात “एकच वादा... वहिनी आणि दादा!” अशा घोषणा देत त्यांचे जोरदार स्वागत केले. या घोषणांनी सभागृहातील वातावरण उत्साहपूर्ण आणि जल्लोषमय झाले होते. बारामतीकरांनी दिलेल्या विक्रमी पाठिंब्यामुळे सुनेत्रा पवार यांच्यावर मोठी जबाबदारी आली असून, मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी त्या कटिबद्ध असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

कार्यकर्ते आणि समर्थकांनी विश्वास व्यक्त केला की, सुनेत्रा पवार यांच्या या शपथविधीमुळे बारामतीच्या जनतेच्या प्रतिनिधित्वाला एक नवी दिशा मिळेल, तसेच राज्याच्या विकासातही त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
    user_Mansoor Shaikh
    Mansoor Shaikh
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    22 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.