फटाक्यांसोबत तरुणाची धोकादायक स्टंटबाजी, व्हिडिओ व्हायरल वाघोलीत फटाक्यांसोबत तरुणाची धोकादायक स्टंटबाजी, व्हिडिओ व्हायरल पुण्याच्या वाघोली परिसरातील बकोरी फाटा येथे एका दुकानाच्या उद्घाटन प्रसंगी एका तरुणाने भर रस्त्यात फटाक्यांची माळ हातात फिरवत ती रस्त्यावर फेकल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकारामुळे काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.वाघोली हा नेहमीच वाहतुकीने गजबजलेला भाग असून अशा प्रकारची जीवघेणी स्टंटबाजी केल्याने नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.फटाक्यांची माळ रस्त्यात फेकल्याने वाहनचालक व पादचारी यांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला होता. या घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर होत असून संबंधित तरुणाविरोधात कारवाई करण्याची मागणी होत आहे. या प्रकरणी वाघोली पोलीस काय कारवाई करतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे..
फटाक्यांसोबत तरुणाची धोकादायक स्टंटबाजी, व्हिडिओ व्हायरल वाघोलीत फटाक्यांसोबत तरुणाची धोकादायक स्टंटबाजी, व्हिडिओ व्हायरल पुण्याच्या वाघोली परिसरातील बकोरी फाटा येथे एका दुकानाच्या उद्घाटन प्रसंगी एका तरुणाने भर रस्त्यात फटाक्यांची माळ हातात फिरवत ती रस्त्यावर फेकल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकारामुळे काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.वाघोली हा नेहमीच वाहतुकीने गजबजलेला भाग असून अशा प्रकारची जीवघेणी स्टंटबाजी केल्याने नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.फटाक्यांची माळ रस्त्यात फेकल्याने वाहनचालक व पादचारी यांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला होता. या घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर होत असून संबंधित तरुणाविरोधात कारवाई करण्याची मागणी होत आहे. या प्रकरणी वाघोली पोलीस काय कारवाई करतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे..
- एसटीच्या ढिसाळ नियोजनामुळे शालेय सहली धोक्यात | विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ? जिल्ह्यातील शालेय सहली आता धोक्यात आल्या आहेत! विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. एसटी महामंडळाच्या ढिसाळ नियोजनामुळे दोन गंभीर घटना समोर आल्या आहेत… आणि आता अनेक शाळांनी सहलींना ब्रेक लावण्याचा निर्णय घेतला आहे. नेमकं काय घडलं? पाहूया सविस्तर… अहिल्यानगर तालुक्यातील जेऊर येथील संतुकनाथ इंग्लिश विद्यालयाची कोकण दर्शन सहल आयोजित करण्यात आली होती. या सहलीसाठी तारकपूर आगाराकडून पाच बसेस देण्यात आल्या. मात्र प्रवास सुरू झाल्यानंतर काही अंतरावरच एका बसचा बिघाड झाला. शिरूरजवळ बस अचानक बंद पडली… विद्यार्थ्यांचा ताफा रस्त्यात अडकला. शिरूर आगारातून सीएनजी बस मागविण्यात आली,पण ती घाट मार्गासाठी सक्षम नव्हती! तळेगाव दाभाडे येथे पुन्हा बस बदलावी लागली आणि पालीजवळ बसच्या चाकातून धूर निघू लागल्याने आणखी गोंधळ उडाला. विद्यार्थिनींना दाटीवाटीत बसवण्यात आलं… शेवटी श्रीवर्धन आगारातून नवीन बस मागवून सहल कसाबसा पूर्ण करण्यात आली. या सगळ्या प्रकारात विद्यार्थ्यांना शारीरिक थकवा, मानसिक ताण आणि भीतीचा सामना करावा लागला. या घटनेनंतर काही दिवसांतच नेवासा तालुक्यातील पिंपरी शहाली येथील जिल्हा परिषद शाळेच्या बसला अपघात झाला. प्राथमिक तपासात समोर आलं की, चालकाला सलग अतिरिक्त ड्युटी देण्यात आली होती.थकलेल्या अवस्थेतच त्याला प्रवासासाठी पाठवण्यात आलं. परिणामी चालकाचा ताबा सुटून अपघात झाला. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली… मात्र अनेक विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापती झाल्या. या घटनेमुळे पालकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. शिक्षक संघटनांचा आरोप आहे की – बसची फिटनेस तपासणी होत नाही चालकांची वैद्यकीय तपासणी होत नाही विश्रांती वेळ दिली जात नाही आणि प्रवासासाठी योग्य बस निवडली जात नाही “उत्पन्न वाढवण्यासाठी जुन्या आणि बिघडलेल्या बसेस सहलींसाठी दिल्या जात आहेत”अशी संतप्त प्रतिक्रिया शिक्षक आणि पालकांनी दिली आहे. या घटनांनंतर अनेक शाळांनी सहली रद्द केल्या आहेत.काहींनी पुढील आदेश येईपर्यंत सहली स्थगित ठेवल्या आहेत. “जोपर्यंत एसटी प्रशासन सुरक्षिततेबाबत ठोस उपाययोजना करत नाही, तोपर्यंत सहली काढायच्या नाहीत,” अशी भूमिका मुख्याध्यापकांनी घेतली आहे. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या अनुभवाधारित शिक्षणावरही होणार आहे. काही शाळा खासगी स्कूलबस किंवा ट्रॅव्हल्सचा पर्याय तपासत आहेत. पण अपघात झाल्यास जबाबदारी कोण घेणार? “स्कूलबसने सहल काढली आणि अपघात झाला तर जबाबदार कोण?” असा थेट सवाल पालकांकडून उपस्थित केला जात आहे. शालेय शिक्षण विभागाकडून स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे नसल्याने शाळाही संभ्रमात आहेत. आता एसटी प्रशासनाला शाळांना भेटी देऊन विश्वास निर्माण करावा लागणार आहे. बसची स्थिती, चालकांची पात्रता, आपत्कालीन व्यवस्था, सुरक्षिततेची हमी हे सर्व स्पष्ट करावं लागेल. जिल्हा प्रशासनाने सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी आणि शालेय सहलींसाठी स्वतंत्र, सुरक्षित आणि आधुनिक बसेस उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी जोर धरत आहे. विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाही. एसटी प्रशासनाने विश्वासार्हता सिद्ध केली तरच शालेय सहली पुन्हा सुरू होतील. या प्रकरणाबाबत तुमचं मत काय आहे? कॉमेंट करून नक्की सांगा.1
- अहिल्यानगरात ‘हिंद-दी-चादर’ जनजागृतीची सुरुवात ! श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागमानिमित्त विशेष चित्ररथाचे लोकार्पण या चित्ररथाद्वारे जिल्हाभर त्यांच्या शौर्य-त्याग, धर्मरक्षण आणि मानवतेच्या संदेशाचा प्रसार होणार. 📍भव्य समागम : २८ फेब्रुवारी व १ मार्च २०२६ – खारघर, नवी मुंबई 👉 सर्व भाविकांनी उपस्थित राहण्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांचे आवाहन #HindDiChadar #GuruTeghBahadurJi #शौर्यआणित्याग #धर्मरक्षण #SikhHistory #Ahilyanagar #NaviMumbai #Samagam2026 #InspirationalHistory #MaharashtraEvents #ReligiousHarmony #WaheguruJi #MarathiReels #ViralReels #TrendingNow1
- Post by Shrinivas mane3
- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नव्या इमारतीच्या संदर्भात पिंपरी चिंचवड शहराचे विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी या इमारतीच्या कामाच्या पाहणी केली1
- Post by NEWS 24 MAHARASHTRA1
- Post by Raju Bawdiwale1
- अजित दादांच्या आठवणीत दिलीप वळसे पाटील भावूक1
- महापुरुषांची बदनामी करणाऱ्या हर्षवर्धन सपकाळ यांचा तीव्र निषेध छत्रपती शिवाजी महाराज चौकात प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन; सकल हिंदू समाजाचे आंदोलन अहिल्यानगर ः महापुरुषांविषयी आक्षेपार्ह आणि बदनामीकारक वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा सकल हिंदू समाजाच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकल हिंदू समाजातर्फे आंदोलन करून सपकाळ यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. या आंदोलनात शहरासह परिसरातील सकल हिंदू समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. माळीवाडा बसस्थानकाजवळील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसरात हे आंदोलन पार पडले. यावेळी कार्यकर्त्यांनी सपकाळ यांच्या निषेधार्थ जोरदार घोषणा देत वातावरण दणाणून सोडले. “छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान खपवून घेतला जाणार नाही”, “महापुरुषांविरोधातील वक्तव्ये तत्काळ मागे घ्या”, अशा घोषणा देत आंदोलकांनी आपला संताप व्यक्त केला. या वेळी आमदार संग्राम जगताप यांनी तीव्र शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले, “हर्षवर्धन सपकाळ यांनी महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना काही धर्मांध लोकांशी, विशेषतः टिपूसोबत करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार अत्यंत निंदनीय असून, संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावणारा आहे. याच निषेधार्थ राज्यभरात तालुकास्तरावर सपकाळ यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून अहिल्यानगर शहरातही हे आंदोलन करण्यात आले.” जगताप पुढे म्हणाले, “महाराष्ट्रात काही लोक जाणीवपूर्वक समाजात तेढ निर्माण करणारे विचार पेरण्याचा प्रयत्न करीत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारख्या महापुरुषांविषयी वादग्रस्त विधाने करून समाजात संभ्रम निर्माण करणे हा गंभीर प्रकार आहे. टिपू सुलतानचा इतिहास पाहिला, तर त्याने भारतात मोठ्या प्रमाणावर धर्मांतर घडवून आणले, षडयंत्र रचली आणि अत्याचार केले. अशा व्यक्तीशी छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना करणे म्हणजे महाराष्ट्राच्या अस्मितेवर घाला घालण्यासारखे आहे,” असेही त्यांनी ठामपणे सांगितले. आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आंदोलकांनी शांततेत आपला निषेध नोंदवला. मात्र, सपकाळ यांनी आपल्या वक्तव्याबाबत जाहीर माफी मागावी आणि भविष्यात अशा प्रकारची विधाने करू नयेत, अशी मागणी सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात आली. दरम्यान, या प्रकरणाचे पडसाद राज्यभर उमटत असून, अनेक ठिकाणी निषेध आंदोलन होत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी कोणतेही आक्षेपार्ह वक्तव्य सहन केले जाणार नाही, असा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला.1
- Post by NEWS 24 MAHARASHTRA1