logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

डीजेमुळे बँड पार्टी कलावंतांवर उपासमारीची वेळ; बँड उरले केवळ अंत्यसंस्कारात वाजविण्यापुरते बदनापूर जिल्हा जालना भोकरदन तालुक्यासह इतर जिल्ह्यातील सुद्धा लग्नसमारंभ, मिरवणुका आणि विविध उत्सवांमध्ये एकेकाळी बँडच्या सुरांनी रंग भरला जायचा. मात्र गेल्या काही वर्षात डीजे संस्कृतीचा शिरकाव झाल्याने पारंपरिक बँड कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे. कमी वेळात मोठा कर्णकर्कश आवाज, ह्रदय विकाराचे झटके येवून सुद्धा आधुनिक गाणी आणि कमी खर्चामुळे अनेकजण बँडऐवजी डीजेला पसंती देत आहेत. पूर्वी लग्नसराईच्या हंगामात बँड पार्टीला महिनाभर आधीपासून बुकिंग मिळायचे. आता बहुतेक ठिकाणी मोठ्या आवाजाचा डीजे असतो. त्यामुळे अनेक बँडवाले आज फक्त अंत्ययात्रा किंवा मरणाच्या प्रसंगीच काम मिळत असल्याची खंत व्यक्त करतात. ही केवळ रोजगाराची बाब नाही. तर एक जुनी परंपरा, एक सांस्कृतिक आवाज हळूहळू हरवत चालला आहे. गेल्या काही वर्षात डीजे ट्रेंडींगवर आहे. त्यामुळे बँड पार्टीचा आवाज हरवत चालला आहे. पूर्वी लग्नसमारंभ म्हटला की, ब्रास बँडचा दणदणीत ताफा, एकसारखी वेशभूषा आणि सनईच्या सुरावटींनी वातावरण भारून टाकलेले असायचे. भोकरदन शहर आणि परिसरातील गावांमध्ये ३० ते ४० जणांचे बँड पार्टी लग्नात हमखास दिसायचे. तसेच ग्रामीण भागात स्थानिक पातळीवर १० ते १५ जण एकत्र येऊन सनई आणि संबळ वाजवून पारंपरिक पद्धतीने लग्न सोहळ्याला रंगत आणायचे. मात्र सध्या या सर्व परंपरांना डीजेने मागे टाकले आहे. मोठ्या आवाजातील गाणी, आकर्षक लाईट्स आणि त्यावर नृत्य यामुळे नव्या पिढीचा कल डीजेकडे वाढत चालला आहे. आता अनेक बँड मालकांना आठवड्यातून एक-दोन कार्यक्रम मिळणेही कठीण झाले आहे. त्यामुळे बँडमध्ये काम करणारे वादक, ढोल-ताशा वाजवणारे, ट्रम्पेट आणि सॅक्सोफोन वाजविणारे कलाकार आर्थिक संकटात सापडले आहेत. अगोदर कोरोनामुळे आम्ही रस्त्यावर आलो. त्या धक्क्यातून कसेबसे सावरलो तर आता डीजेमुळे आम्हाला काम मिळणे कठीण झाले आहे. परिणामी, आमच्यावर आर्थिक संकट ओढवले आहे. येणाऱ्या काळात आम्ही फक्त अंत्ययात्रा किंवा मरणाच्या प्रसंगापुरतेच मर्यादित असणार असे चित्र दिसत आहे. - : सुभाष खरात, बँड पार्टी मास्टर कलावंत वालसावंगी आमच्या कलेला आता मागणी उरलेली नाही. डीजेमुळे लोकांना मोठा आवाज आणि नाच हाच आकर्षणाचा भाग वाटतो; पण पारंपरिक बँडचा मान कमी झाला आहे. असे बँड पथकातील कलावंत सांगतात. काहींनी मजुरी किंवा इतर कामे स्वीकारली आहे. बँड व्यवसायाशी संबंधित दुकानांवरही याचा परिणाम झाला आहे. वाद्यांची दुरुस्ती, गणवेश, सजावटीचे साहित्य यांची मागणी घटली आहे. - : नामू सुरडकर, आजुबाई बँड पार्टी संचालक आन्वा

1 hr ago
user_सय्यद नजाकत
सय्यद नजाकत
बदनापूर, जालना, महाराष्ट्र•

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • जालना जिल्ह्यातील मामादेवी मस्तागडावर जागेच्या वादातून एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. तक्रारदाराची जागा इतरांना विकल्याच्या कारणावरून हा वाद पेटला होता. या प्रकरणी कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
    1
    जालना जिल्ह्यातील मामादेवी मस्तागडावर जागेच्या वादातून एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. तक्रारदाराची जागा इतरांना विकल्याच्या कारणावरून हा वाद पेटला होता. या प्रकरणी कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
    user_YUVA JALNA NEWS
    YUVA JALNA NEWS
    जालना, जालना, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • १२६२ किलो कांदा विकूनही शेतकऱ्याच्या हातात कवडी नाही; उलट अडत्यालाच द्यावा लागला १ रुपया छत्रपती संभाजीनगर पैठण: लाखो रुपये खर्च करून, उसनेवारी आणि कर्ज काढून पिकवलेल्या कांद्याला बाजारात कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी पूर्णपणे हतबल झाला आहे. पैठण तालुक्यातील वरुडी गावातील कांदा उत्पादक शेतकरी प्रकाश गलधर यांनी तब्बल तीन महिने मेहनत घेऊन तयार केलेला १२६२ किलो कांदा बाजारात विक्रीसाठी नेला. मात्र बाजारात कांद्याला मिळालेल्या अत्यल्प दरामुळे हमाली, तोलाई आणि गोणी खर्च वजा जाता त्यांच्या हातात एकही रुपया उरला नाही. उलट अडत्याला १ रुपया द्यावा लागल्याची धक्कादायक परिस्थिती समोर आली आहे. कांदा उत्पादनासाठी शेतकऱ्यांनी सातबारावर कर्ज काढले, तर काहींनी उसनेवारी करून पैसे उभे केले होते. मात्र बाजारातील पडलेल्या दरामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. सरकारी अधिकारी पंचनामे करून फोटो काढून गेले, पण प्रत्यक्ष मदत कधी मिळणार याकडे शेतकऱ्यांचे डोळे लागले आहेत. कांद्याला हमीभाव द्यावा आणि शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
    1
    १२६२ किलो कांदा विकूनही शेतकऱ्याच्या हातात कवडी नाही; उलट अडत्यालाच द्यावा लागला १ रुपया

छत्रपती संभाजीनगर पैठण:
लाखो रुपये खर्च करून, उसनेवारी आणि कर्ज काढून पिकवलेल्या कांद्याला बाजारात कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी पूर्णपणे हतबल झाला आहे. पैठण तालुक्यातील वरुडी गावातील कांदा उत्पादक शेतकरी प्रकाश गलधर यांनी तब्बल तीन महिने मेहनत घेऊन तयार केलेला १२६२ किलो कांदा बाजारात विक्रीसाठी नेला. मात्र बाजारात कांद्याला मिळालेल्या अत्यल्प दरामुळे हमाली, तोलाई आणि गोणी खर्च वजा जाता त्यांच्या हातात एकही रुपया उरला नाही. उलट अडत्याला १ रुपया द्यावा लागल्याची धक्कादायक परिस्थिती समोर आली आहे.
कांदा उत्पादनासाठी
शेतकऱ्यांनी सातबारावर कर्ज काढले, तर काहींनी उसनेवारी करून पैसे उभे केले होते. मात्र बाजारातील पडलेल्या दरामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. सरकारी अधिकारी पंचनामे करून फोटो काढून गेले, पण प्रत्यक्ष मदत कधी मिळणार याकडे शेतकऱ्यांचे डोळे लागले आहेत. कांद्याला हमीभाव द्यावा आणि शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
    user_AMJ NEWS
    AMJ NEWS
    औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण ('अ ब क ड') च्या मागणीसाठी मातंग समाजाने छत्रपती संभाजीनगर येथे भव्य मोर्चा काढला. हजारो समाजबांधव रस्त्यावर उतरले होते, त्यांनी आपल्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवल्या.
    1
    महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण ('अ ब क ड') च्या मागणीसाठी मातंग समाजाने छत्रपती संभाजीनगर येथे भव्य मोर्चा काढला. हजारो समाजबांधव रस्त्यावर उतरले होते, त्यांनी आपल्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवल्या.
    user_One day news
    One day news
    News Anchor औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • डिझेलसाठी जीव धोक्यात; टँकर पलटल्यानंतर नागरिकांची कॅन-बाटल्या घेऊन एकच झुंबड डिझेलसाठी जीव धोक्यात; टँकर पलटल्यानंतर नागरिकांची कॅन-बाटल्या घेऊन एकच झुंबड बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात कल्याण ते विशाखापट्टणम महामार्गावरील तालखेड फाटा परिसरात डिझेल वाहतूक करणारा टँकर पलटल्याची घटना घडली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र टँकरमधून डिझेल गळती सुरू होताच परिसरातील नागरिकांनी जीवाची पर्वा न करता डिझेल मिळवण्यासाठी घटनास्थळी धाव घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
    1
    डिझेलसाठी जीव धोक्यात; टँकर पलटल्यानंतर नागरिकांची कॅन-बाटल्या घेऊन एकच झुंबड
डिझेलसाठी जीव धोक्यात; टँकर पलटल्यानंतर नागरिकांची कॅन-बाटल्या घेऊन एकच झुंबड
बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात कल्याण ते विशाखापट्टणम महामार्गावरील तालखेड फाटा परिसरात डिझेल वाहतूक करणारा टँकर पलटल्याची घटना घडली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र टँकरमधून डिझेल गळती सुरू होताच परिसरातील नागरिकांनी जीवाची पर्वा न करता डिझेल मिळवण्यासाठी घटनास्थळी धाव घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
    user_पत्रकार ओमप्रकाश उढाण
    पत्रकार ओमप्रकाश उढाण
    घनसावंगी, जालना, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • जय लक्ष्मी कंपनीने सिल्लोडच्या राजनगाव येथील म्हारोळा रोडवरील महार हडूळे अवैधपणे खोदून मुरुमाची वाहतूक सुरू केली आहे. हा प्रकार दिवसाढवळ्या सुरू असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
    1
    जय लक्ष्मी कंपनीने सिल्लोडच्या राजनगाव येथील म्हारोळा रोडवरील महार हडूळे अवैधपणे खोदून मुरुमाची वाहतूक सुरू केली आहे. हा प्रकार दिवसाढवळ्या सुरू असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
    user_अरबाज शेख. शुरु रिपोर्टर
    अरबाज शेख. शुरु रिपोर्टर
    Voice of people Sillod•
    6 hrs ago
  • छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात विहिरीची मोटर दुरुस्त करताना वडील आणि त्यांच्या दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. धानोरा येथे घडलेल्या या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त होत आहे.
    1
    छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात विहिरीची मोटर दुरुस्त करताना वडील आणि त्यांच्या दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. धानोरा येथे घडलेल्या या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त होत आहे.
    user_Sham Thakur
    Sham Thakur
    सिल्लोड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • जालना येथे अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी काळी शाई आणि ऑइल फेकले. या घटनेमुळे छत्रपती संभाजीनगर चौफुली परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मनसे कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत हा निषेध नोंदवला.
    1
    जालना येथे अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी काळी शाई आणि ऑइल फेकले. या घटनेमुळे छत्रपती संभाजीनगर चौफुली परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मनसे कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत हा निषेध नोंदवला.
    user_Bharat 24Taas News
    Bharat 24Taas News
    TV News Anchor Bhokardan, Jalna•
    23 hrs ago
  • ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर जालन्यात मनसैनिकांनी शाई आणि ऑइल फेकले. मनसे कार्यकर्ते त्यांच्या विरोधात चांगलेच आक्रमक झाल्याचे या घटनेतून समोर आले.
    1
    ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर जालन्यात मनसैनिकांनी शाई आणि ऑइल फेकले. मनसे कार्यकर्ते त्यांच्या विरोधात चांगलेच आक्रमक झाल्याचे या घटनेतून समोर आले.
    user_YUVA JALNA NEWS
    YUVA JALNA NEWS
    जालना, जालना, महाराष्ट्र•
    19 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.