शिवाजीराव कोंडमगिरे (रेड्डी) यांची राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी नियुक्ती शिवाजीराव कोंडमगिरे (रेड्डी) यांची राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी नियुक्ती उदगीर(एल पी उगीले)अमॅच्युअर कबड्डी फाउंडेशन ऑफ इंडिया,अमॅच्युअर कबड्डी फाउंडेशन ऑफ महाराष्ट्र व अमॅच्युअर कबड्डी असोशियन ऑफ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 35 व्या सब ज्युनिअर राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी तांत्रिक अधिकारी म्हणून लातूरचे सुपुत्र शिवाजीराव बापूराव कोंडमगिरे( रेड्डी) यांची महत्त्वपूर्ण नियुक्ती करण्यात आली आहे .येत्या दोन ते चार एप्रिल 2026 या कालावधीत पुणे जिल्ह्यातील आळंदी येथील संत ज्ञानेश्वर विद्यालय व ज्युनिअर कॉलेजच्या प्रांगणात या राष्ट्रीय स्पर्धेचा थरार राहणार आहे. या मोठ्या क्रीडा महोत्सवाचे नियोजन अत्यंत चौख असावी यासाठी देशभरातील अनुभवी पंचांची आणि तांत्रिक अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये तांत्रिक अधिकारी म्हणून शिवाजीराव कोंडमगिरे यांच्या नावावर शिक्का मोर्तब झाले आहे. बहुआयामी व्यक्तिमत्व:- शिवाजीराव कोंडमगिरे हे स्वतः एक राष्ट्रीय स्तरावरील कबड्डी खेळाडू असून ते राज्यस्तरीय कबड्डी पंच म्हणूनही ओळखले जातात. सध्याचे राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी लातूर विभागात सहाय्यक पदावर कार्यरत आहेत .तसेच एसटी -कष्टकरी जनसंघ लातूरचे विभागीय सचिव म्हणूनही ते कामगारांच्या प्रश्नासाठी सक्रिय असतात. एसटी महामंडळ व क्रीडा वर्तुळातून कौतुक त्यांच्या या निवडीमुळे लातूर जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे .त्यांच्या या यशाबद्दल एसटी महामंडळातील वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी वर्ग, एसटी कष्टकरी जनसंघाचे पदाधिकारी आणि क्रीडा क्षेत्रातील मान्यवराकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे .35 व्या राष्ट्रीय सब ज्युनिअर कबड्डी स्पर्धेत तांत्रिक जबाबदारी सांभाळताना त्यांच्या अनुभवाचा मोठा फायदा खेळाडूंना आणि संयोजकांना होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. त्यांच्या या निवडीबदल सर्व क्रिडा शिक्षकाकडून कौतुक केले जात आहे.

- माजी मंत्री आ. अमित देशमुख अवमान प्रकरणी उदगीरात निषेध.... उदगीर (प्रतिनिधी) लातूर येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळ्याजवळ आरक्षण वर्गीकरण संदर्भात आंदोलन झाले. आंदोलन करणे हा संविधानिक अधिकार आहे. पण सदरील आंदोलन भरकटले गेले असा आरोप मानवाधिकार संरक्षण समितीच्या वतीने राज्य समन्वयक नितीन एकुर्केकर यांच्या वतीने करण्यात आला. विषय आरक्षण वर्गीकरणाचा होता पण त्यात माजी मंत्री आ. अमित देशमुख यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये समाजाला प्रतिनिधित्व दिले नाही म्हणून त्यांच्या प्रतिमेला जोडे मारून विटंबना करण्यात आली , अर्वाच्य भाषा वापरण्यात आली. अपमानजनक भाषा वापरण्यात आली. पाय बांधण्यात येतील असेही यावेळी आंदोलनकर्ते म्हणाले. आरक्षण वर्गीकरण संदर्भात आंदोलन असताना दुसराच विषय मध्ये विनाकारण घुसवून लातूरचे माजी मंत्री आ. अमित देशमुख यांची बदनामी करण्यात आली. माजी मंत्री आ. यांचा कोणत्याही प्रकारचा संबंध नसताना वैयक्तिक आकासापोटी बदनामी करण्याच्या हेतूने सदरील प्रकार घडवून आणल्याची टीका यावेळी पॅंथर नेते गौतम दादा सोमवंशी यांनी केली . सदरील प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून माजी मंत्री आ. अमित देशमुख यांच्या बद्दल अपमान जनक वक्तव्य करणाऱ्या आंदोलकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात यावेत, याबाबतचे निवेदन उपजिल्हाधिकारी उदगीर व पोलीस निरीक्षक उदगीर शहर यांना देण्यात आले. सदरील असंविधानिक भाषा वापरणाऱ्यांनी तात्काळ दिलगिरी व्यक्त करावी. पोलीस प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी, अन्यथा जशास तसे उत्तर मिळेल आणि आंदोलन तीव्र करण्यात येईल असा इशारा यावेळी निवेदनाद्वारे देण्यात आला. यावेळी मानवाधिकार संरक्षण समितीचे राज्य समन्वयक नितीन एकुर्केकर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवक जिल्हाध्यक्ष सुशील कुमार शिंदे, भारतीय दलित पॅंथरचे युवक प्रदेशाध्यक्ष गौतम दादा सोमवंशी, राहुल चौधरी, राम काळे, श्रीआनंद उपाध्ये, आकाश दयानंद माने, कृष्णा मोगले,अक्षय सावंत इत्यादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.3
- लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यात धक्कादायक घटना व नात्याला काळीबा पासणारे घटना घडली आहे सख्या चुलतीनेच सात वर्षीय पुतण्याचा केला गळा आवळून त्याला खून घडलेल्या या धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर सुन्न झाला आहे. सकाळी दोन अल्पवयीन मुले बेपत्ता झाल्यानंतर सुरू झालेल्या शोधमोहीमेत 7 वर्षीय देवांश स्वामी याचा मृतदेह पडक्या घराजवळ आढळून आला. 👉 दुसरा मुलगा साईचरण स्वामी सुखरूप सापडला, ही एक दिलासादायक बाब. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, शेतजमिनीच्या वादातून हा प्रकार घडल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून, या प्रकरणी मृत बालकाची चुलती असलेल्या महिलेला ताब्यात घेण्यात आले आहे. तपासात बेपत्ता नाट्य रचल्याचाही आरोप समोर येत असून, या घटनेमुळे नात्यांवरच प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.1
- हडोळती परिसरातील वीज व्यवस्थेचा बोजवारा; नागरिकांत तीव्र नाराजी हडोळती येथील महावितरण कार्यालयात कार्यरत असलेल्या कनिष्ठ अभियंत्यांनी गेल्या आठ ते नऊ महिन्यांपासून पदाचा कार्यभार स्वीकारला असला, तरी परिसरातील अनेक ग्राहकांना आजही त्यांची ओळख नाही. ते नेमके कधी येतात, कधी जातात याबाबतही नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण असून कार्यालयीन कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. हडोळती उपकेंद्रातून तब्बल २५ गावांना वीजपुरवठा केला जातो. मात्र अनेक ठिकाणी डीपींची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. डीपीवरील वायर तुटलेल्या, किटकॅट जळालेल्या, तसेच वेलींनी वेढलेल्या अवस्थेत असल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. देखभाल व दुरुस्तीसाठी येणारे साहित्य नेमके कुठे वापरले जाते, याबाबतही नागरिकांमध्ये संशय व्यक्त केला जात आहे. अपुर्या देखभालीमुळे दोन दिवसांपूर्वी स्पार्किंग होऊन एका नागरिकाचे घर जळाल्याची घटना घडली होती. त्यानंतर आज रविवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास महादेव मंदिरासमोरील डीपीला अचानक स्पार्किंग होऊन आग लागली. सुदैवाने वेळीच आग नियंत्रणात आणल्याने मोठी दुर्घटना टळली. या सततच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून महावितरण प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन नियमित मेंटेनन्स करावे, जीर्ण डीपी दुरुस्त कराव्यात तसेच वाढत्या भारानुसार नवीन डीपी बसवाव्यात, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.2
- नांदेड : कंधार तालुक्यातील मानार प्रकल्पाच्या कोठा–जगडा मार्गावर असलेल्या अरुंद पुलावरून एक कार खाली कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या अपघातात कारमधील पाच प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कार अरुंद पुलावरून जात असताना चालकाचा ताबा सुटल्याने वाहन थेट पुलाखाली कोसळले. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिक नागरिकांनी तत्काळ धाव घेत बचावकार्य सुरू केले. जखमींना तातडीने बाहेर काढून जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. वेळेवर मदत मिळाल्यामुळे मोठा अनर्थ टळल्याचे सांगितले जात आहे. या घटनेमुळे त्या मार्गावरील पुलाची सुरक्षितता पुन्हा एकदा प्रश्नचिन्हाखाली आली असून, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.1
- ज्या ज्या गावला ब्रेकर आहे त्या त्या गावचे लोकांनी साथ द्यावा ही कळकळीची विनंती कारण की आपल्याला एवढे ब्रेकर मूळ आपले पेशंट नांदेड पर्यंत सुद्धा पोहोचत नाहीत याची काळजी घेणं फार गरजेचं आहे त्यासाठी हा टोल अधिकारी म्हणतोय ज्या गावचे ब्रेकर काढायचा आहे त्या गावचा ठराव मागते ग्रामपंचायतचा त्यासाठी ब्रेकर चा त्रास आहे त्यांनी सहकार्य करावं हे कळकळीची विनंती1
- माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन केल्याने काँग्रेसने चुकीचे गुन्हे दाखल केल्याने “अटक करा किंवा गुन्हा मागे घ्या!” – गांधी चौक पोलीस ठाण्यात मातंग समाजाचा आक्रमक पवित्रा. सुरू ॲप इन मराठी न्यूज लातूर. सोमवार दिनांक 20 एप्रिल 2026. लातूर शहरात आज मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांनी गांधी चौक पोलीस ठाण्यात आक्रमक भूमिका घेत आंदोलन केले. “आम्ही गुन्हा केला असेल तर आम्हाला अटक करा,” अशी ठाम मागणी करत कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात जोरदार घोषणाबाजी केली आहे. लातूर शहरात शनिवार दिनांक 18 एप्रिल 2026 रोजी डॉ. अण्णाभाऊ साठे चौकात माजी मंत्री लातूरचे आमदार अमित देशमुख व आमदार नाना पटोले यांच्या प्रतिमेला जोडे मारून पायाखाली तुडवून मोठे आंदोलन करत आरक्षण उपवर्गीकरणाचा जाहीर निषेध करण्यात आला होता. या प्रकरणी काँग्रेसच्या वतीने गांधी चौक पोलीस ठाण्यात सुमारे बारा कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, रविवार दिनांक 19 एप्रिल 2026 रोजी पोलिसांनी रात्री उशिरा संबंधित कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यावेळी कोणीही हाती लागले नाही. याच्या निषेधार्थ आज सोमवार (दि. 20 एप्रिल 2026) रोजी सकाळी सुमारे 11 वाजता 10 ते 12 मातंग समाजाचे कार्यकर्ते स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाले. डॉ. अण्णाभाऊ साठे सार्वजनिक जयंती समितीचे अध्यक्ष ॲड. सच्छिद्र नाना कांबळे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी “अटक करा किंवा गुन्हा मागे घ्या” अशी मागणी करत दुपारी तीन वाजेपर्यंत आक्रमक भूमिका घेतली. परिस्थिती तणावपूर्ण होत असताना गांधी चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील रेजितवाड यांनी कार्यकर्त्यांची समजूत काढली. चर्चेनंतर कार्यकर्त्यांनी अखेर माघार घेतली आणि वातावरण निवळले.1
- सहाय्यक निबंध दुधाटे यांचे तात्काळ निलंबन करा पत्रकार परिषदेत मागणी.1
- Post by Laxman Ugile1