भोंदू अशोक खरात याच्या प्रतीकात्मक पुतळ्यास फाशी देऊन केले दहन! राज्यात वाढत चाललेल्या अंधश्रद्धा, तंत्र-मंत्र आणि बुवाबाजीच्या नावाखाली होत असलेल्या शोषणाविरोधात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या (माकप) वतीने आज तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील कुख्यात भोंदू अशोक खरात प्रकरणाच्या निषेधार्थ सोलापूर येथे त्याच्या प्रतिकात्मक पुतळ्याला फाशी देऊन दहन करण्यात आले. ज्येष्ठ नेते व माजी आमदार कॉ. नरसय्या आडम (मास्तर) आणि जिल्हा सचिव कॉ. युसुफ शेख (मेजर) यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद, पूनम गेट येथे हे आंदोलन पार पडले. यावेळी कार्यकर्त्यांनी अंधश्रद्धेविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. कॉ. नरसय्या आडम (मास्तर) यांनी सांगितले की, राज्यात तंत्र-मंत्र, अंगारे-धुपारे यांच्या नावाखाली महिलांचे व सर्वसामान्य नागरिकांचे मोठ्या प्रमाणात शोषण सुरू आहे. अशोक खरात याच्या प्रकरणात अनेक लोकप्रतिनिधी, अधिकारी व मंत्री सामील असल्याचे समोर येत असून, ही अत्यंत गंभीर बाब आहे. संविधानाने अपेक्षित केलेला वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारण्याऐवजी काही लोकप्रतिनिधी अंधश्रद्धेला खतपाणी घालत आहेत. त्यामुळे समाजात चुकीचा संदेश जात आहे. या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. महिला संघटनेच्या राज्याध्यक्ष कॉ. नसीमा शेख यांनी सांगितले की, अशोक खरातसारखे अनेक भोंदू बाबा राज्यातील गावागावांत व शहरांमध्ये कार्यरत असून, ते भोळ्या-भाबड्या नागरिकांचे विविध प्रकारे शोषण करत आहेत. माकपच्या राज्य कमिटी सदस्य तथा माजी नगरसेविका कॉ. नलिनीताई कलबुर्गी यांनीही या प्रकरणातील सर्व आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. अशोक खरात याची संपूर्ण मालमत्ता जप्त करून ती अंधश्रद्धा निर्मूलनासाठी वापरण्यात यावी, तसेच या प्रकरणात सामील असलेल्या ३९ आमदारांची नावे जाहीर करून त्यांचे तत्काळ राजीनामे घ्यावेत, असे त्यांनी सांगितले. तसेच, पीडित महिलांचे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित होत असल्याने त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का बसत असून, ते तातडीने हटवावेत, अशीही मागणी करण्यात आली. या आंदोलनादरम्यान निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील यांना शिष्टमंडळाद्वारे निवेदन सादर करण्यात आले. या शिष्टमंडळात कॉ. नसीमा शेख, नलिनीताई कलबुर्गी, लिंगाव्वा सोलापुरे, शकुंतला पाणीभाते, अफसाना बेग आदींचा समावेश होता. यावेळी माकपचे राज्य सचिव मंडळ सदस्य कॉ. एम. एच. शेख यांनी सांगितले की, पुरोगामी महाराष्ट्राला अंधश्रद्धेची गरज नसून विवेकवाद व वैज्ञानिक दृष्टिकोनाची आवश्यकता आहे. समाजात आजही अनेक ‘अशोक खरात’ अस्तित्वात असून, त्यांना संपवण्यासाठी विवेकवाद हा एकमेव पर्याय आहे. मुख्य मागण्या: 1. अशोक खरातसह त्याला समर्थन देणाऱ्या सर्व लोकप्रतिनिधी व सहकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. 2. राज्यभरातील भोंदू बाबांविरोधात विशेष मोहीम राबवावी. 3. प्रत्येक पोलीस ठाण्यात अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष स्थापन करावा. 4. जादूटोणा विरोधी कायद्याचे नियम तात्काळ तयार करून कठोर अंमलबजावणी करावी. 5. सोशल मीडियावरील अंधश्रद्धा पसरवणाऱ्या जाहिरातींवर बंदी घालावी व नियमनासाठी स्वतंत्र यंत्रणा उभी करावी. 6. अंधश्रद्धा व जादूटोणा विरोधी कायदा २०१३ साठी नियम तातडीने लागू करावेत. या आंदोलनाच्या यशस्वी करण्यासाठी राज्य समिती सदस्य दत्ता चव्हाण, शेवंता देशमुख,ॲड. अनिल वासम, व्यंकटेश कोंगारी, रंगप्पा मरेड्डी, हनिफ सारखेड, फातिमा बेग,विल्यम ससाणे, दाऊद शेख, नरेश दुगाणे, दीपक निकंबे, विक्रम कलबुर्गी, अकील शेख,वीरेंद्र पद्मा,बालकृष्ण मल्याळ, विजय हरसुरे, बापू साबळे, रफिक काझी, बालाजी तुम्मा ,सनी शेट्टी, बजरंग गायकवाड, आदींनी परिश्रम घेतले.

- राज्यात वाढत चाललेल्या अंधश्रद्धा, तंत्र-मंत्र आणि बुवाबाजीच्या नावाखाली होत असलेल्या शोषणाविरोधात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या (माकप) वतीने आज तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील कुख्यात भोंदू अशोक खरात प्रकरणाच्या निषेधार्थ सोलापूर येथे त्याच्या प्रतिकात्मक पुतळ्याला फाशी देऊन दहन करण्यात आले. ज्येष्ठ नेते व माजी आमदार कॉ. नरसय्या आडम (मास्तर) आणि जिल्हा सचिव कॉ. युसुफ शेख (मेजर) यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद, पूनम गेट येथे हे आंदोलन पार पडले. यावेळी कार्यकर्त्यांनी अंधश्रद्धेविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. कॉ. नरसय्या आडम (मास्तर) यांनी सांगितले की, राज्यात तंत्र-मंत्र, अंगारे-धुपारे यांच्या नावाखाली महिलांचे व सर्वसामान्य नागरिकांचे मोठ्या प्रमाणात शोषण सुरू आहे. अशोक खरात याच्या प्रकरणात अनेक लोकप्रतिनिधी, अधिकारी व मंत्री सामील असल्याचे समोर येत असून, ही अत्यंत गंभीर बाब आहे. संविधानाने अपेक्षित केलेला वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारण्याऐवजी काही लोकप्रतिनिधी अंधश्रद्धेला खतपाणी घालत आहेत. त्यामुळे समाजात चुकीचा संदेश जात आहे. या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. महिला संघटनेच्या राज्याध्यक्ष कॉ. नसीमा शेख यांनी सांगितले की, अशोक खरातसारखे अनेक भोंदू बाबा राज्यातील गावागावांत व शहरांमध्ये कार्यरत असून, ते भोळ्या-भाबड्या नागरिकांचे विविध प्रकारे शोषण करत आहेत. माकपच्या राज्य कमिटी सदस्य तथा माजी नगरसेविका कॉ. नलिनीताई कलबुर्गी यांनीही या प्रकरणातील सर्व आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. अशोक खरात याची संपूर्ण मालमत्ता जप्त करून ती अंधश्रद्धा निर्मूलनासाठी वापरण्यात यावी, तसेच या प्रकरणात सामील असलेल्या ३९ आमदारांची नावे जाहीर करून त्यांचे तत्काळ राजीनामे घ्यावेत, असे त्यांनी सांगितले. तसेच, पीडित महिलांचे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित होत असल्याने त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का बसत असून, ते तातडीने हटवावेत, अशीही मागणी करण्यात आली. या आंदोलनादरम्यान निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील यांना शिष्टमंडळाद्वारे निवेदन सादर करण्यात आले. या शिष्टमंडळात कॉ. नसीमा शेख, नलिनीताई कलबुर्गी, लिंगाव्वा सोलापुरे, शकुंतला पाणीभाते, अफसाना बेग आदींचा समावेश होता. यावेळी माकपचे राज्य सचिव मंडळ सदस्य कॉ. एम. एच. शेख यांनी सांगितले की, पुरोगामी महाराष्ट्राला अंधश्रद्धेची गरज नसून विवेकवाद व वैज्ञानिक दृष्टिकोनाची आवश्यकता आहे. समाजात आजही अनेक ‘अशोक खरात’ अस्तित्वात असून, त्यांना संपवण्यासाठी विवेकवाद हा एकमेव पर्याय आहे. मुख्य मागण्या: 1. अशोक खरातसह त्याला समर्थन देणाऱ्या सर्व लोकप्रतिनिधी व सहकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. 2. राज्यभरातील भोंदू बाबांविरोधात विशेष मोहीम राबवावी. 3. प्रत्येक पोलीस ठाण्यात अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष स्थापन करावा. 4. जादूटोणा विरोधी कायद्याचे नियम तात्काळ तयार करून कठोर अंमलबजावणी करावी. 5. सोशल मीडियावरील अंधश्रद्धा पसरवणाऱ्या जाहिरातींवर बंदी घालावी व नियमनासाठी स्वतंत्र यंत्रणा उभी करावी. 6. अंधश्रद्धा व जादूटोणा विरोधी कायदा २०१३ साठी नियम तातडीने लागू करावेत. या आंदोलनाच्या यशस्वी करण्यासाठी राज्य समिती सदस्य दत्ता चव्हाण, शेवंता देशमुख,ॲड. अनिल वासम, व्यंकटेश कोंगारी, रंगप्पा मरेड्डी, हनिफ सारखेड, फातिमा बेग,विल्यम ससाणे, दाऊद शेख, नरेश दुगाणे, दीपक निकंबे, विक्रम कलबुर्गी, अकील शेख,वीरेंद्र पद्मा,बालकृष्ण मल्याळ, विजय हरसुरे, बापू साबळे, रफिक काझी, बालाजी तुम्मा ,सनी शेट्टी, बजरंग गायकवाड, आदींनी परिश्रम घेतले.1
- परंडा नगर परिषदेमध्ये पाण्यासाठी नगराध्यक्ष जाकिर भाई सौदागर यांचा जनशक्ती विकास आघाडीच्या सदस्यावर हल्लाबोल1
- सोलापूर जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायत क्षेत्रांमध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर ॲड. पैगंबर बशीरसाब सय्यद यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निवेदन देत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. निवेदनानुसार, काही ग्रामपंचायत हद्दीत अंदाजे २०० ते २५० भटके कुत्रे मुक्तपणे फिरत आहेत. विशेषतः लहान मुले आणि वृद्ध व्यक्तींवर हल्ल्यांच्या घटना वाढत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याशिवाय रेबीज सारख्या जीवघेण्या आजाराचा धोका देखील वाढला आहे. रात्रीच्या वेळी कुत्र्यांचा उपद्रव अधिक वाढत असल्याने नागरिकांच्या दैनंदिन जीवनात अडथळे निर्माण होत आहेत. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर तातडीने सर्वेक्षण करून कुत्र्यांची संख्या निश्चित करणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. नागरिकांच्या जीवित आणि आरोग्याच्या दृष्टीने ही बाब अत्यंत गंभीर असल्याने प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.सदरप्रसंगी युवानेते अमीर शेख,सोमनिंग शेंडगे,बालाजी जाधव,मौलाली शेख आदीजण उपस्थित होते.1
- Post by Dr krishna karade1
- बारामती विधानसभा पोटनिवडणुकीचा नामांकन अर्ज भरणे पूर्वी सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार यांनी स्व. अजित पवार यांच्या स्मृति स्थळाचे दर्शन घेतले1
- स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई. प्रतिबंधित सुगंधी तंबाखूचा रु 3.75 लाखांचा साठा जप्त. एक आरोपी जेरबंद. सुरू ॲप इन मराठी न्यूज. मंगळवार दिनांक 7 एप्रिल 2016. जिल्ह्यात अवैध धंद्यांवर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी लातूर पोलीस दलाकडून सातत्याने कठोर व नियोजनबद्ध कारवाया सुरू असून, त्याच अनुषंगाने आज दिनांक 07 एप्रिल 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी चाकूर येथे मोठी धाड टाकून महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या सुगंधी तंबाखूचा मोठा साठा जप्त केला आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या आदेशान्वये व अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नियंत्रणाखाली ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यात आली. या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे पथकामधील पोलीस उपनिरीक्षक प्रमोद नानासाहेब देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, पाराजी पुठ्ठेवाड, तुळशीराम बरुरे, प्रदीप चोपणे यांचा समावेश होता. तसेच कारवाईदरम्यान पोलीस स्टेशन चाकूर येथील बीट अंमलदार बोळंगे यांनी सहकार्य केले. सदर पथकाने स्वामी विवेकानंद चौक परिसरातील “राज कन्फेक्शनरी” दुकानाच्या पाठीमागील गोडाऊनमध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला सुगंधी तंबाखू साठवून विक्रीसाठी ठेवलेल्या ठिकाणी धाड टाकून मारुती राजेंद्र सोमवंशी (वय 33 वर्षे, रा. चाकूर) यास ताब्यात घेतले.गोडाऊनची झडती घेतली असता झडती दरम्यान मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला सुगंधी तंबाखूचा साठा आढळून आला. त्यामध्ये—NO.4101 Premium Chewing Tobacco नावाची 16 पोती, सुगंधी तंबाखूची 06 पोती, Extra Freshness नावाची 03 पोती, असा एकूण ₹3,75,000/- (तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपये) किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर प्रतिबंधित तंबाखू हा सार्वजनिक आरोग्यास गंभीर धोका निर्माण करणारा असून, महाराष्ट्र शासनाने त्यावर बंदी घातलेली आहे. तरीदेखील आरोपीने स्वतःच्या दुकानाच्या गोडाऊनमध्ये हा साठा बेकायदेशीररित्या विक्रीसाठी ठेवलेला आढळून आला. सदर मुद्देमाल पंचांच्या समक्ष जप्त करण्यात आला असून,या प्रकरणी आरोपी मारुती राजेंद्र सोमवंशी याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 123, 274, 275, 223 तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम कलम 59 अन्वये पोलीस ठाणे चाकूर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांचे उत्पादन, साठवणूक व विक्री करणे हा गंभीर गुन्हा असून, अशा प्रकारच्या अवैध कृत्यांविरुद्ध भविष्यातही कठोर कारवाई करण्यात येणार आहे.2
- ध्वनी प्रदूषणाविरुद्ध लातूर पोलिसांच्या वाहतूक शाखेची कारवाई; ₹9.18 लाखाचे मॉडीफाय सायलेन्सर, हॉर्न, टेप जप्त करून सार्वजनिकरित्या नाश.* नागरिकांच्या आरोग्य, शांतता व सार्वजनिक सुव्यवस्थेच्या दृष्टीने वाढत चाललेल्या ध्वनी प्रदूषणाच्या समस्येला आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांचे आदेशान्वये अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण व उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिंह साळवे यांचे मार्गदर्शनात वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक विठ्ठल दराडे यांचे नेतृत्वात वाहतूक नियंत्रण शाखेकडून मागील महिन्यात या विशेष राबविण्यात आली होती. मोहिमेमध्ये वाहनांवर बसविण्यात आलेल्या बेकायदेशीर व कर्णकर्कश ध्वनी निर्माण करणाऱ्या उपकरणांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करत सदर उपकरणे जप्त करण्यात आलेले त्यामध्ये हॉर्न, फटाका सायलेन्सर, टेप, लेझर लाईट असे 09 लाख 18 हजार रुपयाचे उपकरणाच्या समावेश होता. वाहतूक नियंत्रण शाखा, लातूर यांनी शहरातील विविध प्रमुख मार्ग, चौक व संवेदनशील भागांमध्ये वाहनांची तपासणी करून नियमबाह्य उपकरणे शोधून त्यांच्यावर मोटार वाहन कायद्यानुसार कठोर कारवाई केली विशेषतः युवकांकडून वापरले जाणारे “इंदुरी (फटाका) सायलेन्सर”, मॉडिफाईड मफलर, उच्च क्षमतेचे साऊंड बॉक्स, कर्णकर्कश हार्न, एलईडी लाईट्स व टेप रेकॉर्डर यांचा समावेश या कारवाईत करण्यात आला. या मोहिमेत एकूण — 149 बेकायदेशीर सायलेन्सर (अंदाजे किंमत ₹7,45,000/-),19 साऊंड बॉक्स (अंदाजे किंमत ₹1,52,000/-),06 हार्न (अंदाजे किंमत ₹3,000/-), 25 एलईडी लाईट्स (अंदाजे किंमत ₹5,000/-), 13 टेप रेकॉर्डर (अंदाजे किंमत ₹13,000/-), असा एकूण ₹9,18,000/- (नऊ लाख अठरा हजार रुपये) किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या सर्व प्रकरणांमध्ये संबंधित वाहनचालकांवर मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हे नोंदवून दंडात्मक व कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. जप्त केलेले साहित्य भविष्यात पुन्हा वापरात येऊ नये, तसेच नागरिकांना होणारा त्रास कायमस्वरूपी थांबविण्यासाठी पोलीस प्रशासनाने त्याचा नाश करण्याचा निर्णय घेतला. ते आज दिनांक 07 एप्रिल 2026 रोजी सर्व जप्त साहित्य नवीन रेणापूर नाका ते रेल्वे स्टेशन रोड येथील एच.पी. पेट्रोल पंपासमोरील सिमेंट रोडवर पोलीस अधिकारी, कर्मचारी, महानगरपालिका कर्मचारी, पंच तसेच छायाचित्रकार यांच्या उपस्थितीत रोड रोलरच्या सहाय्याने सर्व साहित्य पूर्णतः निकामी करण्यात आले. ही प्रक्रिया संपूर्णपणे “इन-कॅमेरा” नोंदविण्यात आली. यानंतर निकामी करण्यात आले. सदर स्क्रॅप विक्रीतून ₹16,560/- इतकी रक्कम प्राप्त झाली असून ती शासनाकडे अधिकृत चलनाद्वारे जमा करण्यात येत आहे. लातूर पोलीस प्रशासनाकडून नागरिकांना आवाहन करण्यात येते की, वाहनांवर बेकायदेशीर सायलेन्सर, कर्णकर्कश हार्न, साऊंड सिस्टीम किंवा इतर ध्वनी प्रदूषण करणारी उपकरणे बसवू नयेत. अशा प्रकारचे कृत्य हे केवळ कायद्याचे उल्लंघन नसून समाजाच्या आरोग्यास व शांततेस बाधा पोहोचवणारे आहे.भविष्यातही अशा प्रकारच्या ध्वनी प्रदूषणाविरोधात लातूर पोलीस दलाकडून सातत्याने व अधिक तीव्रतेने कारवाई केली जाणार असून, नागरिकांनी कायद्याचे पालन करून पोलीस प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.1
- प्रशासकीय भवन परिसरात लावण्यात आलेल्या फलकांमुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. या फलकांवर “अजितदादांचे नावच पुरेसे आहे,” घातकी तटकरे-पटेलची गरज नाही समस्त दादा प्रेमी..! असा उल्लेख करण्यात आला असून तटकरे-पटेल यांचा अप्रत्यक्ष निषेध करण्यात आल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वीच हे फलक झळकल्याने या घडामोडींना अधिकच राजकीय रंग चढला आहे. दादा समर्थकांनी या माध्यमातून बारामतीत या तटकरे-पटेलची गरज नसल्याचा स्पष्ट संदेश दिल्याची चर्चा आहे. आता या प्रकरणावर संबंधित नेते काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.1