logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

RTE मधील १ किमी हवाई अंतराची जाचक अट हायकोर्टाकडून रद्द! सामाजिक कार्यकर्ते किरण माळी यांच्या निवेदनासह संघर्षाला मोठे यश; लाखो विद्यार्थ्यांना दिलासा. ​पाळधी /धरणगाव (प्रतिनिधी): शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (RTE) २५% मोफत प्रवेश प्रक्रियेत राज्य सरकारने लादलेली शाळेपासून घराच्या १ किलोमीटर हवाई अंतराची जाचक अट नागपूर खंडपीठाने रद्द ठरवली आहे. या निर्णयामुळे राज्यातील लाखो गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांच्या मोफत शिक्षणाचा मार्ग मोकळा झाला असून, सामाजिक कार्यकर्ते किरण आनंदा माळी यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे. *​काय होता नेमका वाद* राज्य सरकारने यावर्षी आर.टी.ई. नियमांत बदल करून घरापासून शाळेचे अंतर ३ किलोमीटरऐवजी १ किलोमीटर केले होते. तसेच नोंदणीकृत भाडेकराराची सक्ती केली होती. या अटींमुळे अनेक ग्रामीण आणि शहरातील गरीब मुले प्रवेशापासून वंचित राहत होती. या अन्यायाविरोधात सामाजिक कार्यकर्ते किरण माळी यांनी महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री ना. दादा भुसे, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना वारंवार निवेदने देऊन ही अट रद्द करण्याची मागणी लावून धरली होती. ​१० पेक्षा अधिक वृत्तपत्रांनी घेतली होती दखल या विषयाचे गांभीर्य ओळखून पुण्यनगरी, सकाळ, दिव्य मराठी, सनातन प्रभात, देशोन्नती यांसह १० पेक्षा अधिक प्रमुख वृत्तपत्रांनी किरण माळी यांच्या मागणीची दखल घेत वृत्त प्रसिद्ध केले होते. सोशल मीडियावरही त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून सरकारला जाब विचारला होता. अखेर न्यायदेवतेने या प्रकरणाची गंभीर दखल घेत १ किमीची अट रद्द करून गरिबांच्या मुलांना न्याय दिला आहे. _​"हा विजय माझा एकट्याचा नसून राज्यातील त्या प्रत्येक गरीब विद्यार्थ्याचा आणि पालकाचा आहे, ज्यांच्या शिक्षणासाठी आम्ही लढा दिला._ _१० मार्च ही अंतिम मुदत असताना न्यायालयाने दिलेला हा निर्णय लोकशाहीचा विजय आहे."_ — किरण आनंदा माळी (सामाजिक कार्यकर्ते) ​आता या निर्णयामुळे आर.टी.ई. प्रवेशासाठी पुन्हा एकदा ३ किलोमीटर अंतराची मर्यादा लागू होणार असून, यामुळे पालकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

6 hrs ago
user_Kiran Mali
Kiran Mali
Local News Reporter धरणगाव, जळगाव, महाराष्ट्र•
6 hrs ago
07ca5e2b-f195-4d8a-85d0-7ce70d261684

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • Post by Kishor k Patil Patil
    2
    Post by Kishor k Patil Patil
    user_Kishor k Patil Patil
    Kishor k Patil Patil
    पाचोरा, जळगाव, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • धुळे शहरातील देवपूर येथील अमरधाम स्मशानभूमीत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अमरधाम परिसरातून राख चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली असून, राखेतून सोने मिळवण्यासाठी काही अज्ञात व्यक्तींनी ही चोरी केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
    1
    धुळे शहरातील देवपूर येथील अमरधाम स्मशानभूमीत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अमरधाम परिसरातून राख चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली असून, राखेतून सोने मिळवण्यासाठी काही अज्ञात व्यक्तींनी ही चोरी केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
    user_Dhule News 24
    Dhule News 24
    Newspaper publisher धुळे, धुळे, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • प्रतिनिधि.... दिलीप मोरे  छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्याच्या सीमेवर आणि बुलढाणा जिल्ह्याच्या हद्दीलगत असलेल्या गिरडा घाटात दि १० रोजी मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास रेती वाहतूक करणाऱ्या टिप्परचा अपघात झाला. घाट उतरत असताना टिप्परचे अचानक ब्रेक निकामी झाले. परिस्थितीची गंभीरता लक्षात येताच चालकाने प्रसंगावधान राखत टिप्पर टेकडीकडे वळवून धडक दिली. त्यामुळे टिप्पर जागीच पलटी झाला. या अपघातात चालकाला किरकोळ दुखापत झाली असून तो सुदैवाने बचावला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चालकाने वेळीच निर्णय घेतला नसता तर टिप्पर अंदाजे २०० ते २५० फूट खोल दरीत कोसळण्याची शक्यता होती. त्यामुळे मोठी जीवितहानी टळल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान, या दहा टायरी टिप्परमध्ये साधारण पाच ते सहा ब्रास रेती असल्याची माहिती मिळाली आहे. अपघातानंतर टिप्पर रस्त्यावर पलटी झाल्याने काही काळासाठी गिरडा घाटातील वाहतूक पूर्णपणे बंद पडली. त्यामुळे वाहनधारकांना बराच वेळ अडचणीचा सामना करावा लागनार आहे गिरडा घाट हा अवैधरित्या रेती वाहतूक करणाऱ्या टिप्परचा प्रमुख मार्ग बनल्याची चर्चा परिसरात आहे. अरुंद घाटमार्गावरून मोठ्या वेगाने धावणाऱ्या टिप्परमुळे परिसरातील दुचाकीस्वार आणि नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
    2
    प्रतिनिधि....
दिलीप मोरे 
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्याच्या सीमेवर आणि बुलढाणा जिल्ह्याच्या हद्दीलगत असलेल्या गिरडा घाटात दि १० रोजी मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास रेती वाहतूक करणाऱ्या टिप्परचा अपघात झाला. घाट उतरत असताना टिप्परचे अचानक ब्रेक निकामी झाले. परिस्थितीची गंभीरता लक्षात येताच चालकाने प्रसंगावधान राखत टिप्पर टेकडीकडे वळवून धडक दिली. त्यामुळे टिप्पर जागीच पलटी झाला.
या अपघातात चालकाला किरकोळ दुखापत झाली असून तो सुदैवाने बचावला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चालकाने वेळीच निर्णय घेतला नसता तर टिप्पर अंदाजे २०० ते २५० फूट खोल दरीत कोसळण्याची शक्यता होती. त्यामुळे मोठी जीवितहानी टळल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे.
दरम्यान, या दहा टायरी टिप्परमध्ये साधारण पाच ते सहा ब्रास रेती असल्याची माहिती मिळाली आहे. अपघातानंतर टिप्पर रस्त्यावर पलटी झाल्याने काही काळासाठी गिरडा घाटातील वाहतूक पूर्णपणे बंद पडली. त्यामुळे वाहनधारकांना बराच वेळ अडचणीचा सामना करावा लागनार आहे 
गिरडा घाट हा अवैधरित्या रेती वाहतूक करणाऱ्या टिप्परचा प्रमुख मार्ग बनल्याची चर्चा परिसरात आहे. अरुंद घाटमार्गावरून मोठ्या वेगाने धावणाऱ्या टिप्परमुळे परिसरातील दुचाकीस्वार आणि नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
    user_DILIP DESHMUKH
    DILIP DESHMUKH
    Farmer सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • गिरडा घाटात 10 टायर हायवा अपघातग्रस्त; नागरिकांच्या मदतीने परिस्थिती नियंत्रणात बातमी : सोयगाव तालुक्यातील गिरडा घाट येथे 10 टायर हायवा वाहनाचा अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात काही जण किरकोळ जखमी झाले असल्याची माहिती मिळाली आहे. अपघातामुळे काही काळ घाटातील वाहतूक थांबवण्यात आली होती. मात्र सध्या घाटातील रस्ता पुन्हा सुरू करण्यात आला असून वाहतूक सुरळीत सुरू आहे. स्थानिक नागरिक आणि प्रशासनाच्या मदतीने परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली.
    2
    गिरडा घाटात 10 टायर हायवा अपघातग्रस्त; नागरिकांच्या मदतीने परिस्थिती नियंत्रणात
बातमी :
सोयगाव तालुक्यातील गिरडा घाट येथे 10 टायर हायवा वाहनाचा अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात काही जण किरकोळ जखमी झाले असल्याची माहिती मिळाली आहे.
अपघातामुळे काही काळ घाटातील वाहतूक थांबवण्यात आली होती. मात्र सध्या घाटातील रस्ता पुन्हा सुरू करण्यात आला असून वाहतूक सुरळीत सुरू आहे. स्थानिक नागरिक आणि प्रशासनाच्या मदतीने परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली.
    user_RahimKhan Pathan
    RahimKhan Pathan
    Voice of people सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • सिल्लोड पंचायत समिती सभापती पदी भाजप च्या अनिता सुरेश बनकर तर उपसभापती भगवान आहेर यांची निवड... या निवडीने भाजपात आनंदाचे वातावरण.निवडी बद्दल भाजप कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून आनंद साजरा केला..
    1
    सिल्लोड पंचायत समिती सभापती पदी  भाजप च्या अनिता सुरेश बनकर तर उपसभापती भगवान आहेर यांची निवड...
या निवडीने भाजपात आनंदाचे वातावरण.निवडी बद्दल भाजप कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून आनंद साजरा केला..
    user_Vishal Chavan
    Vishal Chavan
    Photographer सिल्लोड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • आज दिनांक 10 मार्च दुपारी चार वाजून 30 मिनिटांनी माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सिल्लोड पंचायत समिती येथे विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेमध्ये सिल्लोड पंचायत समिती सभापती व उपसभापतींची निवड करण्यात आली यामध्ये अनिता सुरेश बनकर यांना बहुमत मिळाल्याने त्यांना पंचायत समिती सिल्लोड सभापती पद देण्यात आले तर उपसभापती भगवान आहे यांची निवड करण्यात आली सदरील काम निवडणूक अधिकारी निलेश अपार यांच्या मार्गदर्शनाखाली निवड करण्यात आली
    1
    आज दिनांक 10 मार्च दुपारी चार वाजून 30 मिनिटांनी माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सिल्लोड पंचायत समिती येथे विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेमध्ये सिल्लोड पंचायत समिती सभापती व उपसभापतींची निवड करण्यात आली यामध्ये अनिता सुरेश बनकर यांना बहुमत मिळाल्याने त्यांना पंचायत समिती सिल्लोड सभापती पद देण्यात आले तर उपसभापती भगवान आहे यांची निवड करण्यात आली सदरील काम निवडणूक अधिकारी निलेश अपार यांच्या मार्गदर्शनाखाली निवड करण्यात आली
    user_Sham Thakur
    Sham Thakur
    सिल्लोड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • रिपोर्टर मुजीब शेख
    1
    रिपोर्टर मुजीब शेख
    user_Mujeeb Shaikh
    Mujeeb Shaikh
    Sillod, Aurangabad•
    17 hrs ago
  • धुळे जिल्ह्यातील नेर गावाला स्वतंत्र तालुक्याचा दर्जा द्यावा या मागणीसाठी नेर तालुका कृती समितीच्या वतीने निदर्शने करण्यात आली. यावेळी नागरिकांनी प्रशासनाला निवेदन देत नेर गावाचा नव्या तालुक्यात समावेश करण्याची मागणी केली.
    1
    धुळे जिल्ह्यातील नेर गावाला स्वतंत्र तालुक्याचा दर्जा द्यावा या मागणीसाठी नेर तालुका कृती समितीच्या वतीने निदर्शने करण्यात आली. यावेळी नागरिकांनी प्रशासनाला निवेदन देत नेर गावाचा नव्या तालुक्यात समावेश करण्याची मागणी केली.
    user_Dhule News 24
    Dhule News 24
    Newspaper publisher धुळे, धुळे, महाराष्ट्र•
    9 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.