हिमायत नगर शहरातून गेलेला राष्ट्रीय महामार्गचे काम करणाऱ्या ठेकेदाराने नाल्याचे काम व्यवस्थित केले नसल्याने हिमायत नगर शहरातून गेलेला राष्ट्रीय महामार्गचे काम करणाऱ्या ठेकेदाराने नाल्याचे काम व्यवस्थित केले नसल्याने अल्पसा पाऊस होताच नव्याने केलेल्या नालीचे घाण दुर्गंधी युक्त पाणी परत गावातील वस्तीत येत असल्याने नागरिकांना घाण पाण्याचा सामना करावा लागतो आहे. कोट्यावधी रुपयाच्या खर्चातून हिमायतनगर शहराच्या दोन्ही बाजूने बनविलेल्या नाल्याचे काम निकृष्ट पद्धतीने व मनमानी करून झाल्याने याचा नाहक फटका शहरातील सखल भागातील नागरिकांना बसत आहे अशा बेपरवा गुत्तेदाराच्या कामाची चौकशी करावी आणि याला अभय देणारे अभियंता यांनी दुर्लक्ष का केले याची चौकशी करून नागरिकांना साथीच्या आजाराचा सामना करण्याची वेळ येणार नाही यासाठी तातडीने उपाययोजना कराव्या अशी मागणी केली जात आहे. #Himayatnagar #drene #WaterCrisis #हिमायतनगर #नांदेड
हिमायत नगर शहरातून गेलेला राष्ट्रीय महामार्गचे काम करणाऱ्या ठेकेदाराने नाल्याचे काम व्यवस्थित केले नसल्याने हिमायत नगर शहरातून गेलेला राष्ट्रीय महामार्गचे काम करणाऱ्या ठेकेदाराने नाल्याचे काम व्यवस्थित केले नसल्याने अल्पसा पाऊस होताच नव्याने केलेल्या नालीचे घाण दुर्गंधी युक्त पाणी परत गावातील वस्तीत येत असल्याने नागरिकांना घाण पाण्याचा सामना करावा लागतो आहे. कोट्यावधी रुपयाच्या खर्चातून हिमायतनगर शहराच्या दोन्ही बाजूने बनविलेल्या नाल्याचे काम निकृष्ट पद्धतीने व मनमानी करून झाल्याने याचा नाहक फटका शहरातील सखल भागातील नागरिकांना बसत आहे अशा बेपरवा गुत्तेदाराच्या कामाची चौकशी करावी आणि याला अभय देणारे अभियंता यांनी दुर्लक्ष का केले याची चौकशी करून नागरिकांना साथीच्या आजाराचा सामना करण्याची वेळ येणार नाही यासाठी तातडीने उपाययोजना कराव्या अशी मागणी केली जात आहे. #Himayatnagar #drene #WaterCrisis #हिमायतनगर #नांदेड
- अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाच्या समर्थनात लातूरमध्ये मोर्चा करण्यात आला या मोर्चामध्ये विधान परिषदचे आमदार अमित गोरखे सर उपस्थित होते अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाच्या समर्थनात लातूरमध्ये मोर्चा करण्यात आला या मोर्चामध्ये विधान परिषदचे आमदार अमित गोरखे सर उपस्थित होते1
- महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफीच्या यादीतील रक्कम आणि संबंधित बँकांमधील प्रत्यक्ष कर्जाची रक्कम यामध्ये मोठी तफावत आढळून येत असल्याने शेतकरी मोठ्या संभ्रमात सापडला आहे. अनेक शेतकऱ्यांच्या मते, सरकारी यादीत दर्शविलेली रक्कम आणि बँकेच्या नोंदीतील कर्जाची रक्कम जुळत नसल्याने पुढील प्रक्रियेबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांनी कोणतीही पुढील प्रक्रिया करण्यापूर्वी सरकारच्या यादीतील कर्जाची रक्कम आणि बँकेच्या नोंदीतील कर्जाची रक्कम काळजीपूर्वक पडताळून पाहावी, असे आवाहन करण्यात येत आहे. दोन्ही रक्कम समान असल्याची खात्री झाल्यानंतरच पुढील प्रक्रिया करावी, अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार करून दुरुस्तीची मागणी करावी. दरम्यान, कर्जमाफीच्या नावाखाली शेतकऱ्यांना वारंवार वेठीस धरले जात असल्याची भावना व्यक्त होत असून, ही परिस्थिती तातडीने सुधारावी, अशी मागणी होत आहे. अन्यथा राज्यभरातील शेतकरी तीव्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारतील, असा इशाराही शेतकरी प्रतिनिधींनी दिला आहे.1
- मोंढा परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ; एका रात्रीत चार दुकाने फोडली, पोलिसांनी गस्त वाढवावी – व्यापाऱ्यांची मागणी1
- बस में सफर या बारिश का कहर? टपकती एसटी बस का वीडियो सोशल मीडिया पर वायरल अकोला में महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडल (एसटी) की एक बस का वीडियो सोशल मीडिया पर तेजी से वायरल हो रहा है। बताया जा रहा है कि बस में सफर कर रहे एक यात्री ने बारिश के दौरान यह वीडियो बनाकर अपने इंस्टाग्राम अकाउंट पर साझा किया। वायरल वीडियो में बस की छत से बारिश का पानी लगातार अंदर टपकता दिखाई दे रहा है। पानी सीटों पर गिर रहा है, जबकि एक वृद्ध यात्री बस के अंदर ही छाता खोलकर खुद को भीगने से बचाने का प्रयास करता नजर आ रहा है। इस दृश्य ने बसों के रखरखाव और यात्रियों को उपलब्ध कराई जा रही सुविधाओं पर सवाल खड़े कर दिए हैं। हालांकि, इस वीडियो की स्वतंत्र रूप से पुष्टि नहीं हो सकी है, लेकिन सोशल मीडिया पर वायरल होने के बाद लोग संबंधित अधिकारियों से मामले की जांच कर आवश्यक कार्रवाई तथा बसों की समय पर मरम्मत कराने की मांग कर रहे हैं।1
- अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाच्या समर्थनात लातूरमध्ये मोर्चा करण्यात आला या मोर्चामध्ये प्रा. डाँ रामचंद्र भरांडे सर उपस्थित होते अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाच्या समर्थनात लातूरमध्ये मोर्चा करण्यात आला या मोर्चामध्ये प्रा. डाँ रामचंद्र भरांडे सर उपस्थित होते1
- मिळालेल्या माहितीनुसार, कंधारचे आमदार डॉ. तुषार राठोड हे 'नॅशनल कॉन्फरन्स ऑफ स्टेट लेजिस्लेटर्स' परिषदेच्या आंतरराष्ट्रीय अभ्यास दौऱ्यासाठी शनिवार, २५ एप्रिल रोजी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अमेरिकेला रवाना झाले. तर आज, २७ जुलै रोजी मिळालेल्या ताज्या अपडेट्सनुसार, त्यांचा हा दौरा विविध देशांतील संसदीय कार्यपद्धती आणि सुशासनाचा अभ्यास करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण ठरत आहे. अमेरिकेतील राज्यांच्या विधिमंडळांच्या प्रतिष्ठित संस्थेच्या परिषदेसाठी आणि 'नॅशनल लेजिस्लेटर्स कॉन्फरन्स भारत' यांच्या संयुक्त विद्यमाने या अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. ही संस्था विधिमंडळ कार्यपद्धती, सार्वजनिक धोरणे, संशोधन आणि आंतरराज्य सहकार्य वाढवण्यासाठी कार्य करते. अमेरिकेला रवाना होताना विमानतळावर सहकारी, समर्थक आणि हितचिंतकांनी आमदार डॉ. तुषार राठोड यांना शुभेच्छा दिल्या. या दौऱ्यादरम्यान आमदार राठोड विविध राज्यांच्या विधिमंडळांची कार्यपद्धती, सुशासन, लोकाभिमुख धोरणे आणि नावीन्यपूर्ण विकास मॉडेल्सचा सखोल अभ्यास करत आहेत. विशेष म्हणजे, आज मिळालेल्या माहितीनुसार या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये तब्बल ४० देशांचे प्रतिनिधी सहभागी झाले आहेत.1
- वाशिम जिल्ह्यातून शेतकरी बांधवांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्रातील कर्जमुक्ती योजनेसाठी पात्र असलेल्या शेतकरी बांधवांनी आपले आधार प्रमाणीकरण तातडीने पूर्ण करून शासनाच्या कर्जमुक्ती योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन यवतमाळ–वाशिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय उत्तमराव देशमुख यांनी केले आहे. कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळण्यासाठी आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे ज्या पात्र शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण अद्याप पूर्ण झालेले नाही, त्यांनी कोणताही विलंब न करता आधार कार्डसह जवळच्या सीएससी अर्थात कॉमन सर्व्हिस सेंटरवर जाऊन आधार प्रमाणीकरण पूर्ण करावे, असे खासदार देशमुख यांनी सांगितले आहे. शेतकऱ्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत वाट न पाहता आवश्यक प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी. आधार प्रमाणीकरण प्रलंबित राहिल्यामुळे कोणताही पात्र शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये, यासाठी संबंधित शेतकऱ्यांनी तातडीने पुढाकार घेणे गरजेचे असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. राज्यातील पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळावा आणि त्यांना आर्थिक दिलासा मिळावा, या उद्देशाने शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह सीएससी केंद्रावर संपर्क साधून आपली प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी. महाराष्ट्रातील पात्र शेतकरी बांधवांनी आधार कार्डसह तत्काळ सीएससी केंद्रावर जाऊन आधार प्रमाणीकरण करून कर्जमुक्ती योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन यवतमाळ–वाशिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय उत्तमराव देशमुख यांनी केले आहे.2
- *स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; चारचाकी चोरीचे ३ गुन्हे उघड* *तीन आरोपी अटकेत; ५ लाख ८१ हजारांचा मुद्देमाल जप्त, आणखी आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता* वाशिम जिल्हा प्रतिनिधी विश्वास कुटे वाशिम जिल्ह्यातील वाहन चोरीच्या घटनांचा छडा लावत स्थानिक गुन्हे शाखेने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. चारचाकी वाहन चोरीचे तीन गुन्हे उघडकीस आणत तीन आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून रोख रक्कम, मारुती सुझुकी स्विफ्ट कार व टूल किट असा एकूण ५ लाख ८१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. कारंजा तालुक्यातील कामरगाव येथील सुभाष भाऊराव निघोट, रा. रामनगर, कामरगाव यांनी २५ जुलै २०२६ रोजी धनज पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यांच्या घरासमोर उभी असलेली फोर्स कंपनीची चारचाकी गाडी क्रमांक एमएच ३७ जी ७६२२, अंदाजे किंमत ६ लाख रुपये, २५ जुलै रोजी पहाटे १ ते ५ वाजेदरम्यान अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले होते. याप्रकरणी अज्ञात आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. जिल्ह्यातील वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील यांनी दिल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर आडे यांनी अधिकारी व अंमलदारांची दोन स्वतंत्र पथके तयार करून नांदेड व बुलढाणा येथे रवाना केली. स्थानिक गुन्हे शाखेच्या एका पथकाने नांदेड जिल्ह्यातील भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून शेख अफजल उर्फ गोलू शेख दाऊद (वय २५ वर्षे, रा. धाड, जि. बुलढाणा) याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने नितीन रमेश गवई (वय २६ वर्षे) आणि शेख सरवर शेख मनवर (वय ३८ वर्षे), दोघे रा. मेरा खुर्द, ता. चिखली, जि. बुलढाणा यांच्या मदतीने गुन्हा केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. कामरगाव येथून चोरी केलेले वाहन नांदेड येथील तीन अनोळखी व्यक्तींना ८० हजार रुपयांना विकल्याची कबुली आरोपीने दिली. त्याच्याकडून वाहन विक्रीतून मिळालेली ८० हजार रुपयांची रोख रक्कम पंचांसमक्ष जप्त करण्यात आली. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेच्या दुसऱ्या पथकाने नितीन रमेश गवई आणि शेख सरवर शेख मनवर यांना वाशिम-हिंगोली मार्गावरील तोंडगाव टोलनाक्याजवळ ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांनी कामरगाव येथील वाहन चोरीच्या गुन्ह्यासह अहिल्यानगर येथून आणखी दोन कार चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. यापैकी अहिल्यानगर जिल्ह्यातील तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील मारुती सुझुकी स्विफ्ट कार, अंदाजे किंमत ५ लाख रुपये आणि १ हजार रुपये किमतीचे टूल किट जप्त करण्यात आले. या कारवाईत आतापर्यंत एकूण ५ लाख ८१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, आणखी आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील, अपर पोलीस अधीक्षक लता फड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर आडे यांच्या नेतृत्वात पोउपनि सचिन गोखले, शेखर मास्कर, तसेच पोलीस अंमलदार गजानन गोटे, दिलीप देवकते, गजानन अवगळे, गजानन झगरे, सुरज खडके, ज्ञानदेव मात्रे, राहुल व्यवहारे, राजकुमार यादव, अविनाश वाढे, दीपक मुगे, भूषण ठाकरे, अमोल इरतकर, शाम इंगळे आणि सुनील तायडे यांनी केली.2