*स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; चारचाकी चोरीचे ३ गुन्हे उघड* *तीन आरोपी अटकेत; ५ लाख ८१ हजारांचा मुद्देमाल जप्त, आणखी आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता* वाशिम जिल्हा प्रतिनिधी विश्वास कुटे वाशिम जिल्ह्यातील वाहन चोरीच्या घटनांचा छडा लावत स्थानिक गुन्हे शाखेने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. चारचाकी वाहन चोरीचे तीन गुन्हे उघडकीस आणत तीन आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून रोख रक्कम, मारुती सुझुकी स्विफ्ट कार व टूल किट असा एकूण ५ लाख ८१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. कारंजा तालुक्यातील कामरगाव येथील सुभाष भाऊराव निघोट, रा. रामनगर, कामरगाव यांनी २५ जुलै २०२६ रोजी धनज पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यांच्या घरासमोर उभी असलेली फोर्स कंपनीची चारचाकी गाडी क्रमांक एमएच ३७ जी ७६२२, अंदाजे किंमत ६ लाख रुपये, २५ जुलै रोजी पहाटे १ ते ५ वाजेदरम्यान अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले होते. याप्रकरणी अज्ञात आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. जिल्ह्यातील वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील यांनी दिल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर आडे यांनी अधिकारी व अंमलदारांची दोन स्वतंत्र पथके तयार करून नांदेड व बुलढाणा येथे रवाना केली. स्थानिक गुन्हे शाखेच्या एका पथकाने नांदेड जिल्ह्यातील भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून शेख अफजल उर्फ गोलू शेख दाऊद (वय २५ वर्षे, रा. धाड, जि. बुलढाणा) याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने नितीन रमेश गवई (वय २६ वर्षे) आणि शेख सरवर शेख मनवर (वय ३८ वर्षे), दोघे रा. मेरा खुर्द, ता. चिखली, जि. बुलढाणा यांच्या मदतीने गुन्हा केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. कामरगाव येथून चोरी केलेले वाहन नांदेड येथील तीन अनोळखी व्यक्तींना ८० हजार रुपयांना विकल्याची कबुली आरोपीने दिली. त्याच्याकडून वाहन विक्रीतून मिळालेली ८० हजार रुपयांची रोख रक्कम पंचांसमक्ष जप्त करण्यात आली. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेच्या दुसऱ्या पथकाने नितीन रमेश गवई आणि शेख सरवर शेख मनवर यांना वाशिम-हिंगोली मार्गावरील तोंडगाव टोलनाक्याजवळ ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांनी कामरगाव येथील वाहन चोरीच्या गुन्ह्यासह अहिल्यानगर येथून आणखी दोन कार चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. यापैकी अहिल्यानगर जिल्ह्यातील तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील मारुती सुझुकी स्विफ्ट कार, अंदाजे किंमत ५ लाख रुपये आणि १ हजार रुपये किमतीचे टूल किट जप्त करण्यात आले. या कारवाईत आतापर्यंत एकूण ५ लाख ८१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, आणखी आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील, अपर पोलीस अधीक्षक लता फड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर आडे यांच्या नेतृत्वात पोउपनि सचिन गोखले, शेखर मास्कर, तसेच पोलीस अंमलदार गजानन गोटे, दिलीप देवकते, गजानन अवगळे, गजानन झगरे, सुरज खडके, ज्ञानदेव मात्रे, राहुल व्यवहारे, राजकुमार यादव, अविनाश वाढे, दीपक मुगे, भूषण ठाकरे, अमोल इरतकर, शाम इंगळे आणि सुनील तायडे यांनी केली.
*स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; चारचाकी चोरीचे ३ गुन्हे उघड* *तीन आरोपी अटकेत; ५ लाख ८१ हजारांचा मुद्देमाल जप्त, आणखी आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता* वाशिम जिल्हा प्रतिनिधी विश्वास कुटे वाशिम जिल्ह्यातील वाहन चोरीच्या घटनांचा छडा लावत स्थानिक गुन्हे शाखेने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. चारचाकी वाहन चोरीचे तीन गुन्हे उघडकीस आणत तीन आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून रोख रक्कम, मारुती सुझुकी स्विफ्ट कार व टूल किट असा एकूण ५ लाख ८१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. कारंजा तालुक्यातील कामरगाव येथील सुभाष भाऊराव निघोट, रा. रामनगर, कामरगाव यांनी २५ जुलै २०२६ रोजी धनज पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यांच्या घरासमोर उभी असलेली फोर्स कंपनीची चारचाकी गाडी क्रमांक एमएच ३७ जी ७६२२, अंदाजे किंमत ६ लाख रुपये, २५ जुलै रोजी पहाटे १ ते ५ वाजेदरम्यान अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले होते. याप्रकरणी अज्ञात आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. जिल्ह्यातील वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील यांनी दिल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर आडे यांनी अधिकारी व अंमलदारांची दोन स्वतंत्र पथके तयार करून नांदेड व बुलढाणा येथे रवाना केली. स्थानिक गुन्हे शाखेच्या एका पथकाने नांदेड जिल्ह्यातील भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून शेख अफजल उर्फ गोलू शेख दाऊद (वय २५ वर्षे, रा. धाड, जि. बुलढाणा) याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने नितीन रमेश गवई (वय २६
वर्षे) आणि शेख सरवर शेख मनवर (वय ३८ वर्षे), दोघे रा. मेरा खुर्द, ता. चिखली, जि. बुलढाणा यांच्या मदतीने गुन्हा केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. कामरगाव येथून चोरी केलेले वाहन नांदेड येथील तीन अनोळखी व्यक्तींना ८० हजार रुपयांना विकल्याची कबुली आरोपीने दिली. त्याच्याकडून वाहन विक्रीतून मिळालेली ८० हजार रुपयांची रोख रक्कम पंचांसमक्ष जप्त करण्यात आली. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेच्या दुसऱ्या पथकाने नितीन रमेश गवई आणि शेख सरवर शेख मनवर यांना वाशिम-हिंगोली मार्गावरील तोंडगाव टोलनाक्याजवळ ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांनी कामरगाव येथील वाहन चोरीच्या गुन्ह्यासह अहिल्यानगर येथून आणखी दोन कार चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. यापैकी अहिल्यानगर जिल्ह्यातील तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील मारुती सुझुकी स्विफ्ट कार, अंदाजे किंमत ५ लाख रुपये आणि १ हजार रुपये किमतीचे टूल किट जप्त करण्यात आले. या कारवाईत आतापर्यंत एकूण ५ लाख ८१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, आणखी आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील, अपर पोलीस अधीक्षक लता फड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर आडे यांच्या नेतृत्वात पोउपनि सचिन गोखले, शेखर मास्कर, तसेच पोलीस अंमलदार गजानन गोटे, दिलीप देवकते, गजानन अवगळे, गजानन झगरे, सुरज खडके, ज्ञानदेव मात्रे, राहुल व्यवहारे, राजकुमार यादव, अविनाश वाढे, दीपक मुगे, भूषण ठाकरे, अमोल इरतकर, शाम इंगळे आणि सुनील तायडे यांनी केली.
- गोपाळनगरमध्ये जुगारावर पोलिसांची धाड; ११ जणांवर गुन्हा खामगाव : गोपाळनगर परिसरात बेकायदेशीरपणे एका घरात सुरू असलेल्या 'एक्का-बादशहा' जुगारावर शिवाजीनगर पोलिसांनी धाड टाकून ११ जुगारींना रंगेहात पकडले आहे.या कारवाईत रोख रकमेसह मोबाईल व जुगाराचे साहित्य असा एकूण ४५ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात येऊन कौटुंबिक त्रासाबाबत तक्रार दिली होती.या तक्रारीच्या शहानिशेसाठी पोलीस पथक गोपाळनगर येथे गेले असता, उमेश चव्हाण याच्या घराच्या वरच्या मजल्यावरील खोलीत पैशांच्या हार-जीतवर ५२ ताश पत्यांचा 'एक्का-बादशहा' जुगार सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली.पोलीस निरीक्षक मंदार पुरी यांच्या मार्गदर्शनानुसार, पोउपनि अमित तळोले आणि सहकाऱ्यांच्या मदतीने पंचासमक्ष सदर ठिकाणी छापा टाकण्यात आला. या कारवाईत उमेश जीवनसिंग चव्हाण, जयसिंग प्रल्हाद सोळंके , नितीन आत्माराम बिलारे, आकाश रामेश्वर लाहुडकर,सूर्यकांत सुखदेव निमकर्डे,विजय काशिराम सुलताने,केशव सिताराम टाले,गुलचंद रामसिंग चव्हाण,पुरुषोत्तम दादाराव वखारे,अंबादास शिवनारायण जाधव,शंकर विठ्ठल कुकडे सर्व रा.गोपाळनगर या ११ जणांना जागीच पकडण्यात आले,तर काही इसम घटनास्थळावरून फरार होण्यात यशस्वी झाले.कारवाईदरम्यान पोलिसांनी आरोपींन कडून नगदी,मोबाईल व इतर साहित्यासह इतर असा एकूण ४५ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.याप्रकरणी पोलीस हेडकॉन्स्टेबल अमरसिंग पवार यांच्या फिर्यादीवरून उपरोक्त आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायदा कलम ४ व ५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.1
- घाणीचे साम्राज्य त्या मुळे डेंगू मलेरिया सारखे आजार वाढण्याची शक्यता लोकांना नाहक त्रास जोगेश्वरी बैरब बाग लिंक रोड कदम नगर कॉर्नर पिन कोड क्रमांक 400102. घाणीचे साम्राज्य त्या मुळे डेंगू मलेरिया सारखे आजार वाढण्याची शक्यता लोकांना नाहक त्रास ज्या लोक तिकडे राहता त्याच्या लोकांच्या स्वास्थ आरोग्य ची बात आहे बीएमसी ला तक्रार kw_202600067915 (68082) केला नंतर पण कारवाई होत नाही वार्ड नंबर 61 नगर सेविका के बीएमसी चुनावों में जीत के बाद की दिव्या अवनीश सिंह हैं। @mybmcwardKW @Ashwini Bhide @mumbaimatterz @TawdeRitu @mybmc3
- हिमायत नगर शहरातून गेलेला राष्ट्रीय महामार्गचे काम करणाऱ्या ठेकेदाराने नाल्याचे काम व्यवस्थित केले नसल्याने हिमायत नगर शहरातून गेलेला राष्ट्रीय महामार्गचे काम करणाऱ्या ठेकेदाराने नाल्याचे काम व्यवस्थित केले नसल्याने अल्पसा पाऊस होताच नव्याने केलेल्या नालीचे घाण दुर्गंधी युक्त पाणी परत गावातील वस्तीत येत असल्याने नागरिकांना घाण पाण्याचा सामना करावा लागतो आहे. कोट्यावधी रुपयाच्या खर्चातून हिमायतनगर शहराच्या दोन्ही बाजूने बनविलेल्या नाल्याचे काम निकृष्ट पद्धतीने व मनमानी करून झाल्याने याचा नाहक फटका शहरातील सखल भागातील नागरिकांना बसत आहे अशा बेपरवा गुत्तेदाराच्या कामाची चौकशी करावी आणि याला अभय देणारे अभियंता यांनी दुर्लक्ष का केले याची चौकशी करून नागरिकांना साथीच्या आजाराचा सामना करण्याची वेळ येणार नाही यासाठी तातडीने उपाययोजना कराव्या अशी मागणी केली जात आहे. #Himayatnagar #drene #WaterCrisis #हिमायतनगर #नांदेड1
- भारतीय संविधानाने अनुसूचित जातींना दिलेल्या ऐतिहासिक आणि एकत्रित आरक्षणात 'अ, ब, क, ड' उपवर्गीकरण करून आरक्षण संपविण्याचा डाव रचला जात असल्याचा गंभीर आरोप करत, जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यातील ५८ जातींच्या समाजबांधवांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. सोमवारी (दि. २७ जुलै २०२६) रोजी 'अनुसूचित जाती उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समिती'च्या नेतृत्वाखाली जळगाव जामोद येथे काढण्यात आलेल्या विराट मोर्चानंतर संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. शासनाच्या अन्यायकारक धोरणाविरोधात रस्त्यावर उतरलेल्या या महामोर्चातून शासनाला थेट इशारा देण्यात आला आहे. शहरातील भीम नगर येथून सुरू झालेला हा मोर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे राष्ट्रगीताचे गायन करून संपन्न झाला. या मोर्चामध्ये दीड हजारांहून अधिक महिला व पुरुष मोठ्या संख्येने अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने सहभागी झाले होते. आंदोलनकांच्या हातात संत शिरोमणी रविदास महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे बैनर व पोस्टर होते. सर्व महापुरुषांच्या जयघोषाने संपूर्ण जळगाव जामोद शहर दणाणून सोडले होते. कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी ठाणेदार सचिन बागुल यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शोषित, पीडित आणि सामाजिक वर्णव्यवस्थेत शूद्र मानल्या गेलेल्या ५९ जातींना एकत्र करून १३ टक्के आरक्षण दिले होते. मात्र, आज याच एकत्रित आरक्षणाला खिंडार पाडण्याचे आणि उपवर्गीकरणाच्या नावाखाली आरक्षण संपवण्याचे प्रयत्न होत असल्याने ५८ जातींचे समाजबांधव आक्रमक झाले आहेत. संघर्ष समितीचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच ५८ जातींमधील हजारो नागरिक व महिलांच्या उपस्थितीत अनुसूचित जाती उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समिती च्या वतीने उपविभागीय अधिकारी, जळगाव जामोद यांच्यामार्फत मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांना सविस्तर निवेदन पाठवून उपवर्गीकरणाची प्रक्रिया तात्काळ रद्द करण्याची मागणी करण्यात आली असून, शासनाविरोधात तीव्र लढा उभारण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. या विराट मोर्चात उत्तम नियोजन संघर्ष समितीचे पदाधिकारी उत्तम वानखडे, ज्ञानदेव इंगळे, सुनिल बोदडे, विजय तांदळे, शिवहरी रोजतकार, श्रीराम भिडे, विजय वानखडे, राहुल तायडे, सिद्धार्थ हेलोडे, संतोष वानखडे, रोशन तायडे, विजयकुमार तायडे, रतन नाईक, मंगल डोंगरदिवे, जगदिश हातेकर, प्रशांत अवसरमोल, संतोष पवार, बाबुराम तायडे, राजु कवडकार, सुपा बांगर, अरुण पारवे, रामकृष्ण रजाने, गुलाबराव आठवले यांनी केले.1
- रोहणा येथील शाळेत शिक्षकांची पदे रिक्त; पालकांनी शाळेला ठोकले कुलूप शिक्षकांविरुद्ध पालकांचा रोष खामगाव: केंद्रीय मराठी प्राथमिक शाळेत दोन शिक्षकांची रिक्त पदे भरण्याची मागणी खामगाव तालुक्यातील रोहणा येथील पालक आणि ग्रामस्थ काही दिवसापासून करत होते.यासंदर्भात वारंवार निवेदने देऊनही शिक्षण विभागाने याकडे लक्ष न दिल्याने, संतप्त पालकांनी सोमवारी शाळेला कुलूप लावून पंचायत समितीसमोर आंदोलन केले आणि गटविकास अधिकारी यांच्या दालनासमोर विद्यार्थ्यांची 'शाळा' भरवली. रोहणा येथील या केंद्रीय मराठी प्राथमिक शाळेत गेल्या काही वर्षांपासून शिक्षकांची पदे रिक्त आहेत.विद्यार्थ्यांची संख्या पाहता,केवळ दोन शिक्षक गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी अपुरे पडत आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे.याविरोधात ग्रामस्थ आणि पालकांनी वेळोवेळी शिक्षण विभाग आणि स्थानिक लोकप्रतिनिधींना निवेदने दिली, परंतु प्रशासनाकडून केवळ आश्वासनेच मिळाली, प्रत्यक्षात कोणतीही कारवाई झाली नाही. या अन्यायाचा निषेध करण्यासाठी पालकांनी एकत्र येत शाळेच्या गेटला कुलूप ठोकले. त्यानंतर, त्यांनी विद्यार्थ्यांसह पंचायत समिती कार्यालयावर मोर्चा काढला. पंचायत समितीच्या समोर धरणे धरत पालकांनी आपल्या मागण्या मांडल्या. या आगळ्यावेगळ्या आंदोलनाचा एक भाग म्हणून, पालकांनी गटविकास अधिकारी यांच्या दालनात विद्यार्थी बसविले होते. मुलांच्या भविष्याचा प्रश्न आहे. शाळेत शिक्षकच नसतील, तर मुले काय शिकणार? आम्ही अनेकदा विनंत्या केल्या, पण कोणीही ऐकायला तयार नाही. म्हणून आज आम्हाला हे पाऊल उचलावे लागले. या आंदोलनाची दखल घेत, पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी पालकांशी चर्चा केली आणि रिक्त पदे लवकरच भरण्याचे आश्वासन दिले. येत्या आठ दिवसात आश्वासन पूर्ण न केल्यास आमरण उपोषण करणार असा इशारा पालकांनी दिला आहे.4
- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आणि पुढे पंतप्रधान व्हावेत - आमदार सिद्धार्थ खरात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आणि पुढे पंतप्रधान व्हावेत - आमदार सिद्धार्थ खरात1
- बुलढाणा जिल्ह्यातून सरकारला एक मोठा प्रश्न विचारला गेला आहे. रविकांत तुपकरांचा प्रश्न आहे की, 'नियमित कर्ज भरून आम्ही पाप केलंय का?' त्यांनी सरकारला हा संतप्त प्रश्न विचारला आहे. त्यांच्या मते, शेतकऱ्यांनी कर्ज नियमितपणे भरले तरी त्यांच्यासाठी काही केले जात नाही. रविकांत तुपकरांचा हेही आरोप आहे की, सरकार शेतकऱ्यांना फक्त ५० हजार रुपये देण्याची योजना आखत आहे, मात्र त्यांच्या मते शेतकऱ्यांना २ लाख रुपये प्रोत्साहन अनुदान द्यावे लागेल. त्यांच्या मते, सरकारने जर शेतकऱ्यांची मागणी पूर्ण केली नाही तर महाराष्ट्रात पुन्हा आंदोलन सुरू होईल. त्यांनी राज्यव्यापी दौऱ्यातून नव्या आक्रमक आंदोलनाचे संकेत दिले आहेत. त्यांच्या मते, सरकारने जर शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण केली नाहीत तर महाराष्ट्रात पुन्हा आंदोलन सुरू होईल. शेतकरी आता सरकारच्या धोरणांपासून निराश झाले आहेत आणि त्यांच्या मते सरकारने जर शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण केली नाही तर शेतकरी सरकारविरोधात मोठ्या प्रमाणावर आंदोलन करणार आहेत.1
- घाटंजी तालुक्यातील मानोलीमध्ये दोंघानी संपवलं जीवन,प्रेमसंबंधाचा हृदयद्रावक शेवट दहा वर्षापूर्वी झालेले प्रेम आणि कालांतराने दोघांचेही वेगवेगळ्या ठिकाणी झालेले विवाह व नंतर आपआपल्या संसारात रममान झालेले या प्रेमीयुगलाचा अचानक सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्क होतो. आणि जुन्या आठवणीनां उजाळा मिळतो. व राजस्थान येथुन प्रेयसी थेट प्रियकराला भेटण्यासाठी त्याच्या गावी येते आणि नंतर दोघेही विष प्राशन करुन मृत्यूला कवटाळतात. ही हृदयद्रायक घटना घडली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यात येणा-या मानोली या गावात. या घटनेमुळे मानोली गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.1