logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

गोपाळनगरमध्ये जुगारावर पोलिसांची धाड; ११ जणांवर गुन्हा खामगाव : गोपाळनगर परिसरात बेकायदेशीरपणे एका घरात सुरू असलेल्या 'एक्का-बादशहा' जुगारावर शिवाजीनगर पोलिसांनी धाड टाकून ११ जुगारींना रंगेहात पकडले आहे.या कारवाईत रोख रकमेसह मोबाईल व जुगाराचे साहित्य असा एकूण ४५ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ​ ​मिळालेल्या माहितीनुसार, एका महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात येऊन कौटुंबिक त्रासाबाबत तक्रार दिली होती.या तक्रारीच्या शहानिशेसाठी पोलीस पथक गोपाळनगर येथे गेले असता, उमेश चव्हाण याच्या घराच्या वरच्या मजल्यावरील खोलीत पैशांच्या हार-जीतवर ५२ ताश पत्यांचा 'एक्का-बादशहा' जुगार सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली.पोलीस निरीक्षक मंदार पुरी यांच्या मार्गदर्शनानुसार, पोउपनि अमित तळोले आणि सहकाऱ्यांच्या मदतीने पंचासमक्ष सदर ठिकाणी छापा टाकण्यात आला. या कारवाईत उमेश जीवनसिंग चव्हाण, जयसिंग प्रल्हाद सोळंके , नितीन आत्माराम बिलारे, आकाश रामेश्वर लाहुडकर,सूर्यकांत सुखदेव निमकर्डे,विजय काशिराम सुलताने,केशव सिताराम टाले,गुलचंद रामसिंग चव्हाण,पुरुषोत्तम दादाराव वखारे,अंबादास शिवनारायण जाधव,शंकर विठ्ठल कुकडे सर्व रा.गोपाळनगर या ११ जणांना जागीच पकडण्यात आले,तर काही इसम घटनास्थळावरून फरार होण्यात यशस्वी झाले.कारवाईदरम्यान पोलिसांनी आरोपींन कडून नगदी,मोबाईल व इतर साहित्यासह ​इतर ​असा एकूण ४५ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.याप्रकरणी पोलीस हेडकॉन्स्टेबल अमरसिंग पवार यांच्या फिर्यादीवरून उपरोक्त आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायदा कलम ४ व ५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

3 hrs ago
user_Shivaji Bhosale
Shivaji Bhosale
Journalist खामगाव, बुलढाणा, महाराष्ट्र•
3 hrs ago

गोपाळनगरमध्ये जुगारावर पोलिसांची धाड; ११ जणांवर गुन्हा खामगाव : गोपाळनगर परिसरात बेकायदेशीरपणे एका घरात सुरू असलेल्या 'एक्का-बादशहा' जुगारावर शिवाजीनगर पोलिसांनी धाड टाकून ११ जुगारींना रंगेहात पकडले आहे.या कारवाईत रोख रकमेसह मोबाईल व जुगाराचे साहित्य असा एकूण ४५ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ​ ​मिळालेल्या माहितीनुसार, एका महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात येऊन कौटुंबिक त्रासाबाबत तक्रार दिली होती.या तक्रारीच्या शहानिशेसाठी पोलीस पथक गोपाळनगर येथे गेले असता, उमेश चव्हाण याच्या घराच्या वरच्या मजल्यावरील खोलीत पैशांच्या हार-जीतवर ५२ ताश पत्यांचा 'एक्का-बादशहा' जुगार सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली.पोलीस निरीक्षक मंदार पुरी यांच्या मार्गदर्शनानुसार, पोउपनि अमित तळोले आणि सहकाऱ्यांच्या मदतीने पंचासमक्ष सदर ठिकाणी छापा टाकण्यात आला. या कारवाईत उमेश जीवनसिंग चव्हाण, जयसिंग प्रल्हाद सोळंके , नितीन आत्माराम बिलारे, आकाश रामेश्वर लाहुडकर,सूर्यकांत सुखदेव निमकर्डे,विजय काशिराम सुलताने,केशव सिताराम टाले,गुलचंद रामसिंग चव्हाण,पुरुषोत्तम दादाराव वखारे,अंबादास शिवनारायण जाधव,शंकर विठ्ठल कुकडे सर्व रा.गोपाळनगर या ११ जणांना जागीच पकडण्यात आले,तर काही इसम घटनास्थळावरून फरार होण्यात यशस्वी झाले.कारवाईदरम्यान पोलिसांनी आरोपींन कडून नगदी,मोबाईल व इतर साहित्यासह ​इतर ​असा एकूण ४५ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.याप्रकरणी पोलीस हेडकॉन्स्टेबल अमरसिंग पवार यांच्या फिर्यादीवरून उपरोक्त आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायदा कलम ४ व ५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • गोपाळनगरमध्ये जुगारावर पोलिसांची धाड; ११ जणांवर गुन्हा खामगाव : गोपाळनगर परिसरात बेकायदेशीरपणे एका घरात सुरू असलेल्या 'एक्का-बादशहा' जुगारावर शिवाजीनगर पोलिसांनी धाड टाकून ११ जुगारींना रंगेहात पकडले आहे.या कारवाईत रोख रकमेसह मोबाईल व जुगाराचे साहित्य असा एकूण ४५ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ​ ​मिळालेल्या माहितीनुसार, एका महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात येऊन कौटुंबिक त्रासाबाबत तक्रार दिली होती.या तक्रारीच्या शहानिशेसाठी पोलीस पथक गोपाळनगर येथे गेले असता, उमेश चव्हाण याच्या घराच्या वरच्या मजल्यावरील खोलीत पैशांच्या हार-जीतवर ५२ ताश पत्यांचा 'एक्का-बादशहा' जुगार सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली.पोलीस निरीक्षक मंदार पुरी यांच्या मार्गदर्शनानुसार, पोउपनि अमित तळोले आणि सहकाऱ्यांच्या मदतीने पंचासमक्ष सदर ठिकाणी छापा टाकण्यात आला. या कारवाईत उमेश जीवनसिंग चव्हाण, जयसिंग प्रल्हाद सोळंके , नितीन आत्माराम बिलारे, आकाश रामेश्वर लाहुडकर,सूर्यकांत सुखदेव निमकर्डे,विजय काशिराम सुलताने,केशव सिताराम टाले,गुलचंद रामसिंग चव्हाण,पुरुषोत्तम दादाराव वखारे,अंबादास शिवनारायण जाधव,शंकर विठ्ठल कुकडे सर्व रा.गोपाळनगर या ११ जणांना जागीच पकडण्यात आले,तर काही इसम घटनास्थळावरून फरार होण्यात यशस्वी झाले.कारवाईदरम्यान पोलिसांनी आरोपींन कडून नगदी,मोबाईल व इतर साहित्यासह ​इतर ​असा एकूण ४५ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.याप्रकरणी पोलीस हेडकॉन्स्टेबल अमरसिंग पवार यांच्या फिर्यादीवरून उपरोक्त आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायदा कलम ४ व ५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
    1
    गोपाळनगरमध्ये जुगारावर पोलिसांची धाड; ११ जणांवर गुन्हा 


खामगाव : गोपाळनगर परिसरात बेकायदेशीरपणे एका घरात सुरू असलेल्या 'एक्का-बादशहा' जुगारावर शिवाजीनगर पोलिसांनी धाड टाकून ११ जुगारींना रंगेहात पकडले आहे.या कारवाईत रोख रकमेसह मोबाईल व जुगाराचे साहित्य असा एकूण ४५ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
​
​मिळालेल्या माहितीनुसार, एका महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात येऊन कौटुंबिक त्रासाबाबत तक्रार दिली होती.या तक्रारीच्या शहानिशेसाठी पोलीस पथक गोपाळनगर येथे गेले असता, उमेश चव्हाण याच्या घराच्या वरच्या मजल्यावरील खोलीत पैशांच्या हार-जीतवर ५२ ताश पत्यांचा 'एक्का-बादशहा' जुगार सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली.पोलीस निरीक्षक मंदार पुरी यांच्या मार्गदर्शनानुसार, पोउपनि अमित तळोले आणि सहकाऱ्यांच्या मदतीने पंचासमक्ष सदर ठिकाणी छापा टाकण्यात आला. या कारवाईत उमेश जीवनसिंग चव्हाण, जयसिंग प्रल्हाद सोळंके , नितीन आत्माराम बिलारे, आकाश रामेश्वर लाहुडकर,सूर्यकांत सुखदेव निमकर्डे,विजय काशिराम सुलताने,केशव सिताराम टाले,गुलचंद रामसिंग चव्हाण,पुरुषोत्तम दादाराव वखारे,अंबादास शिवनारायण जाधव,शंकर विठ्ठल कुकडे सर्व रा.गोपाळनगर या ११ जणांना जागीच पकडण्यात आले,तर काही इसम घटनास्थळावरून फरार होण्यात यशस्वी झाले.कारवाईदरम्यान पोलिसांनी आरोपींन कडून नगदी,मोबाईल व इतर साहित्यासह ​इतर ​असा एकूण ४५ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.याप्रकरणी पोलीस हेडकॉन्स्टेबल अमरसिंग पवार यांच्या फिर्यादीवरून उपरोक्त आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायदा कलम ४ व ५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
    user_Shivaji Bhosale
    Shivaji Bhosale
    Journalist खामगाव, बुलढाणा, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • रिधोरा येथील वसंतरावबापू देशमुख विद्यालय परिपाठातून विद्यार्थी गिरवताहेत सामान्य ज्ञानाचे धडे! अकोला : शालेय जीवनात केवळ पुस्तकी ज्ञान पुरेसे नसून, बाह्य जगाचे भान असणे अत्यंत आवश्यक आहे. हीच बाब लक्षात घेऊन रिधोरा येथील स्व. वसंतरावबापू देशमुख विद्यालयात परिपाठाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दररोज सामान्य ज्ञानाचे धडे दिले जात आहेत. या नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडत असून, त्यांचा आत्मविश्वासही दुणावत असल्याचे दिसून येत आहे. आजच्या स्पर्धात्मक युगात सामान्य ज्ञानाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. भविष्यातील विविध स्पर्धा परीक्षांचा पाया शालेय वयातच मजबूत व्हावा, या उद्देशाने विद्यालयातील शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविला जात आहे. दररोज सकाळी होणाऱ्या परिपाठात विद्यार्थी देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, दिनविशेष, वैज्ञानिक शोध, इतिहास आणि भूगोलाशी संबंधित रंजक माहिती सर्वांसमोर मांडतात. परिपाठात नवीन माहिती सांगण्यासाठी विद्यार्थी दररोज वर्तमानपत्रे आणि संदर्भात्मक पुस्तकांचे नियमित वाचन करत आहेत. रोज शेकडो विद्यार्थ्यांसमोर उभे राहून माहिती मांडल्यामुळे मुलांमधील व्यासपीठाची भीती पूर्णपणे गळून पडली आहे. केवळ परीक्षेपुरते मर्यादित न राहता रोजच्या सरावामुळे विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती आणि आकलन क्षमता वाढत आहे. "केवळ पाठ्यपुस्तक नव्हे, तर बाह्य जगातील चालू घडामोडींचे ज्ञान विद्यार्थ्यांना व्हावे, हा आमचा प्रयत्न आहे. परिपाठातील या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाव्यतिरिक्त अवांतर वाचनाची गोडी निर्माण झाली आहे.
    1
    रिधोरा येथील वसंतरावबापू देशमुख विद्यालय

 परिपाठातून विद्यार्थी गिरवताहेत सामान्य ज्ञानाचे धडे!
अकोला : 
शालेय जीवनात केवळ पुस्तकी ज्ञान पुरेसे नसून, बाह्य जगाचे भान असणे अत्यंत आवश्यक आहे. हीच बाब लक्षात घेऊन रिधोरा येथील स्व. वसंतरावबापू देशमुख विद्यालयात परिपाठाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दररोज सामान्य ज्ञानाचे धडे दिले जात आहेत. या नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडत असून, त्यांचा आत्मविश्वासही दुणावत असल्याचे दिसून येत आहे.
आजच्या स्पर्धात्मक युगात सामान्य ज्ञानाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. भविष्यातील विविध स्पर्धा परीक्षांचा पाया शालेय वयातच मजबूत व्हावा, या उद्देशाने विद्यालयातील शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविला जात आहे. दररोज सकाळी होणाऱ्या परिपाठात विद्यार्थी देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, दिनविशेष, वैज्ञानिक शोध, इतिहास आणि भूगोलाशी संबंधित रंजक माहिती सर्वांसमोर मांडतात.
परिपाठात नवीन माहिती सांगण्यासाठी विद्यार्थी दररोज वर्तमानपत्रे आणि संदर्भात्मक पुस्तकांचे नियमित वाचन करत आहेत. रोज शेकडो विद्यार्थ्यांसमोर उभे राहून माहिती मांडल्यामुळे मुलांमधील व्यासपीठाची भीती पूर्णपणे गळून पडली आहे.
केवळ परीक्षेपुरते मर्यादित न राहता रोजच्या सरावामुळे विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती आणि आकलन क्षमता वाढत आहे.
"केवळ पाठ्यपुस्तक नव्हे, तर बाह्य जगातील चालू घडामोडींचे ज्ञान विद्यार्थ्यांना व्हावे, हा आमचा प्रयत्न आहे. परिपाठातील या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाव्यतिरिक्त अवांतर वाचनाची गोडी निर्माण झाली आहे.
    user_Anil dandi
    Anil dandi
    Farmer बाळापूर, अकोला, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • भारतीय संविधानाने अनुसूचित जातींना दिलेल्या ऐतिहासिक आणि एकत्रित आरक्षणात 'अ, ब, क, ड' उपवर्गीकरण करून आरक्षण संपविण्याचा डाव रचला जात असल्याचा गंभीर आरोप करत, जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यातील ५८ जातींच्या समाजबांधवांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. सोमवारी (दि. २७ जुलै २०२६) रोजी 'अनुसूचित जाती उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समिती'च्या नेतृत्वाखाली जळगाव जामोद येथे काढण्यात आलेल्या विराट मोर्चानंतर संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. शासनाच्या अन्यायकारक धोरणाविरोधात रस्त्यावर उतरलेल्या या महामोर्चातून शासनाला थेट इशारा देण्यात आला आहे. शहरातील भीम नगर येथून सुरू झालेला हा मोर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे राष्ट्रगीताचे गायन करून संपन्न झाला. या मोर्चामध्ये दीड हजारांहून अधिक महिला व पुरुष मोठ्या संख्येने अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने सहभागी झाले होते. आंदोलनकांच्या हातात संत शिरोमणी रविदास महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे बैनर व पोस्टर होते. सर्व महापुरुषांच्या जयघोषाने संपूर्ण जळगाव जामोद शहर दणाणून सोडले होते. कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी ठाणेदार सचिन बागुल यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शोषित, पीडित आणि सामाजिक वर्णव्यवस्थेत शूद्र मानल्या गेलेल्या ५९ जातींना एकत्र करून १३ टक्के आरक्षण दिले होते. मात्र, आज याच एकत्रित आरक्षणाला खिंडार पाडण्याचे आणि उपवर्गीकरणाच्या नावाखाली आरक्षण संपवण्याचे प्रयत्न होत असल्याने ५८ जातींचे समाजबांधव आक्रमक झाले आहेत. संघर्ष समितीचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच ५८ जातींमधील हजारो नागरिक व महिलांच्या उपस्थितीत अनुसूचित जाती उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समिती च्या वतीने उपविभागीय अधिकारी, जळगाव जामोद यांच्यामार्फत मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांना सविस्तर निवेदन पाठवून उपवर्गीकरणाची प्रक्रिया तात्काळ रद्द करण्याची मागणी करण्यात आली असून, शासनाविरोधात तीव्र लढा उभारण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. या विराट मोर्चात उत्तम नियोजन संघर्ष समितीचे पदाधिकारी उत्तम वानखडे, ज्ञानदेव इंगळे, सुनिल बोदडे, विजय तांदळे, शिवहरी रोजतकार, श्रीराम भिडे, विजय वानखडे, राहुल तायडे, सिद्धार्थ हेलोडे, संतोष वानखडे, रोशन तायडे, विजयकुमार तायडे, रतन नाईक, मंगल डोंगरदिवे, जगदिश हातेकर, प्रशांत अवसरमोल, संतोष पवार, बाबुराम तायडे, राजु कवडकार, सुपा बांगर, अरुण पारवे, रामकृष्ण रजाने, गुलाबराव आठवले यांनी केले.
    1
    भारतीय संविधानाने अनुसूचित जातींना दिलेल्या ऐतिहासिक आणि एकत्रित आरक्षणात 'अ, ब, क, ड' उपवर्गीकरण करून आरक्षण संपविण्याचा डाव रचला जात असल्याचा गंभीर आरोप करत, जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यातील ५८ जातींच्या समाजबांधवांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. सोमवारी (दि. २७ जुलै २०२६) रोजी 'अनुसूचित जाती उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समिती'च्या नेतृत्वाखाली जळगाव जामोद येथे काढण्यात आलेल्या विराट मोर्चानंतर संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. शासनाच्या अन्यायकारक धोरणाविरोधात रस्त्यावर उतरलेल्या या महामोर्चातून शासनाला थेट इशारा देण्यात आला आहे. शहरातील भीम नगर येथून सुरू झालेला हा मोर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे राष्ट्रगीताचे गायन करून संपन्न झाला. या मोर्चामध्ये दीड हजारांहून अधिक महिला व पुरुष मोठ्या संख्येने अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने सहभागी झाले होते. आंदोलनकांच्या हातात संत शिरोमणी रविदास महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे बैनर व पोस्टर होते. सर्व महापुरुषांच्या जयघोषाने संपूर्ण जळगाव जामोद शहर दणाणून सोडले होते.

कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी ठाणेदार सचिन बागुल यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शोषित, पीडित आणि सामाजिक वर्णव्यवस्थेत शूद्र मानल्या गेलेल्या ५९ जातींना एकत्र करून १३ टक्के आरक्षण दिले होते. मात्र, आज याच एकत्रित आरक्षणाला खिंडार पाडण्याचे आणि उपवर्गीकरणाच्या नावाखाली आरक्षण संपवण्याचे प्रयत्न होत असल्याने ५८ जातींचे समाजबांधव आक्रमक झाले आहेत.

संघर्ष समितीचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच ५८ जातींमधील हजारो नागरिक व महिलांच्या उपस्थितीत अनुसूचित जाती उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समिती च्या वतीने उपविभागीय अधिकारी, जळगाव जामोद यांच्यामार्फत मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांना सविस्तर निवेदन पाठवून उपवर्गीकरणाची प्रक्रिया तात्काळ रद्द करण्याची मागणी करण्यात आली असून, शासनाविरोधात तीव्र लढा उभारण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. या विराट मोर्चात उत्तम नियोजन संघर्ष समितीचे पदाधिकारी उत्तम वानखडे, ज्ञानदेव इंगळे, सुनिल बोदडे, विजय तांदळे, शिवहरी रोजतकार, श्रीराम भिडे, विजय वानखडे, राहुल तायडे, सिद्धार्थ हेलोडे, संतोष वानखडे, रोशन तायडे, विजयकुमार तायडे, रतन नाईक, मंगल डोंगरदिवे, जगदिश हातेकर, प्रशांत अवसरमोल, संतोष पवार, बाबुराम तायडे, राजु कवडकार, सुपा बांगर, अरुण पारवे, रामकृष्ण रजाने, गुलाबराव आठवले यांनी केले.
    user_अनिल भगत पत्रकार
    अनिल भगत पत्रकार
    जळगाव (जामोद), बुलढाणा, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आणि पुढे पंतप्रधान व्हावेत - आमदार सिद्धार्थ खरात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आणि पुढे पंतप्रधान व्हावेत - आमदार सिद्धार्थ खरात
    1
    शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आणि पुढे पंतप्रधान व्हावेत - आमदार सिद्धार्थ खरात
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आणि पुढे पंतप्रधान व्हावेत - आमदार सिद्धार्थ खरात
    user_विष्णु आखरे पाटील
    विष्णु आखरे पाटील
    पत्रकार बुलडाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • बुलढाणा जिल्ह्यातून सरकारला एक मोठा प्रश्न विचारला गेला आहे. रविकांत तुपकरांचा प्रश्न आहे की, 'नियमित कर्ज भरून आम्ही पाप केलंय का?' त्यांनी सरकारला हा संतप्त प्रश्न विचारला आहे. त्यांच्या मते, शेतकऱ्यांनी कर्ज नियमितपणे भरले तरी त्यांच्यासाठी काही केले जात नाही. रविकांत तुपकरांचा हेही आरोप आहे की, सरकार शेतकऱ्यांना फक्त ५० हजार रुपये देण्याची योजना आखत आहे, मात्र त्यांच्या मते शेतकऱ्यांना २ लाख रुपये प्रोत्साहन अनुदान द्यावे लागेल. त्यांच्या मते, सरकारने जर शेतकऱ्यांची मागणी पूर्ण केली नाही तर महाराष्ट्रात पुन्हा आंदोलन सुरू होईल. त्यांनी राज्यव्यापी दौऱ्यातून नव्या आक्रमक आंदोलनाचे संकेत दिले आहेत. त्यांच्या मते, सरकारने जर शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण केली नाहीत तर महाराष्ट्रात पुन्हा आंदोलन सुरू होईल. शेतकरी आता सरकारच्या धोरणांपासून निराश झाले आहेत आणि त्यांच्या मते सरकारने जर शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण केली नाही तर शेतकरी सरकारविरोधात मोठ्या प्रमाणावर आंदोलन करणार आहेत.
    1
    बुलढाणा जिल्ह्यातून सरकारला एक मोठा प्रश्न विचारला गेला आहे. रविकांत तुपकरांचा प्रश्न आहे की, 'नियमित कर्ज भरून आम्ही पाप केलंय का?' त्यांनी सरकारला हा संतप्त प्रश्न विचारला आहे. त्यांच्या मते, शेतकऱ्यांनी कर्ज नियमितपणे भरले तरी त्यांच्यासाठी काही केले जात नाही.

रविकांत तुपकरांचा हेही आरोप आहे की, सरकार शेतकऱ्यांना फक्त ५० हजार रुपये देण्याची योजना आखत आहे, मात्र त्यांच्या मते शेतकऱ्यांना २ लाख रुपये प्रोत्साहन अनुदान द्यावे लागेल. त्यांच्या मते, सरकारने जर शेतकऱ्यांची मागणी पूर्ण केली नाही तर महाराष्ट्रात पुन्हा आंदोलन सुरू होईल.

त्यांनी राज्यव्यापी दौऱ्यातून नव्या आक्रमक आंदोलनाचे संकेत दिले आहेत. त्यांच्या मते, सरकारने जर शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण केली नाहीत तर महाराष्ट्रात पुन्हा आंदोलन सुरू होईल. शेतकरी आता सरकारच्या धोरणांपासून निराश झाले आहेत आणि त्यांच्या मते सरकारने जर शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण केली नाही तर शेतकरी सरकारविरोधात मोठ्या प्रमाणावर आंदोलन करणार आहेत.
    user_बुलढाणा माझा न्युज
    बुलढाणा माझा न्युज
    बुलढाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • शेतकरी नेते रविकांत तुपकर नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या नाराजीचा आवाज बुलंद करत आहेत. त्यांनी एक संतप्त प्रश्न उपस्थित केला आहे की, 'नियमित कर्ज भरून आम्ही पाप केलंय का?' या प्रश्नाच्या माध्यमातून ते शेतकऱ्यांच्या असंतुष्टीला बल देत आहेत. तुपकर यांची ठाम मागणी आहे की, नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना केवळ ५० हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान न देता ते थेट २ लाख रुपये करावे. ते सध्या राज्यव्यापी दौऱ्यावर असून शेतकरी आणि कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन पुढील आंदोलनाची रणनीती आखत आहेत. सरकारने ही मागणी तातडीने मान्य केली नाही, तर नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना सोबत घेऊन महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा तुपकर यांनी दिला आहे. क्रांतिकारी संघटनेचे अध्यक्ष तथा संस्थापक असलेले रविकांत तुपकर यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
    1
    शेतकरी नेते रविकांत तुपकर नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या नाराजीचा आवाज बुलंद करत आहेत. त्यांनी एक संतप्त प्रश्न उपस्थित केला आहे की, 'नियमित कर्ज भरून आम्ही पाप केलंय का?' या प्रश्नाच्या माध्यमातून ते शेतकऱ्यांच्या असंतुष्टीला बल देत आहेत.

तुपकर यांची ठाम मागणी आहे की, नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना केवळ ५० हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान न देता ते थेट २ लाख रुपये करावे. ते सध्या राज्यव्यापी दौऱ्यावर असून शेतकरी आणि कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन पुढील आंदोलनाची रणनीती आखत आहेत.

सरकारने ही मागणी तातडीने मान्य केली नाही, तर नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना सोबत घेऊन महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा तुपकर यांनी दिला आहे. क्रांतिकारी संघटनेचे अध्यक्ष तथा संस्थापक असलेले रविकांत तुपकर यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
    user_SHEGAONlive
    SHEGAONlive
    Local News Reporter Buldana, Buldhana•
    20 hrs ago
  • नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांवर अन्याय चालणार नाही, असे सरकारने स्पष्ट केले आहे. मात्र, शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सरकारला तातडीने २ लाखांचे प्रोत्साहन अनुदान जाहीर करण्याची मागणी केली आहे. तुपकर यांच्या मते, नियमित कर्ज भरणारे शेतकरी या संकटकाळात विशेषतः मदतीचे पात्र आहेत. त्यांच्याकडे अशी मागणी सरकारपुढे ठेवली आहे की, त्यांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी २ लाखांचे प्रोत्साहन अनुदान जाहीर केले पाहिजे. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढणारे नेते रविकांत तुपकर यांनी स्पष्ट केले आहे की, जर सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर शेतकरी आंदोलन करण्यास भाग पाडले जातील. त्यामुळे सरकारला शेतकऱ्यांच्या हितसंरक्षणासाठी त्वरित निर्णय घेऊन त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याची गरज आहे.
    1
    नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांवर अन्याय चालणार नाही, असे सरकारने स्पष्ट केले आहे. मात्र, शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सरकारला तातडीने २ लाखांचे प्रोत्साहन अनुदान जाहीर करण्याची मागणी केली आहे.

तुपकर यांच्या मते, नियमित कर्ज भरणारे शेतकरी या संकटकाळात विशेषतः मदतीचे पात्र आहेत. त्यांच्याकडे अशी मागणी सरकारपुढे ठेवली आहे की, त्यांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी २ लाखांचे प्रोत्साहन अनुदान जाहीर केले पाहिजे.

शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढणारे नेते रविकांत तुपकर यांनी स्पष्ट केले आहे की, जर सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर शेतकरी आंदोलन करण्यास भाग पाडले जातील. त्यामुळे सरकारला शेतकऱ्यांच्या हितसंरक्षणासाठी त्वरित निर्णय घेऊन त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याची गरज आहे.
    user_जिजाऊ एक्सप्रेस २८ न्यूज
    जिजाऊ एक्सप्रेस २८ न्यूज
    News Anchor बुलडाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • रोहणा येथील शाळेत शिक्षकांची पदे रिक्त; पालकांनी शाळेला ठोकले कुलूप शिक्षकांविरुद्ध पालकांचा रोष खामगाव: केंद्रीय मराठी प्राथमिक शाळेत दोन शिक्षकांची रिक्त पदे भरण्याची मागणी खामगाव तालुक्यातील रोहणा येथील पालक आणि ग्रामस्थ काही दिवसापासून करत होते.यासंदर्भात वारंवार निवेदने देऊनही शिक्षण विभागाने याकडे लक्ष न दिल्याने, संतप्त पालकांनी सोमवारी शाळेला कुलूप लावून पंचायत समितीसमोर आंदोलन केले आणि गटविकास अधिकारी यांच्या दालनासमोर विद्यार्थ्यांची 'शाळा' भरवली. ​ रोहणा येथील या केंद्रीय मराठी प्राथमिक शाळेत गेल्या काही वर्षांपासून शिक्षकांची पदे रिक्त आहेत.विद्यार्थ्यांची संख्या पाहता,केवळ दोन शिक्षक गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी अपुरे पडत आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे.याविरोधात ग्रामस्थ आणि पालकांनी वेळोवेळी शिक्षण विभाग आणि स्थानिक लोकप्रतिनिधींना निवेदने दिली, परंतु प्रशासनाकडून केवळ आश्वासनेच मिळाली, प्रत्यक्षात कोणतीही कारवाई झाली नाही. या अन्यायाचा निषेध करण्यासाठी पालकांनी एकत्र येत शाळेच्या गेटला कुलूप ठोकले. त्यानंतर, त्यांनी विद्यार्थ्यांसह पंचायत समिती कार्यालयावर मोर्चा काढला. पंचायत समितीच्या समोर धरणे धरत पालकांनी आपल्या मागण्या मांडल्या. या आगळ्यावेगळ्या आंदोलनाचा एक भाग म्हणून, पालकांनी गटविकास अधिकारी यांच्या दालनात विद्यार्थी बसविले होते. मुलांच्या भविष्याचा प्रश्न आहे. शाळेत शिक्षकच नसतील, तर मुले काय शिकणार? आम्ही अनेकदा विनंत्या केल्या, पण कोणीही ऐकायला तयार नाही. म्हणून आज आम्हाला हे पाऊल उचलावे लागले. ​या आंदोलनाची दखल घेत, पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी पालकांशी चर्चा केली आणि रिक्त पदे लवकरच भरण्याचे आश्वासन दिले. येत्या आठ दिवसात आश्वासन पूर्ण न केल्यास आमरण उपोषण करणार असा इशारा पालकांनी दिला आहे.
    4
    रोहणा येथील शाळेत शिक्षकांची पदे रिक्त; पालकांनी शाळेला ठोकले कुलूप

शिक्षकांविरुद्ध पालकांचा रोष

खामगाव: केंद्रीय मराठी प्राथमिक शाळेत दोन शिक्षकांची रिक्त पदे भरण्याची मागणी खामगाव तालुक्यातील रोहणा येथील पालक आणि ग्रामस्थ काही दिवसापासून करत होते.यासंदर्भात वारंवार निवेदने देऊनही शिक्षण विभागाने याकडे लक्ष न दिल्याने, संतप्त पालकांनी सोमवारी शाळेला कुलूप लावून पंचायत समितीसमोर आंदोलन केले आणि गटविकास अधिकारी यांच्या दालनासमोर विद्यार्थ्यांची 'शाळा' भरवली. ​
रोहणा येथील या केंद्रीय मराठी प्राथमिक शाळेत गेल्या काही वर्षांपासून शिक्षकांची पदे रिक्त आहेत.विद्यार्थ्यांची संख्या पाहता,केवळ दोन शिक्षक गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी अपुरे पडत आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे.याविरोधात ग्रामस्थ आणि पालकांनी वेळोवेळी शिक्षण विभाग आणि स्थानिक लोकप्रतिनिधींना निवेदने दिली, परंतु प्रशासनाकडून केवळ आश्वासनेच मिळाली, प्रत्यक्षात कोणतीही कारवाई झाली नाही. या अन्यायाचा निषेध करण्यासाठी पालकांनी एकत्र येत शाळेच्या गेटला कुलूप ठोकले. त्यानंतर, त्यांनी विद्यार्थ्यांसह पंचायत समिती कार्यालयावर मोर्चा काढला. पंचायत समितीच्या समोर धरणे धरत पालकांनी आपल्या मागण्या मांडल्या. या आगळ्यावेगळ्या आंदोलनाचा एक भाग म्हणून, पालकांनी गटविकास अधिकारी यांच्या दालनात विद्यार्थी बसविले होते.
मुलांच्या भविष्याचा प्रश्न आहे. शाळेत शिक्षकच नसतील, तर मुले काय शिकणार? आम्ही अनेकदा विनंत्या केल्या, पण कोणीही ऐकायला तयार नाही. म्हणून आज आम्हाला हे पाऊल उचलावे लागले. ​या आंदोलनाची दखल घेत, पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी पालकांशी चर्चा केली आणि रिक्त पदे लवकरच भरण्याचे आश्वासन दिले. येत्या आठ दिवसात आश्वासन पूर्ण न केल्यास आमरण उपोषण करणार असा इशारा पालकांनी दिला आहे.
    user_Shivaji Bhosale
    Shivaji Bhosale
    Journalist खामगाव, बुलढाणा, महाराष्ट्र•
    7 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.