जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा उटी येथे साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा उटी येथे साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी! महागाव उटी स्थानिक जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा उटी येथे साहित्यसम्राट, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात आणि विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेचे मुख्याध्यापक श्री. अमजद पठाण सर यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी शाळेतील शिक्षक श्री. राहुल भगत सर, श्री. प्रतीक लोखंडे सर, श्रीमती प्रेरणा उरकुडे मॅडम, श्रीमती वृषाली पाटील मॅडम, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य आणि पदाधिकारी, ग्रामस्थ तथा विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर, त्यांच्या साहित्यावर आणि समाजकार्यावर अत्यंत प्रभावी भाषणे दिली. काही विद्यार्थ्यांनी अण्णाभाऊंच्या प्रसिद्ध 'माझी मैना गावाकडे राहिली' या पोवाड्याचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. यावेळी बोलताना शाळेचे मुख्याध्यापक श्री. अमजद पठाण सरांनी, "अण्णाभाऊ साठे हे केवळ एक शाहीर किंवा लेखक नव्हते, तर ते अन्यायाविरुद्ध लढा देणारे थोर समाजसुधारक होते. त्यांनी आपल्या साहित्यातून शोषित, कष्टकरी आणि वंचितांच्या वेदनांना वाचा फोडली. त्यांचे विचार आणि जीवनप्रवास आजच्या विद्यार्थी पिढीसाठी अत्यंत प्रेरणादायी आहे," असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. राहुल भगत सर यांनी केले, तर उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. त्यांच्या साहित्याने समाजाला संघर्ष स्वाभिमान आणि समतेची दिशा दिली त्यांच्या विचारांचा वारसा जपत समजहितासाठी कार्य करण्याची प्रेरणा आपण सर्वांनी घ्यावी हीच त्यांना खरी आदरांजली साहित्य पंडित लोकशाहीर अण्णाभाऊ साठे

- बाबाओं के ज्ञान पर भड़का Gen-Z: कहा- आप पतंजलि चलाओ, देश हम संभालेंगे!"1
- विष्णू की रसोई द्वारा आयोजित ग्रैड रैंप शो' नागपूर शहर मे होणे जा रहा1
- एस टी महामंडळाचा लपंडाव सुरू विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात..... तालुका प्रतिनिधी हिंगणा हिंगणा मार्ग वाघ उमरी ही बस शाळेच्या विद्यार्थ्यांकरिता नेहमी सुरू असते. परंतू शाळेच्या विद्यार्थ्यांसोबत नेहमी लपंडाव खेळत आहे दोन दोन विषयांचे तास निघून जातात परंतु एस टी महामंडळाचा लपंडाव मात्र सुरू उमरी वाघ येथील पालकांनी निवेदन देऊन सुद्धा प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचे आरोप गावकरी आणि विद्यार्थी करीत आहे.1
- वर्ध्याच्या भुगाव येथील कंपनीतून लोखंड चोरी; सावंगी पोलिसांनी अवघ्या दोन तासांत उलगडला गुन्हा वर्धा : भुगाव येथील पर्ल इंजिनिअरिंग कंपनीतून कच्चे लोखंड व सळईचे तुकडे चोरी करणाऱ्या चौघांना सावंगी पोलिसांनी अवघ्या दोन तासांत जेरबंद करत गुन्ह्याचा पर्दाफाश केला. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित ऑटोची तपासणी केली असता चोरीचा माल आढळून आला. चौकशीत तीन महिलांसह ऑटोचालकाने चोरीची कबुली दिली. आरोपींकडून चोरीस गेलेले लोखंड, सळईचे तुकडे आणि गुन्ह्यात वापरलेला ऑटो असा एकूण १.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.1
- ड्रग फ्री महाराष्ट्र, ड्रग फ्री मुंबई या नशामुक्ती जनजागृती अभियानाचा शुभारंभ ड्रग फ्री महाराष्ट्र, ड्रग फ्री मुंबई या नशामुक्ती जनजागृती अभियानाचा शुभारंभ1
- डिसेंबर 2027 पूर्वी स्वतंत्र विदर्भ राज्य मिळवणार; विदर्भ राज्य आंदोलन समितीची मिशन 2027 घोषणा वर्धा स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीला पुन्हा वेग देत विदर्भ राज्य आंदोलन समितीने 'मिशन 2027'ची घोषणा केली आहे. डिसेंबर 2027 पूर्वी स्वतंत्र विदर्भ राज्य मिळवण्याचा निर्धार समितीने वर्ध्यात पत्रकार परिषदेत व्यक्त केला आहे. या अभियानांतर्गत विदर्भातील 11 जिल्हे आणि 120 तालुक्यांमध्ये जनजागृती मेळावे आयोजित करण्यात येणार आहेत. तसेच 9 ऑगस्ट 2026 रोजी नागपुरातील दीक्षाभूमी ते संविधान चौक असा भव्य लॉंगमार्च काढण्यात येणार असून त्यानंतर जनसंकल्प जाहीरसभा होणार आहे. समितीच्या मते, विदर्भाच्या विकासासाठी स्वतंत्र राज्य आवश्यक असून सिंचन, रोजगार, उद्योग, आरोग्य आणि पायाभूत सुविधांतील अनुशेष दूर करण्यासाठी केंद्र सरकारने विदर्भ राज्य निर्मितीची प्रक्रिया तातडीने सुरू करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.1
- वणीत ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ उत्साहात संपन्न; हजारो नागरिकांनी घेतला लाभ1
- वर्धा नदीच्या फुगवट्यामुळे चंद्रपूर शहरात शिरले पुराचे पाणी; ५० हून अधिक घरे बाधित, चंद्रपूर-तेलंगणा महामार्ग बंद चंद्रपूर:चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या २४ तासांपासून पावसाने विश्रांती घेतली असली, तरी वर्धा नदीच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ झाल्याने चंद्रपूर शहरासह वाहतुकीला पुराचा मोठा फटका बसला आहे. वर्धा नदी फुगल्यामुळे तिच्या उपनद्या असलेल्या इरई आणि झरपट नदीतील पाणी मागे फिरल्याने (बॅक वॉटर) चंद्रपूर शहरातील सखल भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली असून चंद्रपूर ते राजुरा मार्गे तेलंगणा जोडणारा मुख्य रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला आहे. शहरात 'बॅक वॉटर'चा फटका; ५० हून अधिक घरांत शिरले पाणी वर्धा नदीचे पात्र तुडुंब भरल्याने झरपट आणि इरई नदीचे पाणी पुढे न जाता शहराच्या दिशेने मागे फिरले आहे. यामुळे आज पहाटेपासूनच चंद्रपूर शहरातील रहमतनगर, सहारा पार्क आणि भिवापूर वार्ड परिसरात पुराचे पाणी शिरायला सुरुवात झाली आहे. विशेषतः भिवापूर भागातील सुमारे ५० हून अधिक घरांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने नागरिकांची मोठी धांदल उडाली. मनपा व प्रशासनाकडून नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर परिस्थितीचे गांभीर्य ओळखून चंद्रपूर महानगरपालिका प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाने काल रात्रीपासूनच खबरदारीचा उपाय म्हणून बाधित भागातील कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्याची कारवाई वेगाने सुरू केली आहे. बॅक वॉटरची पातळी वाढत असल्याने पुढील काही तासांत परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता प्रशासनाने वर्तवली आहे. वर्धा नदीचा पूल पाण्याखाली; दक्षिण भारताकडे जाणारी वाहतूक ठप्प दरम्यान, वर्धा नदीने पात्र सोडल्याने चंद्रपूर ते राजुरा मार्गे तेलंगणा आणि दक्षिण भारताला जोडणारा वर्धा नदीचा पूल पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. पुलावरून सुमारे २ फूट पुराचे पाणी वाहत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने काल रात्रीपासूनच हा मार्ग वाहतुकीसाठी बंद केला आहे. रस्ता बंद झाल्याने पुलाच्या दोन्ही बाजूला तेलंगणा व दक्षिण भारताच्या दिशेने जाणाऱ्या मालवाहू ट्रकच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी घटनास्थळी बंदोबस्त तैनात केला असून, नदीची पाणी पातळी ओसरेपर्यंत हा मार्ग बंदच राहणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.1